३० सप्टेंबर २०२२

भारतातील थंड हवेची ठिकाणे

महाराष्ट्र
१.महाबळेश्वर
२. पाचगणी
३. माथेरान

हिमाचल प्रदेश
१.कुलु
२.मनाली
३.शिमला
४. डलहौसी

उत्तराखंड
१.मसुरी
२.नैनिताल

तामिळनाडू
१. उदगमंडलम
२.कोडाईकॅनॉल

राजस्थान
१. माउंट अबू

मध्य प्रदेश
१. पंचमढी

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :   भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

Q.1 जागतिक पत्रकरिता स्वातंत्र्य निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा?
1) १५० वा
2) १६० वा
3) १७० वा
4) १५४ वा
उत्तर 150

Q.2 प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
1) ५३वा
2) ५४वा
3) ५५वा
4) ५६ वा
उत्तर 54 वा

Q.4 अलीकडे स्वदेशी बनावटीच्या...... या युद्धनौकेचे जलअवतरण करण्यात आले?
1) कारागिरी
2) तारागिरी
3) विक्रांत
4) यापैकी नाही
उत्तर तरागिरी

Q.6 सिंगापूर ने भारताची माजी नौदल प्रमुख..... यांना मेरीटोरियस सर्विस मिडल प्रदान केले?
1) सुनील लांबा
2) राकेश सक्सेना
3) राकेश यादव
4) यापैकी नाही
उत्तर सुनील लांबा

Q.7 अटल इनोव्हेशन मिशनला..... वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे?
1) 2023
2) 2024
3) 2025
4) 2026
उत्तर 2023

Q.8 राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?
1) जम्मू काश्मीर
2) पंजाब
3) ओडिसा
4) बंगळूर
उत्तर जम्मू काश्मीर

Q.9 बिमस्टेक शिखर परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?
1) कोलंबो श्रीलंका
2) दिल्ली भारत
3) टोकियो जपान
4) बीजिंग चीन
उत्तर कोलंबो श्रीलंका

Q.10 आंतरराष्ट्रीय भुवैज्ञानिक काँग्रेस परिषद 2022 कोठे आयोजित करण्यात आली?
1) दिल्ली
2) मुंबई
3) बंगळूर
4) कोलकत्ता
उत्तर दिल्ली

अभयारण्य आणि जिल्हे

१) मयुरेश्वर अभयारण्य पुणे

२) सागरेश्वर अभयारण्य सांगली

३) ताम्हिणी अभयारण्य पुणे

४) अनेर अभयारण्य धुळे

५) यावल अभयारण्य जळगाव

६) येडशी अभयारण्य उस्मानाबाद

७) गौताळा अभयारण्य औरंगाबाद

८) टीपेश्वरअभयारण्य यवतमाळ

९)इसापूर अभयारण्य यवतमाळ

१०)मेळघाट अभयारण्य अमरावती

११)काटेपूर्णा अभयारण्य वाशिम

१२)वान अभयारण्य अमरावती

१३)पैनगंगा अभयारण्य नांदेड

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन.

संतसाहित्याचे आणि लोकवाड:मयाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र अनंत देखणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते.

सुमारे 34 वर्षे नोकरी करून ते 2014 मध्ये निवृत्त झाले.

'भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भातील' या त्यांच्या प्रबंधास पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली.

या प्रबंधाला डॉ. मु. श्री. कानडे पुरस्कार समितीचाही पुरस्कार मिळाला आहे.

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

वादळांचे प्रकार

धुळीचे किंवा रेतीचे वादळ

घूर्णवात

पावसाचे वादळ

बर्फाचे वादळ

मेघगर्जनेचे वादळ

चक्रीवादळ

जगातील गवताळ प्रदेश

 
पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात.

गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत.

पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी २४ % भूक्षेत्रावर गवताळ प्रदेश आहेत. एकूण गवताळ क्षेत्रापैकी ७१ % क्षेत्र उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाने व्यापले आहे. ६ % क्षेत्र पर्वतीय गवताळ प्रदेशाचे आहे. 

उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश

-सॅव्हाना (आफ्रिका),
-लानोज व कँपोज (द. अमेरिका)
क्विन्सलँड (ऑस्ट्रेलिया)
द पार्कलँड (आफ्रिका)

समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश

-प्रेअरी (उ. अमेरिका),
-पँपास (द. अमेरिका),
-व्हेल्ड (आफ्रिका),
-स्टेप (यूरेशिया),
-डाऊन्स (ऑस्ट्रेलिया)
-कॅटनबरी (न्यूझीलंड)

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 या वर्षासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे.

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबरला दिल्लीत होणार असून त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी २०२० च्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा आज केली.

५२ व्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अभिनेत्री हेमा मालिनी, पूनम ढिल्लो, टी. एस. नागभरणा आणि गायक उदित नारायण यांची समिती नेमण्यात आली होती.

80 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका

पश्चिम विभागने पटकावले दुलीप करंडकचे जेतेपद.

पश्चिम विभागाने रविवारी दुलीप करंडकाच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली.

पश्चिम विभागने दक्षिण विभागावर 294 धावांनी विजय मिळवला.

याआधी 2009-10 मध्ये पश्चिम विभागाने दुलीप करंडक जिंकला होता.

तब्बल 12 वर्षांनंतर त्यांनी या स्पर्धेचे जेतेपद.

पश्चिम विभागाचे हे 19 वे विजेतेपद आहे.

पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा केल्यानंतर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 327 धावा करीत 57 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यशस्वी जैसवालचे खणखणीत द्विशतक (265 धावा) व सर्फराझ खानचे दमदार शतकाच्या (नाबाद 127 धावा) जोरावर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 4 बाद 585 या धावसंख्येवर डाव घोषित केला. विजयासाठी 529 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण विभागाने 234 धावाच केल्या.

२९ सप्टेंबर २०२२

8 ऑक्टोबर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे चालू घडामोडी मुद्दे

1. राजीव कुमार 25 वे निवडणूक आयुक्त
2. एस. सोमनाथ इस्रोचे नवीन अध्यक्ष
3. लता मंगेशकर
4. शेन वॉर्न
5. ऊर्जीत पटेल
6. एन डी पाटील
7. सिंधुताई सपकाळ
8. गिल्बर्ट होंगबो ILO चे नवीन अध्यक्ष
9. बिरजू महाराज
10. अनिल अवचट
11. शिंजो अबे
12. मनोज पांडे
13. पंडित शिवकुमार
14. के शंकर नारायण
15. सुमन बेरी नीती आयोग उपाध्यक्ष
16. माधुरी पुरी बुच सेबीचे अध्यक्ष
17. शेख मोहम्मद बिन अल झायेद
18. ऑस्कर पुरस्कार 2022
19. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022
20. जागतिक प्रसार माध्यम स्वतंत्र अहवाल
21. IPL क्रिकेट स्पर्धा 2022
22. जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2021
23. जागतिक आनंद अहवाल 2022
24. 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार
25. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2022
26. रामसर यादी 2022
27. पद्म पुरस्कार 2022
28. भौगोलिक निर्देशांक 2022
29. NDB चा नवीन सदस्य इजिप्त
30. EOS -4 पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपण
31. जागतिक वारसा स्थळे
32. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021
33. लोकशाही निर्देशांक 2021
34. हेनली पारपत्र निर्देशांक 2022
35. जागतिक आरोग्य दिन 2022
36. थेट परकीय गुंतवणूक 2021-22
37. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका
38. उत्तराखंड विधानसभा निवडणुका
39. पंजाब विधानसभा निवडणुका
40. गोवा विधानसभा निवडणुका
41. मणीपुर विधानसभा निवडणूका
42. राज्यातील 28 महानगरपालिका
43. जागतिक वन्य दिवस 2022
44. संरक्षणावर सर्वाधिक खर्च अहवाल
45. संरक्षणावरील सिप्रीचा निर्यात अहवाल
46. संरक्षणावरील सिप्रीचा आयात अहवाल
47. INS वागशिर पाणबुडी जलावरण
48. 75 वी जागतिक आरोग्य सभा
49.UNEP ध्वनी प्रदूषण अहवाल
50. QUAD ची चौथी परिषद
51. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022
52. दादासाहेब फाळके आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 
53. 2022 चे संसद रत्न पुरस्कार
54. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022
55. मिस युनिव्हर्स व मिस वर्ल्ड स्पर्धा
56. ICC क्रिकेट पुरस्कार 2021
57. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा अहवाल
58. जागतिक वन अहवाल 2022
59. 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
60. साहित्य अकादमी पुरस्कार 2021
61. पुलित्झर पुरस्कार 2022
62. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
63. 31वा सरस्वती सन्मान 2021
64. जागतिक अन्न पुरस्कार
65. ग्रॅमी पुरस्कार 2022
66. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022
67. जागतिक गुंतवणूक अहवाल 2022
68. सिक्कीम चे फुलपाखरू ब्ल्यू Duke
69. जागतिक पर्यावरण दिवस
70. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2022
71. उबेर कप
72. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2022
73. मिताली राज
74. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021
75. विश्व अथलेटिक्स चॅम्पियनशिप
76. एअरटेल पेमेंट बँक
77. श्री. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
78. सानिया मिर्झा
79. निती आयोग निर्यात सज्जता निर्देशांक
80. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा
81. IIFA awards 2022
82. टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार
83. देवेंद्र झांझरिया पद्मभूषण
84. महारत्न दर्जा कंपन्या
85. राष्ट्रीय जल पुरस्कार
86. भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु

127 वे घटनादुरुस्ती विधेयक 2021 :



◆ मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करणारे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक 09 ऑगस्ट 2021 रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते.

◆ 102 व्या घटना दुरुस्ती विधेयकातील काही तरतुदी स्पष्ट करण्यासाठी, तसेच मागासवर्गीयांसंबंधित राज्यांचा अधिकार पूर्ववत करण्यासाठी संसदेत हे विधेयक मांडण्यात आले.

◆ केंद्र आणि प्रत्येक राज्याद्वारे स्वतंत्र ओबीसी यादया तयार केल्या जातात. राज्य घटनेतील कलम 15[4], 15[5] आणि 16[4] राज्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची यादी घोषित करण्याचे स्पष्टपणे अधिकार प्रदान करतात.

◆ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक 105 वी घटनादुरुस्ती कायदयात रुपांतरीत झाले.

भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली

🟠

🔹भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे, जे भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील.

🔸एनडीएचे माजी विद्यार्थी सप्टेंबर 2019 मध्ये पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले आणि 31 मे 2021 रोजी सेवेतून निवृत्त होईपर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

🔹त्यांनी अनेक नियुक्त्या केल्या आहेत आणि त्यांना बंडखोरीविरोधी कारवायांचा व्यापक अनुभव आहे.


Ksagarfocus

२७ सप्टेंबर २०२२

विधान परिषद असलेले राज्य

♦️ निर्मितीपासूनच विधान परिषद असलेले राज्य :- बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा.

♦️ आंध्रप्रदेश :- 1957 मध्ये निर्माण करण्यात आली. 1985 मध्ये बरखास्त करण्यात आली आणि 2005 मध्ये पुन्हा निर्माण करण्यात आली.

♦️ पंजाब & पश्चिम बंगाल :- 1969 मध्ये विधानपरिषद बरखास्त करण्यात आली.

♦️ तामिळनाडू :- 1986 मध्ये बरखास्त करण्यात आली. 2010 मध्ये निर्मितीचा ठराव पास करण्यात आला. सत्तापालट झाल्याने पुन्हा बरखास्त करण्याचा निर्णय झाला. सध्या संसदेत प्रलंबीत.

♦️ मध्यप्रदेश :- 7व्या घटनादुरुस्तीने (1956) निर्मितीची तरतूद. मात्र राष्ट्रपतीद्वारे अधिसूचना काढण्यात आली नाही.

♦️ सध्या राजस्थान आणि आसाम राज्यात विधानपरिषद निर्मितीची प्रक्रिया चालू आहे.

♦️ ओडिशा विधानसभेने नुकताच विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.

👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प

♦️  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

♦️  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

♦️  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

♦️  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

♦️  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

♦️  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

♦️  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

♦️  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

♦️  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

♦️  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

♦️  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

♦️  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

♦️  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

♦️  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

♦️  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

♦️  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

♦️  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

♦️  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

♦️  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

♦️  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

♦️  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

♦️  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

♦️  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

१० सप्टेंबर २०२२

स्पर्धात्मक चालू घडामोडी


१) पहिला “लता मंगेशकर पुरस्कार" कोणाला घोषित झाला आहे?

- नरेंद्र मोदी


२) "नॉट जस्ट ए नाईट वाचमन माय इनिंग्स विथ बीसीसीआय" पुस्तक कोणाचे आहे?

- विनोद राय


३) अलीकडेच कोणत्या दक्षिण आशियाई देशाने स्वतःला “डीफालटर" घोषित केले आहे?

- श्रीलंका


४) नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यां “१०६४ भष्टाचार विरोधी app" सुरु केले आहे ?

- उतराखंड


५) अलीकडेच कोणत्या राज्याच्या "कांगडी चाय" ला GI tag भेटला आहे ?

- हिमाचल प्रदेश


६) भारत आणि कोणत्या देशात “२ + २ डायलोग" आयोजित केला आहे?

- अमेरिका


७) सध्या चर्चेत असलेले "उमिया माता मंदिर" कोणत्या राज्यात आहे?

- गुजरात पोलीस

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा प्रश्नसंच


1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे?
A 3 रे
B 2 रे
C 4 थे
D 6 वे
उत्तर D

2 6 मार्चला महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यानुसार 2025 पर्यन्त राज्याची अर्थव्यवस्था किती ट्रेलियन अमेरिकन डॉलर वाढविणे निश्चित केले आहे?
A 1
B 3
C 4
D यापैकी नाही
उत्तर A

3 शिखर उद्योजकता विकास संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे?
A औरंगाबाद
B पुणे
C नागपूर
D रायगड
उत्तर D

4 क्वॉलिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 नुसार भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
A 7
B 9
C 5
D 2
उत्तर C
5 लोकशाही निर्देशक 2019 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 55
B 41
C 39
D 42
उत्तर D

6 भ्रष्टाचार आकलन निर्देशक 2018 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 80
B 78
C 90
D 81
उत्तर B

7 मंडल धरण प्रकल्प झारखंड राज्यात उत्तर कोयल नदीवर उभारला जात आहे तर या प्रकल्पातुन किती मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे?
A 30
B 24
C 28
D 22
उत्तर C

8 ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या रक्षणासाठी सुरू केले आहे?
A गांडूळ
B उंदीर
C बेडूक
D मुंगूस
उत्तर D

9 आशिया आरोग्य परिषद ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या शहरात पार पडली?
A चेन्नई
B सिमला
C पुणे
D दिल्ली
उत्तर D

10 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल 2019 च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक जन्मदर आहे?
A उत्तरप्रदेश
B महाराष्ट्र
C बिहार
D मध्यप्रदेश
उत्तर C

11 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल अहवाल प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
A 2010
B 2008
C 2005
D 2002
उत्तर C

12 घडले कसे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A विद्या बाळ
B गिरीश कर्नाड
C राजा ढाले
D नीलम शर्मा
उत्तर B

चालू घडामोडी

Q.1 "हर घर जल" प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : गोवा


Q.2 देशातील पहिली इलेक्ट्रिकल डबल डेकर बस कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आली?

उत्तर : मुंबई


Q.3 खालीलपैकी कोणत्या बँकेने केरळमध्ये पहिली सर्व महिला शाखा उघडली?

उत्तर : एचडीएफसी


Q.4 खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे?

उत्तर : झुलन गोस्वामी


Q.5 खालीलपैकी कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात येणार आहे?

उत्तर : चंदीगड


Q.6 थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या जोडीने सुवर्णपदक जिंकले?

उत्तर : प्रमोद सुकांत


Q.7 महिला चॅम्पियन लीग मध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू कोण?

उत्तर : मनीषा कल्याण


Q.8 अलीकडे समर बॅनर्जी यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर : फुटबॉल


Q.9 जगामध्ये सगळ्यात मोठा आणि सर्वाधिक पोस्ट ऑफिस ची संख्या असणारा डाक विभाग कोणत्या देशात आहे?

उत्तर : भारत


Q.10 जी-20 शिखर परिषद 2023 यजमानपद कोणता देश भूषवणार आहे?

उत्तर : भारत

०९ ऑगस्ट २०२२

नक्की वाचा :- महत्त्वाच्या संस्था


1. G7 [Group of 7]

- स्थापना 1975

- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


2. BRICS

- स्थापना: 2006

- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


3. Asian Development Bank [ADB]

- स्थापना: 19 डिसेंबर 1966

- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स


4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]

- स्थापना: 16 जानेवारी 1987

- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ 

- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


MPSC मॅजिक ठोकळा


5. ASEAN [Association of South East Asian Nation]

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967

- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]

- स्थापना: 6 जून 1997

- मुख्यालय: ढाका, बांगलादेश

- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]

- स्थापना: 1960

- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

- सदस्य संख्या: 13


8. IBSA 

- स्थापना: 6 जून 2003

- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे


★ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 


◆ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

◆ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

◆ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

◆ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

◆ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

◆ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998 

◆ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

◆ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

◆  गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

◆ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014

संयुक्त पूर्व परीक्षा

 नमस्कार मित्रांनो,


आज आपण शेवटच्या 60 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..


⭕️ संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.


⭕️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी गाठाळ सर किंवा कठारे सर या दोघांपैकी एका चे पुस्तक आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा


⭕️भगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.


⭕️पॉलिटी-

 या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.


⭕️अर्थशास्त्र-

 येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.


⭕️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.


⭕️ चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.


⭕️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.


⭕️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.

त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.


❇️ अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.


शेवटच्या दहा दिवसांमध्ये लढाईस सज्ज होऊया.


 नमस्कार मित्रांनो,


 परीक्षा अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे

 त्यामुळे आता घाई गडबड न करता, एकदम आत्मविश्‍वासाने आपल्याला परीक्षेला सामोरे जायचा आहे.

 त्यासाठी आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा

 की, माझं कसं होणार?,

 परीक्षा खूप अवघड असते,

 मी पास होईल का नाही??

 स्पर्धा खूप आहे,

 मी तर नुकताच अभ्यास सुरू केला आहे.


 असे बरेच प्रश्न मनात गोंधळ करून जातात

 त्यामुळे यावर एकच रामबाण उपाय तो म्हणजे

 ह्या कटकटी पासून दूर राहा.

 आणि फक्त आणि फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास यावरच पूर्णता तुम्ही लक्ष दिले पाहिजे.


 आता आपण शेवटच्या दहा दिवसांमध्ये नेमकं काय केलं पाहिजे यावर सविस्तरपणे चर्चा करूया.


1. आता या स्टेजला नवीन पुस्तक हातात घेऊ नका जे काय आधी वाचले तेच पुन्हा पुन्हा रिविजन करा.


2. जर तुम्ही मायक्रो नोट्स शॉर्ट नोट्स काढल्या असतील तर त्याच रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा.


3 निगेटिव्ह लोकांपासून दूर रहा.


4. सी सॅट ला इथून पुढे जास्त वेळ दिला तरी हरकत नाही.


5. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमची तब्येत आणि आरोग्य याकडे तुम्ही कदापिही दुर्लक्ष करू नका कारण की वर्षांची मेहनत ही आजारी पडून घालवू नका नियमित शेडूल ठेवा योग्य तो व्यायाम करा.


6. खाण्याकडे पण लक्ष द्या.

 जेवणाची वेळ यामध्ये बदल करू नका

 जागरण शक्यतो टाळा.

 वडापाव समोसा यासारखे जंक फूड किंवा पिझ्झा वगैरे असं पदार्थ खाणे टाळा.

 शक्यतो फूट प्लेट्स, पौष्टिक आहार घ्या.


7. टेन्शन तर सर्वांनाच येतो अगदी मलाही येतो

 मग एकच डायलॉग आठवायचा,

 बोले तो टेन्शन नही लेनेका मामू. 😁


8. शिस्तप्रिय बना, आणि शेडूल प्रॉपर पाळा

 उगीचच परीक्षा जवळ आली म्हणून 14 तास पण राहता सोळा तास करण्याच्या भानगडीत पडू नका.


9. कुठल्याही परिस्थितीत तणाव आला तर शांत राहण्याचा प्रयत्न करा.


10. दुसऱ्याला दाखवायचा आहे म्हणून स्वतःचा हुशारी पणा दाखवू नका.

 किंवा मला किती येत आहे त्याला येत नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून स्वतःचा कॉन्फिडन्स लूज होऊ देऊ नका.


11.शक्यतो वरील गोष्टी अमलात आणण्याचा प्रयत्न करा.


12.CSAT ला वेळ देता योग्य आहे पण g.s. कडेपण दुर्लक्ष नको.


13. कारण  सुद्धा तितकाच महत्त्वाचा विषय आहे तुम्हाला जर सत्तर ऐंशी मार्क पडले तर तुम्ही स्पर्धेत ना बाहेर पण होऊ शकतात त्यामुळे किमान शंभर चा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करा.


14. कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा.


15. पेपरच्या दिवशी नेमकं काय करायचं हे आपण पुढील भागात पाहू या.

 त्यामध्ये आपण पेपरच्या दिवशी स्वतःचं टेंपरामेंट कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचं या गोष्टी आपण पाहणार आहोत..


 क्रमश..


०८ ऑगस्ट २०२२

भारतातील प्रथम महिला [सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे]


1] जागतिक सौंदर्य - रीटा फरिया


2] ऑलिम्पिक पदक विजेता - कर्णम मल्लेश्वरी


3] एअरलाईन पायलट - दुर्बा बॅनर्जी


4] अंतराळात जाणारी पहिली  - कल्पना चावला


5] माउंट एव्हरेस्ट - बचेंद्री पाल 


6] इंग्लिश खाडीमध्ये पोहोणारी -आरती साहा 


7] "भारतरत्न" प्राप्त करणारे संगीतकार - एम.एस. सुब्बुलक्ष्मी


8] आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक - कमलजित संधू


9] बुकर पुरस्कार विजेता - अरुंधती रॉय


10] डब्ल्यूटीए टायटल विनर - सानिया मिर्झा


11] नोबेल पारितोषिक विजेता - मदर टेरेसा


12] ज्ञानपीठ पुरस्कार विजेता - आशापूर्णा देवी


13] अशोक चक्र प्राप्तकर्ता - निरजा भनोट


14] राष्ट्रपती  - श्रीमती प्रतिभा पाटील


15] पंतप्रधान - श्रीमती इंद्र गांधी


16] मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)


17] सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश - मीरा साहिब फातिमा बीबी


18] संयुक्त राष्ट्रातील राजदूत - विजयालक्ष्मी पंडित


19] केंद्रीय मंत्री - राजकुमारी अमृता कौर

 

20] मिस युनिव्हर्स - सुष्मिता सेन


21] राज्यपाल - सरोजिनी नायडू


22] शासक (दिल्लीची गादी) - रझिया सुल्तान


23] आयपीएस अधिकारी - किरण बेदी  


भारतातली जागतिक वारसा स्थळे



संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.


आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.


▪️सांस्कृतिक


1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश


2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र


3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार


4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)


5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात


6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र


7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट


8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र


9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र


10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश


11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू


12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक


13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू


14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक


15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले


16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर


17) हमायूनची कबर, दिल्ली


18) खजुराहो, मध्यप्रदेश


19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार


20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)


21) कतुब मिनार, दिल्ली


22) राणी की वाव, पटना, गुजरात


24) लाल किल्ला, दिल्ली


25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश


26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा


27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश


28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड


29) जतर मंतर, जयपूर


30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत


▪️नसर्गिक


1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश


2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम


3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम


4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान


5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल


6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड


7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)


▪️मिश्र


1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम


▪️UNESCO बाबत


संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

स्पर्धात्मक चालू घडामोडी


Q.1) कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 26 जुलै


Q.2) अलीकडेच कोणत्या देशाने उष्णतेच्या लाटांमुळे रेड अलर्ट जारी केला आहे?

>> इंग्लंड


Q.3) 13 वा पीटर्सबर्ग हवामान संवाद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?

>> बर्लिन


Q.4) यंदाचा 'माणूस' कार श्री.ग माजगावकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

>> अरुण खोपकर


Q.5) भारतातील पहिला प्रामाणिक हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे?

>> बुऱहानपूर ( मध्य प्रदेश)


Q.6) 2048 मध्ये कोणत्या देशाने ऑलम्पिक खेळ आयोजित करण्याची घोषणा केली आहे?

>> भारत


Q.7) "द रिझेलिएंट एंटरप्रेन्योर" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

>> ध्रूती शहा


Q.8) 2023 मध्ये 19 वी जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात येत आहे?

>> बुडापेस्ट, हंगेरी


Q.9) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

>> रामदास तडस


Q.10) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून भारताच्या कोणत्या खेळाडूला बाहेर काढण्यात आले आहे?

>> नीरज चोप्रा


Q.1) बांगलादेशमधील भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

>> प्रणय कुमार वर्मा


Q.2) सेमीकंडक्टर पॉलिसी 2022-27 लाँच करणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे?

>> गुजरात


Q.3) गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT सिटी) येथे ‘इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (IIBX) कोणाच्या हस्ते लाँच झाले आहे?

>> नरेंद्र मोदी


Q.4) महिला हक्क जागृतीसाठी ‘महतरी न्याय रथ’ कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे?

>> छत्तीसगड


Q.5) कोणत्या संस्थेने संगीतातील उत्कृष्ठेसाठी दिनेश शहारा जीवन गौरव पुरस्कार सुरु केला?

>> दिनेश शहारा फाऊंडेशन (DSF)


Q.6) कॉमनवेल्थ गेम्स 2022: वेटलिफ्टर मीराबाई चानुने कोणते पदक जिंकले?

>> सुवर्ण


Q.7) कॉमनवेल्थ गेम्स 2022: वेटलिफ्टर संकेत सरगरने कोणते पदक जिंकले?

>> रौप्य


Q.8) कॉमनवेल्थ गेम्स 2022: वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने कोणते पदक जिंकले?

>> कांस्य


Q.9) 300 वर्षांतील सर्वात मोठा गुलाबी हिरा “लुलो रोज” कोणत्या ठिकाणी सापडला आहे?

>>  अंगोला (मध्य आफ्रिका)


Q.10) कोणत्या स्कूलने भारतातील नाविन्यपूर्ण आणि पहिला शिकवणारा रोबोट, ईगल रोबोट लॉन्च केला आहे?

>> इंडस इंटरनॅशनल स्कूल


Q.11) व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

>> 30 जुलै


Q.12) 'जागतिक रेंजर दिन' जागतिक स्तरावर केव्हा साजरा केला जातो?

>> 31 जुलै


Q.1) दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोण रुजू होणार आहेत?

>> संजय अरोरा 


Q.2) कॉमनवेल्थ २०२२ स्पर्धेत तिसरे सुवर्ण पदक कोणी जिंकले?

>> अचिंता शेऊली


Q.3) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारी सर्वात लहान भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? 

>> अनाहत सिंग 


Q.4) युरोपियन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कोणत्या देशाने सॉकर चॅम्पियनशिप जिंकली?

>> इंग्लंड 


Q.5) पृथ्वीचा सर्वात लहान दिवस म्हणून कोणता दिवस नोंदवला गेला आहे?

>> 29 जुलै 


Q.6) अलीकडेच कोणत्या सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण 2021-22 चे अनावरण केले आहे?

>> दिल्ली


Q.7) 2021 मध्ये विधिमंडळ अधिवेशन आयोजित करण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे?

>> केरळ


Q.8) 3रा भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय लष्करी सराव “एक्स VINBAX 2022” कोठे सुरू झाला आहे?

>> हरियाणा


Q.9) कारगिल सेक्टरमधील द्रास येथील पॉइंट 5140 या “ऑपरेशन विजय” मधील गनर्सच्या सर्वोच्च बलिदानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी काय नाव देण्यात आले?

>> गन हिल


Q.10) बाळांना नियमित स्तनपान देण्यावर भर देण्यासाठी दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह कधी पाळला जातो?

>> 1 ते 7 ऑगस्ट


Q.1) बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमवेल्थ स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने मिश्र सांघिक प्रकारात कोणते पदक पटकावले?

>> रौप्य 


Q.2) बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत लवप्रीत सिंहने कोणते पदक जिंकले?

>> कांस्य 


Q.3) बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत विकास ठाकूरने कोणते पदक जिंकले?

>> रौप्य


Q.4) ‘डिस्टिंग्विश्ड इंडोलॉजिस्ट फॉर 2021’ पुरस्कार कोणाला मिळाला?

>>  कॅनेडियन जेफ्री आर्मस्ट्राँग 


5) अलीकडेच 'नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार 2022' कोणाला मिळाला आहे?

>> प्रतिभा रे 


6) भारत-तिबेट सीमा पोलीस महासंचालक म्हणून कोणी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली?

>> डॉ. सुजॉय लाल थाओसेन 


7) अलीकडेच कोणाच्या स्मरणार्थ 146 व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने एक विशेष टपाल तिकीट जारी केले?

>> पिंगली व्यंकय्या


8) चौथ्या ONGC पॅरा गेम्स 2022 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

>> हरदीप सिंग पुरी


9) ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटरीमध्ये होणार्‍या 17 राष्ट्रांमधील मेगा एअर कॉम्बॅट सराव “पिच ब्लॅक 2022” या लढाऊ सराव कवायतीत कोणता देश सहभागी होणार आहे?

>> भारत 


10) अलिकडेच सागरी जीवशास्त्रज्ञ एलेन प्रागर यांचे कोणते पुस्तक प्रकाशित झाले आहे?

>> “डेंजरस अर्थ”


Q.11) अलिकडेच कोणाचे “लायन ऑफ द स्काईज: हरदित सिंग मलिक” नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे?

>> स्टीफन बार्कर


Q.1) भारताच्या तेजस्वीन शंकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात कोणते पदक जिंकले?

>> कांस्य


Q.2) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश खेळ प्रकारात सौरव घोषालने कोणते पदक जिंकले?

>> कांस्य


Q.3) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युडो स्पर्धेत तुलिका मानने कोणते पदक जिंकले?

>> रौप्य


Q.4) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर गुरदीप सिंह याने कोणते पदक जिंकले?

>> कांस्य


Q.5) T-20 सामन्यात 2000 करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे?

>> स्मृती मंदना


Q.6) 3 ऑगस्ट 2022 रोजी भारतातील किती पाणथळ स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे?

>> दहा 


Q.7) अलीकडेच कोणत्या राज्याने “मिशन भूमिपुत्र” लौंच केले आहे?

>> आसाम


Q.8) अलीकडेच कोणत्या राज्यात “आदिपुरम उस्तव” साजरा करण्यात आला आहे?

>> तामिळनाडू


Q.9) पाकिस्तान मध्ये “पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक” कोण बनली आहे?

>> मनीषा रोपेटा


Q.10) इस्रो पृथ्वी निरीक्षण उपग्रह “EOS-२” कोठून प्रक्षेपित करणार आहे?

>> आंध्रप्रदेश

राष्ट्रीय आंदोलन की महत्वपूर्ण घटनाएं

►1904 ➖ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित

►1905 ➖ बगाल का विभाजन

►1906 ➖ मस्लिम लीग की स्थापना

►1907 ➖ सरत अधिवेशन, कांग्रेस में फूट

►1909 ➖ मार्ले-मिंटो सुधार

►1911 ➖ बरिटिश सम्राट का दिल्ली दरबार

►1916 ➖ होमरूल लीग का निर्माण

►1916 ➖ मस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)

►1917 ➖ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन

►1919 ➖ रौलेट अधिनियम

►1919 ➖ जलियाँवाला बाग हत्याकांड

►1919 ➖ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार

►1920 ➖ खिलाफत आंदोलन

►1920 ➖ असहयोग आंदोलन

►1922 ➖ चौरी-चौरा कांड

►1927 ➖ साइमन कमीशन की नियुक्ति

►1928 ➖ साइमन कमीशन का भारत आगमन

►1929 ➖ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट

►1929 ➖ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग

►1930 ➖ सविनय अवज्ञा आंदोलन

►1930 ➖ परथम गोलमेज सम्मेलन

►1931 ➖ दवितीय गोलमेज सम्मेलन

►1932 ➖ ततीय गोलमेज सम्मेलन

►1932 ➖ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा

►1932 ➖ पना पैक्ट

►1942 ➖ भारत छोड़ो आंदोलन

►1942 ➖ करिप्स मिशन का आगमन

►1943 ➖ आजाद हिन्द फौज की स्थापना

►1946 ➖ कबिनेट मिशन का आगमन

►1946 ➖ भारतीय संविधान सभा का निर्वाचन

►1946 ➖ अतरिम सरकार की स्थापना

►1947 ➖ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना

►1947 ➖ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति


०७ ऑगस्ट २०२२

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे:


• गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, • गंगाखेड, नांदेड

• कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर

• भिमा : पंढरपुर

• मुळा–मुठा : पुणे

• इंद्रायणी : आळंदी, देहु

• प्रवरा : नेवासे, संगमनेर

• पाझरा : धुळे

• कयाधु : हिंगोली

• पंचगंगा : कोल्हापुर

• धाम : पवनार

• नाग : नागपुर

• गिरणा : भडगांव

• वशिष्ठ : चिपळूण

• वर्धा : पुलगाव

• सिंधफणा : माजलगांव

• वेण्णा : हिंगणघाट

• कऱ्हा : जेजूरी

• सीना : अहमदनगर

• बोरी : अंमळनेर

• ईरई : चंद्रपूर

• मिठी : मुंबई

चालू घडामोडीप्रश्नसंच

 1. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्याच्या अजेंडा आयटम अंतर्गत 'विष्कार, असमानता आणि संघर्ष' या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत  भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?

1. डॉ. राजकुमार रंजन सिंग

2.  एस. एन. सुब्रह्मण्यन

3. नरेंद्र मोदी

4. अजीत डोभाल


उत्तर- 1


------------------------------------------------------------


2.पोलंडमधील व्रोकला येथे झालेल्या प्रेसिडेंट कप नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या एअर पिस्तूलमध्ये कोणत्या खेळाडूला रौप्य पदक मिळाले आहे?

1. अभिषेक वर्मा

2. सौरभ चौधरी

3. ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर

4. यापैकी नाही


उत्तर- 2


------------------------------------------------------------


3. कोणत्या राज्यातील पक्षांनी 14 नोव्हेंबर रोजी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे?

1. राज्यस्थान

2. महाराष्ट्र

3. त्रिपुरा

4. उत्तर प्रदेश


उत्तर- 3


------------------------------------------------------------


4.  पानिपत येथे भारतातील पहिल्या मेगा-स्केल मॅलिक एनहाइड्राइड प्लांटचे उद्घाटन कोणी केले आहे?

1. ओएनजीसी

2. हिंदुस्थान पेट्रोलियम

3. भारत पेट्रोलियम

4. आयओसी


उत्तर- 4


------------------------------------------------------------


5. पेन्शनधारकांसाठी पहिली व्हिडीओ लाईफ सर्टिफिकेट सेवा कोणत्या भारतीय बँकेने सुरू केली आहे?

1. एसबीआय

2. आयसीआयसीआय

3. एचडीबीआय

4. कॅनरा बँक


उत्तर- 1


------------------------------------------------------------


6. आधुनिक भारत या पुस्तकाचे प्रकाशन कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले?

1. गुजरात

2. आसाम

3. हरियाणा

4. बिहार


उत्तर- 3


------------------------------------------------------------


7.  विश्व टपाल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1. 7 नोव्हेंबर

2. 8 नोव्हेंबर

3. 9 नोव्हेंबर

4. 10 नोव्हेंबर


उत्तर- 3


------------------------------------------------------------


8.  वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण ठरली आहे?

1. विनेश फोगाट

2. अंशु मलिक

3. गीता फोर

4. साक्षी मलिक


उत्तर-2


------------------------------------------------------------


9. संकल्प गुप्ता हे भारताचे कितवे ग्रँडमास्टर बनले आहे?

1.  65

2. 70

3. 71

4. 75


उत्तर- 3


------------------------------------------------------------


10. ग्लोबल ड्रग पॉलिसी इंडेक्स 2021 नुसार भारत 30 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे?

1. 18

2. 20

3. 22

4. 25


उत्तर- 1

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...