२२ जून २०२२

भारतीय अर्थव्यवस्था

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
भारतीय वित्तीय व्यवस्था

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास त्या देशातील वित्तीय व्यवस्थेच्या विकासावर अवलंबून असतो.

विकसित अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था विकसित असते. उलटपक्षी, वित्तीय व्यवस्था न्यूनविकसित असल्यास अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेस मर्यादा येतात.

अर्थ – व्यापक दृष्टीने, वित्त म्हणजे कर्जाने दिला-घेतला जाणारा पैसा होय. अशा वित्ताची गरज व्यक्ती, कुटुंबे, व्यापारी, व्यावसायिक, उद्योगपती, शेतकरी तसेच, विविध सरकारे इत्यादींना असते.

उदा. व्यक्ती व कुटुंबांना वित्ताची गरज दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच गृह बांधणीसाठी असते.

व्यापार्‍यांना वित्ताची गरज आपला माल विकत घेण्यासाठी तसेच, साठवण्यासाठी असते. तर, उद्योगपतींना आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी वित्त आवश्यक असते.

सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते.

अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस ‘वित्तीय व्यवस्था’ (Financial System) असे म्हणतात.

____________________

भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना –

वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.

______________________

1. भारतीय नाणे बाजार –

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

_____________

2. भारतीय भांडवल बाजार

वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.

भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.

भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती

जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती

जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

रचना – प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

सभासद संख्या – प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

सभासदांची निवडणूक – प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

पात्रता (सभासदांची) – जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

राजीनामा :

अध्यक्ष – विभागीय आयुक्ताकडे
उपाध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :

1. अध्यक्ष – 20,000/-

अविश्वासाचा ठराव – अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

सचिव – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

बैठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

महाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती

महाधिवक्ता बद्दल संपूर्ण माहिती

राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे.
हा महाधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणूनदेखील काम करतो.
या महाधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरूपाचे कार्य पार पाडावी लागतात. त्यामुळे महाधिवक्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. अशा महाधिवक्त्याची नेमणूक पुढीलप्रमाणे केली जाते-

1. नेमणूक

महाधिवक्त्याची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात.
महाधिवक्त्याला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.
राज्यपालाच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महाधिवक्ता पदासाठी केली जाते.

2. पात्रता

भारतीय घटना कलम 165 नुसार महाधिवक्ता पदावर नियुक्त होणार्‍या पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
त्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्षे न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात 5 वर्षे वकील म्हणून कार्य केले असावे.
संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.
राज्यपालाच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी.
उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असाव्यात.

3. कार्यकाल

भारतीय राज्यघटनेत महाधिवक्त्याच्या तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही परंतु त्याचे निवृत्ती वय 62 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महाधिवक्ता वयाच्या 62 वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतो असे असले तरी महाधिवक्ता मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.
याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटना विरोधी कृत्य केले असेल तर राज्यपाल त्याला पदच्युत करतात.

सामान्यत: राज्यातील मंत्रीमंडळ बदलते की. महाधिवक्ता बदलला जातो.

4. वेतन व भत्ते

महाधिवक्त्याला दरमहा रुपये 80,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो.
एकदा निश्चित झालेले त्याचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.
महाधिवक्त्याचे वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिल्या जाते.
निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

5. अधिकार व कार्ये

राज्यपालाने मागितलेल्या कायदेशीर बाबीसंबंधी सल्ला देणे.
राज्य सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे.
राज्यविधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे.
महाधिवक्त्याला खाजगी वकिलीदेखील करता येते. परंतु एखदया खटल्यामध्ये एक पक्ष राज्यसरकारचा असेल तर राज्यसरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो.
योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.

Economics Questions & Answer

1. इस समय भारत का सबसे बड़ा राष्ट्रीयकृत उद्यम है :
(A) भारतीय रेलवे
(B) भारतीय वाणिज्य बैंकिंग तंत्र
(C) भारतीय विद्युत क्षेत्र
(D) भारतीय दूरसंचार तंत्र

उत्तर
भारतीय रेलवे

2. निम्नलिखित में से किस अधिनियम/नीति के तहत बी आई एफ आर की स्थापना की गई थी?
(A) 1980 की औद्योगिक नीति
(B) कंपनी अधिनियम
(C) बीमार औद्योगिक कंपनी अधिनियम
(D) एम आर टी पी अधिनियम

उत्तर
बीमार औद्योगिक कंपनी अधिनियम

3. निम्नलिखित में से वह भारतीय निजी क्षेत्र कम्पनी कौन-सी है जिसका बिक्री पण्यावर्त सबसे अधिक है?
(A) टाटा सन्स
(B) रिलायंस इन्डस्ट्रीज
(C) आई० टी० सी० लि.
(D) हिन्दुस्तान लीवर लि.

उत्तर
रिलायंस इन्डस्ट्रीज

4. कापरिट ऋण किसे दिया गया है?
(A) लिमिटेड कंपनियों को
(B) लिमिटेड व्यक्तियों को
(C) प्रप्राइइटेरी व्यवसायों को
(D) लिमिटेड शैक्षिक संस्थानों को

उत्तर
लिमिटेड शैक्षिक संस्थानों को

5. औद्योगिक निर्गम (एग्जिट) नीति का अर्थ है
(A) विदेशी कंपनियों को भारत छोड़ने के लिए मजबूर करना
(B) व्यावसायिक एककों को भीड़ भाड़ वाले इलाकों से बाहर जाने के लिए मजबूर करना
(C) विनिर्माताओं को अपने उत्पादों की लाइन बदलने की अनुमति देना
(D) व्यावसायिक एककों को बंद कर देने की अनुमति देना

उत्तर
व्यावसायिक एककों को बंद कर देने की अनुमति देना

6. निम्नलिखित में से नवरत्न कंपनी पहचानिए :
(A) ICICI बैंक
(B) इन्फोसीज
(C) एचपीसीएल लि.
(D) एयर इंडिया

उत्तर
एचपीसीएल लि.

7. लघु उद्योग के लिए संयंत्र एवं मशीनरी में निवेश की ऊपरी/उच्चतम सीमा वर्तमान में कितनी निर्धारित की गई है?
(A) 35 लाख
(B) 45 लाख
(C) 60 लाख
(D) 1 करोड़

उत्तर
1 करोड़

8. राष्ट्रीय नवीकरण निधि (एन आर एफ) किस प्रयोजन से संस्थापित की गई थी?
(A) ग्रामीण पुनर्निर्माण
(B) सामाजिक सुरक्षा
(C) सेवानिवृत्त कर्मचारियों को पेंशन देना
(D) उद्योगों का पुनर्निर्माण एवं आधुनिकीकरण

उत्तर
सामाजिक सुरक्षा

9. आर्थिक सहायता सरकार द्वारा किसको किया जाने वाला भुगतान है?
(A) उपभोक्ता यूनिट
(B) उत्पादक यूनिट
(C) बैंकिंग यूनिट
(D) सेवानिवृत्त व्यक्ति

उत्तर
उत्पादक यूनिट

10. विपणन-क्षेत्र में यूएसपी (USP)क्या होता है ?
(A) निर्बाध बिजली आपूर्ति
(B) उत्पादन के विश्वव्यापी मानक
(C) यू.एस. कार्यक्रम आधारित
(D) अनन्य विपणन लक्षण

उत्तर
उत्पादन के विश्वव्यापी मानक

11. औद्योगिक ऋण के लिए भारत में शीर्ष बैंक कौन सा है?
(A) RBI
(B) NABARD
(C) ICICI
(D) IDBI

उत्तर
IDBI

12. कम्पनी के डिबेंचरधारी कौन होंगे?
(A) शेयरधारी
(B) ऋणदाता (लेनदार)
(C) ऋणी (देनदार)
(D) निदेशक (डायरेक्टर)

उत्तर
ऋणदाता (लेनदार)

13. एन.टी.पी.सी.एक केन्द्रीय लोक क्षेत्र उद्यम है जो निम्नलिखित में से किस क्षेत्र से सम्बन्धित है?
(A) शिक्षा
(B) स्वास्थ्य
(C) विद्युत
(D) परिवहन

उत्तर
विद्युत

14. निम्नलिखित में से कौन-सा एक सार्वजनिक क्षेत्र का उपक्रम है?
(A) बैकं ऑफ राजस्थान
(B) आई.सी.आई.सी.आई. बैंक
(C) कॉर्पोरेशन बैंक
(D) सिटी बैंक

उत्तर
कॉर्पोरेशन बैंक

15. निम्नलिखित में से किसको आधारिक संरचना क्षेत्र में शामिल नहीं किया जाता?
(A) विद्युत उत्पादन
(B) सड़कों का निर्माण
(C) खाद्य उत्पादन
(D) हवाई अड्डों का प्रसार

उत्तर
खाद्य उत्पादन

16. निम्नलिखित भूमि प्रयोगों में से कौन-सा विशेष आर्थिक क्षेत्रों तक सीमित
(A) शैक्षिक संस्थान
(B) मुक्त व्यापार केंद्र
(C) विपणन केंद्र
(D) सूचना प्रौद्योगिकी कपंनियाँ

उत्तर
मुक्त व्यापार केंद्र

17. भारत में पूंजी प्रधान उद्योग का सर्वोत्तम उदाहरण कौन-सा है ?
(A) वस्त्र उद्योग
(B) इस्पात उद्योग
(C) पर्यटन उद्योग
(D) खेल-कूद के सामन का उद्योग

उत्तर
इस्पात उद्योग

18. एस आई डी बी आई इसका द्योतक है:
(A) स्मॉल इंडस्ट्रियल डिज़ाइंड बैंक ऑफ इण्डिया
(B) स्मॉल इंडस्ट्रीज डेवलपमेंट बैंक ऑफ़ इण्डिया
(C) स्मॉल इन्नोवेशन डेवलपमेंट बैंकर्स इंस्टिट्यूट
(D) इंडस्ट्रीज डेवलपमेंट बैंकर इंस्टिट्यूट

उत्तर
स्मॉल इंडस्ट्रीज डेवलपमेंट बैंक ऑफ़ इण्डिया

19. निम्नलिखित में कौन-सा उद्योग, कच्चे माल पर आश्रित उद्योग है?
(A) चीनी उद्योग
(D) पेट्रोलियम परिष्करण-शाला
(C) हल्की इंजीनियरी उद्योग
(D) जहाज निर्माण

उत्तर
चीनी उद्योग

20. सेतुसमुद्रम शिप कनाल परियोजना द्वारा चेन्नई एवं तूतीकोरीन के बीच कितनी दूरी कम हो जाएगी?
(A) 361 नॉटिकल मील
(B) 434 नॉटिकल मील
(C) 243 नॉटिकल मील
(D) 305 नॉटिकल मील

उत्तर
361 नॉटिकल मील

21. भारत किसको बिजली का निर्यात करता है?
(A) बांग्लादेश
(B) म्यांमार
(C) पाकिस्तान
(B) भूटान

उत्तर
बांग्लादेश

22. मनरेगा (MGNREGA) के अन्तर्गत किसी ग्रामीण निर्धन व्यक्ति को अधिकतम कितने दिन तक रोजगार मिल सकता है?
(A) 180 दिन
(B) 120 दिन
(C) 100 दिन
(D) 90 दिन

उत्तर
100 दिन

23. समाचार-पत्रों की रिपोर्ट के अनुसार राष्ट्रीय इस्पात निगम लि. (RINL) में कितने प्रतिशत सरकार की साझेदारी का विनिवेश किया जाएगा?
(A) 5%
(B) 50%
(C) 10%
(D) 12%

उत्तर
10%

24. सार्वजनिक क्षेत्र के किस उपक्रम का गैर-सरकारीकरण (निजीकरण) कर दिया गया है?
(A) एच.जेड. एल.
(B) सी. एम. सी.
(C) होटल कॉर्पोरेशन ऑफ इण्डिया
(D) नालको

उत्तर
एच.जेड. एल.

राज्यसभेबद्दल संपूर्ण माहिती

राज्यसभेबद्दल संपूर्ण माहिती

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.

सभासदांची संख्या :

घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.

उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.

उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

निवडणूक पद्धत :

राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.

राज्यसभेचा कार्यकाल :

राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.

सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.

पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

बैठक किंवा आधिवेशन :

घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.

गणसंख्या :

कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

राज्यसभेचा सभापती :

घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.

उपाध्यक्ष :

राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.

१९ जून २०२२

महत्वाचे प्रश्नसंच

📌ऑगस्ट 2019 मध्ये कोणत्या देशाने लढाईसाठी तयार असलेली मानवरहित युद्धनौका तयार केली?

(A) जापान
(B) चीन✅✅✅
(C) रशिया
(D) संयुक्त राज्य अमेरिका

📌कोणती आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) कार्यक्रमात भाग घेणारी अंतराळ संस्था नाही?

(A) नासा (अमेरिका)
(B) रोस्कोस्मोस (रशिया)
(C) जेएएक्सए (जापान)
(D) आयएसए (इस्राएल)✅✅✅

📌कोणत्या देशाने 23 ऑगस्ट 2019 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मानवी-आकाराचा रोबोट पाठविला?

(A) जापान
(B) चीन
(C) रशिया✅✅✅
(D) संयुक्त राज्य अमेरिका

📌कोणत्या देशाने आर्क्टिक प्रदेशात जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी उभारली?

(A) साऊथ कोरिया
(B) संयुक्त राज्य अमेरिका
(C) जापान
(D) रशिया✅✅✅

📌अमेरिकेतली कॅटालिना खाडी ओलांडणारा पहिला आशियाई जलतरणपटू कोण आहे?

(A) खजान सिंग
(B) मिहिर सेन
(C) सतेंद्र सिंग लोहिया✅✅✅
(D) बला चौधरी

📌आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) वर्तमानातले व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

(A) क्रिस्टलिना जॉर्जिवा
(B) क्रिस्टीन लागार्डे✅✅✅
(C) गीता गोपीनाथ
(D) हॅरी डेक्सटर व्हाइट

📌भारत सरकारच्या नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने 2022 सालापर्यंत ____ एवढ्या अक्षय ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य निश्चित केले आहे.

(A) 375 गीगावॉट
(B) 275 गीगावॉट
(C) 175 गीगावॉट✅✅✅
(D) 75 गीगावॉट

आजचे प्रश्नसंच


1) महाराष्ट्रातील सर्वांत मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे ?
1) खापरखेडा
2) पारस
3) कोराडी
4) चंद्रपूर

उत्तर : 4
         चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र
         क्षमता 2340

2)महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मिती पैकी सुमारे किती टक्के वीज एकट्या विदर्भात निर्माण होते ?
1) 30%
2) 45%
3) 52%
4) 60%

उत्तर : 3
       
महाराष्ट्रात एकूण वीजनिर्मितीपैकी सुमारे 52% वीज ही एकट्या विदर्भात निर्माण होते .

3)महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लक्षात ठेवण्याची trick trick लवकरच........
क्रम
1) औरंगाबाद
2) नाशिक
3) पुणे
4) नागपूर
5) अमरावती
6) कोकण

पर्याय : 4

4). *पी. वि.सिंधू हीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, रोप्य व काश्य अशी 3 पदके मिळवनारी कितवी बॅडमिंटनपटू ठरली आहे.
@maharastratime

11). पहिली

12). दुसरी 

13). तिसरी

14). चोथी

5). *P. V. सिंधू ला खालील पैकी कोणता पुरस्कार मिळाला नाही*??

22) पदमश्री -2015

23.पदमविभुषन -2018

24). राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार

25) वरीलपैकी सर्व मिळाले.

6). *P. V. सिंधूच्या मिळालेल्या पदकाबद्दल अयोग्य जोडी ओळखा??*

33) काश्यपदक 2013

34). काश्यपदक 2014

35). रोप्यपदक 2016

36). रोप्यपदक 2018

7) **कोणत्या वर्षी भारत सरकारने हीमा दास ला अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले??*

44).2017

45).2016

46).2018

47).2019

8). *हीमा दास च्या प्रशिक्षक चे नाव काय आहे??*

55). सुशील दास

56). तरसेम राणा

57). निपोन दास 

58). सुधीर सिंह

9). *किती दिवसात हीमा दासने 5 सुवर्ण पदक मिळवले आहेत??*

66). 30 दिवसात

67). 15 दिवसात

68). 20 दिवसात

69). 19 दिवसात

10). *अरुण जेटली यांनी 2014 मध्ये कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढविली होती??*

77) पंजाब

78). अमृतसर 

79). बडोदा

80). यापैकी नाही.

11). *कोणत्या साली अरुण जेटली भाजपचे सदस्य झाले*??

11) 1975

12).1995

13).1980

14).1978

12) *कोणत्या साली अरुण जेटली यांची दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली??*

22). 1974

33). 1957

44). 1970

55). 1968


13). *सुषमा स्वराज हा दिल्ली च्या कितव्या मुख्यमंत्री होत्या??*

10). पहिल्या

20). चोथा

30). पाचव्या 

40). दुसऱ्या


14). *सुषमा स्वराज कोणत्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलात??*

1). 1992

2). 1995

3). 1984

4). 1990


15). *जम्मू काश्मीर वर जेव्हा पाकिस्तानने घूसखोरी /हल्ला  केला होता तेव्हा पाकिस्तान कडून कोणत्या वरिष्ठ सैन्य अधिकारी ने नेतृत्व केले होते?* ?

1). शेख अब्दुल्ला

2). जावेद खान

3). मोहंमद शेख

4). अकबर खान 


16). *जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल राजवट किती वेळ लागू झाली होती*

1). 10 वेळा

2). 7 वेळा

3). 9 वेळा

4). 8 वेळा 


*17 ). *2014 मध्ये कोणत्या संस्थेने 370 विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली होती??*

1). द  सिटीझन

2). द  सिटीझन ऑफ इंडिया

3). वूई द  सिटीझन 

4). यापैकी नाही


18). *35 A  व 370 कलम संविधानात कधी जोडले गेले??*

1). 1954,   1949

2). 1949, 1954

3). 1952, 1949

4). 1947,  1954

आजचे प्रश्नसंच

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे

✍️

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...