१५ मे २०२२

१५ मे – भारतीय वृक्ष दिन

१५ मे – भारतीय वृक्ष दिन 



✅१५ मे – घटना

१७१८: जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.

१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

 १८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.

१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी...

✅१५ मे – जन्म

१८१७: भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक देवेन्द्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १९०५)

१८५९: नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९०६)

१९०३: साहित्य मीमांसक, कवी व... 


१५ मे – मृत्यू

१३५०: संत जनाबाई यांचे निधन.

१७२९: वैशाख व. १४, शके १६५१ मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन.

१९९३: स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम....

ब्राम्हणेतर पक्ष

🟢ब्राम्हणेतर पक्ष🟢

◾️स्थापना:-12 डिसेंबर 1920

◾️स्थळ:-जेधे मेन्शन पुणे

📌संस्थापक नेते:-

◾️भास्करराव जाधव

◾️केशवराव जेधे

◾️आनंदस्वामी

◾️धनाजीशहा कूपर

◾️गंगाजी काळभोर

◾️बाबुराव जगताप

◾️आनंद जगताप

◾️वालचंद कोठारी

◾️बापूराव जेधे

📌उद्देश:-

◾️ब्राम्हणच्या गुलामगिरी मधून मुक्त करणे

◾️सरकारी नोकऱ्यात हक्क मिळविणे

◾️समाजात बंधुभाव वाढविणे.

इंडियन असोसिएशन

🟢 इंडियन असोसिएशन 🟢

◾️स्थापना:-26 जुलै 1876

◾️ठिकाण:-कोलकत्ता

◾️संस्थापक:-

आनंदमोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी

◾️ध्येय:-अखिल भारतीय चळवळ उभी करणे

◾️हेतू:-हिंदू-मुस्लिम मित्रत्वाचे निर्माण करणे

📌कार्य:-

◾️सिव्हिल सर्व्हिस वयोमर्यादा साठी प्रयत्न केले

◾️राजकीय प्रश्न बाबत जनमत संघटित केले.

रॉबर्ट गिल


🟢  रॉबर्ट गिल  🟢

🔺स्मृतिदिन

◾️जन्म:- 26 सप्टेंबर 1804 बिशपगेट, लंडन

◾️मृत्यू: 10 एप्रिल 1879, भुसावळ

◾️ गिल 19 व्या वर्षी पी.ग्रेलीमरच्या शिफारशीने जेम्स पॅटीसच्या आदेशानुसार मद्रास येथील इस्ट इंडिया कंपनीच्या ‘‘44 मद्रास नेटिव्ह या सैन्य दलात’’ भरती झाल्यानंतर भारतात आला

◾️ते लंडन रॉयल एशियाटिक सोसायटीचा क्वालिफाइड आर्टिस्ट होते

◾️1844 रोजी अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी (ड्राफ्समन) अजिंठा येथे नियुक्ती दिली

◾️1846 ला रॉबर्ट गिलने अजिंठ्याच्या आठ चित्रकृतींचा पहिला टप्पा पूर्ण केला

◾️ लंडनच्या इंडियन कोर्ट ऑफ द क्रिस्टल पॅलेस, सिडनेहॅम येथे 1851 ला त्याच्या अजिंठ्यावरील चित्रांचे प्रदर्शन भरले

◾️या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतातील हा ठेवा सर्वप्रथम जगासमोर आला

◾️फोटोग्राफीतून अजिंठा, वेरूळ, लोणार सरोवर, मुक्तगिरी, हेमाडपंती मंदिरे, किल्ले, मुस्लिम वास्तुकलांची प्रकाशचित्रे काढून भारतातील विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला

◾️भुसावळच्या दवाखान्यात 10 एप्रिल 1879 रोजी निधनानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनजवळ दफनभूमीत दफन करण्यात आले

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig

🟢  रॉबर्ट गिल  🟢 स्मृतिदिन

🔺प्रेमकथा

◾️1845 रोजी अजिंठा नियुक्ती दरम्यान स्थानिक भारतीय जमातीच्या पारो या तरुणीशी ओळख झाली या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले.

◾️परंतु रॉबर्ट- पारो यांचा विवाह झाल्याचे इतिहासात कोठेही नमूद नाही.

◾️1954-55 साली भारतात प्लेगची साथ आली आणि त्यात 23 मे 1856 ला पारो हिचा मृत्यू झाला. या घटनेने रॉबर्ट अत्यंत दु:खी झाला. देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने या सर्वांच्या पलीकडे जावून पारोने रॉबर्टला खूप सहकार्य केले होते

◾️पारोबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर सिल्लोड तालुक्यात अजिंठा गावात बांधली.‘

🔺‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड 23 मे 1856’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या आहेत.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

1. हिवाळी ऑलम्पिक 2022 या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे ..?
-- चीन

2. नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकमध्ये कोणते राज्य प्रथम आहे ..?
-- केरळ 74.01

3. सुधीर मुनगंटीवार यांची कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली आहे ..?
-- गडचिरोली

4. गुलाबी शहर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे ..?
-- जयपूर ( जयपूरच्या प्रसिद्ध चारदिवारी ला युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.)

5. पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री कोण आहेत..?
-- ममता बॅनर्जी ( नुकतेच केंद्र सरकारने प बंगालचे नाव बदलण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे )

6. क्रोएशिया या देशाला भेट देणारे प्रथम राष्ट्रपती कोण..?
-- रामनाथ कोविंद ( यांना नुकताच क्रोएशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे )

7. मराठा समाजाला नवीन कायद्यानुसार किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे ..?
-- शिक्षण संस्थेत 12% आणि शासकीय सेवेत 13% आरक्षण दिले आहे

8. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची सुरवात कधी झाली..?
-- 22 जानेवारी 2015 पासून याची ( दूत :- साक्षी मलिक )

9. UIDAI चे पहिले आधार सेवा केंद्र कोठे उघडले आहे ..?
-- दिल्ली आणि विजयवाडा

10. लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत.?
-- ओम बिर्ला.

महत्वाचे दिन व परीक्षेच्या दृष्टीने

📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने

============================
१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन.

बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर

बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर

⏳ पुरस्काराची सुरुवात : १९५४ पासून

👤 पहिले विजेते : सी ख्रिस्तोफर (१९५४)

👱 सर्वात तरुण विजेता : इयान ब्लॅक (१७)

👨‍🦳 सर्वात वयोवृद्ध विजेता : दाई रीस (४४)

🏆 ३ वेळा पुरस्कार विजेता एकमेव खेळाडू
✅ अँडी मरे : २०१३ , २०१५ , २०१६

✅ २ वेळा पुरस्कार जिंकणारे : ४ खेळाडू

🏆 २०१९ : बेन स्ट्रोक्स : इंग्लंड

🏆 २०२० : लेविस हेमिल्टन (दुसऱ्यांदा ) .

current_affairs_Notes

#current_affairs_Notes

Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?
उत्तर :- पुलियार

Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?
उत्तर :-  यूएस चेंबर ऑफ कॉमर्स

Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का

Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स

Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :-  शेन्झेन

Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- अनस्टॉपेबल

Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- मेघन मर्केल

Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?
उत्तर :- 7 मे

Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?
उत्तर :- तेलंगणा

Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी

महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच

महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच★

1] वाक्यप्रकार ओळखा. - सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही .
उत्तर = संयुक्त वाक्य

2]'मी' देशाची पंतप्रधान झाले तर !' या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर = उद्गारार्थी

3] लता मंगेशकरांची जुनी गाणी मंत्रमुग्ध करतात - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
उत्तर = मनावर जादू होणे

4] वाक्याच्या क्रियापदाच्या रुपावरुन खालीलपैकी कोणता वाक्याचा प्रकार होत नाही ?
उत्तर = संयुक्तार्थी

5] नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा.
उत्तर = मिश्र

6] काय ही गर्दी ! विधानार्थी वाक्य करा.
उत्तर = गर्दी खूप आहे.

7] खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
वाक्य - 'देवा, सर्वांना सुखी ठेव'
उत्तर = आज्ञार्थ

8] ज्या क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो तर अशा क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात ?
उत्तर = स्वार्थ

9] 'ऊ-आख्यात' वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात ?
उत्तर = आज्ञार्थ

10] ..................ही मांसाहारी वनस्पती आहे.
उत्तर = घटपर्णी

11] मधमाश्यांच्या वसाहतीत................. मधमाशी सर्वात मोठी असते.
उत्तर = राणी

12] गुणसूत्रे ही DNA आणि ................यांनी बनलेली असतात.
उत्तर = प्रथिने

13] स्त्रियांमध्ये ................. तर पुरुषांमध्ये .... असते.
उत्तर = डिंवग्रंथी , वर्षण

14] आपल्याला माहिती असलेल्या पेशींमध्ये .............. अंडे ही सर्वात मोठी पेशी आहे.
उत्तर =शहामृगाचे

15] ...............स्नायू गोलाकार व गुळगुळीत असतात,
उत्तर =अनैच्छिक

16] शरीरातील हाडे.................... एकमेकांना जोडलेली असतात.
उत्तर = अस्थिबंधनाने

17] .................... या जनकपेशींच्या हुबेहूब प्रतिकृती असतात.
उत्तर = कन्यापेशी

18] माणसाच्या पेशींमध्ये............... गुणसूत्रे असतात.
उत्तर = 46

19] लहान आतड्याची लांबी ............. मीटर असते.
उत्तर = सहा

20] सिता 10 वस्तु 15 रू. ला खरेदी करून 12 वस्तु 20 रू ला विकते तर तिला किती रूपये नफा किंवा तोटा होईल.
उत्तर = 11.11%

21] 12 पुस्तके विकल्यानंतर 2 पुस्तकांच्या खरेदीकिंमतीमुवढा नफा होतो. तर शेकडा किती?
उत्तर = 20%

22 ]एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किंमतीच्या निम्मे आहे. तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल?
उत्तर = 50%

23]दुकानदाराने पुस्तकाच्या 1000 प्रति 9999 रुपयांना विकल्पानंतर  899 रु. नफा होतो तर, प्रत्येक पुस्तकाची खरेदी किंमत किती?
उत्तर = 9.10 रुपये.

24]40 टक्के नफा घेऊन 40 पुस्तके विकल्यास 40 रूपये फायदा होतो तर खरेदीची किंमत किती?
उत्तर = 100

25] एका वस्तूची किंमत 20 टक्क्यांनी वाढली असता विक्री 20 टक्के कमी होते, तर त्या विक्रेत्यास फायदा की तोटा झाला?
उत्तर = 4 टक्के तोटा

26] 5 रु. ला 2 पेन प्रमाणे 50 रु. ला किती पेन येतील?
उत्तर = 20

27] एक घोडा 9 टक्के तोटा सहन करून 455 रु. विकला तर मूळ किंमत किती?
उत्तर = 500

28] खरेदी रु. 2000, विक्री रु. 2400 आहे, तर शेकडा नफा किती?
उत्तर = 20%

29] एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20  टक्क्याने वाढविली व नंतर 10  टक्के सूट दिली, तर किती टक्के त्यात नफा झाला ?
उत्तर = 8%

30] 'दीनबंधु' हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
उत्तर = कृष्णराव भालेकर

31] खालील पैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?
उत्तर =शिवभारत

32] महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना किती साली झाली
उत्तर = मे १९७२

33]हैद्राबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होता ?
उत्तर =कासीम रझवी

34]खालील पैकी कोणता समाज सुधारक अल्पजीवी ठरला ?
उत्तर = विष्णुबुवा ब्रह्मचारी

35]भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर = वि रा शिंदे

36] अहमदनगरची स्थपणा अहमद निझामशहा याने मध्ये केली
उत्तर = 1490

37]स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?
उत्तर = व्यंकटेश भगवानराव खेडगीकर

38] श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला ?
उत्तर = पाटणा

39] दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?
उत्तर = अलाउद्दीन खिलजी

40]रेशीम उत्पादनात भारतात _राज्य अग्रेसर आहे .
उत्तर = बिहार

41] अंबाबरवा अभयारण्य समुद्रसपाटीपासून _फूट उंचीवर आहे
उत्तर = 2300

42]गेंडा या प्राण्यासाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान काझीरंगा राज्यात आहे
उत्तर = आसाम

43]गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
उत्तर = 12

44]लाख शेती सुरु करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत ?
उत्तर - १ व २

45]मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्यात आहे ?
उत्तर - ठाणे

46]महाराष्ट्रात______________ नदी ला सर्वात जास्त उपखोरी आहेत
उत्तर - गोदावरी.

मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे

मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे 🎯

१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
३)  संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
१५) कवी  गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
२३) साहित्यसम्राट -  न. ची. केळकर
२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
२६) रानकवी - ना. धो. महानोर
२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर.

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

🟣   इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये  🟣

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...