१५ मे २०२२

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

🟣   इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये  🟣

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि विविध ग्रंथ

🟢 डॉ बाबासाहेब आंबेडकर 🟢

✍विविध ग्रंथ:-

◾️प्रॉब्लम ऑफ रुपी

◾️अनहीलेशन ऑफ कास्ट

◾️थॉट्स ऑन पाकिस्तान

◾️कास्ट इन इंडिया

◾️द अन टचेबल्स

◾️रानडे गांधी जिना

◾️रिडल्स ऑफ हिंदुझम

◾️फेडरेशन वार्सेस फ्रीडम

◾️स्टेट अँड मायणारीटीझ.

दर्पण

🟢दर्पण🟢

❇️सुरुवात:- 6 जानेवारी 1832

▪️बाळशास्त्री जांभेकर

▪️सुरुवातीला पाक्षिक होते

▪️4 मे 1832:-साप्ताहिक झाले

▪️अर्धा मजकूर मराठी व अर्धा इंग्रजी असे

❇️चालक:-रघुनाथ हरिश्चंद्र व जनार्धन वासुदेव

▪️जवळपास 9 वर्ष चालले

▪️आकार:-19 × 11.5 इंच

✍देशकाल स्तिथी चे ज्ञान देण्यासाठी सुरू केले.

तापी नदी

🔴तापी नदी🔴

🔳उगम:- मूलताई(मध्य प्रदेश)

🔳लांबी:-724 किमी

❇️महाराष्ट्र:-208 किमी

📌उपनद्या:-

❇️उजवीकडून:-

🔳 बाकी   गोमाई  गुळी

🔳सुकी अरुणावती

❇️डावीकडून:-

🔳पांझरा   बोरी   गिरणा   वाघूर

🔳पूर्णा भोगावती.

बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय

🟢 बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय 🟢

🔺स्मृतिदिन

◾️जन्म :- 27 जून 1838

◾️मृत्यू :- 8 एप्रिल 1894

◾️भारताचे राष्ट्रीय गीत 'वन्दे मातरम्' यांचीच रचना आहे.

◾️हे गीत अनेक क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले

◾️शिक्षणसमाप्ति नंतर बंगाल मध्ये डिप्टी मजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती झाली, काही कालावधीनंतर बंगाल सरकार चे सचिव बनले.

◾️त्यांना रायबहादुर आणि सी. आई. ई. या पदव्या इंग्रजांनी दिल्या

◾ आनंदमठ मधील "वंदे मातरम" हे गीत प्रसिद्ध आहे.

◾️उल्लेखनीय कार्य :-

दुर्गेशनन्दिनी
कपालकुण्डला
देवी चौधुरानी
आनन्द मठ
वन्दे मातरम्.

छत्रपती शाहू महाराज खालील वृत्तपत्र ला त्यांनी आर्थिक मदत केली.

🟢 छत्रपती शाहू महाराज 🟢

✍खालील वृत्तपत्र ला त्यांनी आर्थिक मदत केली.

◾️जागरूक:-वालचंद कोठारी

◾️कैवारी:-दिनकरराव जवळकर

◾️मूकनायक:-बाबासाहेब आंबेडकर

◾️हंटर:-खंडेराव बागल

◾️राष्ट्रविर:-शामराव देसाई

◾️तेज:-दिनकरराव जवळकर

◾️प्रबोधन:-केशवराव ठाकरे

◾️ब्राम्हणेतर:-व्यंकटराव गोडे

◾️डेक्कन रयत:-वालचंद कोठारी

◾️जागृती:-भगवंत पाळेकर

◾️विजयी मराठा:-श्रीपतराव शिंदे.

मानवधर्म सभा

🟢मानवधर्म सभा🟢

◾️स्थापना:-22 जून 1844

◾️ठिकाण:-सुरत

◾️पुढाकार:-दादोबा तर्खडकर व दुर्गाराम मंचाराम

🔺सहभाग:-

◾️दिनमनी शंकर

◾️दामोदरदास

◾️दलपत राम भागूबाई

🔺प्रार्थना दिवस:-रविवार

🔺तत्वे:-

◾️ईश्वर एकच असून पूज्य व निराकार आहे

◾️जातिभेद पाळू नये

◾️प्रत्येकाला विचार करण्याचे स्वंतत्र आहे.

संयुक्त महाराष्ट्र पार्श्वभूमी

🟢संयुक्त महाराष्ट्र पार्श्वभूमी🟢

♦️1938:-

◾️रामराव देशमुख यांनी वऱ्हाड वेगळा प्रांत करावा असा ठराव मांडला.

♦️1939:-

◾️नगर साहित्य संमेलन मध्ये मराठी भाषिक एक प्रांत करावा असे ठरले.

♦️1940:-

◾️वाकणकर यांनी गाडगीळ व पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्र चा नकाशा तयार केला.

♦️1941:-

◾️रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.

♦️1942:-

◾️टी जे केदार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली.

समानार्थी शब्द

📚 समानार्थी शब्द🇨🇮📚

काक - कावळा, वायस, एकाक्ष 

किरण - रश्मी, कर, अंशू 

काळोख - तिमिर, अंधार, तम 

कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 

करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी

कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 

कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 

कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 

खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,
पाखरू 

खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 

खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड.

२७ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

🟡 २७ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

🔶 १९९६ - अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर

🔶 १९९१ - युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

🔶 १९७७ - जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

🔶 १९५४ - अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

🔶 १९५० - अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

🟡 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –

🔶 १९३९ - राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू - ४ जानेवारी १९९४)

🔶 १९१७ - खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू - ११ आक्टोबर १९८४)

🔶 १८८० - हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू - १ जून १९६८)

🔶 १८७५ -  दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू - १३ मार्च १८९९)

🔶 १८६४ - शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू - २७ सप्टेंबर १९२९)

🔶 १८३८ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू - ८ एप्रिल १८९४)

🔶 १५५० - चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू - ३० मे १५७४)

🔶 १४६२ - लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू - १ जानेवारी १५१५)

🟡 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –

🔶 २००८ - फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)

🔶 २००० - द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार.

🔶 १९९८ - होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म - ९ फेब्रुवारी १९१७)

🔶 १९९६ - अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म - ५ एप्रिल १९०९)

🔶 १८३९ - महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म - १३ नोव्हेंबर १७८०)

🔶 १७०८ - धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म - १६५०)

   🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

१४ मे २०२२

समानार्थी शब्द

🌇 समानार्थी शब्द 🌇
_______________________

बदल = फेरफार, कलाटणी 
बर्फ = हिम  
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार 
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका 
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक 
बाप = पिता, वडील, जनक 
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती 
ब्रीद = बाणा   
भरवसा = विश्वास 
भरारी = झेप, उड्डाण 
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक 
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा  
भाळ = कपाळ 
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण   
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
माणूस = मानव
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता 
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत 
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा  
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन 
मुख = तोंड, चेहरा 
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा 
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता 
युक्ती = विचार, शक्कल 
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर 
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या 
रक्त = रुधिर 
रणांगण = रणभूमी, समरांगण 
र्हास = हानी    
राग = क्रोध, संताप, चीड 
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया 
राष्ट्र = देश 
रांग = ओळ 
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा  
रेखीव = सुंदर, सुबक 
लग्न = विवाह, परिणय  
लाट = लहर 
लाज = शरम, 
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा 
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू 
वाट = मार्ग, रस्ता 
वाद्य = वाजप 
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू 
वेश = सोशाख
वेदना = यातना  
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी 
विद्या = ज्ञान 
विनंती = विनवणी 
_________________________

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते

🏆 महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते

👤 १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

🙎‍♀ १९९७ : लता मंगेशकर

👤 १९९९ : विजय भटकर

👤 २००१ : सचिन तेंडुलकर

👤 २००२ : भिमसेन जोशी

👤 २००३ : अभय बंग व राणी बंग 🙎‍♀

👤 २००४ : बाबा आमटे

👤 २००५ : रघुनाथ माशेलकर

👤 २००६ : रतन टाटा

👤 २००७ : आर के पाटील

👤 २००८ : नाना धर्माधिकारी

👤 २००८ : मंगेश पाडगावकर

🙎‍♀ २००९ : सुलोचना लाटकर

👤 २०१० : जयंत नारळीकर

👤 २०११ : डॉ. अनिल काकोडकर

👤 २०१५ : बाबासाहेब पुरंदरे

👩 २०२० : आशा भोसले .

देशातील पहिले

📖देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

📖देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

📖देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

📖देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

📖देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)

📖देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

📖देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

📖देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

📖देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

📖देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

📖देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

📖देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

📖देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

📖देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

📖देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

📖देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

📖देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

📖देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

📖देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

📖देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

📖देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

📖देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

📖देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

📖देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

📖देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

📖देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

📖देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

📖देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

📖देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

📖देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे

📖देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

📖देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

📖देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील  पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)​.

यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

🟢 यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार

◾️जन्म: 12 मार्च 1913

◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होय

◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.

◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.

◾️यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.

◾️यशवंतरावांचे आर्थिक विचार
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

🔺यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

◾️ यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.

◾️त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.

◾️ येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.

◾️ 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला

◾️ 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

◾️ दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.
◾️1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले

◾️1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.

◾️1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले

◾️1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

◾️1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री,
1966-70 गृहमंत्री,
1970-74 पर्यंत अर्थमंत्री व
1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.

◾️ यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग

🔶राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग

स्थापना : १३ ऑगस्ट १९९३
मुख्यालय : दिल्ली 
रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य
कार्यकाळ : ३ वर्षे

अध्यक्ष व सदस्य पात्रता 
अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे
१ सदस्य सचिव असतील
१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील
२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील

स्थापना
मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.

यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.

कार्य
OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.

म गो रानडे संस्थात्मक कार्य

🟢म गो रानडे संस्थात्मक कार्य🟢

▪️सार्वजनिक सभा

▪️लवाद कोर्ट 

▪️वसंत व्याख्यानमाला

▪️औद्योगिक परिषद

▪️फिमेल हायस्कुल

▪️फर्ग्युसन कॉलेज

▪️वकतृत्व उत्तेजक सभा

▪️सबजज्ज परिषद

▪️मराठी ग्रंथोज्जक सभा

▪️रे म्युझियम

▪️पूना मार्कन्टाईल बँक

▪️पदवीधर मंडळ.

महत्वपूर्ण पुस्तकें आणि लेखक

महत्वपूर्ण पुस्तकें आणि लेखक

01. अकबरनामा - अबुल फजल

02. अष्टाध्यायी - पाणिनी

03. इंडिका  - मेगास्थनीज

04. कामसूत्र - वात्स्यायन

05. राजतरंगिणी - कल्हण

06. स्पीड पोस्ट - सोभा-डे

07. आइने-ए-अकबरी - अबुल फजल

08. डिवाइन लाईफ - शिवानन्द

09. इटरनल इंडिया - इंदिरा गांधी

10. माई टुथ  - इंदिरा गांधी

11. मिलिन्दपन्हो - नागसेन

12. शाहनामा - फिरदौसी

13. बाबरनामा  बाबर

14. अर्थशास्त्र - चाणक्य

15. हुमायूँनामा - गुलबदन बेगम

16. विनय पत्रिका - तुलसीदास

17. गीत गोविन्द  - जयदेव

18. बुद्धचरितम् - अश्वघोष

19. यंग इंडिया - महात्मा गांधी

20. मालगुडी डेज -  आर०के० नारायण

21. काव्य मीमांसा -  राजशेखर

22. हर्षचरित -  वाणभट्ट

23. सत्यार्थ-प्रकाश -  दयानंद सरस्वती

24. मेघदूत - कालिदास

25. मुद्राराक्षस - विशाखदत्त

26.हितोपदेश - नारायण पंडित

27. अंधा विश्वास -  सगारिका घोष

28. गाइड - आर०के० नारायण

29. ए सूटेबल बाय -  विक्रम सेठ

30. लाइफ़ डिवाइन  - अरविन्द घोष.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...