०७ मे २०२२

महाराष्ट्रातील समाजसुधारक भाऊराव पायगोंडा पाटील

Mpsc History
महाराष्ट्रातील समाजसुधारक – भाऊराव पायगोंडा पाटील :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जन्म – 22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जी. कोल्हापूर.

मृत्यू – 9 मे 1959.

महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात.

22 सप्टेंबर 1887 पहिला श्रमप्रतिष्ठादिन.

भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ ही पदवी गाडगे महाराजांनी दिली.

22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दी म्हणून साजरा केला जातो.

ग्रामीण शिक्षणप्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संस्थात्मक योगदान :

1910 – स्थानिक लोकांच्या मदतीने दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना, (1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)

4 ऑक्टोबर 1919 – काले, ता. कर्‍हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना.(1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)

1924 – छत्रपती शाहू बोर्डिंग, सातारा येथे स्थापना (ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी). छत्रपती शाहू बोर्डिंगचे उद्घाटन म. गांधीच्या हस्ते झाले. बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद आली होते.

1932 – पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी Union Boarding House स्थापन.

1935 – प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी सातारा येथे Silver Jubilee Rural Training College स्थापले..

1940 – महाराजा सायाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली (सातारा).

1947 – छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापले.

स्वावलंबी शिक्षणासाठी ‘कमवा व शिका योजना‘.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्यूकेशन फंड स्थापना ही योजना राबवली.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वैशिष्टे :

समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक.
वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न.

म. फुले, राजर्षी शाहू, म. गांधी यांचा प्रभाव. सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव.
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.

श्रमाच्या प्रतिष्ठेला शैक्षणिक तत्वज्ञानात महत्वाचे स्थान.

तुम्हास जर एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा ! शंभर वर्षाची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा !

हा संदेश.

शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन बहुजन समाजाला समर्थ बनविले.

महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन–ह. रा.महाजनी.
भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तिस्तंभ है – म. गांधी.

‘जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णाना जगातील सर्व विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल ‘ डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिक्रिया.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

०६ मे २०२२

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)

Mpsc History
भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763) :-

1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.
फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.
त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.
काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.
दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.
खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.
युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले. 1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Mpsc History

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

फ्रेंचांच्या भारतीय राजकारणातून झालेला अस्त :-

इ.स. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती.
पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापेटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते.
इ.स. 1798 मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता.
इ.स. 1798 मध्येच र्लॉड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.

भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात आणण्यास उतावीळ झाला होता.
टिपू सुलतान दौलतराव श्ंिादे व हैद्राबादचा निजाम यांनी कवायती सैन्य ,तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे हा उद्देश र्लॉड वेलस्लीने जाहीर केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

निजामाकडे चौदा हजार व शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली.
टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला.
र्लॉड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला.
एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. 1803 मध्ये तेहरान येथे पाठविले.
डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती बेर्यडला एक फौज देऊन पाठविले परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला तो म्हणजे फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754)

Mpsc History
भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754) :-

कर्नाटकच्या पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली.
भारतीय राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला.
या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो, महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती.
ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद वारसांमूळे प्राप्त झाली.
हैद्राबादचा निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे 1748 मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

याच वेळी कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
या संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला.
एकुण डुप्लेला खूप यश मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट 1949 मध्ये अंबूर येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर 1750 मध्ये झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती करण्यात आली. 
चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. 1751 डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.
परंतु लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले, अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता.
त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त 210 सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले.
राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी चंदासाहेबाने 4000 सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जून 1752 मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी झाले.
1754 मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द समाप्त केले.
जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती चांगली होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला.
30 लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्‍या कर्नाटक फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.

_____________

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात पहिले कर्नाटक युध्द (1746-1748)

Mpsc History
भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :-

ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्‍यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता.
पण भारतातही होणार्‍या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्‍यांशी स्पर्धा करावी लागली.
त्या वेळी भारतात कार्यरत असणार्‍या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली.
त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही.
याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला.
सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला.
दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता, या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते.

इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले.
त्याचा परिणाम असा झाली की इ.स. 1759 मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला.
डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली.
यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतातील इंग्रज -फ्रेंच संघर्ष :-

व्यापार करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या, या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता.
भारतातील व्यापारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सज्ञ्ल्त्;ाा मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
17 व्या आणि 18 व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते, त्यामुळें त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे.

ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचचे भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व चंद्रनगर ही उपकेंद्रे होती.
इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व कलकत्ता या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पहिले कर्नाटक युध्द (1746-1748) :-

युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय.
आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी 1746 मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली.
डुप्लेच्या मदतीला 3000 सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला.
फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा 21 सष्टेंबर 1746 रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले.

या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता.
मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते.
शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त 18 मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही.
अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला.
कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञा नवाबाने दिली.
त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले.
या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील 10,000 भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले.
या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले.

परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच 1748 पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले.
या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संस्था आणि संस्थापक

Mpsc History
संस्था आणि संस्थापक :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

◆ १८२८:- राजाराम मोहन राय – ब्राह्मो समाज

◆ १८६५:- देवेंद्र नाथ टागोर – आदी ब्राह्मो समाज

◆ १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज

◆ १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर – पार्थना समाज

◆ १८७२ :- आनंद मोहन बोस – सार्वजनिक समाज

◆ १८७३ :- महात्मा फुले – सत्यशोधक समाज

◆ १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज

◆ १८८० :- केशव चंद्र सेन – नावविधान समाज

◆ १८८९ :- पंडिता रमाबाई – आर्य महिला समाज

◆ १९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज

◆ १९११ :- शाहू महाराज – सत्यशोधक समाज कोल्हापूर

◆ १९१८ :- शाहू महाराज – आर्य समाज शाखा कोल्हापूर

◆ १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे – तरुण ब्राह्मो समाज

◆ १९५५ :- पंजाबराव देशमुख – भारत कृषक समाज.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सोसायटी

● १७८४ :- विलियम जोन्स – बंगाल अशियाटिक सोसायटी

● १७८९ :- विलियम जोन्स – असियटीक सोसायटी

● १८२२ :- जगनाथ शंकर सेठ – बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी

● १८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ – ग्रँट मेडिकल कॉलेज

● १८५२ :- भाऊ दाजी लाड – ग्रँट मेडिकल सोसायटी

● १८६२ :- सर सय्यद अहमद खान – सायंन्तफिक सोसायटी

● १८६३ :- नवाब अब्दुल लतीफ – मोहमदम लिटररी

● १८६४ :- सर सय्यद अहमद खान – ट्र्न्स्लशन सोसायटी

● १८६५ :- दादाभाई नवरोजी – लंडन इडीयन सोसायटी

● १८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा – थेओसोफिकल सोसायटी

● १९०१ :- शाहू महाराज – मराठा एजुकेशन सोसायटी

● १९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी

● १९०६ :- शाहू महाराज – किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी

● १९४५ :- बाबासाहेब आंबेडकर – पीपल्स एजुकेशन सोसायटी.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वि.दा. सावरकर विषयी माहिती :

Mpsc History
वि.दा. सावरकर .

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वि.दा. सावरकर यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.
प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी
विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.
1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.
1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.
‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.
अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.
1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

प्र. अलीकडेच भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- पद्मविभूषण

प्र. अलीकडेच 19 व्या आशियाई 100 यूपी बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये आठवे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- पंकज अडवाणी

प्र. धर्मजीवन गाथा पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे?
उत्तर :- नरेंद्र मोदी

प्र. स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्स 2022 मध्ये नुकताच प्रतिष्ठित 'स्पोर्टस्टार ऑफ द इयर (मेन)' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर :- नीरज चोप्रा

प्र. स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्स 2022 मध्ये नुकताच प्रतिष्ठित 'स्पोर्टस्टार ऑफ द इयर (महिला)' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर :- मीराबाई चानू

प्र. अलीकडे कोणत्या राज्याची विधानसभा देशातील पहिली पेपरलेस विधानसभा बनली आहे?
उत्तर :- नागालँड विधानसभा

प्र. नुकताच जागतिक जल दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- २२ मार्च

प्र. अलीकडेच कोणत्या देशात NATO ने "कोल्ड रिस्पॉन्स 2022" हा मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव आयोजित केला आहे?
उत्तर :- नॉर्वे

---------------------------------

प्र. अलीकडेच प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2022 जिंकणारा पहिला आफ्रिकन कोण बनला आहे?
उत्तर :- फ्रान्सिस कॅरी

प्र. अलीकडे बहरीन इंटरनॅशनल सर्किटमध्ये फॉर्म्युला वन बहरीन ग्रां प्री 2022 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- चार्ल्स लेक्लेर्क

प्र. अलीकडेच भारताचे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी भारतीय तटरक्षक दलाचे कोणते जहाज कार्यान्वित केले आहे?
उत्तर :- ICGS सक्षम

प्र. अलीकडे इंडियन सुपर लीग 2022 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- हैदराबाद एफसी

प्र. अलीकडे कोणत्या राज्यात 'डोल उत्सव' किंवा 'डोल जत्रा' साजरी केली जाते?
उत्तर :- पश्चिम बंगाल

प्र. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान सौमेलो बौबे मैगा यांचे नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर :- माली

प्र. नुकताच जागतिक हवामान दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- २३ मार्च

प्र. अलीकडेच पुष्कर सिंग धामी यांनी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?
उत्तर :- उत्तराखंड

---------------------------------------

मानवी शरीर प्राथमिक माहिती


1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.


2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.


3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन


4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर


5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)


6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन


7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.


8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी


9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.


10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर


11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट


12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.


13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.


14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस


15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9


16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32


17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.


18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...