२७ एप्रिल २०२२

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४


२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड

३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट

४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी …….  हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन


५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण

६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन

७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ

८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट


९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०

१०) “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती (Names of Shivaji Maharaj bodyguards)
११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड

१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
उत्तर: ६४०


१३) युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड

१४) शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४

१५) छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा


१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४

१८) शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा

१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे

२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८

२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१

२२) ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६

२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९

२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३


२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश

२६) शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ

२७) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर

२८) तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज

२९) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर : वढु बु

३०) अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)
३१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

३२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)

३३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ

३४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड

३५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर : बुधभूषण

३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)

३७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
उत्तर : होण

३८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई


३९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे

४०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

४१) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : भोर

४२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते

४३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
उत्तर : तोरणा

४४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा

४५) छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in marathi)
४६) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
उत्तर : गागाभट्ट

४६) कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे

४७) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

४८) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड

४९) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक

५०) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
उत्तर : वेरूळ

५१) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड

५२) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो

५३) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस

५४) स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर

५५) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी

५६) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव

५७) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस

५८) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370

५८) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?
उत्तर : 11 मार्च 1689

५९) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ

६०) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह

६१) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे

६२) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान

2022 मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे

📑📑  2022 मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे

1. भारतीय AXA लाइफ इन्शुरन्सने खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीची नवीन ब्रँड ॲम्बेसिडर  म्हणून नियुक्ती केली आहे ?
1) विद्या बालन ✅
2) करीना कपूर
3) दिशा पटानी
4) माधुरी दीक्षित

2. खालीलपैकी कोण भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकून कसोटीत विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे ?
1) रविंद्र जडेजा
2) आर अश्विन ✅
3) हार्दिक पांड्या
4) भुवनेश्वर कुमार

3. अलीकडेच कोणत्या दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकीपटूचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले ?
1) इयान जॉनसन
2) एलेन बॉर्डर
3) शेन वार्न ✅
4) ग्रेग चैपल

4. पॅलेस्टाईनमधील भारताच्या कोणत्या राजदूताचे नुकतेच निधन झाले?
1) संजय सुधीर
2) पवन कपूर
3) मुकुल आर्य ✅
4) राहुल सचदेवा

5. प्रीमियर लीग प्रायमरी स्टार्स प्रकल्पांतर्गत क्रीडा, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ब्रिटिश कौन्सिलसोबत भागीदारी केली आहे?
1) दिल्ली ✅
2) बिहार
3) पंजाब
4) झारखंड

6. खालीलपैकी कोण जेट एअरवेजचे CEO बनले आहे?
1) राजीव अग्निहोत्री
2) संजीव कपूर ✅
3) प्रकाश सचदेव
4) मनीष मल्होत्रा

7. अलीकडेच दूरसंचार विवाद निपटारा आणि अपील न्यायाधिकरण (TDSAT) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
1) न्यायमूर्ती डी.एन पटेल ✅
2) न्यायमूर्ती संजय पटेल
3) न्यायमूर्ती मोहन अग्निहोत्री
4) न्यायमूर्ती राहुल सचदेवा

8. कोणत्या भारतीय बँकेने अलीकडेच बंदी घातलेल्या रशियन संस्थांना बँकिंग चॅनेलद्वारे पेमेंटवर बंदी घातली आहे?
1) पंजाब नॅशनल बँक
2) स्टेट बँक ऑफ इंडिया ✅
3) आय सी आय सी आय
4) यापैकी नाही

9. खालीलपैकी कोणाची भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
1) माधबी पुरी बुच ✅
2) कोमल अग्रवाल
3) मोनिका सचदेवा
4) जया अग्निहोत्री

10. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार, यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे देशाला किती कोटींची कमाई झाली?
1) 3800 कोटी रु.
2) 5800 कोटी रू.
3) 8800 कोटी रु.
4) 6800 कोटी रू. ✅

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे  #Revolution /क्रांती

📚 हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

📚धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

📚 श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

📚 नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

📚 पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

📚 लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

📚 तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

📚गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

📚 सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

📚 रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

📚 गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

प्राकृतिक व पर्यावरणीय भूगोल

प्राकृतिक व पर्यावरणीय भूगोल
घटकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्याशिवाय त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.



भूरूपशास्त्र

या घटकामध्ये समाविष्ट असलेले मुद्दे हे भूरूप निर्मितीशी संबंधित घटक म्हणून अभ्यासणे आयोगाला अपेक्षित आहे. त्यामुळे या घटकांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ तयारी करताना जास्त महत्त्व देऊन अभ्यासावी लागणार आहेच. पण त्यांचा मूलभूत अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा आहे. या घटकांचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास झाल्याशिवाय त्यांची ‘भूरूप निर्मितीमधील भूमिका’ समजून घेता येणार नाही हे लक्षात घ्यायला हवे.

पृथ्वीचे अंतरंग – रचना आणि घटना –

अंतर्गत व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे हे मुद्दे भूमीस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक म्हणून अभ्यासायचे आहेत. पृथ्वीचे अंतरंग अभ्यासताना तिच्या अंतर्भागाची रासायनिक व भौतिक रचना, त्यांची वैशिष्ट्ये, वितरण आणि त्यामुळे तयार होणाऱ्या अंतर्गत शक्ती असे मुद्दे यामध्ये पाहायला हवेत. खडक, खनिजे यांचा परिणामही व्यवस्थितपणे समजून घ्यायला हवा.

याव्यतिरिक्त भूमीस्वरूपांच्या विकासावर ज्या घटकांचा परिणाम होतो, ज्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ स्रोताचा उठाव/ उंची, खडकांची भौगोलिक रचना, हवामान, ऊर्जा, जैविक क्रिया आणि मानवी क्रिया यांचा समावेश होतो. या घटकांचा भूरूप निर्मितीवरील परिणाम समजून घ्यायला हवा.

भूरूपचक्रांची संकल्पना हा मुद्दा बहिर्गत शक्तींचे कार्य या घटकांतर्गत येईल. यामध्ये नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमीस्वरूपे अभ्यासायची आहेत. या कारक घटकांच्या विदरण आणि संचयनाच्या कार्यातून विकसित होणारी भूरूपे आणि त्यामध्ये समाविष्ट भूरूपिकीय प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भारतीय उपखंडाची उत्क्रांती कशी झाली याचा भूरूपशास्त्रीय मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करायला हवा. भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग- हिमालयीन प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, वाळवंट, किनारी प्रदेश व बेटे यांचे स्वरूप, विस्तार, रचना, वैशिष्ट्ये, भौगोलिक व हवामानशास्त्रीय महत्त्व, आर्थिक महत्त्व हे पैलू अभ्यासायला हवेत. यामध्ये नदी प्रणाली व पर्वत प्रणालींचा अभ्यासही महत्त्वाचा आहे.

ल्ल महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपिकीय वैशिष्ट्ये अभ्यासताना नदी व पर्वत प्रणालींचा उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने सलगता लक्षात घेऊन अभ्यास करावा. या ठळक भूरूपांनंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये/ भूमीस्वरूपे – टेकड्या, कटक, पठारी  प्रदेश, कुंभगर्ता, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण यांचा आढावा घ्यावा. यामध्ये अशा भूरूपांचे स्थान, वैशिष्ट्ये, भौगोलिक तसेच पर्यटनातील महत्त्व असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

हवामानशास्त्र

वातावरण – वातावरणाची संरचना, घटना व विस्तार अभ्यासताना त्याचे ऋतू व हवामानावरील परिणाम समजून घ्यायला हवेत.

हवा व हवामानाची अंगे ((Elements of weather and climate)  अभ्यासताना तापमान, आद्र्रता, पर्जन्यमान, वायुदाब, वारे हे महत्त्वाचे घटक व त्यांचा हवामानावरील परिणाम यांतील संकल्पनात्मक भाग महत्त्वाचा आहे. कार्यकारण संबंध जोडून या संकल्पनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

सौर ऊर्जा – पृथ्वीपृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान- पृथ्वीपृष्ठावरील तापमानाचे ऊध्र्व व क्षितिजसमांतर वितरण या मुद्द्यांचा अभ्यास उष्णतेच्या संतुलनावर परिणाम करणारे घटक, संतुलनाचा परिणाम, तापमानाच्या वितरणास कारक घटक व त्याचा परिणाम समजून घेऊन करावा.

हवेचा दाब, वारे, ग्रहीय व स्थानिक वारे यांचे कारक घटक व परिणाम समजून घ्यावेत.

मोसमी वारे (मान्सून), पर्जन्याचे वितरण, अवर्षण व पूर व त्यांच्याशी निगडित समस्या यांचा महाराष्ट्रापुरता भाग अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असला तरी भारतीय पर्जन्याचा आढावा घेणे या मुद्द्याच्या आकलनासाठी आवश्यक आहे.

मान्सूनची निर्मिती, ॠतूंची निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. वेगवेगळ्या घटकांमध्ये समाविष्ट भौगोलिक प्रक्रियांच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत. –

भौगोलिक व वातावरणीय पार्श्वभूमी; घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

पर्यावरण भूगोल

या घटकातील संकल्पनांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. या संकल्पना समजून घेऊन केलेला अभ्यास हा विश्लेषणात्मक व उपयोजित प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

परिसंस्था घटक अभ्यासताना त्यातील जैविक आणि अजैविक घटक कोणते व त्यांचे एकमेकांवरील अवलंबित्व व परिसंस्थेतील भूमिका समजून घ्यायला हवी.

ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, अन्न साखळी, अन्न जाळे हे घटक एकत्रितपणे अभ्यासायचे आहेत. परिसंस्थेमधील ऊर्जेचा प्रवाह, अन्न साखळी/ जाळ्यातील विविध घटकांमध्ये होणारे ऊर्जेचे हस्तांतरण आणि त्यातून तयार होणारा ऊर्जेचा पिरॅमिड अशा प्रकारे परस्परसंबंध लक्षात घेऊन हा मुद्दा अभ्यासावा.

पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे, त्यावर परिणाम करणारे घटक, स्वरूप, त्यातून उद््भवणाऱ्या समस्या व त्यांवरील उपाय व पर्यावरणाच्या संधारणाची गरज, त्यासाठीचे उपाय, होणारे प्रयत्न असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

जागतिक पारिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेतील ऱ्हास यांचा अभ्यास कारणे, स्वरूप, परिणाम, समस्या आणि संभाव्य उपाय अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.

जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यांचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे करावा – कारणे- विशेषत: CO, COs, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी, स्वरूप, परिणाम, समस्या, संभाव्य उपाययोजना

जैवविविधतेचा ऱ्हास व जागतिक तापमानवाढ यांच्यामुळे उद््भवलेल्या समस्या म्हणून मानव व वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील ऊष्मावृद्धी केंद्रे (Heat Islands) या अभ्यासक्रमातील घटकांचा विशेष अभ्यास आवश्यक आहे. यांचा अभ्यासही कारणे, स्वरूप, समस्या आवश्यक उपाययोजना या मुद्द्यांच्या आधारे करावा.

पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे अभ्यासताना महत्त्वाच्या व्याख्या, तरतुदी, शिक्षेच्या तरतुदी, अपवाद असे मुद्दे लक्षात घ्यावेत.

पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन (EIA) व कार्बन क्रेडिट्स या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात व त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कशा प्रकारे होतो हे समजून घ्यावे.

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

संस्था आणि संस्थापक


🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
🔸 १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
🔹 १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
🔸 १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
🔹१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
🔸 १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
🔹१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
🔸 १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
🔹१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
🔸१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
🔹 १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
🔸 १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
🔹 १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

🔶सोसायटी (Society) 🔶
🔹१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
🔸 १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
🔹१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
🔸१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
🔹१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
🔸 १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
🔹१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
🔸 १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
🔹१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
🔸१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
🔹 १८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
🔸 १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
🔹१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
🔸१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
🔹१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.

खूप महत्त्वाचे आहे :- देश - राजधानी - मुद्रा(Currency)

🔸भारत- दिल्ली - रुपया

🔹पाकिस्तान - इस्लामाबाद - रुपया

🔸नेपाल - कांठमांडू - रुपया

🔹श्रीलंका - श्री जयवर्धनेपुरा कोट्टी - रुपया

🔸बांग्लादेश - ढाका - टका

🔹भूटान - थिम्पू - गुलत्रुम

🔸म्यांमार  - ने पिता  - ओक्यात

🔹जापान - टोक्यो - येन✅

🔸अफ़ग़ानिस्तान - काबुल - अफगानी

🔹चीन - बीजिंग - युआन

🔸उतरी कोरिया - प्योंगयांग - वॉन

🔹दक्षिण कोरिया - सियोल - वॉन

🔸हॉंग कांग - विक्टोरिया - डॉलर

🔹न्यूजीलैंड - वेलिंग्टन. - डॉलर

🔸ऑस्ट्रेलिया - कैनबरा - डॉलर

🔹ब्राजील - ब्रासीलिया - क्रुजादो

🔸संयुक्त राज्य अमेरिका - वॉशिंगटन डी.सी - डॉलर

🔹कनाडा - ओटावा - डॉलर

🔸मैक्सिको - मैक्सिको  - सिटीपीसो

🔹जर्मनी - बर्लिन - यूरो

🔸ग्रेट ब्रिटेन - लन्दन - पाउंड स्टर्लिंग

🔹इटली - रोम - यूरो

🔸फ्रांस- पेरिस - यूरो

🔹स्पेन - मेड्रिड - यूरो

🔸रशिया - मॉस्को - रूबल✅

काही समानार्थी म्हणी

📔आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
📒आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
📕कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
📗साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
📘कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
📙काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
📓करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
📔खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
📒खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
📕आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
📗गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
📘काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
📙घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
📓चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
📔जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
📒पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
📕नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
📗नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
📘बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
📙पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
📓वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
📕वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   

--------------------------------------------------------------
              ‼️   मायबोली मराठी   ‼️
--------------------------------------------------------------

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी 'स्माईल' कर्ज योजना


◆ कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे व्यवसाय उभारून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे स्माईल कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

◆ इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाव्दारे करण्यात आले आहे.

◆ या योजनेंतर्गत एक ते पाच लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार असून, एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के,
भांडवल अनुदान २० टक्के तर सहा टक्के व्याजदर व परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असा राहणार आहे.

◆ या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता व कागदपत्रे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा ( कुटुंबप्रमुखांच्या रेशनकार्डवर सदर सदस्यांचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

◆ योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लक्ष पर्यंत), कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड. वयाचा पुरावा आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...