२३ एप्रिल २०२२

History GK Questions and Answers for Competitive Exams

History GK Questions and Answers for Competitive Exams

1. Arabs were defeated in 738 A.D. by….

(A) Pratiharas

(B) Rashtrakutas

(C) Palas

(D) Chalukyas


Ans .D


2. Harshvardhan was defeated by….

(A) Prabhakaravardhana

(B) Pulakesin II

(C) Narasimha Varma Pallavas

(D) Sasanka

Ans .B



3. Beetapala and Dhiman, the two great artists that India had produced, belonged to the……

(A) Pala Age

(B) Gupta Age

(C) Mauryas Age

(D) Rathan Age

Ans .A

4. Chalukyas king Pulakesin II was defeated by….

(A) Mahendra Varman 1

(B) Narasimha Varman 1

(C) Parameswara Varman 1

(D) Jatila Parantaka

Ans .B


5. The most distinguished ruler of the Chalukyas dynasty was…..

(A) Jayasimha II

(B) Vikarmaditya VI

(C) Somesvara II

(D) Pulakesin II

Ans .D

6. Which ruler founded the famous Vikramshila University for the Buddhists?

(A) Mahi Pala

(B) Devapala

(C) Gopala

(D) Dharmapala

Ans .D


7.Who among the following were the first to invade India?

(A)Afghan

(B) Mongols

(C) Arabs

(D) Turks

Ans .C


8. Which rulers built the Ellora temples?

(A) Chalukyas

(B) Sunga

(C) Rashtrakutas

(D) Pallavas

Ans .C


9. The famous rock-cut temple of Kailasa is at ……

(A) Ajanta

(B) Badami

(C) Mahabalipuram

(D) Ellora

Ans .D


10. The Rathas of Mahabalipuram was built during the reign of the…….

(A) Palas

(B) Cholas

(C) Rashtrakutas

(D) Pallavas

Ans .D


Indian History

11. Which Rashtrakutas ruler built the famous Kailash temple of Siva at Ellora?

(A) Dantidurga

(B) Amoghvarsha 1

(C) Krishan 1

(D) Vats raj

Ans .C

12. The Rashtrakutas kingdom was founded by……

(A) Dandi Durga

(B) Amoghvarsha

(C) Govinda III

(D) Indra III

Ans .A.

13. The paintings in the Ajanta and Ellora caves are indicative of development of art under the……

(A) Rashtrakutas

(B) Pallavas

(C) Pandya’s

(D) Chalukyas

Ans .A


14. The famous Kailas temple cut out of the solid rock at Ellora was built under the patronage of the….

(A) Cholas

(B) Kadambas

(C) Pallavas

(D) Rashtrakutas

Ans .D



15. Who established Mahabalipuram?

(A) Pallavas

(B) Pandya

(C) Chola

(D) Chalukyas

Ans .A

16. Name the capital of the Pallavas?

(A) Kanchi

(B) Vatapi

(C) Trichinopoly

(D) Mahabalipuram


Ans .A

17. The Seven Pagodas of Mahabalipuram are a witness to the art patronized by the….

(A) Pallavas

(B) Pandya’s

(C) Cholas

(D) Chera

Ans .A

18.Rath temple at Mahabalipuram was built in the reign of which Pallav ruler?

(A) Mahendra Varman 1

(B) Narasimha Varman 1

(C) Parmeshwar 1

(D) Nandi Varman 1

Ans .B

19. The first Indian ruler, who established the supremacy of Indian Navy in the Arabian Sea was….

(A) Raja raja 1

(B) Rajendra 1

(C) Rajadhiraja 1

(D) Kulottunga 1

Ans .A

20. Where is Brihadeshwara Temple situated?

(A) Kanchi

(B) Madurai

(C) Shri Shailan

(D) Tanjore

Ans .D

ऐतिहासिक भाषाशास्त्र

ऐतिहासिक भाषाशास्त्र
काळानुरूप भाषेतील बदलांचा अभ्यास

विविध कालखंडांतील भाषेच्या स्वरूपांचा अभ्यास ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. निरनिराळ्या काळखंडांतील भाषा, तिचे बदलते स्वरूप आणि तिच्यात आलेल्या शब्दांच्या उत्पत्तीचे सिद्धान्त या सर्वांचा विचार ऐतिहासिक भाषाशास्त्रात केला जातो. भाषा ही सतत बदलणारी असते. मराठी भाषेच्या यादवकालीन मराठी भाषा, बहामनीकालीन मराठी भाषा, शिवकालीन मराठी भाषा अशा अनेक पायऱ्या आहेत. भाषेच्या संदर्भात ध्वनी, शब्द, प्रत्यय, शब्दार्थ अशा विविध घटकांमधे बदल होत असतात. आर्यभाषेपासून वैदिक भाषा अशाच काही भाषा निर्माण होत गेल्या, त्या सर्व भाषांचा अभ्यास भारतीय ऐतिहासिक भाषाविज्ञानात केला जातो. भाषेच्या बाबतीत कालानुक्रमे वर्गीकरण करणे, ऐतिहासिक विवेचन करणे, भाषेची अन्य भाषांशी तुलना करणे अशा प्रकारचा अभ्यास या शास्त्रात होतो.

भाषेचा अभ्यास प्राचीन काळापासून त्या काळाच्या शास्त्रानुसार हा अभ्यास केला जात असे. हा अभ्यास तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहास या क्षेत्रातील भाषेच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यातून होत असे. बायबलमध्ये, पूर्वी एकच भाषा होती; परंतु देवानेच माणसांना भिन्न भिन्न भाषा दिल्या अशी भाषेची उत्पत्ती सांगितली आहे. या काळात भाषाविषयक अनेक गैरसमजुती होत्या. प्राचीन काळात ग्रीक आणि लॅटिन या श्रेष्ठ भाषा तर इंग्लिश, ही भ्रष्टभाषा अशी समजूत होती. दुसऱ्या एका समजुतीनुसार एकच भाषा असेल तरच समाजात एकोपा टिकून राहील; भाषा वैविध्य आले की, संघर्ष सुरू होतो, असे मत प्रचलित होते. भाषेच्या अभ्यासाच्या दृष्टीने पुढे धर्मग्रंथ, महाकाव्ये, हस्तलिखिते यांची चिकित्सा शैलीच्या अनुषंगाने करून या ग्रंथाचा काळ ठरवण्यात आला आणि अशा अभ्यासाला ‘भाषाभ्यास’ (Philology) असे नाव देण्यात आले.[१]

ऐतिहासिक भाषाशास्त्राची पार्श्वभूमी संपादन करा
सोळाव्या व सतराव्या शतकात भौगोलिक शोध आणि सांस्कृतिक निरीक्षणे यामुळे बायबल मधील कथा; इतिहास आणि भूगोल यांच्या कसोट्यावर टिकू शकल्या नाहीत. या अभ्यासातून अनेक शंका आणि भाषेचे वैविध्य समोर आले. या वैविध्यामुळे भाषा-भाषेमधला सारखेपणा दिसू लागला. या भाषा अभ्यासातून बायबलने सांगितलेला सहा हजार वर्षाचा काळ कमी वाटू लागला.

बायबलची अशी चिकित्सा सुरू झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला प्रारंभ झाला. पुढे विसाव्या शतकात आधुनिक भाषाशास्त्राचा उगम झाल्यानंतर भाषेचा अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती उदयास आल्या. त्यापैकी एक म्हणजे ऐतिहासिक भाषाभ्यास पद्धती होय. ही भाषाशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा असून भाषा कशी जन्मली किंवा भाषेचे मूळ काय, या प्रश्नांच्या उत्तरातून भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाला सुरुवात झाली आहे.

ऐतिहासिक भाषाशास्त्राचा विकास संपादन करा
या ऐतिहासिक भाषाशाश्त्राचा उत्कर्ष १९ व्या शतकात युरोपमध्ये झाला. त्या काळात ही अभ्यासपद्धती शास्त्रीय व वैज्ञानिक मानली जात असे. १८५७ च्या आसपास ऐतिहासिक भाषाशास्त्रत दोन भाषांमधील कुलसंबंधाच्या संशोधनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. इतकी की, डार्विननेही त्याला आदर्श मानूनच ‘मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत’ मांडला. आधुनिक भाषाशास्त्राचा जनक सोस्यूरनेही सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक भाषाशास्त्राचा अभ्यास केलेला आहे.

            विद्येच्या प्रसारानंतर युरोपीय लोक जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या राज्यात जाऊन राज्य करू लागले. त्यामुळे परकीय संस्कृती आणि परकीय भाषा यांचा अभ्यास होऊ लागला. याच प्रक्रियेतून भारतात संस्कृत भाषेचा अभ्यास भाषाशास्त्राच्या क्षेत्रात क्रांतिकारक ठरला. १७८६ साली सर विल्यम जोन्स याने संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या भाषांमधील साम्य पाहून या भाषांची एकाच जननी असावी असा विचार मांडला. त्यामुळे जोन्सला भाषांचे ऐतिहासिक संशोधन करावे लागले आणि भाषांची तुलना करावी लागली. या भाषांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर दोन भाषांमधील साम्याचा अभ्यास करून ध्वनिपरिवर्तनाचे नियम तयार करण्यात आले. त्यातून संस्कृत, ग्रीक, लॅटिन या भाषांमागे इसवीसनपूर्व तीन हजार वर्ष ‘आदी-इंडोयुरोपियन’ ही भाषा असावी असा तर्क मांडण्यात आला आणि यातील भाषांना भाषा- भगिनी ठरवण्यात आले. त्यांची भाषाकुले व उपकुले वृक्षाकृतीच्या आधारे दाखवण्यात आले.

ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या मर्यादा संपादन करा
ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या मर्यादा

            ऐतिहासिक भाषाशास्त्राची पद्धती रूढ झाली असली तरी भाषाशास्त्राच्या मर्यादाही आहेत. एक म्हणजे, या अभ्यासासाठी जी भाषिक सामग्री घेतली जाई, ती मृत भाषामधील लिखित सामग्री असे आणि त्यावरून अनुमाने केली जात. मात्र भाषेच्या ध्वनींविषयी, लिखित व मौखिक बोली स्वरुपात नेमका संबंध काय, याचा शोध घेतल्याशिवाय या तऱ्हेच्या अभ्यासावरून योग्य ते परिवर्तनाचे नियम हाती लागू शकणार नाही. ही या अभ्यासपद्धतीची मोठी मर्यादा आहे.

            दुसरे म्हणजे, ‘जनन’ ही कल्पना भाषांच्या बाबतीत बरीच रूपकात्मक वापरावी लागते. जितकी ती वनस्पती व प्राणी उत्क्रांतीबद्दल वापरता येते तितकी भाषेबाबत वापरता येत नाही.

            तिसरे म्हणजे, आदिभाषेची कल्पना मानताना करताना ती भाषा एकजिनसी स्वरुपाची असणे गरजेचे असते. मात्र भाषा परिवर्तनाचे नियम भाषा इतिहासाच्या काही टप्प्यात अधिक लागू पडतात तर काही टप्प्यात तितकेसे लागू पडत नाही. आणि असे का होते, याचे स्पष्टीकरण या अभ्यासपद्धतीत मिळत नाही.

ऐतिहासिक भाषाशास्त्राबाबत काही प्रश्न संपादन करा
भाषिक बदलाचे व त्यामागील नियमित तत्त्वांचे काटेकोर वर्णन देण्यात ऐतिहासिक भाषाअभ्यासाने प्रगती केली असली तरी १९ व्या शतकाच्या अखेरीस या अभ्यासपदाहती संदर्भात काही मुलभूत स्वरूपाच्या शंका उपस्थित होऊ लागल्या. या अभ्यासपद्धतीची ही मोठीच मर्यादा आहे.

            एक म्हणजे भाषानाधील किंवा भाषाकुलामधील जनन-संबंध शोधत असताना जनक किंवा आदिभाषेचे स्वरूप निश्चित करता येणे खरोखर शक्य आहे का? दुसरे, साऱ्या भाषांची आधी एकजिनसी भाषा अस्तित्वात होती, याला वस्तुनिष्ठ कसलाही पुरावा नाही. भाषांचे स्वरूप पुनर्रचित असेच राह्रणार. त्यामुळे आदिभाषेच्या अस्तित्वाविषयी व स्वरूपाविषयी शंकाच राहते. भाषा सतत बदलत असल्यामुळे बदल हा अमुक ठिकाणपासून झाला असे मानता येत नाही. तेव्हा विशिष्ट बिंदूपासून परिवर्तनाचे वर्णन करणे सोयीचे नाही.

            तिसरे असे की,  भाषाकुळातील जननसंबंध शोधत मागे मागे गेल्यास भाषांची वा कुळांची संख्या कमी कमी होत गेली पाहिजे; ती तशी होताना दिसत नाही. याचा अर्थ ‘जनन’ ही संकल्पना मानवी कुलाला जशी लागू पडते, तशीच ती भाषाकुलाला लागू पडत नाही.

            चौथे म्हणजे, एक भाषा संपून दुसरी भाषा कुठे सुरू झाली ते भौगोलिकदृष्ट्या ठरवणे जितके अवघड तितकेच ऐतिहासिक दृष्ट्या ठरवणे अवघड. भाषाकुल आकृत्या जितक्या रेखीव व सुटसुटीत वाटतात तितक्याच भाषा प्रत्यक्षात गुंतागुंतीच्या असतात. अशा मर्यादा समोर आल्यामुळे ऐतिहासिक व तौलनिक भाषाअभ्यासपद्धतीपेक्षा वेगळी अभ्यास पद्धती असते अशी जाणीव निर्माण करण्याचे कार्य सोस्यूरने केले. त्यातून पुढे वर्णनानात्मक भाषापद्धतीचा विचार पुढे आला

महर्षी कर्वे

पुनर्विवाह : महर्षी कर्वे

त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती.

लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला.

ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते.

पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते.

बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली.

विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाह साठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे

धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे

(जन्म : १८ एप्रिल १८५८; - ९ नोव्हेंबर १९६२) यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र. धो. कर्वे हे होत. त्यांनीदेखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

भारतामध्येच्या काळात संततिनियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता अशा या काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संततिनियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले या काळामध्ये त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं समाजाकडून त्यांची उपेक्षा केली गेली.

सहजासहजी त्यांचा हा विचार समाजाने या काळामध्ये स्वीकारला नाही. मात्र त्यांचा हा विचार नक्कीच स्पृहणीय होता काळाची पावले ओळखणारे असे हे समाजसुधारक होते.

मानव विकास निर्देशांक व इंदिरा आवास योजना (IAY)

🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲:
मानव विकास निर्देशांक (Human Development Index)

> प्रकाशन : UNDP

> पहिला HDI : 1990

> रचना: महबूब–उल–हक व अमर्त्य सेन

> आयाम

दीर्घ व निरोगी जीवन (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान)

ज्ञानाची सुगमता (शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे,अपेक्षित शिक्षणाची वर्षे)

चांगले राहणीमान (जीएनपी-पीपीपी,आधारभूत वर्ष 2005)

> गुनांकन :
0-1 (0 = अपूर्ण मानव विकास, 1 = पूर्ण मानव विकास )

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम

योजनेची सुरुवात 2 ऑक्टोंबर 1980

योजनेत कार्यवाई 6 वी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्मिती करणे

उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करण्याबरोबरच गावांमध्ये स्थिर व उत्पादक साधनसामग्री निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत  बनवण्यासाठी सामुदायिक परिस्थिती निर्माण करणे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पन्नास 50% भागीदारीतून लागू करण्यात आला सन 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आला.

________________________________

इंदिरा आवास योजना (IAY)

1985-86 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहरलाल रोजगार योजनेचा भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारी 1966पासून

भारत सरकारने तिला स्वातंत्र्य दर्जा दिला आहे.

या योजेनेअतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व मुक्त वेठबिगर या गटांतील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी/सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते.

ही केंद्र पुरस्कार योजना असून वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 75:25 प्रमाणात केली जाते.पूर्वात्तर राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 असे आहे.

टिकाऊ पदार्थाची घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल 2010 पासून प्रत्येक घराची किमत प्रत्येकी रु. 45000 इतकी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ही किंमत प्रत्येकी रु. 70,000 एवढी सुधारित केली आहे.

मूल्यवर्धित करप्रणाली
(Value Added Tax:VAT)

VAT प्रणालीचे प्रतिपादन 1918 मध्ये एफ्. वान. सिमेस यांनी केले.

भारतात VAT ची शिफारस राष्ट्रीय विकास परिषदेने 1956-57 मध्ये केली.

→ 1976 च्या एल. के. झा. समितीच्या शिफारशीनुसार उत्पादन शुल्कासाठी MANVAT पद्धत लागू.

VAT चा मर्यादित प्रमाणावर वापर करणारा पहिला देश : फ्रान्स

संपूर्ण VAT चा वापर करणारा पहिला देश : ब्राझील

वस्तूच्या विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर तिचे मूल्य जेवढ्या प्रमाणात नफ्याचे मार्जिन म्हणून वाढविले जाते तेवढ्या मूल्यवर्धनावरच विक्री कर आकारला जातो. त्यामुळे VAT ला Multi-point
levy Tax' म्हणतात.

_______________________________

🔸जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतातील  गरिबीत अत्यंत १२.३% ने घट

🔹जागतिक बँकेच्या पॉलिसी रिसर्च वर्किंग पेपरनुसार भारतातील अत्यंत गरिबीचा दर 2011 मधील 22.5% वरून 2019 मध्ये 10.2% वर आला. 

🔸हे देशातील 2011 ते 2019 या कालावधीत अत्यंत गरिबीच्या संख्येत 12.3 टक्के घट दर्शवते. 

🔹शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील घसरण खूपच जास्त होती.

🔸ग्रामीण भागातील गरिबीत 14.7 टक्क्यांनी घट झाली आहे, तर शहरी भागातील दारिद्र्य 7.9 टक्क्यांनी घसरले आहे.

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

🔰🔰पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती🔰🔰

🔸पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🔸उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🔸उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🔸विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🔸अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🔸रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

नदीकाठची शहरे व भारतातील प्रमुख आदिवासी जमाती‌‌ आणि महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या ,महाराष्ट्र धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


🌺नदीकाठची शहरे🌺

◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण

_________________________________

♻️ भारतातील प्रमुख आदिवासी जमाती ♻️

✏आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

✏गुजरात -भिल्ल

✏झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

✏त्रिपुरा - चकमा, लुसाई

✏उत्तरांचल - भुतिया

✏केरळ - मोपला, उरली

✏छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

✏नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

✏आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू

✏पश्चिम - बंगाल संथाल, ओरान

✏महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

✏मेघालय - गारो, खासी, जैतिया

✏सिक्कीम - लेपचा

✏तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

___________________________________


🚩🚩 महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या 🚩🚩

महाराष्ट्रात जिल्हे - 36

महाराष्ट्रात तालुके - 358

महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग - 6

महाराष्ट्रात महानगरपालिका - 27

महाराष्ट्रात विधानसभा जागा - 288

महाराष्ट्रात विधानपरिषद जागा - 78

महाराष्ट्रात लोकसभा जागा - 48

महाराष्ट्रात राज्यसभा जागा - 19

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे-3

महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे - 4

महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे - 5

महाराष्ट्रात रामसर स्थळे - 2

महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने - 6

महाराष्ट्रात रेल्वे विभाग - 2

महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र - 6

महाराष्ट्रात वाघ : एकुण - 312

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🏝जायकवाडी         नाथसागर
🏝पानशेत              तानाजी सागर
🏝भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर
🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर
🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय
🏝भाटघर                  येसाजी कंक
🏝मुळा                      ज्ञानेश्वर सागर
🏝माजरा                   निजाम सागर
🏝कोयना                   शिवाजी सागर
🏝राधानगरी                लक्ष्मी सागर
🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ
🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर
🏝माणिक डोह            शहाजी सागर
🏝चांदोली                   वसंत सागर
🏝उजनी                     यशवंत सागर
🏝दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर
🏝विष्णुपुरी             शंकर सागर
🏝वैतरणा                 मोडक सागर

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...