२२ एप्रिल २०२२

सूर्यमाला

सूर्यमाला

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र ,[१] ५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.

सूर्यमाला

आपल्या सूर्यमालेतील ग्रह

सूर्यमा numberलेतील ग्रह

सूर्यमालेतील ग्रह
सर्वसाधारपणे, सूर्यमालेत एकंदर पुढील विभाग करण्यात येतात - सूर्य, पृथ्वी, दोन अंतर्ग्रह- शुक्र व बुध, अन्य ग्रह, मंगळ व गुरू यांमधील लघुग्रहांचा पट्टा, चार वायुमय बाह्यग्रह व कायपरचा पट्टा. कायपरचा पट्ट्यापुढे अतिशय विखुरलेली चकती व शेवटी ऊर्टचा मेघ.

सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र हे अंतर्ग्रह, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती नैसर्गिक उपग्रह (मराठीत सर्वसाधारणपणे वापरला जाणारा शब्द-चंद्र) आहेत. तर बाह्य ग्रहांच्या भोवती कडी आढळतात. पाच बटुग्रह म्हणजे प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.

वर्गीकरणसंपादन करा
सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गाौत वर्गीकरण केले जाते : ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू. जिला इतके वस्तुमान आहे की ती स्वतःच एका गोलात रूपांतरित होऊ शकते अशा वस्तूला ग्रह हे नाव दिले जाते. ग्रहाच्या जवळील अवकाशात सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर छोट्या वस्तू नसतात. या व्याख्येप्रमाणे सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत, असे ज्योतिषी मानतात - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण).

ऑगस्ट २४ २००६ रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने (International Astronomical Union) ग्रहांची नवीन व्याख्या बनविली व त्यानुसार प्लूटोचे वर्गीकरण ग्रहांमधून बटुघुग्रहामध्ये करण्यात आले. त्याच वेळी सेरेस व एरिस यांनाही बटुग्रहांचा दर्जा दिला गेला.[२]

एका बटुग्रहाजवळील अवकाशात इतर खगोलीय वस्तूंचे अस्तित्व असू शकते. लघुग्रहांमध्ये गणना होणाऱ्या इतर खगोलीय वस्तू म्हणजे सेडना, ऑर्कस व क्वाओर.

प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जात होता. पण २० व्या शतकाच्या शेवटी सूर्यमालेतील बाहेरच्या भागात प्लूटोसारख्या अनेक वस्तू शोधण्यात आल्या. यापैकी मुख्य म्हणजे प्लूटोपेक्षा आकाराने मोठा असणारा एरिस.

सूर्याभोवती फिरणाऱ्या इतर खगोलीय वस्तूंना एकजात छोट्या वस्तू असे म्हणतात. "सूर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह अथवा छोट्या वस्तूंभोवती फिरतात, त्यांना नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र म्हणतात".[३]

प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे ग्रहाच्या एका प्रदक्षिणेदरम्यान त्याचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते.

सूर्यमालेतील अंतरे मोजताना खगोलशास्त्रज्ञ साधारणपणे खगोलीय एकक (Astronomical Unit or AU) हे एकक वापरतात. एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळ जवळ १४,९५,९८,००० कि.मी. (९,३०,००,००० मैल) इतके आहे. याप्रमाणे गुरू ग्रहाचे सूर्यापासून अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लुटोचे सुमारे ३८ AU इतके आहे. अंतरे मोजण्याचे दुसरे परिमाण म्हणजे प्रकाशवर्ष. एक प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे ६३,२४० खगोलीय एकके इतके अंतर.

वारांची नावेसंपादन करा
आठवड्याचे वार सात आहेत. जगात सर्वत्र वारांची नावे सारखीच आहेत आणि ती भारतातील प्राचीन भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांनी दिली आहेत. त्यासाठी त्यांनी सूर्य आणि चंद्र यांनाही ग्रह मानले आहे.

उदयात उदयं वारः !!

भारतीय ज्योतिषींच्या दृष्टीने एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्यॊदयापर्यंतच्या काळाला वार म्हणतात. इंग्रजी कालगणनेनुसार मध्यरात्रीपासून ते पुढच्या मध्यरात्रीपर्यंतच्या काळास वार म्हणतात. इस्लामी पद्धतीत सू्र्यास्त झाला की वार बदलतो.

आर्यभटाचे सूत्र आहे :

आ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा: !!

दिवसाचे होरे २४ असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाचा असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.

वरील सूत्राचा अर्थ असा की, आ मंदात्... म्हणजे मंदगतीच्या ग्रहापासून ....शीघ्रपर्यंतम्....शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत... होरेशा:... होरे सुरू असतात.

ग्रहांना एका राशीतून दुसऱ्या राशीत जावयास लागणारा काळ : शनी - अडीच वर्षॆ; गुरू : एक वर्ष; मंगळ - ५७ दिवस; सूर्य (रवि) - एक महिना; शुक्र - १९ दिवस; बुध - साडेसात दिवस; चंद्र (सोम) - सव्वादोन दिवस

त्यामुळे, मंद ग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत—शनी, गुरू, मंगळ, रवि, शुक्र, बुध, चंद्र (सोम). (उरलेल्या ग्रहांचा राश्यंतराचा काळ  : राहू-केतू - दीड वर्ष; युरेनस - ७ वर्षे; नेपच्यून १४ वर्षे; प्लुटो - २०.६४ वर्षे)

शनिवारी पहिला होरा (एक तास) शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रवीचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा आणि सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा.....

इथे २४ तास पूर्ण झाले.

आता दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रवीच्या होऱ्याने. म्हणून शनिवारनंतर रविवार येतो.

थोडक्यात असे की, शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र. या क्रमात कोणात्याही वाराच्या ग्रह-नावापासून सुरुवात केल्यावर तिसरे नाव पुढच्या वाराचे असते. असे केले की, शनी-रवि-चंद्र(सोम)-मंगळ-बुध-गुरू-शुक्र हा क्रम येतो. यावरून हेही सिद्ध होते की भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांना आकाशातील भ्रमणासाठी ग्रहांना लागणाऱ्या काळाचे ज्ञान होते.

रचनासंपादन करा

क्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या मागून घेतलेले सूर्यमालेचे छायाचित्र
सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे सूर्य होय. सूर्याचे वस्तुमान सूर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे ९९.८६% इतके आहे. इतक्या प्रचंड वस्तुमानामुळेच सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूंना त्याच्या भोवती फिरावयास लावते.[४] उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हे गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.

सूर्याभोवती फिरणाऱ्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. ग्रहांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीच्या जवळपास आहे तर धूमकेतू व कायपरचा पट्टा यांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीशी काही अंशांचे कोन करते.

सूर्यमालेतील वस्तूंच्या सूर्याभोवती फिरण्याच्या पातळी (परिमाणात)
सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह व इतर अनेक वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. याला काही अपवाद आहेत, युरेनस, हॅलेचा धूमकेतू आदी सर्व ग्रह स्वतःभोवती अँटीक्लाॅकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात, अपवाद - शुक्र. तो क्लाॅकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेत फिरतो.

सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या वस्तू या केप्लरच्या सिद्धान्ताप्रमाणेच फिरतात. प्रत्येक वस्तू ही एका लंबवर्तुळाकार(पण जवळजवळ वर्तुळाकार) कक्षेत फिरते. त्या कक्षेच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. सूर्याच्या जितक्या जवळ ती वस्तू येईल, त्याप्रमाणात तिचा फिरण्याचा वेग वाढतो. ग्रहांच्या कक्षा या जवळ जवळ वर्तुळाकार आहेत (म्हणजे दोन्ही केंद्रस्थाने खूप जवळ आहेत), तर धूमकेतू व कायपरचा पट्ट्यातील काही वस्तूंच्या कक्षा या फारच लंबवर्तुळाकार आहेत.

सूर्यमालेत असणारी खूप लांब अंतरे दाखविण्यासाठी अनेक जण ग्रहांच्या कक्षा या सारख्या अंतरावर दाखवितात. पण प्रत्यक्षात मात्र ग्रह सूर्यापासून जितका दूर तितकीच आधीच्या ग्रहापेक्षा त्याची कक्षा लांब अंतरावर आढळते. उदा. शुक्र हा बुधापासून ०.३३ AU अंतरावर आहे, तर शनी हा गुरूपासून ४.३ AU इतका दूर आहे. तसेच नेपच्यूनची कक्षा ही युरेनसपेक्षा १०.५ AU इतक्या अंतरावर आहे. अनेक जणांनी या अंतरांमधील संबंध शोधण्याचे प्रयत्‍न केले आहेत, पण अजूनतरी याबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण उपलब्ध नाही.

निर्मितीसंपादन करा
मुख्य लेख - सूर्यमालेची निर्मिती

चित्रकाराच्या नजरेतून सूर्यमाला
सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानतात. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळे सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्षे अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली.[५] जुन्या धूमकेतूंचा अभ्यास केला असता, त्यांच्यावर फक्त मोठ्या फुटणाऱ्या ताऱ्याच्या गाभ्यात आढळणारी मूलद्रव्ये सापडली आहेत. यामुळे सूर्य हा जवळपास झालेल्या तारकासमूहातील स्फोटामुळे तयार झाल्याचा निष्कर्ष निघतो. या स्फोटामुळे तयार झालेली ऊर्जा ही या तेजोमेघाच्या कोसळण्याला कारणीभूत असण्याची शक्यता आहे.[६]

सूर्यमाला ज्या तेजोमेघापासून तयार झाली, त्याचा व्यास सुमारे ७००० ते २०००० खगोलीय एकके इतका होता[५][७], तसेच त्याचे वस्तुमान हे सूर्यापेक्षा थोडेसे जास्त (सुमारे १-१०% जास्त) होते.[८] हा तेजोमेघ जेव्हा कोसळला, तेव्हा कोनीय बलामुळे त्याचा फिरण्याचा वेग वाढत गेला. जसेजसे त्याच्या केंद्रस्थानी वस्तुमान वाढत गेले, तसे त्याचे केंद्रस्थान इतर भागांपेक्षा जास्त गरम होत गेले. त्यानंतर त्या तेजोमेघावर गुरुत्वाकर्षण, वायूंचा दबाव, चुंबकीय क्षेत्र तसेच फिरण्याने येणारे बल, यांचा प्रभाव वाढला व तो एका तबकडीमध्ये रूपांतरित झाला. या तबकडीचा व्यास सुमारे २०० खगोलीय एकके इतका होता[५] तसेच त्याच्या केंद्रस्थानी एक उदयोन्मुख तारा होता.[९][१०]

टी टौरी तारे सूर्यापेक्षा तरुण आहेत. त्यांच्या भोवतीसुद्धा अश्या तबकड्या आढळतात.[८] या तबकड्यांचा व्यास काहीशे किलोमीटर असून त्यांचे कमाल तापमान हे सुमारे १००० केल्व्हिन (सुमारे ७२७° सेल्सियस) इतके आहे.[११]

ओरायन नेब्युलातील तबकडीचे हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र
सूर्यसंपादन करा
सूर्य दर सेकंदाला चार कोटी टन हायड्रोजन अणुइंधन वापरतो. सूर्य सतत जळत राहतो. सूर्याचे तापमान हजारो अंश सेल्सिअस आहे. सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे.सूर्यापासून पृथ्वीचे सरासरी अंतर जवळजवळ १५ कोटी किलोमीटर किंवा ९ कोटी ३० लाख मैल आहे. सूर्यप्रकाशाला पृथ्वीवर पोचायला ८.३ मिनिटे लागतात. या प्रकाशाच्या ऊर्जेमुळे प्रकाश-संश्लेषण नावाची एक जैव-रासायनिक अभिक्रिया होते. ही अभिक्रिया पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. सूर्याचा पृष्ठभाग हायड्रोजन, हेलियम, लोह, निकेल, ऑक्सिजन, सिलिकॉन, सल्फर, मॅग्निशिअम, कार्बन, नियॉन, कॅलशियम, क्रोमियम आदी घटकांपासून झाला आहे. [12] यापैकी हायड्रोजनचे प्रमाण ७४% आणि हेलियमचे २४% आहे.

लघुग्रहांचा पट्टासंपादन करा
मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान काही अवकाशस्थ दगड व ग्रहसदृश अवकाशीय वस्तू आहेत. परंतु त्यांचे वस्तुमान व कक्षा या ग्रहांसारख्या नसल्यामुळे त्यांना लघुग्रह असे म्हणतात. या लघुग्रहांना एकत्रितपणे लघुग्रहांचा पट्टा असे संबोधतात.४.६ अब्ज वर्षांपूर्वी, सूर्यमालेच्या निर्मितीच्यावेळी ग्रह न होऊ शकलेले गुरू अणि मंगळाच्या कक्षांमधल्या रिकाम्या जागेत फिरत असणाऱ्या अशनींना लघुग्रह म्हणतात. ९४५ कि.मी. व्यासाचा सेरेस हा सर्वांत मोठा लघुग्रह आहे. १०० कि.मी.पेक्षा अधिक व्यास असलेले एकूण ७ लघुग्रह आहेत. आतापर्यंत सुमारे ७,८९,०६९ लघुग्रह शोधले गेले आहेत. सर्व लघुग्रहांचे मिळून एकूण वस्तुमान पृथ्वीच्या चंद्राइतके आहे.

धूमकेतूसंपादन करा

धूमकेतू
धूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.

कायपरचा पट्टासंपादन करा
कायपरचा पट्टा किंवा एजवर्थ-कायपर पट्टा हा नेपच्यूनच्या कक्षेपासून पुढे (सूर्यापासून सुमारे ३० खगोलशास्त्रीय एकक (A.U.)) ते ५० खगोलशास्त्रीय एकक यामध्ये पसरला आहे. हा पट्टा लघुग्रहांच्या पट्ट्यासारखाच आहे, मात्र त्यापेक्षा बराच मोठा, म्हणजे जवळपास २० पट रुंद व २०-२०० पट अधिक वस्तुमान असलेला असा आहे.[१][२] लघुग्रहांच्या पट्ट्याप्रमाणेच हा पट्ट्यातसुद्धा मुख्यत्वेकरून सूर्यमालेतील छोट्या वस्तू आहेत. जवळपास सर्व लघुग्रह हे पाषाण रूपात असले तरी कायपर पट्ट्यातील जवळपास सर्व वस्तू ह्या गोठलेला मिथेन, अमोनिया व पाण्याचा बर्फ ह्यांच्या बनलेल्या आहेत. प्लूटो, हौमिआ व माकीमाकी हे तीन बटु ग्रह या पट्ट्यात आहेत. सूर्यमालेतील काही ग्रहांचे उपग्रह (उ.दा. नेपच्यूनचा ट्रायटन व शनीचा फीबी) हे याच पट्ट्यात बनले आणि नंतर त्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे या पट्ट्यात अडकले आहेत.[३][४]

कायपरच्या पट्ट्यातील ज्ञात खगोलीय वस्तू, सोबत ४ बाह्य राक्षसी वायुग्रह दाखविले आहेत. १९९२ च्या सुरुवातीपासून खगोलशास्त्रज्ञांना नेपच्यूनच्या पुढे अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला जेरार्ड कायपर यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले. कायपर हे नेपच्यूनपलीकडील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल भाकीत करण्याच्या पहिल्या काही खगोलशास्त्रज्ञांपैकी एक होते. हा पट्टा अनेक (short-period)(अल्पायुषी)[मराठी शब्द सुचवा] धूमकेतूंचे उगमस्थान मानला जातो. खगोलशास्त्रज्ञ आता प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू म्हणून गणतात.[५] कायपरच्या पट्ट्यातील वस्तूंमध्ये व धूमकेतूंमध्ये अनेक समानता आहेत. उदाहरणार्थ, सौरवाऱ्यामुळे धूमकेतूंप्रमाणे प्लूटोचाही पृष्ठभाग अंतराळात भिरकावला जात आहे.[६] जर प्लूटोला सूर्यापासून पृथ्वीइतक्या अंतरावर ठेवले तर त्याचीसुद्धा शेपटी तयार होईल.[७]

जरी प्लूटोला कायपरच्या पट्ट्यातील सर्वात मोठी वस्तू मानण्यात येत असले तरी, प्लूटोपेक्षा थोडा मोठा असलेल्या ट्रायटनचे वातावरण, तसेच त्यावरची भूरचना, यांबाबतीतील अनेक गुणधर्म प्लूटोसारखेच आहेत. यामुळे अनेक शास्त्रज्ञांची अशी समजूत आहे की ट्रायटन आधी कायपरच्या पट्ट्यात होता व नंतर तो नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवतीच्या कक्षेत अडकला.[८]

ऊर्टचा मेघसंपादन करा
सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थनसंपादन करा
सूर्यमालेचा शोधसंपादन करा
सूर्याचा शोध तेव्हा लागला,जेव्हा बिगबँग नावाची भौतिक घटना घडून आली तेव्हा सूर्य आणि त्याच्याभोवती आठ ग्रहांचा उगम झाला त्याला सूर्यमाला असे संबोधिले गेले. याआधी अभ्यासक्रमांमध्ये ग्रहांचा उल्लेख केला जात होता. त्यानंतर बटुग्रह नावाच्या नवीन ग्रहाचा सूर्यमालेमध्ये समावेश केला गेला. सध्याच्या अभ्यासकांमध्ये सूर्य आणि त्याभोवती नऊ ग्रह अशी सूर्यमाला आहे.

दुर्बिणीतून निरीक्षणसंपादन करा
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप शतकाचा(???) पक्ष आहे जो स्थगित(???) होत आहे. त्याच्या तीव्र जटिलतेमुळे आणि कंपन चाचणी दरम्यान आढळलेल्या काही असंगत वाचनांमुळे(???) दूरबीनची(??) प्रक्षेपण तारीख बऱ्याच वेळा पुन्हा धडकली(???) आहे - सध्या 2021 मध्ये काहीवेळा(??) लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. परंतु स्पष्ट कारणांमुळे(???), नासा हे या मोहिमेकडे पहात आहे .

आर्थिक आणीबाणी

आर्थिक आणीबाणी
१) आर्थिक आणीबाणीची घोषणा केल्यापासून २ महिन्याच्या आत संसदेने मान्यता देणे आवश्यक आहे असे न झाल्यस घोषणा देणे रद्द होते

२) आर्थिक आणीबाणीची घोषणा केलेल्या कालावधीत जर लोकसभा विसर्जित असेल तर राज्यसभेची मान्यता घेणे आवश्यक असते.

आर्थिक आणीबाणीचे परिणाम:
१. केंद्र व राज्य सरकारांना आर्थिक बाबतीत राष्ट्रपती योग्य ते आदेश देतात.

२. राज्य सरकारांना आपली आर्थिक विधेयके राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवावी लागतात

३. कोणत्याही अधिका-याचे किंवा पदाधिका-यांचे वेतन वा भत्ते कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस आहे. आर्थिक वर्षातील महसूल – उत्पन्नाच्या वाटणीमध्ये राष्ट्रपती सुधारणा करु शकतात (आत्तापर्यत भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली नाही.)

यात भारताचा सर्व प्रकारच्या महसूलातून मिळालेले उत्पन्न कर्ज व सार्वजनिक उद्योगांचा नफा सरकार ने दिलेल्या कर्जाची आलेली परत फेड इतर उत्पन्नाचा समावेश होतो.

सरकारचा पुर्ण खर्च एकत्रित व संचित निधीतुन केला जातो.

भारताच्या एकत्रित व संचित निधी खर्चासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता असते.

संसदेच्या संमतीची आवश्यकता नसलेले खर्च:
१. राष्ट्रपतीचे वेतन, भत्ते व राष्ट्रपतींच्या कार्यालयावरील खर्च

२. सर्वोच्च न्यायालयच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते.

३. CAG चे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन.

४. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे द्याव्या लागणा-या रकमा

५. घटना/संसद यांनी मान्य केलेल्या खर्चाच्या बाबी
वरील सर्व बाबी वरील खर्चावर संसदेत चर्चा होते पण मतदान होत नाही.

FAQs
देशात आर्थिक आणीबाणी कोण घोषित करू शकते?
देशाची आर्थिक परिस्थिती पाहता आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे, परंतु या घोषणेसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे.

भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली?
कलम-360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी भारतात आतापर्यंत कधीही लागू करण्यात आलेली नाही. तर राष्ट्रीय आणीबाणीचा भाग असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आणीबाणी अनुक्रमे एकदा आणि दोनदा लागू करण्यात आल्या आहेत. राज्यात शंभराहून अधिक वेळा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

आर्थिक आणीबाणीचा कमाल कालावधी किती असतो?
जारी केलेली आर्थिक आणीबाणीची घोषणा संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या ठरावांद्वारे मंजूर केल्याशिवाय, त्या कालावधीच्या समाप्तीपूर्वी दोन महिन्यांच्या समाप्तीनंतर कार्य करणे बंद होईल.

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे?
कलम ३६० नुसार देशात आर्थिक आणीबाणीची कल्पना करण्यात आली आहे. कलम ३५२ मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद आहे आणि कलम ३५६ मध्ये राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे.

भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आल्या आहेत?
भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतल्या आहेत. भारतीय राज्यघटनेत तीन प्रकारच्या आणीबाणीची कल्पना केली आहे.

आणीबाणी (भारत)

आणीबाणी (भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.[१] राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण जनता आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. समाजवादी पक्ष्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात मृणाल गोरे,पन्नालाल सुराणा,प्रभूभाई संघवी, यांनी मोठे योगदान दिले.

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.
पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.
मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली.

घटनाक्रम संपादन करा
१९७५
१२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१ च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
२२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.
२४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.
२५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.
३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.
१ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.
२३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.
२४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.
५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.
१९७६
२१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.
२५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.
३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.
१ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.
१९७७
१८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.
२० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.
२४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.
२१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.
२२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.

राज्यपाल विशेष अधिकार/Governor

राज्यपाल विशेष अधिकार/Governor

राज्यपाल सामन्य (कलम ,१५३ आणि १५४ ,नेमणूक ,पदावधी,पात्रता ,शपथ), घटनात्मक स्थिती,स्वेच्छाधिन अधिकार,राज्यपाल विशेष जबाबदाऱ्या इत्यादी माहिती

Contents  hide
1 राज्यपाल सामन्य
1.1 राज्यपालाचे अधिकार व कार्य
1.2 राज्यपालाची घटनात्मक स्थिती
1.3 राज्यपालाचे स्वेच्छाधिन अधिकार
1.4 राज्यपालाचे विशेष जबाबदाऱ्या
2 FAQ
राज्यपाल सामन्य
राज्यपाल घाक्राज्याचा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो .कार्यकारी अधिकार त्याच्या हाती असतो .पण संसदीय पद्धतीत नाममात्र असतो .

राज्यपाल हे पद कॅॅनडा देशाकून घेतले आहे

कलम १५३ 

प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल (परिणाम = ७ व्या  १९५६ ला या घटनादुरुष्टीने एकाच व्यक्तीची एक किव्हा दोन राज्यासाठी निवड करता येते ) 

कलम १५४

राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असेल त्याचा वापर घटनेच्या तरतुदीनुसार राज्य्पालाक्डून प्रत्यक्षपणे किवा त्याच्या हाताखालील अधिकार्यामार्फत केला जाईल

राज्यपालाची नेमणूक

कलम १५५ नेमणूक राष्ट्रपतीद्वारे

पदावधी

कलम १५६

i)राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ५ वर्षापर्यंत

ii) राष्ट्र्पातीस संबोधुन राजीना देतात

iii)पदावधीची सुरक्षा नसून ,निश्चित हि नाही राष्ट्रपती केव्हा हि काडू शकतात घटनेत पदावरून दूर करण्याचे कोणतेही आधार सांगितले नाही 

पात्रता

कलम १५७

i)तो भारताचा नागरिक असावा

ii)वय ३५ पूर्ण असावे

i)तो राज्याबाहेरील असावा

ii)नेमणूक करताना मुख्यमंत्रीचा सल्ला घ्यावा

कलम १५८ राज्यपाल पदाची शर्ती सांगितले आहे

शपथ

कलम १५९ नुसार राज्यपालला शपथ देतात उच्च न्यायालयेचे मुख्य न्यायधीस कडून

कलम  १६१ राज्यपाल क्षमादानाचा अधिकार

कलम २१३ राज्यापालाचा अध्यादेश काढण्याचा अधिकार

राज्यपालाचे अधिकार व कार्य
कायर्कारी अधिकार
कायदेविषक अधिकार
न्यायविषयक अधिकार
राज्यपालाची घटनात्मक स्थिती
तीन कलमाद्वारे स्पष्ट होते

१)कलम १५४ (वरील स्पष्टीकरण बघावे )

२)कलम १६३

राज्यपालाल आपली कार्य पार पडण्यासाठी घटनेने प्रधान केलेले स्वेच्छाधिन अधिकार वगळता

मुख्यमंत्रीच्या हाताखाली  एक मंत्रिमंडळ असेल साह्य व सल्ला देण्यासाठी(मंत्र्याने दिलेला सल्ला कोणत्याही न्यायालात चौकशी करता येत नाही )

३)कलम १६४ 

मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या विधानसभेला जबाबदार असते तर वैयक्ती मंत्री राज्यपालास जबाबदार असतो .

वरील तरतुदी वरून

राष्ट्रपतीपेक्षा वेगळ्या तरतुदी

i)गरज पडल्यास -स्वेच्छेनुसार किवा स्वविवेकारानुसार कृती करण्याची शक्यता .(पण राष्ट्रपतीला अशी तरतूद नाही )

ii)४२ वी घटनादुरुस्ती सल्ला बंधनकारक नाही .

राज्यपालाचे स्वेच्छाधिन अधिकार
१)घटनात्मक

एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचार्थ राखून ठेवणे
अतिरिक्त कार्यभार =शेजारच्या केंद्र्शाशित प्रदेशाचा कार्य
रकमेबाबत तंटा =आसाम ,मेघालय ,त्रिपुरा व मिझोरा या राज्याचा शासनांना खनिजांच्या शोधासाठी दिलेल्या पर्वाण्यातून दरवर्षी प्राप्त होणाऱ्या रॉयटीमधुन काही हिस्सा आदिवासी जिल्हा परिषदेला द्यावा लागतो .जर कोणताही तंटा उद्भवला तर त्याच्या निर्णय स्वेच्छेने करण्याचा हक्क आहे आणि तो निर्णय अंतिम असतो
प्रशासकीय व कायदेविषयक बाबीसंबंधी माहिती मुख्यमंत्र्याकडून मागणे
राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत शिफारस करणे
२)प्रासंगिक

प्रासंगिक म्हणजे आपत्कालीन प्रचलित राजकीय परिस्थिती निर्माण होणारे

विधानसभेच्या विश्वास गमावल्यास विसर्जित करणे
निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षास विधानसभेत बहुमत असल्यास मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात
मंत्रिमंडळ विधानसभेत विश्वास सिद्ध करू शकले नाही तर मंत्रिमंडळ पदच्युत करणे
राज्यपालाचे विशेष जबाबदाऱ्या
कलम, विशेष ,कोठे
घटनादुरुस्ती
कलम ३७१

विशेष =स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना 

कोणासाठी =महाराष्ट्र -विदर्भ ,गुजरात-सौराष्ट्र व कच्छासाठ७ वी  घटनादुरुस्ती १९५६
कलम ३६१ (A)

विशेष अशांतता व कायदा सुव्यवस्था .

कोठे नागालँड -नागहील्स व त्येएन्सांग येथे१३ वी घटनादुरुस्ति १९६२
कलम ३६१ (B)

विशेष आदिवासी क्षेत्राच्या प्रशानासंबंधी तरतुदी करणे

कोठे आसाम२२ वी घटनादुरुस्ती १९६९
कलम ३६१ (C)

विशेष डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासाबंधी

कोठे मणिपूर२७ वी घटनादुरुस्ती १९७१
कलम ३६१ (D व E )

विशेष आंद्राप्रदेश व तेलंगणा (स्वेच्छा अधिकार नाही )३२ वी घटनादुरुस्ती १९७३
कलम ३६१ (F)

विशेष शांतता व जनतेच्या विविध गटाचा सामाजिक -आर्थिक विकास

कोठे सिक्कीम३६ वी घटनादुरुस्ती १९७५
कलम ३६१ (H)

विशेष कायदा सुव्यवस्था

कोठे अरुणाचलप्रदेश५५ वी घटनादुरुस्ती १९८६
कलम ३६१ (I)

विशेष गोवा (स्वेच्छे अधिकार नाही )५६ वी घटनादुरुस्ती १९८७
कलम ३६१ (J)

विशेष स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना

कोठे कर्नाटक ,हैद्राबाद९८ वी घटनादुरुस्ती २०१२
FAQ
महाराष्ट्र राज्यपाल कोण ?

उत्तर =भागतशिंग कोश्यारी आहे

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण ?

उत्तर =श्री प्रकाश

राज्यपालचे कार्यकाल किती ?

उत्तर =५ वर्ष किवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत

राज्यपाल हे पद कोणत्या देशाकडून घेतले आहे

उत्तर =कॅॅनडा

मंत्रिमंडळ-मुख्यमंत्री,मंत्री रचना

मंत्रिमंडळ-मुख्यमंत्री,मंत्री रचना

राज्य मंत्रिमंडळ(मुख्यमंत्री -कार्य ,कलम १६३ ते १६४ ,उपमुख्यमंत्री,मंत्रिमंडळाची रचना इत्यादी माहिती यातून राज्य प्रशासन बद्दल माहिती मिळेल

Contents  hide
1 राज्य मंत्रिमंडळ
1.1 मुख्यमंत्री-कार्य
1.2 कलम १६३ ते १६४
1.3 उपमुख्यमंत्री नेमणूक
1.4 मंत्रिमंडळाची रचना
राज्य मंत्रिमंडळ
भारताच्या घटनेमध्ये केंद्राप्रमाणे राज्य स्तरावर राजकीय -प्रशासकीय व्यवस्थेमध्ये खरी वास्तविक सत्ता मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळच्या आहे (राज्यपाल राज्यप्रमुख आणि मुख्यंमंत्री शासन प्रमुख )

मुख्यमंत्री-कार्य
कलम १६४ राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्त करतील (अट :विधानसभेतील बहुमतातील पक्षाला नेत्यालाच मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करावे लागेल )
घटनात्मकदुरुस्त्या मुख्यमंत्री द्विगृही विधिमंडळपैकी कोणत्याही एका सभागृहाच्या सदस्य असू शकतात .

शपथ =राज्यपाल देतात


कार्य

राज्य नियोजन मंडळाचे पदशिध अध्यक्ष म्हणून करतील
राष्ट्रीय विकास परिषदचे सदस्य म्हणून
आंतर -राज्यीय परिषदेचे सदस्य म्हणून
विभागीय परिषदेचे (Zonal Council ) उपाध्यक्ष म्हणून एकावेळी एका वर्षासाठी (सर्व विभागीय परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृह मंत्री कार्य करतात )
राज्यशासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून
राज्य मंत्रिमंडळचे बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवितात
सेवांचे राजकीय प्रमुख म्हणून कार्य करतात .
कलम १६३ ते १६४
घटनेत फक्त १६३ व १६४ या दोन कलमाचे वर्णन केले आहे .

कलम १६३ राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यास मंत्रिमंडळ

कलम १६३ (१) : राज्यापालास आपली कार्य पार पाडतांना स्वेच्छाधीकार वगळता इतर सहाय व सल्ल्यासाठी मुख्यामंत्रांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल .
कलम :१६३(२): राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल. ( अशी तरतूद राष्ट्रपती बाबत नाही )राज्यपालाने केलेल्या कोणत्याही कृतीची विधीग्राह्याता , त्याने स्वच्येने कृती करायला हवी होती की , नाही या कारणास्तव प्रश्नास्पद करता येत नाही .
कलम १६३ (३):मंत्र्याने राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही .
कलम १६४ मंत्रासंबंधी अन्य तरतुदी

कलम १६४ (१) मुख्यमंत्री राज्यपालाक्डून नियुक्त आणि इतर मंत्र्याची नेमणूक राज्यपाल मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने करेल
विशेष छत्तीसगड ,झारखंड ,माध्येप्रदेश व ओडिशा या राज्यामध्ये १ अधिवासी कल्याण मंत्र्याची नेमणूक राज्यपाल करेल
कलम १६४ (1A):राज्य मंत्रिमंडळ एकूण मंत्र्याची संख्या मुख्यमंत्र्यांसहित विधानसभेच्या एकूण सदस्याच्या १५% पेक्षा अधिक असू नये व कमीतकमी १२ असावेत (९१ वी घटनादुरुस्ती २००३ )
कलम १६४ (1B): राज्य विधिमंडळ सदस्य पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत सदस्य म्हणून अपात्र ठरला असेल तर मंत्री म्हणून हि अपात्र ठरतो (९१ वी घटनादुरुस्ती २००३ )
कलम १६४(१) वैयक्तिक मंत्री राज्यपालास जबाबदार असेल
कलम १६४(२) मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या विधानसभेला जबाबदार असतो.
कलम १६४ (३)मंत्र्याची शपथ ३ र्या अनुसूचित दिल्या प्रमाणे
कलम १६४(४)एखादा मंत्री सलग ६ महिने विधिमंडळ सदस्य नसेल तर अपात्र .
कलम १६४ (५)मंत्र्याचे वेतन व भत्ते विधिमंडळ कायद्याप्रमाणे
उपमुख्यमंत्री नेमणूक
घटनेत तरतुदी नाही कधीकधी गरजेनुसार मंत्रिमंडळात एखाद्या व्यक्तीचे नेमणूक करतात फक्त राजकीय कारणामुळे


मंत्रिमंडळाची रचना
घटनेमध्ये राज्यच्या मंत्रिमंडळाचा आकार तसेच प्रकार यांचाबाद्द्ल तरतुदी नाही

तीन प्रकारचे मंत्री असतात

कॅबीनेत =राज्य मंत्रिमंडळ कॅबीनेत मंत्र्याच्या गटाला कॅबीनेत म्हणतात हे पक्षाचे प्रमुख /जेष्ठ असतात यांना महत्वाचे खाते देतात मुख्य मंत्र्याकडून कॅबीनेत समित्या स्थापन करतात कारण कॅबीनेत मंत्र्याचे कामाचे तान कमी करण्यासाठी
राज्यमंत्री =यांना विभागाचे स्वतंत्र कार्यभार दिला जाऊ शकतो /कॅबीनेत मंत्र्यांना सहाय्य म्हणून
उपमंत्री = यांना विभागाचे स्वतंत्र कार्यभार दिला जात नाही हे प्रशासकीय ,राजकीय तसेच विधानमंडळातील कामकाजात मदत करतात
महारष्ट्र शासन सविस्तर माहिती

संविधान-महत्वाचे कलम,भाग/kalmachi yadi
भाग २२ ,कलमे ३९५ (संसद आणि विधिमंड,राज्यपालाल विशेष,इतरही महत्वपूर्ण कलमे),इत्यादी महत्वाचे कलम या बद्दल माहिती भाग सामन्य मुलघटनेत २२ भाग सध्या २५ आहे भारतीय राज्यघटनेतील भाग भाग तरतुदी कलम I केंद्र आणि त्याचे प्रदेश कलम १ ते ४ II नागरीत्वकलम ५ ते ११ III मुलभूत हक्ककलम १२ ते ३५ IV…

In "संविधान"

महाराष्ट्र राज्य वित्त आयोग स्थापना
राज्य वित्त आयोग घटनेचा कलम ,स्थापना ,सदस्य ,रचना,कार्य ,जबाबदारी ,राज्यात पहिला वित्त आयोग स्थापन केव्हा, GST मुले राज्यातील कर विलन इत्यादी महराष्ट्र वित्त आयोग आपणास या बद्दल सामन्य माहिती हवी जसेकी महाराष्ट्र राज्यात पहिला वित्त आयोग स्थापन केव्हा ,५ वा वित्त आयोगचे अध्यक्ष कोण ,GST मुले राज्यातील कर विलन विलीन…

राज्यपाल विशेष अधिकार/Governor
राज्यपाल सामन्य (कलम ,१५३ आणि १५४ ,नेमणूक ,पदावधी,पात्रता ,शपथ), घटनात्मक स्थिती,स्वेच्छाधिन अधिकार,राज्यपाल विशेष जबाबदाऱ्या इत्यादी माहिती राज्यपाल सामन्य राज्यपाल घाक्राज्याचा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो .कार्यकारी अधिकार त्याच्या हाती असतो .पण संसदीय पद्धतीत नाममात्र असतो . राज्यपाल हे पद कॅॅनडा देशाकून घेतले आहे कलम १५३   प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल…

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...