२० एप्रिल २०२२

प्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती आणि संख्या व वर्ग

📖 MPSC Maths Marathi🌷:
📚 प्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती 📚

नमूना पहिला –

उदा. 21 × 19 + 21 = ?

22×20

22×19

21×20

21×18

उत्तर : 21×20

क्लृप्ती :-बेरीज असेल तर असामाईक संख्या 1 ने वाढवून, व वजाबाकी असेल तर असामाईक संख्या 1 ने कमी करून गुणाकार करावा.

 नमूना दूसरा –

उदा. 12×18+12×12 =?

72

384

360

480

उत्तर : 360 

स्पष्टीकरण :-12(18+12) = 12×30 = 360
7×5+7×3 =?    7×(5+(3) = 7×8 = 56
7×5+7×3 =?    7×(5-(3) = 7×2 = 14

उदा. 28×25 =?

675

700

527

650

उत्तर : 700

स्पष्टीकरण :-12×25
= 1200÷4
= 300; 16×125
= 16000÷8
= 2000

क्लृप्ती :- दिलेल्या संख्येला 25 ने गुणायचे असेल ; तर त्या संख्येवर दोन शून्य देऊन 4 ने भागणे व संख्येला 125 ने गुणणे म्हणजे, त्या संख्येवर तीन शून्य देऊन 8 ने भागणे.
:: 28×25
= 2800/4
= 700

__________________________

🔲  संख्या व वर्ग 🔲

1 -1
2-4
3-9
4-16
5-25
6-36
7-49
8-64
9-81
10-100
11-121
12-144
13-169
14-196
15-225
16- 256
17-289
18-324
19-361
20-400
21-441
22-484
23-529
24-576
25-625
26-676
27-729
28-784
29-841
30-900

गणितातील महत्वाची सूत्रे

📖 MPSC Maths Marathi🌷:
🔲 ➕➖ अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे अभ्यासाने अगत्याचे ठरते. ✖️➗

1) अंतरासाठीची परिमाणे :

▪ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर
▪ 100 सेंटीमीटर = 1 मीटर
▪ 1000 मीटर = 1 किलोमीटर

2) वस्तुमानासाठीची परिमाणे :

▪ 1000 मिलिलिटर = 1 लिटर
▪ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
▪ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
▪ 10 क्विंटल = 1 टन

3) कालमापनासाठीची परिमाणे :

▪ 60 सेकंद = 1 मिनिट
▪ 60 मिनिट = 1 तास
▪ 24 तास = 1 दिवस

4) इतर परिमाणे :

▪ 24 कागद = 1 दस्ता
▪ 20 दस्ते = 1 रिम
▪ 12 नग = 1 डझन
▪ 12 डझन = 1 ग्रॉस
▪ 100 नग = 1 शेकडा
▪ 100 पैसे = 1 रुपया

📚 गणितातील महत्वाची सूत्रे 📚

सरासरी :-

1) N संख्यांची सरासरी = दिलेल्या संख्यांची बेरीज / n, n = एकूण संख्या

 

2) क्रमश: संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते.

उदाहरणार्थ – 12, 13, [14], 15, 16  या संख्या मालेतील संख्यांची सरासरी = 14

 

संख्यामाला दिल्यावर ठरावीक संख्यांची (n) सरासरी काढण्यासाठी

 

n या क्रांश: संख्यांची सरासरी = (पहिली संख्या + शेवटची संख्या) / 2

 

उदा. 1) क्रमश: 1 ते 25 अंकांची सरासरी = 1+25/2 = 26/2 = 13

 

2) 1 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी =1+19/2 =20/2 =10

 

3) N या क्रमश:  संख्यांची बेरीज = (पहिली संख्या + शेवटची संख्या) x n/ 2

 

उदा. 1) 1 ते 100 अंकांची बेरीज = (1+100)x20/2 = 81x20/2 = 810

 

(31 ते 50 संख्यांमध्ये एकूण 20 संख्या येतात. यानुसार n = 20) 

 

 सरळव्याज :-

·         सरळव्याज (I) = P×R×N/100

·         मुद्दल (P) = I×100/R×N

·         व्याजदर (R) = I×100/P×N

·         मुदत वर्षे (N) = I×100/P×R

·         चक्रवाढव्याज  रास (A)= P×(1+R/100)n, n= मुदत वर्षे  

 नफा तोटा :-

·         नफा = विक्री – खरेदी    
 

·         विक्री = खरेदी + नफा     

·         खरेदी = विक्री + तोटा 

·         तोटा = खरेदी – विक्री    
 

·         विक्री = खरेदी – तोटा   
 

·         खरेदी = विक्री – नफा 

·         शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100 

·         विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100 – शेकडा तोटा) / 100 

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 + शेकडा नफा)

·         खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)  

 आयात, चौरस, त्रिकोण, कोन :-

·         आयत -
आयताची परिमिती = 2×(लांबी+रुंदी)   
    

·         आयताचे क्षेत्रफळ = लांबी×रुंदी 

·         आयताची लांबी = (परिमिती ÷ 2) – रुंदी    
 

·         आयताची रुंदी =(परिमिती÷2) – लांबी 

·         आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.

·         आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         चौरस -

·         चौरसाची परिमिती= 4×बाजूची लांबी     

·         चौरसाचे क्षेत्रफळ=(बाजू)2 किंवा (कर्ण)2/2 

·         चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. 

·         दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.

   समभुज चौकोण -

·         समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ     

·         = कर्णाच्या लांबीचा गुणाकार/2 

·         समलंब चौकोण -

·         समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीचा बेरीज×लंबांतर/2 

·         समलंब चौकोनाचे लंबांतर = क्षेत्रफळ×2/समांतर बाजूंची बेरीज 

·         समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची बेरीज = क्षेत्रफळ×2/लबांतर 

·         त्रिकोण -

·         त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया×उंची/2

·         काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ    
 

·          

·         = काटकोन करणार्‍या बाजूंचा गुणाकार/2

·          

·         पायथागोरस सिद्धांत -

·         काटकोन त्रिकोणात (कर्ण)2 = (पाया)2+(उंची)2 

 प्रमाण भागिदारी :-

·         नफयांचे गुणोत्तर = भंडावलांचे गुणोत्तर × मुदतीचे गुणोत्तर 

·         भंडावलांचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ मुदतीचे गुणोत्तर 

·         मुदतीचे गुणोत्तर = नफयांचे गुणोत्तर ÷ भंडावलांचे गुणोत्तर 

 गाडीचा वेग – वेळ – अंतर :-

A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 

B) पूल ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी / ताशी वेग × 18/5 

C) गाडीचा ताशी वेग  = कापवयाचे एकूण एकूण अंतर / लागणारा वेळ  × 18/5

 

D) गाडीची लांबी  = ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

E) गाडीची लांबी + पूलाची लांबी = ताशी वेग × पूल ओलांडताना लागणारा वेळ × 5/18

 

F) गाडीची ताशी वेग व लागणारा वेळ काढताना 18/5 ने गुण व अंतर काढताना 5/18 ने गुणा.

1 तास = 3600 सेकंद / 1 कि.मी. = 1000 मीटर  = 3600/1000 = 18/5

 

G) पाण्याचा प्रवाहाचा ताशी वेग = (नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग – प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग) ÷ 2

 

H) गाडीने कापावायचे एकूण अंतर – गाडीची लांबी = बोगध्याची लांबी

 

I) भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ

 

= वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा वेग / वेगातील फरक

 

लागणारा वेळ = एकूण अंतर / दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे आणि नफा-तोटा व त्याची सूत्र


🔶अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे

1) अंतरासाठीची परिमाणे

▪ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर
▪ 100 सेंटीमीटर = 1 मीटर
▪ 1000 मीटर = 1 किलोमीटर

2) वस्तुमानासाठीची परिमाणे

▪ 1000 मिलिलिटर = 1 लिटर
▪ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
▪ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
▪ 10 क्विंटल = 1 टन

3) कालमापनासाठीची परिमाणे

▪ 60 सेकंद = 1 मिनिट
▪ 60 मिनिट = 1 तास
▪ 24 तास = 1 दिवस

4) इतर परिमाणे

▪ 24 कागद = 1 दस्ता
▪ 20 दस्ते = 1 रिम
▪ 12 नग = 1 डझन
▪ 12 डझन = 1 ग्रॉस
▪ 100 नग = 1 शेकडा
▪ 100 पैसे = 1 रुपया

_________________________________________

'नफा-तोटा व त्याची सूत्रं' या घटकांविषयी याविषयी जाणून घेऊयात.

▪ नफा = विक्री – खरेदी  
▪ तोटा = खरेदी – विक्री  
▪ विक्री = खरेदी + नफा    
▪ खरेदी = विक्री + तोटा
▪ विक्री = खरेदी – तोटा  
▪ खरेदी = विक्री – नफा
▪ शेकडा तोटा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
▪ शेकडा नफा = प्रत्यक्ष नफा × 100/ खरेदी
▪ विक्रीची किंमत = खरेदीची किंमत × (100+ शेकडा नफा)/100
▪ खरेदीची किंमत = (विक्रीची किंमत × 100) / (100 – शेकडा नफा)

राज्यपालांची संपूर्ण माहिती

राज्यपालांची संपूर्ण माहिती
:
• राज्यपालांची संपूर्ण माहिती : राज्यपाल हा जनतेचे प्रतिनिधित्त्व करत नाही, तर तो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो.

• कलम १५३ नुसार प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असेल,अशी तरतूद आहे.


• कलम १५५ नुसार राज्यपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे.

• राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात.त्यामुळे राज्यपाल हे केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून कामी करत असतात.

• एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाईल. (७ वी घटना दुरूस्ती, १९५६)

राज्यपालांची संपूर्ण माहिती :
कार्यकाल
राज्यपालांचा कार्यकाल ५ वर्षे असतो. ज्या दिवसापासून राज्यपालांनी पदग्रहण केले, त्या दिवशीपासून त्यांचा कार्यकाल सुरु होतो.


राजीनामा :त्या आधी राज्यपालांना आपला राजीनामा द्यायचा असल्यास ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात.

पदावधी : कलम १५६ (१) नुसार राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंतच राज्यपाल अधिकारपदावर राहू शकतो.

पदच्यूती : राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात.

पात्रता
(कलम १५७) नुसार राज्यपालाच्या पदासाठी खालील दोन पात्रता असतात:

तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
त्याचे वय ३५ वर्ष पूर्ण असावे.
राज्यपाल पदाच्या शर्ती
(कलम १५८) :नुसार राज्यपाल संसद अथवा राज्यविधीमंडळाचा सदस्य असणार नाही.असल्यास राज्यपाल म्हणून निवडून येताच त्याचे सदस्यत्त्व संपुष्टात येईल.

शासनामधील इतर कोणतेही फायद्याचे पद त्याला स्वीकारता येणार नाही.


दोनहून अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल असल्यास, राष्ट्रपतींच्या आदेशाने त्यांचे वेतन ज्या-त्या राज्यातून विभागून देण्यात येईल.

राज्यपालांचे वेतन
राज्यपालांचे वेतन व भत्ते : रु. ३,५०,००० /- दरमहा अधिक भत्ते. (१ फेब्रुवारी २०१८ रोजी घोषणा)

राज्यपालांचे अधिकार
१) कार्यकारी अधिकार : राज्य शासनाचा सपूर्ण शासकीय कारभार राज्यपालाच्या नावे चालविला जातो.

२) कायदेविषयक अधिकार : राज्य शासनाचे काम सोईस्कररित्या पार पडावे यासाठी त्या कामाची मंत्र्यांमध्ये विभागणी करण्यासाठी राज्यपाल नियम तयार करतात.

३) अर्थविषयक अधिकार : राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेत सादर करताना राज्यपालाची परवानगी आवश्यक असते.

४) न्यायिक अधिकार : उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती राज्यपालांचा सल्ला घेतात.उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात.

मुख्यमंत्री बदल थोडी माहिती

मुख्यमंत्री

भारतीय प्रजासत्ताकमध्ये, 28 राज्यांपैकी प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री निवडून आलेला सरकार प्रमुख असतो आणि काहीवेळा केंद्रशासित प्रदेश (सध्या, फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री सेवा देत आहेत). भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो.

राज्यातील विधानसभेच्या (विधानसभा).... निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युती) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात. राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि शपथ घेतात, ज्यांची मंत्री परिषद एकत्रितपणे विधानसभेला जबाबदार असते. वेस्टमिन्स्टर प्रणालीवर आधारित, त्यांनी विधानसभेचा विश्वास टिकवून ठेवल्यामुळे, मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ विधानसभेच्या आयुष्यभर, कमाल पाच वर्षांपर्यंत टिकू शकतो. मुख्यमंत्री किती पदांवर काम करू शकतात याला मर्यादा नाहीत. मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि उपमुख्यमंत्र्यांकडून त्या भूमिकेत प्रतिनियुक्ती केली जाऊ शकते. मुख्यमंत्री सामान्यतः मुख्य सचिवांची निवड करतात आणि त्यांच्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार विभागांचे वाटप देखील करू शकतात. ते मुख्य सचिवांना त्यांच्या राज्यातील अधिकाऱ्यांची बदली, निलंबन किंवा पदोन्नती करण्याचे निर्देश देतात.

निवड प्रक्रिया ....
पात्रता संपादन करा
भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्रिपदासाठी पात्र होण्यासाठी कोणती पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे हे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री असा असावा:

भारताचा नागरिक.....
राज्य विधिमंडळाचा सदस्य असावा
25 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे[3]
विधानमंडळाचा सदस्य नसलेली व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून गणली जाऊ शकते जर ते त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत राज्य विधानसभेवर निवडून आले. तसे न झाल्यास त्यांचे मुख्यमंत्रीपद संपुष्टात येईल.

निवडणूक ....
राज्याच्या विधानसभेत बहुमताने मुख्यमंत्री निवडला जातो. नियुक्ती प्राधिकारी असलेल्या राज्याच्या राज्यपालाने सुचविल्याप्रमाणे विधानसभेतील विश्वासाच्या मताने हे प्रक्रियात्मकरित्या स्थापित केले जाते. ते पाच वर्षांसाठी निवडले जातात. [४] राज्यपालाच्या मर्जीनुसार मुख्यमंत्री पद धारण करतील.

शपथ ....
राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असल्याने राज्यपालांसमोर शपथविधी होतो.

पदाची शपथ....

मी, देवाच्या नावाने शपथ घेतो/गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी कायद्याने स्थापित केल्याप्रमाणे भारताच्या संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवीन, मी भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता टिकवून ठेवीन, की मी माझी कर्तव्ये निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडीन. राज्याचा मंत्री या नात्याने आणि मी राज्यघटना आणि कायद्यानुसार सर्व प्रकारच्या लोकांशी न घाबरता किंवा पक्षपात, आपुलकीने किंवा दुर्भावनाशिवाय योग्य वागेन.

— भारतीय राज्यघटना, अनुसूची ३, परिच्छेद ५

गोपनीयतेची शपथ

मी, <मंत्र्याचे नाव>, देवाच्या नावाने शपथ घेतो/गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संवाद साधणार नाही किंवा माझ्या विचारात आणली जाणारी किंवा मला एक म्हणून ओळखली जाईल अशी कोणतीही बाब उघड करणार नाही. अशा मंत्री म्हणून माझ्या कर्तव्याच्या योग्य पूर्ततेसाठी आवश्यक असेल त्याशिवाय <राज्याचे नाव> राज्याचा मंत्री.

— भारतीय राज्यघटना, अनुसूची ३, परिच्छेद ६

राजीनामा ....
पारंपारिकपणे सार्वत्रिक निवडणुकीनंतर किंवा विधानसभेतील बहुमताच्या संक्रमणाच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा दिल्यास, राज्यपाल एकतर नवीन मुख्यमंत्री नियुक्त करेपर्यंत किंवा विसर्जित करेपर्यंत बाहेर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे "काळजीवाहू" मुख्यमंत्र्याची अनौपचारिक पदवी असते. विधानसभा या पदाची संवैधानिक व्याख्या नसल्यामुळे, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना नियमित मुख्यमंत्री म्हणून सर्व अधिकार मिळतात, परंतु काळजीवाहू म्हणून त्याच्या/तिच्या अल्प कार्यकाळात कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय किंवा मंत्रिमंडळात बदल करता येत नाहीत.


मानधन ...
अधिक माहिती: भारतातील सरकारी अधिकाऱ्यांचे वेतन भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 नुसार, मुख्यमंत्र्यांचे तसेच इतर मंत्र्यांचे मानधन संबंधित राज्यांच्या विधानसभांनी ठरवायचे आहे. जोपर्यंत राज्याची विधिमंडळ पगाराचा निर्णय घेत नाही तोपर्यंत तो दुसऱ्या शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल. अशा प्रकारे पगार राज्यानुसार बदलतात. 2019 पर्यंत, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक पगार काढला आहे, जो ₹410,000 (US$5,400) आहे आणि त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा सर्वात कमी आहे जो कायदेशीररित्या ₹105,500 (US$1,400) आहे.

उपमुख्यमंत्री ....
इतिहासात विविध राज्यांनी उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. घटनेत किंवा कायद्यात याचा उल्लेख नसतानाही, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा वापर अनेकदा पक्ष किंवा युतीमधील गटबाजी शांत करण्यासाठी केला जातो. हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये क्वचितच वापरल्या जाणाऱ्या उप-पंतप्रधान पदासारखे आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करू शकतात आणि विधानसभेतील बहुमताचे नेतृत्व करू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या अनुषंगाने विविध उपमुख्यमंत्र्यांनीही गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या शपथेमुळे वादही निर्माण झाले आहेत.

वराहगिरी वेंकट गिरी व शंकर दयाळ शर्मा आणि के.आर. नारायणन भारतीय राजकारणी

वराहगिरी वेंकट गिरी

वराहगिरी वेंकट गिरी किंवा व्ही.व्ही. गिरी (१० ऑगस्ट १८९४ - २३ जून १९८०) हे चौथे राष्ट्रपती होते पतीपदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपतीपदावर होते.

वराहगिरी वेंकट गिरी

भारताचे चौथे राष्ट्रपती
कार्यकाळ
ऑगस्ट २४, १९६९ – ऑगस्ट २४, १९७४
पंतप्रधान
इंदिरा गांधी
उपराष्ट्रपती
गोपाल स्वरूप पाठक
मागील
मोहम्मद हिदायत उल्लाह
पुढील
फक्रुद्दीन अली अहमद
भारताचे कार्यवाहू राष्ट्रपती
कार्यकाळ
मे ३, १९६९ – जुलै २०, १९६९
मागील
झाकीर हुसेन
पुढील
मोहम्मद हिदायत उल्लाह
भारताचे उपराष्ट्रपती
कार्यकाळ
१३ मे १९६७ – ३ मे १९६९
राष्ट्रपती
झाकिर हुसेन
मागील
झाकिर हुसेन
पुढील
गोपाल स्वरूप पाठक
जन्म
ऑगस्ट १०, १८९४
ब्रह्मपूर, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
(आजचा ओडिशा)
मृत्यू
जून २३, १९८०
मद्रास, तामिळ नाडू
केंद्रीय राजकारणात शिरण्याआधी गिरी ते (१९५६-६०), केरळ (१९६०-६५) व म्हैसूर (१९६५-६७) राज्यांचे राज्यपाल होते. १९७५ साली त्यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.

____________________________

शंकर दयाळ शर्मा


भारतीय राजकारणी


शंकर दयाळ शर्मा हे भारताचे राष्ट्रपती होते.

शंकर दयाळ शर्मा

९वे भारतीय राष्ट्रपती

कार्यकाळ
२५ जुलै इ.स. १९९२ – २५ जुलै इ.स. १९९७[१]पंतप्रधानपी.व्ही. नरसिंहराव
अटलबिहारी वाजपेयी
एच.डी. देवेगौडा
इंद्रकुमार गुजरालउपराष्ट्रपतीके.आर. नारायणनमागीलरामस्वामी वेंकटरमणपुढीलके.आर. नारायणनजन्म१९ ऑगस्ट इ.स. १९१८
भोपाळभारतमृत्यू२६ डिसेंबर १९९९ (वय ८१)
नवी दिल्लीभारतराजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसपत्नीविमला शर्मासही

हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत.

---------------------------------------------------------


के.आर. नारायणन

भारतीय राजकारणी

कोचेरिल रामन नारायणन (फेब्रुवारी ४इ.स. १९२१ - नोव्हेंबर ९इ.स. २००५) हे जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते.

 



Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...