१७ एप्रिल २०२२

भारतीय राज्यघटना कलम ३६-५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे

भारतीय राज्यघटना:  (कलम ३६-५१): राज्याचे मार्गदर्शक तत्वे

राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )
– राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )
राज्याचे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतले. राज्याने कसे वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. आयर्लंडने हे स्पेन कडून घेतले आहे.

मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येत नाही.
मार्गदर्शक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेले आहे व हे भारतीय संविधानाच्या भाग ४ मध्ये कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आलेले आहे.
हे तत्व सामाजिक न्याय घटनेशी निगडित आहे व कार्यपालिकेत कार्य करण्यासाठी हे तत्व मार्गदर्शन देतात.
कलम 36 :-

यात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे व ही तीच व्याख्या आहे जी कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे.
यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती चा उल्लेख केला आहे. आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे, प्रास्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचे आदर्श साध्य करणे.

कलम 37:- मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. जर मार्गदर्शक तत्व मिळाले नाही तर तुम्ही कोर्टमधे जाऊ शकत नाही.

कलम 38: – कल्याणकारी राज्याची व्याख्या

ज्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिला जाईल व यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील.

कलम 39 -1 :- राज्य (सरकार) सर्व व्यक्तींना जीवनउपयोगी किंवा जीवनाकरिता सर्व साधन उपलब्ध करून देईल.

कलम 39 -2: – राज्य समान कार्यासाठी समान वेतन देईल.

कलम 39 -3:- राज्य आर्थिक शोषणाच्या विरुद्ध अधिकार करून देईल.

कलम 39 -4:- यानुसार पालक अल्पवयीन व्यक्ती यांचे शोषणाचे संरक्षण करेल. व त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्याचे संधी उपलब्ध करून देईल. तसेच आरोग्य सुविधाकरिता कार्य योजना लागू करेल. (पोलिओ, अंगणवाडी)

कलम 39 -5:- समान न्याय व निःशुल्क न्यायव्यवस्था

कलम 39 -6:- यानुसार आर्थिक व्यवस्था राज्य निर्माण करेल म्हणजे खूप गरीब आणि खूप श्रीमंत होणार नाही म्हणजे समाजवादी न्यायव्यवस्था निर्माण करायची आहे.

कलम 40:- गांधीवादी तत्व (73वी घ. दु. 1992)

राज्य पंचायत राज निर्माण करण्याचे प्रयन्त करेल. पहिली ग्रामपंचायत 2 Oct 1959 रोजी नागौर जिल्हा राजस्थान मध्ये स्थापन करण्यात आली.

कलम 41:- शिक्षण रोजगार (कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ठ बाबींचा सार्वजनिक सहाय्याचा अधिकार )

राज्य हे आपले आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक साहाय्य हक्क उपलब्ध करून देणार.

बरेचश्या राज्यात या अंतर्गतच बेरोजगारी भत्ता, निराधार योजना, जीवनदायी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादी लागू केले आहे.

कलम 42:- Maternity Leave

कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय्य आणि सहृदयी व्यवस्था.
राज्य महिलांच्या प्रसूतीच्या वेळी विविध आरोग्य सुविधा निर्माण करून देईल.

उदा:- जसे की आर्थिक साहाय्य्य, वैद्यकीय साहाय्य्य

कलम 43:- कामगारांना निर्वाह वेतन

राज्य सर्व कामगारांना योग्य रीतीने निर्वाह वेतन देण्याची परिस्थिती निर्माण करेल.

कलम 43A:- 42 वी घ. दु. 1976 अनुसार संविधानात टाकण्यात आली. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम 43B:- राज्य सहकारी सोसायटींकरिता प्रोत्साहन देण्यास प्रयन्तशील असेल. 97 वी घ. दु. 2011 अनुसार यांचा समावेश करण्यात आला.

कलम 44:- आचारसंहिता (Uniform Civil Code) लागू करण्याचा प्रयत्न राज्यांनी नेहमी करावा. नागरिकांना एकरूप नागरी संहिता. वैयक्तिक कायदे एकत्र करून सर्व नागरिकांना समान वागणूक प्रस्थापित करणे. संपूर्ण भारतीय राज्यक्षेत्रात सर्व नागरिकांना एकरूप नागरी संहिता प्राप्त करून देण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

कलम 45:- 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद.
राज्य ६ वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद करेल.

पूर्वीच्या कलम ४५ ची तरतूद खालीलप्रमाणे होती.
राज्यसंस्था घटनेचा अंमल सुरु झाल्यापासून १० वर्षाच्या आत १४ वर्षाखालील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयन्तशील राहील. हे एकच असे कलम आहे ज्याला कालमर्यादा दिली होती.

कलम 46:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन सरकार करेल.
राज्यसंस्था दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे विशेष काळजीपूर्वक हितसंवर्धन करेल.
राज्यसंस्था त्यांचे सामाजिक अन्याय व इतर सर्व प्रकारच्या शोषणापासून संरंक्षण करेल.

कलम 47:- पोषणमान व राहणीमान उंचावणे, दारूबंदी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्त्यव्य असेल.
नागरिकांचे पोषणमान, राहणीमान तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ह्या गोष्टी राज्यसंस्थेच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक असल्याचे मानले जाईल.
विशेषतः मादक पेय तसेच आरोग्यास घातक असलेले अंमली पेये यांच्यावर बंदी आणण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

अपवाद : औषधी तयार करण्यास वापरली जाणारी पेये.

कलम 48:- कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन (गौहत्या)

याअंतर्गतच गाई व वासरे व इतर जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करने व त्यांच्या कत्तलला मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल.

कलम 48 (A) :- राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यांचा विकास त्याचबरोबर वने, नैसर्गिक संसाधने जशे नद्या, तलाव, समुद्र व त्यामधील असणारे जीव यांचे संरक्षण करेल व त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रणाल्या विकसित करेल.

टीप :- ही कलम 42 वी घ. दु. 1976 मध्ये संविधानात टाकण्यात आली.

कलम 49:- राष्ट्रीय महत्वाचे संस्थाने, वास्तू, स्मारक यांचे संरंक्षण राज्य करेल. संसदीय कायद्याअंतर्गत राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे म्हणून घोषित केले कलात्मक व ऐतिहासिक महत्वाची असणारे स्मारके, ठिकाणे व वस्तूंची लूट, विद्रुपीकरण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट आणि निर्यातीपासून संरक्षण करण्याची राज्यसंस्थेची जबाबदारी असेल .

कलम 50:- राज्य न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे पृथ्थकरण करेल.
लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्याकरिता राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.
मात्र सध्या राज्यसंस्थेअंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी, कलेक्टर, प्रांत तहसीलदार, यांचा समावेश होतो.

कलम 51:- राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयन्त करेल.

राज्यसंस्था खालील बाबींसाठी प्रोत्साहन देईल.
अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
ब. राष्ट्रराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे
क. एकमेकांमध्ये व्यवहार करतांना आंतरराष्ट्रीय कायदा व तहांचा आदर करणे. (आंतर राष्ट्रीय दायित्व ) (Trade Related Intellectual Proper Rights)
ड. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाच्या माध्यमातून सोडवणे. (आंतरराष्ट्रीय स्तरावर)

विद्यापीठ शहर आणि स्थापना

❇️ विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ ❇️

◆  शहर   -  मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना  - 1916

❇️ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर  - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆  स्थापना - 1 ऑगस्ट 2004

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

स्वतंत्रता आंदोलन से संबंधित आंदोलन एवं वर्ष

🌼स्वतंत्रता आंदोलन से संबंधित आंदोलन एवं वर्ष 🌼

♜ बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
➜ 1905 ई.

♜ मुस्लिम लीग की स्थापना
➜ 1906 ई.

♜ कांग्रेस का बंटवारा
➜ 1907 ई.

♜ होमरूल आंदोलन
➜ 1916 ई.

♜ लखनऊ पैक्ट
➜ दिसंबर 1916 ई.

♜ मांटेग्यू घोषणा
➜ 20 अगस्त 1917 ई.

♜ रौलेट एक्ट
➜ 19 मार्च 1919 ई.

♜ जालियांवाला बाग हत्याकांड
➜ 13 अप्रैल 1919 ई.

♜ खिलाफत आंदोलन
➜ 1919 ई.

♜ हंटर कमिटी की रिपोर्ट प्रकाशित
➜ 18 मई 1920 ई.

♜ कांग्रेस का नागपुर अधिवेशन
➜ दिसंबर 1920 ई.

♜ असहयोग आंदोलन की शुरुआत
➜ 1 अगस्त 1920 ई.

♜ चौरी-चौरा कांड
➜ 5 फरवरी 1922 ई.

♜ स्वराज्य पार्टी की स्थापना
➜ 1 जनवरी 1923 ई.

♜ हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
➜ अक्टूबर 1924 ई.

♜ साइमन कमीशन की नियुक्ति
➜ 8 नवंबर 1927 ई.

♜ साइमन कमीशन का भारत आगमन
➜ 3 फरवरी 1928 ई.

♜ नेहरू रिपोर्ट
➜ अगस्त 1928 ई.

♜ बारदौली सत्याग्रह
➜ अक्टूबर 1928 ई.

♜ लाहौर पड्यंत्र केस
➜ 8 अप्रैल 1929 ई.

♜ कांग्रेस का लाहौर अधिवेशन
➜ दिसंबर 1929 ई.

♜ स्वाधीनता दिवस की घोषणा
➜ 2 जनवरी 1930 ई.

♜ नमक सत्याग्रह
➜ 12 मार्च 1930 ई. से 5 अप्रैल 1930 ई. तक

♜ सविनय अवज्ञा आंदोलन
➜ 6 अप्रैल 1930 ई.

♜ प्रथम गोलमेज आंदोलन
➜ 12 नवंबर 1930 ई.

♜ गांधी-इरविन समझौता
➜ 8 मार्च 1931 ई.

♜ द्वितीय गोलमेज सम्मेलन
➜ 7 सितंबर 1931 ई.

♜ कम्युनल अवार्ड (साम्प्रदायिक पंचाट)
➜ 16 अगस्त 1932 ई.

♜ पूना पैक्ट
➜ सितंबर 1932 ई.

♜ तृतीय गोलमेज सम्मेलन
➜ 17 नवंबर 1932 ई.

♜ कांग्रेस सोशलिस्ट पार्टी का गठन
➜ मई 1934 ई.

♜ फॉरवर्ड ब्लाक का गठन
➜ 1 मई 1939 ई.

♜ मुक्ति दिवस
➜ 22 दिसंबर 1939 ई.

♜ पाकिस्तान की मांग
➜ 24 मार्च 1940 ई.

♜ अगस्त प्रस्ताव
➜ 8 अगस्त 1940 ई.

♜ क्रिप्स मिशन का प्रस्ताव
➜ मार्च 1942 ई.

♜ भारत छोड़ो प्रस्ताव
➜ 8 अगस्त 1942 ई.

♜ शिमला सम्मेलन
➜ 25 जून 1945 ई.

♜ नौसेना का विद्रोह
➜ 19 फरवरी 1946 ई.

♜ प्रधानमंत्री एटली की घोषणा
➜ 15 मार्च 1946 ई.

♜ कैबिनेट मिशन का आगमन
➜ 24 मार्च 1946 ई.

♜ प्रत्यक्ष कार्यवाही दिवस
➜ 16 अगस्त 1946 ई.

♜ अंतरिम सरकार की स्थापना
➜ 2 सितंबर 1946 ई.

♜ माउंटबेटन योजना
➜ 3 जून 1947 ई.

♜ स्वतंत्रता मिली
➜ 15 अगस्त 1947 ई.

Important Questions

Important Questions

1. शेरशाह सूरी का मकबरा कहा स्थित है ?
उत्तर - सासाराम

2. संगीत सम्राट तानसेन का जन्म कहा हुआ था ?
उत्तर - ग्वालियर ( मप्र )

3. महात्मा गांधी कांग्रेस के किस अधिवेशन में अध्यक्ष चुने गए थे ?
उत्तर - बेलगाँव ( 1924 )

4. स्वामी विवेकानन्द ने शिकागो में विश्व धर्मसम्मेलन को कब सम्बोधित किया था ?
उत्तर - 1893 ई.

5. सत्यशोधक समाज के संस्थापक कौन थे ?
उत्तर ज्योतिबा फुले

6. यूरोप का मरीज किसे कहा जाता है ?
उत्तर - तुर्की

7. प्रसिद्ध चित्र ' मोनालिया ' किसने बनाया था ?
उत्तर - लियोनार्डो द विंचि

8. सहारा मरुस्थल का विस्तार कहा है ?
उत्तर - उ. अफ्रीका

9. एशियाई विकास बैंक का मुख्यालय कहाँ है ?
उत्तर - मनीला

10. संविधान सभा द्वारा राष्ट्रीय ध्वज का प्रारूप कब अपनाया गया ?
उत्तर - 22 जुलाई 1947

General knowledge

✅ General knowledge

1. प्रसिद्ध करीबा बांध किस नदी पर स्थित है
🔰 Ans. जाबेजी नदी

2. जर्मनी और पोलैंड के बीच की सीमा रेखा क्या कहलाती है?
🔰 Ans. हिंडनबैंकॉक वर्ग रेखा

3. भारत में केसर का सबसे बड़ा उत्पादक राज्य कौन सा है?
🔰 Ans. जम्मू कश्मीर

4. भारतीय फिल्म एवं विकास निगम की स्थापना किस वर्ष हुई?
🔰 Ans.  1980 में

5. पुरा पाषाणकाल की सबसे बड़ी उपलब्धि थी
🔰 Ans.  आग का आविष्कार

6. वायुमंडल में नाइट्रोजन कितने प्रतिशत है?
🔰 Ans. 78%

7. अलीगढ़ आंदोलन की शुरुआत किसने की?
🔰 Ans. सय्यद अहमद खान

8. डायनेमो का सिद्धांत किस  निगम पर आधारित है?
🔰 Ans. फैराडे के नियम

9. भारत में मनीआर्डर प्रणाली की शुरुआत किस वर्ष हुई?
🔰 Ans. 1880

10. द वेल्थ ऑफ नेशंस की रचना किसने की?
🔰 Ans. एडम स्मिथ

11. बाल्मीकि ने रामायण की रचना किस भाषा में की थी?
🔰 Ans. संस्कृत

12. भारत के प्रथम उप प्रधानमंत्री कौन थे?
🔰 Ans. सरदार पटेल

13. सिकंदर ने भारत पर आक्रमण कब किया था?
🔰 Ans. 326 ईसा पूर्व में

14. सिक्खों के प्रथम गुरु कौन थे?
🔰 Ans. गुरुनानक देव

15. एंजाइम की संरचना किससे होते हैं?
🔰 Ans. अमीनो अम्ल

16.द डोज लाफ्टर के रचियता कौन है?
🔰 Ans. आर के लक्ष्मण

17. इलाहाबाद के स्तंभ लेख किसने लिखा?
🔰 Ans. हरिसेन

18. शक संवत के अनुसार अंतिम महीना कौन सा है?
🔰 Ans. फाल्गुन

19. भारत के प्रथम दलित मुख्य न्यायाधीश कौन बने?
🔰 Ans. के जी बालकृष्णन

20. मांसपेशियों में कौन सा अम्ल पाया जाता है?
🔰 Ans.  मायोसीन Acid

विविध महत्त्वपूर्ण स्थळे

🌸🌸विविध महत्त्वपूर्ण स्थळे🌸🌸

🌷संत नामदेव अध्यासन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

🌷महाराष्ट्रातील कीर्तन महाविद्यालय : आळंदी

🌷महानुभावांची काशी : ऋद्धिपूर

🌷श्री गोविंदप्रभूंची समाधी : ऋद्धिपूर

🌷संत सोपानदेवांची समाधी : सासवड

🌷दलित वाङ्मय अभ्यास व संशोधन संस्था : पुणे

🌷संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी : आळंदी

🌷संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेले ठिकाण : नेवासे

🌷संत चोखोबांची समाधी : पंढरपूर

🌷संत मुक्ताबाईंची समाधी : मेहुण

🌷संत निवृत्तीनाथांची समाधी : त्र्यंबकेश्वर

🌷संत जनाबाईंची समाधी : आदिलाबाद

🌷केशवसुत स्मारक : मालगुंड

🌷मर्ढेकर स्मारक : मर्ढे ( जि. सातारा )

🌷बालगंधर्व रंगमंदिर : पुणे

🌷महाराष्ट्र साहित्य परिषद : पुणे

🌷भारत इतिहास संशोधन मंदिर : पुणे

🌷मराठी भाषाविकास संस्था : मुंबई

🌷भारतीय साहित्य अकादमी : दिल्ली

🌷एकनाथ संशोधन मंदिर : औरंगाबाद

🌷रा. गो. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर : पुणे

🌷महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ : मुंबई

🌷प्राचीन दुर्मीळ हस्तलिखितांची पोथी शाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
 

मराठी व्याकरण

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
🌷मराठीतील प्रथम व विशेष🌷

🌷मराठीतील पहिले वृत्तपत्र : दर्पण ( बाळशास्त्री जांभेकर - 6 जानेवारी 1832 )

🌷मराठीतील पहिले वर्तमानपत्र (दैनिक ) : ज्ञानप्रकाश ( 1904 )

🌷मराठीतील पहिले मासिक : दिग्दर्शन ( बाळशास्त्री जांभेकर -1840 )

🌷मराठीतील पहिला शिलालेख : अक्षीचा शिलालेख

🌷मराठीतील पहिले व्याकरणकार : दादोबा पांडुरंग तर्खडकर

🌷मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण : महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ( गंगाधर शास्त्री फडके )

🌷मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी : मोचनगड ( रा. भि. गुंजीकर )

🌷मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी : यमुना पर्यटन ( बाबा पदमनजी )

🌷मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार : साळूबाई तांबवेकर

🌷मराठी व्याकरण 🌷

🌷 स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.

🌷 संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.

🌷 नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.

🌷 अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.

🌷 शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.

🌷 सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.

🌷 शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.

🌷 साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.

🌷प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.

🌷 धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.

🌷 टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.

🌷 समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.

🌷 शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.

🌷 मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.

🌷 महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.

________________________________

🌷नियतकालिक  :   एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात.

नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा.....

🌷द्वैवार्षिक - दोन वर्षांतून एकदा निघणारे

🌷वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे

🌷षाण्मासिक - दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

🌷त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी

🌷द्वैमासिक - दोन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे

🌷मासिक - दर महिन्याला

🌷पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी

🌷द्विसाप्ताहिक - आठवड्यातून दोनदा

🌷साप्ताहिक - दर आठवड्याला

🌷दैनिक - दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन.

व्यवसायावर आधारित जाती व काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
🌷व्यवसायावर आधारित जाती🌷

🌷आजीवक - भिक्षूक

🌷किर - पुराणातील गंधर्व सारखी गायक जात

🌷कापडणीस - राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा

🌷ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

🌷खोत - कोकणातील एक वतनदार

🌷गुरव - शंकराचे पुजारी

🌷धोबी - परीट, रजक

🌷धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

🌷नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

🌷भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

🌷पाथरवट - दगडफोड करणारा

🌷मशालजी - मशाल धरणारा

🌷मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

🌷माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

🌷मोदी - धान्य दुकानदार

🌷मलंग - फकिराचा एक पंथ

🌷माहूत - हत्ती हाकणारा

🌷सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

🌷वडार - दगड फोडणारी एक जात

🌷बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई

_______________________________

🌸🌸काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ🌸🌸

🌷अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा

🌷अकदस : पुण्यवान,धर्मात्मा

🌷अखई : अखंड

🌷अगेल : पहिला

🌷अगाब : मजबूत, श्रेष्ठ

🌷अधा : धनी,यजमान

🌷अजा : शेळी, बकरी

🌷आंदोली  :  हेलकावा, झोका

🌷आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला

🌷आपगा  :  नदी

🌷आभु  :  ब्रम्हा

🌷आमण  :  आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते

🌷आयतन  :  जागा ,स्थळ

🌷आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार

🌷आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ

मराठीतील प्रथम व विशेष आणि मराठी भाषेत येणारे शब्द व लिपी

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
🌷मराठीतील प्रथम व विशेष🌷

🌷मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले ( श्रवणबेळगोळ )

🌷मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र ( म्हाईमभट )

🌷मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू ( मुकुंदराज )

🌷मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर

🌷मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी

🌷मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे

🌷मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर

🌷मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर ( ययाती )

🌷मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी ( भावार्थदीपिका )

🌷मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील ( कृष्णराव भालेकर )

_____________________________

🌷मराठी भाषेत येणारे शब्द🌷

🌷ऑस्ट्रिक अथवा ऑस्ट्रेएशियाटिक : जावा, सुमात्रा, मलाया, इत्यादी देशातील लोकांकडून आलेले शब्द.

🌷शिमी : मुसलमानी धर्माबरोबर व राज्याबरोबर अरबी, फारसी, तुर्की, इत्यादी भाषेतून आलेले शब्द.

🌷युरोपीय : अर्वाचीन काळात इंग्रजी, पोर्तुगीज, फ्रेंच इत्यादिंच्या सहवासाने मराठीत रूढ झालेले शब्द.

🌷वर्तमान बोली : सीमाप्रदेशात गुजराथी, हिंदी इत्यादी भाषांच्या सान्निध्यामुळे मराठी भाषेतील शब्दात वाढ झाली आहे.

🌷प्राकृत, अपभ्रंश भाषा : मराठीची निर्मिती होत असताना पाली, पैशाची, अर्धमागधी, मागधी, शौरसेनी इत्यादी प्राकृत भाषांनीही मराठीच्या शब्दसंग्रहास हातभार लावलेला आहे.

🌷द्राविडी शब्द : भारतात आर्यपूर्वकाळापासून राहणाऱ्या लोकांच्या सहवासाने आलेले शब्द. कन्नड, तामीळ, तेलगू, मल्याळम इत्यादी दक्षिणेकडील भाषांतून मराठीने काही शब्द उचलले आहेत.

🌷 देशज अथवा देश्य : आर्यपूर्वकाळापासून भारतात निवास करून राहणाऱ्या भिल्ल, नाग , कातकरी, गोंड, कोरकू, वारली, इत्यादी वनवासी लोकांचे शब्द.

 

______________________________
                    
🌷लिपी🌷

🌷लिपी : लिपी हा शब्द लिप् या धातूपासून

तयार झाला आहे. लिप् म्हणजे लिंपणे किंवा

सारवणे किंवा माखणे होय. आपण कागदावर

शाईने लिंपतो म्हणून तिला 'लिपी' असे

म्हणतात. विविध सांकेतिक खुणांनी आपण जे

लेखन करतो तिलाच 'लिपी' असे म्हणतात.

🌷देवनागरी लिपी : मराठी भाषेचे लेखन ज्या

मराठी बाळबोध लिपीत केले जाते त्यास

देवनागरी लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपी

आर्य लोकांनी भारतात आणली. देवनागरी

लिपीचे लिखाण डावीकडून उजवीकडे केले जाते.

विविध प्राण्यांची पिल्ले आणि मराठी महिने व विविध धार्मिक सण

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
🌷विविध प्राण्यांची पिल्ले🌷

🌷मेंढीचे : कोकरू

🌷गरुडाचे : पिल्लू

🌷सिंहाचा : छावा

🌷कुत्र्याचे : पिल्लू

🌷वाघाचा : बछडा

🌷कोंबडीचे : पिल्लू

🌷हरणाचे : शावक, पाडस

🌷गाईचे : वासरू

🌷घोड्याचे : शिंगरू

🌷मांजराचे : पिल्लू

🌷म्हशीचे : रेडकू

🌷बदकाचे : पिल्लू

🌷हत्तीचे : करभ, पिल्लू

🌷शेळीचे : करडू

🌷डुकराचे : पिल्लू

 
  _____________________

🌷मराठी महिने व विविध धार्मिक सण🌷

1) चैत्र : पाडवा, ईद ए मिलाद, रामनवमी

2) वैशाख : अक्षयतृतीया, बुद्ध पौर्णिमा

3) ज्येष्ठ : वटपौर्णिमा

4) आषाढ : आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा

5) श्रावण : नागपंचमी, रक्षाबंधन, पतेती, पोळा

6) भाद्रपद : श्रीगणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, गौरीपूजन

7) अश्विन : घटस्थापना, रमजान, विजयादशमी

8) कार्तिक  : दिवाळी पाडवा, भाऊबीज

9) मार्गशीर्ष : श्रीदत्तजयंती, ख्रिसमस, खंडोबा यात्रा

10) पौष : मकरसंक्रांती

11) माघ : वसंत पंचमी, रथसप्तमी, मोहरम, महाशिवरात्री

12) फाल्गुन : होळी, रंगपंचमी

कथासंग्रह आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य

MPSC मराठी व्याकरण व लेखन:
🌷कथासंग्रह🌷

🌷जयवंत दळवी : स्पर्श , रुक्मिणी, गमतीच्या गोष्टी

🌷इंदिरा संत : शामली, चैतु

🌷रणजीत देसाई : रुपमहाल, कणव, सावल्या, मधुमती

🌷शांता शेळके : काचकमल, गुलमोहर, कावेरी, बासरी

🌷प्रिया तेंडुलकर : जावे तिच्या वंवशा, ज्याचा त्याचा प्रश्न

🌷अरुणा ढेरे : कृष्णकिनारा

🌷आनंद यादव : शेवटची लढाई, घरजावई, खळाळ, माळावरची मैना, उखडलेली झाडे, भूमिकन्या, उगवती मने

🌷केशव मेश्राम : धगाडा, पत्रावळ , रुतलेली माणसे , धूळ, वावटळ

🌷दया पवार : विटाळ, चावडी

🌷भास्कर चंदनशिवे : नवी वारुळे , अंगार माती, मरण माती, मरण कळा, जांभूळ ढव

🌷व्यंकटेश माडगूळकर : माणदेशी माणसे , गावाकडच्या गोष्टी, उंबरठा, वाळूचा किल्ला, जांभळाचे दिवस, गोष्टी घराकडील, काळी आई

🌷मधूमंगेश कर्णिक : वस्ती, पारध, मांडव, तहान, तोरण, मंत्र, भुईचाफा, क्षितिज

🌷वि.वा.शिरवाडकर : फुलवाली, सतारीचे बोल,काही वृद्ध काही तरुण

🌷अरुण साधू : एक माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ती, मंत्रजागर, ग्लानिर्भवती भारत

🌷प्र. के.अत्रे : अशा गोष्टी अशा गमती, कशी आहे गंमत, कावळ्याची शाळा, फुले आणि मुले

🌷गंगाधर गाडगीळ : कडू आणि गोड, नव्या वाटा, भिरभिरे, संसार, कबुतरे, तलावतले चांदणे, वर्षा, खंडू, पाळणा, काजवा

🌷चिं. त्र्य. खानोलकर : चाफा आणि देवाची आई,सनई

🌷पु.भा.भावे : परंपरा, सार्थक,पहिला पाऊस,बंगला, हिमानी, फुलवा,झुंझारराव, दुर्गा

🌷रा.रं. बोराडे : नातीगोती, पेरणी, बुरुज, मळणी, माळरान

🌷राजन गवस : आपण माणसात जमा नाही.

_________________________

🌸🌸 साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य 🌸🌸

🌷सदानंद मोरे : तुकारामदर्शन ( १९९८ )

🌷रंगनाथ पठारे : ताम्रपट ( १९९९ )

🌷ना.धो.महानोर : पानझड ( २००० )

🌷राजन गवस : तणकट ( २००१ )

🌷त्र्यंबक विनायक सरदेशमुख : डांगोरा एका नगरीचा ( २००३ )

🌷महेश एलकुंचवार : युगांत ( २००२ )

🌷सदानंद देशमुख : बारोमास ( २००४ )

🌷अरुण कोल्हटकर : भिजकी वही ( २००५ )

🌷आशा बगे : भुमी ( २००६ )

🌷वसंत आबाजी डहाके : चित्रलिपी ( २००९ )

🌷सरोज देशपांडे : अशी काळवेळ ( २०१० )

🌷अशोक केळकर : रुजुवात ( २०१० )

संधी

🌸🌸संधी🌸🌸

अ) स्वरसंधी :

१) दीर्घत्व संधी/ सवर्ण दीर्घ :

दीर्घत्व संधीची काही दुर्मीळ व महत्त्वपूर्ण उदाहरणे:
🌷दुःख +आर्त = दुःखार्त

🌷कर+आ= करा

🌷करीत+आहे= करिताहे

🌷जा+आ= जा

🌷पोवा +आडा = पोवाडा

🌷आशा + आवणे = आशावणे

🌷श्री + ईश = श्रीश

🌷 सू+ उक्त = सूक्त

🌷 गुरू + उक्त = गुरुक्त

2) गुणादेश संधी:

गुणादेश संधीची दुर्मीळ उदाहरणे

🌷 रंग + ईल = रंगेल

🌷गंगा + उत्साह = गंगोत्साह

अपवाद:

🌷स्व + ईर = स्वैर

🌷प्र + उढ = प्रौढ

🌷 दश + ऋण = दशार्ण

🌷अक्ष + ऊहिनी = अक्षौहिनी

🌷 सुख + ऋत = सुखार्त

3)यणादेश :

🌷मति + ओघ = मत्यौघ

🌷 देवी + उत्थ = देव्युत्थ

🌷धू + आ = ध्वा

🌷गुरु + ओघ = गुर्वोघ

🌷धेनू + औदार्य = धेन्वौदार्य

🌷गुरु + इच्छा = गुर्विच्छा

4) पररूप :

🌷एक + एकटा = एकेकटा

🌷गोरा + एला = गोरेला

🌷रेघ + ओटी = रेघोटी

🌷लांब + ओडा = लांबोडा

🌷कर + ओ = करो

🌷बस + ओत = बसोत

🌷नृप + ए = नृपे

🌷टारगा + एला = टारगेला

🌷काळा + एला = काळेला

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...