14 April 2022

भारतीय राज्य घटनेची निर्मिती 1922-1950

भारतीय राज्य घटनेची निर्मिती 1922-1950


राज्य घटनेची निर्मिती
भारतीय राज्य घटनेची निर्मिती हा एक प्रदीर्घ प्रवास भारतीय राजकारणाच्या इतिहासात पाहायला मिळतो.  भारतीय राज्यघटना ही जगामध्ये प्रदीर्घ अशी राज्यघटना आहे.


राज्यघटनेमध्ये सर्व घटकांच्या बाबतीत जसे केंद्र राज्य संबंध, मंत्रिमंडळ, राज्याचे मंत्रिमंडळ, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य यासंदर्भात विस्तृत विवेचन पाहायला मिळते.

भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाल्यानंतर काळाच्या ओघात भारतीय राज्यघटनेमध्ये अनेक बदल करण्यात आले ज्याला आपण घटनादुरुस्ती म्हणून देखील ओळखतो.

    अशा या भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याविषयी माहिती  या लेखामध्ये पाहणार आहोत. राज्य घटनेची निर्मिती

राज्य घटनेची निर्मिती
भारतीय राज्य घटनेची निर्मिती


संविधान सभा – देशाच्या घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्याच्या उद्देशाने लोकांनी निवडून दिलेल्या सभेला संविधानसभा असे म्हणतात. भारतासाठी संविधान सभेची मागणी 1922 मध्ये महात्मा गांधीनी सर्वप्रथम शब्द उल्लेख न करता केली. साम्यवादी चळवळीचे नेते मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना मांडली. 1940 च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर द्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना भारतीयांनीच तयार करावी हे मान्य केले.

संविधान सभा आणि संसद हे दोन्ही घटक भिन्न आहेत.  संविधानावर आधारित संसदेची निर्मिती होत असते.  तर संसदेची निर्मिती करणारे संविधान तयार करणारी सभा म्हणजे संविधान सभा होय. राज्य घटनेची निर्मिती

1942 मध्ये क्रिप्स मिशन पाठवून ब्रिटिश सरकारने घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली. पण मिशनचा प्रस्ताव काँग्रेस व मुस्लीम लीगने नाकारला. 1946 च्या कॅबिनेट मिशन च्या शिफारशीनुसार भारतीय घटना परिषद तयार करण्याचे ठरले. या समितीमध्ये 389 सदस्य होते. त्यापैकी 292 सदस्य ब्रिटिश प्रांतात कडून चार सदस्य चीफ कमिशनर च्या प्रांतात कडून उर्वरित 93 सदस्य संस्थानिकांचे प्रतिनिधी होते.

संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे न करता सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय पत्राद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने केले. हे सदस्य 1935 च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदेमंडळांना सदस्यांकडून निवडून दिले जातील.

ब्रिटिश प्रांतांना देण्यात आलेल्या 296 जागांपैकी काँग्रेसने 208 जागा मिळवल्या. मुस्लिम लीगने 73 जागा मिळवल्या. आठ जागा अपक्षांनी मिळवल्या. संविधान सभेत एकूण 15 जागा महिलांना मिळालेल्या होत्या.

संस्थानिकांच्या 93 जागा मात्र भरल्या गेल्या नाहीत. कारण संस्थानिकांनी संविधान सभेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला होता. संविधान सभेत भारतीय समाजाच्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळाले होते.

9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे पहिले अधिवेशन भरलेले होते. यामध्ये ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरती अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची उद्देश पत्रिका (Objectives of Resolution) मांडली. यामध्ये घटनात्मक संरचनेची मूलतत्त्वे व तत्वज्ञान देण्यात आले होते. 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला. भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका यावरूनच तयार करण्यात आलेली आहे.

राज्य घटनेची निर्मिती

मसुदा समिती –
अध्यक्ष – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सदस्य – N. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, मोहम्मद सादुल्लाह, डॉ. के एम मुंशी, N.माधव राव(B.L. मित्तर यांच्या राजीनाम्याची मुळे), T.T. कृष्णम्माचारी (डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर) मसुदा समितीने विविध समित्यांच्या तरतुदींचा विचार करून घटनेचा पहिला मसुदा तयार केला व फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित केला.
भारतीय जनतेला मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ऑक्टोबर 1948 मध्ये दुसरा मसुदा तयार करण्यात आला, तो 24 ऑक्टोबर 1948 रोजी घटना समितीच्या अध्यक्षांना सादर करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे ही म्हटले जाते.

घटनेची स्वीकृती – डॉ. आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. या स्वीकृत घटनेमध्ये 22 भाग 395 कलमे व आठ अनुसूचींचा समावेश होता. 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या.घटनेची

अंमलबजावणी – घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. हा दिवस निवडण्याचे कारण असे की ते सप्टेंबर 1929 च्या काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव 26 जानेवारी या दिवशी मांडला होता. 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता.

भारतीय राज्य घटनेची निर्मिती कशी झाली हे पाहताना संविधान सभेच्या निर्मितीपासून घटनेची स्वीकृती आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हा संपूर्ण प्रवास आपण या ठिकाणी  पाहिला.

शेषराव मोरे

शेषराव मोरे

प्रा. डॉ. शेषराव मोरे (जन्म : १७ ऑगस्ट, इ.स. १९४८) हे वैचारिक लिखाणाचा प्रवाह समृद्ध करण्यारे एक मराठी लेखक आणि वक्ते आहेत. ते व्यवसायाने इंजिनिअर आहेत. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते कायद्याचे पदवीधरही आहेत.

प्रा. नरहर कुरूंदकर यांच्या परंपरेत घडलेले मोरे परखड विचारांचे लेखक आहेत. नांदेडला अभियांत्रिकी शिकत असताना ते बसायचे मात्र कुरूंदकर यांच्या वर्गात. कुरूंदकरांच्या विचारांचे त्यांच्यावर गारूडच होते. या वाटचालीत कुरूंदकरांशी स्नेह वाढला आणि एका विचारवंताची जडणघडण सुरू झाली.

लेखनासाठी केलेला अभ्यास
आपल्या प्रत्येक पुस्तकात डॉ. मोरे यांनी सामाजिक व राजकीय घडामोडींचा नवा वेध घेतला. एक हजार वर्षांच्या कालखंडात भारतावर इस्लामचा दीर्घ परिणाम झाला. या धर्माचा साधकबाधक अभ्यास सावरकर व डॉ. आंबेडकर यांनी केल्याचे मोरे यांच्या ध्यानात आले. त्यामुळे प्रेरित होऊन, १९९१ मध्ये त्यांनीही इस्लामचा सर्वांगीण अभ्यास आरंभला. रोज सात-आठ तास अभ्यास करूनही वेळ पुरत नसल्याने त्यांनी अखेर औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी कॉलेजातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. देशभर भ्रमंती करून अभ्यासक, मौलवी यांच्या भेटी घेतल्या आणि हजारो पुस्तके अभ्यासली. यातून 'मुस्लिम मनाचा शोध', 'प्रेषितानंतरचे चार आदर्श खलिफा' ही पुस्तके साकारली. रूढार्थाने वाचकानुनय न करता अथक व्यासंग आणि चिंतनातून मोरे यांचे लिखाण साकारले आहे. शेषराव मोरे यांचे लेखन अनेक मराठी नियतकालिकात सातत्याने प्रकाशित होत असते.

सावरकरांविषयीचे लेखन
सावरकरांचा व्यासंग हे शेषराव मोरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अभिन्न अंग आहे. सावरकरांचे जीवन हा मोरे यांच्या लिखाणाचा आवडता विषय. त्यामुळे प्रारंभी 'सावरकरांचा बुद्धिवाद', 'सावरकरांचे समाजकारण', 'सत्य आणि विपर्यास' या पुस्तकांतून सावरकरांच्या मौलिक विचारांची परखड मीमांसा त्यांनी केली.

शेषराव मोरे यांनी लिहिलेली पुस्तके
१८५७ चा जिहाद (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन)
अप्रिय पण (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन)
Islam - Maker of the Muslim Mind
काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला (राजहंस प्रकाशन) : या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेकडून पुरस्कार मिळाला आहे.
काश्मीर एक शापित नंदनवन (राजहंस प्रकाशन)
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी
प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा (राजहंस प्रकाशन)
मुस्लिम मनाचा शोध
विचारकलह (अभिनव निर्माण प्रतिष्ठान प्रकाशन) भाग १, २
शासनपुरस्कृत मनुवादी : पांडुरंगशास्त्री आठवले
(सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास
सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन)
सावरकरांचे समाजकारण
सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)

उठावाची कारणे

उठावाची कारणे

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध १८५७ चा राष्ट्रीय उठाव भारत

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
१८५७ चा राष्ट्रीय उठाव - भारत

१८५७चे स्वातंत्र्ययुद्ध
उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा
उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा
दिनांक १० मे १८५७ - २० जून १८५८
स्थान उ.भारतीय मैदानी प्रदेश, बंगाल
परिणती ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात
शिपायांचा उठाव दडपला गेला
मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्यांचा शेवट
ब्रिटीश राणीचा अंमल सुरू
युद्धमान पक्ष
ईस्ट इंडिया कंपनीचे बंडखोर शिपाई
मुघल
ग्वाल्हेर संस्थान
झांंशी संस्थान
मराठा साम्राज्य ईस्ट इंडिया कंपनी
ब्रिटिश साम्राज्य
भारतातील युरोपीय नागरिक
२१ भारतीय संस्थाने
नेपाळचे साम्राज्य
सेनापती
बहादूरशहा दुसरा
नानासाहेब पेशवा 2
राणी लक्ष्मीबाई
तात्या टोपे
बख्त खान
बेगम हजरत महल
कुंवरसिंघ इंग्रजी सेनाधिकारी

१८५७ चा उठाव  आणि महाराष्ट्र

तात्या टोपे यांची सेना
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरू झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.

१८५७ च्या उठावातील दोन व्यक्तींना फाशी
उठावाची कारणे संपादन करा
बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक) संपादन करा
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

भारताचा स्वातंत्र्यलढा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

भारताचा स्वातंत्र्यलढा

ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र, स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स, १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः; भारताला स्वातंत्र्य मिळाले.[१]

ऐतिहासिक पार्श्वभूमी....

पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला.[२] व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले.त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला.[३] इ.स.१८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते.[४] त्या जोरावर १८ व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.

पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश - उत्तरे

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर ----------- कि.मी. असते.
1. 110
2. 115
3. 105
4. 120
उत्तर : 110

2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ----------- येथे आहे.
1. पेंच
2. मणिकरण
3. कोयना
4. मंडी
उत्तर : मणिकरण

3. 'स्पीड पोस्ट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1. मुल्क राज आनंद
2. शोभा डे
3. अरुंधती राय
4. खुशवंत सिंग
उत्तर : शोभा डे

4. नियोजित आलेवाडी बंदर ------------ जिल्ह्यात आहे.
1. सिंधुदुर्ग
2. ठाणे
3. रत्नागिरी
4. रायगड
उत्तर : ठाणे

5. ---------- शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
1. मुंबई
2. बंगलोर
3. कानपूर
4. हैदराबाद
उत्तर : बेंगलोर

6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
1. 20 मीटर
2. 200 मीटर
3. 180 मीटर
4. 360 मीटर
उत्तर : 200 मीटर

7. मुंबई उच्च न्यायालयाची ----------- खंडपीठे आहेत.
1. दोन
2. तीन
3. चार
4. एक
उत्तर : तीन

8. राज्याचा आकस्मिक निधी ------------ च्या अखत्यारीत असतो.
1. राज्यपाल
2. मुख्यमंत्री
3. मंत्रीपरिषद
4. राज्यविधानमंडळ
उत्तर : राज्यपाल

9. स्पायरोगायरा ---------- शेवाळ आहे.
1. नील-हरित
2. हरित
3. लाल
4. रंगहीन
उत्तर : हरित

10. -------- वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
1. नायट्रोजन
2. अमोनिया
3. हेलियम
4. कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव

🔹प्रश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?

१) शाहू महाराज
२) डॉ.बेव्हरेल निकोल्स
३) जोतिबा फुले
४) यापैकी नाही

१) शाहू महाराज ✅✅

🔹प्रश्न २:-  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?

१) कलम ३४०
२) कलम ३४१
३) कलम ३४२
४) कलम ३४३

१) कलम ३४०✅

🔹प्रश्न ३:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?

१) भंते संघरत्न
२) भंते प्रज्ञानंद
३) भंते चंद्रमणी महास्थीर
४) भंते सद्दतिस्स

३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅

🔹प्रश्न ४:-  विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?

१) १९९२
२) १९८९
३) १९९०
४) १९९१

३) १९९०✅

🔹प्रश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?

१) थॉटस ऑन पाकिस्तान
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म
३) हू  वेअर शुद्राज
४) दि अनटचेबल्स

२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅

🔹प्रश्न ६ :-  १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?

१) एम.ए
२) पी.एच.डी
३) एल.एल. डी
४) डी.एस सी

३) एल.एल. डी✅

🔹प्रश्न ७ :-  महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?

१) ५१ फूट
२) ५५ फूट
३) ५७ फूट
४) ५४ फूट

१) ५१ फूट ✅

🔹प्रश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?

१) तथागत गौतम बुद्ध
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) संत कबीर
४) यापैकी नाही

३) संत कबीर ✅

🔹 प्रश्र ९ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?

१) १४ ऑक्टोबर १९३५
२) १३ ऑक्टोबर १९५५
३) १४ ऑक्टोबर १९५५
४) १३ ऑक्टोबर १९३५

४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅

🔹 प्रश्न १० :-  जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?

१) पहिला
२) दुसरा
३) तिसरा
४) चौथा ✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖