१३ एप्रिल २०२२

सामाजिक भूगोल

सामाजिक भूगोल...


सामाजिक भूगोल....
सामाजिक भूगोलमानवी भूगोलाची एक मुख्य शाखा. मानवी समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास या शाखेत केला जातो. सामाजिक भूगोलाची सर्वमान्य व्याख्या अद्याप झालेली नाही.त्याचप्रमाणे सामाजिक व सांस्कृतिक भूगोलशास्त्रांचे स्वरूप आणि व्याप्ती यांच्यातील निश्चित सीमारेषेबाबतही संदिग्धता आहे. वेगवेगळ्या भूगोलतज्ज्ञांनी केलेल्या सामाजिक भूगोलाच्या व्याख्यांमध्ये तफावत दिसून येते. ई. डब्ल्यू. गिल्बर्ट व आर्. डब्ल्यू. स्टील या तज्ज्ञांच्या मते विविध पर्यावरणातील सामाजिक समुदायांचे वितरण व त्यांची जीवनशैली तसेच अधिवास, आरोग्य आणि वेगवेगळ्या लोकसमूहांतील मजुरांची स्थिती यांचे भौगोलिक विश्लेषण म्हणजे सामाजिक भूगोल होय. वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणानुसार सामाजिक भूगोलात लोकसंख्या, लोकसंख्येचे वितरण व संरचना, स्थलांतर, मानवी वसाहती, मानवाचे सांस्कृतिक वर्तन,वेगवेगळ्या समाजघटकांमधील परस्परसंबंध, सामाजिक गुन्हेगारी इ. मानवी समाजघटकांचा अभ्यास केला जातो.
सामाजिक भूगोल ही नव्याने उदयास आलेली शाखा आहे. समाजाचा आकार जसजसा विस्तृत होऊ लागला, समाजरचना गुंतागुंतीची बनू लागली व सामाजिक समस्यांची संख्या व तीव्र ता वाढत गेली, तसतसे विचारवंतांनी आपले लक्ष समाजाच्या अभ्यासाकडे वळविले. या अभ्यासामधूनच सामाजिक भूगोल हा स्वतंत्र विषय विकासित होत गेला. अभिजात युगातील समन्वेषक व इतर व्यक्तींचे लिखित दाखले तसेच विसाव्या शतकातील भूगोलतज्ञांचे संशोधनकार्य यांमधून सामाजिक भूगोलाचा उद्‌गम स्पष्ट होतो.

ग्रे को–रोमन काळातील समन्वेषक आणि लेखक यांनी लिहिलेले वर्णनात्मक अहवाल ऐतिहासिक पूर्वो दाहरण म्हणून देता येतील. हीरॉडोटस, थ्यूसिडिडीझ, स्ट्रेबो व अन्य लेखक या संदर्भात जागतिक-सामाजिक विभेदाविषयी पहिले लिखित प्रतिबोधन (मान्यता) देतात. अशा प्रकारची विश्वकोशीय वर्णने पाश्चात्त्य देशांत सतराव्या शतकात अधूनमधून आढळतात.उदा., मार्को पोलो व मिशनऱ्यांचे वृत्तांत. जगाच्या वेगवेगळ्या भागांत तेथील नैसर्गिक पर्यावरणाच्या, विशेषतः हवामानातील भिन्नतेनुसार विविध प्रकारचे सामाजिक जीवन आढळते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ फेडेरिक ली प्ले (१८०६–८२) याने फ्रान्समधील कामगारांच्या कुटुंबातील सामाजिक परिस्थितीचा जो प्रत्यक्ष अभ्यास केला होता, तो सामाजिक भूगोलाचाच अभ्यासविषय होता. जर्मन भूगोलज्ञ ⇨राट्सेल फीड्रिख (१८४४–१९०४) याच्या अँथ्रॉपोजिऑगफी (१८८२;१८९१) या द्विखंडीय ग्रंथातील तसेच इतर लेखांमधील वर्णन हे सामाजिक भूगोलाशी निगडित होते. त्याने प्राकृतिक पर्यावरणाचा व्यक्तीवर व समाजावर होणारा परिणाम स्पष्ट केला. जर्मन भूगोलज्ञ कार्ल रिटर, अलेक्झांडर फॉन हंबोल्ट,हॅसिंगर, रू हल व हेटनर, फ्रेंच भूगोलज्ञ एलीझे रक्ल्यू, अमेरिकन भूगोलज्ञ जॉर्ज पेर्किन्स मार्श व ब्रि टिश भूगोलज्ञ एच्. जे.मॅकिंडर हे सामाजिक भूगोलशास्त्राचे प्रवर्तक मानले जातात; तथापि ली प्ले याची सामाजिक सर्वेक्षण चळवळ, राट्सेलचा मानवजाती भूगोल आणि फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) याचे समाजरचनेचे शास्त्र (सोशल मॉर्फालॉजी)यांमधून त्यांनी सामाजिक भूगोल या विषयाच्या संदर्भातील अनेक संकल्पना स्पष्ट केल्या. या तीन महत्त्वाच्या विचारधारा ह्या आधुनिक सामाजिक भूगोलशास्त्राच्या विकासाचे आद्य टप्पे मानले जातात. ली प्ले याच्या अनुयायांच्या लेखनातही या विषयाला धरून विवेचन आढळते. कार्ल रिटर याने भौगोलिक प्रदेशाची ‘जैविक एकात्मता’ ही संकल्पना प्रतिपादन केली.यामध्ये नैसर्गिक परिस्थिती आणि तेथील लोकसंख्या व संस्कृती यांच्यात एकात्मता आढळते, असे स्पष्ट केले.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भूगोलतज्ञांनी समाज आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांच्या अभ्यासावर विशेष भर दिला.अँग्लो–अमेरिकन परंपरेतील व्यक्ती जॉर्ज विल्सन होक याचा ‘द स्टडी ऑफ सोशल जिऑगफी’ हा शोधनिबंध १९०७ मध्ये प्रसिद्घ झाला. त्यात त्याने ‘सामाजिक भूगोल’ ही संज्ञा वापरली होती. वाढती लोकसंख्या, मानवी वसाहती, नागरीकरण व त्यांमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या इ. अभ्यासविषय सामाजिक भूगोलात समाविष्ट होऊ लागले. कोणत्याही प्रदेशातील मानवी जीवनावर तेथील भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव पडत असतो. काही भूगोलज्ञांनी तर नैसर्गिक पर्यावरणातील घटकांचा आधार घेऊन असे स्पष्ट केले, की समाजातील मद्यप्राशन, घटस्फोट, बहुविवाहपद्घती, रू ढी, परंपरा यांच्या पाठीमागे निसर्ग असतो. व्हीदाल द ला ब्लांश या प्रसिद्घ फ्रेंच भूगोलज्ञाने राट्सेलच्या अतिशयोक्तीपूर्ण पर्यावरणीय निसर्गवाद (नियतिवाद, अशक्यतावाद) या विचारप्रणालीऐवजी संभववाद (शक्यतावाद) ही अधिक लवचिक संकल्पना मांडली. त्याच्या मते मानवाला नैसर्गिक पर्यावरणामध्ये इष्ट ते बदल घडवून आणता येतात. त्याने भूगोलाच्या अभ्यासात मानवाला केंद्रस्थानी मानले. आधुनिक मानवी व सामाजिक भूगोलाच्या विकासावर व्हीदालच्या विचारांचा फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. सुरुवातीच्या काळातील–विशेषतः फ्रेंच–भूगोलज्ञांनी सामाजिक भूगोलाचा अभ्यास प्रादेशिक विवरणशास्त्र या दृष्टिकोनातून केला. इलीस याच्या मते सामाजिक भूगोल हे व्हीदाल द ला ब्लाश व बोबेक यांचेच पुढे चालत आलेले तत्त्वज्ञान होय.

दुसऱ्या महायुद्घापूर्वीच्या काळात सामाजिक भूगोलाच्या घटकांचे पद्घतशीर वर्गीकरण करण्याकडे तसेच या विषयाचा सैद्घांतिक आकृतिबंध मांडण्यावर भूगोलज्ञांनी विशेष भर दिला नव्हता. पिअरी जॉर्ज व मॅक्सीमीलीएन सोर यांनी पहिल्यांदा असे वर्गीकरण केले (१९४३–५३). १९६० च्या दशकातील सामाजिक भूगोलाच्या विकासाचे प्रमुख तीन प्रवाह आढळतात.त्यांपैकी पहिला प्रवाह, कल्याणकारी किंवा मानवतावादी विचारप्रणालीचा. तिचा भर कल्याणकारी अर्थव्यवस्थेच्या आकृतिबंधांतर्गत निवासव्यवस्था, आरोग्य व सामाजिक चिकित्सेवर होता. दुसरा प्रवाह, मूलगामी विचारप्रणालीचा. ती मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित असून तिचा भर दारिद्रय व सामाजिक विषमता या समस्यांच्या मूळ कारणांच्या विश्लेषणावरहोता, तर तिऱ्या प्रवाहाचा भर वांशिक किंवा धार्मिक भिन्नतेच्या अभ्यासावर होता. पाश्चिमात्य भूगोलज्ञांनी प्रामुख्याने सामाजिककल्याणावर विशेष भर दिलेला आढळतो. कल्याणकारी राज्य म्हणजे सर्व नागरिकांच्या मूलभूत कल्याणाची जबाबदारीस्वीकारून त्यानुसार शासकीय धोरणे व कार्य करणारी राज्यसंस्था होय.

पहिल्या पिढीतील भारतीय भूगोलज्ञ जॉर्ज कुरियन, एस्. पी. चतर्जी, एस्. एम्. अली, सी. डी. देशपांडे तसेच व्ही. एस्.गणनाथन, व्ही. एल्. एस्. प्रकाश राव यांनी राज्यपुनर्रचना, देशाचा नियोजनबद्घ विकास आणि नैसर्गिक संसाधनांचा अधिककार्यक्षमतेने वापर करणे इ. बाबतींत नियोजन आयोगासारख्या संस्थांचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पारपाडली. त्यांचे मार्गदर्शन भूगोल–विषयांतर्गत होते; परंतु राष्ट्रहिताच्या दृष्टीने समकालीन प्रश्नांना अनुसरून भारतातसामाजिक भूगोल या विषयाबाबत विशेष संशोधन झाले नाही. अलीकडच्या काळात मात्र सामाजिक भूगोलशास्त्रविषयकअभ्यास होऊ लागला आहे.

सामाजिक भूगोल अभ्यासाच्या केंद्रस्थानी मानव आणि समाज असला, तरी त्याच्या स्वरूप व व्याप्तीचे अंतिम प्रारूप कोणते, याविषयी सामाजिक भूगोलज्ञांनी वेगवेगळे विचार मांडले आहेत. त्यामध्ये गिल्बर्ट, टेलर, जे. एम्. हाऊस्टन, डब्ल्यू. फिट्स्जेराल्ड व एल्सवर्थ हटिंग्टन इत्यादींनी सामाजिक भूगोलाची व्याप्ती अधिक स्पष्ट केली आहे. गिल्बर्ट व हटिंग्टन यांच्या मते सामाजिक भूगोल हा विषय अत्यंत व्यापक असून त्यामध्ये भौतिक आणि सामाजिक शास्त्रांच्या उपयुक्ततेचा मिलाफ झालेला आहे. या भूगोल शाखेत प्रामुख्याने मानवी समाज व पर्यावरण यांच्या परस्परसंबंधांच्या अभ्यासाचा अंतर्भाव होतो. मानवी समाजाचे अभिक्षेत्रीय वितरण, लोकसंख्येची वाढ, घनता,संरचना, मानवी वंश, मानवी वसाहतींचा उगम, विकास, प्रारूप व त्यांचे वितरण, स्थलांतर, मानव समूहातील शारीरिक व सांस्कृतिक भिन्नता, आर्थिक व्यवसायांतील विविधता इ. विषयांच्या अभ्यासाचा समावेश या शाखेत केला जातो. त्याशिवाय स्त्रिया, वृद्घ, गरीब, अल्पसंख्याक, मनोरुग्ण, गुन्हेगार, सामाजिक विषमता, सामाजिक विकृती, निवासाचे प्रश्न इ. समस्यांची कारणे, उपाययोजना आणि सामाजिक कल्याण यांचा विचार सामाजिक भूगोलज्ञ करीत असतात. त्याचप्रमाणे विविधप्रदेशांतील नैसर्गिक पर्यावरणाचा या सर्व घटकांवर व त्यांच्या अभिक्षेत्रीय वितरणांवर कसा परिणाम होतो, त्याचाही अभ्यास याशाखेत केला जातो. नैसर्गिक व सांस्कृतिक परिस्थितीचा एकत्रित अभ्यास ज्या ज्या विषयांत केला जातो, त्या सर्व विषयांशीसामाजिक भूगोलाचा संबंध येतो. उदा., इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र,पुरातत्त्वविद्या, समाज–भाषाशास्त्र इत्यादी. सामाजिक भूगोलाच्या लोकसंख्या,–भूगोल, वसाहत भूगोल–राजकीय, लष्करीव ऐतिहासिक भूगोल, पर्यटन, वैद्यक, वर्तणूक व गुन्हेविषयक भूगोल इ. उपशाखा मानल्या जातात. विकासित देशांतसामाजिक भूगोलज्ञांचा विशेष कल नागरी प्रश्नांवर असलेला आढळतो.

आधुनिक समाजात आढळणाऱ्या गुन्हेगारी, बेकारी, घटस्फोट इ. समस्यांचे स्वरूप व कारणे शास्त्रशुद्घ पद्घतीने निश्चित करून,त्यांवर परिणामकारक उपाययोजना करणे, हे या शाखेच्या अलीकडील अभ्यासात गृहीत धरले आहे. समाजात निरनिराळ्याजातिधर्मांचे, वंशांचे व संस्कृतींचे लोक एकत्र राहतात. त्यांच्या मनात परस्परांबद्दल कारणपरत्वे काही पूर्वग्र ह तयार झालेलेअसतात. या पूर्वग्र हांचे परिणाम त्यांच्या परस्पर संबंधांवर झालेले आढळतात. सामाजिक भूगोलाच्या संशोधनाने ते पूर्वगहकसे निराधार आहेत, हे स्पष्ट करता येते. या विषयाच्या अभ्यासाने वेगवेगळ्या जाती, धर्म, वंश व संस्कृतींच्या लोकांमध्येसामंजस्याची भावना निर्माण करणे शक्य होते. आधुनिक समाजरचना अतिशय गुंतागुंतीची बनली आहे. या समाजरचनेचे पुरेसेज्ञान व्यक्तीला झाले तरच ती व्यक्ती या समाजरचनेबरोबर परिणामकारकपणे जुळवून घेऊ शकते. सामाजिक नियोजनकरणारे सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यक्रर्ते, तंत्रज्ञ इत्यादींना सामाजिक भूगोलशास्त्रीय सिद्घांतांचे ज्ञान असणे आवश्यकअसते. त्या ज्ञानाच्या आधारानेच त्यांना सामाजिक नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्याचे मार्ग आणि पद्घती निश्चित करतायेतील.

अलीकडच्या काळात सामाजिक भूगोलज्ञ मानव व समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी वेगवेगळ्या अध्यापनपद्घतींचा अवलंबकरीत आहेत. उदा., प्रादेशिक, कार्यात्मक, तात्त्विक व एकात्मक दृष्टिकोन, सांख्यिकी, वैयक्तिक व तुलनात्मकअध्यापनपद्घती इत्यादी. शिवाय मानवाच्या आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी दारिद्र्य, उपासमार, गुन्हे, वर्णभेद, सामाजिकविषमता, नैसर्गिक आपत्ती इ. बाबींची जाणीवपूर्वक दखल घेऊन अभ्यास केला जात आहे. अशाप्रकारे एकविसाव्या शतकातयेऊ घातलेली विविध आव्हाने स्वीकारण्याच्या दिशेने सामाजिक भूगोलाच्या प्रगतीची वाटचाल चालू आहे.

भारत छोडो आंदोलन

भारत छोडो आंदोलन
8 ऑगस्ट रोजी गांधीजी च्या नेतृत्वाखाली सुरुवात....

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे संपादन करा
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे संपादन करा
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद
इतर कारणे
त्रिमंत्री योजना संपादन करा
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

माउंटबॅटन योजना संपादन करा
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी व महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे व म्हशी व राज्य व घाट बदल थोडी माहिती


भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

______________________________

🔺महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे 🔺

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प 

▪️ तुर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.
▪️बल्लारपूर : चंद्रपूर.
▪️ चोला : ठाणे.
▪️ परळी बैजनाथ : बीड.
▪️ पारस : अकोला.
▪️ एकलहरे : नाशिक.
▪️ फेकरी : जळगाव.

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

▪️ खोपोली : रायगड.
▪️ भिरा अवजल प्रवाह : रायगड.
▪️ कोयना : सातारा.
▪️ तिल्लारी : कोल्हापूर.
▪️ पेंच : नागपूर.
▪️ जायकवाडी . औरंगाबाद.

महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प

▪️ तारापुर : ठाणे.
▪️ जैतापुर : रत्नागिरी.
▪️ उमरेड : नागपूर.

महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प

▪️ जमसांडे : सिंधुदुर्ग.
▪️ चाळकेवाडी : सातारा.
▪️ ठोसेघर : सातारा.
▪️ वनकुसवडे : सातारा.
▪️ ब्रह्मनवेल : धुळे.
▪️ शाहजापूर : अहमदनगर.

________________________

🟢 म्हशी व राज्य 🟢

✔️मुऱ्हा:- हरियाणा

✔️सुरती:- गुजरात

✔️महेसना:- गुजरात

✔️भादवरी:-उत्तर प्रदेश

✔️निलिरवी:- पंजाब

✔️तराई:- उत्तर प्रदेश

✔️तोडा:- तामिळनाडू

________________________

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर
4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ
5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग
6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण
7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी
9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी
10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी
11) पार घाट - सातारा - रत्नागिरी
12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी
13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग
15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई
16) बोरघाट - पुणे - कुलाबा
17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल
18) कुसुर घाट - पुणे - पनवेल
19) वरंधा घाट - पुणे - महाड
20) रूपत्या घाट - पुणे - महाड
21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड
22) कसारा घाट - नाशिक - ठाणे
23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई
24) थळ घाट - नाशिक - ठाणे
25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 
26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
१८५७ चा राष्ट्रीय उठाव - भारत

१८५७चे स्वातंत्र्ययुद्ध
उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा
उठावाची ठिकाणे दर्शवणारा १९१२ सालीचा आराखडा
दिनांक१० मे १८५७ - २० जून १८५८
स्थानउ.भारतीय मैदानी प्रदेश, बंगाल
परिणतीईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात
शिपायांचा उठाव दडपला गेला
मुघल साम्राज्य व मराठा साम्राज्यांचा शेवट
ब्रिटीश राणीचा अंमल सुरू
युद्धमान पक्ष
ईस्ट इंडिया कंपनीचे बंडखोर शिपाई
मुघल
ग्वाल्हेर संस्थान
झांंशी संस्थान
मराठा साम्राज्यईस्ट इंडिया कंपनी
ब्रिटिश साम्राज्य
भारतातील युरोपीय नागरिक
२१ भारतीय संस्थाने
नेपाळचे साम्राज्य
सेनापती
बहादूरशहा दुसरा
नानासाहेब पेशवा 2
राणी लक्ष्मीबाई
तात्या टोपे
बख्त खान
बेगम हजरत महल
कुंवरसिंघइंग्रजी सेनाधिकारी

१८५७ चा उठाव  आणि महाराष्ट्र

तात्या टोपे यांची सेना
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.

१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरू झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.

१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.




उठावाची कारणे ....

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक) संपादन करा
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

भारताचा स्वातंत्र्यलढा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

भारताचा स्वातंत्र्यलढा.....

1857 ची लढाई

भारताचा स्वातंत्र्यलढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंग्डमचे आधिपत्य घालवून स्वतंत्र, स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात आपला वसाहतवाद रुजविला.इ.स. १७५७ ते इ.स.१८५७ असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इ.स, १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इ.स.१९४७ सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधातही भारतीय क्रांतिकारी लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अंतिमतः; भारताला स्वातंत्र्य मिळाले.



ऐतिहासिक पार्श्वभूमी ....

पोर्तुगीज खलाशी वास्को- द- गामा हा इ.स.१४९८ साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला.[२] व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इ.स. १६१३ साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले.त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता १८ व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला.[३] इ.स.१८५७ च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व भारतात प्रस्थापित केले होते.[४] त्या जोरावर १८ व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले.

स्वतंत्र भारत चळवळ आणि पंजाबमधील असंतोष

स्वतंत्र भारत चळवळ...

१८१८ मध्ये मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणल्यावर ब्रिटीशांची भारताच्या मोठ्या भागावर सत्ता स्थापन झाली.

_____________________________

पंजाबमधील असंतोष ....

मुख्य लेख: ऑपरेशन ब्लू स्टार
सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. ३ जून १९८४ रोजी सकाळी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेला प्रारंभ झाला. ६ जून राेजी कारवाई संपली. या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली. भिंद्रानवाले याच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली. त्यानंतर १९८६ मध्ये सुवर्णमंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली. त्याला 'ऑपरेशन ब्लॅक थंडर ' असे म्हणतात. येथुन पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली.

युरोपीयन वसाहत युग

युरोपीयन वसाहत युग .....

ऑटोमन साम्राज्याने भारताशी व्यापाराचे मार्ग बंद केल्यानंतर अनेक धाडशी दर्यावर्दींनी भारताला मार्ग शोधण्याचे प्रयत्न सूरु केले. या प्रयत्नात अमेरिका खंडाचा शोध लागला, वास्को दा गामाने दक्षिण अफ्रिकेहून वळसा घालून भारताला येण्याचा मार्ग शोधला व युरोपीयन साम्राज्य वाद सूरु झाला असे मानतात. पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताशी व्यापार करण्यात रस दाखवला. सुरुवातीला १६ व्या शतकात या युरोपीयन देशांनी मुघल व इतर स्थानिक राज्यकर्त्यांकडून व्यापारी सवलती मिळवल्या. नंतर आपल्या व्यापारी मालाचे संरक्षण व वाहतुकीसाठी व्यवस्था म्हणून यांनी भारताच्या किनाऱ्या वर अनेक ठिकाणी वखारी व लहान किल्ले उभारले. उदा. पोर्तुगीजांनी गोवा दीव दमण येथे तर इंग्रजांनी मुंबई व सुरत येथे आपली केंद्रे स्थापिली होती. भा‍रतीय राज्य कर्त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रे व युद्धतंत्रे देण्यात इंग्रज व फ्रेंचांमध्ये चढाओढ चालली होती. या प्रयत्नात इंग्रज फ्रेंच यांच्यात स्पर्धा तीर्व होती. संरक्षणाच्या नावाखाली छोट्या छोट्या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. १७५७ मध्ये प्लासी येथे झालेल्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला त्यामुळे प्रथमच युरोपीयांना मोठ्या भागावर राज्य करायला मिळाले व त्यानंतर विस्तार धोरण चालू ठेवले. पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांचे सत्ताकेंद्र विभागले याचा चांगलाहच फायदा इंग्रजांनी घेतला. प्रमुख संस्थानिकांच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करून त्यांनी वर्चस्व मिळवायला चालू केले. या राज्यांना एकमेकांविरुद्ध लढण्यास तैनाती फौजेची आमिषे दिली अश्या रितीने फोडा व राज्य करा या नीतीचा वापर केला. मराठे व म्हैसूर चा टिपू सुलतान यांच्याशी युद्धे करून ती राज्ये संपवली व १८१८ पर्यंत भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले. इंग्रजांची आधुनिक युद्धतंत्र व शस्त्रात्रे यांचा सामना करण्यात भारतीयांना सपशेल अपयश आले.

मराठा साम्राज्य

मराठा साम्राज्य .....
मुख्य पान: मराठा साम्राज्य

१७ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर इस्लामी राज्यकर्त्यांचे वर्चस्व झाले होते. अनेक राजपूत हिंदू संस्थाने अस्तित्वात असली तरी मुघलराज्यकर्त्यांना अंकित होती. महाराष्ट्रातही मराठा सरदार हे निजाम व अदिलशाही पदरी काम करत. या परिस्थितीत १६४७ मध्ये महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी परकिय राज्यकर्त्यांचे वर्चस्व झुगारुन देउन पुण्या जवळील किल्यांवर स्वतंत्र राज्याची स्थापना केली जे पुढे मराठा साम्राज्य म्हणून विकसित झाले. मराठा राज्याची सुरुवात मोघल व अदिलशाहीशी सघर्षरत राहिला. छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रभावी नेतृत्वाखाली मराठी सेनेने अदिलशाहीचे वर्चस्व नमवले व मोघलांशी उघड-उघड वैर पत्करले. मोघलांशी झालेल्या पहिल्या मोठ्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सेनापती जयसिंग यांच्याबरोबर तह केला व आग्रा येथे औरंगजेब शी बैठकीचे निमंत्रण मान्य केले. औरंगजेबशी झालेल्या भेटीत औरंगजेबने शिवाजींचा अपमान केला व नजरकैदेत ठेवले. या कैदेतून छत्रपती शिवाजींनी सहिसलामत सुटका करून घेतली जी औरंगजेबच्या जिव्हारी लागली. १६७४ मध्ये शिवाजींनी अधीकृतरित्या राज्याभिषेक करवून घेउन मराठा साम्राज्याची स्थापना केली. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर काही अस्थिर काळानंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सुत्रे घेतली. परंतु औरंगजेबने मराठा राज्य संपवायचा निर्णय घेतला व सर्वशक्तीनीशी दक्षिणेत आला. १६८९ मध्ये  संभाजी महाराजांना अटक करण्यात औरंगजेबला यश आले व अतिशय मारहानी करून संभाजी महाराजांची  हत्या केली. यानंतर राजाराम महाराजांनी सुत्रे घेतली व दक्षिणेत जिंजी येथून औरंगजेब विरुद्ध लढा चालू ठेवला. १७०७ पर्यंत मराठ्यांनी अतिशय चिकाटीने हा लढा चालू ठेवत मुघल साम्राज्याचा पायाच खिळखिळा केला. १७०७ मध्ये औरंगजेबच्या म्रुत्यूनंतर हा लढा संपला पण तोपर्यंत मराठ्यांनी विस्तार सुरू केला होता व मुघलांची उत्तर भारतातून माघार सुरू झाली. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार सूरु झाला भोसले घराणे अधीकृतरित्या राज्यकर्ते असले तरी खरी सुत्रे पेशव्यांच्या कडे आली. पहिला बाजीराव, शिंदे व होळकरांनी मिळून भारताचा मोठा भूभाग मराठ्यांच्या अख्यात्यारित आणला. १७६१ मध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत पेशव्यांचा दारुण पराभव झाला व साम्राज्याचे पतन चालू झाले. यामुळे इंग्रजांचे चांगलेच फावले व त्यांनी विस्तार चालू केला. १७७७ ते १८१८ पर्यंत इंग्रजांशी तीन युद्धे झाली व शेवटी १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावचा पराभव झाल्यानंतर मराठा साम्राज्याचा अंत झाला.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...