१२ एप्रिल २०२२

आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास


आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास

आर्थिक वृद्धी (Economic Growth) :

आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तु व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होणे होय. म्हणजेच, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जणाच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हटले जाते.

अर्थात राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले म्हणून त्यास आर्थिक वृद्धी म्हणणे अयोग्य ठरते.

आर्थिक वृद्धीचे मोजमाप साधारणत: जी.डी.पी.च्या संदर्भात केले जाते.

अशा रीतीने, देशाचा जी.डी.पी. वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असे म्हणतात, तर एका वर्षाचा जी.डी.पी. मागील वर्षाच्या जी.डी.पी. च्या तुलनेत जेवढ्या टक्क्यांनी वाढलेल्या असतो त्यास आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात.

वृद्धी दर धनात्मक किंवा ऋणात्मक असे शकतो.

वस्तू व सेवांचे भौतिक उत्पादन वाढणे, हे खरे आर्थिक वृद्धीचे धोतक आहे.

वास्तु व सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने वाढलेले जी.डी.पी. आर्थिक वृद्धी दर्शवित नाही. त्यामुळे खरी आर्थिक वृद्धी नॉमिनल जी.डी.पी.तील वाढीच्या तुलनेत वास्तव जी.डी.पी. (real GDP) वाढीने चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते.)

आर्थिक विकास (Economic Development) :

‘आर्थिक विकास’ ही ‘आर्थिक वृद्धी’ पेक्षा एक व्यापक संकल्पना आहे. ती एक गुणात्मक संकल्पना आहे.
‘विकास’ या संकल्पनेत केवळ आर्थिक वृद्धीच नव्हे, तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश होतो. (पुढे केवळ आर्थिक विकासाच्या संकल्पनेची चर्चा केलेली आहे.)
‘आर्थिक विकासा’ मध्ये आर्थिक वृद्धीबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल, यांचा समावेश होतो.
दुसर्‍या भाषेत, आर्थिक वृद्धी होत असतांना दर डोई वास्तव उत्पन्न, दारिद्रय, बेरोजगारी, देशातील उपन्नाचे वितरण इत्यादींमध्ये काय बदल होत आहे, यातून आर्थिक विकास सुचीत होत असेल.
म्हणजेच, आर्थिक वृढीमुळे निर्माण होणारे फायदे मुठभर भांडवलदारांपूरती मर्यादित न राहता, त्यामुळे सर्वासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील, त्यांच्या हातात पर्याप्त क्रमशक्ती निर्माण होत असेल, दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असेल व देशातील आर्थिक व सांपक्तिक विषमता कमी होत असेल, तरच आर्थिक विकास होत आहे, असे म्हटले जाईल.
अशा रीतीने, आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व गटांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास होय.
थोडक्यात, आर्थिक विकास म्हणजे ‘आर्थिक वृद्धी+बदल’ असे म्हणता येईल.
येथे ‘बदल’ ही संकल्पना अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शविते. त्यामध्ये दारिद्रय कमी होणे, रोजगार निर्मिती, विषमता कमी होणे, राहाणीमानाचा दर्जा उंचावणे, कार्यक्षमता वाढणे, तंत्रज्ञान विकास, औधोगिक व सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास, व्यक्तींच्या दृष्टीकोनांमध्ये सकारात्मक बदल, यांसारख्या सकारात्मक बदलांचा समावेश होतो.

अर्थ: जीवनाच्या मूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.
 

दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहतो.

दारिद्रयाची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्यामध्ये चांगल्या जीवन स्तराच्या ऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर दारिद्राची कल्पना करण्यात येते.

भारतातही दारिद्रयाच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो.

सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty) :

देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :

दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.
राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

_____________________________

दारिद्रय रेषा :

गरिबीची प्रमाण मोजण्यासाठी दारिद्रय रेषा (Pov-erty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो.
1973-74 पासून नियोजन आयोग दारिद्रय रेषा ठरविण्यासाठी पुढील दोन निकषांचा वापर करीत आहे.
1दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग (Per Capita per day calorie intake) –

या निकषानुसार ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक उपभोग 2400 कॅलरी, तर शहरी भागात तो किमान 2100 कॅलरी एवढा ठरविण्यात आला आहे.
अर्थात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी मूल्याचे रूपांतर पैशात (equivalent मनी value) केले जाते.
दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च (Per Capita Per Month Consumption Expenditure) –

या निकषानुसार दारिद्रय रेषा 2004-2005 मध्ये (आधारभूत वर्ष: 1973-74) ग्रामीण भागात दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च रु. 356.30 तर शहरी भागात तो रु. 538.60 एवढी ठरविण्यात आली आहे.
यावरून जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा कमी खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेखालील कुटुंबे’ (Below Poverty Line: BPL) तर जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा जास्त खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेवरील कुटुंबे’ (Above Poverty Line:APL) असे संबोधले जाते.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे


◆ मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
◆ उपमुख्यमंत्री - अजित पवार
◆ गृहमंत्री - दिलीप वळसे पाटील
◆ गृहराज्यमंत्री - सतेज पाटील
◆ वित्तमंत्री - अजित पवार
◆ महसूलमंत्री - बाळासाहेब थोरात
◆ पर्यटनमंत्री - आदित्य ठाकरे
◆ उद्योगमंत्री - सुभाष देसाई
◆ शिक्षणमंत्री - वर्षा गायकवाड
◆ आरोग्यमंत्री - राजेश टोपे
◆ जलसंपदामंत्री - जयंत पाटील
◆ ऊर्जामंत्री - नितीन राऊत
◆ कृषिमंत्री - दादाजी भुसे
◆ परिवहनमंत्री - अनिल परब
◆ सहकारमंत्री - बाळासाहेब पाटील
◆ क्रीडामंत्री - सुनिल केदार
◆ सामाजिक न्यायमंत्री - धनंजय मुंडे

━━━━━━━━━━━━━━━━━

❇️  महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची पदे :-

◆ विधानसभा सभापती - सध्या रिक्त आहे
◆ विधानसभा उपसभापती - नरहरी झिरवळ
◆ विधानसभा विरोधी पक्षनेता - देवेंद्र फडणवीस
◆ विधानपरिषद सभापती - रामराजे निंबाळकर
◆ विधानपरिषद उपसभापती - नीलम गोऱ्हे
◆ विधानपरिषद विरोधी पक्षनेता - प्रवीण दरेकर

━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️  महाराष्ट्रातील महत्त्वाचे उच्चपदस्थ व्यक्ती :-

◆ मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
◆ राज्यपाल - भगतसिंह कोष्यारी
◆ मुख्य सरन्यायाधीश - दिपांकर दत्ता
◆ निवणुक आयुक्त - यू.पी.एस.मदान
◆ लोकायुक्त - व्ही. एम. कानडे
◆ एमपीएससी अध्यक्ष -  के.आर. निंबाळकर
◆ महाधिवक्ता - आशुतोष कुंभकोणी
◆ राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - के.के. तातेड
◆ राज्य महिला आयोग अध्यक्ष - रुपाली चाकणकर
◆ मुख्य सचिव - देवाशिष चक्रवर्ती
◆ गृह सचिव - अमिताभ राजन
◆ पोलीस महासंचालक - रजनीश सेठ

महत्वपूर्ण प्रश्न व उत्तरे


प्र. 1 "इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन" कोठे आहे?
उत्तर श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)

प्रश्न 2 दरवर्षी "जागतिक पर्यावरण दिन" कधी साजरा केला जातो?
उत्तर 5 जून रोजी

Q. 3 PSLV चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन

Q. 4 जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे?
उत्तर रेडवुड

Q.5 कोणत्या चित्रपटाला "सर्वोत्कृष्ट चित्रपट" मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला?
उत्तर परजीवी

Q.6 "पहिल्या पंचवार्षिक योजनेची" मुदत काय होती?
उत्तर 1951 ते 1956

Q.7 भारतात नोटाबंदी कधी झाली?
उत्तर 2016

Q.8 कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते?
उत्तर व्हिटॅमिन के

प्र.९ काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात १९२९ मध्ये काय घडले?
उत्तर पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली

प्र.१० “द व्हाईट टायगर” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर अरविंद अडिगा

प्र.११ “जागतिक आरोग्य संघटना” कुठे आहे?
उत्तर जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

Q.12 BRAC चे जुने नाव काय आहे?
उत्तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

प्र. 13 कोणत्या IT कंपनीने संगणकाचे उत्पादन बंद केले आहे?
उत्तर IBM

Q.14 कोणत्या घटनेमुळे वाळवंटातील वाळू पाण्यासारखी दिसते?
उत्तर मारिचिका

Q.15 खालीलपैकी कोणते स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट नाही?
उत्तर कोणार्क मंदिर, आग्रा किल्ला, हवा महाल, एलिफंटा लेणी

प्रश्न 16. कोणत्या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण अनिवार्य आहे?
उत्तर 6 ते 14 वर्षे

Q. 17 डिसेंबर 2020 पर्यंत T20 क्रिकेटमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर होता?
उत्तर इंग्लंड

Q.18 “FORTRAN” चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर सूत्र भाषांतर

प्र. 19 काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात प्रथमच "राष्ट्रगीत" गायले गेले?
उत्तर कोलकाता

प्र. २० “F7 की” MS Word मध्ये वापरली जाते –
उत्तर शुद्धलेखन आणि व्याकरणाच्या चुका तपासण्यासाठी

प्र.२२ "कॉफी आणि चहा" ही कोणत्या प्रकारची शेती आहे?
उत्तर नगदी पिक

Q.23 "एडीस डास" चावल्यामुळे कोणता रोग होतो?
उत्तर डेंग्यू

Q.24 कोणती संस्था भारतात "विमा" नियंत्रित करते?
उत्तर IRDA (IRDA)

Q.25 "भटियाली लोकगीत" कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर पश्चिम बंगाल

भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे


🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

15 वा वित्त आयोग


🌸लक्ष्यात ठेवा
📚📚📚📚📚📚📚📚📚📚

अध्यक्ष:एन के सिंग, =  सचिव: अरविंद मेहता
स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा

» करातील वाट्यानुसार राज्ये
१. उत्तरप्रदेश - 17.9%
२. बिहार 10%
३. मध्यप्रदेश 7.9
४. पश्चिम बंगाल 7.5
५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )

» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388

» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले
१. लोकसंख्या : 15%
२. क्षेत्रफळ     : 15%
३. वने आणि पर्यावरण : 10%
४. उत्पन्न तफावत : 45 %
५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%
६. कर प्रयत्न : 2.5 %

उद्देश पत्रिका

1. संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्यांचा उद्देश

2. उद्देशाला संविधानमध्ये किती स्थान देण्यात आलेले आहे जर देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरूस्ती करून त्याची पूर्तता करणे

3. घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो.

उद्देश पत्रिका : “आम्ही भारतीय जनता, भारताच सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना
न्याय : सामाजिक, आर्थिक आणि राजकीय
स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे
समता : दर्जा आणि संधी याबाबतीत
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर, 1949 रोजी विचारपूर्वक ठरवीत आहोत.” “व ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य स्वीकृत करीत आहोत.”

व्यापारी बँकांची कार्य

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.

बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.

1. प्राथमिक कार्य – ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

A. ठेवी स्विकारणे-

1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –

१. ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.

२.खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.

३.खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो 

2. मुदत ठेवी –

१.या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.

२.मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.

३.मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.

3. समिश्र ठेवी/बचाव ठेवी –

१.मागील देय व मुदत ठेवींच्या अटींचे एकत्रीकरण
२.यात केव्हाही व कितीही पैसे ठेवता येतात मात्र पैसे काढण्यावर बंधन असतात.बचत बँका अल्पावधीसाठी गुंतऊ शकतात, म्हणून बँका त्यावर अल्पदराने व्याज    ठेवतात.

4. आवर्ती ठेवी –

१.दरमहा ठराविक रक्कम विशिष्ट मुदतीपर्यंत भरल्यास मुदतीअखेर व्याजासह ठेवी परत मिळते.
२.ठेवी-रक्कम दर महिन्याला वाढत जाते.
३.ठेवीवर बचत खात्यांपेक्षा जास्त मात्र मुदत ठेवीपेक्षा कमी दराने व्याज मिळते.

B. कर्ज व अग्रिमे देणे –

बँका जमा केलेल्या ठेवींमधून निरनिराळ्या पद्धतीने कर्ज व अग्रिमे देतात व स्वतःसाठी नफा कमवितात.
ठराविक मुदतीसाठी कर्ज दिले तर त्याला कर्ज व अग्रिमे म्हणतात.

१. रोख पत रोख कर्ज
२.अधिकर्ष सवलत
३.तारणमूल्याधारित कर्ज
४.हुंड्याची वटवणी 

3. पतचलण निर्माण करणे

2. दुय्यम/अनुषंगिक कार्य –

बँकांवर असलेल्या दुय्यम कार्याचे वर्गीकरण प्रतिंनिधीक कार्य व सर्वसाधारण सेवा कार्य असे केले जाते.

A. प्रतिंनिधीक कार्य

B. सर्वसाधारण सेवा कार्य

महाराष्ट्रातील पंचायतराज


👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
  - ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
  -  राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
   -  विस्तार अधिकारी

◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
  - ग्रामविकास खाते

  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
  - जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
  -  जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
  -  जिल्हा परिषद अध्यक्ष

◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
  -  वसंतराव नाईक

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते


✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

वहाबी चळवळ / वलीउल्लाह चळवळ


▶️ स्थापना -18व्या शतकात अरेबियात
▶️ संस्थापक - अब्दुल वहाब
▶️ उद्देश - ही एक इस्लामिक शुद्धीकरण चळवळ
इस्लामची खरी व मूळ शिकवण पुनरुज्जीवित करने
▶️ भारतात - भारतातील वहाबी चळवळीचे प्रवर्तक रायबरेलीचे सय्यद अहमद 1820 मध्ये पटना (बिहार) येथे स्थापन

➡️ सय्यद अहमद यांच्यावर अरबचे अब्दुल वहाब आणि संत शाह वलीउल्लाह यांच्या शिकवणीचा प्रभाव होता

▶️ मुख्य मुद्दे - संघटनेचे मुख्य केंद्र - सीताना या ठिकाणी इनायत अलीच्या नेतृत्वाखाली लष्करी सैन्य तयार केले

➡️ मुख्य ध्येय - मूळ इस्लामची पुनर्स्थापना आणि काफिराविरुद्ध जिहाद पुकारने त्यांचा नायनाट करणे

➡️ सुरुवातीला हे पंजाबच्या शीख राज्याविरुद्ध जिहाद सुरू केले

➡️ नंतर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पंजाबचा समावेश झाल्यानंतर, त्याचे एकमेव लक्ष्य भारतातील इंग्रजी वर्चस्व बनले

➡️ ही चळवळ 1820 पासून सक्रिय, परंतु 1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर,त्याचे रूपांतर सशस्त्र प्रतिकार,ब्रिटिशांविरुद्धच्या जिहादमध्ये झाले

➡️ त्यानंतर ब्रिटिशांनी वहाबींना देशद्रोही आणि बंडखोर म्हणून संबोधले आणि वहाबींविरुद्ध व्यापक लष्करी कारवाया केल्या

महत्वाचे दिनांक


23 मे 1498  ➖ वास्को द गामा भारतात प्रवेश.
31 डिसेंबर 1600 ➖ ईस्ट इंडिया कंपनी स्थापना.
19 फेब्रुवारी 1630 ➖ छ. शिवाजी महाराजांचा जन्म.
14 मे 1657 ➖ छ. संभाजी महाराजांचा जन्म.
05 एप्रिल 1663 ➖ शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
10 नोव्हेंबर 1659 ➖ अफझलखानचा वध.
19 ऑगस्ट 1666 ➖ राजेंची आग्रा कैदेतून सुटका.
06 जून 1674 ➖ छत्रपतींचा शिवराज्यभिषेक.
03 एप्रिल 1680 ➖ छ. शिवरायांचे निधन.
11 मार्च 1689 ➖ छ. संभाजी राजेंचे निधन.
23 जून 1757 ➖ प्लासीची लढाई.
22 ऑक्टोंबर 1764 ➖ बक्सार चे युद्ध.
19 डिसेंबर 1773 ➖ बोस्टन टी पार्टी.
03 मार्च 1776 ➖ पुरंदरचा तह.
04 जुलै 1776 ➖ अमेरिकेला स्वातंत्र्य.
17 मे 1782 ➖ साल्बाईचा तह.
31 डिसेंबर 1802 ➖ वसईचा तह.
11 एप्रिल 1827 ➖ महात्मा फुलेंचा जन्म.
28 ऑगस्ट 1828 ➖ ब्राम्हो समाजाची स्थापना.
26 ऑगस्ट 1852 ➖ बॉम्बे असोसिएशनची स्थापना.
16 एप्रिल 1853 ➖ भारतात रेल्वेची सुरुवात.
23 जुलै 1856 ➖ लो. टिळकांचा जन्म.
10 मे 1857 ➖ 1857 चा उठावाला सुरवात.
31 मे 1857 ➖ 1857 च्या उठावाची नियोजित तारीख.
01 नोव्हेंबर 1858 ➖ अलाहाबाद राणीचा जाहीरनामा .
12 जानेवारी 1863 ➖ स्वामी विवेकानंदांचा जन्म.
31 मार्च 1867 ➖ प्रार्थना समाजाची स्थापना.
2 ऑक्टोंबर 1869 ➖ महात्मा गांधीजींचा जन्म.
24 सप्टेंबर 1873 ➖ सत्यशोधक समाजाची स्थापना.
26 जून 1874 ➖ राजश्री शाहू महाराजांचा जन्म.
10 एप्रिल 1875 ➖ आर्य समाजाची स्थापना.
17 नोव्हेंबर 1875 ➖ थिओसोफिकल सोसायटी स्थापन.
18 मे 1882 ➖ स्था. स्वराज्य कायदा पास.
25 डिसेंबर 1885 ➖ राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.
28 नोव्हेंबर 1890 ➖ महात्मा फुले यांचे निधन.
14 एप्रिल 1891 ➖ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म.
11 सप्टेंबर 1893 ➖ शिकागो धर्मपरिषदेत स्वा. विवेकानंद.
10 मे 1897 ➖ रामकृष्ण मिशनची स्थापना.
22 जून 1897 ➖ चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला.
26 जुलै 1902 ➖ शाहूचे मागास.  50% आरक्षण.
16 ऑक्टोंबर 1905 ➖ बंगालची फाळणी.
30 डिसेंबर 1906 ➖ मुस्लिम लीगची स्थापना.
01 जुलै 1909 ➖ कर्झन वायलीची हत्या.
21 डिसेंबर 1909 ➖ ब्रिटिश अधिकारी जॅक्सन ची हत्या.
12 डिसेंबर 1911 ➖ बंगालची फाळणी रद्द.
28 एप्रिल 1916 ➖ महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.
13 एप्रिल 1919 ➖ जालियनवाला बाग हत्याकांड.
1 ऑगस्ट 1920 ➖ लो. टिळकांचा मृत्यू.
5 फेब्रुवारी 1922 ➖ चौराचौरी येथील हत्याकांड.
20 जुलै 1924 ➖ बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.
9 ऑगस्ट 1925 ➖ काकोरी कट.
20 मार्च 1927 ➖ चवदार तळ्याचा सत्याग्रह.
25 डिसेंबर 1927 ➖ मनुस्मृती ग्रंथाचे दहन.
03 फेब्रुवारी 1928 ➖ सायमन कमिशन भारतात आले.
17 फेब्रुवारी 1928 ➖ सॉंडर्स ची हत्या(भगतसिंग-राजगुरू)
8 एप्रिल 1929 ➖ भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.
02 मार्च 1930 ➖ काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
12 मार्च 1930 ➖ महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.
12 डिसेंबर 1930 ➖ ट्रकसमोर बाबू गेनूचे बलिदान.
23 मार्च 1931 ➖ भगतसिंग,  राजगुरू, सुखदेव फाशी.
16 ऑगस्ट 1932 ➖ रॅम्से मॅकडोनाल्ड जातीय निवाडा.
24 सप्टेंबर 1932 ➖ गांधी व आंबेडकर  पुणे करार.
23 ऑक्टोंबर 1935 ➖ आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा.
13 मार्च 1940 ➖ ओडवायरची हत्या ( उद्धम सिंग ).
23 मार्च 1942 ➖ क्रिप्स कमिशन भारतात आले.
18 जुलै 1942 ➖ शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
24 ऑक्टोंबर 1945 ➖ संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
16 मे 1946 ➖ त्रिमंत्री योजना जाहीर.
9 डिसेंबर 1946 ➖ संविधान सभेची पहिली बैठक.
11 डिसेंबर 1946 ➖ राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष
18 जुलै 1947 ➖ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित.
15 ऑगस्ट 1947 ➖ भारताला स्वातंत्र्य मिळाले.
29 ऑगस्ट 1947 ➖ मसुदा अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब.
23 ऑक्टोंबर 1947 ➖ जम्मू काश्मीर भारतात विलीन.
20 फेब्रुवारी 1948 ➖ जुनागड संस्थान भारतात विलीन.
17 सप्टेंबर 1948 ➖ हैदराबाद संस्थान भारतात विलीन.
10 डिसेंबर 1948 ➖ मानवी हक्काचा जाहीरनामा.
26 नोव्हेंबर 1949 ➖ भारतीय राज्यघटना स्वीकृत.
26 जानेवारी 1950 ➖  राज्यघटनेची अंमलबजावणी.
28 सप्टेंबर 1953 ➖ नागपूर करार.
14 ऑक्टोंबर 1956 ➖ डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्मांतरण.
1 नोव्हेंबर 1956 ➖ द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना.
06 डिसेंबर 1956 ➖ बाबासाहेबांचा महापरीनिर्वान दिवस.
1 मे 1960 ➖ महाराष्ट्र राज्याची स्थापना.
19 डिसेंबर 1961 ➖ गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त.
1 मे 1962 ➖ महाराष्ट्रात पंचायतराज सुरुवात.

महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....

🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢  52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
⛩  भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾  तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂  ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁  कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ
🏭  साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇  द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक
🤼‍♂  कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर
🍊  संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर
🍌  केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌  सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔  शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖  संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड
👳  समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘  गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे
🎋  ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾  तीळाचा जिल्हा ➖ धुळे
🥐  हळदीचा जिल्हा ➖ सांगली
🥛  दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
📚  शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳  आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴  गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟  विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...