१२ एप्रिल २०२२

सोनम वांगचुक आणि निजाम राजवटीची स्थापना

🎯 History By Sachin Gulig:
◆◆ सोनम वांगचुक ◆◆

● ‘थ्री इडियट्स’ या राजकुमार हिराणीकृत चित्रपटातील फुनसुख वांगडूच्या प्रेमात प्रत्येक प्रेक्षक पडला.

● ही चाकोरीबाहेरची, जगावेगळे प्रयोग करणारी व्यक्तिरेखा साकारली होती आमिर खानने; पण खरोखरच असा माणूस आपल्यात आहे – त्यांचे नाव सोनम वांगचुक.

●  त्यांना नुकताच मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘वास्तवातले फुनसुख वांगडू’ ही तुलना खरे तर वांगचुक नम्रपणे नाकारतात.

● शिक्षणव्यवस्थेत आंतरबाह्य़ बदलाची एक वेगळी कल्पना सोनम वांगचुक यांनी मनीमानसी बाळगली.

● त्यांचा जन्म जम्मू-काश्मीरमधील लेह जिल्ह्य़ातील अलचीमधील एका गावचा. त्यांचे वडील सोनम वांगयाल हे राजकारणी.

● नंतर राज्य सरकारमध्ये मंत्रीही झाले. सोनम यांच्या खेडेगावात शाळा नसल्याने आईच त्यांची शिक्षक.

● वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत ते मातृभाषेतून शिकले.

● नंतर श्रीनगरला गेल्यानंतर त्यांना भाषेच्या अडचणी जाणवू लागल्या. त्यामुळे शिक्षणही भरकटू लागले हे पाहून ते दिल्लीला आले, तेथे त्यांनी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला.

● लडाखच्या इतर मुलांवर परकीय भाषा लादली जात असताना भलत्याच भाषेतून शिकण्याच्या शिक्षेतून वांगचुक मुक्त झाले.
● १९८७ मध्ये त्यांनी श्रीनगरमधील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये बी. टेक्. पदवी घेतली.

● नंतर दोन वर्षे फ्रान्समध्ये जाऊन मातीच्या बांधकामांचे धडे क्राटेरे स्कूल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेतून घेतले.

● खरा प्रश्न असतो शिक्षण संपल्यानंतरचा. वांगचुक यांनी त्यांचे भाऊ व इतर पाच जणांसमवेत १९८८ मध्ये ‘एज्युकेशनल अ‍ॅण्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ ही संस्था सुरू केली.

● विद्यापीठातील शिक्षण संपल्यानंतर विद्यार्थी खेडय़ातील मुलांना शिकवायला येऊ लागले.

● एरवी ९५ टक्के लडाखी मुले परीक्षांमध्ये नापास होत असत, ती आता उत्तीर्ण होऊ लागली.

● १९९४ पासून वांगचुक यांनी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा शैक्षणिक कार्यक्रम राबवला.

● सौरशक्तीवर चालणाऱ्या शाळा वांगचुक यांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने तयार केल्या.
● उणे तीस अंश तापमानात लडाख, नेपाळ व सिक्किममध्ये त्यांनी सुरू केलेल्या शाळा उबदार राहू लागल्या.

● २००५ मध्ये वांगचुक यांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय प्राथमिक शिक्षण मंडळावर निवड केली.

●  वांगचुक यांनी ‘आइस स्तुपा’ नावाची कृत्रिम हिमनदीही तयार केली आहे.

●  त्यात हिवाळ्यात पाण्याचे प्रवाह बर्फाच्या स्वरूपात गोठतात व उन्हाळ्यात वितळतात, त्यातून शेतीला पाणी मिळते.

● लडाखमध्ये त्यांनी २०१६ मध्ये ‘फार्मस्टे लडाख’ हा कार्यक्रम सुरू केला.

त्यात पर्यटक लडाखमधील स्थानिक कुटुंबांबरोबर जीवन शिक्षण घेत राहतात.

● त्यांना २०१६ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी प्रतिष्ठेचा ‘रोलेक्स पुरस्कार’ मिळाला होता.

_______________________

1. निजाम राजवटीची स्थापना

1. मीर कमरुद्दीन उर्फ निझाम उल मुल्क याची फार्रुख्सियारच्या कारकिर्दीत दक्षिणेत नेमणूक झाली होती. काही काळ दिल्लीच्या बादशाहचा वजीर म्हणून कार्य केल्यानंतर १७२४ मध्ये दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. १७४८ पर्यंत तो हैद्राबाद संस्थांनचा स्वतंत्र शासक बनला.

2. दिल्लीच्या राजकारणात सय्यद बंधूचे वर्चस्व निर्माण झाले. याच काळात दक्षिणेचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीनची नियुक्ती करण्यात आली. दक्षिणेत आल्यावर मीर कमरुद्दीनने मराठ्यांच्या अंतर्गत दुफळीचा फायदा घेऊन सर्जेराव घाटगे, रंभाजी निंबाळकर, चंद्रसेन जाधव यांना शाहूविरोधी चिथावणी दिली.

3. १७१५ च्या सुमारास मोगल सम्राट फार्रुखसियार याने मीर कमरुद्दीनची बदली मोरादाबादला केली. त्याच्या जागेवर सय्यद हुसैन अलीस दक्षिणेची सुभेदारी दिली गेली. हुसैन अलीने दक्षिणेत आल्याबरोबर १७१८ मध्ये शाहुबरोबर तह केला. या तहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मोगलाकडील सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळाले. तेव्हा दक्षिण प्रांतात खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बिदर व हैद्राबाद असे सहा सुभे होते.

4. मराठा सैन्याच्या मदतीने हुसैन अलीने दिल्लीची सत्ता ताब्यात घेतली. १७२० मध्ये मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर निजाम उल मुल्कची बदली दिल्ली व अवध येथे करण्यात आली. पण त्याला तेथे जाण्यात रस नव्हता. बंडाची चिन्हे दिसू लागली म्हणून बादशाहने सुभेदार मुबारिजखान याला निजामाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले.

5. निजाम व मोगल सरदार मूबारीजखान यांच्यात १ ऑक्टोबर १७२४ रोजी साखरखेर्डा येथे लढाई झाली. या लढाईत निजामाचा विजय झाला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली.

6. पहिल्या निजामाची कारकीर्द १७२४-१७४८ अशी २४ वर्षांची होती. त्यानंतर निजामाच्या वारसदारात १७४८-१७६२ पर्यंत वारसायुद्ध झाले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्यानेच सर्वप्रथम स्वतःला 'निजाम' अशी पदवी दिली. म्हणून नंतरच्या सर्व राजांना 'निजाम' असे संबोधण्यात आले. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटकडून 'आसफजाह' हा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याला 'आसफजाही' घराणे असे म्हणतात.

7. या घराण्यात एकूण सात राजे होऊन गेले. त्यांचा एकूण कालखंड २२४ वर्षांचा होता. हैद्राबाद राज्याची राजभाषा 'फारशी' होती. शेवटचा निजाम मीर उस्मान अली (१९१९ ते १९४८) याच्या काळात हैद्राबाद मुक्ती संग्राम घडून आले. इंग्रजांचे राज्य उधळून लावून स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचे उस्मान अलीचे स्वप्न होते.

8. निजाम व इस्ट इंडिया कंपनी यांच्यात १२ ऑक्टोबर १८६० मध्ये तैनाती फौजेचा करार झाला. इंग्रज फौजेच्या खर्चासाठी कडप्पा, कुर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने कंपनीला दिले.

9. सातवा व शेवटचा मीर उस्मान अली खान २९ ऑगस्ट १९११ रोजी सत्तेवर आला. पहिल्या महायुद्धात निजामाने इंग्रजांना खूप मदत केली होती . म्हणून ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज याने निजामाला "हिज एक्झाल्टेड हायनेस" हा किताब दिला.

 

1857 का विद्रोह

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा 🎯:
🔵🔴🔵1857 का विद्रोह 🔵🔴🔵

Q1. 1857 में अंग्रेजी साम्राज्य के विरुद्ध पंजाब में किसने सशस्त्र विद्रोह किया?*
(A) सैनिकों ने
*(B) नामधारी सिखों ने*✅
(C) अकाली सिखों ने
(D) निरंकारी सिखों ने 

*Q2. अंग्रेजी भारतीय सेना में चर्बी वालेय कारतूसों से चलने वाली एनफील्ड राइफल कब शामिल की गई?*
(A) नवम्बर 1856
(B) दिसम्बर 1856
*(C) जनवरी 1857*✅
(D) फरवरी 1857 

*Q3. 1857 के बरेली विद्रोह का नेता कौन था?* 
*(A) खान बहादुर*✅
(B) कुँवर सिंह
(C) मौलवी अहमदशाह
(D) बिरजिस कादिर 

*Q4. कानुपर के गदर का नेतृत्व किसने किया था?*
(A) बेगम हजरत महल
*(B) नाना साहिब*✅
(C) तांत्या टोपे
(D) रानी लक्ष्मीबाई 

*Q5. किसी स्थान पर हुए विद्रोह के दमन के दौरान ब्रिटिश सैन्य अधिकारी हैवलाक की मौत हो गई?* 
(A) दिल्ली
(B) कानपुर
*(C) लखनऊ*✅
(D) झांसी 

*Q6. सर्वप्रथम किसने 1857 के विद्रोह के तुंरत बाद इसे एक ‘राष्ट्रीय विद्रोह’ की संज्ञा दी?*
*(A) बेंजामिन डिजरायली*✅
(B) वी.डी. सावरकर
(C) के. एम. पणिक्कर
(D) ताराचंद 

*Q7. वह कौन-सा ब्रिटिश सेनापति था, जिसकी 1857 के विद्रोह को दबाने में महत्त्वपूर्ण भूमिका रही?*
(A) आउट्रम
(B) चार्ल्स नेपियर
*(C) कैम्पबेल*✅
(D) हैवलॉक 

*Q8. निम्नलिखित में से वह कौन-सा स्थान था, जो 1857 के विद्रोह से अछूता रहा?* 
(A) अवध
*(B) मद्रास*✅
(C) पूर्वी पंजाब
(D) मध्य प्रदेश 

*Q9. ‘इस मिसाल में हम मुसलमानों को हिन्दुओं से भिड़ा नहीं पाए।’ निम्नलिखित में से कौन-सी एक घटना से एचिसन के इस कथन का सम्बन्ध है?* 
*(A) 1857 का विद्रोह*✅
(B) चम्पारण सत्याग्रह, 1917 
(C) खिलाफत और असहयोग आन्दोलन, 1919-22
(D) 1942 की अगस्त क्रांति 

*Q10. बिहार के जगदीशपुर में विद्रोह के दमन का श्रेय किस ब्रिटिश अधिकारी को है?*
(A) हडसन
(B) हैवलाक
(C) ह्यूरोज
*(D) टेलर व विसेंट आयर*✅

*Q11. 1857 के विद्रोह के दौरान दिल्ली में विद्रोह का सैन्य-नेतृत्व किसने किया?*
(A) बख्त खाँ
(B) लियाकत अली
*(C) बहादुरशाह II ‘जफर’*✅
(D) इनमें से कोई नहीं 

*Q12. आधुनिक इतिहासकार, जिसने 1857 के विद्रोह को ‘स्वतन्त्रता की पहली लड़ाई’ कहा था–* 
(A) आर. सी. मजुमदार
(B) एस. एन. सेन
*(C) वी. डी. सावरकर*✅
(D) अशोक मेहता 

_____________________

धरणांची पाणी क्षमता

In use🎯 History By Sachin Gulig:
◆◆  धरणांची पाणी क्षमता  ◆◆   

● धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???

1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??
2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??
3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??

● सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.

● इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???

● आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.

● पाणी मोजण्याची एकके

● स्थिर पाणी मोजण्याची एकके –
1) लिटर
2) घनफूट
3) घनमीटर 
4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)

● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.

1 टीएमसी  = 28,316,846,592 लिटर्स

2) वाहते पाणी मोजण्याची एकके-

1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.

2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते.

● उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.
म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.

● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.

● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे

1)उजनी  117.27 टीएमसी
2)कोयना  105.27 टीएमसी
3)जायकवाडी 76.65 टीएमसी  ( पैठण )
4)पेंच तोतलाडोह  35.90 टीएमसी
5) वारणा  34.40 टीएमसी
6) पूर्णा येलदरी  28.56 टीएमसी

___________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥

📌 1 नोव्हेंबर 1993 रोजी स्थापित युरोपीय संघ (EU) हा मुख्यतः युरोपमध्ये स्थित इतक्या देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे
👉 - 28.

📌 आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) कडून या साली प्रथम विश्वचषक आयोजित करण्यात आला.

👉 - सन 1930.

📌 आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA)चे स्थापना वर्ष

👉 – सन 1904.

आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप कुस्तीत भारताच्या सचिन राठीने पटकावले सुवर्ण आणि जगातून निवृत्त झालेल्या विमानावर भारतीय हवाई दल अवलंबून


◆◆ आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप कुस्तीत भारताच्या सचिन राठीने पटकावले ‘सुवर्ण’ ◆◆

● आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

● आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

●  त्याने मंगोलियाचा मल्ल बॅट एर्डेनेला आस्मान दाखवले.

● यापूर्वी शनिवारी विशाल कालीरमण, सचिन गिरी आणि नवीन हे आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभूत झाले होते. त्यांना रौप्य पदावरच समाधान मानावे लागले होते.

● फ्री स्टाईल बाउटच्या सुरूवातीच्या दिवशी पाचपैकी चार मल्ल पदक जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.

●  करणने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक घेतले होते.

____________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

✳ जगातून निवृत्त झालेल्या विमानावर भारतीय हवाई दल अवलंबून

🔺 हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे.    

◾️भारतीय हवाई दल आधीच फायटर विमानांच्या स्क्वाड्रन  समस्येचा सामना करत आहे. त्याचवेळी हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. भारतीय हवाई दलात अजूनही जी फायटर विमाने कार्यरत आहेत त्याचा वापर अन्य देशांनी थांबवला आहे.

भारतीय हवाई दलाला ही विमाने कार्यरत ठेवण्यासाठी दुसऱ्या देशांची मदत घ्यावी लागत आहे. भारताला जॅग्वार विमानांसाठी लागणारे सुट्टे भाग ओमान, फ्रान्स आणि युकेकडून मिळणार आहेत. त्यामुळे या फायटर विमानांचे आयुष्य वाढवता येणार आहे. जॅग्वार ही मुळची ब्रिटीश बनावटीची विमाने आहेत. भारतीय हवाई दलाकडे सध्या ११८ जॅग्वार विमाने आहेत. पण ही विमाने जुनी झाल्यामुळे त्यांची युद्ध क्षमता मोठया प्रमाणावर कमी झाली आहे.

या विमानांचे सुट्टे भागही सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे या विमानांना लढण्यायोग्य स्थितीत ठेवणे एक आव्हान आहे. या विमानांचे एअरफ्रेम आणि सुट्टे भाग मिळवण्यासाठी शोध सुरु आहे असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारताकडे जॅग्वारच्या पाच स्क्वाड्रनमध्ये ८० विमाने आहेत. या विमानांमध्ये सुधारणा करण्याची १.५ अब्ज डॉलरच्या खर्चाची योजना आहे.

१९७९ साली भारताने यूकेकडून ४० जॅग्वार विमाने विकत घेतली होती. त्यानंतर एचएएलने १५० विमानांची निर्मिती केली. फ्रान्स आणि यूकेने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांचा वापर २००५ ते २००७ दरम्यान पूर्णपणे थांबवला. भारताने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांमध्ये एफ-१२५ आयएन इंजिन बसवल्यानंतर २०३५ नंतर सुद्धा ही विमाने कार्यरत राहतील असे सूत्रांनी सांगितले. भारताला फ्रान्सकडून जॅग्वारच्या ३१ एअरफ्रेम, ओमानकडून आठ इंजिन दोन एअरफ्रेम मिळणार आहेत. फ्रान्स आणि ओमान हे भाग भारताला पूर्णपणे मोफत देणार आहे भारताला फक्त वाहतुकीचा खर्च उचलावा लागतो.

__________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा आणि भारतातील विभाग व त्यांची मुख्यालय आणि पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🌸 महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा 🌸 #Maharashtra

•१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

•२) कर्नाटक – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

•३) तेलंगना-गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

•४) गुजरात – पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे.

•५) दादर,नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

•६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

•७) गोवा- सिंधुदुर्ग.

____________________________

✅✅ भारतातील विभाग व त्यांची मुख्यालय ✅✅

● *मध्य विभाग* (मुंबई)

● *पूर्व विभाग* (कोलकाता)

● *उत्तर विभाग* (नवी दिल्ली)

● *उत्तर पूर्व विभाग* (गोरखपूर)

● *उत्तर पूर्व सीमा विभाग* (गुवाहाटी

● *दक्षिण विभाग* (चैनई)

● *दक्षिण मुख्य विभाग* (सिकंदराबाद)

● *दक्षिण पूर्व विभाग* (कोलकाता)

● *पश्चिम विभाग* (चर्चगेट-मुंबई)

● *पूर्व मध्य विभाग* (हाजीपूर-बिहार)

● *पूर्व किनारी विभाग* (भुवनेश्वर)

● *उत्तर मध्य विभाग* (अलाहाबाद)

● *उत्तर पश्चिम विभाग* (जयपूर)

● *दक्षिण पूर्व मध्य विभाग* (विलासपुर)

● *दक्षिण पश्चिम विभाग* (हुगळी)

● *पश्चिम मध्य विभाग* (जबलपूर)

● *मेट्रो रेल्वे झोन* (कोलकाता)

_______________________________

✅✅ पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती ✅✅ #Geography #PhysicalGeography

🏆 पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🏆 उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🏆 उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🏆 विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🏆 अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🏆 रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

🏆 स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

नदी व उगमस्थान व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
✅✅ नदी व उगमस्थान ✅✅

💦 पूर्णा:-मेळघाट-अमरावती

💦 काटेपूर्णा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

💦 मोरणा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

💦 ज्ञानगंगा:-नागझिरा:-बुलढाणा

💦 वाघूर:-अजिंठा:-औरंगाबाद

💦 गिरणा:-सुरगाणा:-नाशिक

💦 पांझरा:-पिंपळनेर:-धुळे

💦 सिना:-हरिश्चंद्र डोंगर

💦 घोड:-आहुपे(आंबेगाव)

💦 नीरा:-शोरगाव(भोर)

💦 कुकडी:-नानेखडी(जुन्नर)

💦 इंद्रायणी:-लोणावळा

💦 भामा:-भामनेर

_______________________________

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

☑️ एकूण वातावरणाच्या सुमारे ९७% वातावरण समुद्र सपाटीपासून सुमारे २९ कि.मी. उंची पर्यंतच सामावलेले आहे.

☑️ भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. उंची पर्यंतच्या भागात वातावरणातील वायूंचे प्रमाण सर्वत्र सारखे असून या आवरणातील रासायनिक घटना सर्वत्र समान असते म्हणून या थराला समावरणाचा थर म्हणतात.

☑️ समावरणाच्या थरात वातावरणातील एकूण वायूंपैकी नायट्रोजन व ऑक्सिजन यांचे प्राबल्य सर्वात जास्त म्हणजे ९९.०३% इतके असते. तर भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. च्या वर वातावरणाच्या भागाला विषमावरण म्हणतात.

☑️ पृथ्वीच्या संपुर्ण वातावरणाच्या वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पहिल्या 30 किलोमीटर च्या आत केंद्रित आहे.

☑️ तापमान व इतर घटकांचा विचार करून वातावरणाचे खालील स्तरांमध्ये विभाजन केले जाते.
1) तपांबर (Troposphere)
2) स्थितांबर (Stratosphere)
3) दलांबर/आयनांबर) (Ionosphere)
4) बाह्यम्बर (Exosphere)

_____________________________________

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

✅✅ महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे✅✅

🔵 भीमाशंकर ➖ पुणे

🟤 त्र्यंबकेश्वर ➖ नाशिक

🟣 घृष्णेश्वर ➖ वेरुळ,औरंगाबाद

🔴 परळी वैजनाथ ➖ बीड

🟠 औंढा नागनाथ ➖ हिंगोली.

 

महाराष्ट्र व भारताचा भूगोल आणि जगातील विस्ताराने मोठे देश आणि महाराष्ट्र जलाशय व धरणे

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🔰भारतात राष्ट्रीय उद्याने नसलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश 🍀🍀

◾️ चंदीगड,
◾️ दादरा नगर हवेली,
◾️दमन व दीव ,
◾️लक्षद्वीप,
◾️पद्दुचेरी,
◾️ दिल्ली
याठिकाणी एकही राष्ट्रीय उद्यान नाही✍

🔰भारतामध्ये एकूण 104 राष्ट्रीय उद्याने आहेत

🔰 राष्ट्रीय उद्याने भारतातील 40500 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापली आहे

🔰देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या  1.23 टक्के  

🔰 भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने ⛰⛰🏝

◾️ मध्य प्रदेश( 10 )
◾️अंदमान निकोबार (9) ,
◾️केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल प्रत्येकी 6,
◾️आसाम कर्नाटक हिमाचल प्रदेश तामिळनाडू तेलंगणा प्रत्येकी 5

🔰 भारत सरकारने 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू केला सध्या भारतात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️ त्यापैकी महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️प्रत्येक चार वर्षांनी वाघांची 🐅🐅
जनगणना होते 2018 च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत  त्यापैकी महाराष्ट्रात 312 वाघ आहेत

_____________________________

जगातील विस्ताराने मोठे देश 

* रशिया [ आशिया ] - १,७०,०७५,०००

* कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९

* चीन [ आशिया ] - ९,५६१,०००

* अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४

* ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५

* ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००

* भारत [ आशिया ] - ३,२८७,७८२

* अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] - २,७७६,६५४

* कझाकस्तान [ आशिया ] - २,७१७,३००

* सुदान [ आफ्रिका ] - २,५०५,८१३

______________________________

💦 महाराष्ट्र - जलाशय व धरणे 💦
----------------------------------

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

_____________________________

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...