०७ एप्रिल २०२२

नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

1. नाशिक जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नाशिक      
       क्षेत्रफळ - 15,530 चौ.कि.मी.

लोकसंख्या - 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 15 - नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा. 

सीमा - उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.

जिल्हा विशेष -

हा जिल्हा महाराष्ट्रातील पाच व गुजरातमधील दोन जिल्हयांनी वेढला आहे. निफाड व लासलगाव परिसर कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध. द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातील पहिले मातीचे धरण नाशिक जिल्हातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. 

नाशिक शहर हे तापी व गोदावरी या नधांच्या खोर्‍यात वसलेल्या दख्खन पठाराचा भू-भाग आहे. गोदावरी काठी वसलेले हे शहर एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो.

प्रमुख स्थळे

नाशिक - येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे. 

महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे. 

त्र्यंबकेश्वर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे. 

मालेगाव - पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. 

येवले - तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता. 

सापुतरा - निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. 

भगूर - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान. 

नांदूर - मध्यमेश्वर - भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे. 

भोजापूर - खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर. 

देवळाली - सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. 

गंगापूर - गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण. 

सप्तश्रुंगी - साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात. 

सिन्नर - यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध. 

दिंडोरी - शिवाजी व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध. 

निलगिरीपासून कागदनिर्मिती - इगतपुरी (नाशिक)

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (MERI)- नाशिक 

महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी - नाशिक 

चलनी नोटा, पोस्ट कार्ड व तिकिटे छापण्याचा कारखाना - नाशिक 

नाशिक प्रशासकीय विभागास उत्तर महाराष्ट्र म्हंटले जाते. 

नाशिक जिल्ह्यात सातमाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या डोंगररांगांनाच औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असे म्हटले जाते.

नाशिक जिल्ह्यात वाहणार्‍या सर्व नधा नाशिक जिल्ह्यातच उगम पावतात. एकही नदी दुसर्‍या जिल्ह्यातून प्रवेश नाही. हे आगळे वैशिष्ट्य आहे. 

भारातातील पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात गंगापूर येथे बांधण्यात आले आहे. 

2. धुळे जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - धुळे           
     क्षेत्रफळ - 8,063 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 20,48,781 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 4 - शिंदखेड, साक्री, धुळे, शिरपूर.

सीमा - उत्तरेस नंदुरबार जिल्हा व मध्य प्रदेशचा मेवाड जिल्हा, पूर्वेस जळगाव जिल्हा, पश्चिमेस नंदुरबार जिल्हा व गुजरात राज्य, दक्षिणेस नाशिक जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष -

पूर्वी जळगाव आणि धुळे मिळून खानदेश हा एक जिल्हा होता. या जिल्ह्याचे मुख्यालय धुळे येथे होते. पुढे 1961 ला पश्चिम खानदेशाला धुळे जिल्हा असे नाव देण्यात आले. 

प्रमुख स्थळे

धुळे - नकाणे तलाव व डेडरगाव तलाव ही सहलीची केंद्रे आहेत. 

शिरपूर - धुळे जिल्ह्यातील शेतीमालाची मोठी बाजारपेठ. शिरपूरमधील बालाजी मंदिर प्रेक्षणीय आहे. 

दोंडाईचे - मिरचीच्या व्यापारासाठी दोंडाईचे विशेष महत्वाचे आहे. येथे स्टार्चचा कारखाना आहे. 

3. नंदुरबार जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - नंदुरबार             

क्षेत्रफळ - 5,034 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 16,46,171 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 6 - नंदुरबार, अक्कलकुवा, तळोदे, नवापुर, शहादे, धडगांव (अक्राणी).

सीमा - उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश, पूर्वेस धुळे जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस गुजरात राज्य, दक्षिणेस धुळे जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष -

धुळे जिल्ह्याचे विभाजन करून 1 जुलै 1998 ला नंदुरबार या नव्या जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आदिवासीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्ह्यास आदिवासी जिल्हा म्हणून ओळखतात. 

सातपुडा पर्वतरांगामुळे हा जिल्हा गुजरात व मध्यप्रदेशापासून वेगळा झाला. 

या जिल्ह्यात भिल ही आदिवासी जमात केंद्रीय झाली आहे. एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासींचे प्रमाण लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचा आदिवासींच्या संदर्भात राज्यात प्रथम क्रमांक लागतो.

प्रमुख स्थळे

नंदुरबार - येथे 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात छातीवर गोळ्या झेलणार्‍या बालक्रांतिकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे. 

प्रकाशे - येथील केदारेश्वर व संगमेश्वर मंदिरे प्रसिद्ध आहेत. यालाच दक्षिण काशी म्हणतात. 

धडगाव - हे अक्राणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. 

तोरणमाळ - प्राचीन मांडू घराण्याची राजधानी. निसर्गरम्य ठिकाण. 

भारतामध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी 2006 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यात बर्ड फ्ल्यू या विषाणूजन्य (एच-5, एन-1) आजाराची कोंबड्यांना लागण झाली. 

नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मिती आधी धुळे जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु आता आदिवासींची 60 टक्के लोकसंख्या असलेला नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. 

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. 

महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणजे नंदुरबार होय. 

धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार हा जिल्हा अस्तित्वात आला आहे. 

महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना शिरपूर (धुळे)

4. जळगाव जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - जळगाव         
    क्षेत्रफळ - 11,765 चौ.कि.मी 

लोकसंख्या - 42,24,442 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 15 - चोपडा, यावल, अमळनेर, एरंडोल, रावेर, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मुक्ताईनगर (एदलाबाद), पारोळा, भडगांव, जामनेर, चाळीसगांव, धरणगांव, बोदवड. 

सीमा - उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेश, पश्चिमेस धुळे जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा असून नैऋत्येस नाशिक जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रदेशाचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले होते. त्यापैकी पूर्व खानदेश भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून संबोधले जाते. जळगावला केळीचे कोठार, अजिंठ्याचे प्रवेश व्दार म्हणून ओळखले जाते.

प्रमुख स्थळे -

जळगांव - या शहरास अजिंठ्याचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते. 

अंमळनेर - साने गुरुजींनी येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे. 

भुसावळ - महत्वाचे रेल्वे जंक्शन आणि जवळच पोकरी येथे औष्णिक विधुत केंद्र आहे. 

चाळीसगांव - प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला लीलावती हा ग्रंथ याच गावी लिहिला असे म्हटले जाते. 

जामनेर - येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे. 

चांगदेव - येथे तापी व पूर्णा या दोन नधांचा संगम आहे. 

पाल - सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण व वंनोध्यान पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. 

कोथमी हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे. 

उत्तर महाराष्ट्र विधापीठ जळगाव येथे आहे. 

पोकरी दीपनगर औष्णिक वीज केंद्र जळगाव या जिल्हयात आहे. 

महाराष्ट्रातील केळीच्या बागा जळगाव जिल्ह्यात आहेत. 

पाटणादेवी वंनोधान जळगाव जिल्हयात आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये केली संशोधन केंद्र यावल येथे आहे. 

यावल अभयारण्य जळगाव जिल्ह्यात आहे. 

चांगदेवगाव हे धार्मिक स्थळ जळगाव जिल्ह्यात आहे.

 

5. अहमदनगर जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अहमदनगर       
     क्षेत्रफळ - 17,048 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 45,43,083 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 14 - कोपरगाव, आकोले, संगमनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, शेवगाव, पारनेर, नेवासे, पाथर्डी, कर्जत, जामखेड (महाल), राहता. 

सीमा - उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस पुणे व ठाणे जिल्हा, दक्षिणेस सोलापूर जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

अहमदनगर हे शहर सन 1418 मध्ये मलिक अहंमद यांनी बसविले. मलिक हमदच्या नावावरून ते अहमदनगर म्हणून ओळखले जावू लागले. हे निजामशाही राजधानीचे शहर म्हणून ओळखतात. 

शहराच्या चारही बाजूंनी खंदक असलेला भुईकोटा किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित नेहरू यांनी'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 

साखर कारखान्यांचा जिल्हा, खर्डे येथील भुईकोट किल्ला मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. जामखेड तालुक्यातील चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म.
या जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.

प्रमुख स्थळे

अहमदनगर - शहरातील भुईकोट किल्ला व चांदबिबीचा महाल ही ऐतिहासीक स्थळे प्रसिद्ध आहेत. येथे लष्कराचा वाहन संशोधन व विकास विभाग आहे. सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्र येथे आहे. 

अकोले - येथील अगस्तिऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे. 

प्रवरानगर - देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला.

नेवासे - येथेच संत ज्ञांनेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' सांगितली. 

राहुरी - महात्मा फुले कृषी विधापीठ याच ठिकाणी आहे. 

शनि-शिंगणापुर - शनि-शिंगणापुर हे नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. या गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कडया नाहीत हे आगळे-वगळे वैशिष्ट्य होय.

राळेगण सिद्धी - थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या परिश्रमातून या खेड्याचा कायापलट झाला. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंब कल्याण व शिक्षणक्षेत्रात आघाडीवर आहे. 

शिर्डी - साईभक्ताचे श्रद्धास्थान 

सिद्धटेक - येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते. 

भंडारदारा - अकोले तालुक्यात प्रवारा नदीवर 'भंडारदरा' हे धरण बांधण्यात आले आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे.

आजचे प्रश्नसंच , महाराष्ट्र जिल्हे निर्मिती

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र



✅ महाराष्ट्र जिल्हे निर्मिती ✅

1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)

3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)

7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)

गाल्फ प्रवाह

🔹गाल्फ प्रवाह

काय आहे गल्फा प्रवाह

📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*

📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.

📌त्यांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.

📌त्याला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो

📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.

📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.

*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*

📌 ते तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.

📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.

📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.

📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.

📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

पानवळ रेल्वे पूल

पानवळ रेल्वे पूल:
.
कोकण रेल्वेवरील पानवळ पूल हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे.


पानवळ रेल्वे पूल:
.. हा पूल कोकण रेल्वेवरील रत्नागिरी आणि निवसर या दोन स्थानकांदरम्यान पानवळ नदीवर बांधला आहे. रत्नागिरी स्थानकापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाची लांबी सुमारे 360 मीटर्स आणी उंची 64 मीटर आहे. सर्वसाधारणपणे इतक्या लांब पुलाच्या निर्माणासाठी अनेक गर्डर्स वापरले जातात; परंतु पानवळ पुलाच्या निर्मितीसाठी केवळ एक सलग गर्डर बनविला गेला. हा गर्डर इंक्रीमेंटल लॉंचिंग या पद्धतीने पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत लॉंच केला गेला. या गर्डर लॉंचिंगचा वेग सुमारे दोन फूट प्रती तास एवढा होता. अशाप्रकारचे गर्डर लॉंचिंग तंत्र भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच वापरण्यात आले. या पुलाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे याचा एक पिअर कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे. या पुलावरून खाली पाहिले, तर जीप आगपेटीएवढी दिसते. या पुलावरून शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने धावणारी गाडी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हिरव्यागार पर्वतांनी वेढलेल्या पानवळ पुलाखालून वाहणारे पानवळ नदीचे पात्र पुलावरून खूपच सुंदर दिसते. या पुलाची भौगोलिक स्थिती अशी आहे, की येथे वाऱ्याचा वेग धोकादायक पातळीपर्यंत जाऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन या पुलावर वाऱ्याचा वेग सतत मोजण्यासाठी ऍनॉमिमीटर बसविण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक झाल्यास, गाडी निवसर आणि रत्नागिरी स्थानकावर थांबविण्यासाठी विशेष प्रणाली बसविण्यात आली आहे. रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर पानवळ फाट्यावरून पानवळ पुलापर्यंत पोचता येते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात हा पूल पाहायला जाऊ शकतो.

भारतातील महत्वाची सरोवरे , भारतातील महत्वाचे धबधबे , महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

🔹भारतातील महत्वाची सरोवरे

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
____________________________________

🔹भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी.



🔹महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

*१)मुंबई*--------भारताचे प्रवेशद्वार,
            भारताचे प्रथम क्रमांकाचे
           औद्योगिक शहर,भारताची,
           राजधानी

*२)रत्नागिरी*---देशभक्त व
                समाजसेवकांचा जिल्हा

*३)सोलापूर*----ज्वारीचे कोठार,
                सोलापुरी चादरी

*४)कोल्हापुर*--कुस्तीगिरांचा जिल्हा
                गुळाचा जिल्हा

*५)रायगड*-----तांदळाचे कोठार व
               डोंगरी किल्ले असलेला
              जिल्हा

*६)सातारा*----कुंतल देश व शुरांचा
               जिल्हा

*७)बिड*------जुन्या मराठी कविंचा
              जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,
              देवळादेवळा जिल्हा, ऊस
              कामगारांचा जिल्हा

*८)परभणी*---ज्वारीचे कोठार

*९)उस्मानाबाद*--श्री.भवानी मातेचा
                    जिल्हा

*१०)औरंगाबाद*--वेरुळ-अजिंठा
                   लेण्यांचा जिल्हा,
                  मराठवाडयाची
                  राजधानी

*११)नांदेड*--संस्कृत कवींचा जिल्हा

*१२)अमरावती*--देवी रुख्मिणी व
                   दमयंतीचा जिल्हा

*१३)बुलढाणा*--महाराष्ट्राची
                 कापसाची बाजारपेठ

*१४)नागपुर*----संत्र्यांचा जिल्हा

*१५)भंडारा*-----तलावांचा जिल्हा

*१६)गडचिरोली*--जंगलांचा जिल्हा

*१७)चंद्रपुर*----गौंड राजांचा जिल्हा

*१८)धुळे*----सोलर सिटीचा जिल्हा
                    
*१९)नंदुरबार*-आदिवासी बहुल
                                   जिल्हा

*२०)यवतमाळ*-पांढरे सोने-
                     कापसाचा जिल्हा
                   
*२१)जळगाव*--कापसाचे शेत,
                      केळीच्या बागा,
                       अजिंठा लेण्यांचे
                      प्रवेशद्वार

*२२)अहमदनगर*-साखर कारखाने
                   असलेला जिल्हा

*२३)नाशिक*---मुंबईची परसबाग,
                   द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा
                   गवळीवाडा
२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,
                    कलावंतांचा जिल्हा
____________________________________

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...