०५ एप्रिल २०२२

सामान्य ज्ञान

जीवशास्त्र : मानवी पचनसंस्था । एमपीएससी-२०२० । विज्ञान । MPSC EXAMS HUB
मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter  असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
ग्रसनी (Pharynx)
ग्रसिका (Esophagus)
जठर/ आमाशय (Stomach)
लहान आतडे (Small Intestine)
मोठे आतडे (Large Intestine)
मलाशय (Rectum)
गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

जीवशास्त्रामध्ये मानवी पचनसंस्था फार महत्वाची संस्था आहे( एमपीएससी-२०२० । विज्ञान ) ज्यामध्ये पुढीलप्रमाणे घटक येतात.

लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.

पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.

अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.




पचनसंस्था :-

प्राण्याच्या शरीरातली पचनसंस्था ही त्याच्या शरीरातील अनेक अवयवांची बनलेली आहे. या संस्थेमुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ही पोषकद्रव्ये शरीराची वाढ व चलनवलन यांसाठी उपयोगी पडतात.

माणसाच्या पचनसंस्थेत पुढील अवयव असतात:

तोंड, घसा, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय व गुदद्वार.

१) तोंड:-

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो.

आजार:-

तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात.

अतितीव्र आम्ल, अल्कली किवा औषधांचा संपर्क तोडांतील त्वचेशी आल्यास. व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरतेमुळे.

२)घसा:-

घसा हा मानवी शरीराचा एक भाग आहे.

३) अन्ननलिका:-

अन्ननलिका ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठराचे वरचे मुख यांना जोडते. नलिकेतून अन्न स्नायुंच्या हलचालींच्या साहाय्याने पुढे ढकलले जाते.

तिची लांबी २०-२५ से.मी. पर्यंत असते. अन्ननलिकेची आतील बाजूस स्तरीकृत स्क्वैमस उपकला (Stetified Squamous Epithelium) असते.

४) जठर:-

जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते.

जठर विकार:-

जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात.

या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.




राज्य निवडणूक आयोगाबद्दल. आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१९ (१४ वी विधानसभा )

    १. भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

२.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली.

३. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत)

४. अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.

५). जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर:-
I). निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण

II). संचलन आणि नियंत्रण

III). निवडणुकांचे आयोजन


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१९ (१४ वी विधानसभा )

मुख्मंत्री :- उध्दव बाळासाहेब ठाकरे (महाराष्ट्र राज्याचे 29 वे मुख्यमंत्री )
अध्यक्ष :- नाना पटोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २०१९
विरोधी पक्षनेता :- देवेंद्र फडणवीस, भाजपा २०१९ 

बहुमतासाठी २८८ पैकी १४४ जागा आवश्यक आहेत

दिनांक : 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते
इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली.

त्यांची पुस्तके खाली दिलेली आहेत.
१) ठाकरे विरुद्ध ठाकरे मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे, शिरीष सहस्रबुद्धे)

उद्धव ठाकरे यांची ग्रंथ संपदा

१) महाराष्ट्र देशा
२) पहावा विठ्ठल

राजकीय गट : महाराष्ट्र विधानसभा :-

महाराष्ट्र विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह).
विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.व महाराष्ट्रात शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाराष्ट्र विकास आघाडी चे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे
भाजप (१०५) शिवसेना (५६) काँग्रेस (५४) राष्ट्रवादी (४४)
शेकाप (१) बविआ (३) एमआयएम (१) भारिपबम (१) मनसे (१) रासप (१)माकप (१) इतर (८)                                      



भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे


कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. – कायद्यापुढे समानता
कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा कलम
१८. – पदव्या संबंधी
कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. – समान नागरी कायदा कलम
४८. – पर्यावरणाचे सौरक्षण कलम
४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम
५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. – भारताचा महान्यायवादी
कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ – संसद
कलम ८० – राज्यसभा
कलम ८१. – लोकसभा
कलम ८५. – संसदेचे अधिवेशन
कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. – सर्वोच न्यायालय
कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. – राज्यपालाची निवड
कलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. – राज्यपालाची पात्रता
कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. – विधानसभा
कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. – उच्च न्यायालय
कलम २३३. – जिल्हा न्यायालय
कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. – वित्तआयोग
कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. – निवडणूक आयोग
कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. – राज्य आणीबाणी
कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. – घटनादुरुस्ती
कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबध.                

देशातील पहिला कचरा कॅफे

👉 अंबिकापूर (छत्तीसगड)

👉 हेतू-- शहर प्लॅस्टिकमुक्त करणे

👉 नागरीकांना 1kg प्लॅस्टिक कचऱ्याच्या बदल्यात अन्न पुरविणे

👉 घोषवाक्य-- "More the waste better the taste"

💐  राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय 💐

👉 ठिकाण-- लोथल, गुजरात

👉 लिस्बन, पोर्तुगाल येथील नेव्ही म्युझियम च्या धर्तीवर अंमलबजावणी      

👉केंद्रीय नौकावहन मंत्रालय (सागरमाला  प्रकल्पांतर्गत)

👉 भारत आणि पोर्तुगाल यांच्या सहकार्याने उभारणी

👉मार्च 2019 पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी

👉लोथल-- प्राचीन हडप्पा संस्कृतीतील एक बंदर                                                                                       

शाश्वत विकासाची संकल्पना


आपल्या बुद्धीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना माणूस हा निसर्गचक्राचा एक घटक आहे याची जाणीव शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव आपल्या गरजेपेक्षा जास्त संसाधनांचा वापर करत नाही. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गचक्र आहे. माणसाच्या सतत अधिक काही मिळवण्याच्या इच्छेमुळे तो सतत अधिकाधिक संसाधनांचा वापर करत असतो.

--------------------------------------------------

⭐️  शाश्वत विकास १७ ध्येये ⭐️

१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.

 २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.

३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.

४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.

५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.

६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.

७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.

८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.

९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.

१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.

११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.

१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.

१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.

१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.

१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.

१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.

१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

__________________________

ब्रिटिश भारत के दौरान ब्रिटिश वायसराय की सूची (1858-1947)

👉 लार्ड कैनिंग ( 1958 - 1964 )

• रानी विक्टोरिया की घोषणा और भारत सरकार अधिनियम 1858 की घोषणा
• व्हाइट विद्रोह
• भारतीय परिषद अधिनियम 1861
• भारतीय दंड संहिता 1860
• वहाबी आन्दोलन का दमन

👉 लार्ड जॉन लॉरेंस (1864-69)

• भूटान युद्ध (1865)
• कलकत्ता, बम्बई में उच्च न्यायालयों और 1865 में मद्रास की स्थापना

👉 लार्ड मेयो (1869-1872)

• भारत के सांख्यिकीय सर्वेक्षण की स्थापना
• कृषि और वाणिज्य विभाग
• राज्य रेलवे
• 1872 में अंडमान में हत्या कर दी गई

👉 लॉर्ड लिटन I (1876-1880)

• रॉयल टाइटल अधिनियम 1876
• महारानी विक्टोरिया द्वारा भारत की महारानी के  खिताब की धारणा
• वर्नाकुलर प्रेस एक्ट
• शस्त्र अधिनियम 1878
• दूसरा अफगान युद्ध (1878-1880)
• 1878 में पहली बार अकाल आयोग की नियुक्ति

👉 लार्ड रिपन (1880-1884)

• पहले फैक्टरी अधिनियम और पहली जनगणना
• 1882 में स्थानीय प्रशाशन
• 1882 में केंद्र की डिवीजन वित्त
• शिक्षा पर हंटर आयोग
• इल्बर्ट बिल विवाद

👉 लार्ड डफरिन (1884-1888)

• बर्मा  युद्ध (1885-1886)
• भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना

👉 लार्ड लैंड्सडाउन (1888-1894)

• 1891 के कारखाना अधिनियम
• इम्पीरियल प्रांतीय और अधीनस्थ में सिविल सेवा की डिवीजन
• 1892 के भारतीय परिषद अधिनियम
• डूरंड आयोग की नियुक्ति और भारत (अब पाकिस्तान) और अफगानिस्तान के बीच डूरंड रेखा की अपनी परिभाषा

👉 लार्ड एल्गिन द्वितीय

• चापेकर द्वारा अंग्रेजों की हत्या

👉 लॉर्ड कर्जन (1899-1905)

• थॉमस रॉली आयोग
• प्राचीन स्मारक संरक्षण अधिनियम 1904 के
• बिहार में पूसा में कृषि अनुसंधान संस्थान की स्थापना
• 1905 में बंगाल के विभाजन

👉 लॉर्ड मिंटो द्वितीय (1905-1910)

• एंटी विभाजन और स्वदेशी आंदोलनों
• सूरत सत्र और कांग्रेस में विभाजन
• मिंटो मॉर्ले सुधारों
• 1906 में ढाका के आगा खान नवाब द्वारा मुस्लिम लीग के फाउंडेशन

👉 लॉर्ड हार्डिंग द्वितीय (1910-1916)

• बंगाल की विभाजन के विलोपन
• दिल्ली के शाही राजधानी स्थानांतरण
• जी के की मौत 1915 में गोखले
• 1915 में हिंदू महासभा के फाउंडेशन

👉 लार्ड चेल्म फ़ोर्ड  (1916 -21)

• गांधीजी की वापसी
• होम रूल लीग
• लखनऊ सत्र और 1916 में कांग्रेस के पुनर्मिलन
• बी। जी। तिलक  के प्रयासों से 1916 में  लखनऊ संधिमोंटेग का अगस्त घोषणा
• एस.एन. बनर्जी द्वारा भारतीय लिबरल संघ के गठन
• जलिांया वाला  बाग नरसंहार (13 अप्रैल 1919)
• खिलाफत आंदोलन (1919-1920)
• बिहार के लेफ्टिनेंट गवर्नर के रूप में सर एस. पी. सिन्हा  की नियुक्ति (प्रथम भारतीय)

👉 लार्ड रीडिंग (1921-1926)

• चौरी-चौरा की घटना (5 वीं फ़र, 1922)
• दिसं, 1922 में सी. आर. दस  मोतीलाल नेहरू ने स्वराज पार्टी का गठन
• राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आरएसएस) के.बी.हेडगवार द्वारा की फाउंडेशन (1925)
• रोलेट एक्ट का निरसन
• भारत और इंग्लैंड में एक साथ परीक्षाओं का आयोजन
• भारतीय सेना के अधिकारी के कैडर के भारतीयकरण की शुरुआत।

👉 लॉर्ड इरविन (1926-1931)

• साइमन कमीशन और उसके बायकाट
• हरकोर्ट बटलर भारतीय राज्यों आयोग (1927)
• नेहरू रिपोर्ट और मुस्लिम लीग हिंदू महासभा आदि द्वारा अपनी अस्वीकृति
• दीपावली घोषणा
• लाहौर सत्र (1929)
• पूर्ण स्वराज की  घोषणा
• सविनय अवज्ञा आंदोलन और दांडी मार्च का शुभारंभ
• पहले गोलमेज कांग्रेस
• गांधी इरविन पैक्ट

👉 लार्ड विलिंग्डन (1931-1936)

• दूसरे और तीसरे गोलमेज सम्मेलन
• सांप्रदायिक पुरस्कार (1932) रामसे मैक डोनाल्ड द्वारा
• गांधी और अम्बेडकर के बीच पूना पैक्ट • (1932)
• सरकार भारत अधिनियम 1935 की
• आचार्य नरेन्द्र देव और जय प्रकाश नारायण से समाजवादी पार्टी के फाउंडेशन (1934)

👉 लॉर्ड लिनलिथगो (1936-1943)

• कांग्रेस मंत्रालयों का गठन
• कांग्रेस के अध्यक्ष जहाज से सुभाष चंद्र बोस का इस्तीफा
• फॉरवर्ड ब्लॉक का गठन
• और लिनलिथगो द्वारा
• अगस्त प्रस्ताव को कांग्रेस द्वारा अपनी अस्वीकृति
• मुस्लिम लीग द्वारा  उद्धार दिन (1939)
• क्रिप्स मिशन
• भारत छोड़ो आंदोलन

👉 लार्ड वावेल (1943-1947)

• सी.राजगोपालाचारी द्वारा सी.आर.फार्मूला
• वावेल योजना और शिमला सम्मेलन
• आईएनए परीक्षण
• नौसेना विद्रोह (1946)
• कैबिनेट मिशन (लॉरेंस, क्रिप्स और सिकंदर)
• अंतरिम सरकार और सीधी कार्रवाई दिवस के शुभारंभ का गठन

👉 लार्ड माउंटबेटन (1947)

• भारत और स्वतंत्रता का विभाजन .

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.

15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.

18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

जागतिक हिमोफिलिया दिन: 17 एप्रिल🎯

🎯जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) यांच्या नेतृत्वात रक्तस्त्राव विकाराने ग्रसित समुदायाद्वारे 17 एप्रिल 2020 रोजी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो.

🎯उद्दीष्ट: शरीराच्या काही भागांमधून किंवा नाकपूड्यामधून अचानकपणे रक्तस्त्राव होण्याच्या विविध विकारांविषयी जागृती पसरवणे हे या दिवसाचे आहे.

🎯2020 या वर्षाची संकल्पना: यंदा हा दिन ‘गेट+इनवॉल्व्ड व्हर्चूयली अँड स्टे सेफ’ या संकल्पनेखाली पाळण्यात आला. 

◾️पार्श्वभूमी

🎯फ्रँक शॅनाबेल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक हिमोफिलिया दिन पाळतात. फ्रँक शॅनाबेल हे एक उद्योगपती होते, जे गंभीर हिमोफिलिया घेऊन जन्मले होते.

🎯जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) याची स्थापना 1963 साली फ्रँक शॅनाबेल यांनी केली होती. संस्थेचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे.

🎯जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) कडून रक्तस्त्रावाचा विकार असलेल्या लोकांचे निदान आणि उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात सुधारण्यासाठी ग्लोबल अलायन्स फॉर प्रोग्रेस (DAP) कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

◾️हिमोफिलिया आजार

🎯हिमोफिलिया हा अनुवांशिक आजार आहे. हा आजार अनुवांशिकरित्या पालकांकडुन त्यांच्या मुलांना होतो. गुणसुत्रांतल्या दोषांमुळे हा आजार होत असुन आईकडुन मुलाला किंवा मुलाला गर्भावस्थेपासुन होण्याची शक्यता असते.

🎯हिमोफिलियाचे दोन प्रकार आहेत - हिमोफिलिया A (क्लोटिंग फॅक्टर 8 याच्या कमतरतेमुळे दर 5000 पुरुषांपैकी एकाला होतो) आणि हिमोफिलिया B (क्लोटिंग फॅक्टर 9 याच्या कमतरतेमुळे दर 30000 पुरुषांपैकी एकाला होतो).

🎯क्लोटिंग फॅक्टरच्या कमतरतेमुळे जखम झाल्यानंतर रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद असते आणि अधिक काळ उस्फुर्तपणे रक्तस्त्राव होतो.

अर्थमंत्रीचा जागतिक बँक आणि जागतिक नाणेनिधीच्या विकास समितीच्या बैठकीत सहभाग


- 17 एप्रिल 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नियामक मंडळाच्या मंत्रीस्तरीय विकास समितीच्या 101 व्या पूर्ण सत्रात सहभाग घेतला.

- या बैठकीत मुख्यतः कोविड-19 च्या आप्तकालीन परिस्थितीत, जागतिक बँकेचा प्रतिसाद, आणि कोविड19 कर्जविषयक निर्णय, आंतरराष्ट्रीय विकास संघटनेच्या सदस्य देशांना मदत करण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय निर्णय यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

▪️भारत सरकारने उचलेली पाऊले

- केंद्र सरकारने, समाजातील दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सुविधांसह, 23 अब्ज डॉलर्सचे पैकेज घोषित केले आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत विमा, रोख रक्कम हस्तांतरण, मोफत अन्नधान्य आणि गैस वितरण, आणि बाधित कर्मचाऱ्‍यांना सामाजिक सुरक्षा अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

- या अचानक आलेल्या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी, कंपन्यांना, विशेषतः लघू आणि मध्यम उद्योगांना मदत करण्यासाठी,सरकारने, प्राप्तीकर, जीएसटी, अबकारी, वित्तीय सेवा आणि कॉर्पोरेट व्यवहार अशा सर्व ठिकाणी कायदेशीर आणि नियामक बाबींमध्ये सवलती जाहीर केल्या आहेत.

▪️जागतिक बँक

- जागतिक बॅंक (World Bank) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त व पतपुरवठा संस्था आहे. संस्थेची स्थापना 1944 साली झाली. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी येथे जागतिक बॅंकेचे मुख्यालय आहे.

- संस्थेच्या स्थापनेसाठी ब्रेटन वुडस् सिस्टम समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे.

▪️आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)

- ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी झाली आणि प्रत्यक्ष कामकाज 1 मार्च 1947 रोजी सुरू झाले. त्याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.

- देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्‍या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते.

-  तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.
---------------------------------------------------

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...