०३ एप्रिल २०२२

तांदूळ वाण 'IR-8' व हरितक्रांती ला 50 वर्षे पूर्ण झाली

आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI) ने 29 नोव्हेंबर 1966 रोजी IR-8 च्या नावाने तांदळाची एक जात शोधून काढली होती. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक बियाणे हे प्रति हेक्टर फक्त दोन टन भाताचे उत्पन्न देते, तर IR-8 हे प्रति हेक्टर सात टन भाताचे उत्पन्न देते. आज या घटनेला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत.

या तांदळाची लागवड प्रथम 1966 साली फिलीपिन्स मध्ये  करण्यात आली होती. IRRI ही मुळची फिलीपिन्स मधील कृषि संशोधन संस्था आहे. फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन हे संस्थापक आहेत. तर मुख्यालय लॉस बॅनोस, लागुना, फिलीपिन्स मध्ये आहे.

IR-8 ची पार्श्वभूमी

भारतासह बहुतेक आशियायी देशांमध्ये दुष्काळ चालु असताना, तांदळाची उच्च उत्पादन क्षमतेची वाण विकसित करण्यासाठी सन 1960 मध्ये संशोधनाला सुरुवात करण्यात आली. पीटर जेनिंग्स, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे प्रथम तांदूळ प्रजनक (rice breeder) (1961-67) यांनी यामध्ये नेतृत्वपूर्ण कामगिरी केली. संशोधकांनी चीन, तैवान आणि इंडोनेशिया पासून मिळालेल्या तांदूळ वाणांचे 38 अलग-अलग संकरीत वाण तयार केले.

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, हेन्री एम. बिचेल, जेनिंग्स यांचे सहकारी, यांनी तांदळाच्या डी-जिओ-वू-गेन आणि पेटा या वाणांचे संकरीत स्वरूप म्हणून IR8-288-3 या नव्या वाणाचा विकास केला आणि फिलीपिन्स मध्ये त्याचे परीक्षण केले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यावेळी 88 किलो शुद्ध बियाणांच्या पेरणीपासून 71 टन भाताचे उत्पादन झाले होते. त्यानंतर, 29 नोव्हेंबर 1966 रोजी IRRI ने या नव्या जातीला अधिकृतपणे IR-8 हे नाव दिले आणि जाहीर केले.

हरित क्रांती आणि भारत

फिलीपिन्स मध्ये मिळालेल्या परिणामानंतर, भारत हा मोठया प्रमाणात भात खाणारा देश असल्यामुळे, दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, सन 1967 मध्ये, एन. सुब्बा राव यांनी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा अटचंता मध्ये 2,000 हेक्टर क्षेत्रात IR-8 ची पेरणी केली. हा क्षण म्हणजे भारतामध्ये भात लागवडीमधील क्रांतीचा भाग झाला.

कमी वाढ कालावधी व उच्च उत्पन्न तसेच नायट्रोजन खताला प्रतिसाद देणारे वाण असल्यामुळे IR-8 हे शेतकर्‍यांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. कीटक प्रतिरोधक हे आणखी एक कारण होते. शिवाय, आकाराने खूपच लहान असल्याने, IR8 हे वाराधून परिस्थितीत उभे राहू शकत होते. IR-8 हे फक्त 105 दिवसांत कापणीसाठी तयार होते.

त्यानंतर, भारतीय शास्त्रज्ञांनी IR-20, IR-36, आणि IR-50 असे अनेक वाण विकसित केले आहे.

भारत आणि फिलीपिन्स मधील,  यशानंतर डॉ. जेनिंग्स यांनी युद्धाने ग्रासलेल्या व्हिएतनाम मध्ये याची लागवड करण्यात आली. व्हिएतनाम मध्ये याला कौतुकाने "होंडा राइस" असे म्हणतात, कारण याच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे शेतकऱ्यांना पैसे कमावता आले. ज्यामधून त्यांनी होंडा मोटारसायकल घेण्यास सुरू केले होते.

हवामानातील बदलाचा उत्पन्नावर परिणाम

2010 साली, फील्ड क्रॉप्स रिसर्च जर्नल कडून प्रकाशित अभ्यासामधून हे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे, IR-8 च्या उत्पादन क्षमतेत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. गरम रात्री, वारंवार येणारे पुर आणि प्रदूषण हे यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे आणि लक्षात ठेवा


🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग
🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔 प. बंगाल............... दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 केरळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू............. उटी
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल
🏔 तामिळनाडू............. कुन्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

.        🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) गॅमा किरणांची गती अल्फा किरणांच्या गतीहून .... असते.
- अधिक

🔹२) पिवळा फॉस्फरस .... मध्ये द्रावणीय आहे.
- बेन्झीन

🔸३) .... हा वायू नॅचरल गॅसमध्ये असतो.
- इथिलिन

🔹४) अभिक्रियाकारकातील अणूंमधील बंध तुटण्याची प्रक्रिया ही .... असते.
- उष्माग्राही

🔸५) किरणोत्सारित मूलद्रव्याने एक बीटा कण उत्सर्जित केला की त्याचा अणुक्रमांक .... ने वाढतो.
- एक

गोदावरी नदीबद्दल सविस्तर माहिती आणि भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखर आणि महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे

◆ गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. 

◆ दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. 

◆ गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. 

◆ रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. 

◆ महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. 

◆ महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. 

◆ हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता.  

★ गोदावरी नदीचा उगम :-

◆ सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हगीरी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. 

◆ ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. 

◆ या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या 3 राज्यांतुन वाहते. 

◆ गोदावरी नदीची एकूण लांबी 1465 किमी एवढी आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. 

◆ संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे.

◆ गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते :- १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

★ गोदावरीच्या उपनद्या:-

◆ पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका,बोरा इत्यादी.

★ गोदावरी नदीच्या काठावरील शहरे:-

◆ नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

★ गोदावरी नदीवरील धरणे:-

◆ गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले.

◆ महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. 

◆ जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसागर” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.

.⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

🟤महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे🟤
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

◆प्रवरा नदी व मुळा नदी  -  नेवासे, अहमदनगर

◆मुळा व मुठा नदी - पुणे

◆गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा, गडचिरोली

◆तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव

◆कृष्णा व वेष्णानदी -  माहुली, सातारा

◆तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

◆कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी, सांगली

◆कृष्णा व कोयना -  कराड, सातारा

◆गोदावरी व प्रवरा  - टोके, अहमदनगर

◆कृष्णा व येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली



कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

◆ पालघर जिल्हा -
         दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

◆ ठाणे जिल्हा -
         भातसई , काळू , उल्हास

◆ रायगड जिल्हा -
         पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

◆ रत्नागिरी जिल्हा -
           सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

◆ सिंधुदुर्ग जिल्हा -
          काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

पर्जन्य आणि उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार:

पर्जन्य 👇
      आफ्रिकेतील कांगो नदीखोरे व दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन नदीखोऱ्यातील विषुववृत्तीय प्रदेशात आरोह पर्जन्य पडतो.

🌺 आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरुपाचा पर्जन्य आहे.

🌺 आरोह पर्जन्याचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे.

🌺 प्रतिरोध पर्जन्य जगातील सर्वाधिक प्रदेशांत पडतो.

🌺 समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आवर्त पाऊस अधिक पडतो.
१ चौकिमी प्रदेशावर १ मिमी पाऊस पडल्यास, त्यापासून १० लाख लिटर पाणी मिळते.

🌺 १२० मिमी बर्फाचा थर हा १० मिमी पावसाइतका असतो.

🌺 ईशान्यकडील मॉसिनराम येथे प्रतिरोध पर्जन्य जगातील सर्वाधिक प्रदेशांत पडतो.



उद्रेकानुसार ज्वालामुखीचे प्रकार:

१)केंद्रीय ज्वालामुखी : 

      ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो ,तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात
या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडलेले पदार्थ नळीच्या मुखाभोवती साचतात .त्यामुळे शंकूच्या आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची निर्मिती होते.उदा.किलीमांजारो तांझिया

२)भेगीय ज्वालामुखी :

       ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगातून बाहेर पडतो , त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात .या क्रियेत ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांभोवती साचतात .त्यामुळे ज्वालामुखीत पठाराची निर्मिती होते उदा. महाराष्ट्र पठार

महाराष्ट्रातील नद्यांची माहिती (उतरत्या क्रमाने) आणि महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे

🔰 नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार (चौ.किमी):

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

⛲️⛲️महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे⛲️⛲️

  अकलोली ठाणे

उनकेश्वर

उनपदेव

उन्हेरे

गणेशपुरी

खेड (रत्नागिरी)

तुरळ

देवनवरी

राजवाडी

राजापूर

वज्रेश्वरी

सव

सातिवली

सुनपदेव

पाली

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे

    बंदरे         -     राज्य

1) कांडला - गुजरात

2) मुंबई - महाराष्ट्र

3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्

4) मार्मागोवा - गोवा

5) कोचीन - केरळ

6) तुतीकोरीन - तमिळनाडू

7) चेन्नई - तामीळनाडू

8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

9) पॅरादीप - ओडिसा

10)न्यू मंगलोर - कर्नाटक

11) एन्नोर - आंध्रप्रदेश

12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल

13) हल्दिया - पश्चिम बंगाल

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था आणि महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)


🔴महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

महत्त्वाची माहिती आणि भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

☑️ एकूण वातावरणाच्या सुमारे ९७% वातावरण समुद्र सपाटीपासून सुमारे २९ कि.मी. उंची पर्यंतच सामावलेले आहे.

☑️ भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. उंची पर्यंतच्या भागात वातावरणातील वायूंचे प्रमाण सर्वत्र सारखे असून या आवरणातील रासायनिक घटना सर्वत्र समान असते म्हणून या थराला समावरणाचा थर म्हणतात.

☑️ समावरणाच्या थरात वातावरणातील एकूण वायूंपैकी नायट्रोजन व ऑक्सिजन यांचे प्राबल्य सर्वात जास्त म्हणजे ९९.०३% इतके असते. तर भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. च्या वर वातावरणाच्या भागाला विषमावरण म्हणतात.

☑️ पृथ्वीच्या संपुर्ण वातावरणाच्या वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पहिल्या 30 किलोमीटर च्या आत केंद्रित आहे.

☑️ तापमान व इतर घटकांचा विचार करून वातावरणाचे खालील स्तरांमध्ये विभाजन केले जाते.
1) तपांबर (Troposphere)
2) स्थितांबर (Stratosphere)
3) दलांबर/आयनांबर) (Ionosphere)
4) बाह्यम्बर (Exosphere)


⛰ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰

▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)

लक्षात ठेवा आणि भारतातील महत्वाची सरोवरे

1) भारताचे संरक्षण, अणुऊर्जा, रेल्वे, खाणी, आयकर हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कोणत्या सूचीत नमूद केलेले आहेत ?
- केंद्र सूची

2) शिक्षण, कुटुंबकल्याण, वीज, वने हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील ------------- मध्ये दिलेले आहेत.
- समवर्ती सूची

3) पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक आरोग्य हे विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील ------------------ मध्ये नमूद केलेले आहेत.
- राज्य सूची

4) राष्ट्रपती जेव्हा -------------  या कलमान्वये आणीबाणी पुकारतात तेव्हा घटनेतील एकोणिसावे कलम व त्यात अंतर्भूत असलेली सहा स्वातंत्र्ये आपोआपच रद्दबातल ठरतात.
- 352

5) भारताच्या घटना समितीचे वैधानिक सल्लागार म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल ?
- डॉ. बी. एन. राव


🔹भारतातील महत्वाची सरोवरे 🔹

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

*गट - क - 3 एप्रिल पूर्व परीक्षा* *चालू घडामोडी उत्तरे*


1. कोव्हीड- 19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानांसंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्च स्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली आहे ?

(1) अरुंधती रॉय

(2) अमर्त्य सेन

(3) जयती घोष🔰

(4) रघुराम राजन

2. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये पी.एस.ए. ऑक्सिजन प्लांटस बसविण्यास मंजूरी देण्यात आली. पी.एस.ए. (PSA) चा विस्तार काय आहे ?

(1) प्रेशर स्विंग अॅडसॉर्पशन
(Pressure Swing Adsorption)🔰

(2) प्रेशर स्लिप अॅडजेस्टमेंट

(3) प्रायमरी स्टोअरेज अॅडमिनीस्ट्रेशन

(4) प्रायमरी स्लिप अॅडजेस्टमेंट

3. ए.के.-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेटप्रुफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे ?

(1) बिपीन रावत

(2) वेदप्रकाश मलीक

(3) अनुप मिश्रा 🔰

(4) रंजन मथाई

Que.4 .'माय पॅड माय राईट' या नावाचा, नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?

(1) गुजरात

(2) तामिळनाडू

(3) त्रिपुरा🔰

(4) उत्तर प्रदेश

Que. 5.खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी (मूळ रहिवासी) लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे ?

(1) इटली

(2) फ्रान्स

(3) ऑस्ट्रेलिया🔰

(4) स्पेन

Que.6
30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरियामुक्त म्हणून प्रमाणित केले आहे ?

(1) बांग्लादेश

(2)कॅनडा

(3) भारत

(4) चीन🔰

Que.7 .कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक्ट मॉनिटरिंग उपग्रह 'आर्क्टिका एम. प्रोषित केला आहे ?

(1) रशिया🔰

(2) जपान

(3) चीन

(4) जर्मनी

Que. 8.
कोणत्या राज्य सरकारने 'कॉपर महसीर' नावाच्या मास्याला 'राज्य मासा' म्हणून घोषित केले ?

(1) आसाम

(2) सिक्किम🔰

(3) ओडीशा

(4) मणिपूर

Que. 9.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यानों का स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे?

(1) ऑकुस ( AUKUS)🔰

(2) इन्डपॅक

(3) युसा

(4) यापैकी नाही

Que.10
'द बॅटल ऑफ रेझांग ला' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

(1) संतोष यादव

(2) कुलप्रित यादव🔰

(3) नेहा सिंग

(4) विजयद

11. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) इंग्लंड

(2) कॅनडा🔰

(4) फ्रान्स

(3) अमेरिका

12. ऑटोमोबाईल्ससाठी आशियातील सर्वात लांब हाय-स्पीड ट्रॅक

येथे आहे.

(4) चेन्नई

(1) पुणे

(2) इंदौर🔰

(3) मुंबई

13. कोणत्या राज्याने आय.एल.जी.एम.एस. (ILGMS) नावाचे पोर्टल सुरू केले आहे?

(1) आसाम

(2) ओडीशा

(3) केरळ🔰

4) ओडिशा

14. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(1) अशोक सिंग

(2)  धुर्ती बॅनर्जी 🔰

(4) दृष्टी धमिजा

(3) स्नेहा अग्रवाल

15. इमा मॅकीअन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे?

(1) अमेरिका

(2) ऑस्ट्रेलिया🔰

(3) जर्मनी

(4) इंग्लंड

०२ एप्रिल २०२२

आजचे प्रश्नसंच

Current Affairs Quiz  With Answers

Q : अलीकडे, EIU ने जारी केलेल्या अहवालानुसार, जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते?

(अ) मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

(ब) कोपनहेगन (डेन्मार्क)✅✅

(क) मुंबई   (भारत)

(ड) टोकियो  (जपान )

Q :अलीकडेच, 2021 च्या प्रकाशित झालेल्या ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्समध्ये भारताचे स्थान काय आहे?

(अ) पहिला

(ब) दुसरा ✅✅

(क) तिसरा

(ड) चौथा

Q :  अलीकडे, टोकियो पॅरालिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे?

(अ) भाविना पटेल

(ब) गायत्री नेहरा

(क) अवनी लेखरा✅✅

(ड) यापैकी नाही

Q : अलीकडे  “राष्ट्रीय क्रीडा दिन” हा कोणत्या खेळाडूच्या नावाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो?

(अ) बलबीर सिंह Sr.

(ब) मेजर ध्यानचंद✅✅

(क) सचिन तेंडुलकर

(ड) नीरज चोप्रा

Q :  अलीकडेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?

(अ) शरद अरविंद बोबडे

(ब) विवेक राम चौधरी

(क) न्या. व्ही.एन.रमण्णा

(ड)  न्या. प्रणय वर्मा✅✅

Q : अलीकडे  कोणत्या फिनटेक फर्मने "12% क्लब" नांवाचा ऍप लाँच केला आहे?

(अ) फोनपे

(ब) पेटीएम

(क) भारतपे✅✅

(ड) गूगलपे

Q : अलीकडेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) नवे अध्यक्ष कोण झाले आहेत?

(अ) एस. जयशंकर

(ब) जे.बी. महापात्रा✅✅

(क) प्रदीप कुमार जोशी

(ड) विवेक राम चौधरी

प्र. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शहरी शेतीसाठी एक मेगा मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर :- दिल्ली सरकार

प्र. 'कौशल्य मातृत्व योजना' कोणत्या सरकारने सुरू केली आहे?
उत्तर :- छत्तीसगड

प्र. WHO ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनची स्थापना अलीकडे कुठे केली जाईल?
उत्तर :- जामनगर

प्र. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मातृशक्ती उद्यमिता योजना जाहीर केली आहे?
उत्तर :- हरियाणा

प्र. नुकताच जगभरात धुम्रपान निषेध दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- ९ मार्च

प्र. अलीकडेच कोणत्या ऑलिम्पिक चॅम्पियनने पोल व्हॉल्टमध्ये नवीन विश्वविक्रम केला आहे?
उत्तर :- आर्मंड गुस्ताव्ह डुप्लँटिस

प्र. इटलीमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रँडिस्की कॅटोलिका इंटरनॅशनल ओपनमध्ये कोणाला विजेता घोषित करण्यात आले?
उत्तर :- एस एल नारायणन

प्र. अलीकडेच यूएस इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर :- रिजवाना हसन

प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने गुवाहाटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कागदी मतपत्रिकांच्या जागी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा प्रस्ताव मंजूर केला आहे?
उत्तर :- आसाम

प्र. अलीकडेच कोणाला इंडियन एअर फोर्स अकादमी (IAFA) चे कमांडंट बनवण्यात आले आहे?
उत्तर :- बी चंद्रशेखर

वाचा :- महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...