३१ मार्च २०२२

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवेवरील स्थगितीला मुदतवाढ.

🎨नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणावर असलेल्या स्थगितीची मुदत ‘पुढील आदेशापर्यंत’ वाढवण्यात आली असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी सांगितले. यापूर्वी १९ जानेवारीला या स्थगितीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

🎨करोना महासाथीच्या फैलावानंतर भारतात २३ मार्च २०२० पासून नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित करण्यात आली आहे. तथापि, काही देशांसोबत करण्यात आलेल्या करारानुसार (एअर बबल अरेंजमेंट) भारत आणि सुमारे ४५ देशांदरम्यान जुलै २०२० पासून विशेष प्रवासी सेवांचे संचालन होत आहे.

🎨‘भारतातून जाणाऱ्या व भारतात येणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांवरील स्थगितीची मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमान सेवा आणि डीजीसीएने खास करून मंजुरी दिलेल्या उड्डाणांना लागू होणार नाहीत’, अ्से डीजीसीएने सोमवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे.

🎨एअर बबल व्यवस्थेंतर्गतच्या विमानोड्डाणांवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०२१ पासून भारत नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू करेल, असे डीजीसीएने २६ नोव्हेंबर २०२१ ला जाहीर केले होते.

🎨दुसऱ्याच दिवशी, करोनाच्या ओमायक्रॉन या उपप्रकाराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय व डीजीसीए यांना केले होते. यानंतर, या विमानसेवेवरील स्थगिती किती काळ कायम राहील याचा उल्लेख न करता डीजीसीएने १ डिसेंबर २०२१ रोजी आपला २६ नोव्हेंबरचा निर्णय फिरवला होता.

युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी यांचे निधन.

🌛🌷ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ व सातारा येथील युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर नारायण ऊर्फ पी. एन. जोशी (वय ९०) यांचे साताऱ्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. संगम माहुलीतील कैलास स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

🌛🌷बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील नामवंत जाणकार म्हणून त्यांची देशभर ओळख होती. त्यांनी रिझव्‍‌र्ह बँक, सारस्वत बँक, बँक ऑफ इंडियात विविध पदांवर काम केले. सातारच्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. निवृत्तीनंतर ते साताऱ्यात स्थायिक झाले होते. सातारच्या सामाजिक, सांस्कृतिक व इतर कामांत त्यांचा मोठा सहभाग होता.

🌛🌷बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील सरकारच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी लोकसत्ता आणि विविध माध्यमांतून लिखाण केले. त्यांची ‘माय मेमरीज-गिलीम्सेस ऑफ चेंजिंग बँकिंग सिनॅरिओ’, ‘बँकिंग आणि वित्त धोरण – एक परामर्श’, ‘बदलत्या बँकिंगच्या छटा - माझ्या आठवणी’ (मराठी) व ‘नॅशनल बँकिंग पॉलिसी फॉर इनक्लुसिव्ह डेव्हलपमेंट’ ही पुस्तकं गाजली. खासगी बँक संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यांचे आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अर्थशास्त्रात नियमित वाचन होते. बँकिंग साक्षरतेसाठी त्यांनी राज्यभर लोकजागृती करण्याचे मोठे काम केले.

राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात घट.


🔄राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुमारे १३०० कोटींनी घट झाली आहे. ओमायक्रॉनच्या लाटेत लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

🔄फेब्रुवारी महिन्यात राज्यात वस्तू आणि सेवा कराचे १९ हजार ४२३ कोटींचे संकलन झाले. जानेवारी महिन्यात राज्यात २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले होते. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात संकलनात १२८२ कोटींची घट आली. राष्ट्रीय पातळीवर जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत ५.६ टक्के घट झाली. महाराष्ट्रातही हा कल कायम राहिला.

🔄फेब्रुवारीत २८ दिवस असल्याने जानेवारीच्या तुलनेत संकलन कमीच होते. पण याबरोबरच ओमायक्रॉनच्या लाटेमुळे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीत लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी याचा संकलनावर परिणाम झाल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांची तुलना केल्यास फेब्रुवारीतील संकलन घटले आहे.

आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी.

📛रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यानचे युद्ध सुरूच असून रशियाने युक्रेनमधील सर्वात मोठा झापोरिझ्झिया अणुऊर्जाप्रकल्प शुक्रवारी ताब्यात घेतला. हा युरोपातील सर्वात मोठा प्रकल्प आहे.

📛तसेच युक्रेनच्या दक्षिण भागात युद्ध चिघळले असून, या भागातील खेर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेले पहिले शहर आहे. मारिओपोल, चेर्निव्ह आणि खारकीव्ह येथे तीव्र संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे आपण युक्रेनशी चर्चा करण्यास तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटलंय.

📛रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोट केल्याचे आरोप फेटाळत  आपल्या मागण्या मान्य झाल्यास युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलंय. रशियाचे अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनने म्हटले आहे की युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोटांचे वृत्त खोटे आणि बनावट आहेत.

📛युक्रेनची राजधानी किव्ह आणि इतर प्रमुख शहरांमध्ये रशियाने हवाई हल्ला केल्याच्या बातम्या खोट्या असून आमचा अपप्रचार करण्यात येतोय, असं ते म्हणाले. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच युक्रेनसोबत चर्चा शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रेमलिनच्या म्हणण्यानुसार, या युद्धासंदर्भात युक्रेन आणि इतर सर्वांशी चर्चेचा पर्याय रशियासाठी खुला आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची अट ठेवली आहे.

चीनच्या लाँग मार्च-8 रॉकेटने 22 उपग्रह अवकाशात सोडले.


🔻चीनच्या दुसऱ्या लाँग मार्च 8 रॉकेटने विविध व्यावसायिक चिनी अंतराळ कंपन्यांसाठी देशांतर्गत विक्रमी 22 उपग्रह प्रक्षेपित केले. 

🔺चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (CASC) ने नंतर प्रक्षेपण यशस्वीतेची पुष्टी करून , लाँग मार्च 8 ने 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10:06 वाजता वेनचांग उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून उचलले .

🔻या उपग्रहांचा वापर प्रामुख्याने व्यावसायिक रिमोट सेन्सिंग सेवा, सागरी पर्यावरण निरीक्षण, जंगलातील आग प्रतिबंध आणि आपत्ती निवारणासाठी केला जाईल. 

🔺या मोहिमेने लाँग मार्च वाहक रॉकेटचे ४०९ वे उड्डाण केले.

⚠️सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे : 

🌀चीनची राजधानी: बीजिंग;

🌀चीनचे चलन: रॅन्मिन्बी;

🌀चीनचे अध्यक्ष: शी जिनपिंग

कोव्होवॅक्स लशीला मंजुरी.

💡सीरम इन्स्टिटय़ूटच्या १२ ते १७ वर्षे वयोगटासाठीच्या कोव्होवॅक्स लशीचा आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. करोनाविषयक तज्ज्ञ समितीने गेल्या आठवडय़ात या वयोगटासाठी कोव्होवॅक्स लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरीची शिफारस केली होती़ 

💡त्यानुसार केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून ही मंजुरी मिळाली आहे. १२ ते १७ वर्षे वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी ही परवानगी सशर्त दिल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.

💡१२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार ७०७ मुलांवरील दोन अभ्यासांमधील आकडेवारीनुसार कोव्होवॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिबंधक, सुरक्षित असल्याचे औषध महानियंत्रकांकडे करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होत़े.

💡  १८ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली कोव्होवॅक्स ही चौथी लस आह़े

💡१५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सरसकट लसीकरणाबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

💡लसीकरणाची अतिरिक्त गरज आणि लसीकरणासाठी लोकसंख्येच्या समावेशाची व्याप्ती किती वाढवायची, याबाबत सतत तपासणी केली जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Russia Ukraine War:”…तर तिसरं महायुद्ध होईल”; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा गंभीर इशारा.

🍄अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. रशियाने जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची रशियाला मोठी किंमत चुकवावी लागेल असं बायडन म्हणाले आहे. अमेरिका युक्रेनमध्ये रशियाशी लढणार नाही. तसंच नाटो आणि क्रेमलिनच्या दरम्यान भिडल्यास तिसरं महायुद्ध होईल, असा इशाराही ज्यो बायडन यांनी दिला आहे. तसंच युक्रेनसोबतच्या लढाईत रशिया कधीच जिंकणार नाही, असंही बायडन म्हणाले आहेत.

🍄२४ फेब्रुवारी रोजी रशियाच्या सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. २७ फेब्रुवारीला मॉस्कोने युक्रेनमधली दोन वेगळी क्षेत्रं डोनेट्स्क आणि लुहान्स्कला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ज्यो बायडन यांनी सांगितलं की आम्ही युरोपात आमच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देणं सुरूच ठेवणार आहोत.

🍄आम्ही संपूर्ण ताकदीनिशी नाटो क्षेत्राच्या इंच न इंच भागाचं रक्षण करू आणि नाटोमधल्या अन्य देशांनाही यासाठी प्रेरित करू. त्यांनी सांगितलं की आम्ही युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात युद्धात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. बायडन यांनी सांगितलं की नाटो आणि रशिया थेट भिडल्यास तिसर महायुद्ध होईल. आम्ही ते रोखण्याचा प्रयत्न करू.

🍄या आधी बायडन यांनी रशियाची दारू, सी-फूड आणि हिऱ्यासह अन्य व्यापारी संबंधांवर निर्बंध लावण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी बायडन म्हणाले की आता जग पुतीन यांचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहे.

राज्यावरील कर्जाचा बोजा साडेसहा लाख कोटींवर ; तूट २० हजार कोटींनी वाढली, प्रमुख स्रोत आटले.

✅पुढील आर्थिक वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा हा साडेसहा लाख कोटींवर जाणार आहे. यंदाच्या वर्षांत तूट ही २० हजार कोटींनी वाढली आहे. करोनाचा फटका लागोपाठ दुसऱ्या वर्षांही राज्याच्या तिजोरीला बसला असून, जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, वाहन कर, उत्पादन शुल्क या मुख्य आर्थिक स्त्रोतात घट झाली आहे. 

✅गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना १० हजार २२६ कोटींची तूट अपेक्षित होती. नैसर्गिक आपत्ती आणि चक्रीवादळामुळे खर्चात वाढ झाली. परिणामी तूट २० हजार कोटींनी वाढली व ती ३० हजार कोटींवर जाणार आहे. २०२०-२१ मध्ये महसुली तूट ही ४१,१४२ कोटी होती. यंदाच्या वर्षांत ती ३० हजार कोटी असून, पुढील आर्थिक वर्षांत ती तूट २४ हजार ३५३ कोटी होईल, असा अंदाज आहे. प्रत्यक्ष तूट वाढू शकते. आकस्मिक खर्च २३ हजार कोटी झाला आहे.

✅नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या वर्षांत खर्च वाढला. यामुळे ९० हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले. २०२०-२१ या वर्षांत ६५ हजार कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. पुढील वर्षांत ७७ हजार कोटींचे कर्ज काढण्याचे उद्दिष्ट आहे.  राज्य सकल उत्पन्नाच्या तीन टक्के कर्ज काढण्यास मान्यता असल्याने तेवढय़ा रक्कमेचे कर्ज काढण्यात आले. ही मर्यादा वाढविण्यात आली तरी राज्याने अतिरिक्त कर्ज काढण्याचे टाळले होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा (महिला) - महाराष्ट्राच्या महिला संघाचा दोन वर्षांनी बाद फेरीत प्रवेश.

📕महाराष्ट्राच्या महिला संघाने शुक्रवारी साखळी सामन्यांत तेलंगण आणि चंडीगड या संघांवरील दोन विजयांसह फ-गटातून बाद फेरीतील प्रवेश केला. पाटणा आणि जयपूर येथे झालेल्या गेल्या दोन राष्ट्रीय स्पर्धामध्ये महाराष्ट्राचा संघ साखळीतच गारद झाला होता.

📕महाराष्ट्राने सायंकाळच्या सत्रात चंडीगडला ४०-१८ असे सहज नमवले. या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावातच २३-१३ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात आणखी जोरदार खेळ करीत १७ गुणांची भर टाकली. महाराष्ट्राच्या या विजयात स्नेहल शिंदेच्या धारदार चढायांचा मोलाचा वाटा आहे. तिने एकाच चढाईत ४ गडी टिपण्याचा पराक्रम केला. पूजा यादवची तिला चढाईत तर सायली केरीपाळे, पूजा शेलार यांची पकडींची साथ लाभली.

📕त्याआधी, सकाळच्या सत्रात महाराष्ट्राने तेलंगणावर ४८-१४ असा दिमाखदार विजय नोंदवला. मध्यंतराला महाराष्ट्राने २६-१० अशी आघाडी घेतली होती. शनिवारी महाराष्ट्राची शेवटची साखळी लढत छत्तीसगडशी होईल.

केंद्र सरकारकडून पर्यटन व्हिसा पूर्ववत "

⛔️करोनाकाळात बंद करण्यात आलेला ई-पर्यटन व्हिसा केंद्र सरकारने पूर्ववत केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ १५६ देशांतील नागरिकांना होणार आहे.

⛔️सर्व देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा नियमित पर्यटन व्हिसाही आता मिळणार असून त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात आली. 

⛔️अमेरिका आणि जपान या देशांतील नागरिकांसाठी देण्यात येणारा १० वर्षांसाठीचा नियमित पर्यटन व्हिसाही पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

⛔️करोना रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याने मार्च २०२० पासून केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी असणारा पर्यटन व्हिसा देणे बंद केले होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाल्याने हे पुन्हा सुरू केले आहे.

कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या

नदी  -------- खाडी

वैतरणा -------दातीवर

उल्हास --------वसई

पाताळगंगा------- धरमतर

कुंडलिका -------रोह्याची खाडी

सावित्री -------बाणकोट

वशिष्ठी ------दाभोळ

शास्त्री ------जयगड

शुक -------विजयदुर्ग

गड -------कलावली

कर्ली ------ कर्ली

तेरेखोल -----तेरेखोल

बँकांचे राष्ट्रीयकरण

भारतातील बँकांचे राष्ट्रीयकरण

स्वातंत्र्यानंतर  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले. काही वर्षांनंतर,  1955 मध्ये, इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचेदेखील राष्ट्रीयकरण झाले आणि त्याचे नामकरण भारतीय स्टेट बँक करण्यात आले . नंतर  1959  मध्ये भारतीय स्टेट बँक कायदा तयार करून आठ प्रादेशिक बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. सध्या या आठ बँकांना स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुप बँक म्हणतात. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बीकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ इंदूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर इत्यादी या आठ बँकांची नावे आहेत. त्याच्या देशभरात सुमारे 15,000 शाखा आहेत.

१ July जुलै 1969 रोजी देशातील चौदा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. या सर्व वाणिज्य बँका होत्या. त्याचप्रमाणे    १ April एप्रिल  1980  रोजी खासगी क्षेत्रातील आणखी सहा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. या सर्व वीस बँकांच्या शाखा देशभर पसरलेल्या आहेत. 

स्वातंत्र्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

     स्वातंत्र्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्रीय बँकेचा दर्जा कायम ठेवला. तसेच त्याला 'बँक ऑफ बँक' घोषित केले गेले. सर्व प्रकारच्या आर्थिक धोरणे ठरविण्याची आणि इतर बँका आणि वित्तीय संस्थांकडून ती अंमलात आणण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रित व नियामक शक्तींनी या कार्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

ठळक/घटना/घडामोडी

📊१६६५: मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यास सुरूवात केली.

📊१८६७: डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली.

📊१९६४: मुंबईतील विजेवर चालणाऱ्या ट्रॅम बंद झाल्या.

📊१९७०: १२ वर्षे अंतराळात भ्रमण करून एक्सप्लोअरर-१ हे अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत परतले.

📊१९६६: रशियाने ल्यूना-१० हा चंद्राचा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडला.

📊२००१: सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय सामन्यात १०,००० धावा पूर्ण केल्या.

📊१९०१: पहिली मर्सिडिज कार तयार करण्यात आली. ज्या ऑस्ट्रियन राजकीय अधिकार्‍यासाठी ती बनवली गेली, त्याच्या मुलीचे नाव या गाडीस देण्यात आले.


जन्मदिवस/जयंती
━━━━━━━━━━━━

📊१५०४: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचा जन्म.

📊१८४३: नाटककार बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म.

📊१८७१: स्वातंत्र्यसैनिक कर्नाटकसिंह गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचा जन्म.

📊१९७२: ट्विटर चे सहसंस्थापक इव्हान विल्यम्स यांचा जन्म.

💁‍♂पुण्यतिथी/स्मृतीदिन
━━━━━━━━━━━━━

📊१९७८: इन्सुलिन चे सहनिर्माते चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचे निधन.

📊२००४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचे निधन.

📊२००४: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचे निधन.

लक्षात ठेवा

.         
     
🔹2000 च्या नोटवर ➖ मंगलयान

🔹500 च्या नोटवर ➖ लाल किल्ला

🔹200 च्या नोटवर ➖ सांची स्तूप

🔹100 च्या नोटवर ➖ राणीची बाग

🔹50  च्या नोटवर ➖ हंपीचा रथ

🔹20  च्या नोटवर ➖ वेरूळच्या गुफा

🔹10  च्या नोटवर ➖ कोणार्क सूर्य मंदीर

लक्षात ठेवा

🔸१) सन १९३६ मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिलेच अधिवेशन 'फैजपूर' येथे भरले होते. फैजपूर काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते ....
- पंडित जवाहरलाल नेहरू

🔹२) .... या वर्षी गांधीजींनी भारतात प्रथमच असहकाराचा लढा सुरू केला.
- सन १९२०

🔸३) गांधीजींनी सविनय कायदेभंगाचा लढा सुरू केला ....
- १२ मार्च, १९३०

🔹४) सन १९४२ मधील छोडो भारत आंदोलनादरम्यान पुण्यात स्थापन झालेल्या गुप्त रेडिओ केंद्रात कोणाचा सहभाग होता ?
- शिरूभाऊ लिमये

🔸५) ८ ऑगस्ट, १९४२ रोजी .... येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 'चले जाव'चा ठराव संमत केला.
- मुंबई

🔸१) जालियनवाला बाग अमृतसर येथील हत्याकांड ....
- १३ एप्रिल, १९९९

🔹२) "माझ्याजवळ आणखी दारूगोळा असता तर मी अधिक लोक मारले असते." अशी दर्पोक्ती काढणारा जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड घडविणारा लष्करी अधिकारी ....
- जनरल डायर

🔸३) डिसेंबर, १९२९ मध्ये लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली. हे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू

🔹४) महात्मा गांधी आणि व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यामध्ये 'गांधी-आयर्विन करार' घडून आला.
- ५ मार्च, १९३९

🔸५) इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर करून हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे घोषित केले ....
- ऑगस्ट, १९३२



जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली ?
🎈कुतुबुद्दीन ऐबक. ( १२०६ मध्ये )

💐 हडप्पाकालीन धौलावीरा स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
🎈गुजरात.

💐 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ 'कैसर-ए-हिंद' पदवी कोणी परत केली ?
🎈महात्मा गांधी.

💐 इंग्रज व सिराज उद्दोला यांच्यात निर्णायक प्लासी युद्ध कधी झाले ?
🎈२३ जून १७५७.

💐 इंग्लंडची महाराणी हिक्टोरिया यांना 'भारत की सम्राज्ञी' ही पदवी कधी देण्यात आली ?
🎈१ जानेवारी १८७६.

💐 कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीने 'पेमेंट बॅंक सेवा' सुरू केली आहे ?
🎈एअरटेल.

💐 देशात वीजनिर्मितीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो ?
🎈हिमाचल प्रदेश.

💐 निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?
🎈गिधाड.

💐 देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकादमीचे अध्यक्ष कोण ?
🎈न्या.अरूण चौधरी.

💐 सार्क ( SAARC ) म्हणजे काय ?
🎈द साउथ एशियन असोसियशन फाॅर रिजनल को-ऑपरेशन.

💐 कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीने 'पेमेंट बॅंक सेवा' सुरू केली आहे ?
🎈एअरटेल.

💐 देशात वीजनिर्मितीत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो ?
🎈हिमाचल प्रदेश.

💐 निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा पक्षी कोणता ?
🎈गिधाड.

💐 देशातील प्रसिद्ध चंदीगड ज्युडिशियल अकादमीचे अध्यक्ष कोण ?
🎈न्या.अरूण चौधरी.

💐 सार्क ( SAARC ) म्हणजे काय ?
🎈द साउथ एशियन असोसियशन फाॅर रिजनल को-ऑपरेशन.

31 मार्च 2022 चालू घडामोडी

प्र.1 अलीकडेच कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीला टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड्स 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- दीपिका पदुकोण

प्र.2 स्टेप-अप टू एंड टीबी - वर्ल्ड टीबी डे समिट नुकतेच कधी आयोजित करण्यात आले?
उत्तर :- २४ मार्च

प्र.3. अलीकडेच रॉबर्ट अबेला यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
उत्तर :- माल्टा

प्र.4. अलीकडेच ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू कोण बनला आहे?
उत्तर :- रवींद्र जडेजा

प्र.5 अलीकडेच फिलीपिन्सने कोणत्या देशाच्या सैन्यासोबत 'बालिकतन 2022' हा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला आहे?
उत्तर :- युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

प्र.6 अलीकडेच DRDO ने उच्च-वेगवान हवाई लक्ष्यांवर मध्यम श्रेणीच्या पृष्ठभाग-टू-एअर क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी कोठे केली आहे?
उत्तर :- चांदीपूर (ओडिशा)

प्र.7 "राष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप" ची 20 वी आवृत्ती अलीकडे कुठे सुरू झाली आहे?
उत्तर :- भुवनेश्वर

प्र.8 अलीकडेच भारताची घरगुती हॉकी स्पर्धा "औबैदुल्ला खान हॉकी कप" कोणी जिंकली आहे?
उत्तर :- भारतीय रेल्वे

शास्त्रीय उपकरणे व वापर

• स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

• अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...