२६ मार्च २०२२

भारतातली जागतिक वारसा स्थळे


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली.

🔰ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

👉 आता भारतात एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 32 (तेलंगणा आणि गुजरात सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि 1 मिश्रित ठिकाण आहे.

👉 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

🏰💒🛕⛪️सांस्कृतिक🕌⛩🛤🏞
1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान,
    गुजरात

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई,
    महाराष्ट्र

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

17) हमायूनची कबर, दिल्ली

18) खजुराहो, मध्यप्रदेश

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

21) कतुब मिनार, दिल्ली

22) राणी की वाव, पटना, गुजरात

24) लाल किल्ला, दिल्ली

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

29) जतर मंतर, जयपूर

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट
      डेको एन्सेम्बल ही इमारत
31) काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर,
       तेलंगणा
32) धोलावीरा हडप्पाकालीन शहर, गुजरात

  🏞🌅🎑 नैसर्गिक ⛰🗻🏔
1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

    🟥🟧 मिश्र 🟨🟩

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

✅ UNESCO :-

👉 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

👉 स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.

👉 या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली.

👉 भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

यूएनएससी’तील युक्रेनसंबंधी ठरावावर भारत तटस्थ

🔵युक्रेनमधील मानवी संकटाबाबत रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) गुरुवारी मांडलेल्या ठरावावर तटस्थ राहून, आपण रशियाच्या बाजूने नसल्याचे संकेत भारताने दिले.

🔵या ठरावात युक्रेनवर टीका करण्यात आली होती. ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली समर्थनाची ९ मते न मिळाल्याने हा ठराव संमत होऊ शकला नाही.

🔵रशिया पुरस्कृत ठरावावर भारताने तटस्थ राहण्याचा प्रसंग प्रथमच घडला आहे.

🔵यापूर्वी युक्रेनमधील युद्धावर झालेल्या मतदानात, रशियाच्या कृतीवर टीका करणाऱ्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांनी पुरस्कृत केलेल्या ठरावांवर भारत तटस्थ राहिला होता.

🔵या ताज्या घडामोडीतील, आपली तटस्थता दर्शवण्याचा भारताचा प्रयत्न प्रतििबबित झाला आहे.

🔵न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव मांडला जात असताना आणि भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले असताना परराष्ट्र सचिव  हर्षवर्धन श्रृंगला तेथे होते.

🔵रशिया व चीनने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर भारतासह यूएनएससीचे उर्वरित १२ सदस्य तटस्थ राहिले.

रेल्वेचे खासगीकरण होणार नाही ! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही.

🟤रेल्वेची सामाजिक बांधिलकी सर्वाधिक महत्त्वाची असल्याने रेल्वे क्षेत्राचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी राज्यसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भातील चर्चेच्या उत्तरात दिली.

🟤रेल्वे क्षेत्रात २००९-१४ या काळात २ लाख ४२ हजार ७०९ रोजगार देण्यात आले. त्या तुलनेत २०१४ पासून आत्तापर्यंत ३ लाख ४४ हजार ६४६ नोकऱ्या दिल्या गेल्या. १ लाख ४० हजार ७१३ पदांवर नियुक्त्या केल्या जात आहेत, अशी माहिती देत रेल्वे मंत्रालयाने भरती थांबवल्याचा विरोधकांचा आरोप वैष्णव यांनी फेटाळला.

🟤काँग्रेसच्या काळात रेल्वे क्षेत्रातील विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले पण, त्यामध्ये दूरदृष्टी नव्हती. कुठे स्टेशन उभे करायचे आहे, कुठे रेल्वे सुरू करायची आहे, ही माहिती म्हणजे व्हिजन नव्हे. रेल्वे क्षेत्राचे अत्याधुनिकीकरण होत असून विशिष्ट ध्येय ठरवून कामे पूर्ण केली जात आहेत.

🟤२०१४-१९ मध्ये दरवर्षी ३,४४० किमी विद्युतीकरण केले गेले, ५० हजार कमीचे विद्युतीकरण झाले आहे. आगामी ३०-४० वर्षांचा आढावा घेतला जाणार आहे, असे वैष्णव म्हणाले.

९ मे पर्यंत युद्ध संपवा; रशियन सैन्याला आदेश .

🔥रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे सध्या संपूर्ण जगावर चिंतेचं वातावरण असताना लवकरच हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या लष्करानेच असा दावा केला आहे.

🔥 युक्रेन लष्कराच्या दाव्यानुसार, ९ मे रोजी रशिया हे युद्ध संपवू इच्छित आहे. Kyiv Independent च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफच्या गुप्तचर सूत्रांनी दावा केला आहे की, रशियन सैन्याला युद्ध ९ मे पर्यंत संपलं पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे.

🔥९ मे हा दिवस रशियामधील नाझी जर्मनीवरील विजय म्हणून साजरा केला जातो. दरम्ान रशिया आपल्या हजारो नागरिकांना त्यांच्या देशात घेऊन जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे.

🔥 या नागरिकांना ओलीस ठेवत आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा कट असल्याचाही त्यांचा दावा आहे.

🔥असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार, युक्रेनचे लोकपाल डेनिसोवा यांनी चार लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या इच्छेविरोधात रशियात नेण्यात आलं असून त्यामध्ये ८४ हजार लहान मुलं असल्याचा दावा केला आहे.

🔥 दुसरीकडे रशियानेही जवळपास हीच संख्या दिली असून या लोकांना रशियाला जायचे होते असा प्रतिदावा केला आहे.

🔥दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पाश्चिमात्य देशांनी नवे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून युक्रेनला माणुसकीच्या आधारावर मदत करण्याचं वचन दिलं.

🔥 पण युक्रेनच्या राष्टाध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मागितलेल्या मदतीच्या तुलनेत लष्करी सहाय्य कमी मिळत आहे.

देश ३१ मार्चपासून निर्बंधमुक्त! ; केंद्र सरकारचा निर्णय - मुखपट्टी, अंतरनियम पालन मात्र आवश्यक

🌼देशात दोन वर्षांपूर्वी करोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आह़े  करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असला तरी मुखपट्टीचा वापर आणि अंतरनियमाचे पालन यापुढेही करावे लागणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केल़े

🌼देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्वप्रथम २४ मार्च २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या होत्या़  करोना रुग्णआलेखातील चढ-उतारानुसार त्यात वेळोवेळी बदल करण्यात आल़े  आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने जोखीम-मूल्यांकनाधारित धोरणाचा अवलंब करण्याची सूचना करताना केंद्राने बुधवारी सार्वजनिक कार्यक्रम आणि आर्थिक व्यवहार पूर्ववत करण्याची गरज व्यक्त केली़

🌼याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आह़े  रुग्ण निदान, देखरेख, रुग्णशोध, उपचार, लसीकरणावर भर देत रुग्णालयांतील पायाभूत सुविधांच्या क्षमतवाढीवर गेल्या दोन वर्षांत चांगले काम झाले आह़े  तसेच करोनाबाबत सर्वसामान्य जनतेतही मोठी जागरूकता आली आहे, असे भल्ला यांनी या पत्रात म्हटले आहे.  देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सुमारे २० हजार असून, करोनाचा दैनंदिन संसर्गदरही ०.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सर्वाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, देशात लशींच्या एकूण १८१.५६ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत, हेही उल्लेखनीय असल्याचे भल्ला यांनी नमूद केले.

🌼या सर्व बाबी विचारात घेऊन, करोनाला आळा घालण्याच्या उपाययोजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदी यापुढे लागू करण्याची गरज नाही, असा निर्णय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच ; त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला.


🟤राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी)चे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करणारा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल बुधवारी मंत्रिमंडळाने स्वीकारला.

🟤मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय अहवालात एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजणे आणि महामंडळाचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सरकारच्या विभागामार्फत करणे ही मागणी मान्य करणे कायद्यातील तरतुदीनुसार  तसेच प्रशासकीय आणि व्यावहारिक बाबी विचार घेता शक्य नसल्याचे  स्पष्ट करण्यात आले आहे.

🟤एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ दिल्यानंतरही विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू केलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी सुरूच ठेवला आहे.

🟤विलीनीकरणाबाबत नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला.

🟤आज हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडून तो स्वीकारण्यात आला. यासंदर्भात १ एप्रिलपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल असे ५ एप्रिलला होणाऱ्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.

🟤तसेच संपाबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी कालच विधानसभेत स्पष्ट  केले होते.

२५ मार्च २०२२

Daily Question series

कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ साजरा करतात?

(A) 28 सप्टेंबर
(B) 29 सप्टेंबर
(C) 30 सप्टेंबर
(D) 01 ऑक्टोबर ✅✅



“माय लाइफ इन फूल: वर्क, फॅमिली, अँड अवर फ्युचर” या शीर्षकाचे पुस्तक ____ यांच्या स्मृतींवर लिहिले गेले आहे.

(A) राज के. नूयी
(B) इंद्रा नूयी ✅✅
(C) प्रियांका चोप्रा
(D) चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन


कोणत्या व्यक्तीची ‘2021 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड’ या पुरस्कारासाठी निवड झाली?

(A) मल्लिका श्रीनिवासन
(B) शिव नादर
(C) A आणि B ✅✅
(D) यापैकी नाही



कोणत्या व्यक्तीने भारतीय हवाई दलाचे प्रमुख (CAS) म्हणून पदभार सांभाळला?

(A) एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी ✅✅
(B) एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया
(C) एअर मार्शल हरजितसिंग अरोरा
(D) यापैकी नाही

कोणत्या दिवशी “जागतिक कृषि पशुधन दिवस’ साजरा करतात?

(A) 29 सप्टेंबर
(B) 30 सप्टेंबर
(C) 01 ऑक्टोबर
(D) 02 ऑक्टोबर ✅✅



कोणत्या मंत्रालयाने “डिजिसक्षम” या नावाने एक डिजिटल कौशल्ये कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

(A) अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय
(B) कामगार आणि रोजगार मंत्रालय ✅✅
(C) गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालय
(D) पंचायतराज मंत्रालय



कोणत्या संस्थेने "बाल रक्षा संच" विकसित केले, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते?

(A) अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था
(B) राष्ट्रीय आयुर्वेद संस्था
(C) अखिल भारतीय आयुर्वेद संस्था ✅✅
(D) यापैकी नाही



खालीलपैकी कोणते NMCG संस्थेच्या कार्यकारी समितीच्या 37 व्या बैठकीत ‘नमामी गंगे’ कार्यक्रमाचा शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले?

(A) चाचा चौधरी ✅✅
(B) छोटा भीम
(C) शक्तीमान
(D) यापैकी नाही



कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस’ साजरा करतात?

(A) 01 ऑक्टोबर
(B) 02 ऑक्टोबर ✅✅
(C) 03 ऑक्टोबर
(D) 04 ऑक्टोबर



कोणत्या संस्थेने बांगलादेशात तेलाच्या शोधासाठी ड्रिलिंग मोहीम हाती घेतली?

(A) मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड
(B) इम्पीरियल एनर्जी कॉर्पोरेशन
(C) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) ओएनजीसी विदेश लिमिटेड ✅✅

२४ मार्च २०२२

प्रमुख व्यक्तीची प्रचलीत नावे

१) शांतीदूत -- पंडित नेहरू
२) मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
३) कैद-ए-आजम -- बॅ. जीना
४) शहीद-ए-आलम --  भगतसिंग
५) लोकनायक -- बापूजी अणे
६) भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
७) गान कोकिळा -- लता मंगेशकर
८) हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद
९) आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम
१०) गरिबांचे कैवारी -- के. कामराज
११) प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
१२) देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
१३) भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
१४) बा -- कस्तुरबा गांधी
१५) पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग
१६) विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी
१७) विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
१८) समर सौदामिनी -- अरुणा आसफअली
१९) भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२०) हार्मिट ऑफ सिमला -- ए. ओ. ह्यू
२१) म्हातारपाखडीचा -- मॅझिनी जोसेफ बॅप्टीस्टा
२२) राजर्षी -- पुरुषोत्तमदास टंडन
२३) महानामा -- मदनमोहन मालवीय
२४) वंगबंधू -- शेख मुजीबर रहमान
२५) विजी -- विजयनगरचे महाराज
२६) राष्ट्रभक्तांधील राजपुत्र -- डॉ. घनश्यामदास बिर्ला
२७) पख्तुन -- खान खान अब्दुल गफ्फार खान
२८) लोकमान्यकार  -- कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

लक्षात ठेवा

🔸१)अनेकेश्वरवादाचे खंडन व एकेश्वरवादाचे समर्थन करणारा 'गिफ्ट टू मोनोथेइस्टस्' हा फारसी भाषेतील महान ग्रंथ लिहिला....
- राजा राममोहन रॉय

🔹२)स्वामी दयानंद सरस्वती हे स्वामी .... यांचे शिष्य होत.
- विरजानंद सरस्वती

🔸३) .... यांनी १८१७ मध्ये डेव्हिड हेअर यांच्या मदतीने कलकत्ता (कोलकाता) येथे 'हिंदू कॉलेज' स्थापन केले.
- राजा राममोहन रॉय

🔹४) दादाभाई नौरोजी, फर्दनजी व एस. एस. बंगाली आदीनी पारशी धर्मीयांमध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने इ. स. १८५१ मध्ये .... ही संस्था स्थापन केली.
- रहनुमाई माजदयासन समाज

🔸५) राजा राममोहन रॉय यांनी मूर्तिपूजा, अनेकेश्वरवाद वगैरवर कडाडून टीका केली. त्यासाठी त्यांनी .....  चा आधार घेतला.
- शांकर वेदान्त

१२६ वर्षीय स्वामी शिवानंद राष्ट्रपतींसमोर झाले नतमस्तक; योगासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

‼️राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात देशातील सर्व व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. यावेळी वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी असे काम केले की संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी तीनदा डोके टेकले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

‼️वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धतीत आणि योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वामी शिवानंद पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला. स्वामी शिवानंद यांची ही कृती पाहून पंतप्रधान मोदींनीही नतमस्तक होऊन नमस्कार केला. यानंतर स्वामी शिवानंद यांनी रेड कार्पेट आणि स्टेजजवळ दोनदा डोके टेकून रामनाथ कोविंद यांनाही नमस्कार केला.

‼️यानंतर राष्ट्रपती कोविंद आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी स्वामी शिवानंद यांना उभे केले आणि त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. राष्ट्रपती कोविंद यांनीही स्वामी शिवानंद यांच्यासोबत हसत संवाद साधला. स्वामी शिवानंद हे वाराणसीच्या कबीर नगर भागात राहतात. वयाच्या १२६ व्या वर्षीही ते खूप निरोगी आहेत.

मराठी माध्यमांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा.

🅾एकीकडे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पालकांच्या शाळेबाहेर रांगा लागत असताना मराठी शाळांकडे मात्र अनेक पालक नाक मुरडताना दिसतात. भविष्यातील स्पर्धेसाठी आपलं मूल तयार व्हावं यासाठी अनेकजण इंग्रजी शाळांमध्येच मुलांना शिकवण्याकडे प्राधान्य देताना दिसतात. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री यांनी मराठी माध्यमांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

🅾पालकांच्या इंग्रजी शिकण्याच्या हट्टापायी मराठी शाळा ओस पडत असताना वर्षा गायकवाड यांनी आता मराठी माध्यमांमध्येही विद्यार्थ्यांना पहिलीपासून इंग्रजीची ओळख करुन दिली जाईल असं सांगितलं आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तकं तयार असतील अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

🅾“अनेक आमदारांनी सीबीएसई, आसीयएसईचा अभ्यासक्रम असा आहे सांगितलं. मी एक गोष्ट नम्रपणे सांगू इच्छिते की, आपलं एक बोर्ड असून त्याचंही अस्तित्व आहे. त्याचा अभ्यासक्रम कसा चांगला करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिलीचा अभ्यासक्रम बदल आहोत आणि आदर्श शाळा आहेत तिथे दुसरीचा अभ्यासक्रम बदलत आहोत,” असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

🅾पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेत चांगलं कळतं. पण त्याचसोबत त्या शब्दाला इंग्रजी शब्द काय आहे हे माहिती असावं म्हणून आम्ही हे करत आहोत. पुस्तकांचं ओझं होणार नाही याचं आपण तंतोतंत पालन करत आहोत. त्यामुळे आपण सध्या राज्याच पहिलीसाठी एकत्रित आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तकं आणत आहोत”.

आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर

💠इंडियन प्रीमियर लीग  (आयपीएल) या जगातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून यावेळी पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे.

💠‘आयपीएल’चे प्रसारण करणारी वाहिनी स्टार स्पोर्टसचा तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिकाधिक भर असून सामन्यांदरम्यान समालोचकांना संघांविषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानवाचा (रोबो स्टॅटिस्टीक्स) वापर केला जाईल. याबाबतची माहिती डिस्ने स्टारच्या क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी दिली.

💠‘‘आम्ही ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानव तयार केला आहे. तो समालोचकांचे साहाय्य करेल. आमच्या समालोचकांना विराट कोहली ‘आयपीएल’मध्ये एखाद्या प्रकारच्या चेंडूवर किती वेळा बाद झाला आहे, याची माहिती पाहिजे असल्यास ते ‘क्रिको’ला याबाबत विचारू शकतील. तो ३० सेकंदात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.

💠तसेच यंदा पहिल्यांदाच सर्व ७४ सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन केले जाईल. संदीप पाटील, अमोल मुझुमदार, स्नेहल प्रधान आणि विनोद कांबळी यांसह अन्य काही जण समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. यंदाच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत.

तेल आयातीच्या भारताच्या ‘स्वतंत्र’ धोरणाचे इम्रान खान यांच्याकडून कौतुक

🔥अमेरिकेच्या निर्बंधांची तमा न बाळगता भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याचे सांगून, ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे’ पालन करत असल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारताची प्रशंसा केली.

🔥पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे कडवे टीकाकार असलेले खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभरून कौतुक केले.

🔥आपला शेजारी देश असलेल्या भारताचे ‘स्वतंत्र परेराष्ट्र धोरण’ असल्याबद्दल आपण त्याची प्रशंसा करू इच्छितो, असे खैबर- पख्तुन्ख्वा प्रांतात एका जाहीर सभेत केलेल्या भाषणात खान यांनी आपल्या समर्थकांना उद्देशून सांगितले.

🔥‘क्वाड’चा भाग असलेल्या भारताने अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही रशियाकडून तेलाची आयात केली, असे ते म्हणाले. आपले परराष्ट्र धोरण पाकिस्तानच्या लोकांना धार्जिणे असल्याचेही पंतप्रधान खान यांनी नमूद केले. ‘मी कुणासमोर झुकलेलो नाही आणि माझ्या देशालाही झुकू देणार नाही’, असे येत्या आठवडय़ात संसदेत विश्वासदर्शक ठरावापूर्वी जनमताचा पाठिंबा मिळवू पाहणाऱ्या खान यांनी सांगितले.

एन. बिरेन सिंह यांची पुन्हा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी निवड.

🏵एन. बिरेन सिंह हेच दुसऱ्यांदा मणिपूरचे मुख्यमंत्री राहतील, असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी इंफाळमध्ये जाहीर केले.

🏵भाजपच्या राज्य विधिमंडळ पक्षाने सिंह यांची आपले नेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे भाजपने केंद्रीय निरीक्षक म्हणून मणिपूरला पाठवलेल्या सीतारामन यांनी सांगितले.

🏵मणिपूर विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, बिरेन सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार विश्वजित सिंह हे दोन प्रतिस्पर्धी नेते केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी दोन वेळा दिल्लीला गेले होते. दोन्ही प्रतिस्पर्धी गटांनी आपल्यात मतभेद असल्याचा इन्कार केला असला, तरी त्यांचे हे प्रयत्न म्हणजे मुख्यमंत्रिपदासाठी दबावतंत्र (लॉबिंग) असल्याचे मानले गेले.

🏵१० दिवसांच्या अनिश्चिततेनंतर विधिमंडळ पक्षाची बैठक व नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली.  सीतारामन यांच्यासह सह-निरीक्षक आणि केंद्रीय विधि व न्याय मंत्री किरेन रिजिजू हे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रविवारी सकाळी इंफाळला पोहचले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यांच्या सभागृहात ३२ जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे.

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

२३ मार्च २०२२

तयारी 'गट क' ची

सामान्य ज्ञान 10 प्रश्नोत्तरे

प्रश्न १ : महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?
           १)  लोकमान्य टिळक
           २)  आचार्य विनोबा भावे ✔
           ३)  बाळशास्त्री जांभेकर
           ४)  गो.ग.आगरकर

प्रश्न २ : निकटदृष्टीता हा दृष्टीदोष ............ भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ?
           १)  अंतर्वक्र ✔
           २)  बहिर्वक्र
           ३)  गोलीय
           ४)  द्विनाभीय

प्रश्न ३ : ‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?
           १)  1942 साली ✔
           २)  1920 साली
           ३)  1940 साली
           ४)  1930 साली

प्रश्न ४ : तंबाखूमध्ये ............. हे धोकादायक रसायन असते .
           १)  युरिया
           २)  युरिक आम्ल
           ३)  निकोटीन ✔
           ४)  कॅल्शियम कार्बोनेट

प्रश्न ५ : जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
           १)  न्यूटन
           २)  सी व्ही रमन
           ३)  आईनस्टाइन
           ४)  चार्ल्स डार्विन ✔

प्रश्न ६ : महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?
           १)  पहिल्या
           २)  दुसर्‍या ✔
           ३)  तिसर्‍या
           ४)  चौथ्या

प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या धातुपासून बनविलेल्या वस्तु चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?
           १)  लोखंड
           २)  निकेल
           ३)  कोबाल्ट
           ४)  वरील सर्व ✔

प्रश्न ८ : बर्फामध्ये ............ मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?
           १)  साखर
           २)  मीठ ✔
           ३)  कॉपर
           ४)  झिंक

प्रश्न ९ : नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?
           १)  राजेशाही
           २)  लोकशाही ✔
           ३)  हुकुमशाही
           ४)  वरीलपैकी नाही

प्रश्न १० : हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?
           १)  40 वर्षातून
           २)  50 वर्षातून
           ३)  76 वर्षातून ✔
           ४)  80 वर्षातून

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...