१८ मार्च २०२२

भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल

• विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात.

• पृथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला अक्षवृत्त म्हणतात. एकूण 181 अक्षवृत्त आहेत.

• आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास रेखावृत्त म्हणतात. ती एकूण 360 आहेत.

• शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.

• पृथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात.

• पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात.

• पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

• नकाशात हिरवा रंग वनक्षेत्रासाठी वापरतात.

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

महाराष्ट्र : नैसर्गिक सीमा

1.    वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.

2.    उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.

3.    ईशान्येस : दरेकासा टेकड्या.

4.    पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.

5.    दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.

6.    पश्चिमेस : अरबी समुद्र.

तुषार सिंचन पद्धत

ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक भोक असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.

✳️ तुषार सिंचनाचे फायदे ✳️

१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.

२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.

३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.

४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते

५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.

६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.

७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.

८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.

९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.

१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..

११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.

१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.

१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.

✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️✳️

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र


महाराष्ट्रातील :अष्टविनायक
-----------------------------------------------------:
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
🐆🐅🐿🐇 महाराष्ट्र : अभयारण्ये.🐇🐿🐅🐆
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार

1. व्दिपकल्प - 
    एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

2. भूशीर -
    व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

3. खंडांतर्गत समुद्र - 
    मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

4. बेट -
     एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

5. समुद्रधुनी - 
    काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

6. संयोगभूमी - 
     दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

7. आखात - 
    उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

8. खाडी - 
      आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

9. समुद्र किंवा सागर - 
     महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

10. उपसागर -
     खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

❎❎❎❎❎❎❎❎❎❎❎❎❎

महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

जायकवाडी         नाथसागर

पानशेत              तानाजी सागर

भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

गोसिखुर्द           इंदिरा सागर

वरसगाव               वीर बाजी पासलकर

तोतलाडोह            मेघदूत जलाशय

भाटघर                  येसाजी कंक

मुळा                      ज्ञानेश्वर सागर

माजरा                   निजाम सागर

कोयना                   शिवाजी सागर

राधानगरी                लक्ष्मी सागर

तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

माणिक डोह            शहाजी सागर

चांदोली                   वसंत सागर

उजनी                     यशवंत सागर

दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी               शंकर सागर

वैतरणा                 मोडक सागर

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


🌿आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

🌿गुजरात -भिल्ल

🌿झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

🌿त्रिपुरा - चकमा, लुसाई

🌿उत्तरांचल - भुतिया

🌿केरळ - मोपला, उरली

🌿छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

🌿नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

🌿आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू

🌿पश्चिम - बंगाल संथाल, ओरान

🌿महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

🌿मेघालय - गारो, खासी, जैतिया

🌿सिक्कीम - लेपचा

🌿तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

जगातील सर्वात उंच 10 शिखर

(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच.

जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.
____________________________________

भूजल पुनर्भरण

शेत पातळीवर पाणी अडवून जिरविण्यासाठी खोल नांगरणी, उताराला आडवी नांगरणी करावी. म्हणजे पावसाचे वाहते पाणी कमी वेगाने थांबून वाहते, जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.

◆ कच्चा बंधारा

आपल्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात दगड मातीमध्ये छोटासा बांध घालावा. साठविलेले पाणी दीर्घकाळ जमिनीत मुरत राहते.

हे बंधारे दरवर्षी बांधावे लागतात. कमीत कमी खर्चात, श्रमदानाचे असे बंधारे जागोजागी बांधल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होईल.

◆ नाला बंडिंग

नाल्यात मातीचे नाला बांध बांधल्यास पावसाचे वाहणारे पाणी दीर्घकाळ साठून राहते. हे साठलेले पाणी जमिनीत कालांतराने मुरत जाते. आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.

◆ वळवणीचा बंधारा

नाल्याच्या प्रवाहामधून उजव्या आणि डाव्या बाजूने पाणी वळविण्याची सोय असल्यास वाहणारे पाणी शेतातून फिरत येते. यातूनच हे पाणी जमिनीत झिरपत जाते आणि पाणी अडविणे व झिरविणे हे साध्य होते.

बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मृद्‌ व जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि मुरलेले पाणी झऱ्याच्या स्वरूपात विहिरीत पुन्हा येते.

◆ दगडी बंधारा

पाणलोट क्षेत्रातून वाहणारे नाले अरुंद असतात. दोन्ही काठांवर खडक आढळतो अशा ठिकाणी दगडी बंधाऱ्याचा उपयोग पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत जिरविणे यासाठी करता येतो.

दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. बंधाऱ्यात पाणीसाठा जास्त झाल्यास अधिक येणारे पाणी बंधाऱ्यातून वाहून जाते. यामुळे बंधारा बांधताना हे पाणी बाजूच्या शेत जमिनीतून जाऊ नये याप्रमाणे बांधकाम करावे.

●●●●●●●●●●●●●●●

क्षारयुक्त जमिनींची सुधारणा

• शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.

• शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.

• सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी 20 ते 25 टन वापर करावा.

• जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.

• हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.

• भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.

• सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भूगर्भ रचना

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.

ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.

क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडकa आहेत.

ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.

इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

१७ मार्च २०२२

लोकसभेत मोदींचा जयघोष.

◼️पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘जयघोषा’मुळे लोकसभेचे सभागृह सोमवारी सकाळी दणाणून गेले! मोदी सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी ‘मोदी-मोदी’चा उद्घोष केला आणि बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

◼️संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामकाज सुरू होताच मोदी लोकसभेत आले. त्या वेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला सदस्यांना सभागृहाच्या विशेष कक्षात बसलेल्या परदेशी पाहुण्यांची माहिती देत होते.

◼️ऑस्ट्रियाच्या संसदेतील सदस्यांचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर असून ते सोमवारी लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी सभागृहात उपस्थित होते.

◼️त्याच वेळी मोदी सभागृहात आल्यामुळे बिर्लाना बोलणे थांबवावे लागले. भाजपच्या सदस्यांनी मोदींचे स्वागत इतक्या उत्साहात केले की, अखेर बिर्लाना सदस्यांना मोदींच्या नावाने होणाऱ्या घोषणा थांबवण्याची विनंती करावी लागली.

◼️पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये बहुमताने विजय मिळवला.

◼️भाजपच्या या यशाचे श्रेय फक्त मोदींना असल्याचे लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी दाखवून दिले. मोदींचे स्वागत होत असताना सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी भाजपचे ज्येष्ठ नेते, तर विरोधी बाकांवर सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी आदी नेते उपस्थित होते.

चीनमध्ये करोनाची दोन वर्षांतली सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या

♦️चीनमध्ये सध्या नोंदली जाणारी करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ही दोन वर्षांतील सर्वाधिक असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. तेथे २४ तासांत सरासरी सुमारे दोन हजार रुग्ण नोंदले जात आहेत.

♦️मध्यवर्ती चीनमध्ये शनिवारी करोनाचे नवे १८०७ रुग्ण नोंदले गेले. हे सर्व स्थानिक संक्रमणाचे रुग्ण आहेत. याशिवाय परदेशातून आलेल्या १३१ जणांचे करोना अहवाल होकारात्मक आले आहेत, अशी माहिती आयोगाने रविवारी दिली. आयोगाने म्हटले आहे की, जिलनव्यतिरिक्त शान्डाँगमध्ये १७५, गुआंगडाँगमध्ये ६२, शान्स्कीमध्ये ३९, हेबईमध्ये ३३, जियांग्सूमध्ये २३ आणि तिआनजिनमध्ये १७ रुग्ण नोंदले गेले आहेत. देशाच्या विविध भागांची एकत्रित दैनंदिन रुग्णसंख्या ही सुमारे दोन हजार असून ती दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. बीजिंगमध्येही २० रुग्ण आढळून आले आहेत.

♦️नवे रुग्ण ओमायक्रॉनचे - चीनच्या जिलिन प्रांतात नवे १४१२ स्थानिक रुग्ण आढळून आले. या प्रांताच्या राजधानीचे शहर असलेल्या चंगचूनमध्ये गेल्या शुक्रवारपासून टाळेबंदी लागू केली आहे. या शहरातील ९० लाख लोक टाळेबंदीचे निर्बंध पाळत आहेत. येथे वेगाने प्रसार होणाऱ्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पाच लाख लोकसंख्येच्या युचेंग शहरातही टाळेबंदी लागू केली आहे. हे शहर शान्डाँग प्रांतात आहे.

१३ मार्च २०२२

महत्वाचे सराव प्रश्न ( गणित )

1) 300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

1) 45 से.         2) 15 से.       3)  25 से.       4)  35 से.

उत्तर : 15 से.

*  स्पष्टीकरण :-   एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद
____________________________

२) ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?

१) 1मि. 12से.     २) 1मि. 25से.    ३) 36से.  ४) 1मि. 10से.

उत्तर : 1 मि. 12से.

* स्पष्टीकरण :-  एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5
___________________________

३) ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?

१) 540मी.  २) 162मी.  ३) 270मी.   ४) 280मी.

उत्तर : 270 मी.

*  स्पष्टीकरण :-  सूत्र - गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.

४)  800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?

१) 54 कि.मी.
२) 40 कि.मी.
३) 50 कि.मी.
४) 60 कि.मी.

उत्तर : 40 कि.मी.  

*  स्पष्टीकरण :-  वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)

५)  मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?

दु.12 वा.
12.30 वा.
1.30 वा.
11.30 वा.

उत्तर : 12.30 वा.

*  स्पष्टीकरण :-  भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास
 नमूना सहावा –

६)  मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

दु.12.30 वा.
दु.12वा.
दु.1.30 वा.
दु.1वा.
उत्तर : दु.12.30वा.

*  स्पष्टीकरण :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

७) ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?

300 कि.मी.
240 कि.मी.
210 कि.मी.
270 कि.मी.

उत्तर : 240 कि.मी.

स्पष्टीकरण :- 60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

अंकगणित 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

 13/27

 19/39

 11/23

 17/35

उत्तर :13/27

2. 85053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

 5050

 540

 4950

 4550

उत्तर :4950

3. एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती?

 79

 71

 87

 65

उत्तर :79

4. हरीकडे जेवढया मेंढया आहेत त्याच्या दुप्पट कोंबडया आहेत. त्या सर्वाचे एकूण पाय 96 आहेत. तर हरी जवळील एकूण कोंबडया किती?

 48

 24

 12

 16

उत्तर :24

5. एका संख्येचा 2/5 भाग = 24 तर ती संख्या कोणती?

 120

 60

 180

 80

उत्तर :60

6. 9 लीटर दुध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलास किती दूध मिळेल?

 200 मीली

 2000 मीली

 20 मीली

 2 मीली

उत्तर :200 मीली

7. 3 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?

 2543

 4574

 7641

 9170

उत्तर :7641

8.1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?

 3

 5  

 15

 6

उत्तर :3

9. तीन शाळा सकाळी 10.00 वा. सुरू होतता पहिल्या शाळेची घंटा दर 20 मिनिटांनी वाजते. दुसर्‍या शाळेची घंटा दर 30 मिनिटांनी वाजते आणि तिसर्‍या शाळेची घंटा दर 40 मिनिटांनी वाजते तर तिन्ही शाळेची घंटा एकाच वेळी किती वाजता वाजेल?

 11:30

 12:00

 12:30

 13:00

उत्तर :12:00

10. 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडणार्‍या गाडीचा तश वेग किती कि.मी. आहे?

 50 कि.मी.

 72 कि.मी.

 60 कि.मी.

 45 कि.मी.

उत्तर :60 कि.मी.

11. ‘अ’ एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 24 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात?

 12

 8

 12

 10

उत्तर :8

12. एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसर्‍या नळाने 4 तासात रिकामी होते. नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

 4

 8

 16

 19

उत्तर :8

13. 36 सेकंदाचे 3 तासांशी गुणोत्तर किती?

 1:200

 1:300

 1:5

 1:400

उत्तर :1:300

14. सुमनचे वय स्वातीच्या वयाच्या निमपट आहे. दोघीच्या वयातील फरक 15 वर्षे असल्यास त्यांच्या वयांची बेरीज किती?

 60 वर्षे

 30 वर्षे

 20 वर्षे

 45 वर्षे

उत्तर :45 वर्षे

15. वसुंधरेला जशी पृथ्वी म्हणतात तसे नारी या शब्दाला काय?

 जननी

 दुहिता  

 महिला

 जाया

उत्तर :दुहिता 

16. गटात बसणारे पद ओळखा?

49,16,81

 120

 65

 8

 यापैकी नाही

उत्तर :यापैकी नाही

17. विजोड पद ओळखा?

पेरु, डाळींब, बटाटा, फणस?

 पेरु

 डाळींब

 बटाटा

 फणस

उत्तर :बटाटा

18. विजोड पद ओळखा?

 SRQ

 KJI

 FGH

 ZYX

उत्तर :FGH

19. मेणबत्तीला जसा प्रकाश तसे कोळशाला काय?

 शेगडी

 उष्णता

 काळा

 उष्ण

उत्तर :उष्णता

20. 4 ला जसे 16 तसे कोणता 36?

 6

 9

 24

 यापैकी नाही

उत्तर : 6

--------------------------------------------------------

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...