१३ मार्च २०२२

भारतातील सर्वात लांब

◾️भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

◾️भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

◾️.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

◾️भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

◾️भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

◾️भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

◾️भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

◾️भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

◾️भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

◾️.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
-सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
___________________________________

भारताचा भूगोल

📌भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

📌भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. 

📌भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो.  गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. 

📌पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो.  दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.

📌भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.

📌बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. 

📌गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्. मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.

📌पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार.

📌भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात.

📌जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैरुत्य मोसमी वार्‍यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते.

📌ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान.

पृथ्वीचे अंतरंग

🏆 'पृथ्वीचे अंतरंग' या भूगोलाच्या घटकावर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-१ मध्ये किमान २ प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या आंतरांगावरच पृथ्वीच्या पृष्ठभागाची रचना अवलंबून असते. म्हणून पृथ्वीच्या आंतरांगाचा अभ्यास महत्वाचा ठरतो.

🏆 पृथ्वीच्या आंतरांगाचे गूढ अजूनही मानवास उलगडलेले नाही. पृथ्वीच्या आंतरांगाच्या अभ्यासात प्रमुख दोन अडचणी आहेत.

🏆 पृष्ठभागावरील खडक हा कठीण व अपारदर्शक आहे. पृथ्वीच्या अंतर्गत भागात तापमान वृद्धी होत जाते. साधारणपणे ३० मी खोलीवर 1°C तापमान वाढत जाते.

🏆 अंतरंगाची माहिती मिळवण्यासाठी भूकंपशास्त्राची मदत होते. भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. जेव्हा भूकंप होतो तेव्हा सेस्मॉमीटरवर तीन प्रकारच्या लहरींची नोंद होते.

प्राथमिक लहरी (P Waves)
दुय्यम लहरी (S Waves)
पृष्ठीय लहरी (L Waves)
या लहरींच्या अभ्यासावरून पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती भूगर्भशास्त्रज्ञांना मिळते.

✅ प्राथमिक लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 भूकंप यंत्रावर या लहरींची नोंद सर्वप्रथम होते, याचा आर्थ या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो.

🏆 प्राथमिक लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल ही पुढे-मागे होते. प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून बऱ्याच खोलपर्यंत प्रवास करतात. प्राथमिक लहरी या घन तसेच द्रव माध्यमातून प्रवास करतात. परंतु मध्यम बदलले की या लहरी वाक्रीभूत होतात.

✅ दुय्यम लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 प्राथमिक लहारीनंतर या लहरींची नोंद होते. प्राथमिक लहरींपेक्षा वेग कमी.वस्तूकणांची हालचाल लहरींच्या काटकोनामध्ये होते. पृष्ठभागापासून २८८०km पर्यंतच प्रवास करतात. दुय्यम लहरी फक्त घन माध्यमातूनच प्रवास करतात. मध्यम बदलले की या लहरी परावर्तीत होतात.

✅ पृष्ठीय लहरींची वैशिष्ट्ये:

🏆 पृथ्वीच्या कवचामध्येच या लहरी प्रवास करतात. या लहरींचा वेग कमी असतो. या लहरींमुळे वस्तूकणांची हालचाल विविध दिशांनी होते. या लहरी अतिशय विध्वंसख असतात. पृथ्वीच्या आंतरांगासंबंधी निष्कर्ष

🏆 पृथ्वीचा केंद्रभाग द्रवरूप:- पृथ्वीचे अंतरंग पूर्णतः घनरूप असते तर 'P' व 'S' लहरी गाभ्यातून आरपार गेल्या असत्या व भूकंप झालेल्या ठिकाणच्या विरुद्ध बाजूसदेखील भूकंपाची नोंद झाली असती. परंतु भूकंप लहरींच्या निरीक्षणावरून असे आढळते की, विरुद्ध बाजूस फक्त 'P' लहरींची नोंद होते. 'S' लहरी फक्त घन भागातून प्रवास करतात. यावरून केंद्रभाग द्रवरूप असावा असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 भूगर्भातील गाभ्याचा व्यास ६९४२ km :- भूकंपाच्या उगमस्थानापासून १०३° चा कोण करून लहरी वळतात. १०३° ते १४२° प्रदेशात P व S लहरींची नोंद होत नाही; यामुळे या प्रदेशाला भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. यावरून भूगार्भाच्या गाभ्याचा व्यास ६९४२ km आहे असे निश्चित झाले.

🏆 बाह्य गाभा द्रवरूप:- गाभ्याच्या बाह्य अवरनाजवळ 'P' लहरींचा वेग एकदम कमी होतो. या गाभ्याचा बाह्य भाग द्रवरूप आहे असा निष्कर्ष काढता येतो.

🏆 कठीण घन पदार्थाचा आंतगाभा:- अंतर्गाभ्यात 'P' लहरींचा वेग वाढतो. यावरून असे अनुमान काढले जाते की, कठीण अशा घन पदार्थाचा आंतर्गाभा बनला असावा. कठीण घन पदार्थाचे प्रावरण:- 'P' व 'S' लहरींचा वेग प्रवारानातून प्रवास करताना इतका प्रचंड असतो की, अशा लहरी फक्त अति कठीण व घन पदार्थातूनच प्रवास करतात.

मृत समुद्राला ‘मृत’ का म्हणतात?-


*मृत समुद्र काय आहे?*

मृत समुद्राला ‘खारट समुद्र’ असेही म्हणतात. मृत समुद्राच्या पूर्वेला जॉर्डन आणि पश्चिमेस इस्त्राईल व पॅलेस्टाईन हे देश आहेत. या समुद्र जगातील सर्वात कमी उंचीचे ठिकाण म्हणून देखील ओळखला जातो कारण या समुद्राचा पृष्ठभाग समुद्रसपाटी पासून ४३० मी.(१४१२ फुट) खाली आहे. या समुद्राची खोली ३०४ मी.(९९७ फुट) इतकी आहे. या पाण्याची क्षारता ३४२ ग्रॅम/कि.ग्रॅ. इतकी आहे जी आपली सर्वसाधारण समुद्रांपेक्षा जवळपास १०%(९.६) एवढी जास्त आहे. या समुद्राची लांबी ५० कि. मी. असून रुंदी १५ कि. मी. इतकीच आहे. जॉर्डन नदी या समुद्राला येऊन मिळते.

*मृत का?*

एवढ्या क्षारतेच्या पाण्यात कोणत्याही सजीव प्राण्याला जिवंत राहणे शक्य होणार नाही. म्हणून आजही या समुद्रात काही अपवादत्मक जीवजंतू सोडले तर एकही मासा किंवा सागरी प्राणी,  जलीय वृक्षे नाहीत. म्हणून या समुद्राला ‘मृत’ असे म्हणतात.

*इतका खारट कसा झाला?*

इतर समुद्रांच्या तुलनेत हा समुद्र १०% अधिक खारट आहे. पण हा इतका खारट का झाला असेल? तर हा समुद्र वर सांगितल्याप्रमाणे जगातील सर्वात खालची जागा म्हणून देखील ओळखले जाते. म्हणून यात जे पाणी नदीमार्फत किंवा पावसामार्फत येते ते एकदा या  समुद्रात आले की ते बाहेर जाऊ शकत नाही. उन्हात या पाण्याचे बाष्पीभवन होऊन यातील पाण्याची वाफ होऊन जाते पण क्षार आहे असेच राहते. हेच वर्षानुवर्षे घडत आले आहे. यातील पाणी बाहेर पडते व क्षार आहे असेच राहल्याने पाण्याची क्षारता अधिक वाढते. या पाण्याची क्षारता अधिक असल्याने या पाण्याची घनतादेखील आहे. या पाण्याची घनता १.२४ कि.ग्रॅ./ली. इतकी आहे. त्यामुळे या पाण्यात पोहणे हे तरंगण्याबरोबर आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे

१] रास्तगोप्तार - दादाभाई नौरोजी
२] न्यू इंडिया - बिपीनचंद्र पाल
३] न्यू इंडिया - अनिबेझंट
४] कॉमन विल - अनिबेझंट
५] यंग इंडिया -  महात्मा गांधी
६] इंडियन ओपीनियन - महात्मा गांधी
७] नवजीवन समाचार - महात्मा गांधी
८] वंदे मातरम - अरविंद घोष
९] इंडियन मजलिस - अरविंद घोष
१०] अल – हिलाल आझाद
११] इंडियन सोशॅलिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा
१२] न्याशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
१३] इंडिपेंडन्स - मोतीलाल नेहरू
१४] हिंदू - श्री सुब्राह्मण्यम अय्यर
१५] शोमप्रकाश -  ईश्वरचंद विद्यासागर
१६] पंजाबी - लाला लजपत राय
१७] बंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन राय
१८] वंदे मातरम -  लाला लजपत राय
१९] पीपल - लाला लजपत राय
२०] वंदे मातरम -  मादाम कामा
२१] बिहारी - वि. दा. सावरकर
२२] संवाद कौमुदी, - राजा राममोहन रॉय
२३] बॉम्बे क्रोनिकल - फिरोजशहा मेहता
२४] युगांतर व संध्या -  भूपेंद्र दत्त, विरेंद्र घोष
२५] अमृतबझार पत्रिका -  शिरीष कुमार घोष
२६] बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२७] कॉम्रेड, हमदर्द -  मोहम्मद अली
२८] गदर - लाला हरदयाळ
२९] प्रबुद्ध भारत - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३०]  रिव्होल्युशनरी - सच्चीन्द्रनाथ सन्याल
३१]  इंडिया  - सुब्रमण्यम भारती

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर .


🅾भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

1. *लॉर्ड क्लाईव्ह* (1756 ते 1772) :-

🅾भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.

*प्लासिचे युद्ध* :-

🅾जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.

*बक्सरची लढाई* :-

🅾बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.

*अलाहाबादचा तह* :-

🅾बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

2. *सर वॉरन हेस्टिंग*(सन 1772 ते 1773) :-

🅾सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.

🅾भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले.

3. *लॉर्ड कॉर्नवॉलीस* (1786 ते 1793) :-

🅾लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

4. *लॉर्ड वेलस्ली* (1798 ते 1805) :-

🅾लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.

🅾तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.

🅾सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

5. *मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज* (सन 1813 ते 1823) :-

🅾मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

🅾जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

6. *लॉर्ड विल्यम बेंटीक* (1823 ते 1833) :-

🅾लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.

🅾भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

कायमधारा पध्दत


   प्रायोगिक स्वरूपात :- इ.स. 1790
   कायम स्वरूपात :- इ.स. 1793
   ठिकाण :- बंगालa, बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी
   प्रमाण :- भारतातील एकूण शेतजमीनीच्या 19%
   महसूल वाटणी :- शासन, जमीनदार व शेतकरी
   संकल्पना :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   गव्हर्नर :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   प्रभाव :- सर जॉन शोअर
   इतर नावे - जहागिरदारी पध्दत, मालगुजारी पध्दत, बिसवेदारी पध्दत.

🖍 वॉरन हेस्टिंग याने जमीन महसुल वसुल करण्याच्या अधिकारांचे लिलाव करण्याची पध्दत स्विकारली होती. मात्र ही व्यवस्था काही उपयोगात ठरली नाही. यामुळे हेस्टिंग्जच्या या पध्दतीतील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने 1789 मध्ये सर जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सर जाॅन शोअर समितीच्या शिफारशी नुसार, कायमधारा पध्दत लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतात इ.स. 
1790 ला 10 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू केली होती, परंतू नंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था कायमस्वरूपासाठी लागू केली. म्हणूनच या व्यवस्थेला कायमधारा पध्दत असे म्हणतात.
🖍कायमधारा पध्दतीत जमीनीचा मालक जमीनदार असून प्रत्यक्ष शेतकरी हा भुदास असतो.
🖍या पध्दतीत शेतसारा हा रोख स्वरूपात गोळा केला जात असल्याने या पध्दतीत व्यापारवादाची तत्वेदिसतात.
🖍या व्यवस्थेत संपूर्ण जमिनीचे महसुल गोळा करण्याची जबाबदारी ही संपुर्णपणे जमिनादारांवरच सोपविण्यात आली.
🖍शेतकऱ्यांकडून मिळालेल्या महसुलांपैकी विशिष्ट रक्कम ही जमिनदाराने ब्रिटीशांना महसुल रूपात देणे आवश्यक होते.
🖍या व्यवस्थेनुसार जमिनदार व शेतकरी यांच्यात करारनाम्याची तरतूद होती जेणे करुन जमीनदाराला शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम महसूल रुपात मिळेल. परंतू तसे प्रत्यक्षात न झाल्यामुळे जमिनदार शेतकऱ्यांकडून कितीही महसुल वसुल करु शकत होता व ती जास्तीची रक्कम ही ब्रिटीशांना देण्याची 
गरजही नव्हती.
🖍1799 मध्ये तर महसूलाची रक्कम वेळेत न मिळाल्यास जमिनदारास शेतकऱ्याची जमीन, अवजारे किंवा जनावरे जप्त करण्याचा अधिकार मिळाला व यासाठी त्यास न्यायालयाच्या परवानगीची गरज देखील नव्हती.
🖍या व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन महसुलाची रक्कम ही कायमची ठरविण्यात आली. यानुसार 89 टक्के सरकारला व 11 टक्के जमीनदारांना असे जमीन महसूलाच्या रकमेचे दोन भाग करण्यात आले होती.
🖍शेतसारा हा 30 ते 40 वर्षेस्थिर असेल.यात वाढ करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
🖍या कायमधारा पध्दतीचे लाभार्थी हे केवळ जमिनदारच बनत असे.
🖍या व्यवस्थेवर सर जॉन शोअर याचा प्रभाव होता.
🖍जॉन शोअर समितीच्या शिफारसीनुसार या समितीत जेम्स ग्रँट आणि जोनार्थन डंकन हे इतर सदस्य होते.
🖍ही पध्दत सुरूवातीला केवळ बंगाल प्रांतामध्ये लागु करण्यात आली हाेती. 
🖍तिचा विस्तार पुढे बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी या भागांमध्ये करण्यात आला.
🖍भारतातील एकुण शेतजमिनीच्या 19 % क्षेत्रफळावर ही पध्दत अस्तित्वात होती.
🖍विल्यम बेंटिकने आपल्या 1829 च्या भाषणात कायमधारा पध्दतीचे फायदे स्पष्ट केले होते.

संविघानाच्या उद्देशिकेची (Preamble) सुरुवात “आम्ही भारताचे लोक” अशीच का?

🔸 संविधान सभा सदस्य “एच व्ही कामत” यांनी प्रस्ताव ठेवला की “आम्ही भारताचे लोक” ऐवजी आपण “देवाचे नाव” घेवुन सुरुवात करुयात.

🔸”रोहिणी कुमार चाैधरी”यांनी कामत यांच्या सुचनेत बदल करत “देवीचे नाव” सुचवले.

🔸 संविधान सभेचे दुसरे सदस्य “शिब्बन लाल सक्सेना” यांनी आम्ही भारताचे लोक याऐवजी “देव आणि महात्मा गांधी” यांच्या नावाने सुरुवात करण्याचा प्रस्ताव ठेवला.

🔸मात्र वरील दोन्ही प्रस्ताव मान्य झाले नाहीत. आणि उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी करण्यात आली.

“आम्ही भारताचे लोक” (We the people) याचा अर्थ -

“आम्ही भारताचे लोक” ही रचना भारताने “अमेरीका” देशांकडुन घेतली.

१) या संविधानाचे निर्माते भारतीय आहेत.

२) संविधानाच्या शक्तीचा स्त्रोत भारतीय जनता आहे.

३) आम्ही भारताचे लोक ही रचना सार्वभाैमत्वाचे (Sovereign) दर्शन देते.

महाराष्ट्रातील पंचायत राज- महत्त्वपूर्ण माहिती.

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
 स्थानिक स्वराज्य संस्था

2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
 वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
27 जून 1960

6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
महसूल मंत्री


7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
 जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
 1 मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
 7 ते 17

13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
 जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
 पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
 तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
 विभागीय आयुक्त

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
 तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
 जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
 संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
 जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
 ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
जिल्हा परिषदेचा

30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
 राज्यशासनाला

34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
 विस्तार अधिकारी

35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
 ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
 स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
 जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
वसंतराव नाईक

曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆 曆

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

कर्झनच्या शेती सुधारणा

☘  १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली.

🌷  १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली.

☘  त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची  स्थापना केली.

🌷   सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा  केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले.

☘   रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले.

🌷  ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला.

☘  कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची  स्थापना केली.

🍁🍁🍁🍁☘☘☘☘🍁🍁🍁🍁☘☘

8 फेब्रुवारी 1872 रोजी, शेर अली आफ्रिदीने (पठाण) लॉर्ड मेयोची हत्या केली

🔹 जेव्हा व्हॉईसरॉय त्यांची तपासणी पूर्ण करून बोट कडे परतत होते,तेव्हा शेर अलीने हल्ला करून त्याला ठार केले.

🔹 तो त्यावेळी अंदमान आणि निकोबार बेटांवर कैदी होता.

🔹 शेर अली आफ्रिदीला 11 मार्च 1872 रोजी वायपर आयलंड तुरुंगात फाशी देण्यात आली.

🔶 Key Points:-

♦️ लॉर्ड मेयो - (1869 ते 1872)

🔹1870 मध्ये भारतात आर्थिक विकेंद्रीकरण सुरू केले

🔹 काठियारवाड येथे राजकोट कॉलेजची आणि राजपुत्रांसाठी मेयो कॉलेज अजमेर येथे स्थापना केली

🔹 भारतात भारतीय सांख्यिकी सर्वेक्षणाचे (Statistical Survey of India)आयोजन केले

🔹 लॉर्ड मेयोच्या नेतृत्वाखाली 1872 मध्ये जनगणना  सुरुवात झाली

🔹 कृषी आणि वाणिज्य विभागाची स्थापना केली

🔹 भारतीय इतिहासात प्रथमच राज्य रेल्वेचा परिचय

🔹खून होऊन मृत्यू झालेला तो एकमेव व्हाईसरॉय होता

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...