१३ मार्च २०२२

राजर्षि शाहू महाराज


जन्म – 16 जुलै 1874.

एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

▪️संस्थात्मक योगदान :

ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 – विधवा विवाहाचा कायदा.
1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
कोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननी‘ म्हटले जाते.
ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
मृत्यू – 6 मे 1922.

▪️वैशिष्टे :

महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
उदार विचार प्रणालीचा राजा.
राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.
कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.
शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.
टीकाकारांकडून ‘शुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.

महात्मा ज्योतीराव फुले

✅ जीवन परिचय, शिक्षण, विवाह

🔯 जीवन परिचय - आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून फुले यांना ओळखले जाते. आधुनिक  महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून फुले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराणे मुलचे  सातार्यापासून २५ मैल अंतरावर असलेले कटगुण हे गाव होते.शेटीबाचा मुलगा गोविन्दराव व गोविंदरावची पत्नी चिमणाबाई यांच्या पोटी ११ एप्रिल १८२७ रोजी एक मुलगा ज्योतिबा .

🔯 शिक्षण - महात्मा फुल्यांनी १८३४ ते १८३८ हे चार वर्षे कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पुर्ण केले. दुरद्येवाची गोष्ट अशी चौथा वर्ग झाल्यानंतर काही कालावधीपर्यंत महात्मा फुल्यांचे शिक्षण थांबले

🔯 विवाह - महात्मा फुले १३ वर्षे असताना इ . स . १८४० मध्ये त्यांचा विवाह नायगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांची मुलगी सावित्री बाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला.

✅ समाज क्रांतीमध्ये वाटचाल ✅

◾️युरोपियन लेखक थोमस पेन यान्ह्या ( रीतस ऑफ मन ) या पुस्तकाचा प्रभाव त्यांचावर झाला. ओगष्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.

◾️१७ सप्टेबर १८५१ रोजी रस्ता पेठेतील मुलीची दुसरी शाळा सुरु केली. १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची तिसरी शाळा सुरु केली. १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरु केली. महात्मा फुल्यांनी इ . स .
१८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना आपल्याच घरी केली. इंग्रज सरकारने २५ जुले १८५६ रोजी विधवा विवाहाचा कायदा संमत केला होता.

◾️८ मार्च  १८६४ रोजी त्यांच्या प्रयत्नाने पुण्यात गोघ्ल्यांच्या बागेत एका शेणवी जातीतील अठरा वर्षाच्या नर्मदा या विधवेचापुनर्विवाह घडवून आणला हा पहिला पुनर्विवाह होय. अस्पृश्यासाठी शिक्षणाची दारे खुली व्हावी  त्यांनी १८५१ मध्ये  शहरात नानापेठेत अस्पृश्यासाठी पहिली शाळा सुरु केली. १८७३ मध्ये अस्पृशायासाठी जाहीरनामा काढला.

🔘 सत्यशोधक समाजाची स्थापना 🔘

◾️२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुल्यांचा समाज मानवता बुद्धिमत्ता, व्यक्तीस्वतंत्र, या प्रमुख तत्वावर आधारित होता. निवृत्त सनदी अधिकारी अलन व्हूम यांच्या मदतीने राष्ट्रीय सभा २८डिसेंबर १८८५ रोजी गोकुलचंद संस्कृत महाविद्यालयात स्थापना केली.

◾️१८८० मध्ये महात्मा फुले यांनी कामगाराच्या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी नारायण लोखंडे यांच्या   माध्यमातून बॉम्बे मिल असोसिअशन या संघटनेशी स्थापना केली. ही देशातील प्रथम कामगार संघटना ठरली.

🔘 फुले यांची ग्रंथसंपदा 🔘

🔘 ग्रंथ  - वर्षे  -   ठिकाण 🔘

🔸तृतीय रत्न(नाटक) - १८५५ - पुणे

🔸पोवाडा(शिवाजी राजे) -१८६९ - मुंबई

🔸ब्राम्हणाचे कसब - १८६९ - मुंबई    
        
🔸गुलामगिरी - १८७३ - पुणे 

🔸शेतकऱ्यांचा असूड - १८८३ - पुणे

🔸इशारा - १८८५ - पुणे

🔸सार्वजनिक सत्यधर्म - १८९१ - मुंबई

◾️या लिखाणाच्या माध्यमातून ११ मे १८८८ रोजी मांडवी येथील कोळीवाडा सभागृहात महात्मा फुल्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या  समारंभात सामाजिक कार्यकर्ते रावबहादूर  वाद्वाद्देवर होते. यांच्या उपस्थितीत फुले यांना (महात्मा) ही पदवी अर्पण करण्यात आली. फुल्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची उजवी बाजू लुळी पडली.१एप्रिल १८८९ रोजी सार्वजनिक हा ग्रंथ पूर्ण केला.   

११ मार्च २०२२

स्वामी विवेकानंद

🔹नाव : नरेंद्रनाथ दत्त

🔹जन्म : 12 जानेवारी 1863 , कलकत्ता 

🔸मृत्यू  : ४ जुलै १९०२  (वय ३९) , बेलूर मठ 

🔹धर्म : हिंदू धर्म

🔸नागरिकत्व : ब्रिटिश भारत

🔹गुरुकुल : कलकत्ता विद्यापीठ ( बीए )

🔸चे संस्थापक :
▪️रामकृष्ण मिशन (1897)
▪️रामकृष्ण मठ

🔹तत्वज्ञान : आधुनिक वेदांत 

🔸गुरु : रामकृष्ण

🔹शिष्य : अशोकानंद ,  विराजानंद ,  परमानंद ,  अलसिंगा पेरुमल ,  अभयानंद ,  सिस्टर निवेदिता  , स्वामी सदानंद

🔸साहित्यिक कामे :
▪️राजयोग
▪️कर्म योग
▪️भक्ती योग
▪️ज्ञान योग
▪️माय मास्टर
▪️लेक्चर्स कोलंबो ते अल्मोडा

🔹अवतरण :

" उठा, जागे व्हा, आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका "

लाल बहादूर शास्त्री

🔸जन्म :  २ ऑक्टोबर १९०४
मुगलसराई, भारत

🔹मृत्यू : ११ जानेवारी  १९६६
ताश्कंद

🔸राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

🔹पत्नी : ललिता देवी

🔸दुसरे भारतीय पंतप्रधान (९ जून १९६४ – १२ जानेवारी १९६६)

🔹तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री
(९ जून १९६४ – १७ जुलै १९६४ )

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔸लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके :
▪️गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)

▪️शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔹लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था :
▪️लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.

वि.वा. शिरवाडकर

🔸जन्म नाव :  विष्णु वामन शिरवाडकर

🔹टोपण नाव : कुसुमाग्रज

🔸जन्म : २७ फेब्रुवारी १९१२, पुणे

🔹मृत्यू : १० मार्च १९९९  (वय ८७) , नाशिक

🔸राष्ट्रीयत्व : भारतीय

🔹धर्म : हिंदू

🔸कार्यक्षेत्र : कवी, लेखक,  नाटककार,  कथाकार  व  समीक्षक

🔹भाषा : मराठी

🔸प्रसिद्ध साहित्यकृती : नट सम्राट✅

🔹पुरस्कार : ज्ञानपीठ पुरस्कार, 
साहित्य अकादमी पुरस्कार

🔸त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.✅

महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

121) मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर : 52

122) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?
उत्तर : 37° सेल्सियस

123) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत

124) मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात

125) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा

126) पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था

127) चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती

128) महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.

129) महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर

130) भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

आंतरराष्ट्रीय विमान सेवेला आकाश मोकळे ; २७ मार्चपासून सेवा पूर्ववत.

🧨करोनाकाळातील दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला आकाश मोकळे झाले आह़े  २७ मार्चपासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केल़े करोना प्रादुर्भावामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा २३ मार्च २०२० रोजी स्थगित केली होती़  मात्र, जुलै २०२० पासून ३७ देशांशी कराराद्वारे भारताने विशेष विमानसेवा सुरू ठेवली होती़ 

🧨आता करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, असे हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितल़े  या निर्णयामुळे हवाई वाहतूक क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला़ जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण वाढले आह़े  या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला़.

🧨या सेवेसाठी आरोग्य मंत्रालयाने  प्रसृत केलेल्या करोनाविषयक मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे हवाई वाहतूक मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केल़े हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील स्थगिती २६ मार्चपर्यंत राहील़  त्यानंतर  २७ मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल.

साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले.


♻️साताऱ्यातील सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी मागील ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले झाले आहेत. सैनिक स्कूलमध्ये ६११ विद्यार्थिनींमधून पहिल्यांदाच दहा मुली प्रवेश प्रक्रिया पार पाडून दाखल झाल्या आहेत.

♻️ देशातील पहिल्या  सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरू झाले आहे.

♻️जागतिक महिला दिनानिमित्त सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या १० मुलींशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने २३ जून १९६१ रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरू झाली. या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण दिले जाते. ६४० विद्यार्थी येथे शिकतात. पैकी १० मुलींना यावर्षी प्रथमच प्रवेश मिळाला आहे.

♻️निवासी शाळेत शिकणारी ही मुलींची पहिलीच बॅच आहे.

♻️सैनिक स्कूलचे उपप्राचार्य िवग कमांडर बी लक्ष्मीकांत यांनी  सांगितले की आत्तापर्यंत या शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जात होता.

♻️राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी शासनाने घेतला. त्यामुळे  सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी गेल्या ६१ वर्षांत  खुले झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

♻️ यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वरित सात विद्यार्थिनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.

जर्मन खुली बॅडिमटन स्पर्धा - सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी.

♒️दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या भारतीय खेळाडूंनी जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) विजयी सलामी दिली.

♒️सातव्या मानांकित सिंधूने मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानला २१-८, २१-७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या बुसाननवरील सिंधूचा हा १५वा विजय ठरला. तिचा पुढील फेरीत स्पेनची बिएट्रीझ कोरालेस आणि चीनच्या झांग यी मान यांच्यातील विजेतीशी सामना होईल.

♒️पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आठव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेर्डेझवर २१-१०, १३-२१, २१-७ अशी मात केली. श्रीकांतचा हा लेव्हेर्डेझवरील सलग चौथा विजय ठरला. दुसऱ्या फेरीत श्रीकांत चीनच्या लू गुआंग झू याच्याविरुद्ध खेळेल.

०९ मार्च २०२२

भारतातील सर्वात लांब


1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
___________________________________

General Knowledge

● पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?
उत्तर : देखो मेरी दिल्ली

●  कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले?
उत्तर : NASA

● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?
उत्तर : नजला बौडेन रोमधाने

● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०१ ऑक्टोबर

●  कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
उत्तर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी

● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
उत्तर : सी. के. मिश्रा

● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : पद्मजा चुंडुरू

●  खालीलपैकी कोण "क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ" हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?
उत्तर : वोले सोयिंका

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


शिखराचे नाव    उंची(मीटर)   जिल्हे

कळसूबाई         1646         नगर
साल्हेर              1567      नाशिक
महाबळेश्वर         1438     सातारा
हरिश्चंद्रगड         1424      नगर
सप्तशृंगी            1416     नाशिक
तोरणा               1404     पुणे
राजगड             1376      पुणे
रायेश्वर               1337     पुणे
शिंगी                 1293     रायगड
नाणेघाट             1264     पुणे
त्र्यंबकेश्वर           1304    नाशिक
बैराट                1177    अमरावती
चिखलदरा         1115    अमरावती
___

सोलापुरात पदव्युत्तर शिक्षणामध्ये मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर.

🎪कालानुरूप घडलेल्या सामाजिक बदलांमुळे मुलांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्याही पुढे झेप घेऊन मुलींची वाटचाल सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातही मागील पाच वर्षांत हे आश्वासक चित्र पाहायला मिळते. देशात शंभर वर्षांपूर्वी महिलांना दुय्यम स्थान तर होतेच, शिवाय शिक्षणाचे धडेही त्यांना दिले जात नव्हते.

🎪क्रांतिज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. प्रतिकूल परिस्थितीत टप्प्या-टप्प्याने महिला शिक्षण घेऊन पुढे येत राहिल्या. अलीकडे तर संपूर्ण जगात कार्यकर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांची नावे सर्व परिचित झाली आहेत. शिक्षणात तर महिलांची झेप सुरूच आहे.

🎪मागील पाच वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांपेक्षा मुलींनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतला आहे. यात २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या शैक्षणिक कार्यकाळात एकूण २६९५ मुले तर २८७९ मुलींनी यशस्वी पद्धतीने उच्चशिक्षण घेतले आहे. १८४ संख्येने मुलींची संख्या अधिक आहे.

🎪जागतिक महिला दिन साजरा होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला हे सकारात्मक आणि आश्वासक चित्र समोर आहे. विशेषत: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, विज्ञान आणि अर्थशास्त्र आदी महत्त्वाच्या पदव्युत्तर ज्ञानशाखांकडे मुलींचा ओढा वाढला आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - रिदम-अनिष जोडीला सुवर्ण .

🪀भारताच्या रिदम सांगवान आणि अनिष भानवाला या जोडीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले.

🪀सोमवारी रिदम-अनिष या जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत थायलंडच्या पादुका चाविसा आणि राम खांहाएंग या जोडीला १७-७ अशी धूळ चारली. त्यांच्या या कामगिरीमुळे विश्वचषकाअखेरीस भारताने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा सात पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

🪀रिदम-अनिष या जोडीने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटातील पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत ४०० पैकी ३७० गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. थायलंडच्या चाविसा आणि खांहाएंग जोडीने ३८१ गुणांसह अग्रस्थान कमावले होते. मात्र, सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले. भारताच्या इशा सिंग आणि भावेश शेखावत या जोडीनेही पात्रतेची दुसरी फेरी गाठली होती; परंतु त्यांना ३५६ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

🪀त्याआधी भारताने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. सुवर्णपदकाच्या लढतीत जर्मनीच्या ख्रिस्टियन रित्झ, गेस ऑलिव्हर आणि पीटर फ्लोरियन या त्रिकुटाने भारताच्या गुरप्रीत सिंग, अनिष आणि भावेश शेखावत या त्रिकुटावर मात केली. कैरो येथे झालेल्या या विश्वचषकात ६० देशांच्या ५०० हून अधिक नेमबाजांचा सहभाग होता. एकूण २२ देशांना या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले. गुणतालिकेत भारताने चार सुवर्णपदकांसह अव्वल, नॉर्वेने तीन सुवर्णपदकांसह (एकूण सहा पदके) दुसरा, तर फ्रान्सने तीन सुवर्णपदकांसह तिसरा क्रमांक पटकावला.

जागतिक महिला दिन

🔹👉 महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

🔸दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.

🔹भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला.

🔸८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

🔹पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले.

🔸काही देशात जसे  बल्गेरिया  आणि  रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो.

🔹इटलीमध्ये या दिवशी पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.

🔸थीम 2022 : 'Gender Equality Today for a Sustainable Tomorrow' ✅

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

🔸आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
🔹महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

🔸अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी
: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

🟠आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :

🔸डॉ. अरुणा देरे - 2019✅
🔹विजया ध्यसा- 2001
🔸शांता शेलड़े- 1996
🔹दुर्गा भागवत - 1973
🔸कुसूमावती देशपांडे - 1961

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

🔸कालावधी :  ३, ४ व ५ डिसेंबर २०२१
🔹स्थळ : नाशिक
🔸अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅
🔹स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :✅

🔹स्थळ : उदगीर ✅
🔸अध्यक्ष : भारत सासणे ✅

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...