07 March 2022

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच


१) उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणत विधान गैरलागू आहे ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

   2) दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला.

   3) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.

   4) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.

उत्तर :- 4

२) ........................ हे भारताचे 25 वे राज्य बनले.

   1) गोवा    2) मिझोराम  

3) सिक्कीम    4) झारखंड

उत्तर :- 1

३)  भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

   1) हदयनाथ कुंझरू
   2) के.एम. पणीकर
   3) फाझल अली   
   4) के.एम. मुन्शी

   उत्तर :- 3

४) महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला  ?

   1) 2000     2) 2005  

   3) 2010      4) 2011

   उत्तर :- 3

५)  राज्य पुनर्रचनेसंबंधी फाजल – अली आयोगाने केलेल्या प्रमुख शिफारशी –
   अ) विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे.

   ब) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र बनवता येणार नाही.

   क) गुजरात, मराठवाडा व महाराष्ट्र यांचे व्दैभाषिक राज्य करावे.

   ड) मुंबईला स्वतंत्र ठेवण्यात यावे.

        वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे  ?

   1) अ फक्त    
   2) अ आणि ब फक्त   
   3) अ आणि क फक्त   
   4) अ, ब, क आणि ड

  उत्तर :- 3

६) गटा बाहेरचा ओळखा :
     विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक

   1) विचार 
  2) श्रध्दा     
  3) उपासना 
  4) सामाजिक

उत्तर :- 4

७) 42 व्या घटना दुरूस्तीव्दारे उद्देश्यपत्रिकेमध्ये ............. आणि .............. शब्द जोडण्यात आले.

   अ) समाजवादी     ब) धर्मनिरपेक्ष 
  क) प्रजासत्ताक      ड) राष्ट्राची एकता

   1) फक्त अ, ब, क 
  2) फक्त अ, ब, ड   
  3) फक्त ब, क, ड   
4) फक्त अ, क, ड

उत्तर :- 2

८).  भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ............. यातून व्यक्त होते.

   1) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार 

   2) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

   3) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे 

  4) वरीलपैकी एकही नाही

  उत्तर :- 2

९) ............. या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.

    1) 13-1-1976  
    2) 3-1-1977 
    3) 31-1-1978
    4) 1-3-1977

    उत्तर :- 2

१०) फाझल अली कमिशनचे सदस्य ................... होते.

   अ) के. एम. पण्णीकर   
   ब) हदयनाथ कुंझरू
   क) यशवंतराव चव्हाण  
   ड) अण्णा डांगे

   1) फक्त अ, ब 
   2) फक्त क, ड  
   3) फक्त ब, क  
   4) वरीलपैकी सर्व

   उत्तर :- 1


महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना
-----------------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना
------------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.
------------------------------------------------------

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे
-------------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम
-----------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर.

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती

▪️1. ग्रहाचे नाव - बूध

·         सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

·         परिवलन काळ - 59 

·         परिभ्रमन काळ - 88 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही. 

▪️2. ग्रहाचे नाव - शुक्र

·         सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

·         परिवलन काळ - 243 दिवस 

·         परिभ्रमन काळ - 224.7 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 

▪️3. ग्रहाचे नाव - पृथ्वी

·         सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

·         परिवलन काळ - 23.56 तास 

·         परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस 

·         इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. 

▪️4. ग्रहाचे नाव - मंगळ

·         सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

·         परिवलन काळ - 24.37 तास 

·         परिभ्रमन काळ - 687 

·         इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत. 

▪️5. ग्रहाचे नाव - गुरु

·         सूर्यापासुन चे अंतर - 77.86 

·         परिवलन काळ - 9.50 तास 

·         परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे 

इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.

 

▪️6. ग्रहाचे नाव - शनि

·         सूर्यापासुन चे अंतर - 142.6 

·         परिवलन काळ - 10.14 तास 

·         परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष 

·         इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत. 

▪️7. ग्रहाचे नाव - युरेनस  

·         सूर्यापासुन चे अंतर - 268.8  

·         परिवलन काळ - 16.10 तास 

·         परिभ्रमन काळ - 84 वर्षे 

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. 

▪️8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  

·         सूर्यापासुन चे अंतर - 449.8 

·         परिवलन काळ - 16 तास 

·         परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे 

·         इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

वकिली : दुर्गाबाई देशमुख

तुरुंगातून आल्यानंतर दुर्गाबाईंनी मद्रास विद्यापीठात नियमित अभ्यास सुरू केला. एम.ए. च्या परीक्षेत त्यांना पाच पदके मिळाली.

तिथूनच त्यांना कायद्याची पदवी मिळाली आणि १९४२ मध्ये दुर्गाबाईंनी सराव सुरू केला. खुनाच्या प्रकरणात युक्तिवाद करणारी ती पहिली महिला वकील होती.

🌺 महत्त्वपूर्ण योगदान : दुर्गाबाई देशमुख  🌺

🍀  त्यांनी १९३७ मध्ये आंध्र महिला सभेची स्थापना केली.

🌷  तसेच विद्यापीठ महिला संघ, नारी निकेतन अशा विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीसाठी दुर्गाबाई यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आयोगाने प्रकाशित केलेले  एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सर्व्हिस इन इंडिया  तयार केले गेले. आंध्र मधील खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांना 'नेहरू साक्षरता पुरस्कार' देण्यात आला.

🍀   त्यांनी बरीच शाळा, रुग्णालये, नर्सिंग शाळा आणि तांत्रिक शाळा स्थापन केली. तसेच अंधांसाठी शाळा, वसतिगृहे आणि तांत्रिक प्रशिक्षण केंद्रेही त्यांनी उघडली.

🍀🍀🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🍀🍀🌷🍀🍀

तुरुंगवास : दुर्गाबाई देशमुख

दुर्गाबाईंनी प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्या बरोबर त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात भाग घेतला

२५ मे १९३० रोजी दुर्गाबाईंना अटक करण्यात आली आणि एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.
बाहेर येताच दुर्गाबाईंनी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा त्यांना अटक केली गेली आणि तीन वर्षांची तुरुंगवासही भोगावा लागला.
तुरुंगाच्या या काळात दुर्गाबाईंनी इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढवले.

           🍃🍃🍃🌷🍃🍃🍃

दुर्गाबाई देशमुख

दुर्गाबाई यांचा जन्म १९०९ मध्ये आंध्र प्रदेशातील राजमुंदरी जिल्हातील काकीनाडा या गावी झाला

दुर्गाबाईंचा वयाच्या 8व्या वर्षी सुब्बाराव यांच्याशी विवाह झाला. पण परिपक्व झाल्यानंतर दुर्गाबाईनी एकत्र राहण्यास नकार दिला. आणि त्यांच्या वडिलांनी आणि भावाने त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले. व पुढील शिक्षणासाठी बाहेर पडल्या. आई श्रीमती कृष्णवेन्मा आणि वडील श्री. बीवीएन.रामाराव होते. दुर्गाबाईंचे वडील समाजसेवक होते. 

]लहानपणापासूनच मातृत्व, देशभक्ती आणि समाजसेवा या मूल्यांवर दुर्गाबाईंच्या मनावर परिणाम झाला होता.

 १९५३ मध्ये त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री चिंतामण देशमुख यांच्याशी वयाच्या ४४व्या वर्षी विवाह केला. दुर्गाबाई यांनी द स्टोन यू स्पीकेथ  नावाचे पुस्तक लिहिले.

१९८१ मध्ये पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यांचे निधन नरसानापेता श्रीकाकुलम जिल्ह्यात झाले.

           🍃🍃🍃🌷🌷🍃🍃🍃

🌺  शिक्षण : दुर्गाबाई देशमुख  🌺

दुर्गाबाईंच्या बालपण काळात मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. पण दुर्गाबाईना शिकण्याची खूप आवड होती. त्यांनी आपल्या शेजारच्या एका शिक्षकाबरोबर हिंदीचा अभ्यास सुरू केला. त्या काळात हिंदीचा प्रसार हा राष्ट्रीय चळवळीचा एक भाग होता.

दुर्गाबाईंनी लवकरच हिंदी भाषेत अशी योग्यता प्राप्त केली आणि १९२३ मध्ये त्यांनी मुलींसाठी राजमुंद्री येथे बालिका हिंदी पाठशाला ही शाळा सुरू केली. प्रयत्नाचे कौतुक करून गांधीजींनी दुर्गाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविले.

१९५३ मध्ये दुर्गाबाई यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

       🍃🍃🍃🍃🌷🌷🌷🍃🍃🍃🍃

पंचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास

📌पंचायत राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यावयाचा झाल्यास भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचे दिसते. अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्याचे स्वरूप खूपच वेगळे होते.

📌गावातील हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची. गावातील चावडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी रोज सकाळी ही मंडळी बसायची आणि गावातील लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करावयाची. गावामध्ये काही वाद, भांडणे झाल्यास त्यामध्ये लक्ष घालून सोडविणे, गावचा विकास होण्यासाठी योजना आखणे, गावाचा कारभार चालविणे, गावाचा कर गोळा करून राजाला खंड वसूली देणे इ. कामे ही पंचमंडळी पार पाडीत असत. गावात त्यांना फार मान होता. गावकरी त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत.

📌मौर्याच्या काळामध्ये तर त्यांना ग्रामशासनाचा अधिकार होता. व त्या दृष्टीने ह्या पंचायती खूपच विकसित झालेल्या होत्या. सन ८०० ते १००० च्या दरम्यान बोल घराण्याच्या इतिहासातील एकल येथील चौदा शिळा खऱ्या ग्रामपंचायतीच्या निर्देशक आहेत.

📌आजच्या ग्रामपंचायती करीत असलेली विविध गाव विकासाची कामे या ग्रामपंचायती त्या वेळी करीत होत्या. ग्रामपंचायतीची निवडणूक दरसाल होत असे व सर्व सभासद लोकनियुक्त असत. त्यांच्यावर सरकारी अधिकाऱ्यांची देखरेखीसाठी नेमणूक होई. ग्रामपंचायतीकडे स्वतःच्या निधी असायचा.न्याय निवाडे ही पंचायत करी, फाशीची शिक्षा क्वचितच अंमलात येई. देवळात नंदादीप लावणे अगर पंचायतीस अमुक इतक्या गाई पुरविणे या गोष्टी शिक्षा म्हणून देत असत.

📌भारतात अनेक साम्राज्ये आली होती. बाहेरून आलेल्या मोगलांनी ही पद्धत स्विकारली. भारता सारख्या खंडप्राय खेडया पाड्यात विखुरलेल्या देशाला विकेंद्रित शासनाचीच जरुरी होती. त्यामुळेच ही पद्धत अनेक वर्षे टिकून होती. त्यातूनच खेडी स्वयंपूर्ण बनत होती. ग्रामीण कारागीर, कष्टकरी यांना पोट भरण्याकरीता व्यवसाय मिळत होता.

📌शिवाजी महाराजांच्या काळात ग्रामपंचायतीची पद्धत चोहीकडे चालू होती. तीच रयतेच्या सोयीची वाटल्यावरून महाराजांनी कायम ठेवली. रयतेला न्याय मिळवण्यासाठी लांब कुठे जावे लागू नये म्हणून गावातील पंचांनीच फुकट न्याय दयावा हे अभिप्रेत होते. छत्रपतीच्या काळात ग्रामपंचायती पूर्वीप्रमाणे चालू होत्या.

📌ब्रिटीशांच्या आगमनानंतर त्यांनी मात्र आपल्या आपल्या स्वार्थासाठी गावगड्यांची चालू व्यवस्था मोडीत काढून तलाठी पोलीस पाटील यांच्यापासून ते कलेक्टर पर्यंत नोकरशाहीची फौज निर्माण केली. १८८२ साली लॉर्ड रिपनने मर्यादित स्वरुपात स्थानिक स्वराज संस्थेचा कार्यक्रम अंमलात आणला. परंतु आरोग्य आणि प्राथमिक सोयी सुविधा पुरतेच त्यांचे उद्दिष्ट मर्यादित होते. त्यामध्ये स्वराज्याचा मागमूसही नव्हता. याच काळात तालुका लोकल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड व काही मोठया गावात ग्रामपंचायती स्थापन झाल्या. या स्थानिक स्वराज्य संस्था स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही काही काळ चालू होत्या.

📌देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशाच्या पुनुरुत्थापनाचा व नवनिर्माणाचा विचार सुरु झाला. त्यामध्ये गाव विकासाच्या दृष्टीने विचार होणे स्वाभाविक होते. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात खेडयाकडे जाण्याचा मार्ग दाखविला आणि ग्राम स्वराज्याची कल्पना मांडली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवा मुलभूत आणि व्यापक अर्थ मिळाला.

📌१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि घटना समितीची स्थापना झाली. स्वातंत्र्य लढयात लोकांनी उराशी बाळगलेल्या ध्येयात ग्राम स्वराज्य हे सूत्र होते. त्यामुळे देशाची घटना होत असताना ग्रामपंचायतीचा स्वतंत्र तिसरा सत्र असावा अशी सूचना मांडण्यात आली. त्या सूचनेला घटना समितीतील काही लोकांनी विरोध केला.

📌भारतीय समाज व्यवस्था जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर आधारीत असल्यामुळे तथाकथित उच्च वर्गीय जातींना पंचायत व्यवस्थेत पंच म्हणून स्थान मिळत असे. तसेच गांवातील उच्च जातीय लोकच निर्णय घेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असत. अशा रितीने या पूर्ण व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि तथा कथित खालच्या जातींना कोणतेही स्थान नव्हते. ही व्यवस्था समानतेवर आधारीत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता.

📌त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या स्थराची व्यवस्था अंमलात येण्यासाठी काही काळ थांबावे लागेल कारण ग्रामपंचायतीचा वापर समाजातील हित संबंधी व श्रीमंत लोक करून घेतील व सर्व सामान्य लोकांवर व दलीतांवर अन्याय होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. तरीसुद्धा घटना समितीने सामाजिक उद्दिष्ट म्हणून ‘राज्ये, ग्रामपंचायत संघटीत करतील व त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करण्यास आवश्यक अधिकार देतील’ असे चाळीसाव्या मार्गदर्शक सूत्रात नमूद केले.

भारतीय शिक्षणावर मॅकॉलेचे मिनिट

📒2 फेब्रु.1835 ला थॉमस मॅकॉले यांनी  ‘Minute on Indian Education’ सादर, यात भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रयत्न

📒1813 चा चार्टर कायदा हा देशातील आधुनिक शिक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल,या कायद्याने शिक्षणासाठी वार्षिक 1₹ लाख तरतूद

📒भारतीयांना शिक्षण देण्याच्या पद्धतीबद्दल ब्रिटिशांमध्ये दोन गट Orientalists नुसार भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत,स्वतःचे धर्मग्रंथ शिकवावे,तर Anglicist नुसार इंग्रजी शिक्षण हा सर्वोत्तम पर्याय

📒त्यांच्या 'मिनिटात',त्यांनी इंग्रजीचा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरावे आणि भारतीयांना पाश्चात्य शिक्षण देण्याचे समर्थन केले

📒त्यांनी भारतीय साहित्याबद्दल म्हटले की:-
"एका चांगल्या युरोपियन लायब्ररीचा एक शेल्फ भारत आणि अरबस्तानच्या संपूर्ण मूळ साहित्यासाठी मोलाचा होता."

📒सरकारने फक्त काही भारतीयांनाच शिक्षित करावे,ते बाकीच्या लोकांना शिकवतील,असा त्यांचा सल्ला याला ‘Downward Filtration policy म्हणतात

📒त्यांना भारतीयांचा एक वर्ग तयार करायचा होता,जो हा वर्ग "रक्त आणि रंगाने भारतीय, परंतु मतांमध्ये,नैतिकतेने आणि बुद्धीने इंग्रजी "असेन.

राज्यशास्त्र - केशवानंद भारती खटला

🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.

🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.

🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.

🔸संसदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?

🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.

🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.

🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.

🔸या खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले गेले.

🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की, ' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.

🔸 संसदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.

🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.

🔸 या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.

🔸 केशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विविध अभ्यास शाखा

हवामनाचा अभ्यास
मीटिअरॉलॉजी

रोग व आजार यांचा अभ्यास
पॅथॉलॉजी

ध्वनींचा अभ्यास
अॅकॉस्टिक्स

ग्रह-तार्यांचा अभ्यास
अॅस्ट्रॉनॉमी

वनस्पती जीवनांचा अभ्यास
बॉटनी

मानवी वर्तनाचा अभ्यास
सायकॉलॉजी

प्राणी जीवांचा अभ्यास
झूलॉजी

पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास
जिऑलॉजी

कीटकजीवनाचा अभ्यास
एन्टॉमॉलॉजी

धातूंचा अभ्यास
मेटलर्जी

भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास
मिनरॉलॉजी

जिवाणूंचा अभ्यास
बॅकेटेरिओलॉजी

विषाणूंचा अभ्यास
व्हायरॉलॉजी

हवाई उड्डाणाचे शास्त्र
एअरॉनाटिक्स

पक्षी जीवनाचा अभ्यास
ऑर्निथॉलॉजी

सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र
हर्पेटलॉलॉजी

आनुवांशिकतेचा अभ्यास
जेनेटिक्स

मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास
न्यूरॉलॉजी

विषासंबंधीचा अभ्यास
टॉक्सिकॉलॉजी

ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र
कार्डिऑलॉजी

अवकाश प्रवासशास्त्र
अॅस्ट्रॉनॉटिक्स

प्राणी शरीर शास्त्र
अॅनाटॉमी

मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास)
अँथ्रापॉलॉजी

जीव-रसायनशास्त्र
बायोकेमिस्ट्री

सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)
बायोलॉजी

रंगविज्ञानाचे शास्त्र
क्रोमॅटिक्स

विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास
एथ्नॉलॉजी

उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र
हॉर्टिकल्चर

शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र
फिजिअॉलॉजी

फलोत्पादनशास्त्र
पॉमॉलॉजी

मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र
टॅक्सीडर्मी

भूपृष्ठांचा अभ्यास
टॉपोग्राफी

कुतूहल : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था

- वाढलेली सागरी वाहतूक; रासायनिक कारखाने, कंपन्या आणि घरांमधून समुद्रात सोडले जाणारे प्रदूषित पाणी; समुद्रात साठणारा प्लास्टिकचा प्रचंड कचरा; मोठय़ा प्रमाणावर होणारी यांत्रिक मासेमारी या सगळ्यांचा दुष्परिणाम सागरी पर्यावरणावर होत आहे.

- याबरोबरच समुद्रात इंधन आणि वाळूसाठी उत्खनन होते. गाळ एकाच जागी साचतो. याचा परिणाम जलचरांवर होतो. या सर्व समस्यांवर अभ्यास आणि संशोधन होणे गरजेचे आहे. याच उद्देशाने १९६६ साली राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी- एनआयओ) या संस्थेची स्थापना करण्यात आली.

- या संस्थेचे मुख्यालय गोव्यातील डोना पावला येथे असून कोची, मुंबई आणि विशाखापट्टणम येथे प्रादेशिक केंद्रे आहेत. दिल्ली येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) च्या घटक प्रयोगशाळांपैकी एनआयओ ही एक संस्था आहे. मोठय़ा संख्येने असलेले समुद्र शास्त्रज्ञ आणि योग्य समुद्री संशोधन या पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेली सीएसआयआरची एनआयओ ही संस्था महासागर विज्ञानातील प्रगत शिक्षणाचे केंद्र आहे.

- १९६० च्या दशकात आंतरराष्ट्रीय हिंद महासागर मोहिमेनंतर १ जानेवारी १९६६ रोजी एनआयओची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली असून या संस्थेमार्फत हिंद महासागरातील समुद्रशास्त्रीय वैशिष्टय़ांचे संशोधन केले जाते. आतापर्यंत येथे पाच हजारांहून अधिक विषयांवर संशोधन- लेखन झाले आहे.

- एनआयओच्या गोवा मुख्यालयात तसेच प्रादेशिक केंद्रांवर अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. यात ‘आर. व्ही. सिंधू संकल्प’ आणि ‘आर. व्ही. सिंधू साधना’ या दोन समुद्रीशास्त्रीय निरीक्षणासाठी सुसज्ज अशा जहाजांचा समावेश आहे.

-  अभ्यासासाठी तब्बल १५ हजार पुस्तके
आणि २० हजार शोधनियतकालिके असा ज्ञानसाठाही येथे आहे.
संस्थेत अनेक संशोधन घटकांचा समावेश आहे. मुख्यत्वे हिंदी महासागर जैविक केंद्र (आयओबीसी), जैविक समुद्र विज्ञान विभाग, भौतिक समुद्रशास्त्र विभाग, नियोजन आणि विदा विभाग, इत्यादी. गोव्यातील फील्ड युनिट मे १९६७ मध्ये सुरू केले गेले.

- आपल्या सभोवतालच्या समुद्रांबद्दल अभ्यास आणि पाण्याचे भौतिक, रसायन, जैविक, भूवैज्ञानिक, भू-भौतिक, अभियांत्रिकी आणि प्रदूषण या अनुषंगाने संशोधन करून ते ज्ञान सर्वासाठी खुले करणे, हे या संस्थेचे ध्येय आहे.
--------------------------------------------------

जीवनसत्त्व K के

_______________________________________

◾️रासायनिक नाव:-फायलोक्वीनोण

◾️प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम

🔰मुख्य कार्य:-

◾️ रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करते

◾️गूलुकोजचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर

◾️हाडांचा विकास

🔰 मुख्य स्रोत:-

◾️पालक,कोबी

◾️दूध , यकृत ,कडधान्ये

🔰 अभावाचा परिणाम

◾️रक्त गोठण्यास विलंब होतो

🔰आधिक्य चा परिणाम

◾️ऍनिमिया व कावीळ

_______________________________________