०४ मार्च २०२२

यंग बंगाल चळवळ:-(1826 ते 1832)

🔶 मुख्य मुद्दे :-

⚡️हेन्री लुई व्हिव्हियन डेरोजिओ हे यंग बंगाल चळवळीचे संस्थापक आहेत.

⚡️त्यांचा जन्म 1809,वडील-पोर्तुगीज तर आई- भारतीय होती, ते पोर्तुगीज वंशाचे भारतीय कवी होते आणि ते हिंदू कॉलेजचे सहाय्यक मुख्याध्यापक होते.

⚡️ते त्यांच्या काळातील एक मूलगामी विचारवंत होते आणि बंगालच्या तरुणांमध्ये पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान प्रसारित करणारे ते पहिले भारतीय शिक्षक होते.

⚡️वयाच्या 17व्या वर्षी ते हिंदू कॉलेजमध्ये शिक्षक रुजू.

⚡️त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी डेरोझियन किंवा यंग बंगाल या नावाने बंगालच्या लोकांमध्ये मूलगामी सुधारणावादी विचारांना चालना दिली.

⚡️त्यांनी महिलांच्या हक्कांच्या आणि त्यांचे शिक्षण याचा पुरस्कार केला.

⚡️ते कवी,कादंबरीकार आणि लेखक होते. ते आधुनिक भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी देखील होते.

⚡️हेन्री लुईस व्हिव्हियन डेरोजिओ यांची "जंगहिराचा फकीर" ही दीर्घ कविता आहे.

⚡️त्यांचे बहुतांश कार्य हे भारतीय धर्म, संस्कृती, नियम आणि नियमन,कठोरता, संस्कृती इ

⚡️26 डिसेंबर 1831 रोजी कलकत्ता येथे डीरोजिओचे वयाच्या 22 व्या वर्षी कॉलरामुळे निधन झाले.

अर्थसंकल्प

💰 अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन

💰 बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो.

💰 अर्थसंकल्प हा कलम 112 अन्व्यये जाहीर केला जातो.अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडला जात.

💰 आर. के. शन्मुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला.

💰1965-66 या वर्षांतील अर्थसंकल्पात पहिल्यांदाच काळ्या पैशांविरोधातील धोरण मांडण्यात आले.

💰 सर्वात जास्त 10 वेळा बजेट सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांना.

💰 2000 पर्यंत बजेट सायंकाळी 5 वाजता मांडले जायचे.ब्रिटीशकालीन पद्धतीने  2001 साली(भाजपचे सरकार)यशवंत सिन्हा अर्थमंत्री  प्रथा बदलून सकाळी 11 वाजता बजेट मांडण्यास सुरुवात.

💰 स्वातंत्र्यानंतर 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या.2022 मध्ये त्यांनी चौथा अर्थसंकल्प मांडला.

💰 मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यांमध्येच अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन पद्धत सुरु करण्यात आली आहे.

सुंदरबन

🛑 Recent news - सुंदरबन ही भारताची चक्रीवादळाची राजधानी आहे : IMD

🔰 सुंदरबनचे जंगल भारत आणि शेजारील बांग्लादेश व्यापून 10,000 चौरस किमी पेक्षा जास्त पसरलेले आहे, त्यापैकी 40% भारतात आहे.

🔰 भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीपासून बांग्लादेशच्या खुलना विभागातील बालेश्वर नदीपर्यंत पसरलेले आहे.

🔰भारतात, हे पश्चिम बंगालच्या
दक्षिणेकडील टोकापर्यंत मर्यादित आहे आणि दक्षिण 24 परगणा आणि उत्तर 24 परगणा या दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

🔰सुंदरबन डेल्टामध्ये 102 बेटे आहेत, त्यापैकी 54 लोकवस्ती आहेत. उर्वरित जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे.

🔰 जगातील सर्वात मोਠੇ किनारपट्टीवरील खारफुटीचे जंगल (सुमारे 10,000 किमी 2 क्षेत्र)

🔰 भारत (4,000 किमी ) आणि बांग्लादेश (6,000 किमी ) मध्ये सामायिक केले गेले आहे.

🔰 सुंदरबन हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि एक चिंताजनक(Critical) पाणथळ जागा आहे.

व्हर्नाक्युलर प्रेस कायदा:

💢 व्हर्नाक्युलर प्रेस कायदा १८७८ मध्ये लॉर्ड लिटनच्या व्हाइसरॉयल्टी अंतर्गत पारित करण्यात आला.

💢 हे फक्त भारतीय भाषिक वृत्तपत्रांच्या विरोधात होते.

💢 ब्रिटिशांविरुद्ध जनतेमध्ये असंतोष निर्माण करणार्‍या राजद्रोहाच्या साहित्याच्या छपाई आणि प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या कायद्याचा उद्देश होता.

💢 व्हर्नाक्युलर प्रेस कायद्याने जिल्हा दंडाधिकार्‍यांना कोणत्याही स्थानिक वृत्तपत्राच्या मुद्रक आणि प्रकाशकाला सरकारशी करारनामा जोडण्यासाठी बोलावण्याचा अधिकार दिला.

💢 दंडाधिकारी पुढे प्रकाशकाला Deposit Security करण्याची आणि वृत्तपत्राने नियमांचे उल्लंघन केल्यास ते जप्त करण्याची आवश्यकता असू शकते.

💢 गुन्हा पुन्हा घडल्यास, प्रेस उपकरणे जप्त केली जाऊ शकतात.  दंडाधिकार्‍यांची कारवाई अंतिम होती आणि कायद्याच्या न्यायालयात अपील करता येत नव्हते.

💢 एखाद्या स्थानिक वृत्तपत्राला सरकारी सेन्सॉरकडे पुरावे सादर करून कायद्याच्या ऑपरेशनमधून सूट मिळू शकते.

💢 व्हर्नाक्युलर प्रेस कायदा अंतर्गत, सोम प्रकाश, भरत, मिहीर, ढाका प्रकाश आणि समाचार यांच्यावर कारवाई करण्यात आली.

आर्थिक सर्वेक्षण 2021 - 2022

✡ 2022-23:- भारताचा विकास दर- 8.0 ते 8.5% राहण्याचा अंदाज

✡  2021-22:-  वास्तविक वृद्धी दर - 9.2%

✡ 2021-22:- कृषी विकास दर - 3.9%
मागाच्या वर्षी हा दर 3.6% होता.

✡ जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या अनुसार 2021-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सर्वात वेगाने वृद्धींगत होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून जारी राहणार.

✡ सेवा क्षेत्रात 2021-22 मध्ये 8.2% वृद्धी

✡ 31 डिसेंबर 2021 ला परकीय गंगाजळी 634 अब्ज अमेरीकी डॉलर्स, ही गंगाजळी 13 महिन्यांच्या आयातीइतकी आणि देशाच्या बाह्य कर्जापेक्षा जास्त

✡ 2021-22 मध्ये गुंतवणुकीत 15% भक्कम वाढ अपेक्षित

भारतातील नागरी सेवांचा विकास



✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले

✏️वेलेस्ली (1798-1805)
1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज
2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)
3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

✏️1853- खुली स्पर्धा

✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861
1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}
{19-1878}
2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय

✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)
1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)
 
✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन
1.करारबद्ध आणि uncovenanted Drop
2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),
-   प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),
-   अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)
3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

✏️माँटफोर्ड सुधारणा,1919
1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

✏️ली कमिशन,1924
1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.
2.लोकसेवा आयोग स्थापन करणे
(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

✏️GoI Act,1935
1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

ला- निना

✳️ Recent In News - भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले, "की यावेळी ला-निना डिसेंबर 2021 किंवा फेब्रुवारी 2022 पर्यंत त्याचा प्रभाव असेल."

🔰 अमेरिकेतील पेरूच्या  प्रासंगिक कारणांमुळे विकसित होणाऱ्या पाण्याच्या शीत प्रावहास 'ला- निना' असे म्हणतात.

🔰ला-निना प्रवाह डिसेंबर महिन्यात आढळून येतो.

🔰ला-निनास दक्षिण हेलकाव्याचा शीत टप्पा म्हणूनही ओळखतात.

🔰ला-निना हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ लहान मुलगी असा होतो.

🔰ला-निना भारतासाठी अनुकूल तर चीनसाठी प्रतिकूल आहे.

महत्वाच्या लढाया

🔹1780-84 :- 2nd अँग्लो म्हैसूर युद्ध, हैदरअलीचे निधन- संघर्ष टिपूकडे > मंगलोरच्या तह

🔹1790-92 :- 3rd अँग्लो म्हैसूर युद्ध >सेरिंगपट्टम  तह

🔹1799 :- 4th अँग्लो म्हैसूर युद्ध, मराठे-निजामाने ब्रिटिशांना मदत, युद्धात टिपूचा मृत्यू

🔹1803-1805 :- 2nd अँग्लो मराठा युद्ध, मराठे पराभूत 

🔹1814-16 :- अँग्लो नेपाळ युद्ध, सगौलीचा तह

🔹1817-19 :- 3rd अँग्लो मराठा युद्ध, मराठे पराभूत 

🔹1823-26 :-1st अँग्लो बर्मा युद्ध, बर्मा पराभव Yandahbooचा तह

🔹1839-42 :-1st अँग्लो अफगाण युद्ध, इंग्रजांचा पराभव

🔹1845-46 :-1st अँग्लो-शीख युद्ध, शिखांचा पराभव, लाहोरचा तह

🔹1848-49 :-2nd अँग्लो शीख युद्ध, शीखांचा पराभव, पंजाब ब्रिटिशांच्या ताब्यात

🔹1852 :-2nd अँग्लो बर्मा युद्ध, इंग्रज जिंकले

🔹1878-80 :-2nd अँग्लो अफगाण युद्ध, इंग्रजांचे नुकसान

🔹1885-87 :-3rd अँग्लो बर्मा युद्ध, English Annexed Burma

🔹1919 :-3rd अँग्लो अफगाण युद्ध, इंग्रजांनी विजय मिळवला तरी युद्धाचा फायदा झाला नाही

राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात घट.


🌟राज्यातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सुमारे १३०० कोटींनी घट झाली आहे. ओमायक्रॉनच्या लाटेत लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संकलनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

💫फेब्रुवारी महिन्यात राज्यात वस्तू आणि सेवा कराचे १९ हजार ४२३ कोटींचे संकलन झाले. जानेवारी महिन्यात राज्यात २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले होते. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात संकलनात १२८२ कोटींची घट आली. राष्ट्रीय पातळीवर जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत ५.६ टक्के घट झाली. महाराष्ट्रातही हा कल कायम राहिला.

🌟फेब्रुवारीत २८ दिवस असल्याने जानेवारीच्या तुलनेत संकलन कमीच होते. पण याबरोबरच ओमायक्रॉनच्या लाटेमुळे जानेवारीअखेरीस व फेब्रुवारीत लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच रात्रीची संचारबंदी याचा संकलनावर परिणाम झाल्याचे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांची तुलना केल्यास फेब्रुवारीतील संकलन घटले आहे.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा - सौरभ चौधरीला सुवर्ण.


🌅सौरभ चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करताना पहिल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मंगळवारी भारताचे खाते उघडले.

🌅आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभने १६ अचूक लक्ष्यवेध करताना प्रथम क्रमांक पटकावला, तर जर्मनीच्या मायके शिवाल्डने (६) दुसरा क्रमांक पटकावला. रशियाच्या आर्टिम शेरनॉसोव्हने कांस्यपदक पटकावले.

🌅मात्र हे पदक युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाच्या खात्यावर जमा होणार नाही. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या १९ वर्षीय सौरभने पात्रता फेरीत ५८४ गुण कमावले. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठ नेमबाजांपैकी त्याची कामगिरी तिसऱ्या क्रमांकाची ठरली.

मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक.


🟠रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

🟡केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते.

🟠पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सिंग पुढे म्हणाले, तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी याबाबतीत दूरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं.

युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट ; WHO ने देखील व्यक्त केली भीती.

🎭🎗युक्रेनमध्ये युद्धादरम्यान एक नव संकट निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे की, कीव्हसह इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमध्ये ६०० रुग्णालये आहेत. तेथे अजूनही १७०० करोनाचे रुग्ण दाखल आहेत.

🎭🎗डब्ल्यूएचओने आपल्या असेही म्हटले आहे की, करोना रुग्णांव्यतिरिक्त युक्रेनमधील नवजात, गर्भवती महिला आणि वृद्धांनाही वेळोवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते. युद्धाच्या काळात लोकांच्या मनस्थितीवर परिणाम झाल्याने परिस्थितीही चिंताजनक बनली आहे.

🎭🎗कठीण परिस्थितीमुळे तेथील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जवळपास संपला आहे. ऑक्सिजन जनरेटर प्लांटमधून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत.

🎭🎗रशियाने युक्रेनवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा आजचा पाचवा दिवस आहे. देशभरात आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालयांवर म्हणजेच आरोग्य सेवांवरही गंभीर संकट निर्माण झाले आहे. तसेच रुग्णवाहिकेतून रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना त्यांच्यावर गोळीबार होण्याचा धोकाही वाढला आहे.

विश्लेषण : बंगाल विधानसभा अधिवेशन पहाटे २ वाजता! काय आहे यामागील कारण.

🚨पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनगड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी परस्परांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. उभयतांमध्ये अगदी नळावरच्या भांडणाप्रमाणे भांड्याला भांडे लागलेले असते.

🚨राज्यपाल फारच ट्वीट करून सरकारचे वाभाडे काढत असल्याने अलीकडेच ममतादिदींना राज्यपालांचे ट्वीट खातेच ब्लाॅक करून टाकले. त्यावर कुरघोडी म्हणून राज्यपालांनी सारे आदेश ट्वीटच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असतानाच विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यावरून वाद झाला. साधी टंकलेखनीय चूक, पण त्याचाही राज्यपालांनी किती मुद्दा ताणून धरला. शेवटी ममता बॅनर्जी यांना एक पाऊल मागे घ्यावे लागलेच.

🚨काय आहे वाद - पश्चिम बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्च रोजी बोलाविण्याची शिफारस मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली. आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अधिवेशनासाठी पत्र दिले होते. पण घटनेतील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन शिफारस करायची असते याकडे राज्यपालांनी लक्ष वेधत शिफारस पुन्हा सरकारकडे पाठविली.

🚨कारण आधी पत्र मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयाशिवाय शिफारस पत्र पाठविणे हा ममता बॅनर्जी यांचा अगोचरपणाच म्हणावा लागेल. राज्यपालांनी नकार दिल्याने ममता यांच्या मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला. राज्यपालांना शिफारस पत्र पाठविले. हे शिफारस पत्र पाठविताना एक साधी चूक झाली. पण ही चूकच पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल विरुद्ध तृणमूल काँग्रेस सरकारमधील वाद वाढण्यास कारणीभूत ठरली.

जगातील सर्वात मोठं कार्गो विमान रशियाच्या हवाई हल्ल्यात जळून खाक; युक्रेन म्हणालं, “विमान नष्ट झालं तरी…”.

✈️रशिया युक्रेनवर करत असलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये जगातील सर्वात मोठं कार्गो विमान नष्ट झालं नाही. युक्रेनमध्ये तयार करण्यात आलेलं अंटोंनोव्ह-२२५ मिर्या असं या जगातील सर्वात मोठ्या कार्गो विमानाचं नाव होतं. हे विमान किव्हजवळच्या होस्तोमील विमानतळावर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये नष्ट झालंय. युक्रेनमधील सरकारी हत्या निर्मिती कंपनी असणाऱ्या युक्रोबोरोनप्रोम या कंपनीने रविवारी यासंदर्भातील माहिती दिलीय.

✈️“रशियन हल्लेखोरांनी युक्रेन हवाई क्षेत्रातील महत्वाचं आणि विशेष असं एएन-२२५ मिर्या विमान नष्ट केलंय. किव्हजवळच्या होस्टोमील एअरफिल्डवर हा सारा प्रकार घडलाय,” असं कंपनीने म्हटलंय. इतकच नाही तर विमान नष्ट झालं असलं तरी पुन्हा आम्ही ते निर्माण करु असा विश्वासही कंपनीने व्यक्त केलाय. “आम्ही पुन्हा या विमानाची बांधणी करु. आम्ही आमचं सशक्त, मुक्त आणि स्वतंत्र युक्रेनचं स्वप्न पूर्ण करु,” असंही कंपनीने म्हटलं आहे.

✈️या विमानाच्या दुरुस्तीसाठी तीन बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च होईल असा अंदाज आहे. तसेच हे विमान दुरुस्त करण्यासाठी बराच वेळही लागणार आहे.

पंतप्रधान मोदींनी भारतीय तरुणांना रिल्स बनवण्याचं केलं आवाहन; विदेशी व्हायरल जोडीचं कौतुक करत म्हणाले.

🗺पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातमध्ये लोकप्रिय टांझानियन भावंडांची जोडी किली पॉल आणि त्यांची बहीण नीमा यांचा उल्लेख केला आणि भारतीयांना त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित केले. राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या प्रसिद्ध जोडीच्या सर्जनशीलतेचे आणि भारतीय संस्कृतीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचे कौतुक केले.

🗺या टांझानियन जोडीने आपल्या भारतीय गाण्यांवरील व्हिडिओंनी देशातील अनेकांची मने जिंकली आहेत. किली आणि नीमा यांनी प्रजासत्ताक दिनी भारतीय राष्ट्रगीत गायले आणि लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, असेही मोदींनी नमूद केले. भारतातील वैविध्यपूर्ण भाषा लोकप्रिय करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधानांनी भारतीयांना, विशेषत: मुलांनी किली आणि नीमा यांच्याकडून बोध घेण्याचे आणि लिप-सिंक व्हिडिओ बनवण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, यामुळे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा अर्थ पुन्हा स्पष्ट होण्यास मदत होईल.

🗺काही वर्षांपूर्वी १५० हून अधिक देशांतील परदेशी नागरिकांनी त्यांच्या सांस्कृतिक पोशाखात ‘वैष्णव जन तो’ गाऊन गांधी जयंती कशी साजरी केली होती, याची आठवणही मोदींनी केली. सोशल मीडियावर किली-नीमाच्या चाहत्यांना पंतप्रधानांनी या प्रतिभावान जोडीची कबुली दिल्याचे पाहून आनंद झाला. तथापि, काहींनी लिप-सिंक केलेले व्हिडिओ बनवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या कल्पनेवर टीका केली.

तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत.

🏵रशियाने शक्तिशाली सैन्याच्या जोरावर युक्रेनवर हल्ला केला आणि युक्रेनची यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. युक्रेनला जगापासून तोडण्यासाठी रशियाने युक्रेनच्या ब्रॉडबँड सेवेची यंत्रणाही बेचिराख करण्यास सुरुवात केली.

🏵या पार्श्वभूमीवर युक्रेनचे उपपंतप्रधान आणि डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री मिकायलो फेडोरोव्ह यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क यांनी पुढील १० तासात युक्रेनमध्ये २,००० उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारी स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा सुरू केली. यामुळे युक्रेनचा जगाशी संपर्क तोडण्याचा रशियाचा हेतू अपूर्ण राहणार आहे.

🏵एलोन मस्क यांनी स्वतः युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत युक्रेनमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केल्याची माहिती दिली. युक्रेनच्या मंत्र्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर १० तासात एलोन मस्क यांनी युक्रेनमध्ये ही सेवा सुरू झाल्याचं कळवलं.

राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार - उदय सामंत.

🩸मराठी भाषा जगाच्या पाठीवर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात रत्नागिरी पंचायत समितीचा शिक्षण विभाग, कोकण मराठी साहित्य परिषदेची (कोमसाप) मालगुंड शाखा आणि कवी केशवसुत स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

🩸सामंत म्हणाले की, मराठी भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अधिक चांगले दिवस आणण्यासाठी आपण सर्वानी या भाषेचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. ही भाषा अधिक सुदृढ करण्यासाठी, तसेच जगाच्या पाठीवर पोचवण्यासाठी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्रात करण्यात येईल.

🩸मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असून ते त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असाही विश्वासमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.

🩸कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

रशियाची आर्थिक नाकेबंदी ; ‘स्विफ्ट’ प्रणालीतून बँका हद्दपार, अमेरिकेसह मित्रराष्ट्रांचा महत्त्वाचा निर्णय.

🧩युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने निवडक रशियन बँकांना ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हद्दपार करण्याबरोबरच रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक निर्बंध लादले. या कठोर निर्बंधांमागे रशियाची अर्थक्षमता नियंत्रित करून युद्धाचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा हेतू आहे.

🧩अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि कॅनडाने रशियावरील आर्थिक निर्बंधांना मान्यता दिल्यानंतर काही रशियन बँकांना ‘स्विफ्ट’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रशियाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असलेली ‘तेल आणि वायू निर्यात’ ‘स्विफ्ट’वर अवलंबून आहे. त्यामुळे या निर्बंधांचा रशियाला मोठा फटका बसेल, असा अंदाज आहे.

🧩‘स्विफ्ट’ ही जगातील मुख्य बँकिंग संदेश सेवा आहे. भारतासह २००हून अधिक देशांमधील सुमारे ११ हजार बँका आणि वित्तसंस्थांना ती सेवा पुरवते. ही प्रणाली जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदेशवहनात केंद्रस्थानी असल्याने रशियाला गंभीर आर्थिक परिणामांचा सामना करावा लागेल, असे सांगण्यात येते.

🧩रशियन सैन्याचे युक्रेनवर हवाई हल्ले सुरू असताना मित्रराष्ट्रांनी शनिवारी कठोर आर्थिक निर्बंधांचा निर्णय घेतला. त्यानुसार रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या काही मालमत्ताही गोठवल्या जाणार आहेत. त्यामुळे परदेशातील राखीव अर्थसाठे मिळवण्याच्या रशियाच्या क्षमतेवर अंकुश येईल. मित्रराष्ट्रांनी घातलेल्या निर्बंधांचा प्रभाव कमी करण्यासाठी रशिया युद्धासाठी पैसा वापरणे थांबवेल, असा या निर्बंधांमागील हेतू आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...