०१ मार्च २०२२

अर्थव्यवस्था

बॅसेल कमिटी ऑन बँक सुपरव्हीजन (BCBS) या संस्थेच्या अहवालानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या नियमांनुसार ठरविण्यात आलेल्या मानदंडांची पूर्तता करण्यास कमी पडली - बॅसेल III.

आंतरराष्ट्रीय 

UNच्या ‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स’ या अहवालाच्या अंदाजानुसार, 2027 सालापर्यंत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश – भारत.

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) याच्या सर्वेक्षणानुसार, जगातले सर्वात कमकुवत पोलीस दल असलेला देश – भारत.

राष्ट्रीय 

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) याच्या सर्वेक्षणानुसार, पोलीस दलासंबंधी जागतिक निकष पूर्ण करणारा राज्य - पंजाब.

NITI आयोगाने या सालापासून फक्त विद्युत वाहनेच भारतात विकली जावी असा प्रस्ताव मांडला आहे - 2030.

१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी

  

आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.

This. या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

This. या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

This. या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

Nara. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

Branch. या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

Nara. नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

This. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक


🧩नाणे बाजार ( Money Market)-

🅾नाणे बाजार ही अल्प मुदतीच्या पत साधनाची खरेदी करणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेद्वारे अल्प मुदतीची कर्जे मागणा-यांची मागणी पुर्ण केली जाते.तसेच धनकोंना रोखता व उत्पन्न प्राप्त करुन दिले जाते.

🧩नाणे बाजारातील उप बाजार

१.     अल्प सूचना किंवा मागणी कर्ज बाजार (CMM) – यात २४ तास ते ७ दिवसांपर्यंतची कर्जे देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया यात धनकोची भुमिका बजावते.

२.     ट्रेझरी बिल्स बाजार (TBM) - रिझर्व बँक ऑफ हा यातील मोठा खरेदीदार आहे.

३.     हुंडी बाजार

४.     सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटस् बाजार (CD) - हे साधन बँकांसाठी १९८९ व वित्त संस्थासाठी १९९३ ला उपलब्ध झाले. याची शिफारस १९८२ च्या तांबे समितीने केली होती. १९८७ च्या वाघुळ समितीच्या शिफारशीने सुरुवात झाली.

५.     कमर्शिअल पेपर बाजार (CP) – नोंदणीकृत कंपन्यांना आपल्या खेळत्या भांडवलाची गरज पुर्ण करण्यासाठी १९९३ पासुन सुरुवात.

६.     मनी मार्केट म्युच्युएल फंड (MMMF) – यात स्टेत बँक व तीच्या सहयोगी बँकांना १९८७ मध्ये खाजगी कंपन्यांना १९९३ मध्ये व्यवहारास प्रवेश मिळाला.

७.     डिस्काउंट अँन्ड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया  (DFHI-१९८८) (वटावगृह)

🅾भारतीय नाणे बाजाराची रचना

🧩नाणे बाजार

संघटीत क्षेत्र                                                असंघटीत क्षेत्र

🧩रिझर्व बँक ऑफ इंडिया (सर्वोच्च संस्था)

१) व्यापारी बँका                                          १) सराफी पेढ्या

२) विकास बँका                                          २) सावकार

३) सहकारी बँका                                         ३) अनियंत्रित बिगर बँकींग वित्तीय संस्था

४)गुंतवणूक संस्था-बचत बँका, पोस्ट ऑफिस म्युच्यूअल फंड, एलआयसी

🧩बँकिंग क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान-

१.     संगणकीकरण – व्यापारी बँकांच्या संगणकीकरणास १९९३ ला सुरुवात झाली.

२.     एम. आय. सी. आर. समाशोधन पध्दती- १९८७ पासून रिझर्व्ह बँकेने एम. आय. सी. आर. तंत्रज्ञानाची ( Magentic Ink Character Recongnition Technology)

धनादेश देवघेवीसाठी अवलंब सुरु केला.

३.     इलेक्ट्रॉनिक समाशोधन सुविधा – १९९६-९७ पासून रिझर्व्ह बँकेने ही सुविधा विभिन्न संस्थासाठी सुरु केली.

४.     इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण पध्दती (EFT System) – ही निधी स्थानांतरण सुविधा १९९६ पासून करण्यात आली असून मुंबई, मद्रास या दोन शहरांमध्ये कार्यान्वित करण्यात आली.

आरबीआय आयनेटद्वारा ही सुविधा पुरविते. मार्च१९९९ पासून ही सुविधा सर्व अनुसूचित बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली.

५.     स्वयंप्रदान पध्दती (ATM) – व्यापारी बँकांच्या अनेक शाखांनी मोठ्या प्रमाणावर ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या १००००/- रुपये पर्यंतची रक्कम विनामुल्य कोणत्याही बँकेच्या एटीएम मधुन काढता येते.

६.     एस. पी. नेटवर्क पध्दती (Shared Payment Network System/SPNS) – मुंबईमध्ये एस. पी. नेटवर्क पध्दती १ फेब्रुवारी १९९७ पासून सुरु करण्यात आली. इंडियन बँक असोशिएशनने हे नेटवर्क स्थापन केले असून मुंबईतील सभासद बँकांचे सर्व एटीएम केंद्र या नेटवर्कला जोडले आहे.

७.     स्वीफ्ट नेटवर्क – भारतातील ८८ बँका स्वीफ्ट नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत. स्वीफ्ट म्हणजे (Society for World wide Interbank Financial Tele Communication/ SWIFT)  होय. ही संस्था आंतरराष्ट्रीय संदेशवहन नेटवर्क चालविते व त्याद्वारे जगातील सदस्य बँकांशी वित्तीय संदेशवहन करण्याची महत्वपुर्ण सेवा उपलब्ध होते.

८.     EDI / Electronic Data Enterchange-

९.     बँकिंग तंत्रज्ञान विकास व संशोधन संस्था (Instititute for Development & Research in Banking Technology / IDRBI) रिझर्व्ह बँकेने या संस्थेची स्थापना १९९६ ला हैद्राबाद येथे केली.

१०.इंटरनेट वेबसाईट (Internet Website) – १७ सप्टेंबर १९९६

११.भारतीय वित्तीय नेटवर्क: इंफिनेट (Indian Financial Network # INFINET) – जुन १९९९ ला हा कार्यक्रम सुरु झाला. आरबीआय व आयडीआरबीआय या दोन संस्थानी संयुक्तपणे इंफिनेट सुरु केले आहे.

१२.उपग्रह आधारित नेटवर्क (Setelite – based Wide Area Network / WAN) – उपग्रह आधारित व्यापक क्षेत्रिय नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. या संदर्भात एका करारावर फेब्रुवारी १९९८ मध्ये सह्या झाल्या आहेत.

🧩भांडवल बाजार

1. भांडवल बाजार म्हणजे अशी यंत्रणा किंवा संघटना की जिच्यामार्फत दिर्घ मुदतीचे भंडवल गरजू व्यक्ती, सरकार किंवा संस्था यांना मिळू शकते.

🧩भारतातील विकास बँका

🅾जगातील पहिली विकास बँक – सोसायटी  जनरल द बेल्जीक, बेल्जियम (१९२२)

🅾आशियातील पहिली विकास बँक – इंडस्ट्रियल बँक ऑफ जपान , १९०२

🅾भारतातील पहिली विकास बँक – टाटा औद्योगिक बँक १९१७

🅾कोलकाता औद्योगिक बँकेची स्थापना १९१९ मध्ये कर

Important question

➡️ हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
👉 बियास

➡️ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
👉 तिरुवनंतपुरम

➡️ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
👉 औरंगाबाद

➡️ हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
👉 रांची

➡️ फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
👉 जळगाव

➡️ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
👉 लक्षद्वीप

➡️ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
👉 १२ लाख चौ.कि.मी.

➡️ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
👉 दख्खनचे पठार

➡️ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
👉 उत्तर

➡️ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
👉 निर्मळ रांग

➡️ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
👉 नदीचे अपघर्षण

➡️ दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
👉 Lignite

➡️ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
👉 औरंगाबाद

➡️ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
👉 पाचगणी

➡️ हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
👉 आसाम

➡️ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
👉 मणिपूर

➡️ पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
👉 मरियाना गर्ता

➡️ गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
👉 राजस्थान

➡️ घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
👉 दुर्गा

➡️ ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
👉 प्रशांत महासागर

➡️ कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
👉 शुक्र
➡️ कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
👉 गोदावरी

➡️ भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
👉 आसाम

➡️ जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
👉 मणिपुरी

➡️ भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
👉 महाराष्ट्र

➡️ इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
👉 आंध्र प्रदेश

➡️ पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
👉 अरूणाचल प्रदेश

➡️ वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
👉 महाराष्ट्र

➡️ लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
👉 हिमाचल प्रदेश

➡️ फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
👉 गुजरात

➡️ पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
👉 राजस्थान

➡️ कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
👉 सिक्किम

➡️ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
👉 मध्य प्रदेश

➡️ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
👉 नंदुरबार

➡️ कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
👉 केरळ

➡️ महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
👉 पूर्व विदर्भ

➡️ राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
👉 अहमदनगर

➡️ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
👉 नर्मदा

➡️ 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
👉 कृष्णा

➡️महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
👉 ९%

➡️महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
👉 उत्तर सीमेला

➡️ महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
👉 ७२० किमी

➡️ कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
👉 पंचगंगा

➡️ महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
👉 ४४० कि.मी.

➡️ महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
👉 पारनेर (अहमदनगर जिल्हा)

भूकवचातील पदार्थ : खडक.

🌸 खडकाची व्याख्या : भूपृष्ठावरील अतिशय कठीण अशा दगडापासून तर अतिशय मृदू अशा बारीक मातीपर्यंत सर्व पदार्थाचा समावेश ‘खडक’ या संज्ञेत होतो.

✍ खडकांचे वर्गीकरण : वेगवेगळ्या आधारभूत तत्त्वांचा वापर करून विविध प्रकारे खडकांचे वर्गीकरण केले जाते. उत्पत्तीनुसार झालेले खडकांचे वर्गीकरण सर्वमान्य आहे.

🌸 खडकांचे उत्पत्तीनुसार वर्गीकरण :

१. अग्निजन्य खडक २. जलजन्य किंवा स्तरीत किंवा गाळाचे खडक ३. रूपांतरित खडक.

१) अग्निजन्य खडक : पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वी वायूरूपात होती. त्यानंतर तिचे रूपांतर तप्त अशा द्रवरूपात झाले. कालांतराने पृथ्वीचे कवच थंड होऊन जे कठीण खडक तयार झाले, त्यांना ‘अग्निजन्य खडक’ असे म्हणतात. भूपृष्ठावरील हे खडक अतिशय प्राचीन व सर्वात प्रथम निर्माण झालेले असल्याने त्यांना प्राथमिक खडक असेही म्हणतात. अग्निजन्य खडकांच्या निर्मितीनंतर इतर खडकांची निर्मिती अग्निजन्य खडकांपासून झाली आहे.

✍ लाव्हारस थंड होण्याच्या स्थितीवरून अग्निजन्य खडकांचे प्रकार : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तप्त लाव्हारस थंड होऊन भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक तयार झाले. अंतर्गत भागातही तप्त लाव्हारस थंड होऊन काही अग्निजन्य खडक तयार झाले. लाव्हारस ज्या ठिकाणी व ज्या स्थितीत थंड झाला त्यावरून त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात- भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक आणि भुपृष्ठांतर्गत अग्निजन्य खडक.

१) भूपृष्ठावरील अग्निजन्य खडक : भूगर्भातील तप्त लाव्हारस भूपृष्ठाला पडलेल्या भेगांमधून ज्वालामुखीच्या रूपाने पृष्ठभागावर येऊन पसरतो. कालांतराने थंड होऊन त्याचे कठीण अशा खडकांत रूपांतर होते, अशा खडकांना ‘बानिर्मित अग्निजन्य खडक’ किंवा ‘ज्वालामुखी खडक’ म्हणतात.

२) भूपृष्ठांतर्गत अग्निजन्य खडक : बऱ्याच वेळा भूपृष्ठांतर्गत भागातील तप्त लाव्हारस भूपृष्ठावर न येता अंतर्गत भागातच थंड होतो. त्यापासूनही कठीण अशा खडकांची निर्मिती होते. त्यांना ‘अंतर्गत अग्निजन्य खडक’ असे म्हणतात. त्यांची निर्मिती भूपृष्ठापासून बऱ्याच खोलवर होत असल्याने त्यांना ‘पातालिक खडक’ असेही म्हणतात. अंतर्गत भागात लाव्हारस सावकाश थंड होत असल्याने स्फटिकीभवनास जास्त काळ लागतो. म्हणून त्यातील स्फटिक मोठे असतात. भूपृष्ठाची झीज झाल्यावर हे खडक उघडे पडतात. ग्रॅनाइट खडक हे याचे उत्तम उदाहरण आहे. आंध्र प्रदेशात हैद्राबादजवळ, कर्नाटक राज्यात व अबू पर्वतावर हे खडक आढळतात.

🌸 अंतर्गत अग्निजन्य खडकांचे उपप्रकार : अंतर्गत भागात तप्त लाव्हारस वेगवेगळ्या पद्धतीने थंड होऊन अग्निजन्य खडक तयार होतात, त्यावरून त्यांचे अनेक उपप्रकार पडतात

🌸 बॅथोलिक : भूपृष्ठापासून जास्त खोलीवर लाव्हारस थंड होऊन अशा प्रकारचे खडक निर्माण होतात. त्यांचा आकार अवाढव्य व ओबडधोबड असतो. लाव्हारस पृष्ठभागावर न येता अंतर्गत भागातच थंड होत असल्याने हवेशी संबंध येत नाही. सावकाश थंड होत असल्याने त्यातील स्फटिक कण मोठे असतात.

🌸 लॅकोलिथ : भूपृष्ठाच्या खाली परंतु कमी खोलीवर लाव्हारस थंड होऊन खडक तयार झाले तर त्यांना लॅकोलिथ म्हणतात. इतर बाबतीत त्यांचे बॅथोलिक खडकांशी बरेच साधम्र्य असते. यांचा आकार साधारणत: घुमटाकार असून तळाला पसरट व वरील भाग खडबडीत असतो.

होमरूल चळवळ

* होमरूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा आपणास अधिकार प्राप्त करून घेणे. 

* इंग्लंडच्या जोडखातून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होमरुलची चळवळ प्रथम "आयर्लंडमध्ये" सुरु झाली. 

* डॉ. अनी बेझंट या विदुषीने तिचा प्रथम विचार मांडला. 

* बेझंट ह्या जन्माने आयरिश होत्या, २५ सप्टेंबर १९१५ साली होमरूल लीग [ स्वराज्य संघ ] याची स्थापना करण्यात आली. 

* त्यांनी धार्मिक थिओसोफ़िकल सोसायटी हा संप्रदाय स्थापन केला. 

* २ जानेवारी 1916 रोजी मद्रास प्रांतात 'कॉमन विल' हे वृत्तपत्र स्थापन केले. 

* इंग्लंडचा दौरा करून डॉ अनी बेझंट हिंदुस्तानात परतल्यानंतर त्यांनी मद्रासेत 'न्यू इंडिया' नावाचे एक आणखी वृत्तपत्र काढून आपले विचार सुरु केले.

📚लो. टिळकांची होमरूल चळवळ

* हिंदुस्तानासाठी स्वराज्य मागणे व त्यासाठी चळवळ उभारणे, हि त्यावेळी जहाल विचारसरणीच होती. 

* बेझंट बाईच्या होमरूल चळवळीच्या अगोदरच त्यांनी १८ एप्रिल १९१६ रोजी त्यांना महाराष्ट्रात होमरूल चळवळ स्थापन केली होती. व जोसेफ बॉप्टिस्टा हे या लीग चे अध्यक्ष होते. 

* न. चि. केळकर हे तिचे सचिव होते.

📚होमरूल चळवळीचे परदेशातील कार्य

* हिंदुस्त्नातील चळवळीचे कार्य हे परदेशातही उमटले. 

* मद्रास हाय कोर्टाचे न्यायाधीश सर सुब्र्म्ह्न्यम अय्यर हे मद्रास प्रांतातील होमरूल लीगचे अध्यक्ष होते. 

* ईंग्लंड व अमेरिकेतही होमरूल या संघटनेचे वृत्त या देशातील वृत्तपत्रानीही घेण्यास सुरवात केली.

📚होमरूल चळवळीचे कार्याचे परीक्षण

* राष्ट्रसभेच्या धोरणात बदल 

* पाश्चात्य देशात हिंदी स्वराज्याबद्दल सहानुभूती 

* मॉन्टेग्यू साहेबाची  इतिहास प्रसिद्ध घोषणा ( ऑगस्ट घोषणा )

📚होमरूल चळवळीचे उदिष्टे

* ब्रिटीश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ताबडतोब प्राप्त करणे

* देशातील लोकमत जागृत करून ते संघटीत करणे

* इंग्रजांच्या जुलुमी धोरणाचा परिचय सामान्य जनतेला करून देणे

* स्वराज्य मिळून देण्यासाठी देशातील सर्व साधनसामुग्रीचा वापर करणे

* इंग्रज प्रशासनाकडून भरीव राजकीय सुधारणा प्राप्त करणे.

आधुनिक भारताचा इतिहास


🅾भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

🅾१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

🅾२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

🅾लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

🅾लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

🅾भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.

❇️ 1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.

❇️1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.

❇️संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.

❇️या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.

❇️1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.
❇️भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.

❇️मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.

❇️1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.

❇️1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...