०१ मार्च २०२२

व्हाइसरॉय लिनलिथगो

कार्यकाळ

(१९३६-१९४३)

स्टॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य  केले होते.

  लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष  होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता.

   १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले.

दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली.

  सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.

  १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

  सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले.  १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.

विधानपरिषद


विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती:

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सात घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर आणि कर्नाटक , तेलंगणा , आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना :
1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :
1. 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

2. 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

3. 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

4. 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

5. 1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल :
सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल :
विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :
विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

__________________________

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक


🅾नियंत्रक आणि महालेखाकार (कॅग) भारत लेख 148 स्थापना करून एक अधिकार आहे, भारतीय संविधानाच्या , जे ऑडिट सर्व पावत्या आणि खर्च या भारत सरकारच्या आणि राज्य सरकार , संस्था आणि अधिकारी सेवनाने यांनी आर्थिक त्या सरकार.

🅾 कॅग ही सरकारी मालकीच्या कंपन्यांचे बाह्य ऑडिटरही आहेआणि सरकारी कंपन्यांचे पूरक लेखापरीक्षण करते, म्हणजेच कोणतीही नॉन-बँकिंग / बिगर-विमा कंपनी ज्यात केंद्र सरकारची इक्विटी हिस्सा कमीतकमी 51१ टक्के किंवा विद्यमान सरकारी कंपन्यांच्या सहाय्यक कंपन्यांचा हिस्सा आहे.

🅾 कॅगचे अहवाल संसद / विधिमंडळात मांडले जातात आणि लोकलेखा समित्यांनी (पीएसी) आणि सार्वजनिक उपक्रमांवरील समित्यांनी (सीओपीयू) विचारात घेतल्या आहेत, ज्या भारतीय संसदेत आणि राज्य विधानमंडळातील विशेष समित्या आहेत . 

🅾कॅग भारतीय ऑडिट अँड अकाउंट्स विभागाचे प्रमुख देखील आहेत, ज्याचे कामकाज भारतीय ऑडिट आणि अकाउंट्स सर्व्हिसेसच्या अधिका by ्यांमार्फत केले जातात आणि देशभरात (०१.०3.२०२० पर्यंत), 43,576 employees कर्मचारी आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠नियुक्ती.💠💠

🅾नियंत्रक आणि भारत महालेखापरीक्षक नियुक्त केले राष्ट्रपती भारत  एक शिफारसीचे अनुसरण पंतप्रधान . 

🅾भेटीनंतर, त्याने / तिला राष्ट्रपतींसमोर शपथ किंवा कबुली द्यावी लागेल.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠शपथ किंवा पुष्टीकरणसंपादन.💠💠

🅾"मी, (नियुक्त केलेल्या व्यक्तीचे नाव), भारताचे नियामक आणि महालेखा परीक्षक नियुक्त केल्यावर मी देवाच्या नावाने शपथ घेतो / कायद्याने स्थापित केल्यानुसार मी भारतीय संविधानाविषयी खरा विश्वास आणि निष्ठा बाळगू शकतो," मी भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन, की मी योग्य रीतीने आणि विश्वासूपणाने आणि माझ्या योग्यतेनुसार, ज्ञान व निर्णयाने माझ्या पदाचे कार्य निर्भयपणे किंवा निष्ठेने, आपुलकीने किंवा वाईट इच्छाशक्तीशिवाय करेन आणि राज्यघटनेचे समर्थन करीन. आणि कायदे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

संसदेविषयीे काही शब्दावली


1) गणपूर्ती (Quorram) :-

◆ कलम 100 अनुसार सदनाच्या बैठकी करिता गणपूर्तीची आवश्यकता असेल.

◆ लोकसभा भरण्याकरिता एकूण सदस्यसंख्येच्या 1/10 म्हणजेच 55 सदस्यांची गरज असेल तर राज्यसभा भरण्याकरिता 25 सदस्यांची गरज असेल यालाच गणपूर्ती म्हणतात.
---------------------------------------------------
2) प्रश्न काळ (Question Hour) :-

◆ याचा संबंध त्यावेळी आहे ज्याद्वारे संसद सदस्य लोक महत्त्वाच्या कोणत्याही बाबींवर मंत्री परिषदेला प्रश्न विचारतात.

◆ हा सुरुवातीचा एक तासाचा काळ असतो यामध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात
---------------------------------------------------
A. तारांकित प्रश्न:–

या प्रश्नांच्या सुरवातीला * असे चिन्ह असते म्हणून त्यास तारांकित प्रश्न असे म्हणतात.

असे प्रश्न ज्यावर विचारणारा तात्काळ उत्तर मौखिक स्वरूपात मंत्री परिषदेतील सदस्यांद्वारे देण्याची अपेक्षा करीत असतो.

◆ या प्रश्नाचे उत्तरावर अनुसरून इतर प्रश्नही विचारले जाऊ शकतात. कागदावर लिहून प्रश्न विचारतात. त्वरित उत्तर द्यावे लागते.

◆ पीठासीन अधिकाऱ्यास वाटल्यास ते तारांकित प्रश्नांचे रूपांतर अतारांकित प्रश्नात करू शकतात.
---------------------------------------------------
B. अतारांकित प्रश्न:-

◆ या प्रश्नांच्या समोर * हे चिन्ह नसते.

◆ हे प्रश्न लिखित स्वरूपात विचारले जातात व याचे उत्तरही लिखित स्वरूपात द्यावे लागते.

◆ आकडेवारी, दीर्घ तपशील असणारे हे प्रश्न असतात.
---------------------------------------------------
C. अल्प सूचना प्रश्न:- 

◆ यामध्ये उत्तर देण्याकरिता दहा दिवसांची कालावधी दिली जाते.

◆ सर्वसाधारण प्रश्नांसाठी १० दिवसांची पूर्वसूचना आवश्यक असते. परंतु अल्पसुचनावधी प्रश्नांना त्यापेक्षा कमी दिवसांची सूचना दिली जाते. हे प्रश्न तातडीचे व सार्वजनिक महत्वाचे असतात.

◆ पीठासीन अधिकाऱ्यांचा व संबंधित मत्र्यांच्या पूर्वसंमतीशिवाय कोणताही सदस्य कोणत्याही मंत्र्याला प्रश्न विचारू शकत नाही. आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे अशा अर्थाची सूचना सदस्याने संबंधित सभागृहाच्या महासचिवाला द्यावी.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ज्या दिवशी प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल, त्या दिवसापूर्वी १० दिवसापेक्षा जास्त व २१ दिवसापेक्षा कमी अशा कालावधीत हि सूचना महासचिवांना मिळावयास हवी.
---------------------------------------------------
D. गैर सरकारी सदस्यास विचारले जाणारे प्रश्न
---------------------------------------------------
3) शून्य काळ :-

◆ संसदेच्या दोन्ही सदनामध्ये प्रश्न काळ नंतर तात्काळ असणाऱ्या वेळेस शून्य काळ असे म्हटले जाते. हा 12 वाजता सुरू होतो व 1 वाजेपर्यंत चालते व त्यावर तुरंत कार्यवाही करणारे अपेक्षित प्रश्न विचारले जातात.
---------------------------------------------------
4) स्थगन (Adjournment) :-

◆ स्थगन प्रस्ताव हे अध्यक्ष (लोकसभेचे अध्यक्ष ) महोदयांद्वारे केले जातात.

◆ याचा अर्थ सभागृह निश्चित काळासाठी बरखास्त केल्या जाते. (तास, दिवस)
---------------------------------------------------
5) स्थगन अनिश्चित काळ (Prorogation) :-

◆ हे अनिश्चित काळासाठी स्थगन राष्ट्रपतीद्वारे केले जाते जसे बजेट सेशन नंतर माॅन्सून सेशन च्यामधील दिवस.

◆ माॅन्सून सेशन संपल्यानंतर हिवाळी अधिवेशन चालू होण्याच्या पूर्वीचे दिवस
---------------------------------------------------
6) विघटन (Dissolution) :- 

◆ राज्यसभेचे विघटन कधीच होत नाही कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे.

◆ लोकसभेचे विघटन केले जाते व यानंतर निवडणुका होतात.

◆ बजेटच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती येऊन म्हणतात आता गृह पुढचे session अनिश्चित काळासाठी स्थगित झाले आहे.

पचन संस्था (Digestive System)

🚩मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
🚩पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
🚩अन्ननलिकेची लांबी 9 meter (950cm, 32 Ft.) असते.
🚩मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

💥अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

1)मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
2)ग्रसनी (Pharynx)
3)ग्रसिका (Esophagus)
4)जठर/ आमाशय (Stomach)
5)लहान आतडे (Small Intestine)
6)मोठे आतडे (Large Intestine)
7)मलाशय (Rectum) आणि
8)गुदद्वार (Anus)
यांचा समावेश होतो.

🚩लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.
🚩पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.
🚩अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत.

🌷खायचा  सोडा🌷

🌸बेकिंग सोडा सामान्य घटक असलेल्या खमीर एजंटसाठी, बेकिंग पावडर पहा .

🌸सोडियम बायकार्बोनेट, ( IUPAC नाव : सोडियम हायड्रोजन कार्बोनेट ), सामान्यतः म्हणून ओळखले बेकिंग सोडा , एक आहे रासायनिक संयुग सूत्र सह ना HCO 3 . हे सोडियम केशन (ना + ) आणि बायकार्बोनेट आयनॉन (एचसीओ 3 - ) बनलेले एक मीठ आहे . 

🌸सोडियम बायकार्बोनेट एक पांढरा घन आहे जो स्फटिकासारखे आहे , परंतु बर्‍याचदा दंड पावडर म्हणून दिसून येतो. 

🌸त्यात थोडासा खारट, क्षारयुक्त चव वॉशिंग सोडा ( सोडियम कार्बोनेट ) सारखा आहे . नैसर्गिक खनिज स्वरूप नहकोलाइट आहे. 

🌸हा खनिज नायट्रॉनचा एक घटक आहे आणि बर्‍याच खनिज झ ings्यांमध्ये विरघळलेला आढळतो .

क्रायोजेनिक इंजिन - criogenic engine

🛰भूस्थिर उपग्रह

भूस्थिर म्हणजेच जिओन्सिक्रोनस उपग्रह हे पृथ्वीच्या भूमध्य रेषेवर स्थित असतात व ते पृथ्वीच्या गतीनुसार पृथ्वीसोबत फिरत असतात. हे भूस्थिर उपग्रह आपल्या नावाप्रमाणे पृथ्वीच्या कक्षेत एकाच स्थानावर स्थिर असतात. भारताने याच भूस्थिर उपग्रह प्रक्षेपणात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. क्रायोजेनिक इंजिनाच्या माध्यमातून आता भारताने उपग्रह प्रक्षेपणात आपला झेंडा पृथ्वीबाहेर फडकवला आहे. यामुळे भारत क्रायोजेनिक क्लबचा सदस्य झाला.

🚀क्रायोजेनिक इंजिन

जीएसएलव्हीच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात येते. भौतिकशास्त्रात अत्याधिक कमी तापमान निर्माण करणे व त्याचा वापर करणे यास क्रायोजनिक्स म्हणतात. जीएसएलव्हीच्या टप्प्यात अवजड उपग्रहाला पुढे ढकलण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे कमी इंधनाचा वापर करून उपग्रहाला सुमारे ८०० सेकंदापर्यंत ढकलत नेहण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येतो. क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन म्हणून उणे २५३ सेल्सिअस द्रवरूप हायड्रोजन तर ऑक्सिडायझर म्हणून उणे १८३ सेल्सिअस द्रवरूप ऑक्सिजन वापरले जाते. इंजिनसाठी लागणारे इंधन अतिशीत आहे. त्यामुळेच त्याला 'क्रायोजेनिक इंजिन' म्हणतात.

🚀क्रायोजेनिक क्लब

जगातील फारच मोजक्या देशांकडे क्रायोजेनिक इंजिनासारखे यान आहे. भारताने या क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवून अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स व चीन या देशांच्या पंक्तीमध्ये आपला समावेश पक्का केला.

⛽️चांगले इंधन

हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे चांगले इंधन वापरण्यात येत असल्यामुळे यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही खूपच चांगली ऊर्जा असते. त्यामुळे रॉकेट उड्डान अति वेगाने करणे शक्य होते. भारताच्या इंजिनाचे नाव CE-२० असून, हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीने त्याचे उत्पादन केले आहे. त्याची चाचणी 'इस्रो'चे ज्वलन सुविधा केंद्र महेंद्रगिरी येथे केली जाते.

🔹फायदे

क्रायोजेनिक इंजिनच्या वापरामुळे फार मोठ्या प्रमाणात भारताची आर्थिक बचत होणार आहे. पूर्वी भारताचे उपग्रह युरोपीय अंतराळ संस्थेच्या 'एरिअन' या प्रक्षेपकांच्या माध्यमातून प्रक्षेपित केले जात होते. भारताचा आता तो खर्च वाचणार आहे. क्रायोजेनिक इंजिनच्या माध्यमातून जड उपग्रहाचे प्रक्षेपण करणेही आता सोपे होणार आहे. मार्क-३सारखी भारताची पहिली मानवी अवकाश मोहीम साकारणे शक्य होणार आहे. ही मानवी मोहिम २०२० ते २०२५ सालापर्यंत शक्य आहे. क्रायोजेनिक इंजिनमुळे जीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात प्रगती झाल्याचे दिसून येते. भारताचे जी-सॅट ६, जीएसएलव्ही-डी-५ने यशस्वी प्रक्षेपण करून दाखवले.

🚀क्रायोजेनिक पुढची हॉटस्पॉट

एखाद्या प्रयोगशाळेत क्रायोजेनिक इंजिनासाठी लागणारे कमी तापमान तयार करणे आणि द्रवरूप वायूत साठवणे शक्य असले तरी उपग्रहात त्याचा वापर करणे अवघड जाते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूंना वेगवेगळ्या टाक्यामध्ये साठवून नंतर त्यांना एका पाइपद्वारे विशिष्ट कम्बशन चेंबरमध्ये आणणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे.

रेणुभार, आम्ले आम्लारी व क्षार रेणुभार

*✍🏻 मूलद्रव्ये आणि संयुगाचा रेनुभार त्याच्या रेणुसुत्रावरून त्यांच्या रेणुसुत्रावरून समजते ऑक्सिजनचे रेणूसुत्र O२ आहे. आणि अणुभार १६ आहे म्हणून त्याचा रेणुभार ३२ आहे. H२O =१८ H =२ व O =१६, =१८

* ✍🏻संयुगाच्या एका रेणूचा तुलनात्मक वास्तुमानाला संयुगाचा रेणुभार म्हणतात.

आम्ले आम्लारी व क्षार

*✍🏻 साबण तयार करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा वापर केला जातो.

* ✍🏻हायड्रोक्लोरिक आम्लात निळा लिटमस लाल होतो.

* ✍🏻सोडीअम हायड्रोक्साईड मध्ये लाल लिटमस निळा होतो व निळा निळाच राहतो.

* ✍🏻वरील आम्ल पदार्थात लिटमस रंग लाल रंग लालच राहतो. व आम्लारीत त्याचा रंग निळा राहतो.  पदार्थात रंगाबद्दल घडवून येत नाही पदार्थ उदासीन पदार्थ होय.

* ✍🏻सामान्यता अधातुंची ऑक्साइडे आम्लधर्मी धातूंची ऑक्साइडे अम्लारीधर्मी असतात.

*✍🏻 सल्फुरिक, नायट्रिक, ही आम्ले दाहक आणि उष्ण असतात.

* ✍🏻कार्बोनिक आम्ल सौम्य आम्ल असतात. सोडीअम हे पाण्यात विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात.

* ✍🏻लिंबू, संत्रा, मोसंबी, यांच्यात सायट्रिक आम्ल असते.

*✍🏻 प्रसाधन गृहात स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल उपयोगी असते.

*✍🏻 सोने चांदी यांना स्वच्छ करण्यासाठी HCL चा वापर करतात.

* ✍🏻लोणचे व मुरंबा साठवणीच्या पदार्थात असेटिक आणि बेंझॉंइक आम्ल वापरतात

पोलीस भरतीसाठी आजचे महत्वाचे प्रश्न

1) कोणत्या देशाने लढाईसाठी तयार असलेली मानवरहित युद्धनौका (ऑगस्ट 2019) तयार केली?

*उत्तर* : चीन

2) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) मानवी-आकाराचा रोबोट (फेडर) कोणत्या देशाने पाठविला?

*उत्तर* : रशिया

3) अमेरिकेतली कॅटालिना खाडी ओलांडणारा पहिला आशियाई जलतरणपटू कोण बनला?

*उत्तर* : पॅरा-जलतरणपटू सतेंद्र सिंग लोहिया (मध्यप्रदेश)

4) अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘सरल’मध्ये (‘स्टेट रूफटॉप सोलर अट्रॅक्टीवनेस इंडेक्स) कोणत्या राज्याला प्रथम क्रमांक मिळाला?

*उत्तर* : कर्नाटक

5) आर्क्टिक प्रदेशात जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी (अ‍ॅकेडेमिक लोमोनोसोव्ह) कोणत्या देशाने उभारली?

*उत्तर* : रशिया

6) मनुष्यबळ विकास मंत्रीने सर्वात मोठ्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्याचे नाव काय?

*उत्तर* : निष्ठा

1) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : भुवनेश्वर

2) पुर्णपणे विजेवर उडणारे NASA चे पहिले प्रायोगिक विमान कोणते?
उत्तर : X-57’s Mod II

3) ‘ईशान्य हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनी 2019’ या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : मिझोराम

4) भारतीय रिझर्व्ह बँकेनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कधीपासून बंदी घातली आहे?
उत्तर : 5 ऑक्टोबर 2019

5) जागतिक अंतराळ सप्ताह ऑक्टोबर महिन्यात कधी साजरा केला जातो?
उत्तर : 4 ते 10 ऑक्टोबर

6) ‘गृह फायनान्स’ ही गृहनिर्माण कंपनी कोणत्या बँकेत विलीन होणार आहे?
उत्तर : बंधन बँक

7) अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या पहिल्या पर्वतीय युद्ध सरावाचे नाव काय?
उत्तर : 'हिम विजय'

8) “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : उत्तराखंड

9) CISF ने कोणत्या जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : बागलीहार जलविद्युत प्रकल्प

10) अमेरिकेने कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली?
उत्तर : मिनिटेमन II

1) क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी केंद्र सरकारने कोणते वर्ष मुदतनिश्चिती म्हणून ठरवले आहे?
उत्तर : सन 2025

2) बाजारभांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील कितवी मोठी ऊर्जा संस्था बनली आहे?
उत्तर : सहावी

3) आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे नवे महासंचालक कोण आहेत?
उत्तर : राफेल ग्रोसी

4) संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत किती सदस्यदेश आहेत?
उत्तर : 171

5) निर्मल पुरजा कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
उत्तर : नेपाळ

6) “द अनक्वायट रिव्हर: ए बायोग्राफी ऑफ द ब्रह्मपुत्रा” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : अरुपज्योती सैकिया

7) लेबनॉन या देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर : बैरूत

8) ‘रोडटेक विषयक आंतरराष्ट्रीय परिषद’ कुठे भरली होती?
उत्तर : नवी दिल्ली

9) UNESCOच्या वतीने जागतिक शहर दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 31 ऑक्टोबर

10) आंतरराष्ट्रीय सौर युतीची दुसरी सभा कुठे भरविण्यात आली?
उत्तर : नवी दिल्ली

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी कोणती दोन नामे तिन्ही लिंगामध्ये आढळते.

   अ) हरीण      ब) पोर      क) नेत्र      ड) मूल
   1) अ आणि ब      2) क आणि ड   
   3) ब आणि ड      4) अ आणि क

उत्तर :- 3

2) पर्यायी उत्तरांत ‘चतुर्थी विभक्तीचे अपादन कारकार्थ’ असलेले वाक्य कोणते ?

   1) मी नदीच्या काठाने गेलो    2) तो घरातून बाहेर पडला
   3) तू रामाला पुस्तक दे      4) तो दिवसाचा चालतो

उत्तर :- 3

3) तू जबाबदारीने काम केले नाहीस – पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.

   1) तू जबाबदारीने काम करतोस    2) तू बेजबाबदाराने काम केलेस
   3) तू जबाबदारी ओळखली नाहीस    4) तू जबाबदारीने काम करणारा आहेस

उत्तर :- 2

4) ‘माझ्या नणंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठविली नाही’ या वाक्यातील विधेय ओळखा.

   1) नणंद      2) उभ्या वर्षात एकदाही माहेरी
   3) पाठविली नाही    4) सासूने

उत्तर :- 3

5) कर्मणीप्रयोगात कर्ता
........................... विभक्तीत असतो.

   1) तृतीया    2) प्रथमा     
   3) चतुर्थी    4) पंचमी  

उत्तर :- 1

6) ‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.’ वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

   1) सामासिक शब्द    2) अभ्यस्त शब्द   
   3) तत्सम शब्द      4) तद्भव शब्द

उत्तर :- 1

7) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा..

   1) सोड, मला ! तो जोराने ओरडला      2) ‘सोड मला’, तो जोराने ओरडला
   3) “सोड मला !” तो जोराने ओरडला    4) “सोड मला”, तो जोराने ओरडला

उत्तर :- 2

8) देशी शब्द शोधा.

   1) धडधड    2) धोंडा     
   3) धाक    4) धोरण

उत्तर :- 2

9) ‘अभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?

   1) काय गाढव आहे !        2) मला फार भूक लागली
   3) शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो    4) ‘मुलांनो, आता दिवे लागणीची वेळ झाली.’

उत्तर :- 2

10) ‘अचूक’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.
   1) अगम्य    2) नेमका     
   3) अचानक    4) नीट

उत्तर :- 2

२७ फेब्रुवारी २०२२

हिजाब हा धार्मिक हक्क नाही; कर्नाटक सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण


🔰हिजाब परिधान करणे हे राज्यघटनेच्या कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याचा भाग असून राज्य सरकार त्याचे उल्लंघन करत आहे, हा आरोप कर्नाटक सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात फेटाळून लावला. हिजाब परिधान करणे कलम १५ नुसार धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारांत मोडत नसून केवळ संस्थात्मक शिस्त म्हणून हिजाबवर शैक्षणिक संस्थांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

🔰हिजाबवर शैक्षणिक संस्थांच्या आवारात बंदी नसून केवळ शिक्षण घेत असताना वर्गामध्ये बंदी घालण्यात आली आहे, असे कर्नाटक सरकारने स्पष्ट केले.

🔰कर्नाटकातील हिजाब बंदीवर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश रितू राय अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. राज्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नवाडगी यांनी कर्नाटक सरकारची बाजू उच्च न्यायालयात मांडली.

🔰‘‘हिजाब परिधान करणे हे कलम १९ (१)(अ)मध्ये येते, तर कलम २५मध्ये नाही. एखाद्या महिलेची हिजाब परिधान करण्याची इच्छा असेल तर त्याला संस्थात्मक शिस्तीनुसार परिधान केला असेल तर त्याला कोणताही विरोध नाही,’’ असे नवाडगी यांनी सांगितले. कलम १९ (१) अ अतंर्गत हा ज्या अधिकारांतर्गत हा दावा करण्यात आला आहे, तो कलम १९ (२) संबंधी असून त्यानुसार सरकार संस्थात्मक प्रतिबंधानुसार योग्य प्रतिबंध लागू करू शकते, असे नवाडगी यांनी न्यायालयाला सांगितले. राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत  राज्य सरकारचा कायदा आहे. त्यानुसार हा कायदा शैक्षणिक संस्थांच्या आवारात नाही, मात्र वर्गामध्ये शिक्षण घेत असताना हिजाब परिधान करण्यास बंदी घालतो, असे नवाडगी यांनी सांगितले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...