१५ फेब्रुवारी २०२२

पोलीस भरती साठी महत्त्वाचे

Q1. कोणत्या व्यक्तीला भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या दोन्ही विज्ञान शाखांमध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे?
✅.  - मेरी क्यूरी

 

Q2. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या लोगोवर या पैकी कशाचे चित्र आहे?
✅. - धनेश

 

Q3. नॅस्डॅक मधे प्रवेश मिळवणार्‍या प्रथम भारतीय कॉम्प्यूटर कंपनी कोणती?
✅. - इन्फोसिस टेक्नोलॉजी लिमिटेड

 

Q4. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
✅. - आसाम

 

Q5. यलम्मा, महाकाली, मैसम्मा, पोचम्मा आणि गुंडम्मा या देवतांची पूजा कोणत्या सणादिवशी केली जाते?
✅.  - बीहु

 

Q6. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
✅. - मणिपूर

 

Q7. स्वतंत्र भारतात जन्म घेऊन लोकसभेचे सभापती असा मान मिळणारी पहिली व्यक्ती कोण?
✅. - जी.एम.सी. बालयोगी

 

Q8. भारतीय घटने नुसार कलम 199 काय आहे?
✅. - धन विधेयकाची व्याख्या

 

Q9. भारतातील सर्वांत जूनी आयआयटी कोठे आहे?
✅.  - खरगपूर

 

Q10. कॉम्प्यूटरच्या भाषेत 'CAD' चा अर्थ काय आहे?
✅.  - कॉम्प्यूटर ऍडेड डिझाइन

 

Q11. प्रजासत्ताक दिनी सैन्यदलांची मानवंदना कोण स्वीकारतो?
✅. - राष्ट्रपती

 

Q12. कोणाच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने आपली टेस्ट क्रिकेट कारकिर्द सुरु केली होती?
✅. - के. श्रीकांत

 

Q13. कोणत्या भारतीय सणाला हरियाणा राज्यात 'सालूनो' म्हटले जाते?
✅.  - रक्षा बंधन

 

Q14. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
✅   - मरियाना गर्ता

 

Q15. श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?
✅.  - भारतीय जन संघ

Q16. किशोरी आमोणकर कोणत्या घराण्याशी संबंधित आहेत?
✅.  - जयपुर

 

Q17. धर्म व धर्मशास्त्र यांच्या वर अधिक चर्चा व्हावी या उद्देशाने कोणत्या समाज सुधारकाने १८१५ मध्ये आत्मीय सभेची सुरुवात केली होती?
✅.  - राजा राममोहन राय

 

Q18. कानपुर मेमोरियल चर्च' कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवले गेले होते?
✅.  - १८५७ च्या मृत इंग्रज सैनिकांसाठी

 

Q19. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
✅. - राजस्थान

 

Q20. असेट इंटरनॅशनल हा कोणत्या संस्थानाचा तंत्रज्ञान प्रशिक्षण विभाग आहे?
✅. - ऍप्टेक लिमिटेड

 

Q21. भारतीय राज्य घटनेतील धारा ३४५-३५१ कशाशी संबंधित आहेत?
✅. - अधिकृत भाषा

 

Q22. राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे?
✅.  - गुरगाव

 

Q23. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
✅. - दुर्गा

 

Q24. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
✅.  - प्रशांत महासागर

 

Q25. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
✅.  - शुक्र

 

Q26. झिरोग्राफीचा संशोधक कोण?
✅. - चेस्टर चार्ल्सट्न

 

Q27. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
✅.  - गोदावरी

 

Q28. या पैकी कोणती भारतीय भाषा सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी एक आहे?
✅.   - तामिळ

 

Q29. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
✅. - आसाम

 

Q30. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
✅.  - मणिपुरी

काही महत्त्वाच्या म्हणी

1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.

2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.

3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.

4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.

5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.

6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.

7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.

9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.

10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.

11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.

12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.

13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.

14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.

15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.

16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.

17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.

18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.

19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.

20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.

महाराष्ट्रातील समाज सुधारक : डॉ पंजाबराव देशमुख

🔘 जीवन परिचय 🔘

⚫️ डॉ पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ  या गावी एका मराठा शेतकरी कुटुंबात झाला.वडिलांचे श्यामराव व आईचे नाव राधाबाई होते.त्यांचे आडनाव कदम  असे होते. वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे नाव पडले.

⚫️ पंजाब्रावाचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले.अमरावतीच्या हायस्कूलमधून १९१८ साली म्याट्रिकची परीक्षा पास झाले.पंजाबराव उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले.तेथे त्यांनी फर्गुसन कॉलेजात प्रवेश घेतला.नंतर ते इग्लंडला गेले.तेथे त्यांनी एडिनबरो विद्यापीठाची एम ए व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी लिट या पदव्या मिळवल्या.इग्लंडला असताना त्यांनी वकिलीची पदवी मिळाली. पुरोगामी विचाराचे देशमुख यांनी मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई नावाच्या मुलीशी विवाह केला.

🔲 सामाजिक कार्य 🔲

⚫️ १३ व १४ नोवेंबर १९२७ मध्य  त्यांच्याच प्रयत्नातून अमरावतीतील इंद्रभुवन थिएटर मध्ये वऱ्हाड अस्पृश्य परिषद भरविण्यात आली. त्या परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब होते.

⚫️ १९२८ मध्ये अमरावती जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष झाल्यावर त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यासाठी खुल्या केल्या. अमरावतीचे अम्बामंदीर दलितांसाठी उघडे केले. अखिल भारतीय मागास जातीसंघा ची स्थापना त्यांनी केली.

🔲 शिक्षणासाठी कार्य 🔲

⚫️ सन १९२६ मध्ये त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय  सुरु केले.

⚫️ पंजाबरावनी १९३० साली शिवाजी शिक्षण संस्थेची  केली. भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली.

⚫️ १९२७ मध्ये त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली.

⚫️ त्यांनी महाराष्ट्र केसरी  हे वृत्तपत्र चालविले. पंजाबराव देशमुख यांना १९५२ मध्ये केद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला.

⚫️पंजाबराव देशमुखांनी १९५५ साली 'भारत कृषक समाजाची'स्थापना केली.  त्यांचे विद्यामध्ये राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी- विक्री संघाची स्थापना झाली.

१४ फेब्रुवारी २०२२

परीक्षेसाठी महत्वाचे

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक

◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच

◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक

◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच

◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच

◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती

◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी

◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती

◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी

◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO

◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष

◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष

◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO

◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी

◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी

◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष

◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी

◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त

◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर

◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.
1. कांस्य
2. रौप्य
3. सुवर्ण
4. यापैकी नाही

उत्तर- 2

----------------------------------------------------------------

2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
1. सुहास यथीराज
2. कृष्णा नागर
3. प्रमोद भगत
4. मनीष नरवाल

उत्तर- 2
---------------------------------------------------------------

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.
1. भारत आणि चीन
2. भारत आणि सिंगापूर
3. भारत आणि अमेरिका
4. भारत आणि ऑस्ट्रेलिया

उत्तर- 2

---------------------------------------------------------------

4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर- 3

---------------------------------------------------------------

5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.
1. सिक्कीम
2. आसाम
3. हिमाचल प्रदेश
4.  यापैकी नाही

उत्तर-2

  ---------------------------------------------------------------

6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.
1. कृष्णा नागर
2. सुहास यथिराज
3. मनीष नरवाल
4. अवनी लेखारा

उत्तर- 4

---------------------------------------------------------------

7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
1. मेघालय
2. अरुणाचल प्रदेश
3. सिक्कीम
4.आसाम

उत्तर – 4

---------------------------------------------------------------

8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?

1. 3 सप्टेंबर
2. 4 सप्टेंबर
3. 5 सप्टेंबर
4. 6 सप्टेंबर

उत्तर- 3
---------------------------------------------------------------

9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ महाराष्ट्र
3. Axis बँक
4. आयसीआयसीआय बँक

उत्तर- 1

----------------------------------------------------------------

10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.
1. चीन
2. नेपाळ
3. भारत
4. श्रीलंका

उत्तर- 3

महत्वाच्या जागतिक संस्था

1. G7 [Group of 7]
- स्थापना 1975
- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.
- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा

2. BRICS
- स्थापना: 2006
- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका

3. Asian Development Bank [ADB]
- स्थापना: 19 डिसेंबर 1966
- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स

4. SAARC [South Asian Association for Regional Cooperation]
- स्थापना: 16 जानेवारी 1987
- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ
- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव

5. ASEAN [Association of South East Asian Nation]
- स्थापना: 8 ऑगस्ट 1967
- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया
- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर

6. BIMSTEC [Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation]
- स्थापना: 6 जून 1997
- मुख्यालय: ढाका, बांगलादेश
- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान

7. OPEC [Organization of Petroleum Exporting Countries]
- स्थापना: 1960
- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य संख्या: 13

8. IBSA
- स्थापना: 6 जून 2003
- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria
- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

वाचा :- काही महत्वाची पुस्तके व त्यांचे लेखक

🌷प्लेईंग टू विन ------ सायना नेहवाल

🌷हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला ------ डॉ. भालचंद्र नेमाडे

🌷टू द लास्ट बुलेट ------ विनिता कामटे/ देशमुख

🌷हाफ गर्लफ्रेंड------ चेतन भगत

🌷प्लेईंग इट माय वे ----- सचिन तेंडूलकर

🌷ड्रिम्स फ्रॉम माय फादर ------ बराक ओबामा

🌷इंडिया डिव्हायडेड ------ राजेन्द्र प्रसाद

🌷सनी डेज ------ सुनिल गावस्कर

🌷द टेस्ट ऑफ माय लाईफ ------ युवराज सिंग

🌷झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, ------ विश्‍वास पाटील

🌷छावा, लढत, युगंधर ------ शिवाजी सावंत

🌷वाट तुडविताना ------ उत्तम कांबळे

🌷अक्करमाशी ------ शरणकुमार लिबाळे

🌷एकच प्याला ------ राम गणेश गडकरी

🌷यमुना पर्यटन ------ बाबा पद्मजी

🌷पण लक्षात कोण घेतो ------ ह.ना.आपटे

🌷सुदाम्याचे पोहे ------ श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

🌷गिताई ------ विनोबा भावे

🌷भिजकी वही ------ अरूण कोल्हटकर

🌷नटसम्राट ------ वि.वा.शिरवाडकर

🌷धग ------ उध्दव शेळके

🌷 अमृतवेल ----- वि.स.खांडेकर

🌷एक झाड दोन पक्षी ------ विश्‍वास बेडेकर

🌷गोतावळा, झोंबी ------ आनंद यादव

🌷जेव्हा माणूस जागा होतो ------ गोदावरी परूळेकर

🌷बलूतं ------ दया पवार

🌷बारोमास ------ सदानंद देशमुख

🌷आहे मनोहर तरी ------ सुनिता देशपांडे

🌷शाळा ------ मिलींद बोकील

🌷चित्रलिपी ------ वसंत आबाजी डहाके

🌷गोलपीठा ------ नामदेव ढसाळ

🌷मी कसा घडलो ------ आर.आर.पाटील

🌷सखाराम बाईंडर ------ विजय तेंडूलकर

🌷ओडिशी ऑफ माय लाईफ ------ शिवराज पाटील

🌷मुकुंदराज ------ विवेक सिंधू

🌷दासबोध, मनाचे श्‍लोक ------ समर्थ रामदास

🌷बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर ------सावित्रीबाई फुले

🌷गीतारहस्य ------ लोकमान्य टिळक

🌷 तीन पैशाचा तमाशा ------ पु.ल. देशपांडे

🌷 सनद, जाहिरनामा ------ नारायण सुर्वे

🌷रामायण ------ वाल्मीकी

🌷मेघदूत ------ कालीदास

🌷पंचतंत्र ------ विष्णू शर्मा

🌷मालगुडी डेज ------- आर.के.नारायण

🌷महाभारत ------ महर्षी व्यास

🌷अर्थशास्त्र ------ कौटील्य

🌷अन् हॅपी इंडीया  ------ लाला लजपतराय

🌷माय कंट्री माय लाईफ ------ लालकृष्ण अडवाणी

🌷रोमान्सिंग विथ लाईफ ------ देव आनंद

🌷प्रकाशवाटा ------ प्रकाश आमटे

🌷दास कॅपीटल ------ कार्ल मार्क्स

🌷गाईड ------ आर.के.नारायण

🌷हॅम्लेट ------ शेक्सपिअर

🌷कर्‍हेचे पाणी ------ आचार्य अत्रे

🌷कृष्णाकाठ ------ यशवंतराव चव्हाण

🌷ज्योतीपुंज ------ नरेंद्र मोदी

🌷शतपत्रे ------ भाऊ महाजन

🌷प्रिझन डायरी ------ जयप्रकाश नारायण

🌷माझे स्वर माझे जिवन ------ प.रविशंकर

🌷निबंधमाला ------ विष्णुशास्त्री चिपळूणकर

🌷स्पीड पोस्ट ------ शोभा डे

🌷पितृऋण ------ सुधा मूर्ती

🌷माझे गाव माझे तीर्थ ------ अण्णा हजारे

🌷एक गाव एक पानवटा ------ बाबा आढाव

🌷मंझील से ज्यादा सफर ------ व्ही.पी.सिंग

🌷कोसबाडच्या टेकडीवरून ------ अनुताई वाघ

🌷गोल्डन गर्ल ------ पी.टी.उषा

🌷राघव वेळ ------ नामदेव कांबळे

🌷आकाशासी जुळले नाते ------ जयंत नारळीकर

🌷गोईन ------ राणी बंग

१३ फेब्रुवारी २०२२

वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

🔴महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ? 
अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी 
मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी 
जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी ✅
फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिट

_
🟠 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे ✅
राणी लक्ष्मीबाई 
शिवाजी महाराज 
नानासाहेब पेशवे
_
🟡 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला?
सन १९०२ 
सन १९०३
सन १९०४✅
सन १९०५

_
🟢 वसंदादा पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रह कुठं केला?
1) सांगली ✅
2) कराड
3) सातारा
4) कोल्हाप

_✍

🟣 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
लोकमान्य टिळक 
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे

बुलडाणा जिल्हाच्या राजु केंद्रे यांचा फोर्ब्स मासिकाच्या ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत समावेश

🏵बुलडाणा जिल्हाच्या पिंप्री खंदारे या गावातले शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते राजु केंद्रे यांचा फोर्ब्स या मासिकानं, सामाजिक कार्य उद्यमशीलता या वर्गवारीत, भारतातल्या तीस वर्षांखालच्या ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत समावेश केला आहे.

📝 २८ वर्ष वयाचे राजू केंद्रे हे एकलव्य फाउंडेशन या उच्च शिक्षणाशी संबंधित संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणी दूर करायचा प्रयत्न केला जातो. राजु केंद्रे यांनी टाटा इन्सिट्यूटमधून ग्रामीण विकास या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ग्रामपरिवर्तन चळवळीच्या माध्यमातून आपल्याच मूळगावी राहून सामाजिक काम सुरु केलं.

✅महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गतही केंद्र यांनी पारधी समाजाच्या विकासासाठीचे उपक्रम राबवले आहेत. सध्या ते लंडन इथं उच्चशिक्षण घेत आहेत. याअंतर्गत ते 'भारतातलं उच्च शिक्षण आणि असमानता' या विषयावर संशोधन करत आहेत. यासाठी त्यांना ब्रिटिन सरकारच्या वतीनं चेवनिंग स्कॉलरशिप दिली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गृह अलगीकरणातून मुक्तता; १४ फेब्रुवारीपासून नवी नियमावली.

🔰जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांना आता करोना चाचणी करणे अनिवार्य नाही. प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी ७२ तास आधी करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आता आवश्यक नाही. प्रवासी केवळ लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवू शकतात.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवस गृहअलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. १४ दिवस त्यांच्या आरोग्याची देखरेख ते स्वत:च करतील.

🔰प्रवास केल्यानंतर आठ दिवसांनी करोना चाचणी करणे अनिवार्य नाही आणि चाचणीचा अहवाल सरकारी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक नाही. त्याऐवजी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करू शकता.

🔰विमानातील दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर पडण्यास परवानगी देण्यात येणार असून त्यांना चाचणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. ८२ देशांतील संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना ‘अलगीकरण मुक्त’ प्रवेश देण्यासाठी हे नियम लागू आहेत.

हिजाब संदर्भात पाकचे भारतीय राजदूताला पाचारण.

🔰पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली.

🔰भारतात मुस्लिमांविरुद्धची कथित धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक साचेबंद चित्रण आणि भेदभाव याबाबत पाकिस्तानला वाटणारी अतीव चिंता भारतीय राजदूतांना कळवण्यात आली, असे परराष्ट्र कार्यालयाने बुधवारी उशिरा रात्री एका निवेदनात सांगितले.

🔰कर्नाटकमध्ये महिलांचा छळ करणाऱ्या सूत्रधारांना भारतीय सरकारने वठणीवर आणावे आणि मुस्लीम महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे उपाय योजावेत, यावर भर देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुस्लीम मुलींना शिक्षणापासून वंचित करणे हे मूलभूत मानवी अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सांगून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कर्नाटकातील हिजाब वादावर भाष्य केल्यानंतर परराष्ट्र कार्यालयाने हे निवेदन जारी केले.

पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान; उत्तर प्रदेश : अनेक केंद्रांवर मतदान यंत्रांत बिघाड; गोंधळाचे वातावरण.

🔰उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी ६० टक्के मतदान झाल़े. काही केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल़े  मात्र, किरकोळ अपवादवगळता मतदान शांततेत पार पडल़े

🔰उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी गुरुवारी मतदान झाल़े  सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७़ ७९ टक्के मतदानाची नोंद झाली़.  ६ वाजेपर्यंत ६०़ ५१ टक्के मतदान नोंदवण्यात आल़े.  मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपली़.  मात्र, त्याआधीच रांगेत असलेल्यांना वाढीव वेळ देऊन मतदानाची परवानगी देण्यात आली, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी़ डी़ राम तिवारी यांनी सांगितल़े.  त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आह़े.

🔰काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये  बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़. त्यानुसार संबंधित मतदान यंत्रे बदलण्यात आली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली, असे तिवारी  यांनी स्पष्ट केल़े  कैराना मतदारसंघांमधील दुंदूखेडा येथे काही मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला़. याबाबत तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे तिवारी यांनी सांगितल़े

मराठी भाषेसंदर्भात सुप्रिया सुळेंची लोकसभेत मोदी सरकारकडे मोठी मागणी; म्हणाल्या, “येत्या २७ फेब्रुवारीला.

🔰मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

🔰मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. साहित्य अकादमीकडेही याबाबत सात वर्षांपूर्वीच शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले. काही वर्षांपुर्वी तत्कालिन केंद्रीय मंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते.

क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा - लुकाकूच्या गोलमुळे चेल्सी अंतिम फेरीत.

🔰आघाडीपटू रोमेलू लुकाकूने केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने अल हिलाल संघावर १-० अशी मात करत क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

🔰युरोपीय संघांनी या आंतरखंडीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून मागील १४ पैकी १३ अंतिम सामन्यांत बाजी मारली आहे. अंतिम फेरीत पराभूत होणारा चेल्सी हा एकमेव संघ आहे. २०१२ मध्ये त्यांच्यावर ब्राझीलमधील संघ कोरिन्थिन्सने मात केली होती. यंदा मात्र चेल्सीला ही स्पर्धा जिंकण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. शनिवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे ब्राझीलमधील संघ पाल्मेरेसचे आव्हान असेल.

🔰तत्पूर्वी, बुधवारी रात्री उशिराने झालेल्या लढतीत अल हिलालने चेल्सीला चांगली झुंज दिली. अल हिलालने भक्कम बचाव करतानाच आक्रमणात गोलच्या काही संधी निर्माण केल्या. मात्र, चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाने अप्रतिम खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. दुसरीकडे ३२व्या मिनिटाला काय हावेत्झच्या पासवर लुकाकूने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अखेर हाच गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरला.

तीन वर्षांत २५ हजार आत्महत्या; २०१८ ते २० या कालावधीत कर्जबाजारीपणा, बेरोजगारीचा परिणाम

🔰एकीकडे भविष्यातील विकासाचे चित्र सरकारकडून रंगवून सांगितले जात असताना करोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक अडचणींनी सामान्य नागरिकांचे जिणे किती अवघड झाले होते, याचे चित्रच समोर आलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

🔰देशात २०१८ ते २० या तीन वर्षांत बेरोजगारीमुळे ९ हजार १४० तर, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार ९१ अशा २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीच्या आधारे केंद्राने आत्महत्यांसंदर्भातील माहिती वरिष्ठ सभागृहात मांडली.

🔰केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून त्याद्वारे देशातील ६९२  जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला साह्य करत आहे. मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून आत्महत्या रोखण्याचा केंद्र प्रयत्न करत असल्याचे राय यांनी  सांगितले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...