०२ फेब्रुवारी २०२२

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे.
भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते. यामध्ये केंद्राचा कारभार हा संसदेमार्फत चालतो. तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधीमंडळामार्फत चालतो.
परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे.

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासन प्रमुख आहेत. देशातील सर्व राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहिने तयार होत असतो.
राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. या राष्ट्रपतीला 26 जानेवारीच्या दिवशी मनवंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे.
राष्ट्रपती हे पद अतिशय जबाबदारीचे असल्यामुळे राष्ट्रपतीला काही घटनात्मक विशेष अधिकार देखील देण्यात आलेले आहेत.
राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते. असे असले तरी भारताचे राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेने सत्तेवर येत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारताचे राष्ट्रपतीपद तयार केलेले नाही.
अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे. तर भारतात राष्ट्रपती हे नामधारी शासनप्रमुख आहेत.
भारताच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा ही अतिशय महत्वाची आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद तर 11 वे राष्ट्रपती के.आर. नारायणन तर बारावे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.
तेराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व चौदावे राष्ट्रपती म्हणून प्रवण मुखर्जी हे कार्यरत आहेत.
पात्रता –

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.
त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.
संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.
अपात्रता –

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.
ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.
ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास.
ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.
त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास.
निवडणूक

राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.
राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.
कार्यकाल

भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.
राष्ट्रपती पदाची मुदत पाच वर्षाची असली तरी मुदतपूर्व राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो.
याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल अशा परिस्थितीत राष्ट्रपतीवर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालविला जातो व हा महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो.
एक व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी किमान दोन वेळा निवडणूक लढवू शकते.

विज्ञान मैत्री प्रश्नमंजूषा


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰〰〰〰〰〰〰〰〰
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही

संयुगांची निर्मिती

व्याख्या:- ज्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. अशी मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रिया करून स्थिर इलेक्ट्रॉन संरुपण प्राप्त करतात म्हणजेच बाह्यतम कक्षा पूर्ण करतात. त्या रासायनिक अभिक्रिया दोन प्रकारे घडून येतात.

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण 2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

1) इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण

इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण धातू आणि अधातू यामध्ये होते.

धातूंच्या बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि अधातूंच्या  बाह्यतम कक्षेत 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन कमावतात

2) इलेक्ट्रॉनची भागीदारी

समान किंवा भिन्न अधातूमध्येच इलेक्ट्रॉनची भागीदारी होते. समांतर धातूमध्ये भागीदारी झाल्यास रेणू तयार होतात तर भिन्न अधातूमध्ये भागीदारी झाल्यास  संयुगे तयार होतात.

अधातूमध्ये भागीदारी होताना त्यांच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात. त्यानंतर प्रत्येक अधातू बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉंन भागीदारीमध्ये वापरतात आणि ते इलेक्ट्रॉन दोन्ही मूलद्रव्यासाठी सामाईक असतात.

भारतातील सर्वात जास्त


 भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग.


 भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण - मावसिनराम.


 भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण- गंगानगर.


 भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण- लेह.


 भारतातील सर्वात जास्त जंगल व्याप राज्य- अरुणाचल प्रदेश.


 भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य- केरळ.(९३%)


 भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे राज्य- बिहार.(६३%)


 भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृतपत्र - Times of India


 भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र.

मराठी व्याकरण प्रश्नमालिका


1. या ठिकाणी माझे काय काम?
उद्गारवाचक 
नकरार्थी
प्रश्नार्थक
होकारार्थी

* उत्तर - प्रश्नार्थक

2. ‘पाणउतारा करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा .
पाणी उतारावर वाहणे
पायऱ्या उतरणे
पाय उतार होणे
अपमान करणे

* उत्तर - अपमान करणे

3. अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा दाढी धरणे
पकडून ठेवणे
कचाट्यात पकडण
आळवणी करणे
शरण आणणे

* उत्तर - आळवणी करणे

4. केशवकुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे?
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
कृष्णाजी केशव दामले
राम गणेश गडकरी
प्रल्हाद केशव अत्रे

* उत्तर -प्रल्हाद केशव अत्रे

5. ..... जळले तरी पीळ जात नाही.
दोरखंड
चऱ्हाट
घर
सुंभ

* उत्तर - सुंभ

6. मी घरीच शिकलो
अकर्मक कर्तरी
सकर्मक कर्तरी
सकर्मक भावे
अकर्मक भावे

* उत्तर - अकर्मक कर्तरी

7. मी पुस्तके वाचली
कर्मणी प्रयोग
कर्तरी प्रयोग
भावे प्रयोग
यापैकी नाही

* उत्तर -  कर्मणी प्रयोग

8. 'हात दाखविणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
कर्तबगारी दाखविणे
फसविणे
प्रकृती दाखविणे
हात दाखऊन भविष्य पाहणे

* उत्तर -  फसविणे

9. रात्र संपता संपत नाही
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमानकाळ
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ

* उत्तर -  अपूर्ण वर्तमानकाळ

10. कपिलाषष्टीचा योग - या शब्दाचा अर्थ कोणता?
ऋणानुबंध
दुर्मिळ योग
योगायोगाने होणारी भेट
कपिल मुनींचा जन्मदिवस

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. – पाचावर धारण बसणे.

1) मनात संख्या मोजणे   
2) पंचप्राण धारण करणे   
3) खूप भयभीत होणे   
4) ऐसपैस बसणे

उत्तर :- 3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 तिथी, वार, नक्षत्र, योग, करणा-या पाच घटकांनी युक्त अशा दिनी – वैशिष्टयांची माहिती असणारी पुस्तिका कोणती ?

1) पंचीकरण   
2) पंचांग     
3) पंचशील   
4) पंचीकृती

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 पुढील शब्दांपैकी व्याकरणदृष्टया योग्य शब्द कोणता ?

1) मनस्थीती   
2) मनस्थिति:   
3) मन्हस्थिती   
4) मन:स्थिती

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 ट, ठ, ड, ढ, ण हे वर्ण ..................
आहेत.

1) तालव्य   
2) अनुनासिक   
3) दन्त्य     
4) मूर्धन्य

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 ‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

1) पूर्वरूप संधी   
2) पररुप संधी   
3) व्यंजन संधी   
4) विसर्ग संधी

उत्तर :- 4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ?

1) कुत्र्या   
2) कुत्रा     
3) कुत्र्याने   
4) कुत्र्याचा

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ? पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

1) चार     
2) पाच     
3) सहा     
4) सात

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 पुढीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?

1) बोलकी बाहुली   
2) पुढची गल्ली   
3) कापड – दुकान   
4) माझे – पुस्तक

उत्तर :- 2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ...................

1) क्रियापद   
2) धातू     
3) कर्म     
4) कर्ता

उत्तर :- 1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗  खालील विधानातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.

तो इतका मोठयाने बोलला, की त्याचा आवाज बसला.

1) उद्देशदर्शक   
2) कारणदर्शक   
3) रीतिदर्शक   
4) कालदर्शक

उत्तर :- 2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार

पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे.

उद्देश विभाग/ उद्देशांग :-

1 ) उद्देश (कर्ता)

वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते.

उदा.
रामुचा शर्ट फाटला. (फाटणारे काय/कोण?)

रामरावांचा कुत्रा मेला. (मरणारे कोण/काय?)

मोगल साम्राज्याचा अंत झाला. (होणारे-कोण/काय?)

रामुच्या घराचा दरवाजा उघडला. (उघडणारे कोण/काय?)

वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत.

2) उद्देश विस्तार

कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे.

उदा.
शेजारचा रामु धपकन पडला.

नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात.

 विधेय विभाग/ विधेयांग :-

वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते.

उदा. 
रामने झडाचा पेरु तोडला. (या वाक्यात तोडण्याची क्रिया पेरु वर झाली म्हणून ते कर्म).

गवळ्याने म्हशीची धार काढली. (या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म).

1) कर्म विस्तार

कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म विस्तार’ होय.

उदा. 
रामने झाडाचा पेरु तोडला.

गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली.

2) विधान पूरक

कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते ‘विधानपूरक’ असते.

उदा. 
राम राजा झाला.

संदीप शिक्षक आहे.

शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना ‘विधानपूरक’ असे म्हणतात.

3) विधेय विस्तार

क्रियापदास विधेय असे म्हणतात.

वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्‍या शब्दांचा यात समावेश होतो.

क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास ‘विधेय विस्तार’ उत्तर येते.

ही सर्व क्रियाविशेषणे असतात.

उदा. 
कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.

शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.

माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला.

4) विधेय/क्रियापद

वाक्यातील क्रियापदाला ‘विधेय’ असे म्हणतात.

उदा.

रमेश खेळतो.

रमेश अभ्यास करतो.

रमेश चित्र काढतो.

धोंडो केशव कर्वे

टोपणनाव:  - अण्णासाहेब
जन्म:  - (एप्रिल १८, इ.स. १८५८
                           - शेरवली , मुरुड
मृत्यू:  - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)
                            हिंगणे आश्रम ,पुणे
चळवळ:  - स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा
पुरस्कार:  - भारतरत्‍न
प्रमुख स्मारके:  - हिगणे पुणे
धर्म:  - हिंदू
वडील:  केशव बापूराव कर्वे
आई:  लक्ष्मीबाई केशव कर्वे
पत्नी:  राधाबाई धोंडो कर्वे , आनंदीबाई धोंडो कर्वे
अपत्ये:  रघुनाथ ,भास्कर , दिनकर

धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. . इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

▪️अनुक्रमणिका
१  बालपण आणि तारुण्य
१.१  पुनर्विवाह
२  कार्य
३  श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठची स्थापना
४  चरित्रे
५  संदर्भ

▪️बालपण आणि तारुण्य

रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

▪️पुनर्विवाह

त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.

अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

▪️कार्य

इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता.
इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी  '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. स्तियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशूसंगोपन, गृह्जीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामूळे स्त्रियांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळाली.

पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' आणि त्यानंतर `महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' असे त्याचे नामकरण करण्यात आले.     १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते.
अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.
जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे नामकरण करण्यात आले.
अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषत: महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले.
कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले.
मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले.

▪️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठची स्थापना

त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. 1910 मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली.
इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले.
इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची माहिती जगाला करून दिली.

बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाइन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या.अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील एक स्त्री सुधारणा करणारे म्हत्वाचे व्यक्तिमत्व आहे.
आजही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...