२९ जानेवारी २०२२

पोलीस भरती साठी महत्त्वाचे प्रश्न -30 खूप महत्त्वाचे आहे संग्रह करून ठेवा

Q1. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
✅   - मध्य प्रदेश

 

Q12.  हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
✅   - पद्‍म विभूषण

 

Q3. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद _ ह्यांनी भूषविले.
✅  - राजर्षी शाहू महाराज

 

Q4. इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत?
✅  - सेवा

 

Q5.  ह्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
✅   - औरंगाबाद

 

Q6. जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो.
✅   - तिसरा

 

Q7. दुधात __ ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.
✅.  - शर्करा

 

Q8. अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे?
✅.  - केरळ

 

Q9. राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?
✅.  - 368

 

Q10. गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते?
✅.  - लोकसंख्या

 

Q11. आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या __ ह्या संस्थेचे शुभचिंतक होते.
✅. - शारदा सदन

 

Q12. अतिरिक्त मद्यपानाने __ ची कमतरता जाणवते.
✅. - थायामिन

 

Q163. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
✅.  - रांची

 

Q14. फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे?
✅. - जळगाव

 

Q15. _ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.
✅.   - संगमरवर

 

Q16. 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत?
✅. - मणि भवन

 

Q17. भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?
✅.  - आयएनएस गरुड

 

Q18. कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे?
✅.  - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

Q19. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
✅. - लक्षद्वीप

 

Q20. कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे?
✅.  - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

Q21. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
✅. - १२ लाख चौ.कि.मी.

 

Q22. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार __
✅. - दख्खनचे पठार

 

Q23. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
✅.  - मध्य प्रदेश

 

Q24. महाराष्ट्राच्या ___ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
✅. - उत्तरे

 

Q25. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात.
✅. - निर्मळ रांग

 

Q26. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
✅. - नदीचे अपघर्षण

 

Q27. लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत?
✅. - किन्हाळा

 

Q28. दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
✅. - Lignite

 

Q29. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
✅. - औरंगाबाद

 

Q30. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
✅ - पाचगणी

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )

1. अंजू 8:30 ला 15 मिनिटे कमी असतांना शाळेत पोहोचली ती पोहचली तेव्हा शाळा सुरु होऊन अर्धा तास झाला होता तर तिच्या रोजच्या शाळेची वेळ कोणती?
7: 45
8: 00
8: 15
8: 30

● उत्तर - 7: 45

2.
राधाने एका स्पर्धा परिक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उतरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उतरासाठी 2 गुण 100 गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उतरांची संख्या किती?
60
65
70
75

● उत्तर - 60

3. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
5, 8, 17, 24, 37, 48, 65, _.
65
80
82
99

● उत्तर - 80

4. एक परिचारिका तिच्या रोग्याला दर 10 मिनिटांनी एक गोळी देते तर तिच्या पाच तासाच्या पाळीत तिला किती गोळ्या घाव्या लागतील?
20
25
30
31

● उत्तर - 30

5.
एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे “green colour book”, म्हणजे “ blue colour cover” आणि 794 म्हणजे “ green colour earth” तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?
green
colour
cover
earth

● उत्तर - earth

6.
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा  121, 222, __, 424, 525

302
323
333
324

● उत्तर - 323

7. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
111, 126, 141, ____, 201, 216.
114
156
251
168

● उत्तर - 156

8. एका सांकेतिक भाषेत NO = 56, DE =98 तर DONE = ?
56105
9856
9658
8965

● उत्तर - 9658

9. एका सांकेतिक लिपीत IN = 914 तर NO =?
1415
1425
1417
1396

● उत्तर - 1415

10.
एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय?
rust
nsb
mabs
kurt

● उत्तर - mabs

संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न उत्तरे

*प्रश्न १: खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता?

१)पुजारी✅
२) परिश्रम
३) प्रगती
४) प्रशांत

*प्रश्न २: खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त आहे?

१) सोक्षमोक्ष
२) कडकड
३) काळाकाळा✅
४) गडगड

*प्रश्न ३: खालीलपैकी कोणता सिद्ध शब्दाचा प्रकार नाही?

१) तदभव
२) अभ्यस्त✅
३) देशी
४) तत्सम

*प्रश्न ४: खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?

१) घोडा
२) धोंडा
३) झाड
४) गाव✅

*प्रश्न ५: खालीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त आहे ?

१) सरसर
२) दूरदूर
३) दगड धोंडा✅
४) पडसाद

*प्रश्न ६: खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून रूढ झाला आहे?

१) किल्ली✅
२) कंबर
३) काम
४) कजाग

*प्रश्न ७: 'खळखळ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

१) अनुकरण वाचक✅
२) अंशाभ्यस्त
३) पूर्णाभ्यास्त
४) उपसर्गघटित

*प्रश्न ८: खालीलपैकी नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?

१) नातसून
२) नीलकंठ
३) नाइलाज✅
४) नवरात्र

*प्रश्न ९: 'सहोदर' या सामाजिक शब्दाचा समास कोणता?

१) विभक्ती बहुव्रीही
२) सहबहुव्रीही✅
३) प्रादिबहुव्रीही
४) नञ बहुव्रीही

*प्रश्न १०: 'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे' या वाक्यातील उपमान कोणते?

१) माया
२) तुझी
३) आम्हावरी
४)आभाळागत✅

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

🚦1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार
        कोणता?

    ‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी
     शिगोशिग भरली होती.’

▪️1) ती गाडी  
▪️2) शिगोशिग   
▪️3) भरली होती  
▪️4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ✅

🚦2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील
          प्रयोग ओळखा.

◾️ 1) कर्मणी प्रयोग  
◾️ 2) कर्तरी प्रयोग    ✅
◾️ 3) भावे प्रयोग  
◾️ 4) शक्यकर्मणी प्रयोग

🚦3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा
          विग्रह करून समास ओळखा.

▪️ 1) मध्यमपद लोपी समास    
▪️ 2) समाहार व्दंव्द
▪️ 3) इतरेतर व्दंव्द      
▪️ 4) कोणताही नाही✅

🚦4) विरामचिन्हांचा वापर करताना
      ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’

▪️अ) दोन शब्द जोडताना       
▪️ब) संबोधनाकरिता वापर केला जातो
▪️क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे
          सांगण्यासाठी
▪️ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा
          राहिल्यास

▪️1) ब बरोबर
▪️2) ब, ड बरोबर
▪️3) क     
▪️4) अ, ड बरोबर ✅

🚦5) सावळाच रंग तुझा पावसाळी
          नभापरी ! (अलंकार ओळखा.)

▪️1) श्लेष अलंकार   
▪️2) यमक अलंकार  
▪️3) अतिशयोक्ती अलंकार
▪️4) उपमा अलंकार ✅

🚦6) सिध्द शब्द ओळखा.
  
▪️1) येऊन  
▪️2) ये      ✅
▪️3) येवो    
▪️4) येणार

🚦7) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील
         शब्दशक्ती ओळखा.

▪️1) व्यागार्थ  
▪️2) लक्षार्थ    ✅
▪️3) वाच्यार्थ   
▪️4) संकेतार्थ

🚦8) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी
         शब्द शोधा :

▪️1) जल      ✅
▪️2) जलद    
▪️3) ढग     
▪️4) क्षार

🚦9) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी
        शब्द निवडा.

▪️1) उन्नत   
▪️2) अवनत  
▪️3) आरोहण    ✅
▪️4) प्रारंभ

🚦10) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा
            होतात.’

        हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य
        म्हण निवडा.

▪️1) हात ओला तर मित्र भला    ✅
▪️2) मूल होईना सवत साहीना
▪️3) मनास मानेल तोच सौदा  
▪️4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

छत्रपती शाहू महाराज

✍26 जून सामाजिक न्याय दिन

आपल्या कृतीतून सामाजिक समतेचा संदेश देणारे लोकोत्तर महाराज राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते.

●मूळ नाव : यशवंतराव , वडिलांचे नाव-जयसिंगराव घाटगे ,आईचे नाव –राधाबाई
 
●जन्म :२६ जून१८७४,कागल ,कोल्हापूर

●राज्याभिषेक : २ एप्रिल १८९४ रोजी वयाच्या २० व्या वर्षी.

●मृत्यू : ६ में १९२२ मुंबई

कार्ये:
● १८९५ - शाहूपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन .

●२६ जुलै १९०२- रोजी एक आदेश संमत करून शासकीय सेवेत ब्राह्मणेतरांना ५०%जागा राखीव ठेवल्या .

●१९०६ -कोल्हापूर येथे शाहू मिल ची स्थापना.

●१९०८ -भोगावती नदीवर राधानगरी नावाचे धरण बांधले.

●१९११- मध्ये कोल्हापुरात सत्येशोधक समाजाच्या चळवळीचे पुनरुज्जीवन करून तिचे नेतृत्व केले ,१९१३ मध्ये सत्यशोधक       विद्यालय स्थापन.

● १९१२ -नवी कृषी  तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अॅूग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’  संस्था कोल्हापुरात स्थापन .

● १९१३- मध्ये महाराजांनी संस्थानातील प्रत्येक खेड्यात शाळा असावी असा आदेश काढला.१९१८ मध्ये त्यांनी आणखी एक आदेश काढून  कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

● इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.

● १९१८ - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत.
-संस्थानात आर्ये समाजाची स्थापना केली व  राजाराम college,राजाराम विद्यालय ,ट्रेनिंग कॉलेज यांची जबाबदारी आर्ये        समाजावर सोपवली
-कनिष्टजातींना त्रासदायक ठरणारी बलुता पद्धती नष्ट केली .
-कुलकर्णी वतनाचे उच्चाटन करून त्यावर पगारी तलाठ्याची नेमणूक केली .

●१९१९- संस्थानात अस्पृशतापालनास बंदी घातली.
-१३व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष(कानपूर,एप्रिल१९१९ ),कानपूरच्या जनतेने त्याना”राजर्षी”पदवी दिली .

●१९२० –भावनगर(गुजरात ) येथे आर्यधर्म परिषदेचे अध्यक्षस्थान राजांनी भूषविले .
            - हुबळी येतील सामाजिक परिषदेचे अध्यक्ष .

●इतर कार्ये ;
            -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक ‘ व आगरकरांच्या ‘सुधारक ‘वृत्तपत्रांना आर्थिक साहाय्य.

           -व्हेलेंटीन चिरोल यांच्या ‘Unrest In India’ या ग्रंथाचे भाषांतर रा .र .डोंगरे यांच्या कडून करवून घेतले .

●१९०२ –केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने L.L.D पदवी दिली.

प्रजासत्ताक दिनी परिंचेत सरपंचानी रचला इतिहास

सरपंच ऋतुजा जाधव यांच्या कल्पनेतून स्वच्छता कर्मचाऱ्याचा सन्मान


२६ जानेवारी हा समस्त भारतीयांचा राष्ट्रीय सण. संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी राष्ट्रीय ध्वजरोहण करून सलामी दिली जाते. गावपातळीवर ग्रापंचायतीत राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मान हा गावचे प्रथम नागरिक या नात्याने सरपंच यांचा असतो. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात मात्र भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी ध्वजरोहणाचा मान हा ग्रा.पं चे स्वच्छता कर्मचारी पार्वती पोळ यांना देण्यात आला. परिंचे गावच्या सरपंच ऋतुजा जाधव यांनी ध्वजारोहणाचा आपला मान पार्वती पोळ यांना देत एक आदर्शच घालून दिला आहे. ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांवर ध्वजारोहण समारंभाची पूर्वतयारीची जबाबदारी असते. अगदी ध्वजारोहणाचा स्तंभ, राष्ट्रीय ध्वज फडकविण्यासाठी दोरी बांधून ठेवणे, परिसर स्वछ करणे ही कामे ध्वजारोहणापूर्वी ग्रा.पं.चे शिपाई करतात. परिंचे ग्रा.पं. मध्ये गेली २५ वर्ष स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या पार्वती पोळ यांना हा ध्वजारोहांचा सन्मान देण्यात आला. यानिमित्ताने सरपंच ऋतुजा जाधव यांनी शिपाई पोळ यांना ध्वजारोहणाचा मान देऊन एक वेगळाच आदर्श घालून दिला. ज्या ग्रामपंचायतमध्ये २५ वर्ष इमानइतबारे सेवा केली. तिथे मिळालेल्या या बहुमानाने पार्वती पोळ यांना गहिवरून आले.

ध्वजारोहण करण्याचा सन्मान हा बहुमान कोरोनाच्या कालावधीसह दैनंदिन कामकाजात योगदान देणाऱ्या स्वच्छता दूताच्या मार्फत करण्याचा विचार आला. आपला देश हा शेतकऱ्यांचा व कष्टकरी कामगारांचा आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेचा सन्मान करण्यासाठी पार्वती पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संविधानातील सामाजिक समता व बंधुता मी प्रत्यक्ष कृतीतून जपली आहे. : ऋतुजा जाधव सरपंच परिंचे

ध्वजारोहणाचा सन्मान माझ्यासारख्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या हस्ते केल्याने गेल्या २५ वर्षाच्या प्रामाणिक सेवेचे फळ मिळाल्याची भावना आहे. एवढ्या मोठ्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ध्वजारोहण करणे हा माझा जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. : श्रीमती. पार्वती पोळ ग्रा पं. कर्मचारी परिंचे

चालू घडामोडी

1. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती मशाल आजपासून कोणत्या मशालमध्ये विलीन होणार आहे?

उत्तर: राष्ट्रीय युद्ध स्मारक.

2. १५५ दिवसांत मायक्रोलाइट विमानाने संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालणारी ती सर्वात तरुण (19 वर्षे) पहिली महिला बनली आहे?

उत्तर: बेल्जियन-ब्रिटिश पायलट झारा रदरफोर्ड.

3. ICC ने निवडलेल्या जगातील कसोटी XI मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे?

उत्तरः रोहित शर्मा, आर अश्विन आणि ऋषभ पंत.

4. सिंगापूरमधील कोणत्या सोसायटीने देशाच्या लिटल इंडिया कॅम्पसमध्ये नूतनीकरण केलेल्या महात्मा गांधी मेमोरियल हॉलचे उद्घाटन केले आहे?

उत्तर: सिंगापूर इंडियन फाइन आर्ट्स सोसायटी.

5. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या 13 जागतिक नेत्यांच्या यादीत लोकप्रिय नेत्यांमध्ये कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे?

उत्तरः नरेंद्र मोदी.

6. मॉरिशस सरकारने मेट्रो एक्स्प्रेस प्रकल्पासाठी भारताच्या समर्थनावरून स्टेशनचे नाव देण्याची घोषणा केली आहे?

उत्तर : महात्मा गांधी.

7. माल्टा येथील एका संसद सदस्याची युरोपियन युनियनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिचे नाव काय आहे?

उत्तर: रॉबर्टा मेत्सोला.

8. फायझरचे प्रमुख अल्बर्ट बोएर्ला यांना कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तरः जेनेसिस अवॉर्ड.

9. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने तुम्हाला बाजारातील मूलभूत गोष्टी प्रदान करण्यासाठी कोणते अॅप लॉन्च केले आहे?

उत्तर: सा₹ठी.

10.श्रम मंत्रालयाचे नवीन अतिरिक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तरः शशांक गोयल.

11. ICC ने जगातील सर्वोत्तम ODI महिला संघात कोणत्या दोन भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे?

उत्तरः मिताली राज

महाराष्ट्राचा भूगोल

प्र.१) महाराष्ट्र राज्यातील येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) पुणे
ब) परभणी ✅
क) औरंगाबाद
ड) सोलापूर

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात येलदरी हे धरण आहे.

प्र.२) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते ?
अ) राजस्थान
ब) मध्ये प्रदेश
क) राजस्थान ✅
ड) कर्नाटक

स्पष्टीकरण : भारतातील आकारमानाने राजस्थान राज्य सर्वात मोठे आहे.

जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे.

क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे

प्र.3) जोड्या लावा.

   जिल्हा         साखर कारखाना
अ) बीड - I) तुळशीदास नगर
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) कडा
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

अ) (IV) (III) (II) (I)
ब) (II) (I) (III) (IV)
क) (III) (II) (I) (IV) ✅
ड) (III) (IV) (II) (I)

स्पष्टीकरण : अ) बीड - III) कडा
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) तुळशीदास नगर
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

प्र.४) - - - - - - - - - - - वर्षी लातूर येथे तर - - - - - - - - वर्षी कोयना येथे भूकंप झाले.

अ) १९९३, १९६७ ✅
ब) १९८३, २००१
क) २००१, २००९
ड) १९९९, १९६६

स्पष्टीकरण : १९९३ वर्षी लातूर येथे तर वर्षी १९६७ कोयना येथे भूकंप झाले.

प्र.५) महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा.

    तालुके               जिल्हे
अ) खेड      I) रायगड, अहमदनगर
ब) कर्जत     II) रत्नागिरी, पुणे
क) कळंब    III) नाशिक, अमरावती
ड) नंदगाव   IV) उस्मानाबाद, यवतमाळ

अ) (II) (IV) (I) (III)
ब) I) (II) (IV) (III)
क) (II) (I) (IV) (III) ✅
ड) (IV) (III) (II) (I)

स्पष्टीकरण : अ) खेड - II) रत्नागिरी, पुणे
ब) कर्जत - I) रायगड, अहमदनगर
क) कळंब - IV) उस्मानाबाद, यवतमाळ
ड) नंदगाव - III) नाशिक, अमरावती

प्र.६) भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग - - - - - - - शहरात बांधण्यात आला.

अ) मुंबई
ब) दिल्ली
क) चेन्नई
ड) कोलकाता ✅

स्पष्टीकरण : भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग कोलकाता शहरात बांधण्यात आला.

प्र.७) गोदावरी नदी महाराष्ट्रातील - - - - - - - - - येथून उगम पावते.

अ) भीमाशंकर
ब) मुलताई
क) त्र्यंबकेश्वर ✅
ड) महाबळेश्वर

स्पष्टीकरण : गोदावरी नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील एक देवस्थान आहे.

प्र.८) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

अ) ठिबक सिंचन पध्दती
ब) मोकाट सिंचन पध्दती ✅
क) उपसा सिंचन पध्दती
ड) तलाव सिंचन पध्दती

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील मोकाट सिंचन पध्दती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

प्र.९) अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर  जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) फक्त अ
ब) फक्त ब
क) अ आणि ब बरोबर ✅
ड) वरीलपैकी एकही नाही.

स्पष्टीकरण : अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी दोन्ही विधान बरोबर आहेत.

प्र.१०) आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोठे आहे ?

अ) जायकवाडी प्रकल्प
ब) तारापूर प्रकल्प
क) कोयना प्रकल्प ✅
ड) पूर्णा प्रकल्प

स्पष्टीकरण : आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोयना प्रकल्प आहे, हा प्रकल्प कोयना धरणावर बांधला गेला आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला

भारतातील विविध गोष्टींची संख्या

🏘️ भारतात राज्य : २८
🏘️ भारतात केंद्रशासित प्रदेश : ०८
🏘️ भारतात जिल्हे : ७४२
✌️ लोकसभेच्या जागा : ५४३
✌️ राज्यसभेच्या जागा : २४५
⛱️ ब्लू फ्लॅग समुद्रकिनारे : ०८
🌳 वर्ल्ड ट्री सिटी : ०१
✈️ भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळे : ३४
☢️ कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्प : ०८
🚉 भारतात रेल्वे विभाग : १८
🌊 भारतातील जलमार्ग : १११
🔱 भारतात युनेस्को वारसास्थळे : ३८
🔱 भारतात रामसर स्थळे : ४२
1️⃣ भारतात सांस्कृतिक वारसास्थळे : ३०
2️⃣ भारतात नैसर्गिक वारसास्थळे : ०७
3️⃣ भारतात मिश्र वारसास्थळ : ०१
⛰️ भारतात राष्ट्रीय उद्याने : १०५
🐯 भारतात व्याघ्र राखीव क्षेत्र : ५२
🐯 भारतात वाघ : एकुण २९६७

    

लोकपाल


    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष

गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम

न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी

🛑 लोकपाल निवड समिती
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा अध्यक्ष
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ

🛑 लोकपाल पात्रता

1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

🛑 अध्यक्ष अपात्रता

45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती संसद व विधिमंडळ सदस्यअपराधी दोषी

🛑 कार्यकाल

5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो

🛑 पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे

🛑 लोकपाल कायदा 2013

   राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
लोकसभा:-18 डिसेंबर 2013
राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
अंमलबजावणी :-16 जानेवारी 2014
रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

Commonwealth of Nation (राष्ट्रकुल संघटना)


"कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स" हा शब्द ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड रोजबेरी यांनी 1884 मध्ये प्रथम तयार केला होता. 

अधिकृत भाषा: इंग्रजी

एकूण सदस्य: 54

स्थापना:  11 डिसेंबर 1931

मुख्यालय: (मार्लबरो हाऊस) लंडन, युनाटेड किंग्डम

भारताने राष्ट्रकुलात 15 ऑगस्ट 1947 मध्ये प्रवेश केला होता. तसेच राष्ट्रकुलात प्रवेश करणारा 19 व्या क्रमांकाचा देश आहे.

11 डिसेंबर 1931 च्या वेस्टमिन्स्टर कायद्याने राष्ट्रकुलची कायदेशीर स्थिती सुरक्षित केली होती. 1946 पासून ब्रिटीश कॉमनवेल्थ"फक्त" कॉमनवेल्थ "म्हणून ओळखली जाऊ लागली.

कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स सार्वभौम राज्यांची स्वैच्छिक आंतरराज्यीय संघटना आहे ज्यात ग्रेट ब्रिटन आणि त्यातील जवळजवळ सर्व पूर्वीची सत्ता, वसाहती आणि संरक्षक कार्य समाविष्ट आहे. ही परिभाषा फिट न होणारी राज्ये मोझांबिक आणि रवांडा आहेत.(मोझांबिक आणि रवांडा पूर्व ब्रिटीश वसाहती न होता राष्ट्रकुलमध्ये सामील झाले.)

मालदीवने राष्ट्रकुलात 1982 मध्ये प्रवेश केला होता. (नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव)
नव्याने सदस्य झालेले देश रवांडा (रवांडा हा सर्वात नवीन सदस्य आहे जो 29 नोव्हेंबर 2009 रोजी सामील झाला.)

आता सर्वात विकसित वसाहतींना अधिराज्य - स्वायत्त अर्ध-राज्य स्थापनेचा (नंतर प्रत्यक्षात स्वतंत्र राज्यांचा) दर्जा देण्यात आला आणि त्या सर्वांनी ब्रिटीश कॉमनवेल्थ नेशन्सचा भाग बनला.

राष्ट्रकुल देशातील प्रत्येक देशाकडून एकतर्फी माघार घेण्याचा बिनशर्त अधिकार आहे.

बेंगॉल गॅझेट



▪️२९ जानेवारी,१७८० 


▪️जेम्स ऑगस्टस हिक्की


▪️भारतात पहिले वर्तमानपत्र


▪️एक साप्ताहिक होते


▪️बेंगॉल गॅझेट/ कलकत्ता जनरल ऍडव्हायझर किंवा हिक्कीज गॅझेट या नावाने प्रसिद्ध 


▪️बेंगॉल गॅझेटवरील हिक्कीचे नेहमीचे वाक्य  - A weekly political and commercial paper open to all parties, but influenced by none


▪️त्याची दोन पाने निघत, या दोन पानांपैकी अर्धी अधिक जागा जाहिरातींनी व्यापलेली असे

शीत लहरी(cold wave)


🛑 Recent in News-  IMD नुसार येत्या 3-4 दिवसांत 10 राज्ये आणि UT मध्ये थंड लाटेचा इशारा


💠 काही प्रदेशांमध्ये Cold Snap किंवा Cold Spell म्हणून ओळखली जाते.


💠ही एक हवामानाची घटना आहे जी हवेचे तापमान कमी होते त्यावरुन ओळखली जाते.


💠 विशेषत: US National Weather Service ने वापरल्याप्रमाणे, शीत लहर म्हणजे 24 तासांच्या कालावधीत तापमानात होणारी झपाट्याने घसरण असते .


💠ज्यासाठी कृषी, उद्योग, वाणिज्य आणि सामाजिक क्रियाकलापांना मोठ्या प्रमाणावर संरक्षण आवश्यक असते.


💠 शीतलहरीचे अचूक निकष म्हणजे तापमान   कमीत कमी किती कमी होते. हे किमान तापमान भौगोलिक प्रदेश आणि वर्षाच्या वेळेवर अवलंबून असते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...