२८ जानेवारी २०२२

काही महत्त्वाचे एकक

एककाचे नाव - वापर

नॉट :- सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक

1 नॉटिकल मैल=6076 फुट

फॅदम - समुद्राची खोली मोजण्याचे एकक

1 फॅदम=6 फुट

प्रकाशवर्ष :- तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक

1 प्रकाशवर्ष=9.46×10१२ मीटर

अँगस्ट्रॉंम :- प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक

1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर

बार :- वायुदाब मोजण्याचे एकक

1 बार=10 डाईन्स दाब/चौ

पौंड :- वजन मोजण्याचे एकक

2000 पौंड=1 टन

कॅलरी :- उष्णता मोजण्याचे एकक

1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा

अॅम्पीअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक

1 अॅम्पीअर=6.3×10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद

मायक्रोन :- लांबीचे वैज्ञानिक एकक

1 मायक्रोन=0.001 मिमी

हँड :- घोड्याची उंची मोजण्याचे एकक

1 हँड=4 इंच

गाठ :- कापूस गाठी मोजण्याचे एकक

1 गाठ=500 पौंड

रोएंटजेन :- क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक

वॅट :- शक्तीचे एकक

1 हॉर्सपॉवर=746 वॅट

हॉर्सपॉवर :- स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक

1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.

दस्ता :- कागदसंख्या मोजण्याचे एकक

1 दस्ता=24 कागद,

1 रिम=20 दस्ते

एकर :- जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक

1 एकर = 43560 चौ.फुट

मैल :-अंतर मोजण्याचे एकक

1 मैल=1609.35 मीटर

हर्टझ :- विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक

सामान्य विज्ञान : प्रमुख संज्ञा

🌿 अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.

🌿 बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.

🌿 कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.

🌿ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर

🌿अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.

🌿वोल्ट :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलातून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.

🌿प्रकाश वर्ष :– प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3×10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46×10)12 किमी

🌿विस्थापन :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात.

🌿गती/चाल :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात.

🌿वेग :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे.

पाण्याचे असंगत आचरण

सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

· परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

· 00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

· 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 40C च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

· पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

· 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 40C ला उच्चतम (Maximum) असते.

· पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

· बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 00C तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

· थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 00C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 40C होईपर्यंत चालू राहते.

तापमान 40C पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते. परिणामी त्याची घनता कमी होऊन ते पृष्ठभागावरच राहते.

पृष्ठभावरील तापमान कमी होत होत 00C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान 40C च राहाते.

· बर्फ उष्णतेचा विसंवाहक (Bad Conductor) आहे. त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वाटवरणात जाऊ शकत नाही.

· अशाप्रकारे 40C तापमानास जलीय वनस्पति व जलचर प्राणी जीवंत राहू शकतात.

· तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. 00C तापमानाला पाण्याचे बर्फ होते. नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात.

· कधीकधी खडकाच्या फटीमध्ये पाणी शिरते आणि तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावते. मोठा दाब निर्माण होऊन खडक फुटून त्याचे तुकडे होतात.

सामान्य विज्ञान - प्रश्नसंच

1.त्वचा व त्वचारोगाचा अभ्यास करणार्‍या शास्त्रास काय म्हणतात?

अ) मायकॉलॉजी

ब) इकॉलॉजी

क) अर्निथॉलॉजी

ड) डर्मेटॉलॉजी

2.कोणत्या रक्तगटाची व्यक्ती सर्वांना रक्तदान करू शकते?

अ) ओ

ब) ए

क) बी

ड) एबी

3........ या वायुच्या थरामुळे अतिनिल किरणाची तीव्रता कमी होते?

अ) हायड्रोजन

ब) हेलियम

क) ओझोन

ड) क्लोरीन

4.पर्यावरणाच्या दृष्टीने देशातील किती टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असणे आवश्यक आहे.

अ) 20%

ब) 33 %

क) 30%

ड) 44%

5.रडार या यंत्रात कोणत्या लहरिंचा वापर करतात?

अ) रेडीयो लहरी

ब) विद्युत लहरी

क) अल्ट्रासॅानिक लहरी

ड) नाद लहरी

6.जड पाण्यामधे खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?

अ) कार्बन

ब) क्लोरीन

क) सोडीयम

ड) कॅल्शियम

7.चंद्राचा फक्त ....... पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसु शकतो?

अ) 41%

ब) 47%

क) 51%

ड) 59%

8.अ‍ॅसिटिल सॅलिसिलिक अ‍ॅसिड (Acetyl salicylic acid) ला आणखी कोणत्या नावाने ओळखतात?

अ) अ‍ॅस्पिरिन

ब) व्हिनेगर

क) पेनिसिलीन

ड) कॉस्टीक  सोडा

9.सौर ऊर्जा हा ऊर्जेचा कोणता स्त्रोत आहे?

अ) नवीकरणीय

ब) अनवीकरणीय

क) पारंपारिक

ड) मर्यादित

10.हिमनगातील पाणी...........असते.

अ) कडू

ब) खारे

क) गोड

ड) तुरट

उत्तरे

1-ड  

2-अ    

3-क  

4-ब  

5-अ  

6-ड  

7-ड  

8-अ  

9-अ  

10-क   

General Knowledge

1) कोणत्या दिवशी भारतात ‘सुशासन दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 25 डिसेंबर

2) कोणत्या शहराने “ऑक्सिजन पार्लर” नावाचा उपक्रम राबविला?
उत्तर : नाशिक

3) कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
उत्तर : राफेल नडाल

4) परराष्ट्र सचिव पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : हर्षवर्धन श्रृंगला

5) अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : चंदीगड

6) 32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ कुठे आयोजित केले गेले?
उत्तर : नवी दिल्ली

7) कोणत्या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 24 डिसेंबर

8) कोणत्या राज्यात ‘नेथन्ना नेस्थम’ योजना लागू करण्यात आली आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

9) ‘FIFA टीम ऑफ द ईयर’चा किताब कोणाला देण्यात आला?
उत्तर : बेल्जियम

10) कोणाच्या हस्ते नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : उपराष्ट्रपती

1) ‘विस्डेन’संस्थेच्या ‘दशकातले पाच क्रिकेटपटू’ च्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे?
उत्तर : विराट कोहली

2) पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
उत्तर : भारत

3) 26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
उत्तर : शहीद उधम सिंग

4) कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
उत्तर : वर्ष 2011

5) मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
उत्तर : तामिळनाडू

6) क्युबा देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मॅन्युएल मरेरो क्रूझ

7) QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेनी घेतली आहे?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)

8) पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
उत्तर : गुलजार अहमद

9) आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर : ऑक्टोपस

10) ICCच्या ताज्या 2019 कसोटी मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
उत्तर : विराट कोहली

1) कोणत्या दिवशी भारतात ‘सुशासन दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 25 डिसेंबर

2) कोणत्या शहराने “ऑक्सिजन पार्लर” नावाचा उपक्रम राबविला?
उत्तर : नाशिक

3) कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
उत्तर : राफेल नडाल

4) परराष्ट्र सचिव पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : हर्षवर्धन श्रृंगला

5) अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : चंदीगड

6) 32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ कुठे आयोजित केले गेले?
उत्तर : नवी दिल्ली

7) कोणत्या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 24 डिसेंबर

8) कोणत्या राज्यात ‘नेथन्ना नेस्थम’ योजना लागू करण्यात आली आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

9) ‘FIFA टीम ऑफ द ईयर’चा किताब कोणाला देण्यात आला?
उत्तर : बेल्जियम

10) कोणाच्या हस्ते नवी दिल्लीत 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले?
उत्तर : उपराष्ट्रपती

पोलीस भरती प्रश्नसंच

1.महाराष्ट्राचे बुकर टी-वॉशिग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते.

A. महात्मा फुले
B.कर्मवीर भाऊराव पाटील✅✅
C.महर्षी धांडो केशव कर्वे
D.महर्षी विट्ठल रामजी शिंदे

2.4 नोव्हेंबर 1905 मध्ये स्थापन केलेल्या परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता

A : परिपत्रकाला विरोध करणे
B : काढून टाकलेल्या विद्याथ्र्यांना शिक्षण देणे✅✅
C : विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करणे
D : वरीलपौकी कोणताच उद्देश नव्हता

3.सन 1985 मध्ये असंघटित क्षेत्रातील स्त्री कामगारांवर एक महत्तपूर्ण अभ्यास कोणी प्रसीध्द केला

A : सुलभा ब्रम्हे
B : निर्मला बॅनर्जी✅✅
C : लीला दुबे
D : बीना आगरवाल

4.विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारीत आहे.

A : हंटर कमिशन
B : सॅडलर कमीशन
C : रॅली कमिशन✅✅
D : वूडस कमिशन

5.थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली

A : अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक✅✅
B : जी. के. गोखले आणि एन. सी. केळकर
C : महात्मा फुले
D : आंबेडकर

6.कोणत्या घटना दुरुस्तीनुसार भाषावर प्रांतरचना करण्यात आली

A : पहिली दुरुस्ती
B : सातवी दुरुस्ती
C : सहावी दुरुस्ती✅✅
D : चौथी दुरुस्ती

7.स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन "लढाऊ हिंदू धर्म" (Aggressive Hinduism) असे कोणी केले

A : सरोजिनी नायडू
B : भगिनी निवेदिता✅✅
C : अॅनी बझंट
D : वरील सर्व

8.  . . . . यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना "आर्यसमाज" स्थापनेसाठी मदत केली

A : विवेकानंद
B : आगरकर
C : गोखले
D : लोकहितवादी✅✅

9.महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिध्द सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखली जात होते.

A : ज्योतीबा फुले
B : महादेव रानडे
C : गोपाळ हरी देशमूख✅✅
D : गोपाळ गणेश आगरकर

10.विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारीत आहे.

A : हंटर कमिशन
B : सॅडलर कमीशन
C : रॅली कमिशन✅✅
D : वूडस कमिशन

महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. पुढील शब्दाचा सामासिक प्रकार कोणता? (दारोदार)
अव्ययीभाव
बहुव्रीही
व्दंद
तत्पुरुष

● उत्तर - अव्ययीभाव

2. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पैकी कोणता?
उपाशी राहणे
थंड पदार्थ खाणे
भरपुर फराळ करणे
थंड करून मग खाणे

● उत्तर - उपाशी राहणे

3. शिपायाने चोरास पकडले प्रयोग ओळखा.
कर्मणी
भावे
कर्मभावसंस्कार
कर्तरी-कर्म संकर

● उत्तर - भावे

4. पद्य सुरावर म्हणण्याची पध्दत म्हणजे खालील पैकी काय?
कविता
चाल
गद्य
गाण

● उत्तर - गाण

5. ‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
दोष देणे
शब्दांनी रचना करणे
लेखन करणे
बोलणे

● उत्तर - दोष देणे

6. 'उंदिर' या नामाचे अनेक वचन कोणते?
उंदरे
उंदरांना
उंदीरं
अनेकवचन होत नाही

● उत्तर - अनेकवचन होत नाही

7. 'दही' या शब्दाचा प्रकार कोणता?
तत्सम
तद्भव
परभाषिक
यापैकी नाही

● उत्तर - यापैकी नाही

8. 'बोलका पोपट उडून गेला.'
'बोलका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
धातुसाधित विशेषण
गुण विशेषण
अनिश्चय वाचक
ते विशेषणाच नाही

● उत्तर - गुण विशेषण

9. हत्ती गेला ...... राहिले.
चिन्ह
अंकुश
शेपूट
माहूत

● उत्तर - शेपूट

10. नाशिकहून मुंबई २०० किलोमिटर आहे.
तृतीय
पंचमी
सप्तमी
व्दितीय

● उत्तर - पंचमी

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.

   1) आम्ही भारतीय नागरिक    2) भारतीय नागरिक
   3) आज भारताशी      4) प्रामाणिक आहोत

उत्तर :- 1

2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) भावे प्रयोग    2) सकर्मक कर्तरी प्रयोग   
   3) कर्मणी प्रयोग    4) अकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर :- 4

3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’

   1) नत्र बहुव्रीही समास    2) व्दिगू समास   
   3) समाहार व्दंव्द – समास  4) मध्यमपदलोपी समास

उत्तर :- 1

4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?

   1) पूर्णविराम    2) उद्गारवाचक चिन्ह   
   3) अर्धविराम    4) प्रश्नचिन्ह

उत्तर :- 2

5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?

   1) मंदाक्रांता    2) वसंततिलका     
   3) शिखरिणी    4) पृथ्वी

उत्तर :- 4

6) या टोपीखाली दडलंय काय?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

   1) सात    2) आठ     
   3) नऊ    4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
     ‘मधू लाडू खात जाईल’

   1) साधा भविष्यकाळ    2) अपूर्ण भविष्यकाळ
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

   1) पुल्लिंगी    2) नपुंसकलिंगी   
   3) स्त्रीलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती – कार्य, विचार आणि निबंध

🎥मूळ आडनाव – गोह्रे
🎥जन्म – 11 एप्रिल 1827
🎥मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

🎥1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

🎥1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

🎥21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

🎥युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय

🕹आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते.

🎥फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण:-

@Ravi sir

🎥फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.

🕹गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.

🎥परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

🎥विवाह:-
महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

🎥संस्थात्मक योगदान:-

🕹3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

🕹4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

🕹1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

🕹1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

🕹1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

🕹1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

🕹10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

🕹24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

🕹1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

🕹1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

🕹1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘

🕹1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

🕹1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.

🕹1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

🕹1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.

🕹1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

🕹1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

🕹अस्पृश्यांची कैफियत.

🕹शिवाजी महाराजांचा पोवाडा.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये:-

👉थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.

🎥1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

🕹1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

🎥1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.

🎥2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.

🎥ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

🕹उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

🎥सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘

🎥सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला..

=========≠=≠==========

२७ जानेवारी २०२२

Online Test Series

स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड.....

🏏 भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे.

🏏 स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता.

🏏 पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही.

🏏 भारताच्या एकाही खेळाडूला ICCच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.

🏏 स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती.

🏏 पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची ICC प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान त्याने प्रथमच पटकावला आहे. तसेच शाहीन आफ्रिदी वर्षातील सर्वात तरुण खेळाडू आहे. (वयाच्या २१व्या वर्षी)

🏏 इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूट :  ICCचा कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष)

🏏 बाबर आझम : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष)

महाराष्ट्र चित्ररथ

१. महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा (Kass Plateau) समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ (Suparba) या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे.

२. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या (Shekru) सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे (Tamhan) सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत.

३. चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या (Hariyal) प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या. शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड (mango tree) विशेष आकर्षक दिसत होते.

४. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू (butterfly) ‘ब्ल्यू मॉरमॉन’ची (Blue Mormon) आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...