१६ जानेवारी २०२२

भारताची राज्यघटना महत्त्वाचे प्रश्नसंच


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू

2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू

3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅

4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4

5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅

6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅

7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८

8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅

9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८

10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅

11. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

12. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

13. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल
४. लोकायुक्त

14. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

15. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

15. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

16. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

17. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

18. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21
२. कलम 23
३. कलम 24 ✅
४. कलम 28

19. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370
४. कलम 360

20. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र
२. राजस्थान
३. जम्मू कश्मीर
४. आंध्र प्रदेश✅

21. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?

१.19 ते 22✅
२.31 ते 35
३.22 ते 24
४.31 ते 51

22. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.

१.राष्ट्रपती✅
२.उपराष्ट्रपती
३.पंतप्रधान
४.राज्यपाल

23. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?

१.राष्ट्रपती
२ राज्यपाल
३.पंतप्रधान
४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅

24. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?

१.11 डिसेंबर 1946✅
२.29 ऑगस्ट 1947
३.10 जानेवारी 1947
४.9 डिसेंबर 1946

25. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.

१.परिशिष्ट-1
२.परिशिष्ट-2
३.परिशिष्ट-3✅
४.परिशिष्ट-4

26. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

१.47✅
२.48
३.52
४.यापैकी नाही

27. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. आंबेडकर
२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅
३.पंडित नेहरू
४.लॉर्ड माऊंटबॅटन

28. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

१.डॉ. राजेंद्रप्रसाद
२.डॉ. आंबेडकर✅
३.महात्मा गांधी
४.पंडित नेहरू

29. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?

१.लोकसभा
२.विधानसभा
३.राज्यसभा✅
४.विधानपरिषद

30. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?

१. लोकसभा सदस्य✅
२.मंत्रीमंडळ
३. राज्यसभा सदस्य
४. राष्ट्रपती

31.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?

१.322
२.324
३.326✅
४.329

32. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?
१. संसद✅
२.राज्याचे राज्यपाल
३.राष्ट्रपती
४. सर्वोच्च न्यायालय

33.खालील विधानांचा विचार करा.
अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.
ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.
क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.
ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.

वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.
१.अ,ब,क,ड
२.अ,ब,ड✅
३.अ,क,ड
४.ब,क,ड

34.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत.

या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?
१.फ्रेंच राज्यक्रांती 1789
२.रशियन राज्यक्रांती 1917✅
३.जर्मनी (वायमर संविधान)
४.जपान संविधान

35. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?

१.डॉ नागेन्द्र सिंह✅
२.जी. वी. माळवणकर
३.जगदीश चंद्र बसु
४.आर. के. नारायण

36. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?
१.कलम 11✅
२.कलम 10
३.कलम 9
४.कलम 8

37. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?
१.12 महिने
२.3 वर्ष
३.5 वर्ष✅
४.7 वर्ष

38. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?
१.राष्ट्रपती
२.पंतप्रधान
३.सर्वोच्च न्यायालय
४.संसद✅

39. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?
१.केंद्रीय मंत्रिमंडळ
२.संसद✅
३.राज्य विधिमंडळ
४.संसद आणि राज्य विधिमंडळ

40. खालील विधानांचा विचार करा.

अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.

ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.

क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.

ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.
पर्याय
१.अ,ब,क,ड✅
२.अ,ब,क
३.ब,क,ड
४.अ,ब,ड

४१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती ✅
ब) वांछू व गोस्वामी समिती
क) तारकुंडे समिती
ड) गोपालकृष्णन समिती

४२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे✅
ब) सहा वर्षे
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे

४३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅

४४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग✅

४५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य✅
क) दोन्ही
ड) यापैकी नाही

४6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?
१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
२.भारतीय राज्यघटना✅
३.माहिती व प्रसारण मंत्रालय
४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया

47) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?
१.२/३
२.१/४
३.१/३✅
४.३/४

48.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?
१. नियोजन मंत्री
२.वित्तमंत्री
३.पंतप्रधान✅
४.राष्ट्रपती

49. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?
१.राष्ट्रीय विकास परिषद
२.आंतरराज्य परिषद
३.नियोजन आयोग
४.वित्त आयोग✅

50. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?
१.जवाहरलाल नेहरू
२.सरदार पटेल✅
३.महात्मा गांधी
४.मोतीलाल नेहरू

5१) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.
१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये     २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये
३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही✅
४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास

2२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?
१) बिहार    २) किंद्रीय प्रांत ✅   ३) बॉम्बे    ४) पंजाब

3३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.
अ) एकेरी न्यायव्यवस्था    ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क) समान अखिल भारतीय सेवा
१) अ, क      २) अ, ब     ३) ब, क      ४) वरील सर्व✅

5४) योग्य क्रम निवडा
अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे     ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे
क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे     ड) संविधानाचा सन्मान करणे

5५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?
१) मूलभूत अधिकार   २) मूलभूत कर्तव्ये ✅   ३) प्रस्तावना     ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे

5६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?
१) २१  ✅   २) २२     ३) २३     ४) २४

5७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?
समिती     -     अध्यक्ष
१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद     
२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी
३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी
४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद✅

5८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?
१) भाग १     २) भाग २     ३) भाग ३     ४) भाग ४✅

5९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?
१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद  ३) डॉ. सचिदानंद सिन्हा  ✅४) पंडित जवाहरशलाल नेहरू

6०) १९३५ च्या कायद्यात कशाची तरतूद होती?
१)प्रौढ मताधिकार
२)साम्राज्य अंतर्गत शासन✅
३)सापेक्ष स्वायत्तता
४)प्रांतीय स्वायत्तता

61.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?
1. 30 वर्षे
2. 21 वर्षे
3. 25 वर्षे✅
4. 18 वर्षे

62.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?
1. मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. यापैकी नाही

63. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
1. पंतप्रधान व मुख्यमंत्री
2. राज्यपाल✅
3. राष्ट्रपती
4. मुख्य न्यायमूर्ती

64.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?
1. तहसीलदार
2. जिल्हाधिकारी✅
3. आयुक्त
4. उपजिल्हाधिकारी
 

65. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?
1. १ मे १९६०
2. १ मे १९६१
3.  १ मे १९६२✅
4.  १ मे १९६४

66. 4G Wi= Fi   (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती?
1. अकलूज
2. इस्लामपूर✅
3. मिरज
4. सांगली

67. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत
1. लोकसभा
2. पंचायतराज संस्था
3. राज्य विधिमंडले
4. यापैकी nahi✅

68. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती?
1.पाच
2. सात✅
3. नऊ
4. अकरा

69. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
1. चावडी
2. पार
3.दफ्तर
4. सजा✅

70. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?
1. तहसीलदार✅
2. उपविभागीय अधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. विभागीय अधिकारी

१५ जानेवारी २०२२

ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होणार, बूस्टर डोसही संसर्ग थांबवू शकणार नाही; आरोग्य तज्ज्ञांची माहिती



🔰गेल्या काही दिवसांपासून भारतात पुन्हा करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. तर, करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा संसर्गही देशात वाढतोय. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला.


🔰शिवाय आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, हा बूस्टर डोस देखील लोकांना ओमायक्रॉनची लागण होण्यापासून रोखू शकणार नाही, असं एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलंय.


🔰आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, “करोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही.


🔰नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमायक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमायक्रॉनची लागण झाली,” असं त्यांनी सांगितलं.


दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद ; कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा आदेश ; रेस्ताराँ-बारही बंद, घरपोच सेवांना मुभा "



🔰 दिल्लीतील करोनाचा संसर्गदर २५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे राजधानीत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अपवाद केलेल्या खासगी सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिले असून कर्मचाऱ्यांनी घरातून कार्यालयीन कामे करण्याची सूचना करण्यात आली आहे.


🔰खासगी बँका, रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित कार्यालये, बिगर बँक वित्तीय संस्था, सूक्ष्मवित्तीय पुरवठादार संस्था, वकिलांची कार्यालये, कुरिअर सेवा तसेच, अत्यावश्यक सेवांमध्ये औषधपुरवठासंदर्भातील कार्यालये-दुकाने, दूरध्वनी सेवा, मालवाहतूक व विमान सेवा यांची कार्यालये मात्र खुली राहतील. या सेवांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये जाण्याची मुभा देण्यात आली आहे.


🔰राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरातील रेस्ताराँ व बार बंद राहतील. रेस्ताराँची घरपोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. मॉल व बाजार सम-विषय तारखांनुसार खुली राहतील. रात्रीची संचारबंदी तसेच, शनिवार-रविवारची ४८ तासांची संचारबंदीही कायम राहणार आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती असून उर्वरित

डेल्टाक्रॉन, सायप्रसमध्ये सापडलेला कोरोनाचा एक नवीन प्रकार

🔰 सायप्रस विद्यापीठातील एका प्राध्यापकाने कोरोनाव्हायरसचा एक नवीन प्रकार ओळखला आहे ज्याला 'डेल्टाक्रॉन' असे नाव देण्यात आले आहे.  


🔰 डल्टा जीनोममध्ये ओमी क्रॉन सारखी जनुकीय वैशिष्ट्ये ओळखल्यामुळे या प्रकाराला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. 


🔰 डल्टाक्रॉनला अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मान्यता दिलेली नाही.


🔰 या नवीन प्रकारात डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही आवृत्त्यांचे फीचर्स दिसत आहेत.

सर्व दुकानांना मराठीत नामफलक बंधनकारक ; अन्य भाषांनाही मुभा, पण अक्षरांचा आकार मराठीपेक्षा मोठा नको

🔰राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


🔰कामगार संख्या दहापेक्षा कमी किंवा अधिक असलेल्या सर्व आस्थापने किंवा दुकानांसाठी देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आस्थापनेचा नामफलक हा मराठीबरोबरच इतर भाषेतही लिहिता येईल.


🔰परंतु, मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लिहिणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेतील नामफलकावरील अक्षरांचा आकार इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा लहान असू नये. ज्या आस्थापनेत कोणत्याही प्रकारे मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा दुकानास, बार, रेस्टॉरंटला महापुरुष किंवा आदरणीय महिलांची किंवा गड किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नयेत, असाही निर्णय घेण्यात आला आहे.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - मालविकाचा सायनावर सनसनाटी विजय

नागपूरची उदयोन्मुख बॅडिमटनपटू मालविका बनसोडने इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत गुरुवारी तिची प्रेरणास्थान असलेल्या सायना नेहवालवर सनसनाटी विजय मिळवला. मालविकासह ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांनी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.


🔰२० वर्षीय मालविकाविरुद्धच्या लढतीत सायनाने १७-२१, ९-२१ अशी हार पत्करली. जागतिक क्रमवारीत १११व्या क्रमांकावरील मालविकाने फक्त ३४ मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात आणले. आकर्षी कश्यपने केयुरा मोपाटिनला २१-१०, २१-१० असे हरवले.


🔰सिंधूने इरा शर्मावर २१-१०, २१-१० असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिची अश्मिता छलिहाशी गाठ पडणार आहे. अश्मिताने फ्रान्सच्या याईली होयॉक्सचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला.


🔰परुष एकेरीत मिथुन मंजुनाथने माघार घेतल्याने प्रणॉयला पुढे चाल मिळाली. लक्ष्य सेनने स्वीडनच्या फेलिक्स ब्यूरेस्टेडचा २१-१२, १२-१५ असा पराभव केला. कॅनडाच्या ब्रायन यँगविरुद्धची लढत समीर वर्माने दुखापतीमुळे अर्धवट सोडली.


🔰परुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने श्याम प्रसाद व एस. संजित जोडीला २१-९, २१-१८ असे पराभूत केले.

ओमायक्रॉननंतर दुसऱ्या व्हेरिएंटसाठी तयार राहा”; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींची सूचना

🔰देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.


🔰पतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला बळकटी देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असे म्हटले आहे.


🔰पतप्रधानांसोबतच्या आभासी बैठकीत गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते.

भारत-चीनदरम्यान आता पुन्हा चर्चा

🔰भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यानच्या चर्चेची चौदावी फेरी निर्णायक ठरली नाही, मात्र उर्वरित मुद्दय़ांबाबत ‘परस्परमान्य तोडगा काढण्यासाठी’ लष्करी व राजनैतिक माध्यमातून संवाद सुरू ठेवण्याबाबत दोन्ही बाजूंचे एकमत झाले.सीमाविषयक चर्चेची पुढील फेरी लवकरात लवकर व्हावी याबद्दल आपले मतैक्य झाले असल्याचे दोन्ही देशांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले.


🔰पर्व लडाखमधील पॅट्रोलिंग पॉइंट १५ (हॉट स्प्रिंग्ज) येथून सैन्य माघारी घेण्याशी संबंधित मुद्दय़ांचे चर्चेच्या १५व्या फेरीत निराकरण करण्याबाबत भारत आशावादी आहे, असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी म्हटले होते.


🔰पर्व लडाखमधील पँगाँग सरोवरावर पूल बांधल्याबद्दल भारताने चीनवर टीका केल्यानंतर चर्चेची ही ताजी फेरी पार पडली आहे. याच वेळी, हा भाग सुमारे ६० वर्षे चीनच्या अवैध कब्ज्यात असल्याचेही भारताने म्हटले होते.


🔰भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरीय चर्चेची चौदावी फेरी बुधवारी पूर्व लडाखमधील चुशुल- मोल्दो सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेच्या चीनकडील बाजूला पार पडली. दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार खात्यांचे प्रतिनधी या चर्चेदरम्यान उपस्थित होते, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.


🔰पश्चिम भागातील (लडाख सीमा) प्रत्यक्ष ताबा रेषेवरील संबंधित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी मतांचे ‘मनमोकळेपणाने व सखोल’ आदानप्रदान केले, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.आपापल्या देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याचे, तसेच उर्वरित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी काम करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.


दारु पार्टी प्रकरण बोरिस जॉन्सन यांना भोवणार? भारतीय वंशाचा ‘हा’ नेता ब्रिटीश पंतप्रधान होण्याची दाट शक्यता



🔰ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी वाढत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. सन २०२० मध्ये देशात करोना निर्बंध लागू केलेले असताना त्यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आलीय. यानंतर जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय.


🔰विरोधी पक्षाने पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय. दरम्यान ब्रिटनमधील एक प्रमुख सट्टा कंपनी असणाऱ्या ‘बेटफेअर’ने केलेल्या दाव्यानुसार या नवीन वादात अडकलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर भारतीय वंशाचे मंत्री ऋषि सुनक (Indian Origin Rishi Sunak as Next British PM Boris Johnson to Resign) यांची वर्णी पंतप्रधानपदी लागू शकते.


🔰‘बेटफेअर’ने दिलेल्या माहितीनुसार मे २०२० मध्ये करोना लॉकडाउनच्या कालावधीत पंतप्रधान कार्यालयातील डाउनिंग स्ट्रीटमध्ये झालेल्या ड्रिंक पार्टीसंदर्भात समोर आल्लेल्या माहितीनंतर बोरिस जॉन्सन अडचणीत आलेत.


🔰५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांना विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही विरोध केला जातोय, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान केलं जाऊ शकतं अशा चर्चा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.


मनरेगा प्रकल्प महाराष्ट्र.


🅾देशात ग्रामीण मजुरांना अकुशल रोजगाराची हमी 1977 पासून कायद्यान्वये देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य.

🅾भारत सरकारने ग्रामीण रोजगाराचे विविध कार्यक्रम (जवाहर रोजगार योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना इ.) निधीच्या उपलब्धतेनुसार राबविले होते मात्र या कार्यक्रमात रोजगाराची हमी नव्हती, तर फक्त रोजगारांची उपलब्धता होती.

🅾महाराष्ट्राचा रोहयो कायदा, त्याची यशस्वी अंमलबजावणी, माहितीच्या अधिकाराचा कायदा व सद्यस्थितीच्या अनुषंगाने अभ्यास करुन केंद्रशासनाने संपुर्ण देशासाठी दिनांक 5 सप्टेंबर 2005 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अमलात आणला.

🅾संपूर्ण देशातील ग्रामीण कुटुंबांना वित्तीय वर्षात 100 दिवस प्रती कुटुंब अकुशल रोजगाराचा हक्क प्राप्त.

🅾राष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी दिनांक 2 फेब्रुवारी 2006 पासून टप्प्याटप्प्याने सुरु व दिनांक 1 एप्रिल 2008 पासून देशातील सर्व जिल्हयांचा समावेश.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक

🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ

🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
                  एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन

🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
                  इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल

🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
                  इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स

🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स

🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
                  इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स

🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स

लाव्हाचे प्रकार

1) बेसिक लाव्हा -

- अतिशय तप्त (1000 डिग्री सेंटिग्रेड पेक्षा जास्त)
-जास्त जलद वाहणारा, कमी विस्मयकारकता
- गडद रंगाचा उदा- बेसाल्ट
-Mg, Fe, ने समृद्ध
- सिलिका चे प्रमाण कमी
- बाहेर पडताना जास्त आवाज करत नाही (not very explosive)
- जास्त वाहकता असल्यामुळे 50 किमी/ तास या वेगानेही पूढे जाऊ शकतात
-सिलिका चे प्रमाण कमी असल्यामुळे कमी वेगाने थंड होतो; म्हणजेच जास्त वेळ आहे त्याच (melted ) स्थितीत राहतो
- यापासून तयार होणारा ज्वालामुखी/ आकार हा पृष्ठभागावर जास्त पसरतो (gently sloping)

2) असिडीक लाव्हा

-  जास्त viscocity असते
-फिकट रंगाचा आणि कमी घनतेचा
-सिलिका चे प्रमाण जास्त (65-80%)
-यापासून तयार होणारा कोन हा मोठ्या चढाचा (steep sized) असतो कारण हा उद्रेकानंतर लवकर थंड होणारा आहे
-बाहेर पडताना जास्त मोठ्याने आवाज करतो (loud explosions)

# ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्थानावरून लॅक्रोइक्सने ज्वालामुखीचे एकूण चार प्रकार पडले आहेत.

1) हवाईयन प्रकार : हे ज्वालामुखी शांत प्रकारचे असतात. विस्फोटक प्रकारचा उद्रेक होत नाही. शिलारस अतिशय पातळ असतो. वायू जास्त प्रमाणात बाहेर पडत नाही. याला "पिलेज  हेअर" असेही म्हणतात

2)स्ट्रॉम्बोलियन प्रकार : या प्रकारचे ज्वालामुखी विस्फोटक प्रकारचे असतात. शिलारस बेसिक प्रकारचा असतो.

3)व्हलकॅनिक प्रकार : स्ट्रॉम्बोलियन बेटाच्या जवळ असलेल्या लिपाली बेटावरील व्होलकॅनो यावरून हा ज्वालामुखी ओळखला जातो. विस्फोटक स्वरूपाचा ज्वालामुखी. घट्ट स्वरूपाचा शिलारस. ज्वालामुखीच्या वर काळ्या रंगाचे ढग जमतात.

4)पिलियन प्रकार : जगातील सर्वाधिक विस्फोटक प्रकारचा ज्वालामुखी. या ज्वालांचे प्रतिबिंब सभोवतालच्या ढगांवर पडून भयानक देखावा दिसतो.

सिंधु संस्कृतीचा शोध

◾️  सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या. 

◾️  सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय. 

◾️  ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते. 

◾️ आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. 

◾️ आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.

चंद्रगुप्त पहिला

 हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे.

☘  चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.

🌷   चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो  .

☘   चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .

🌷  वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई.

☘  लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला  . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला.

🌷  चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय  .

🍂🍂☘☘🍂🍂☘☘🍂🍂☘☘🍂🍂☘

हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली

भारतीय रेल्वेचा इतिहास

◾️भारतातल्या रेल्वे सेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

◾️भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

◾️1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार

हैदराबादची निझाम रेल्वे,
ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला.

'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे,

राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला.

उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे,
बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली.

अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली.

'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

◾️आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)   १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)   १८५८ राणीचा जाहीरनामा
८)   १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)   १८६० इंडियन पिनल कोड
१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)   १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)   १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)   १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)   १८८७ कुळ कायदा
१६)   १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)   १८९९ भारतीय चलन कायदा
१८)   १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)   १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)   १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१)   १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)   १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)   १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)   १९१९ रौलेक्ट कायदा
२५)   १९३५ भारत सरकार कायदा
२६)    १९४४ राजाजी योजना
२७)    १९४५ वेव्हेल योजना
२८)   १९४५ त्रिमंत्री योजना
२९)   १९४७ माउंटबॅटन योजना
३०)   १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

वित्तीय समित्या

१) 🌺लोकअंदाज समिती/प्रकलन समिती🌺

जॉन मथाई यांच्या शिफारशीने - 1950 मध्ये स्थापन
रचना 30 सदस्य - सर्व लोकसभेमधूनच
सर्व पक्षांना प्रतिनिधीत्व
मंत्री सदस्य नाही.
अध्यक्षांची नेमणुक-लोकसभा अध्यक्षांकडून
अध्यक्ष नेहमी सरकारी पक्षातीलच
कार्य- अर्थसंकल्पीय खर्चाच्या अंदाजाची
मितव्यायिता सुचविणे.

२) 🌺लोकलेखा समिती-🌺
रचना-22 सदस्य (15 लोकसभा+7 राज्यसभा)
एका वर्षासाठी सदस्यांची निवड
मंत्री सदस्य नसतात.
लोकसभेतील एका सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांकडून अध्यक्ष म्हणून निवड.
1967-68 नंतर अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षातील
CAG च्या अहवालांची तपासणी करण्याचे कार्य.
समितीला कार्य पार पाडतांनी महालेखापरिक्षक वेळोवेळी मदत
करतात म्हणून त्यांना लोकलेखा समितीचे कान, डोळे, मित्र,
मार्गदर्शक व तत्वज्ञ असे म्हणतात.

३) 🌺सार्वजनिक उपक्रम समिती-🌺
1964- मध्ये कृष्ण मेनन यांच्या शिफारशीने स्थापन
सदस्य संख्या 22- (15 लोकसभा+7 राज्यसभा)
एका वर्षासाठी
मंत्री सदस्य बनू शकत नाही.
लोकसभेतील सदस्याची लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत अध्यक्ष
म्हणून नेमणुक.
कार्य-सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखे तपासणे.

.
४) 🌺विभागीय स्थायी समित्या-🌺

कार्यकारी मंडळाची संसदेप्रती अधिक जबाबदारी साध्य करण्याच्या उद्देशाने स्थापना.
एकूण समित्या-24
रचना-एक विभागीय स्थायी समिती एक/अधिक मंत्रालय/
विभागासाठी कार्य करतात.
प्रत्येक समितीत 31 सदस्य पैकी 21 लोकसभेतून (अध्यक्षांमार्फत)
तर 10 राज्यसभेतून (सभापतींमार्फत)
अध्यक्षाची नेमणुक संसदेचे पिठासीन अधिकारी करतात.
मंत्री सदस्य नाही .

१) कामकाज सल्लागार समिती-
कार्य-सभागृहामध्ये कामकाजाचे नियंत्रण करण्याचे कार्य पार
पाडणे.
नवीन लोकसभेच्या आरंभी स्थापना- तेथून समोर एक वर्षासाठी -
साधारणतः दरवर्षी जूनमध्ये स्थापना.
लोकसभेत अध्यक्षांमार्फत स्वतःसहीत 15 तर राज्यसभेत
सभापतींमार्फत स्वतःसहीत 1 1 सदस्य नामनि्देशीत
दोन्ही सभागृहात स्वतंत्र समित्या

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...