१५ जानेवारी २०२२

NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय आहे!...

NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय आहे!...
----------------------------------
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS? त्याचं महत्त्व काय? आणि नेमका त्यांच्यामधील फरक काय?

जाणून घेऊया.....

भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत, ज्यातील प्रमुख प्रक्रिया आहेत-

▪१. National Electronic Fund Transfer – NEFT
▪२. तात्काळ पैसे पाठवणे (Real Time Gross Settlement – RTGS
▪३. Immediate Payment Service – IMPS

◾आपण आता या तिन्ही प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे जाणून घेऊया:

🔺१. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT)
ही भारतातील सर्वात प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणालीपैकी एक आहे. ही प्रणाली नोव्हेंबर २००५ मध्ये सुरु करण्यात आली. या पद्धतीने पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत, या प्रणालीमध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. ही सुविधा देशाच्या ३०००० बँकांमध्ये उपलब्ध आहे.

🔺२. रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)
भारतीय RTGS प्रणाली महिन्याच्या केवळ १६ दिवसात देशाच्या जीडीपी एवढी देवाण – घेवाण करते. RTGS च्या माध्यमातून मोठमोठी देवाणघेवाण केली जाते. देशातील ९५% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे १९८५ पर्यंत केवळ ३ देश ही पद्धत वापरत असतं, पण आज जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात. RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.

🔺३. इमीडेट पेमेंट सर्विस (IMPS)
ही सेवा भारतामध्ये २२ नोव्हेंबर २०१० रोजी सार्वजनिकरीत्या सुरु करण्यात आली होती. या सेवेमार्फत एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. एकीकडे NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या २४ तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते.

◾NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे?

🔺१. NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.

🔺२. NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत कमी २ लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.

🔺३. NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो, पण RTGS मधून पैसे लगेच हस्तांतरीत होतात.

🔺४. NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.

🔺५. ट्रान्सफरसाठी आकारण्यात येणारे शुल्क :

◾NEFT मध्ये आकारण्यात येणारे शुल्क

▪१ लाखांपर्यंत आकारण्यात येणारे शुल्क:- ५ रुपये + सेवा कर

▪१ लाखापेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमीसाठी आकारण्यात येणारे शुल्क :- १५ रुपयापेक्षा जास्त नाही + सेवा कर

▪२ लाखापेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- २५ रुपयापेक्षा जास्त नाही+सेवा कर

◾RTGS मध्ये लागणारे शुल्क :

▪२ लाख रुपये ते ५ लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ३० रुपये

▪५ लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :- प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ५५ रुपये...

#IMPS #NEFT #RTGS #India #ट्रान्सफर #Fund

मराठी व्याकरण झाले सोपे व मजेशीर - पोलीस भरती स्पेशल

    पोलीस भरतीत सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा घटक कोणता ? असे विचारले तर, मराठी व्याकरण असे ठाम पणे सांगता येईल. जर मराठी व्याकरण सोप्या पद्धतीने अभ्यासले तर, आपण नक्कीच पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतो.
    या लेखात, मी तुम्हाला एकदम सोप्या पध्दतीने मराठी व्याकरण कसे अभ्यासतात ते सांगणार आहे. सुरवात करण्यापूर्वी तुम्हास आवर्जून सांगू इच्छितो की, सोप्या व सहज पद्धतीने मराठी व्याकरण शिकायचे असेल तर माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक नक्की वाचून पहा, जे की सर्व बुक सेंटर वर उपलब्ध आहे. ते नक्कीच तुम्हाला संजीवनी बनून यशस्वी बनवेल.
     आज आपण अलंकार व त्यातील शब्दालंकार कसा सोप्या पद्धतीने केला जाऊ शकतो ते पाहणार आहोत. आपण प्रत्येक अलंकार हा त्याच्या अर्थनुसार एका व्यक्तीशी तुलना करून अभ्यासाला तर किती मजेशीर व सोपे होईल, ते पुढे वाचल्यानंतर समजून येईल.

अलंकार :- कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार होय.
अलंकाराचे दोन प्रकार पडतात :- 1. शब्दालंकार  व  2. अर्थालंकार
1. शब्दालंकार :- जेव्हा पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती होत असेल व त्यामुळे नादमाधुर्य निर्माण होत असेल, तेव्हा अशा शाब्दिक चमत्कृती साधण्यास शब्दालंकार असे म्हणतात.
( थोडक्यात - शब्दालंकारात शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती होते ).
शब्दालंकार याचे परत 3 प्रकार पडतात - 1.1 यमक , 1.2 श्लेष , 1.3 अनुप्रास
1.1 यमक :- कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने परंतु उच्चारात समानता असेल व त्यामुळे नाद निर्माण होऊन कवितेच्या चरणाला सौंदर्य प्राप्त होत असेल तर यमक हा शब्दालंकार होतो.
★ यमक अलंकार याची तुलना आपण रामदास आठवले सर यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत त्यांच्या कविते सारखे चरणे विचारले की, डोळे झाकून आपण यमक अलंकार हा पर्याय निवडतोल.
■ यमक अलंकार ट्रिक्स :- जसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक...! 
जसे भाजीला चव येण्यास टाकावे लागते नमक...!!
तसेच समान उच्चाराचे शब्द आले की होतो यमक...!!
( रामदास आठवले सरांचे बोलणे हे नेहमी यमक अलंकारात असते )            

1.2 श्लेष :- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
★ श्लेष अलंकार याची तुलना आपण दादा कोंडके यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच शब्दाचे दोन अर्थ निघत असतील तर आपण डोळे झाकून श्लेष अलंकार हा पर्याय निवडतोल.
■ श्लेष अलंकार ट्रिक्स :-  दादा  कोंडके  यांचे  बोलणे  म्हणजे  श्लेष  अलंकार  असतो.
दादा कोंडके यांच्या बोलण्यातून जसे दोन अर्थ निघतात, तसेच श्लेष अलंकारात देखील एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरला जातो.
( दादा कोंडकेंचे सिनेमा पहा म्हणजे श्लेष अलंकार केव्हाच विसणार नाहीत )   

1.3 अनुप्रास :- कवितेच्या चरणात किंवा वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
★ अनुप्रास अलंकार याची तुलना आपण शाहरुख  खान यांच्याशी करूया, जेणे करून परीक्षेत विचारलेल्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असताना दिसली की, आपण डोळे झाकून अनुप्रास अलंकार हा पर्याय निवडतोल.
■ अनुप्रास अलंकार ट्रिक्स :- शाहरुख  खान  बोलण्यास  प्रयास  करतो,  त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात.  ( प्रयास = अनुप्रास )
जसे अनुप्रास अलंकारात वाक्यात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते व नाद निर्माण होतो, तसेच शाहरुख खान देखील एकच अक्षर परत परत बोलण्याचा प्रयास करत असतो.
डर सिनेमातील शाहरुख खानचा डायलॉग :- क...क...क...क...किरण...!   

      बाकी अलंकार अशाच मजेशीर स्वरूपात आपण पाहणार आहोत. अधिक माहिती साठी, तुम्ही माझे शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तक अभ्यासू शकता ज्यामध्ये सर्व घटक मजेशीर स्वरुपात समाविष्ट केलेले आहेत, पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. आगामी पोलीस भरतीत आशा प्रकारे स्मार्ट पद्धतीने अभ्यास केलात तर, यश नक्कीच तुमच्या पायाशी लोटांगण घालेल यात काहीच शंका नाही...!

संपूर्ण मराठी व्याकरण 30 प्रश्न

1) “जो अत्यंत खर्चिक असतो तो” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) उधळया    2) कंजूष     
   3) दानशूर    4) चिकट

उत्तर :- 1

2) खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा.

   1) निर्भत्सना    2) नि:र्भत्सना   
   3) नीभर्त्सना    4) निर्भर्त्सना

उत्तर :- 4

3) आपल्या तोंडावाटे निघणा-या मूलध्वनींना काय म्हटले जाते ?

   1) अक्षर    2) वर्ण     
   3) पद      4) वाक्य

उत्तर :- 2

4) निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

   1) नि: + कपट    2) निष् + कपट   
   3) निष्क + पट    4) न: क + पट

उत्तर :- 1

5) ‘या वयात तुला असे बोलणे शोभत नाही ?’ – या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

   1) भाववाचक नाम    2) विशेष नाम   
   3) धातुसाधित नाम    4) सामान्य नाम

उत्तर :- 3

6) खाली दिलेल्या वाक्यांतून ‘सार्वनामिक विशेषण’ असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.

   1) प्रभाला आता साठावे वर्ष लागले      2) रत्नाला आठवीचा वर्ग शिकविण्यासाठी आला
   3) आक्काला चौदा भाषा येतात      4) तिच्या सर्व साडया म्हणजे भरजरी शालूच आहे

उत्तर :- 4

7) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे  ?

   1) प्रायोजक क्रियापद    2) शक्य क्रियापद   
  3) अनियमित क्रियापद    4) गौण क्रियापद

उत्तर :- 2

8) अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

     वाहन सावकाश चालवावे.
   1) रीतीवाचक    2) निश्चयार्थक   
   3) स्थलवाचक    4) सातत्यदर्शक

उत्तर :- 1

9) शाळेतील विद्यार्थ्यांपैकी रमेश हुशार आहे. (शब्दाची जात ओळखा)

   1) शब्दयोगी अव्यय    2) उभयान्वयी अव्यय 
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) यापैकी  नाही

उत्तर :- 1

10) ‘चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात ?

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
   3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय      4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

1) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?

      ‘विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला’

   1) उत्तीर्ण    2) परीक्षेत    3) झाला      4) विश्वाय

उत्तर :- 4

2) पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा.

      ती मुलगी चांगली गाते.

   1) मुलगी    2) ती      3) गाते      4) चांगली

उत्तर :- 2

3) हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. – अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.

   1) साधित विशेषण    2) परिणाम दर्शक विशेषण
   3) नामसाधित विशेषण    4) अविकारी विशेषण

उत्तर :- 3

4) ‘मला आता काम करवते’ या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

   1) शक्य क्रियापद  2) प्रयोजक क्रियापद  3) अनियमित क्रियापद  4) साधित क्रियापद

उत्तर :- 1

5) जोडया जुळवा.

   अ) नामसाधित क्रियाविशेषणे    i) निजल्यावर, खेळताना
   ब) विशेषणसाधित क्रियाविशेषणे     ii) दररोज, शास्त्रदृष्टया
   क) धातुसाधित क्रियाविशेषणे    iii) सकाळी, प्रथमत:
   ड) समासघटित क्रियाविशेषणे    iv) मोटयाने, सर्वत्र

  अ  ब  क  ड

         1)  iii  iv  i  ii
         2)  iii  i  iv  ii
         3)  iv  ii  iii  i
         4)  i  iii  iv  ii
उत्तर :- 1

6) आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागतो. या वाक्यातील ‘आणि’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?

   1) विकल्पबोध अव्यय    2) समुच्चबोध अव्यय   
   3) न्यूनत्वबोध अव्यय    4) शब्दयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) खालीलपैकी किती आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यये आहे.

     ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्या

   1) पाच      2) तीन     
   3) सर्व      4) चार

उत्तर :- 3

8) ‘सुधाने निबंध लिहला असेल’ या वाक्याचा काळ ओळखा.

   1) रीती भविष्यकाळ    2) पूर्ण भविष्यकाळ 
   3) अपूर्ण भविष्यकाळ    4) साधा भविष्यकाळ

उत्तर :- 3

9) ‘बछडा’ या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) वाघीण    2) बछडी     
   3) भाटी    4) हंसी

उत्तर :- 2

10) करण म्हणजे ...........................

   1) क्रियेचे साधन किंवा वाहन    2) क्रियेचा आरंभ
   3) क्रियेचे स्थान        4) वरील कोणताही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 1

1) खाली दिलेल्या वाक्यांतून ‘सार्वनामिक विशेषण’ असलेल्या वाक्याचा योग्य पर्याय लिहा.

   1) प्रभाला आता साठावे वर्ष लागले      2) रत्नाला आठवीचा वर्ग शिकविण्यासाठी आला
   3) आक्काला चौदा भाषा येतात      4) तिच्या सर्व साडया म्हणजे भरजरी शालूच आहे

उत्तर :- 4

2) त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे  ?

   1) प्रायोजक क्रियापद    2) शक्य क्रियापद   
  3) अनियमित क्रियापद    4) गौण क्रियापद

उत्तर :- 2

3) अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

     वाहन सावकाश चालवावे.
   1) रीतीवाचक    2) निश्चयार्थक   
   3) स्थलवाचक    4) सातत्यदर्शक

उत्तर :- 1

4) शाळेतील विद्यार्थ्यांपैकी रमेश हुशार आहे. (शब्दाची जात ओळखा)

   1) शब्दयोगी अव्यय    2) उभयान्वयी अव्यय 
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) यापैकी  नाही

उत्तर :- 1

5) ‘चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.’ या वाक्यातील ‘म्हणून’ या अव्ययास काय म्हणतात ?

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
   3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय      4) कारणबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

6) पुढील शब्द कोणत्या शब्दजाती मधील आहे? – ‘वावा’

   1) सर्वनाम      2) शब्दयोगी अव्यय   
   3) उभयान्वयी अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 4

7) खालील वाक्याचा काळ ओळखा. – हरीने आंबा खाल्ला.

   1) वर्तमानकाळ    2) भूतकाळ   
   3) भविष्यकाळ    4) पूर्ण भूतकाळ

उत्तर :- 2

8) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो.

   1) मजा    2) ढेकर     
   3) तंबाखू    4) सर्व

उत्तर :- 4

9) विभक्तीचे मुख्य कारकार्थे किती आहेत  ?

   1) आठ    2) सात     
   3) पाच      4) सहा

उत्तर :- 4

10) “समाजात विषमता असू नये” – या वाक्याचा पुढीलपैकी होकारार्थी पर्याय निवडा.

   1) समाजात समानता नसावी    2) समाजात समानता असावी
   3) समाजात विषमता आहे    4) समाजात विषमता असावी

उत्तर :- 2

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

   1) पाटील    2) सोमवार    3) श्रीमंत      4) पौरुषत्व

उत्तर :- 4

2) ‘हा-ही-हे’, ‘तो-ती-ते’, ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे होत ?

   1) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे      2) संबंधी सर्वनामे
   3) प्रश्नार्थक सर्वनामे        4) दर्शक सर्वनामे

उत्तर :- 4

3) अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.

     ‘राम एकवचनी राजा होता.’

   1) नामसाधित क्रियापद      2) प्रयोजक क्रियापद
   3) सर्वनामिक क्रियापद      4) समासघटित विशेषण

उत्तर :- 4

4) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
     मला आता काम करवते.

   1) शक्य क्रियापद    2) भावकर्तृक क्रियापद   
   3) अनियमित क्रियापद    4) साधे क्रियापद

उत्तर :- 1

5) क्रियाविशेषण अव्यये ही :

   अ) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात.    ब) क्रियाविशेषण विकारी असतात.
   क) एका वाक्याची दुस-या वाक्याशी सांगड घालतात.
   1) फक्त अ बरोबर    2) फक्त क बरोबर   
   3) अ आणि ब बरोबर    4) अ आणि क बरोबर

उत्तर :- 3

6) अचूक विधाने निवडा.

   अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

   1) फक्त अ अचूक    2) फक्त ब अचूक   
   3) दोन्ही अचूक      4) दोन्ही चूक

उत्तर :- 3

7) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) न्युनत्वबोधक      4) परिणामबोधक

उत्तर :- 2

8) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
      वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.

   1) चार      2) पाच      3) तीन      4) एक

उत्तर :- 1

9) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.

   1) मी निबंध लिहिला    2) मी निबंध लिहित जाईन
   3) मी निबंध लिहित असेन  4) वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 3

10) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) पंडिता    2) विदुषी      3) हुषार      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

Online Test Series

१२ जानेवारी २०२२

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्यानंतर 'ब्लू बुक' प्रसिद्धीच्या झोतात आले.

🔰 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र यांच्या सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे.  गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंजाबमधील हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवला.  पीएम 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकले होते.  पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक होती.

🔰मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, निदर्शनांबाबत माहिती होते, तरीही पंजाब पोलिसांनी 'ब्लू बुक' नियमांचे पालन केले नाही.  स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या ब्लू बुकमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत.

🔴 ब्लू बुक म्हणजे काय? 

🔰 ब्लू बुक हा मार्गदर्शक तत्त्वांचा एक संच आहे, ज्यामध्ये व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेबाबत पाळल्या जाणाऱ्या नियमांची माहिती लिहिली जाते. 

🔰 सध्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असून एसपीजीच्या ब्लू बुकनुसार पंतप्रधानांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.  या ब्लू बुकमध्ये पीएम सिक्युरिटीमध्ये पाळल्या जाणार्‍या मार्गदर्शक तत्त्वांची संपूर्ण माहिती लिहून त्यानुसार प्रोटोकॉल ठरवला जातो. 

🔰या कारणामुळे पंजाब पोलिसही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.  पिवळे पुस्तक काय होते?  ब्लू बुक व्यतिरिक्त एक यलो बुक देखील आहे, ज्यामध्ये व्हीआयपींच्या सुरक्षेची माहिती असते.  जसे खासदार आणि मंत्र्यांना कशी सुरक्षा दिली जाईल आणि त्यांच्या सुरक्षेची काय व्यवस्था असेल, हे यलो बुकमध्ये माहिती आहे. 

🔴 SPG म्हणजे काय?

🔰स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ही देशाची सशस्त्र दल आहे.  भारत सरकारचे हे मंत्रिमंडळ देशाचे पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांसह त्यांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांना सुरक्षा प्रदान करते.  लष्कराच्या या युनिटची स्थापना संसदेच्या कायद्याच्या कलम 1 (5) अंतर्गत 1988 मध्ये करण्यात आली. 

🔴 ऐतिहासिक पार्श्वभूमी

🔰 1981 पूर्वी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलाकडे होती.  पण 1981 मध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरोने स्पेशल टास्क फोर्स (Special Task Force STF) कडे सोपवली होती. 

🔰1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर या विशिष्ट गटाने पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, असे ठरले होते.  यासाठी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत बिरबल नाथ समितीची स्थापना करण्यात आली.  या समितीने 1985 मध्ये स्पेशल प्रोटेक्शन युनिट (SPU) स्थापन करण्याची शिफारस केली होती. 

🔰 सन 1988 मध्ये, संसदेचा विशेष संरक्षण गट कायदा, 1988 (विशेष संरक्षण गट कायदा) पारित करण्यात आला आणि SPU चे नाव बदलून SPG करण्यात आले.

'चित्ता' भारतात परत आणण्यासाठी कृती योजना.

🔰 1952 मध्ये नामशेष झाल्यानंतर, केंद्र सरकारने 5 जानेवारी 2022 रोजी 'चित्ता' भारतात परत आणण्यासाठी कृती योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत पुढील पाच वर्षांत सुमारे 50 चित्ते देशात आणले जातील. .

🔰  कृती आराखड्यानुसार, पहिल्या वर्षात सर्व 'चित्ता' नामिबिया किंवा दक्षिण आफ्रिकेतून आणले जातील.  जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी, चित्ता, नोव्हेंबर 2021 मध्ये मध्य प्रदेशात पुन्हा आणण्याची योजना होती, परंतु महामारीमुळे ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. 

🔰 1952 साली भारतातून चित्ता नामशेष झाला हे विशेष.  देशातील चित्ता नामशेष होण्यामागे दोन विशिष्ट कारणे होती.  पहिला- चित्ता प्राण्यांच्या शिकारीसाठी पाळीव केला जातो आणि दुसरे म्हणजे, चित्ता बंदिवासात असताना त्यांची पैदास होत नाही. 

🔰 वाघ आणि सिंहांपेक्षा वेगवान आणि कमी हिंसक असल्यामुळे ते ठेवणे सोपे होते.  तत्कालीन राजे आणि जमीनदार यांनी शिकारीसाठी याचा वापर केला होता.

चिनी यानाकडून चंद्रावरील पाण्याचा थेट पुरावा

🔰चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते, याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा चीनच्या चँग-५ यानास आढळला आहे. यातून पृथ्वीचा हा उपग्रह शुष्क कसा बनला, हे समजून घेणे शक्य होणार आहे.

🔰याबाबतचा अभ्यास शनिवारी सायन्स अ‍ॅडव्हान्सेस या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार चीनचे हे चांद्रयान चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले, तेथील पृष्ठभागावरील मातीमध्ये १२० पीपीएमपेक्षा कमी पाणी आहे. हे प्रमाण एक टन मातीमध्ये १२० ग्रॅम पाणी इतके आहे. त्याचप्रमाणे तेथील हलक्या सच्छिद्र खडकामध्ये १८० पीपीएमपेक्षा कमी पाणी दिसून आले आहे.

🔰पृथ्वीच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या तुलनेत चंद्राचा पृष्ठभाग फारच शुष्क आहे.  चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे अस्तित्व हे दूरवरून निरीक्षणातून निश्चित करण्यात आले असले तरी, या यानाने आता चांद्रभूमीवरील खडक आणि मातीमध्ये पाणी असल्याच्या खुणा शोधून काढल्या आहेत. या यानावरील एका साधनाद्वारे पृष्ठभागावरील माती आणि खडकांची स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स तपासणी करून त्याच वेळी पाण्याचे अस्तित्व शोधून काढले. हे प्रथमच घडले आहे.

🔰काही विशिष्ट काळात चंद्राच्या बाह्य आवरणातील पाणीसाठे हे वाफेच्या स्वरूपात उडून गेल्याने चांद्रभूमी ही कोरडी होत गेली असावी, असे या अभ्यासातून पुढे येत आहे.

भारतातील चलनवाढीची कारणे

◾️तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे

◾️ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो

◾️ परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.

◾️ ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.

◾️ परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.

◾️ काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.

◾️ या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...