२६ डिसेंबर २०२१

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

महाराष्ट्राची विधानपरिदषद

- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली.
- परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्ये पार पडली.
- 1960 पासून हिवाळी अधिवेशन (ऑक्टो नोव्हें) नागपूर येथे होते.
- 1987 मध्ये परीषदेला 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
- 2000 पासून 22 जुलै हा दिवस महाराष्ट्र विधानपरिषदेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
---------------------------------------
● सदस्य संख्या

- 1937 मध्ये 29, 1957 मध्ये 108 करण्यात आली तर वेगळ्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही सदस्य संख्या 78 करण्यात आली. यापैकी -
30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे
22 सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे
07 सदस्य पदवीधर आणि शिक्षकांद्वारे
12 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात.
- गणपूर्तीसाठी कमीत कमी 10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.
--------------------------------------
● सभापती

- पहिले सभापती: मंगलदास मच्छाराम पक्वासा (22 जुलै 1937 ते 16 ऑगस्ट 1947)
- सध्या: रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर
- आजपर्यंत एकही महिला सभापती झाली नाही.
----------------------------------------
● उपसभापती

- पहिले उपसभापती: आर. जी. सोमण (22 जुलै 1937 ते 16 ऑक्टोबर 1947)
- पहिल्या महिला उपसभापती: जे. टी. सिपाहिमलानी (19 ऑगस्ट 1955 ते 24 एप्रिल 1962)
- सध्या: नीलम गोर्हे

राज्यसभा.

🅾राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.

🧩सभासदांची संख्या :

🅾घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.

🧩उमेदवारांची पात्रता :

🅾घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

🧩निवडणूक पद्धत :

🅾राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.

🧩राज्यसभेचा कार्यकाल :

🅾राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.

🧩सभासदांचा कार्यकाल :

🅾प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.

🧩पदमुक्तता :

🅾कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

🧩बैठक किंवा आधिवेशन :

🅾घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.

🧩गणसंख्या :

🅾कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

🧩राज्यसभेचा सभापती :

🅾घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.

🧩उपाध्यक्ष :

🅾राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.

🦋 🦋 🦋  🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋  🦋

🔶राज्य व केंद्रशासित प्रदेशमध्ये काय फरक आहे?

✍केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पूर्नरचनेचा निर्णय घेतल्यामुळे आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश होतील. सद्यस्थितीत भारतात 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. मात्र आता जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे.

✍शिवाय लडाख देखील जम्मू-काश्मीरपासून विभक्त करून त्याला देखील केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे. असे असले तरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात नेमका काय फरक आहे? याबाबत अनेकांना माहित नसते. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊ... 

🔴राज्य म्हणजे काय? :

● हे भारतीय राज्यघटने अंतर्गत येणारा एक घटक असून ज्याचे स्वतंत्र असे सरकार आहे.
● हे सरकार 'राज्य सरकार' म्हणून ओळखले जाते. या सरकारची निवड जनता मतांद्वारे करते.
● राज्यांना आपले कायदे तयार करण्याचे व त्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार असतात.
● प्रत्येक राज्याला स्वतंत्र विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो. या ठिकाणी राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात असतात.

🔴 केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? :

● केंद्रशासित प्रदेश हा एक छोटा प्रशासकीय घटक असतो. ज्यावर केंद्र सरकाचे नियंत्रण असते.
● या ठिकाणी थेट केंद्र शासनाचे नियम लागू असतात.
● या नियमांची अंमलबजावणी उपराज्यपालांच्या माध्यमातून होत असते.
● उपराज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, त्यांची निवड केंद्र सरकार करत असते.
● केंद्रशासित प्रदेशांच्यावतीने संसदेचे उच्च सभागृह म्हणजेच राज्यसभेत नवी दिल्ली आणि पुदुचेरी सोडले तर कोणतेही प्रतिनिधीत्व नसते.

मूलभूत अधिकार/हक्क.


🅾भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे.

🅾 घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे.

🅾 म्हणून सध्या 6 अधिकार आहेत.

1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18

2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22

3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24

4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28

5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30

6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार - कलम 32

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राज्य मानवी हक्क आयोगाची रचना.

🅾राज्य सरकार, राज्य आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करील.

🧩 राज्य मानवी हक्क आयोगामध्ये-

🅾अध्यक्ष - उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश

🅾 एक सदस्य - उच्च न्यायालयाचा विद्यमान किंवा माजी न्यायाधीश किंवा किमान 7 वर्षे अनुभव असलेला जिल्हा न्यायाधीश

🅾 एक-दोन सदस्य - मानवी हक्कांसंबंधी ज्ञान किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्ति

🅾सचिव हा आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल.

🅾 राज्य आयोगाचे मुख्यालय राज्यशासन विनिर्दिष्ट करेल अशा ठिकाणी असेल.

🅾राज्य आयोगाच्या अध्यक्षांची व सदस्यांच्या नेमणुका:

🅾अध्यक्षांची नेमणूक राज्यपाल पुढील समितीच्या शिफारशिनुसार करतील.

🧩समितीची रचना -

🅾मुख्यमंत्री - सभाध्यक्ष

🅾विधान मंडळाचा अध्यक्ष - सदस्य

🅾त्या राज्याच्या गृहविकासाचा प्रभारी मंत्री - सदस्य

🅾विधानसभेतील विरोधी पक्षनेता - सदस्य

🅾ज्या राज्यात विधानपरिषद असेल त्या ठिकाणी त्याचा सभापती व विरोधी पक्षनेता - सदस्य

🅾राज्य आयोगाच्या सभाध्यक्षांची किंवा सदस्यांची नोंदणी आणि त्यांना पदावरून दूर करणे:

🅾 राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य राज्यपालांना उद्देशून त्याच्या पदाचा राजीनामा देवू शकेल.

🅾 तसेच अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील कारणावरून पदावरून दूर करता येईल .

🅾अभिनिर्णीत नादार असेल; किंवा -

🅾 त्याने लाभाचे पद धारण केले आहे ; किंवा

🅾मानसिक किंवा शारीरिक अस्वास्थ्य  ; किंवा

🅾 राष्ट्रपतींच्या मते नैतिक अध : पतनाचा अंतर्भाव आहे अशा अपराधासाठी दोषी ठरविलेली व्यक्ती.

🅾राज्य आयोगाच्या अध्यक्षाचा आणि सदस्याचा पदावधी:

🅾 अध्यक्षांचा कार्यकाल - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत.

🅾 पुनर्नियुक्ति होवू शकते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

संसदेविषयी महत्त्वाची माहीती.

◆ एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.

◆ संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.

◆ नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.

◆  राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

◆ घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.

◆  संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.

◆ जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.

◆ विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.

◆ करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.

◆ सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.

◆ वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.

◆ विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.

◆ वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.

◆ वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.

◆ सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात. टेलिग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.

◆ लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.

◆ लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.

◆ आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.

◆ राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.

◆ राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.

◆ लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

विज्ञान :- अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात

  🔹इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध  लावला.

🔹 सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.

 🔹सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.

🔹  सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.

🔹 अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.

🔹  केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.

🔹 केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.

🔹   पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते. आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे.
(1 pm = 10 -12 m)

🔹 अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u)

🔹   इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.

🔹    इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.

🔹 प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.

🔹न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.

🔹  भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या

🔹  KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.

🔹कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.

🔹   हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.

🔹 अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.

🔹   संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे.

🔹   अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.

🔹 ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.

निशाचर प्राणी कसे जगतात ?

◼दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी.

◼यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते.

◼प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो.

◼नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.

◼स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी.
,
◼एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात.

◼यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.

◼अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.

◼अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो.

◼ पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.

◼घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात.

◼बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.

◼निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.

नत्रवायू किंवा नत्र:नत्रवायू


▪️नत्रवायू किंवा नत्र:नत्रवायू हा वातावरणात कोणत्याही वायूच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाणात पसरलेला आहे.

▪️नत्राचा उपयोग हा सजीवांना थेट नसला,तरी सजीवांच्या वाढीसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण वायू आहे.

▪️ नत्र (N, अणुक्रमांक ७) हे वायुरुप अधातू मूलद्रव्य आहे.

✅ कक्ष तापमानाला ह्या वायूचे रेणू हे विस्कळीत असतात आणि हा वायू रंगहीन व गंधहीन असतो.

▪️नत्र हे विश्वात सर्वसामान्यपणे आढळणारे एक मूलद्रव्य आहे,तसेच आपली आकाशगंगा आणि सूर्यमालेतील अंदाजे सातवा भाग नत्राने व्यापलेला आहे.

▪️पृथ्वीवर हे वायूरुपात आढळते;याने पृथ्वीच्या वातावरणाचा सुमारे ७८% भाग व्यापलेला आहे.

▪️हवेतील संयुगांना विघटीत करण्यासाठी स्कॉटीश भौतिकतज्ञ डॅनियल रुदरफॉर्ड यांनी इ.स.१७६२ साली नत्राचा शोध

__________________________________

हवा


पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील विविध वायूंचे यांत्रिक मिश्रण म्हणजे हवा होय. निसर्गातील हवा, पाणी व भूपृष्ठ या तीन घटकांमधील परस्परसंबंधांमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. पावसाळी हवा, दमट हवा व वादळी हवा या शब्दप्रयोगांत हवा हा शब्द हवामान या अर्थी वापरलेला आढळतो.

हवेतील प्रमाण जवळजवळ स्थिर असलेल्या वायूंचा एक गट आहे. या गटातील वायू व त्यांचे हवेच्या घनफळातील शेकडा प्रमाण कंसात पुढे दिले आहे
नायट्रोजन (७८.०८४)
ऑक्सिजन (२०.९४६)
आर्गॉन (०.९३४)
निऑन (०.००१८),
हीलियम (०.०००५२४)
मिथेन (०.०००२)
क्रिप्टॉन (०.०००११४)
हायड्रोजन (०.००००५)
नायट्रस ऑक्साइड (०.००००५)
झेनॉन (०.०००००८७).

हवेच्या संघटनातील हा एकसारखेपणा वातावरणीय हालचालींशी निगडित असलेल्या मिश्रणाच्या क्रियेमुळे टिकून राहतो. तथापि, सु. ९० किमी.पेक्षा अधिक उंचीवर मिश्रणापेक्षा विसरण प्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरत असल्याने विशेषतः हायड्रोजन व हीलियम यांच्यासारखे अधिक हलके वायू या पातळीच्या वर अधिक विपुल प्रमाणात असतात.

पाण्याची वाफ, कार्बन डाय-ऑक्साइड, ओझोन व नायट्रोजन डाय-ऑक्साइड या वायूंचे हवेतील प्रमाण बदलणारे असून त्यांचा हवेतील शेकडा प्रमाणाचा पल्ला पुढे दिला आहे :

पाण्याची वाफ (०–७),
कार्बन डाय-ऑक्साइड (०.०१–०.१ सरासरी सु. ०.०३२),
ओझोन (०–०.१),
सल्फर डाय-ऑक्साइड (०–०.०००१) आणि नायट्रोजन डाय-ऑक्साइड (०.०००००२).

यांशिवाय हवेत अमोनिया व कार्बन मोनॉक्साइड हेही वायू अत्यल्प बदलत्या प्रमाणात असतात. अर्थात, हे वायू हवेत सापेक्षतः अल्प प्रमाणात आढळत असले, तरी भूपृष्ठावरील जीवसृष्टी टिकून राहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. जीवसृष्टी-साठी ऑक्सिजन, पाणी व अन्न या अत्यावश्यक गोष्टी असून यांपैकी ऑक्सिजन हवेतून मिळतो. पाण्याची वाफ ही पाऊस, हिमवृष्टी इत्यादींचा स्रोत असून ती अवरक्त प्रारणाचे शोषण व उत्सर्जन होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वनस्पतींत कार्बन डाय-ऑक्साइड वायू ⇨ प्रकाशसंश्लेषणा साठी महत्त्वाचा असून त्यातून अन्ननिर्मिती होते. तसेच त्याच्या-मुळे अवरक्त प्रारणाचे उत्सर्जन वा शोषणही होते. ओझोन मुख्यत्वे भूपृष्ठापासून १०–५० किमी. उंचीवरील पट्ट्यात आढळतो. सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक जंबुपार प्रारणाचे त्याच्यात प्रभावीपणे शोषण होते. तसेच ओझोनामुळे ३,००० अँगस्ट्रॉमपेक्षा कमी तरंगलांबीच्या सर्व प्रारणापासून पृथ्वीचे ढालीप्रमाणे रक्षण होते. परिणामी या प्रारणापासून जीवसृष्टीचे रक्षण होते.

हवेतील बाष्पापासून ढग तयार होतात. ढगांतील प्रक्रियांमुळे पाऊस, वादळ आणि वीज पडणे यांसारखे आविष्कार घडतात. पाणी वातावरणात वायू , द्रव व घन या तीनही रूपांत असू शकते. खनिज इंधनांच्या वाढत्या वापरामुळे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे. सूर्यप्रकाशात हरित वनस्पती कार्बन डाय-ऑक्साइड अन्ननिर्मितीसाठी वापरून ऑक्सिजन हवेत सोडतात. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले मोठ्या प्रमाणात तोडली गेल्यानेही कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढत आहे. अशा रीतीने प्रदूषणात भर पडत आहे. शिवाय वाऱ्यामुळे धुळीचे, मातीचे व रेतीचे सूक्ष्मकण वातावरणात मिसळूनही नैसर्गिक रीतीने प्रदूषण होते. तसेच समुद्रावरील वारे वा लाटा यांच्यामुळे हवेत पाण्याचे तुषार उडतात व त्यांच्या बाष्पीभवनामुळे त्यांतील लवणाचे कण हवेत तरंगत राहूनही प्रदूषण होते.

हवेचा दाब, हवेचे तापमान व तिच्यातील आर्द्रता यांवर हवेची घनता अवलंबून असते. भूपृष्ठापासून वाढत्या उंचीमुळे हवेचा दाब, तापमान व तिच्यातील बाष्प यांची घट होते. दाब कमी झाला की हवेची घनता कमी होते. हवेचे तापमान व तिच्यातील बाष्प कमी झाले म्हणजे तिची घनता वाढते परंतु वाढत्या उंचीमुळे दाब बराच कमी झाल्याने वातावरणात हवेची घनता वाढत्या उंचीमुळे नेहमी कमी होते. हवेची घनता १०० किमी.पेक्षा अधिक उंचीवर नगण्य असते. सरासरी सागरी पृष्ठावर हवेची घनता दर घनमीटरला सु. १,२२५ ग्रॅ. एवढी असते. साधारणपणे वाढत्या उंचीबरोबर हवेचा दाब व तापमान कमी होत जातात.

रेडिओ, रडार, रॉकेट, कृत्रिम उपग्रह आणि आंतरग्रहीय एषण्या यांच्यामार्फत वातावरणाच्या वरील भागाच्या आणि बाह्य अवकाशाच्या संक्रमण पट्ट्याच्या अनुसंधानाला प्रोत्साहन मिळत आहे.

हवेच्या काही बाबी अभियांत्रिकीमध्ये महत्त्वाच्या आहेत. विविध खाणकाम यंत्रे व छिद्रण यंत्रे, हवाई गतिरोधक, स्वयंचलित वाहनांतील हवा-संधारण यंत्रणा व इतर प्रयुक्त्या यांमध्ये वातशक्तिचलित सामग्री सामान्यपणे प्रेरणा व ऊर्जा प्रेषित करते. हवेत उडणाऱ्या विमानावर लागू होणाऱ्या प्रेरणा व परिबले यांचा अभ्यास ⇨ वायुगतिकी चे खास अध्ययन क्षेत्र आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...