२६ डिसेंबर २०२१

संसदेविषयी महत्त्वाची माहीती.

◆ एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.

◆ संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.

◆ नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.

◆  राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

◆ घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.

◆  संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.

◆ जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.

◆ विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.

◆ करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.

◆ सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.

◆ वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.

◆ विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.

◆ वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.

◆ वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.

◆ सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात. टेलिग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.

◆ लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.

◆ लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.

◆ आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.

◆ राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.

◆ राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.

◆ लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

विज्ञान :- अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात

  🔹इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध  लावला.

🔹 सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.

 🔹सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.

🔹  सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.

🔹 अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.

🔹  केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.

🔹 केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.

🔹   पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते. आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे.
(1 pm = 10 -12 m)

🔹 अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u)

🔹   इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.

🔹    इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.

🔹 प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.

🔹न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.

🔹  भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या

🔹  KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.

🔹कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.

🔹   हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.

🔹 अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.

🔹   संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे.

🔹   अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.

🔹 ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.

निशाचर प्राणी कसे जगतात ?

◼दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी.

◼यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते.

◼प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो.

◼नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.

◼स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी.
,
◼एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात.

◼यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.

◼अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.

◼अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो.

◼ पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.

◼घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात.

◼बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.

◼निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.

नत्रवायू किंवा नत्र:नत्रवायू


▪️नत्रवायू किंवा नत्र:नत्रवायू हा वातावरणात कोणत्याही वायूच्या तुलनेत सर्वात जास्त प्रमाणात पसरलेला आहे.

▪️नत्राचा उपयोग हा सजीवांना थेट नसला,तरी सजीवांच्या वाढीसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण वायू आहे.

▪️ नत्र (N, अणुक्रमांक ७) हे वायुरुप अधातू मूलद्रव्य आहे.

✅ कक्ष तापमानाला ह्या वायूचे रेणू हे विस्कळीत असतात आणि हा वायू रंगहीन व गंधहीन असतो.

▪️नत्र हे विश्वात सर्वसामान्यपणे आढळणारे एक मूलद्रव्य आहे,तसेच आपली आकाशगंगा आणि सूर्यमालेतील अंदाजे सातवा भाग नत्राने व्यापलेला आहे.

▪️पृथ्वीवर हे वायूरुपात आढळते;याने पृथ्वीच्या वातावरणाचा सुमारे ७८% भाग व्यापलेला आहे.

▪️हवेतील संयुगांना विघटीत करण्यासाठी स्कॉटीश भौतिकतज्ञ डॅनियल रुदरफॉर्ड यांनी इ.स.१७६२ साली नत्राचा शोध

__________________________________

हवा


पृथ्वीभोवतीच्या वातावरणातील विविध वायूंचे यांत्रिक मिश्रण म्हणजे हवा होय. निसर्गातील हवा, पाणी व भूपृष्ठ या तीन घटकांमधील परस्परसंबंधांमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली. पावसाळी हवा, दमट हवा व वादळी हवा या शब्दप्रयोगांत हवा हा शब्द हवामान या अर्थी वापरलेला आढळतो.

हवेतील प्रमाण जवळजवळ स्थिर असलेल्या वायूंचा एक गट आहे. या गटातील वायू व त्यांचे हवेच्या घनफळातील शेकडा प्रमाण कंसात पुढे दिले आहे
नायट्रोजन (७८.०८४)
ऑक्सिजन (२०.९४६)
आर्गॉन (०.९३४)
निऑन (०.००१८),
हीलियम (०.०००५२४)
मिथेन (०.०००२)
क्रिप्टॉन (०.०००११४)
हायड्रोजन (०.००००५)
नायट्रस ऑक्साइड (०.००००५)
झेनॉन (०.०००००८७).

हवेच्या संघटनातील हा एकसारखेपणा वातावरणीय हालचालींशी निगडित असलेल्या मिश्रणाच्या क्रियेमुळे टिकून राहतो. तथापि, सु. ९० किमी.पेक्षा अधिक उंचीवर मिश्रणापेक्षा विसरण प्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरत असल्याने विशेषतः हायड्रोजन व हीलियम यांच्यासारखे अधिक हलके वायू या पातळीच्या वर अधिक विपुल प्रमाणात असतात.

पाण्याची वाफ, कार्बन डाय-ऑक्साइड, ओझोन व नायट्रोजन डाय-ऑक्साइड या वायूंचे हवेतील प्रमाण बदलणारे असून त्यांचा हवेतील शेकडा प्रमाणाचा पल्ला पुढे दिला आहे :

पाण्याची वाफ (०–७),
कार्बन डाय-ऑक्साइड (०.०१–०.१ सरासरी सु. ०.०३२),
ओझोन (०–०.१),
सल्फर डाय-ऑक्साइड (०–०.०००१) आणि नायट्रोजन डाय-ऑक्साइड (०.०००००२).

यांशिवाय हवेत अमोनिया व कार्बन मोनॉक्साइड हेही वायू अत्यल्प बदलत्या प्रमाणात असतात. अर्थात, हे वायू हवेत सापेक्षतः अल्प प्रमाणात आढळत असले, तरी भूपृष्ठावरील जीवसृष्टी टिकून राहण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. जीवसृष्टी-साठी ऑक्सिजन, पाणी व अन्न या अत्यावश्यक गोष्टी असून यांपैकी ऑक्सिजन हवेतून मिळतो. पाण्याची वाफ ही पाऊस, हिमवृष्टी इत्यादींचा स्रोत असून ती अवरक्त प्रारणाचे शोषण व उत्सर्जन होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वनस्पतींत कार्बन डाय-ऑक्साइड वायू ⇨ प्रकाशसंश्लेषणा साठी महत्त्वाचा असून त्यातून अन्ननिर्मिती होते. तसेच त्याच्या-मुळे अवरक्त प्रारणाचे उत्सर्जन वा शोषणही होते. ओझोन मुख्यत्वे भूपृष्ठापासून १०–५० किमी. उंचीवरील पट्ट्यात आढळतो. सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक जंबुपार प्रारणाचे त्याच्यात प्रभावीपणे शोषण होते. तसेच ओझोनामुळे ३,००० अँगस्ट्रॉमपेक्षा कमी तरंगलांबीच्या सर्व प्रारणापासून पृथ्वीचे ढालीप्रमाणे रक्षण होते. परिणामी या प्रारणापासून जीवसृष्टीचे रक्षण होते.

हवेतील बाष्पापासून ढग तयार होतात. ढगांतील प्रक्रियांमुळे पाऊस, वादळ आणि वीज पडणे यांसारखे आविष्कार घडतात. पाणी वातावरणात वायू , द्रव व घन या तीनही रूपांत असू शकते. खनिज इंधनांच्या वाढत्या वापरामुळे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे. सूर्यप्रकाशात हरित वनस्पती कार्बन डाय-ऑक्साइड अन्ननिर्मितीसाठी वापरून ऑक्सिजन हवेत सोडतात. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे जंगले मोठ्या प्रमाणात तोडली गेल्यानेही कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण वाढत आहे. अशा रीतीने प्रदूषणात भर पडत आहे. शिवाय वाऱ्यामुळे धुळीचे, मातीचे व रेतीचे सूक्ष्मकण वातावरणात मिसळूनही नैसर्गिक रीतीने प्रदूषण होते. तसेच समुद्रावरील वारे वा लाटा यांच्यामुळे हवेत पाण्याचे तुषार उडतात व त्यांच्या बाष्पीभवनामुळे त्यांतील लवणाचे कण हवेत तरंगत राहूनही प्रदूषण होते.

हवेचा दाब, हवेचे तापमान व तिच्यातील आर्द्रता यांवर हवेची घनता अवलंबून असते. भूपृष्ठापासून वाढत्या उंचीमुळे हवेचा दाब, तापमान व तिच्यातील बाष्प यांची घट होते. दाब कमी झाला की हवेची घनता कमी होते. हवेचे तापमान व तिच्यातील बाष्प कमी झाले म्हणजे तिची घनता वाढते परंतु वाढत्या उंचीमुळे दाब बराच कमी झाल्याने वातावरणात हवेची घनता वाढत्या उंचीमुळे नेहमी कमी होते. हवेची घनता १०० किमी.पेक्षा अधिक उंचीवर नगण्य असते. सरासरी सागरी पृष्ठावर हवेची घनता दर घनमीटरला सु. १,२२५ ग्रॅ. एवढी असते. साधारणपणे वाढत्या उंचीबरोबर हवेचा दाब व तापमान कमी होत जातात.

रेडिओ, रडार, रॉकेट, कृत्रिम उपग्रह आणि आंतरग्रहीय एषण्या यांच्यामार्फत वातावरणाच्या वरील भागाच्या आणि बाह्य अवकाशाच्या संक्रमण पट्ट्याच्या अनुसंधानाला प्रोत्साहन मिळत आहे.

हवेच्या काही बाबी अभियांत्रिकीमध्ये महत्त्वाच्या आहेत. विविध खाणकाम यंत्रे व छिद्रण यंत्रे, हवाई गतिरोधक, स्वयंचलित वाहनांतील हवा-संधारण यंत्रणा व इतर प्रयुक्त्या यांमध्ये वातशक्तिचलित सामग्री सामान्यपणे प्रेरणा व ऊर्जा प्रेषित करते. हवेत उडणाऱ्या विमानावर लागू होणाऱ्या प्रेरणा व परिबले यांचा अभ्यास ⇨ वायुगतिकी चे खास अध्ययन क्षेत्र आहे.

२४ डिसेंबर २०२१

धातुंचे द्रवनांक व उत्कलनांक


Metals, Melting p. & Boiling P.

📌 अॅल्युमिनिअम- 660°C-2470°C

📌 पितळ(CuPb)- 327°C-1749°C

📌 तांबे(Cu) - 1083°C - 2567°C

📌 जस्त(Zn) - 419°C - 907°C

📌 निकेल(Ni) - 1455°C - 2730°C

📌 टंगस्टन(W) - 3422°C - 5555°C

📌 कथिल(Ti) - 231 °C - 2602°C

📌 पारा(Hg) - -38.83°C - 356 °C

📌 सोडीयम(Na) - 97°C - 882°C

📌 प्लॅटिनम(Pt)- 1768°C-3825°C

📌 कॅडमीअम(Cd) -321°C-766°C

📌 टायटॅनम(Ti)-1668°C-3287°C

📌 लोखंड(Fe)- 1538°C-3000°C

📌 स्टील - 1520°C - 2900°C

📌 सोने(Au) - 1064°C - 2700°C

📌 चांदी (Ag) - 961°C - 2162°C

📌 जर्मेनिअम(Ge)- 938°C-2833°C

(High court -उच्च न्यायालय )

2021 सर्व 25 उच्च न्यायालय 🌹
==========================

   
🌹🌹 अलाहबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answer ===👉 राजेश बिंदल
स्थापना ===👉 17 मार्च 1866

🌹🌹 आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 प्रशांत कुमार मिश्रा
स्थापना ===👉 1 जानेवारी 2019

🌹🌹 बॉम्बे  ( मुंबई ) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers === 👉 दीपांकर दत्ता
स्थापना ===👉 14 ऑगस्त 1862

🌹🌹 कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 प्रकाश श्रीवास्तव
स्थापना ===👉 1 जुलै 1862

🌹🌹 छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 अरुप कुमार गोस्वामी
स्थापना ===👉 1 नोव्हेंबर 2000

🌹🌹 दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ???
Answers ===👉 धीरुभाई एन पटेल
स्थापना ===👉 31 ऑक्टोबर 1966

🌹🌹 गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 सुधांशू घुलिया
स्थापना ===👉 1 मार्च 1948

🌹🌹 गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 आरविंद कुमार
स्थापना ===👉 1 मे 1960

🌹🌹 हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 मोहम्मद रफीक
स्थापना ===👉 25 जानेवारी 1971

🌹🌹 जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 पंकज मिथल
स्थापना 26 मार्च 1928

🌹🌹 झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 डॉ. रवी रंजन
स्थापना ===👉 15 नोव्हेंबर 2000

https://t.me/joinchat/PVjcfsobKCEwMjg1

🌹🌹 कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 रितू राज अवस्थी
स्थापना ===👉 1884

🌹🌹 केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 एस. मणी.कुमार
स्थापना ===👉 1 नोव्हेंबर 1956

🌹🌹 मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 रवी विजयकुमार मलीमठ
स्थापना ===👉 2 जानेवारी 1956

🌹🌹 मुद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 संजीव बॅनर्जी
स्थापना ===👉 15 ऑगस्ट 1862

🌹🌹 मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 पी. व्हि.संजय कुमार
स्थापना ===👉 25 मार्च 2013

🌹🌹 मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 रंजीत वसंतराव मोरे
स्थापना ===👉 23 मार्च 2013

🌹🌹 ओडिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ??????
Answers ===👉 डॉ.एस.मुरलीधर
स्थापना ===👉 3 एप्रिल 1948

🌹🌹 पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 संजय कारोल
स्थापना ===👉 2 सप्टेंबर 1916

🌹🌹 पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 रवी शंकर झा.
स्थापना ===👉 15 ऑगस्ट 1947

🌹🌹 राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 अकील अब्दुलहमीद कुरेशी
स्थापना ===👉 21 जून 1949

🌹🌹 सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 बिस्वानाथ सोमाडर
स्थापना ===👉 16 मे 1975

🌹🌹 तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?????
Answers ===👉 सतीश चंद्र शर्मा
स्थापना === 1 जानेवारी 2019

🌹🌹 त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ????
Answers ===👉 इंद्रजित महंती
स्थापना ===👉 26 मार्च 2013

🌹🌹 उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ??????
Answers ===👉 राघवेंद्र सिंह चौहान.
स्थापना ===👉 9 नोव्हेंबर

राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते ..

👉 भारताच्या राष्ट्रपतींची निवडणुक अप्रत्यक्ष निवडणुक पध्दतीने होते

१) संसदेची दोन्ही सभागॄहे व २) घटक राज्यांच्या विधानसभा यांतील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीची निवड करतात. (टिप  विधान परिषदातील सदस्यांना तसेच राज्यसभा व लोकसभा यांतील नियुक्त सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार दिलेला नाही.)

👉 संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्यांच्या मताचे मुल्य पुढील प्रमाणे ठरवितात.

👉 राष्ट्रपतींच्या निवडणूकीसाठी प्रमाणशीर क्रमदेय मतदान पध्दती किंवा एकल संक्रमणीय पध्दती स्वीकारली जाते.

👉 भारताचा राष्ट्रपती प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या गुपत मतदान पदतीने अप्रत्यक्षपणे निवडला जातो. त्यामुळे तो भारतातील सर्व जनतेचा प्रतिनिधी आहे. हे सिध्द होते. अशा प्रकारे भारतातील जनतेकडून (त्यांच्या प्रतिनिधीकडून) अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतीची निवड होते.

👉२६ जाने. १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड झाली. तेव्हा पासून आता पर्यंत १३ वेळा राष्ट्रपती निवडणूक झाली आहे.

👉11 वे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्द्ल कलाम हे होते.

👉भारताच्या १२ व्या राष्ट्रपती व पहिल्या महिला राष्ट्रपती – सौ. प्रतिभाताई पाटील.

👉 सद्याचे म्हणजे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आहेत

राष्ट्रपती पदाची पात्रता:-

👉 तो भारताचा नागरिक असावा

👉 त्याच्या वयाची ३५ वर्षे पुर्ण झालेली असावीत

👉 तो लोकसभेचा सदस्य म्हणुन निवडून येण्यास पात्र असावा

कार्यकाल:-

राष्ट्रपतीचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो. कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. संसद महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला पदावरुन दुर करु शकते.

राजिनामा:-

राष्ट्रपती आपला राजीनामा उप राष्ट्रपतींकडे देतो. राष्ट्रपतीच्या राजिनाम्यामुळे किंवा मृत्युमुळे ते पद रिकामे झाले तर उप राष्ट्रपती त्या पदाची सुत्रे हाती घेतो. परंतु सहा महिन्याच्या आत राष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावी लागते.

महाभियोग:-

कलम ६१ मध्ये महाभियोगाची कार्यपध्दती स्पष्ट केली आहे. संविधानाचा भंग केल्यास राष्ट्रपतींवर महाभियोगाची कारवाई होऊ शकते. संसदेच्या कोणत्याही सभागृहात राष्ट्रपतींवर निश्चित दोषारोप करणारा ठराव मंजूर केल्यास राष्ट्रपतीस पदावरून पायउतार व्हावे लागते.

निवडणुक:-

राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढविण्यासाठी उमेद्वाराला 15  हजार रुपये अनामत म्हणून भरावे लागते. निवडून यावयाच्या आवश्यक असणा-या मतांच्या एक षष्ठांश मते प्राप्त झाली नाहीत तर ती अनामत रक्कम जप्त केली जाते.

राष्ट्रपतींचे वेतन व भत्ते:-

भारताच्या राष्ट्रपतीला दरमहा वेतन मिळते शिवाय इतर भत्ते, सुखसोयी व सवलती देण्यात येतात. भारतीय संसदेला राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा आधिकार आहे.

चालू घडामोडी

1. 22 डिसेंबर हा दिवस ....... म्हणून साजरा केला जातो.

1. राष्ट्रीय गणित दिवस
2.राष्ट्रीय विज्ञान दिवस
3. राष्ट्रीय हिंदी दिवस
4. राष्ट्रीय संस्कृत दिवस

उत्तर- 1
------------------------------------------------------------

2. खालीलपैकी कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याची बॅडमिंटन जागतिक महासंघाच्या एथलेटिक्स कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

1. किदांबी श्रीकांत
2. पी. कश्यप
3. सायना नेहवाल
4. पी.व्ही सिंधू

उत्तर- 4

--------------------------------------------------------

3. चिल्लई कलान संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

अ.  काश्मीरमधील दरवर्षी 21 डिसेंबर ते 29 जानेवारी या कालावधीत हिवाळ्यातील हा सर्वात थंड भाग असतो. संपूर्ण खोऱ्यात किमान तापमान शून्याखाली असताना, स्थानिक भाषेत 'चिल्लई कलान' म्हणून ओळखतात.
ब. हे काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीच्या ४० दिवसांच्या कालावधीला दिलेले स्थानिक नाव आहे.
क. चिल्लई कलान किंवा चिल्ल्या कलान हा एक पर्शियन शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ चाळीस दिवस तीव्र थंडी असा होतो.

1. अ, ब
2. ब, क
3. अ, ब, क
4. अ, क

उत्तर- 3

----------------------------------------------------------

4. खालीलपैकी कोणत्या टेनिसपटूने BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2021 पुरस्कार जिंकला आहे?

1. टॉम डेली
2. एम्मा रादुकानू
3. सानिया मिर्झा
4. नाओमी ओसाका

उत्तर- 2

------------------------------------------------------------

5. भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी  भारतीय सांस्कृतिक संबंध  परिषदेने  खालीलपैकी कोणासोबत  करार केला आहे?

1. विविध भारती
2. दूरदर्शन
3. प्रसार भारती
4. आकाशवाणी

उत्तर- 3

------------------------------------------------------------

6. 'नीना गुप्ता' संदर्भात खालीलपैकी कोणती विधान/ने योग्य आहेत?

अ. नीना गुप्ता रामानुजन पुरस्कार जिंकणाऱ्या तिसऱ्या भारतीय महिला आहे.
ब.  इंडियन स्टॅटिकल इन्स्टिट्यूटमधील गणिततज्ञ आहेत.
क. तरुण गणितज्ञांसाठी DST-ICTP-IMU रामानुजन पुरस्कार दिला जातो.

1. अ, ब, क
2. ब, क
3. अ, क
4. अ, ब

उत्तर-1

------------------------------------------------------------

7.  कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महानदीवरील 'टी-सेतू' या सर्वात लांब पुलाचे उद्घाटन केले?

1) ओडिशा
2)  आसाम
3) पश्चिम बंगाल
4) महाराष्ट्र

उत्तर- 1

------------------------------------------------------------

8. ........100% लसीकरनातील दोन्ही डोस पूर्ण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे.
1. लेह लडाख
2. लक्षद्वीप
3. पॉंडेचेरी
4. अंदमान आणि निकोबार

उत्तर- 4

------------------------------------------------------------
9. GIS-आधारित 'स्वयंचलित पाणी पुरवठा प्रणाली संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा

अ. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने ईछावणी प्रकल्पांतर्गत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरिकांसाठी भारतातील पहिली भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित 'स्वयंचलित पाणी पुरवठा प्रणाली' लाँच केली.
ब. या प्रणालीसाठीचे मॉड्यूल भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओइन्फॉरमॅटिक्स (BISAG) ने संरक्षण सचिव आणि संरक्षण संपत्तीचे महासंचालक (DGDE), दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केले आहे.

1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब
4. एकही नाही

उत्तर- 1

Correct ans- केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्रालयाने.......

------------------------------------------------------------

10.  नेतृत्व प्रतिबद्धता 2021 साठी UN महिला पुरस्कार कोणी जिंकला आहे?

1. दिव्या हेगडे
2. रितू कुमार
3. आदिती गुप्ता
4. वाणी कोला

उत्तर- 1

================================

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...