२४ डिसेंबर २०२१

सराव प्रश्नसंच - विज्ञान

● फुफ्फूसावर सुज येणे हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

अ. हिवताप
ब. न्युमोनिया
क. कावीळ
ड. मलेरिया

उत्तर - ब. न्युमोनिया

● 1 मायक्रोमीटर म्हणजे किती मीटर?

अ. 10^-3
ब. 10^-4
क. 10^-5
ड. 10^-6

उत्तर - 10^-6

● बटाटा चिप्सच्या पॉकेटमध्ये ऑक्सीडेशन रोखण्यासाठी कोणता वायू वापरतात?

अ. ऑक्सीजन
ब. कार्बन डाय ऑक्साईड
क. नायट्रोजन
ड. मिथेन

उत्तर - क. नायट्रोजन

● रबराच्या चिकापासून मिळणाऱ्या चिकाला काय म्हणतात?

अ. लॅटेक्स
ब. पॅटेक्स
क. मॅटेक्स
ड. बॅटेक्स

उत्तर - अ. लॅटेक्स

● हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते?
अ. 76
ब. 78
क. 74
ड. 75

उत्तर - ब. 78

● कोणत्या किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाइतचा असतो?

अ. गॅमा किरण
ब. अल्फा किरण
क. बीटा किरण
ड. क्ष किरण

उत्तर - अ. गॅमा किरण

● मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?

अ. 65%
ब. 70%
क. 75%
ड. 80%

उत्तर - ब. 70%

● अ जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग कोणता?

अ. रातांधळेपणा
ब. बेरीबेरा
क. न्युमोनिया
ड. स्कर्व्ही

उत्तर अ. रातांधळेपणा

● प्लस पोलिओ हि मोहिम कधी पासून राबवली जात आहे?

अ. 25 जुलै 2015
ब. 17 ऑक्टोबर 2014
क. 20 सप्टेंबर 2015
ड. 27 मार्च 2014

उत्तर - ड. 27 मार्च 2014

● शरीरात सर्वात प्रथम युरीया कोठे तयार होतो?

अ. स्वादुपिंड
ब. फुफ्फूस
क. यकृत
ड. पित्ताशय

उत्तर - क. यकृत

विज्ञान 15 प्रश्न

Ques. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध
B. दुहेरी बंध
C. तिहरी बंध
D. आयनिक बंध
Ans. तिहेरी बंध

Ques. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र
B. बुध
C. मंगळ
D. पृथ्वी
Ans. बुध

Ques. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन
B. मिथेन आणि ब्युटेन
C. ब्युटेन आणि प्रोपेन
D. हायड्रोजन आणि मिथेन
Ans. ब्युटेन आणि प्रोपेन

Ques. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन
B. पासकल
C. डाइन
D. वॅट
Ans. पासकल

Ques. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा
B. बीटा
C. गॅमा
D. क्ष
Ans. गॅमा

Ques. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम
B. आयोडिन
C. लोह
D. फ्लोरिन
Ans. फ्लोरिन

Ques. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व
B. क जीवनसत्त्व
C. ड जीवनसत्त्व
D. इ जीवनसत्त्व
Ans. ड जीवनसत्त्व

Ques. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम
B. प्रथिने व लोह
C. सोडियम व प्रथिने
D. लोह व क जीवनसत्त्व
Ans. लोह व क जीवनसत्त्व

Ques. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप
B. काकडी व सफरचंद
C. अंडी व केळी
D. केळी व दूध
Ans. काकडी व सफरचंद

Ques. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व
B. ब-4जीवनसत्त्व
C. ड जीवनसत्त्व
D. के जीवनसत्त्व
Ans. के जीवनसत्त्व

Ques. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक
B. लोणी
C. चीज
D. मासे
Ans. मासे

Ques. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन
B. टॅनिन
C. मॉर्फिन
D. निकोटीन
Ans. मॉर्फिन

Ques. पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा
B. सफरचंद
C. कलिंगड
D. काजू
Ans. मासा

Ques. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन
B. नायट्रोजन पेरॉक्साईड
C. अमोनिया
D. नायट्रस ऑक्साईड
Ans. नायट्रस ऑक्साईड

Ques. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर
D. सेट्रॅटोस्फियर
Ans. ट्रोपोस्फियर

सामान्य विज्ञान

- अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.
- चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

- प्राणी : जीवनकाळ
घरमाशी - 1 ते 4 महिने
कुत्रा - 16 ते 18 वर्ष
शहामृग - 50 वर्ष
हत्ती - 70 ते 90 वर्ष

- वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.
- बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.
- वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.
- व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
- वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

- जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस
- उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

- वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

- पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.
- जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

- वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.
- MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.
- गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.
- स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

- मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.
- घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
- घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

- एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.
- ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.
- आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

- कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.
- पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.
- गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.
- पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल

99 वी घटनादुरूस्ती.

🅾ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेने संमत केलेले असल्याने अद्यापही विधेयक (प्रस्तावित घटनादुरुस्ती) या स्वरूपातच आहे.)

🅾वास्तविक पाहता हे 121वे घटनादुरूस्ती विधेयक होते. परंतु, काही विधेयके संमत न होत.रद्द(Lapsed)होतात, पण संमत झालेली घटनादुरूस्ती ही क्रमाने पुढील क्रमांक धारण करते, म्हणून ही 99 वी घटनादुरूस्ती.

🅾राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 31 डिसेंबर 2014 रोजी. मात्र कायदा अंमलात आला 13 एप्रिल 2015 पासून.ही घटनादुरूस्ती National Judicial Appointment Commission(NJAC) अर्थात राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती कमिशन च्या संदर्भातील आहे.

 🅾ह्या घटनादुरूस्ती द्वारा राज्यघटनेत 124अ, 124ब, 124क या तीन नवीन कलमांचा समावेश करण्यात आला, तर राज्यघटनेच्या कलम 127, 128, 217, 222, 224अ,231 या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

🅾 ही घटनादुरूस्ती वास्तवात येण्यापूर्वी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांच्या समितीकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका तसेच बदल्यांबद्दल शिफारशी राष्ट्रपतींकडे केल्या जात व त्या आधारे निर्णय घेतला जाई. कार्यकारी मंडळाला त्यात स्थान नव्हते.मात्र आता घटनादुरूस्तीने हे अधिकार NJAC मिळाले आहेत.

 🦋 🦋 🦋  🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋  🦋

राज्य सभा संपूर्ण माहिती

👉80-कलमानुसार 3 एप्रिल, 1952 ला राज्य सभेचे गठन करण्यात आले.

👉राज्य सभेची प्रथम बैठक 13 मे, 1952 ला झाली.

☑️राज्य सभा -(टोपणनावे)

-(1) संसदेचे उच्च/वरिष्ठ सदन
-(2) विद्ववानांचे सभागृह
-(3) राज्यांचे सदन
-(4) अलोकप्रिय सदन
-(5) संसदेचे द्वितिय सदन
-(6) संसदेचे स्थायी सभागृह (कारण राज्य सभेला केंव्हाही भंग केल्या जाऊ शकत नाही, फक्त स्थगित केल्या जाऊ शकते.

☑️अध्यक्ष-

👉-राज्य सभेच्या अध्यक्षांना सभापती देखील म्हटले जाते जे सध्याचे उपराष्ट्रपति असतात.

👉-राज्य सभा एकमात्र असे सदन आहे की जिसे अध्यक्ष त्या सदनचे सदस्य नसुनही  अध्यक्ष असतात.

👉-भारताचे प्रथम राज्य सभा अध्यक्ष (प्रथम उपराष्ट्रपति) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होते.

👉सध्याचे राज्य सभा अध्यक्ष (उपराष्ट्रपति) वैकेया नायडु आहेत.

☑️उपाध्यक्ष-

👉-राज्य सभेचे सदस्य आपल्यातील एकाची उपसभापति/उपाध्यक्ष म्हणुन निवड करतात.

👉-राज्य सभेचे प्रथम उपाध्यक्ष S.V कृष्णामूर्ति राव होते.

☑️राजीनामा-

👉राज्य सभेचे अध्यक्ष अपना राजीनामा (उपराष्ट्रपतीच्या रूपात) राष्ट्रपतिकडे देतात.तसेच उपाध्यक्ष आपला राजीनामा अध्यक्षांकडे (उपराष्ट्रपति) देतात.

☑️कार्यकाल-

👉राज्य सभेच्या सभापतींचा कार्यकाल (उपराष्ट्रपतीच्या रूपात) 5 वर्ष असतो. आणि उपाध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असतो.

☑️निर्वाचन (निवड)-

👉-राज्य सभेच्या सदस्यांची निवड राज्याच्या विधान सभेच्या निर्वाचित सदस्यां (M.L.A) द्वारे केली जाते.

👉-राज्य सभेचे एक तृतियांश सदस्य प्रति 2 वर्षां नंतर सेवानिवृत होत असतात आणि तेव्हढेच त्यांच्या जागी नव्याने निर्वाचित केले जातात तसेच सेवानिवृत सदस्य पुनः नियुक्तीस पात्र असतात.

👉पात्रता-

👉-राज्य सभा सदस्यत्वासाठी कमीत कमी वय 30 वर्ष तसेच जास्तीत जास्त कितीही असु शकते.

☑️शपथ-

👉-राज्य सभेच्या अध्यक्षांना शपथ राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींच्या अनुपस्थित राष्ट्रपतींद्वारे नामित/नियुक्त व्यक्ति शपथ देत असतो.

👉- राज्य सभा सदस्यांना शपथ राज्य सभा अध्यक्ष देतात.

👉 सध्या राज्य सभा जागा - 245

(1) राज्य+केन्द्रशासित प्रदेशांमधुन निर्वाचित- 233

(2) राष्ट्रपतींद्वारे मनोनित- 12

👉 जास्तीत जास्त राज्य सभा जागा - 250

(1) राज्यों + केन्द्रशासित प्रदेशांमधुन निर्वाचित- 238

(2) राष्ट्रपतिद्वारे मनोनित- 12

-कलम 80 नुसार राष्ट्रपति द्वारे 12 सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाज सेवा, खेळ इ. क्षेत्रांमधुन मनोनित केले जातात.

👉-राष्ट्रपति द्वारे संसदेमध्ये एकुण 14 सदस्य (2 लोक सभा+ 12 राज्य सभा) मनोनित केले जातात.

👉-सर्वाधिक राज्य सभा सिट्स असणारे राज्य उत्तर प्रदेश आहे, ज्यामध्ये एकुण 31 सिट्स आहेत.

👉-राजस्थान च्या एकुण राज्य सभा जागा 10 आहेत.
👉-दिल्लीच्या एकुण  राज्य सभा जागा 3 आहेत.
👉-पोण्डिचेरी  च्या एकुण  राज्य सभा जागा 1 आहे.

☑️राज्य सभेचे विशेष अधिकार

(1) कलम 249-
-या कलमानुसार राज्य सभा राज्य सुचीतील कोणत्याही विषयाला राष्ट्रीय महत्वाचा दर्जा देऊ शकते.

(2) कलम 252-
-या कलमानुसार राज्य सभा दोनपेक्षा अधिक विधान मण्डळा द्वारा पारित विषयावर कायदा बनवू शकते.

(3) कलम 312-
-या कलमानुसार केवळ राज्य सभाच नविन अखिल-भारतीय सेवांचे गठन करु शकते‌‌.

👉-भारतात सध्या एकुण 3 अखिल-भारतीय/प्रशासनिक सेवा आहेत.

☑️जसे-

👉-(1) I.A.S- Indian Administrative Service (भारतीय प्रशासनिक सेवा)
👉-(2) I.P.S- Indian Police Service (भारतीय पुलिस सेवा)
👉-(3) I.F.S- Indian Forest Service (भारतीय वन सेवा)

☑️लॉर्ड रिपन-

👉-सिविल सर्विस/अखिल भारतीय सेवांचे जनक लॉर्ड रिपन आहेत .

👉-सिविल सर्विस डे 21 एप्रिल ला साजरा केला जातो .

👉-राज्य सभा धन विधेयकामद्ये काहीही फेर बदल करू शकत नाही केवळ सुझाव देऊ सकते.

👉-राज्य सभा सदस्य बननारा प्रथम अभिनेता➡️ पृथ्वीराज कपूर

👉-राज्य सभा सदस्य बननारी प्रथम अभिनेत्री➡️ नरगिस दत

👉-राज्य सभा सदस्य बननारा प्रथम खेळाडू➡️ सचिन तेन्डूलकर

👉-राज्य सभा सदस्य बननारे प्रथम वैज्ञानिक➡️ सत्येंद्र नाथ बोस.

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

➡कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

➡लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :
600 ते 1500 - 7 सभासद
1501 ते 3000 - 9 सभासद
3001 ते 4500 - 11 सभासद
4501 ते 6000 - 13 सभासद
6001 ते 7500 - 15 सभासद
7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद

➡निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

➡कार्यकाल - 5 वर्ष

➡विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

➡आरक्षण :
👉महिलांना - 50%
👉अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात
👉इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)

➡ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :
👉तो भारताचा नागरिक असावा.
👉त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.
👉त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

➡ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

➡सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

➡सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

➡राजीनामा :
👉सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.
👉उपसरपंच - सरपंचाकडे

➡निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :
सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

➡अविश्वासाचा ठराव :
👉सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.👉बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)👉अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच👉तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.👉अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.👉आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.

➡ग्रामसेवक / सचिव :
निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.
नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.
नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.
कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा.

➡कामे :
👉ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
👉ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
👉कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.
👉ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
👉व्हिलेज फंड सांभाळणे.
👉ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
👉ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
👉गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
👉जन्म-मृत्यूची नोंद करणे.

➡ग्रामपंचातीची कामे व विषय :
कृषी
समाज कल्याण
जलसिंचन
ग्राम संरक्षण
इमारत व दळणवळण
सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
सामान्य प्रशासन👉ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.👉बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)👉सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.👉अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच👉ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

✳✴ग्रामपंचायतींची कार्ये✴✴
१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.
२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.
४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.
५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.
६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.
७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.
८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे .

काळाराम मंदिर सत्याग्रह" एक क्रांतिकारक घटना

◾️केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव-देवलाली येथे प्रथम 29 डिसेंबर 1929 रोजी विहीतगावच्या चावडीत झालेल्या बैठकीमध्ये मंदिर प्रवेशाची घोषणा केली

◾️"आम्ही जर हिंदू असू तर आम्हाला मंदिरात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही"

ही समानतेची वागणूक मिळावी यासाठीचा हा लढा होता

◾️सत्याग्रह समितीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा

◾️भाऊराव उर्फ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते.

◾️तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद 

◾️शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील

◾️मोठ्या राजवाड्यातील जाहीर सभेत या धाडसाबद्दल त्यांना बेलमास्तर ही पदवी बहाल

◾️2 मार्च 1930 ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली.

◾️नाशिकचे जिल्हाधिकारी "R. G. गॉर्डन" यांनी मध्यविभागाचे आयुक्त "घोषाळ" यांना सत्याग्रहाची माहिती कळविली होती

◾️2 मार्च 1930 रोजी सुरू झालेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत सहस्त्रबुद्धे, देवराव नाईक, डी.व्ही.प्रधान, बाळासाहेब खरे, स्वामी आनंद हे होते.

◾️गोदावरीच्या रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी शंकरराव गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली. 

◾️ इंग्रजांनी शंकरराव गायकवाड यांना रामकुंडात उडी मारली म्हणुन काठीने मारले

◾️सत्याग्रहाबद्दल गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात त्यांना तुमचा जामीनदार कुठे आहे’, अशी विचारणा करताच त्यांनी डॉ. आंबेडकर माझे जामीनदार असून, ते इंग्लंडमध्ये आहेत, असे सांगितल्याने न्यायालयाने त्यांना सात दिवस साध्या कैदेची शिक्षा ठोठावली

🔺"आम्ही पण एक सजिव माणूस आहोत"
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आम्हाला काळाराम मंदिराचा प्रवेश करून कोणी रामभक्त बनायचे नाही, तर या भारत देशामध्ये असणा-या दगड जाती व्यवस्थेला सांगायचे आहे की, आम्ही पण एक सजिव माणूस आहोत हे दाखवून द्यायचे आहे. तुमच्या या मंदिरामध्ये कुञी, मांजरे, शेळ्या, मेंढया हे प्रवेश करू शकतात. तर आम्ही का नाही...?

पहिले कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)

◆ युद्धाचे कारणः

√ युरोपात इंग्लंड व फ्रान्स यांच्यादरम्यान ऑस्ट्रीयन वारसा हक्क युद्ध' (Austrian War of Succession) सुरू झाल्यामुळे भारतातही इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध सुरू झाले.

◆महत्त्वाच्या घटना:

√ १७४५ मध्ये ब्रिटिश नौदलाने फ्रेंचाची जहाजे ताब्यात घेतली.

√ त्यामुळे फ्रेंच गर्व्हनर डुप्ले याने १७४६ मध्ये इंग्रजांचे मद्रास जिंकून घेतले.

√ इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबाकडे फ्रेंचांविरूद्ध मद्रास मुक्त करण्यासाठी मदतीची मागणी केली.

√ कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याने फ्रेंचांना दिलेला आदेश न मानल्यामुळे १७४८ मध्ये अन्वरूद्दीनचे सैन्य व फ्रेंच यांमध्ये प्रसिद्ध सेंट थोमची लढाई' (Battle of St.Thome) झाली.

√ या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे के पॅराडाईस याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्यात केवळ ९३० सैनिक होते, तर महफूज खान याच्या नेतृत्वाखालील नवाबाच्या सैन्यात १०,००० सैनिक होते. तरीही फ्रेंचांनी नवाबाच्या सैन्याचा दारूण पराभव केला.

√ युरोपात ऑस्ट्रीयन वारसाहक्क युद्ध संपताच भारतातील युद्धही थांबले.

√ 'अॅक्स ला शापेल तहा द्वारे (Treaty of Aix-La-Chapelle) फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास परत केले.

√ मात्र युद्धात फ्रेंचांचे वर्चस्व सिद्ध झाले.

अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

नियामक कायदा (1773).

🅾कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने कंपनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतुने नियामक कायदा 1773 मध्ये मंजूर केला.

🧩कायदा मंजूर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे-

🅾बंगालमध्ये अत्याचार - कंपनीच्या नोकरांनी बंगालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार केला.

🅾कारागिराकडून जबरदस्तीने स्वस्त दरात माल घेणे, दंड करणे कारागृहात पाठविणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून जबरदस्तीने कर्जाचे रोखे लिहून घेणे यामुळे इंग्लडची जनता कंपनी शासनावर टीका करुन कंपनी सरकार बरखास्त केले.

🧩कंपनीचे शासन म्हणजे व्यापारी धोरण -

🅾 प्लासीच्या युध्दाने राजकारणात प्रवेश तर बक्सारच्या युध्दाने सत्ता स्थिर झाली. संरक्षण परराष्ट्रीय धोरण, करार, तह इ. महत्वाचे अधिकार कंपनीला मिळाले शासनविषयक सज्ञ्ल्त्;ाा व्यापारी संघटनेकडे असणे योग्य नाही असे मत राजनीतिज्ञम्प्;म्पनी व्यक्त केले.

🅾व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हटले जाते.

🅾ब्रिटिश पार्लमेंटला संधी - कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अनेक मार्गाने मोठया प्रमाणात पैसा स्वत:साठी गोळा केला.

🅾कंपनीने सतत युध्दाचे धोरण स्वीकारले त्यामूळे आर्थिक स्थिती कोलमडली होती. यासाठी कंपनीने पार्लमेंटकडे आर्थिक मदत मागितली.

🅾1772 मध्ये संसदेने कंनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सदस्य असलेल्या प्रवर समिती व त्याचबरोबर 13 सदस्यअसलेल्या गुप्त समितीची नेमणूक केली. समितीच्या अहवालाच्या आधारे 14 लाख पौंड रक्कम कर्जाऊ दिली.

🅾त्याचवेळी 1 ऑक्टोबर 1773 रोजी नियंत्रणाचा कायदा मंजूर केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...