२३ डिसेंबर २०२१

General Knowledge


● कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : व्हाइस ॲडमिरल अधीर अरोरा

●  कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात?
उत्तर : ०४ ऑक्टोबर

●  कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे १००  टक्के भागभांडवल विकत घेतले?
उत्तर :  पेटीएम

● कोणत्या व्यक्तीला २०२१ या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला?
उत्तर : व्ही. एस. नटराजन

●  कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला?
उत्तर : राजीव बन्सल

● कोणत्या संस्थेच्यावतीने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी देशभरात ४०० हून अधिक ठिकाणी "नॅशनल अप्रेंटिसशीप मेला" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?
उत्तर : प्रशिक्षण महासंचालनालय (DGT), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC)

● ३ ऑक्टोबर २०२१ रोजी, ‘सोमुद्र अविजन’ नामक जहाज विशाखापट्टणमच्या बंदरावर पोहचले. ते कोणत्या देशाच्या नौदलाचे जहाज आहे?
उत्तर : बांगलादेश

●  खालीलपैकी कोणाला आसाम सरकारचा “लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले?
उत्तर : शिलाँग चेंबर चॉइर, आसामी साहित्यिक डॉ. निरोद कुमार बारूआ, कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक न्यास

● कोणत्या दिवशी ‘जागतिक अधिवास दिवस २०२१’ साजरा करण्यात आला?
उत्तर : ४ ऑक्टोबर

●  कोणत्या राज्यात ICMR संस्थेच्या ‘ड्रोन रिस्पॉन्स अँड आउटरीच इन नॉर्थ ईस्ट’ (आय-ड्रोन) कार्यक्रमाला सुरूवात झाली?
उत्तर :  मणिपूर

●  कोणत्या बुद्धिबळपटूने प्रथम ‘मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूर’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?
उत्तर : मॅग्नस कार्लसन

● कोणता देश २०२२ साली ‘मिलान’ नामक त्याची सर्वात मोठी नौकवायत आयोजित करणार?
उत्तर : भारत

●   या संस्थेच्यावतीने "द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रेन 2021; ऑन माय माइंड: प्रोमोटिंग, प्रोटेक्टिंग अँड केयरिंग फॉर चिल्ड्रेन्स मेंटल हेल्थ” या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
उत्तर : UNICEF

● कोणत्या देशामधील 'JIMEX' नामक सागरी द्विपक्षीय कवायतीची पाचवी आवृत्ती ०६ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली?
उत्तर : भारत आणि जपान

● कोणत्या राज्यातून GI टॅग मिळविलेल्या ‘मिहिदाना’ नामक गोड पदार्थाची पहिली खेप बहरीन देशाकडे निर्यात करण्यात आली?
उत्तर :  पश्चिम बंगाल

●  __ राज्यातील इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेतांक (GI) टॅग प्राप्त झाले.
उत्तर :  केरळ

● कोणत्या संस्थेने ‘वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : आंतरराष्ट्रीय चलननिधी

●  कोणती २०२१ साली ‘आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस’ची संकल्पना आहे?
उत्तर :  ग्राहक ही चक्रीय अर्थव्यवस्थेची किल्ली आहे!

●  कोणता ५८ व्या ‘EY रिन्यूएबल एनर्जी कंट्री अट्रेक्टिवनेस इंडेक्स' (RECAI) या यादीत भारताचा क्रमांक आहे?
उत्तर : तृतीय

● कोणत्या देशाने जगातील पहिली स्वयंचलित रेलगाडी तयार केली?
उत्तर : जर्मनी

●  कोणती सरकारी कंपनी ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील ११ वी कंपनी ठरली आहे?
उत्तर : पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन

● कोणती व्यक्ती ‘अकासा एअर एअरलाइन्स’ या कंपनीचे सह-संस्थापक आहे?
उत्तर : विनय दुबे, राकेश झुनझुनवाला

● कोणत्या व्यक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली?
उत्तर :  अमित खरे

●  कोणत्या व्यक्तीची सेबेस्टियन कुर्झ यांच्या राजीनाम्यानंतर ऑस्ट्रिया देशाच्या चान्सलर पदावर निवड झाली?
उत्तर : अलेक्झांडर शेलेनबर्ग

भारत रत्न पुरस्कार विजेता व वर्ष


⌾ डॉ. चन्द्रशेखर वेंकटरमण   ➾  1954

⌾ चक्रवर्ती राजगोपालाचारी  ➾  1954

⌾ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  ➾  1954

⌾ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया  ➾  1955

⌾ डॉ. भगवान दास  ➾  1955

⌾ जवाहर लाल नेहरू  ➾  1955

⌾ गोविन्द वल्लभ पंत  ➾ 1957

⌾ महर्षि डॉ॰ धोंडो केशव कर्वे  ➾ 1958

⌾ राजर्षि पुरुषोत्तम दास टंडन  ➾  1961

⌾ डॉ॰ बिधान चंद्र राय ➾  1961

⌾ डॉ. राजेन्द्र प्रसाद  ➾  1962

⌾ डॉ. जाकिर हुसैन  ➾  1963

⌾ डॉ. पांडुरंग वामन काणे  ➾  1963

⌾ लाल बहादुर शास्त्री (मरणोपरांत)  ➾  1966

⌾ इंदिरा गांधी  ➾  1971

⌾ वराहगिरी वेंकट गिरी  ➾  1975

⌾ कुमारस्वामी कामराज (मरणोपरांत)  ➾  1976

⌾ मदर टेरेसा  ➾ 1980

⌾आचार्य विनोबा भावे (मरणोपरांत)  ➾  1983

⌾ खान अब्दुल गफ्फार खान  ➾  1987

⌾ मरुथुर गोपालन रामचंद्रन (मरणोपरांत) ➾  1988

⌾ डॉ. भीमराव अम्बेडकर (मरणोपरांत)  ➾  1990

⌾ नेल्सन मंडेला   ➾  1990

⌾ सरदार वल्लभ भाई पटेल (मरणोपरांत)  ➾  1991

⌾ मोरार जी देसाई  ➾  1991

⌾ राजीव गांधी (मरणोपरांत)  ➾  1991

⌾ मौलाना अबुल कलाम आजाद (मरणोपरांत)   ➾  1992

⌾ जे. आर. डी. टाटा  ➾  1992

⌾ सत्यजीत रे  ➾  1992

⌾ डॉ. एपीजे अब्दुल कलाम  ➾  1997

⌾ अरुणा आसफ अली (मरणोपरांत)  ➾  1997

⌾ गुलज़ारी लाल नंदा (मरणोपरांत)  ➾   1997

⌾ एम. एस. सुब्बुलक्ष्मी  ➾  1998

⌾ चिदम्बरम् सुब्रह्मण्यम्  ➾  1998

⌾ जयप्रकाश नारायण (मरणोपरांत)  ➾  1998

⌾ पंडित रविशंकर  ➾  1999

⌾ प्रोफेसर अमर्त्य सेन  ➾  1999

⌾ गोपीनाथ बोरदोलोई (मरणोपरांत)  ➾  1999

⌾ उस्ताद बिस्मिल्लाह खां  ➾  2001

⌾ लता मंगेशकर  ➾  2001

⌾ भीमसेन जोशी  ➾  2008

⌾ चिंतामणि नागेश रामचंद्र राव  ➾ 2014

⌾ सचिन तेंडुलकर  ➾  2014

⌾ अटल बिहारी वाजपेयी  ➾  2015

⌾ मदन मोहन मालवीय  ➾  2015

⌾ नानाजी देशमुख (मरणोपरांत)  ➾ 2019

⌾ प्रणब मुखर्जी  ➾  2019

⌾ भूपेन हजारिका (मरणोपरांत)  ➾ 2019

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे

✅ धरण : नदी : जिल्हा

💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर
💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद
💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद
💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली
💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे
💧 मुळशी : मुळा : पुणे
💧 दारणा : दारणा : नाशिक
💧 माजलगाव : सिंदफणा : बीड
💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड
💧 खडकवासला : मुठा : पुणे
💧 कोयना : कोयना : सातारा
💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

वल्लभभाई पटेल

 ( ३१ ऑक्टोबर १८७५ - १५ डिसेंबर १९५०) हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते.

त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते.

वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला.

या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले.

 भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले

या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय.

मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात.

सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.

मंगल पांडे यांचा जिवन परिचय – (Mangal Pandey Biography)

🎯पुर्ण नाव (Name) मंगल पांडे

🎯जन्म (Birthday) 19 जुलै 1827, नगवा, बलिया, उत्तर प्रदेश,

🎯वडिल (Father Name) दिवाकर पांडेय

🎯आई (Mother Name) अभय रानी पांडेय

🎯कार्य (Work) 1857 साली स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत चेतवणारे पहिले भारतिय

🎯मंगल पांडे यांच्यावर आधारीत चित्रपट (Movie) मंगल पांडे: दि राइजिंग

🎯मृत्यु (Death) 8 एप्रील 1857 ( वयाच्या 29 व्या वर्षी) बैरकपुर, पश्चिम बंगाल, भारत

🎯इंग्रजांविरूध्द विद्रोहाची ज्वाला भडकविणारे मंगल पांडे हे भारतातील पहिले कांतिकारी होते ज्यांनी केवळ 1857 च्या उठावाची सुरूवात केली असे नाही तर प्रत्येक भारतियाच्या मनात इंग्रजांच्या गुलामगिरीतुन सुटका व्हावी या हेतुने पेटुन उठण्याची ज्योत देखील जागविली.

🎯त्यांनी सुरूवात केलेली स्वातंत्र्याची ही लढाई पुढे कित्येक वर्श चालली आणि बराच संघर्श व बलिदाना नंतर आपला भारत देश 15 आगस्ट 1947 ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन मुक्त होऊ शकला.

🎯मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते.

🎯1849 साली ते ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) सैन्यात भरती झाले. ब्रिटिश शासनाने 1856 मध्ये *एनफिल्ड नावाच्या रायफलसोबत* नवी काडतुसं आणली होती. या काडतुसांचं आवरण दातांनी तोडून ती बंदुकीत भरावी लागत. या काडतुसांमध्ये गाय आणि डुकरांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता.त्यामुळे अनेक जवानांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. म्हणून त्यांनीही काडतुसं वापरण्यास नकार दिला होता. त्यामुळे फेब्रुवारी 1857 मध्ये या मुद्द्यावरून सैन्यात रोष पसरला.

🎯29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी ब्रिटिशांच्या या नव्या काडतुसांना खुलेपणाने विरोध केला. इंग्रज अधिकाऱ्यांनी जेव्हा दबाव आणायचा प्रयत्न केला, तेव्हा मंगल पांडे यांनी त्यांना ठार केलं. ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढलं आणि त्यांना फाशी देण्याचे आदेश *6 एप्रिल 1857* रोजी दिले. पांडे यांच्या हौतात्म्यामुळे अन्य जवान आणि देशवासीयांमध्ये ब्रिटिशांविरोधात बंड करून पेटून उठण्याची चेतना जागृत झाली.

जीवन : बाळशास्त्री जांभेकर

जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले.

मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.

‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते.

फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता.
जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.

त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. 

गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते. अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली.

या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे 'दर्पण दिन' अथवा 'वृत्तपत्र दिन' म्हणून साजरा होतो.

महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे सुरुवातीच्या अवस्थेत निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे काम या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केलं इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतिशास्त्र या विविध विषयावरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली बाळशास्त्री वांग्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये निष्णात होते गणित व ज्योतिष शास्त्र या विषयातही त्यांचा अधिकार मोठा होता त्यांनी मराठी भाषेत शून्यलदी हे पहिले पुस्तक लिहिले

प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट याचे संशोधन करून त्यावर त्यांनी विद्वत्तापूर्ण लेखन केले यासंबंधीचे त्यांचे शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते

🍃🍃🍃🍃🔺🔺🔺🍃🍃🍃🍃🔺🔺🔺🍃

वासुदेव बळवंत फडके

🖍वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म 4 नाेव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला.

🖍फडके यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.

🖍1857 च्या उठावानंतर भारतात इंग्रजांविरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो फडके यांचा होता.

🖍 पेशवाईच्या काळात पनवेल जवळील कर्नाळ जिल्ह्याची किल्लेदारी ही फडक्यांच्या घराण्यात होती.
त्यांना सुभेदार फडके म्हणून देखील ओळखले जात असे.

🖍उदरनिर्वाहासाठी वासुदेव फडके यांनी प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामास सुरुवात केली व नंतर ते लष्करी खात्यात नोकरीस लागले.

🖍 इंग्रजांकडून त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत असे व त्यांच्या या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीस देखील जाता आले नाही.

🖍फडकेंवर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचा प्रभाव होता.

🖍1873 मध्येफडकेंनी स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ घेतली तसेच समाजात समानता, ऐक्य व
समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धीनी संस्था सुरू केली.

🖍 पुणे येथे फडकेंने 1874 मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन ही शाळा स्थापन करुन स्वदेशीचा पुरस्कार देखील केला.

🖍फडके हे दत्त उपासक होते व त्यांनी दत्तमाहात्म्य हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला
होता.

🖍शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज भारतातून जाणार नाहीत असे त्यांना वाटत असल्यामुळे इंग्रजांविरोधी उठावास त्यांनी सुरूवात केली व इंग्रजांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढविली व वैराग्याचा वेश घेवून जन जागृती करत ते गावोगावी फिरू लागले.

🖍 दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर त्यांनी पहिला दरोडा घातला यामध्ये त्यांना केवळ 3,000 रुपये मिळाले.

🖍 सरकारी खजिन्यास कडक बंदोबस्त असल्यामुळे सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंताची व सावकारांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी लोणी, खेड, जेजुरी जवळील वाल्हे, पुरंदर, हुरणे, सोलापूर, वरसगाव येथे दरोडा टाकून लुटमार केली. याच काळात त्यांनी रामदरा, मल्हारगाव येथील जंगलांचा आश्रय घेवून आसपासचा प्रदेश देखील लुटला.

🖍 अखेर दिवसेंदिवस या लुटीच्या बातमीने हादरुन पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनिअल याने फडकेंचा शोध घेत असता शुक्रवार पेठेत पोचला व त्याठिकाणी त्यास तलवारी, बंदुका मिळाल्या व डॅनीअलने लगेलच फडकेंवर अटक वॉरंट काढले व यानुसार फडकेंना पकडण्यासाठी मुंबई सरकारने 4,000 रुपयांचे रोख बक्षिस घोषित केले.

🖍 यावर प्रतिउत्तर म्हणून फडकेंनी जाहीर केले की, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल याचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपयांची बक्षिस दिले जाईल. परंतु फडकेंचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही व रामोशांनी देखील त्यांची साथ सोडली होती.

🖍 अखेर 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बाैध्द विहारमध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली होती.

🖍 न्या. अल्फ्रेड केसर यांच्या समोर सदरील खटला सुरू झाला व त्यांनी सत्र न्या. न्युनहॅमकडे हा खटला वर्ग केला. फडकेंचे वकीलपत्र ग.वा. जोशींनी घेतले होते व उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते.

🖍 फडके यांच्या बचावासाठी जनतेने उस्ताहाने निधीदेखील गोळा केला परंतू कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

🖍 अखेर जानेवारी 1880 मध्ये त्यांची तेहरान बोटीने एडण येथे रवानगी करण्यात आली व तेथेच 17 फेब्रुवारी 1883 रोजी तेथील इंग्रजांच्या होणारया छळाला बळी पडून त्यांचे निधन झाले.

🖍 "  देशप्रेमाने ओथंबलेला हिमलया सारखा उत्तुंग महापुरुष " असा फडकेंचा गौरव बंगालमध्ये प्रसिध्ह अमृतबाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर एका पत्रात केला होता.

इ.स. 1795 :- खर्ड्याची लढाई


🖍सदरील लढाई ही पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च 1795 साली महाराष्ट्रातील 
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता. जामखेड) येथे झालेली एक निर्णायक लढाई होती.
🖍मराठा साम्राज्यवादी विस्तार करू इच्छिणाऱ्या नाना फडणवीसने हैद्राबादच्या निजामाकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली होती. निजामाचा मंत्री मुशिर मुल्कने सदरील मागणी फेटाळून लावताच पेशवा, दौलतराव शिंदे (मादजी शिंदेचा 
वारस), तुकोजी होळकर व दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च 1795 मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. 
🖍यावेळी निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली असता ब्रिटिशांनी सदरील मदत नाकारली. परीणामी उघड्या मैदानावर मराठ्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. या किल्याला लगेचच मराठ्यांनी वेढा घातला व या किल्याला होणारा पाणी पुरवठा व अन्न पुरवठा खंडीत करुन किल्ल्या भोवती तोफा रचल्या.
🖍अखेर भयग्रस्त निजामाने 13 मार्च 1795 साली तहाची याचना करून लढाईतून माघार घेतली व या तहाने सदरील लढाईची सांगता झाली. या लढाईत पराभुत झाल्यावर निजामानेही इंग्रजांची साथ सोडून दिली.
              या तहातील अटींनुसार, 
🖍 निजामाने मराठ्यांना 5 कोटी रुपये, थकलेल्या चौथाई देण्याचे मान्य केले.
🖍स्वत:च्या ताब्यातील प्रदेशांपैकी एक तृतीअंश प्रदेश मराठ्यांचा स्वाधीन केला.
🖍दौलताबादचा किल्ला तसेच त्याच्या भोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला.
🖍तसेच वऱ्हाडचा प्रदेश नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला.

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

🖌व्हाॅईसराॅयच्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून निवडण्यात आलेले पहिले भारतीय व्यक्ती?
- सत्येन्द्रनाथ सिन्हा

🖌कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात अध्यक्ष असणारया पहिल्या महिला?
- अॅनी बेझंट

🖌कांग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात सर्वप्रथम जन गण मन  गाण्यात आले?
- 1911 चे कलकत्ता अधिवेशन

🖌महिलांना मताधिकाराचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते?
- त्रावणकोर कोचिन

🖌टिळक स्वराज्य फंड मध्ये 1 लक्ष रुपये किमतीचे दागिने दान करणारी पहिली महिला कोन?
- मन्नती अन्नपुर्नम्मा

🖌कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातील पहिल्या भारतिय महिला अध्यक्ष?
- सरोजिनी नायडू

🖌भारतातील कयदे मंडळाच्या निवडणूक लढविनार्या पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)

🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)

🖌 देशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?
- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी

🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?
- अब्दुल कलम आझाद

🖌 तुरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?
- सुभाषचंद्र बोस

🖌 तुरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?
- चित्तरंजन दास

🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?
- नेहरु अहवाल

🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?
- लोकमान्य टिळक

🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?
- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.

📚 कृषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?
- लॉर्ड बेंटींक

📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?
- मद्रास

📚 मुलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?
- लॉर्ड मेकॉले

📚 रेलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

📚 इंग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?
- सुरत

📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?
- लैंड होल्डर्स सोसायटी.

📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?
- नारायण मेघाजी लोखंडे

लखनऊ ऐक्य व लखनऊ करार

🖍गोखलेंच्या भारत सेवक समाजास होमरुल लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती, परंतु त्यांनी देखील भाषण दौरे आयोजित करुन होमरुलला पाठबळ दिले.

🖍होमरूल कार्यपध्दती ही गांधीजींना मान्य नव्हती व होमरूलसाठीची ही योग्य वेळ नाही असे त्यांचे मत होते. 

🖍या अधिवेशनासाठी टिळकांच्या होमरूल लीगने ‘काँग्रेस स्पेशल’ व ‘होमरूल स्पेशल’ म्हणून लखनौसाठी या दोन स्पेशल आगगाडयांची व्यवस्था केली.
🖍या अधिवेशनात ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये औपचारिकरित्या सामील करून घेण्यात आले. यास ‘लखनौ ऐक्य’ असे म्हणतात.

🖍आता काँग्रेसची दारही जहाल गटाला खुली झाल्यानंतर ती पुन्हा प्रभावीत तसेच गतीशील बनली व राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्याची ताकद तिच्यात पुन्हा निर्माण झाली.

🖍याअधिवेशनात एक मुखाने स्वराज्याची मागणी करण्यात आली.

🖍काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांच्या राजकीय मागण्या सारख्याच असाव्यात म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीग यांमध्ये एक करार करण्यात आला. त्यास लखनौ करार असे म्हणतात.

🖍या कराराव्दारे काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केली, तर मुस्लिम लीगने काँग्रेसच्या साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीचे समर्थन केले.

🖍तसेच मुस्लिमांच्या अल्पसंख्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी 
पाठविण्यासंबंधीची मागणी मुस्लिम लीगने काहीशी सौम्य केली.

🖍आता काँग्रेस व लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत मतैक्य होवून भारताच्या राजकीय क्षेत्रात समान उद्दिष्ट पूर्तीसाठी या संघटना सहकार्यास सिध्द झाल्या. (वस्तुत: काँग्रेसने व्यवहारीक दृष्टीकोनातून राष्ट्रीय सामंजस्यासाठी मुस्लिमांचे स्वतंत्र मतदार संघ आनंदाने स्विकारुन नाईलाजाने केलेली एक तात्विक तडजोड होती.)

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...