*· सिंधुदुर्ग----------------1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
*· जालना-----------------1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
*· लातूर-------------------16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
*· गडचिरोली--------------26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
*· मुंबई उपनगर---------1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
*· वाशिम-----------------1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
*· नंदुरबार----------------1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
*· हिंगोली----------------1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन
*· गोंदिया----------------1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
*· पालघर-----------------2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१३ डिसेंबर २०२१
महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती
जाणून घ्या :- ट्रेन व स्टेशनचे प्रकार
● *पॅसेंजर ट्रेन* : जी ट्रेन स्टेशनवर थांबते तिला पॅसेंजर ट्रेन म्हणतात.
● *एक्सप्रेस ट्रेन* : जी ट्रेन प्रमुख स्टेशनवर थांबते आणि तिचा वेग जास्त असतो तिला एक्सप्रेस ट्रेन म्हणतात.
● *मेल ट्रेन* : जी ट्रेन विशेष करून डाक सामुग्री घेवून जाते तिला मेल ट्रेन म्हणतात.
● *सुपरफास्ट ट्रेन* : या गाडीची गती तासी 100 कि.मी. पेक्षा जास्त असते म्हणून तिला सुपर फास्ट ट्रेन म्हणतात.
● *गुडस ट्रेन* : ही ट्रेन सामान किंवा वस्तु वाहून नेते. मालगाडीच्या डब्याला वॅगन आणि प्रवासी डब्याला कोच म्हणतात.
● *बुलेट ट्रेन* : या ट्रेनची गती सर्वात जास्त असते. ही ट्रेन विद्युत चुंबकीय बलच्या आधारे चालते.
● *मोनो ट्रेन* : ही ट्रेन पृथ्वीच्यावर अर्थात आकाशात रोप-वे सारखी चालते.
● *जनता एक्सप्रेस* : या ट्रेनमध्ये फक्त व्दितीय श्रेणीचे डब्बे असते.
● *अप ट्रेन* : जी ट्रेन मुख्यालयापसून निर्धारित स्टेशनपर्यंत जाते या प्रकाराला अप ट्रेन म्हणतात.
● *डाउन ट्रेन* : जी ट्रेन मुख्यालयाकडे निर्धारित स्टेशनपासून परत येते या गाडीला डाउन ट्रेन म्हणतात.
💁♂️ असे आहेत रेल्वे स्टेशनचे प्रकार :
1. *वे साईड स्टेशन* : यावरुन एकाच दिशेने गाड्या जाणे-येणे करतात.
2. *जंक्शन स्टेशन* : यावरुन वेगवेगळ्या दिशेने गाड्या (मार्ग) जातात.
3. *टर्मिनल स्टेशन* : हे स्टेशन शेवटचे असते.
4. *भूमिगत स्टेशन* : हे स्टेशन जमिनीच्या खाली असते.
भूगोल महत्त्वाची माहीती
♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके
3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके
♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास
3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)
🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)
1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229
Mpsc pre exam samples questions
1) एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसुल निश्चितीची पद्धत म्हणजे ____ यांचा समन्वय होता.
A. मक्ता, रयतवारी, कायमधारा
B. रयतवारी, महालवारी, मौजेवारी
C. मौजेवारी, कायमधारा, रयतवारी✍️
D. मक्ता, मौजेवारी, महालवारी.
________________
2) पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीले नाही ?
A. वक्तृत्त्व - कला आणि साधना
B. आमच्या आठवणी✍️
C. दगलबाज शिवाजी
D. माझी जीवन गाथा.
________________
3) होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?
A. खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू केली.
B. अमरावती होमरूल लीगचे खापर्ड अध्यक्ष होते.
C. यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते✍️
D. नागपूरच्या परिसरात मुंजेनी होमरूल लीगच्या शाखा स्थापन केल्या.
________________
4) ते लहूजींचे शिष्य होते.
लहूजींना त्यांचा अभिमान होता.
ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.
त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता.
ते कोण?
A. जोतीबा फुले✍️
B. यशवंत फुले
C. मेघाजी लोखंडे
D. नारायण लोखंडे.
________________
5) खालील व्यक्तींपैकी कोणी फग्र्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?
(a) बी.जी. टिळक
(b) जी.के. गोखले
(c) धों.के. कर्वे
पर्यायी उत्तरे :
A. (a), (b) फक्त
B. (b), (c) फक्त
C. (a), (c) फक्त
D. (a), (b), (c). ✍️
________________
6) पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
(a) : ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी
(b) द डिस्कवरी ऑफ इंडिया
(c) अँन ऑटोबायोग्राफी
पर्यायी उत्तरे :
A. (a), (b), (c)
B. (b), (c), (a)
C. (c), (a), (b)
D. (a), (c), (b). ✍️
________________
7) 'रयत शिक्षण संस्थेचे' _ हे उद्दिष्ट नव्हते.
A. मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे.
B. मुलाना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनविणे.
C. मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थांना मोफत शिक्षण देणे.
D. समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्रि-पुरुषांचे संघ निर्माण करणे.✍️
__________________
8) 1942 च्या भूमिगत क्रांतीकारकांचे नेतृत्व केल्या बद्दल दैनिक ट्रिब्यूनने '1942 ची झाँशीची राणी' म्हणून कोणाचा सन्मान केला होता?
A. सुचेता कृपलानी
B. मृदूला साराभाई
C. अरुणा असफ अली✍️
D. लीलाताई पाटील.
________________
9) _ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.
A. शंकरराव देव✍️
B. जमनालाल बजाज
C. के.एफ्. नरिमन
D. किशोरलाल मश्रूवाला.
________________
10) महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.
A. अहमदाबाद, चंपारण, खेड़ा
B. खेडा, अहमदाबाद, चंपारण
C. चंपारण, अहमदाबाद, खेड़ा ✍️
D. चंपारण, खेडा, अहमदाबाद.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?
(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’✅✅
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
____________ या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.
(A) भारत✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?
(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा✅✅
(D) सुशील चंद्र
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?
(A) वेस्ट इंडीज✅✅
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान
पहिले वृत्तपत्र म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे "दर्पण' पत्र ओळखले जाते.
🅾वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1832च्या प्रारंभी त्यांनी मुंबईतून हे वृत्तपत्र सुरू केले. पितामह दादाभाई नौरोजी यांच्यासारख्या थोर पुरुषांचे ते गुरू होत. न्या. ना. ग. चंदावरकरांनी त्यांचा पश्चिम भारतातील "आद्य ऋषी' असा त्यांचा सार्थ गौरव केला होता.
🅾"दर्पण'चा पहिला अंक शुक्रवार, दि. 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. पहिले काही महिने हे पत्र पाक्षिकच होते. 4 मे 1832च्या अंकापासून ते साप्ताहिक स्वरूपात निघू लागले. हे वृत्तपत्र आठ पानी होते व त्यात पानातील दोन स्तंभांपैकी डावीकडच्या स्तंभात इंग्रजी मजकूर व समोर उजवीकडील स्तंभात त्याचे मराठी भाषांतर असे. गंमत म्हणजे दर्पणच्या अंकाला "कागद' असे म्हटले जात असे.
🅾 तसा उल्लेख खुद्द बाळशास्त्री करीत असत. त्या काळी कोणत्याही वृत्तपत्राचा खप 300-400 प्रती याच्या पुढे नसे. वर्षभरातच दर्पणने 300ची मजल गाठली होती. हे पत्र सुमारे साडेआठ वर्षे चालले. 26 जून 1840 रोजी शेवटचा अंक प्रसिद्ध होऊन ते बंद पडले.
🅾"दर्पण'ची ओळख आद्य मराठी पत्र अशी असली, तरी त्याच्या अगोदर एक मराठी वृत्तपत्र अस्तित्वात असल्याचा पुरावा मिळतो. त्या वृत्तपत्राचे नाव "मुंबापूर वर्तमान' असे होते. रविवार, दि. 20 जुलै 1828 रोजी त्याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता.
🅾 या पत्राच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेला एक "विक्षिप्त' यांचा लेख "बॉम्बे गॅझेट' या मुंबईतील इंग्रजी पत्राने आपल्या 23 जुलै 1828 च्या अंकात प्रसिद्ध केला होता. लंडन येथे निघणाऱ्या "एशियाटिक जर्नल ऍण्ड मंथली रजिस्टर (फॉर इंडिया ऍण्ड इट्स डिपेन्डन्सीज)' या मासिकाच्या फेब्रुवारी 1829च्या अंकात "महरट्टा न्यूजपेपर' या मथळ्याच्या वृत्तात "मुंबापूर वर्तमान' या पत्राचा उल्लेख होता.
🅾हे वृत्त "दी बॉम्बे गॅझेट' या पत्राच्या 23 जुलै 1828 च्या अंकावरून घेतल्याचाही उल्लेख एशियाटिक जर्नलमध्ये होता. "बॉम्बे गॅझेट' मध्ये 9 जुलै 1828च्या अंकात या पत्राची इंग्रजी व मराठी जाहिरातही प्रसिद्ध झाली होती. परंतु या पत्राचे चालक, संपादक, प्रकाशक कोण होते, ते किती काळ चालले याची काहीच माहिती उपलब्ध नाही. एक मात्र खरे की ते 20 जुलै 1828 रोजी सुरू झाले. यावरून "मुंबई वर्तमान' हेच मराठीतील आद्य वृत्तपत्र असे म्हणता येईल.
🅾पण त्यातही एक गोची अशी, की "बॉम्बे गॅझेट'च्या प्रास्ताविकात "एक नवीन मराठी वर्तमान पत्र' असा उल्लेख आहे. याचा अर्थ त्यापूर्वी एखादे पत्र निघत होते की काय, अशी शंका "मराठी वृत्तपत्रांचा इतिहास'कर्ते रा. के. लेले यांनी व्यक्त केली आहे.
🅾परंतु कालानुक्रमे "दर्पण' हे पहिले मराठी वृत्तपत्र म्हणता आले नाही, तरी मराठी वृत्तपत्राचा पाया घालून त्याची थोर परंपरा सुरू करण्याचा मान "दर्पण'कडेच जातो, असा लेले यांचा अभिप्राय आहे.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
बंगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -
🔸बंगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.
🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.
🔸त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.
🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.
🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.
चलेजाव आंदोलन (१९४२).
🧩घटनाक्रम
🅾 क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
🅾 मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू.
🅾 (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर.
🅾 ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.
🅾गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.
🅾 कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
🅾 प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.
🅾बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
🅾 या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.
🅾सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
🅾या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
🅾 काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
🅾 व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
🅾मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
🅾 भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
🅾निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
🅾 स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
🅾 भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.
🧩छोडो भारत चळवळ.
🅾क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला.
🅾 ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले.
🅾 देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.
🧩नेताजी सुभाष चंद्र बोस...
🅾भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले.
🅾त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.
🧩आझाद हिंद सेना...
🅾ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
🅾नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
🅾१८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
🧩भारतीय नौदलाचा उठाव..
🅾आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली.
🅾या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
११ डिसेंबर २०२१
जॉब स्वीच करणं महागात पडणार! …तर नोकरी सोडताना संपूर्ण पगारावर भरावा लागणार १८ टक्के जीएसटी.
🔰आज अनेक श्रेत्रांमध्ये खास करुन माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रामध्ये नोकऱ्या बदलण्याचं प्रमाण फार वाढलं आहे. अनेकदा कंपन्या समोरच्या व्यक्तीला लवकरात लवकर नोकरीवर रुजू करुन घेण्यासाठी नोटीस पिरियड बाय आऊट करतानाही दिसतात.
🔰मात्र आता अशाप्रकारे नोटीस पिरियडचा कालावधी पूर्ण न करता नोकरी बदलण्याचा विचारात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशाप्रकारे नोटीस पीरियडचा कालावधी पूर्ण न करता नोकरी सोडताना नोटीस पीरियडच्या कालावधीमध्ये मिळालेल्या संपूर्ण वेतनावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.
🔰भारत पेट्रोलियमची सहाय्यक कंपनी असलेल्या ओमान रिफायनरीच्या प्रकरणात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क प्राधिकरणाने या पद्धतीचा निर्णय दिला आहे.
🔰तयानुसार कंपन्या भरत असलेले टेलिफोन बिल, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे ग्रुप इन्शुरन्स, नोटीस पीरियडच्या बदल्यात दिले जाणारे वेतन अशा सगळय़ा गोष्टी जीएसटीच्या अखत्यारीत येण्याची शक्यता असल्याचं वृत्त द इकनॉमिक टाइम्सने दिलं आहे.
भारत सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील; एक टक्के लोकांकडे देशाची २२ टक्के संपत्ती.
🔰जागतिक विषमता अहवाल २०२२ मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. भारत हा गरीब आणि असमानता असलेला देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताबाबत या अहवालात हा एक असा देश आहे जिथे लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नात ५७ टक्के वाटा आहे. तर खालच्या ५० टक्के विभागाचा केवळ १३ टक्के वाटा आहे, असे म्हटले आहे.
🔰हा अहवाल वर्ष २०२१ वर आधारित आहे. या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की २०२० मध्ये देशाचे जागतिक उत्पन्नही अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहे.
🔰‘जागतिक असमानता अहवाल २०२२’ नावाचा अहवाल लुकास चॅन्सेल यांनी लिहिला आहे जे ‘वर्ल्ड इनक्वालिटी लॅब’ चे सह-संचालक आहेत. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ञांनी हा अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारत आता जगातील सर्वाधिक असमानता असलेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा? आर काउंटमुळे ‘या’ शहरांची चिंता वाढली
🔰करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव देशात झाला असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कालच नव्यानं १० ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं होतं. याच दरम्यान महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात करोनाचा ‘आर काउंट’ १ च्या अगदी जवळ पोहोचला आहे. मुंबई-पुणे-ठाण्यात तर हा काउंट १पेक्षा पुढे गेलाय.
🔰आर व्हॅल्यू किंवा आर काउंट हा करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमित झालेल्या लोकांची संख्या सांगते. सध्या, आर चा देशातील काउंट एकापेक्षा कमी आहे. परंतु काही मोठ्या शहरांमध्ये तो झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना आर काउंट वाढत आहे. कोणत्याही रोगाच्या प्रसाराच्या दराला री-प्रॉडक्शन नंबर म्हणजेच आर-व्हॅल्यू म्हणतात. एखादा आजार एखाद्या संक्रमित व्यक्तीद्वारे सरासरी किती लोकांमध्ये पसरू शकते, याची माहिती सांगणारा हा ‘आर’ क्रमांक असतो.
🔰दशात महामारी संपण्यासाठी आर काउंट १ पेक्षा कमी असला पाहिजे. महाराष्ट्रात या आठवड्यात आर काउंट ०.९७वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये आर काउंट १पेक्षा जास्त आहे. पुण्यात तर हा काउंट १.१३वर पोहोचला आहे. तर मुंबई १.१०वर आणि ठाण्यात सर्वात जास्त १.१९ आहे. देशातील प्रमुख शहरांपैकी चेन्नई आणि बंगळुरूचा आर काउंट १.०४ वर आहे. तर राज्यांमध्ये कर्नाटक १.१२. जम्मू-काश्मीर १.०८ आणि तेलंगणा १.०५वर आहे.
ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढल्याने ब्रिटनमध्ये कठोर उपाययोजना जाहीर
🔰ब्रिटनमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या उपप्रकाराचे आणखी १३१ रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या ५६८ झाली आहे. या पार्श्वभूमीवर; शक्य असेल तेथे घरून काम करणे, मुखपट्टीबाबतचे विस्तारित नियम, तसेच कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राचा वापर यांसारख्या अधिक कठोर उपाययोजना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी जाहीर केल्या.
🔰दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या ओमायक्रॉन या अत्यंत संसर्गजन्य उपप्रकाराचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने ब्रिटन सरकारचे तथाकथित ‘प्लॅन बी’ हिवाळी धोरण या शुक्रवारपासून टप्प्या-टप्प्याने अमलात येणार आहे. हा उपप्रकार दोन ते तीन दिवसांत दुप्पट वेगाने वाढतो, असे जॉन्सन यांचे म्हणणे आहे.
🔰करोनाच्या यापूर्वी प्रबळ असलेल्या डेल्टा या उपप्रकारापेक्षा ओमायक्रॉनचा अधिक वेगाने प्रसार होतो, असे जॉन्सन यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
🔰‘नाट्यगृहे व चित्रपटगृहे यांसह सार्वजनिक अंतगृह स्थळी मुखपट्टी वापरण्यासारख्या कायदेशीर तरतुदी आम्ही शुक्रवारपासून लागू करू. घरून काम करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे आम्ही पुन्हा लागू करू. सोमवारपासून तुम्हाला शक्य असेल तर घरून काम करा आणि आवश्यक असेल तर कामावर जा, पण शक्यतो घरूनच काम करा’, असे आवाहन जॉन्सन यांनी केले.
मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन कुराणातील आयातींचं पठण करून झाले?; ‘त्या’ व्हायरल फोटोचं सत्य काय
🔰नाशिक येथे पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप काही दिवसांपूर्वीच झाला. यावेळी आयोजकांपासून विरोधकांपर्यंत सुरु असलेले वाद पाहायला मिळाले. भाजपाने संमेलनात सावरकरांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याचा आरोप करत आयोजकांवर टीका केली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना, या साहित्यनगरीला नाव देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
🔰तयानंतर आता महाराष्ट्रात पार पडलेल्या साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणमधील आयातींच्या पठणाने झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यासंदर्भात एक फोटो देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्राचे मंत्री जितेंद्र आव्हाड दिसत आहेत.
🔰अल्ट न्यूजच्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालमधील शंकराचार्य गुरुकुलच्या अध्यक्षा अर्पिता चॅटर्जी यांनीही हा फोटो शेअर करून हा दावा केला आहे. या ट्विटला चार हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत. यासोबत अनेकांनी हा फोटो शेअर करून महाराष्ट्र साहित्य संमेलनाची सुरुवात कुराणातील आयतींच्या पठणाने झाली, असेच म्हटले आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन महागात पडणार ; राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसविण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
या कायद्यानुसार वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये दंड, तर चार चाकी वाहन मालकांना दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल. लायसन्स (अनुज्ञप्ती)नसताही वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करुन नवीन कायदा आणला आणि त्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली. परंतु महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध केला. तत्कालिन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन मोटर वाहन कायद्याल तुर्तास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु राज्यात वाहतुक नियमांचे होणारे उल्लंघन आणि वाढते अपघात पाहता परिवहन विभाग नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही होता.
त्यानुसार परिवहन विभागाने १ डिसेंबर २०२१ ला अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालविल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये, तर चार चाकी चालकाला तीन हजार रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला चार हजार रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम ५०० रुपये होती. तीन वर्षांत दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड होणार आहे.
हॉर्नबिल फेस्टिव्हलचे आयोजन नागालैंड
*नागालँड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त (1 डिसेंबर 1963) दरवर्षी हॉर्नबिल फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते*. यावर्षी 1 ते 10 डिसेंबर 2021 दरम्यान हॉर्नबिल फेस्टिव्हलची 22 वी आवृत्ती आयोजित केली जाईल. नागा हेरिटेज व्हिलेज येथे राज्याच्या पर्यटन आणि कला आणि संस्कृती विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या सणाला हॉर्नबिल पक्ष्याचे नाव देण्यात आले असून हा *सण 2000 साली सुरू झाला*.
हॉर्नबिल हा *अरुणाचल प्रदेश आणि केरळचा राज्य पक्षी आहे*. हे भारतीय खंड आणि आग्नेय आशियामध्ये आढळते.
हा सांस्कृतिक उत्सव नृत्य, संगीत आणि पारंपारिक खाद्यपदार्थांसह, नागा समाजातील विविधतेचे प्रतिबिंब असलेल्या नागा समुदायाच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे वर्षानुवर्षे स्वीकारलेले कलात्मक प्रदर्शन आहे. त्याला 'उत्सवांचा उत्सव' असेही म्हणतात.
नागालँडच्या समृद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि जतन करणे तसेच तिची परंपरा प्रदर्शित करणे हा या उत्सवाचा उद्देश आहे.
▪️नागालँड स्थापना दिवस
५९ वा नागालँडचा स्थापना दिवस ०१ डिसेंबर २०२१ रोजी साजरा करण्यात आला.
▪️*नागालँड 1 डिसेंबर 1963 रोजी भारतीय संघराज्याचे 16 वे राज्य म्हणून अस्तित्वात आले*. नागालँड पूर्वेला *म्यानमार*, उत्तरेला *अरुणाचल प्रदेश*, पश्चिमेला *आसाम* आणि दक्षिणेला *मणिपूरने* वेढलेले आहे.
सरमती पर्वत रांग नागालँड आणि म्यानमार दरम्यान नैसर्गिक सीमा तयार करते, जी नागालँडची सर्वोच्च टेकडी देखील आहे*. राज्यातील सुमारे 70% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि येथील *मुख्य अन्न पीक हे भात* आहे, याशिवाय एकूण शेतीच्या 70% भागावर भाताची लागवड केली जाते. स्लॅश आणि बर्न पद्धतीची शेती येथे प्रचलित आहे ज्याला स्थानिक भाषेत *झुम शेती* म्हणतात. राज्यातील दिमापूर जिल्हा संपूर्ण देशाशी रेल्वे आणि हवाई वाहतुकीने जोडलेला आहे.
▪️हॉर्नबिल पक्षी.
हॉर्नबिल हा उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय आफ्रिका, आशिया आणि मेलेनशियामध्ये आढळणारा पक्षी आहे. *भारतात धनेश म्हणूनही ओळखले* जाते. हॉर्नबिल्स लांब, वक्र आणि चमकदार असतात.
लिओनेल मेस्सीने सातव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला.
❇️ लिओनेल मेस्सीने 2021 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून फ्रान्स फुटबॉलच्या नावावर सातव्यांदा बॅलोन डी'ओर जिंकला आहे. मेस्सीच्या प्रभावी कामगिरीमुळे अर्जेंटिनाला जुलैमध्ये कोपा अमेरिका विजेतेपद जिंकण्यात मदत झाली.
⚜️ मस्सीने 2009
⚜️2010
⚜️2011
⚜️2012 आणि
⚜️2015 मध्येही विजेतेपद पटकावले होते.
❇️ तयाने पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडस्की यांना मागे टाकले.
❇️रोनाल्डोच्या नावावर सहा जेतेपदे आहेत.
❇️रोनाल्डोने 2008, 2013, 2014, 2016, 2017 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते.
⚠️ बलन डी'ओर 2021 विजेते..
1. बॅलोन डी'ओर (पुरुष) : लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)
2. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्लब: चेल्सी फुटबॉल क्लब
3. सर्वोत्कृष्ट गोलकीपरसाठी याशिन
जियानलुइगी डोनारुम्मा (इटली)
4. बॅलन डी'ओर (महिला): अलेक्सिया पुटेलास (बार्सिलोना स्पेन)
5. वर्षातील सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर : रॉबर्ट लेवांडोव्स्की (बायर्न म्युनिक/पोलंड)
6. सर्वोत्कृष्ट युवा पुरुष खेळाडूसाठी कोपा करंडक : पेद्री (बार्सिलोना स्पेन)
⚠️ बलोन डी'ओर' पुरस्कार विषयी...
❇️फरान्स फुटबॉल' या फ्रेंच फुटबॉल मॅगझिनद्वारे बॅलन डी'ओर पुरस्कार दरवर्षी दिला जातो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो.
❇️ सटॅनले मॅथ्यूज यांना हा पुरस्कार *पहिल्यांदा 1956* मध्ये देण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा - सिंधूला उपविजेतेपद
भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडिमटन मालिकेच्या अंतिम टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला कोरियाच्या आन सेयंगने सरळ गेममध्ये पराभूत केले.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळात जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत १९ वर्षीय सेयंगने तिचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. ४० मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूला सेयंगचा बचाव भेदता आला नाही किंवा तिने केलेल्या वेगवान खेळाचे उत्तरही देता आले नाही. सिंधूची सरळ गेममध्ये पराभूत होण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली.
सिंधूने वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे २०१८ मध्ये जेतेपद पटकावले होते. यंदा अंतिम लढतीत तिला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये सुरुवातीलाच ती ०-४ अशी मागे पडली. सेयंगने वेगवान पद्धतीने खेळ करत १६-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सेयंगला हा गेम २१-१६ असा जिंकण्यात यश आले.
कावेरी नदी
🔘दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे.
🔘तिला पोंनी असेही उपनाव आहे.
🔘ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे.
🔘कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील [तळकावेरी][कर्नाटक] येथे आहे.
🔘कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे.
🔘कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.
⚫️कावेरी नदी : उपनद्या⚫️
🔹शिमशा
🔹हमवती
🔹अर्कावती
🔹होन्नुहोळे
🔹लक्ष्मणतीर्थ
🔹काबिनी
🔹भवानी
🔹नोय्याल नदी
🔹अमरावती नदी सिरपा
🔹लोकपावनी
भारतातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI in India)
ऑगस्ट 1991 मध्ये केंद्र सरकारने स्विकारलेल्या उदरीकरणाच्या धोरणामुळे देशात परकीय तंत्रज्ञान व परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग सुलभ झाला.
परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीची संमती व्यवस्था (Approval to FDI in India) – भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस दोन प्रकारे संमती दिली जाते –
1) Automatic Route आणि
2) Government Approval Route.
1) परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक संमत करण्यात आली आहे. Automatic Route व्दारे परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी भारत सरकारची किंवा रिझर्व्ह बँकेची पूर्व संमती घेण्याची आवश्यकता नसते. मात्र गुंतवणुकानंतर (inward remittances प्राप्त होण्यास सुरुवात झाल्यापासून) 30 दिवसांच्या आत रिझर्व्ह बँकेच्या संबंधित विभागीय कार्यालयास गुंतवणुकीची अधिसूचना देऊन कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
2) ज्या क्षेत्रांमध्ये Automatic Route संमत नाही अशा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक Government Approval Route व्दारे संमत केली जाते. अशा गुंतवणुकीसाठी सरकारच्या पूर्व संमतीची आवश्यकता असते.
महाराष्ट्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक :
ऑगस्ट 1991 ते स्पटेंबर 2010 दरम्यान महाराष्ट्रात भारत सरकारने 84,958 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 4,221 प्रकल्प संमत केले.
प्रकल्प संख्या तसेच एकूण परकीय गुंतवणुकीबाबत हे प्रमाण सर्वाधिक आहे.
महाराष्ट्राखालोखाल प्रकल्प संख्येबाबत तमिळनाडू, आंध्रप्रदेश व गुजराथ यांचा क्रमांक लागतो, तर गुंतवणुकीबाबत तामिळनाडू, गुजराथ व आंध्रप्रदेश यांचा क्रमांक लागतो.
वाचा संपूर्ण माहिती :- जनरल बिपीन रावत
🔸नाव : बिपीन लक्ष्मणसिंग रावत
🔹जन्म : 16 मार्च 1958, पौडी , उत्तर प्रदेश
🔸मत्यू : ८ डिसेंबर २०२१ (वय ६३) कुन्नूर , तामिळनाडू
🔹मत्यूचे कारण : हेलिकॉप्टर अपघात
🔸जोडीदार : मधुलिका रावत
🔹गरुकुल
-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( बीएससी )
-यूएस आर्मी कमांड अँड जनरल स्टाफ कॉलेज
-मद्रास विद्यापीठ
-चौधरी चरण सिंग विद्यापीठ ( पीएचडी )
🔸शाखा/सेवा : भारतीय सैन्य सेवा (6 डिसेंबर 1978 - 8 डिसेंबर 2021)
🔹यनिट : 5/11 गोरखा रायफल्स
🔸सवा क्रमांक : IC-35471M
🔹पहिले भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख संरक्षण कर्मचारी (CDS)✅
(1 जानेवारी 2020 - 8 डिसेंबर 2021)
🔸चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे 57 वे अध्यक्ष
(27 सप्टेंबर 2019 - 31 डिसेंबर 2019)
🔹26 वे लष्करप्रमुख.
(31 डिसेंबर 2016 - 31 डिसेंबर 2019)
🔸लष्कराचे 37 वे उपप्रमुख
(1 सप्टेंबर 2016 - 31 डिसेंबर 2016)
🔹परस्कार
-परम विशिष्ट सेवा पदक
-अति विशिष्ट सेवा पदक
-युद्ध सेवा पदक
-सेना पदक
-विशिष्ट सेवा पदक
शहीद भगतसिंग आणि गांधीजी
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बाँब फ़ेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. .
महात्मा गांधींनी या संदर्भात लक्ष घालावे अशी त्यांना विनंती करण्यात आली. भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा काही उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरला मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला. मुख्य म्हणजे २३ मार्च रोजीच गांधी यांनी आयर्विन यांना पत्र लिहून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे समर्थन केले - "कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरवले."
भगतसिंगांचा मार्ग जरी गांधीजींना पसंत नव्हता तरी त्यांच्याबद्दल गांधीजींना प्रचंड आदर होता. त्यांच्या फाशीनंतर ’यंग इंडिया’मध्ये लेख लिहून गांधीजींनी त्यांच्या हौतात्म्याला आदरांजली वाहली
Latest post
महत्त्वाच्या आयोगांची माहिती
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
✅ पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर ( सातारा ) ✅ दुसरा मधुबन हनी पार्क - बोरिवली ( मुंबई ) ✅ पहिले सौरग्राम गाव - मान्याचीवाडी ( सातारा ) ✅...
-
📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...