११ डिसेंबर २०२१

सविस्तर वाचा - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष, सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया, पात्रतापहिल्यांदाच निश्चित करण्यात आली आहे.

♦️सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पात्रता ठरवण्यात आली असून आता आयोगावरील राजकीय नियुक्त्यांना काही प्रमाणात चाप लागण्याची शक्यता आहे.
♦️एमपीएससीच्या माध्यमातून
शासनाच्या विविध विभागांसाठीच्या
पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात
येते.
♦️आतापर्यंत एमपीएससीच्या अध्यक्ष, सदस्यांसाठी निश्चित अशी पात्रता नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये एका याचिकेमध्ये दिलेल्या आदेशानुसार
आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांची
पात्रता, निवड प्रक्रिया निश्चित
करण्यासाठीचे पत्र राज्यपालांनी
२०१७ मध्ये दिले होते.  त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
♦️सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख सचिव सीताराम कुंटे यांनी आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांची पात्रता, निवड प्रक्रियेसंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
🔵आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्ष आणि सदस्यांसाठी पात्रता आणि निवड प्रक्रियेसाठीची मार्गदर्शक तत्त्वे
निश्चित करण्यात आली आहेत.
♦️त्यामुळे आता या पद्धतीनेच निवड करावी लागणार असल्याने राजकीय नियुक्त्यांना चाप लागण्याची शक्यता
आहे.

🔳निवडीची पात्रता आणि प्रक्रिया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1⃣अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती नेमली जाईल.
2⃣आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांचा समावेश आहे.
3⃣त्यात आयोगाच्या अध्यक्षपदासाठी केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेतील किमान दहा वर्षांचा अनुभव असलेला अधिकारी
किंवा शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक
दर्जाची व्यक्ती असेल.
4⃣किमान वय पन्नास वर्षे असेल.
5⃣सहावर्षासाठीच त्यांना आयोगात काम करता येईल.
6⃣सदस्यांसाठीही हीच पात्रता असेल.
7⃣आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य
निष्कलंक, चारित्र्यसंपन्न, अनुभवी
असणे अपेक्षित आहे.
8⃣आयोगाचे अध्यक्ष प्रशासकीय सेवेतील
असल्यास किमान दोन सदस्य प्रशासकीय सेवेतील असतील.
9⃣अध्यक्ष अध्यापन क्षेत्रातील असल्यास किमान तीन सदस्य प्रशासकीय सेवेतील असतील.
🔟तर राज्य शासनाच्या अधिनस्त मंडळे,
महामंडळे, प्राधिकरणे,स्थानिक
स्वराज्यसंस्थांतून शक्यतो दोन
सदस्य असतील.
1⃣1⃣अध्यक्ष, सदस्यांच्या निवडीसाठी जाहिरात देऊन प्रक्रिया राबवलीजाईल.
1⃣2⃣शोध समितीने तयार केलेल्या यादीतून योग्य उमेदवारांची शिफारस मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना करण्यात येईल.
1⃣3⃣त्यानंतर राज्यपाल निवडीसंदर्मातील अंतिम आदेश देतील.

🔴सध्या आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर अोक आहेत.

✳️संघलोकसेवा आयोगासंबंधातील घटनात्मक तरतुदी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌कलम 315- संघ आणि राज्यांसाठी लोकसेवा आयोग.
📌कलम 316- सदस्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ.
📌कलम- 317 लोकसेवा आयोगाच्या सदस्याची बडतर्फी आणि निलंबन.
📌कलम-318 आयोगाचे सदस्य आणि कर्मचारी यांच्या सेवाशर्तीबाबत नियम करण्याचा अधिकार.
📌कलम- 319 आयोगाच्या सदस्यांनी, असे सदस्यत्व समाप्त झाल्यावर पदे धारण करण्याबाबत मनाई.
📌कलम 320 लोकसेवा आयोगाचे कार्याधिकार.
📌कलम 321 लोकसेवा आयोगांचे कार्याधिकारामध्ये विस्तार करण्याचा अधिकार.
📌कलम - 322 लोकसेवा आयोगांचा खर्च.
📌कलम- 323 लोकसेवा आयोगांचे अहवाल.

ग्रामपंचायत

भारतीय घटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात ‘मुंबई ग्रामपंचयात अधिनियम 1958’ उपकलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे.

स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधीत गावची लोकसंख्या कमीतकमी 600 असली पाहिजे.

जर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच म्हणतात.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते.

महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यसंख्या 7 ते 17 अशी आहे.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार (सदस्यसंख्या निश्चित करण्याचा अधिकार) जिल्हाधिकार्‍यास असतो.

📌महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या

600 ते 1500   –  7

1501 ते 3000   – 9

3001 ते 4500  – 11

4501 ते 6000  – 13

6001 ते 7500  – 15

7501 ते पेक्षा जास्त  -17 
 

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.

ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.

ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.

संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.

महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.

ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.

सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.

सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.

ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.

ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.

ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.

ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.

सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.

महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.

एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.

सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.

सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.

सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.

ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.

जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.

सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.

नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.

ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.

ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.

ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.

ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.

सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.

जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.

सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.

ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.

न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.

सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.

न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज

महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर

महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा

महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग

ग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास असतो.  

काय आहे पक्षांतर बंदी ?

- भारतीय राजकारणात 1967 पर्यंत पक्षांतर बंदीच्या विरोधात कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती.
- 1967 नंतर पक्षांतरबंदी कायद्याची आवश्यकता वाटू लागली. कारण 1967 मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. पण त्यानंतर मोठय़ा प्रमाणावर पक्षांतरे सुरू झाली. सुमारे 125 पेक्षा जास्त खासदार आणि दोन हजारांच्या आसपास आमदारांनी पुढे 10 वर्षांमध्ये पक्षांतर केले. हरयाणामध्ये काही आमदारांनी तीन-तीन वेळा पक्षांतरे केली होती. यातूनच आयाराम-गयाराम संस्कृती रूढ झाली.
- हरयाणामध्ये भजनलाल यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना मंत्रिमंडळासह पक्षांतर केले होते. पक्षांतरे वाढू लागल्याने पक्षांतरबंदी कायद्याची आवश्यकता भासू लागली.

Que: पक्षांतरबंदी कायदा केव्हा लागू झाला?
》राजीव गांधी पंतप्रधान असताना घटना दुरुस्ती करण्यात आली. ती 52वी घटना दुरुस्ती होती. 1985 पासून देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला.
》एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते पक्षांतर होत नाही, अशी मूळ कायद्यात तरतूद करण्यात आली होती.

Que: सदस्य अपात्र कसा ठरतो ?
》लोकसभा किंवा विधिमंडळ सदस्य पक्षादेशाचे (व्हिप) पालन न केल्यास अपात्र ठरू शकतात. अन्य पक्षात प्रवेश करणे किंवा पक्षादेश डालवून मतदान केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो. याशिवाय अन्य पक्षांना मदत करणे किंवा त्यांच्या बैठकांना हजेरी लावल्यासही सदस्य अपात्र ठरू शकतो.
》बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद यादव यांनी त्याला विरोध केला होता. नितीशकुमार यांना विरोध दर्शवित त्यांनी वेगळ्या व्यासपीठावर पक्षाच्या विरोधात भाषणे केली होती. या मुद्दय़ावर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.

Que: पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली
》पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदीतील पळवाटांचा अनेकांनी फायदा घेतला होता. मूळ कायद्यात एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते वैध मानले जायचे.
》2003 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार एकूण सदस्यसंख्येच्या दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरच सदस्यत्व कायम राहू शकते.

Que: कायद्याचा उद्देश साध्य झाला का?
》सदस्यांच्या पक्षांतरांवर बरीच बंधने आली. पण गट करून अन्य पक्षांमध्ये प्रवेश करण्यावर काहीच नियंत्रण ठेवता आलेले नाही. गोवा आणि कर्नाटक ही ताजी उदाहरणे आहेत.
》कायद्यातील पळवाटा दूर करून सदस्यांच्या पक्षांतरांना आळा बसेल या पद्धतीने कायद्यात सुधारणा करण्यावर लोकसभेचे माजी सचिव पी डी टी आचार्य यांनी भर दिला.

विधानपरिषदेची रचना

विधानपरिषदेमध्ये than० पेक्षा कमी सदस्य किंवा विधानसभेच्या एकूण सदस्यांपैकी जास्तीत जास्त एक तृतीयांश सदस्यांचा समावेश असेल, जो या विभागात प्रदान केलेल्या पद्धतीने निवडला जाईल.

Members० सदस्य विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातील

महाराष्ट्रातील सात प्रभागांमधून (मुंबई, अमरावती विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग आणि पुणे विभाग) पदवीधारकांमधून members सदस्य निवडले जातात.

महाराष्ट्रातील सात विभागांतील शिक्षकांमधून members सदस्य निवडले जातात (मुंबई, अमरावती विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग व पुणे विभाग)

महाराष्ट्रातील २१ प्रभागातून (मुंबई (२ जागा) आणि अहमदनगर, अकोला-कम-वाशिम-कम-बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद-कम-जालना, भंडारा-गोंदिया) मधील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी २२ सदस्य निवडले गेले आहेत. , धुळे-कम-नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद-कम-लातूर-कम-बीड, परभणी-हिंगोली, पुणे, रायगड-कम-रत्नागिरी-कम-सिंधुदुर्ग, सांगली-कम-सातारा , सोलापूर, ठाणे-कम-पालघर, वर्धा-कम-चंद्रपूर-कम-गडचिरोली आणि यवतमाळ)

राज्यपालाद्वारे साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ आणि सामाजिक सेवाशास्त्र या विषयांबद्दल विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असणार्‍या १२ सदस्यांची नेमणूक

हे एक सतत घर आहे आणि विघटनास अधीन नाही. तथापि, त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दुसर्‍या वर्षी सेवानिवृत्त होतात आणि त्यांची जागा नवीन सदस्यांनी घेतली आहे. अशा सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषदेचे सभासद त्याचे अध्यक्ष व उपसभापती निवडतात.

महाराष्ट्र विधानसभा

महाराष्ट्र विधानसभेच्या खालच्या घर आहे या दोन सभा च्या विधीमंडळ भारतीय राज्य महाराष्ट्र . तो मध्ये स्थित आहे नरिमन पॉइंट परिसरात च्या दक्षिण मुंबई मध्ये राजधानी मुंबई . सध्या विधानसभेचे 24 सभासद थेट एक मतदारसंघातून एका जागेवरुन निवडून येतात आणि एका सदस्याला उमेदवारी दिली जाते. सदस्य वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्र विधानपरिषदेची मार्फत निवडून येतात निवडणूक कॉलेज . महाराष्ट्र विधानसभेच्या २88 जागांपैकी २ जागा अनुसूचित जातीसाठी आणि २ Sched अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. 

मराठी व्याकरण शब्दाच्या जाती

📚📚मराठी व्याकरण 📚📚
    ♦️ शब्दाच्या जाती ♦️
__________________________

1] नाम -

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.

उदाहरण - घर, आकाश, गोड, गणेश...
__________________________

2] सर्वनाम-

जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरण - मी, तू, आम्ही, हा, जो, तो, कोण......
__________________________

3] विशेषण-

जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.

उदाहरण - गोड, उंच, सुंदर, चपळ, चातुर....
__________________________

4] क्रियापद-

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण - बसणे, पळणे, जातो.....
__________________________

5] क्रियाविशेषण-

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.

उदाहरण - इथे, तिथे, आज, उद्या....
__________________________

6] शब्दयोगी अव्यय-

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी,
__________________________

7] उभयान्वयी अव्यय-

जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - व, आणि, किंवा, परंतु.....
__________________________

8] केवलप्रयोगी अव्यय-

जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - अरेरे, अबब.....

सामान्य विज्ञान : सराव परीक्षा

प्र.१. वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.
A) लघु वारंवारतेचा
B) उच्च वारंवारतेचा ✅
C) मध्यम वारंवारतेचा
D) यापैकी नाही

प्र.२. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?
A) विहिरीतील
B) नळाचे
C) तलावाचे
D) पावसाचे ✅

प्र.३. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?
A) डॉ. हॅन्सन ✅
B) डॉ. रोनॉल्ड
C) डॉ. बेरी
D) डॉ. निकेल्सनू

प्र.४. ७ कि.मी. = डेकामीटर ?
A) ७०
B) ७०० ✅
C) ७०००
D) ०.७००

प्र.५. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?
A) स्ट्रेप्टोमायसिन ✅
B) पेनिसिलिन
C) डेप्सॉन
D) ग्लोबुलिन

प्र.६. कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?
A) कावीळ
B) विषमज्वर
C) अतिसार
D) वरील सर्व ✅

प्र.७. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली?
A) एडवर्ड जेन्नर ✅
B) लुई पाश्चर
C) श्याम विल्मुट
D) कार्ल स्टिनर

प्र.८. विद्यूत शक्ती _ मध्ये मोजतात.
A) वॉल्ट
B) केल्वीन
C) वॅट ✅
D) कॅलरी

प्र.९. ढगांचा गडगडात वीज चमकल्यानंतर थोड्यावेळाने ऐकू येतो; कारण
A) ढग आकाशात खूप उंचावर असतात
B) प्रकाश व आवाजाची गती समान असते
C) प्रकाशाची गती ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त असते ✅
D) ध्वनीची गती प्रकाशाच्या गती पेक्षा जास्त आहे

प्र.१०. तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते, जेव्हा तुम्ही
A) खुर्चीवर बसलेले असता
B) जमिनीवर बसलेले असता
C) जमिनीवर झोपलेले असता ✅
D) जमिनीवर उभे असता

वैज्ञानिक संकल्पना

अश्चशक्ती (Horse Power)
यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.

व्होल्ट (Volt)
विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.

नॉट
जहाजाच्या वेगाचे परिमाण.  हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.

कार्य
वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर

बार
बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.

सराव  प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती ) 


1. अंजू 8:30 ला 15 मिनिटे कमी असतांना शाळेत पोहोचली ती पोहचली तेव्हा शाळा सुरु होऊन अर्धा तास झाला होता तर तिच्या रोजच्या शाळेची वेळ कोणती?
7: 45
8: 00
8: 15
8: 30

● उत्तर - 7: 45

2.
राधाने एका स्पर्धा परिक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उतरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उतरासाठी 2 गुण 100 गुण मिळाले तर त्याच्या बरोबर उतरांची संख्या किती?
60
65
70
75

● उत्तर - 60

3. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
5, 8, 17, 24, 37, 48, 65, _.
65
80
82
99

● उत्तर - 80

4. एक परिचारिका तिच्या रोग्याला दर 10 मिनिटांनी एक गोळी देते तर तिच्या पाच तासाच्या पाळीत तिला किती गोळ्या घाव्या लागतील?
20
25
30
31

● उत्तर - 30

5.
एका सांकेतिक भाषेत 743 म्हणजे “green colour book”, म्हणजे “ blue colour cover” आणि 794 म्हणजे “ green colour earth” तर 9 हा अंक कोणत्या शब्दासाठी आलेला आहे?
green
colour
cover
earth

● उत्तर - earth

6.
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा  121, 222, __, 424, 525

302
323
333
324

● उत्तर - 323

7. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
111, 126, 141, ____, 201, 216.
114
156
251
168

● उत्तर - 156

8. एका सांकेतिक भाषेत NO = 56, DE =98 तर DONE = ?
56105
9856
9658
8965

● उत्तर - 9658

9. एका सांकेतिक लिपीत IN = 914 तर NO =?
1415
1425
1417
1396

● उत्तर - 1415

10.
एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय?
rust
nsb
mabs
kurt

● उत्तर - mabs

*आजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी व स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवण्यासाठी  लिंकवर क्लिक करा     https://wa.me/917798653068?text=Join*




मराठी व्याकरण - समास व त्याचे प्रकार

काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्‍याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

उदा.

वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.

पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट

कांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.

पंचवटी – पाच वडांचा समूह

समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

1. अव्ययीभाव समास

2. तत्पुरुष समास

3. व्दंव्द समास

4. बहुव्रीही समास

1)  अव्ययीभाव समास :

ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.

अ) मराठी भाषेतील शब्द

उदा.  

गावोगाव– प्रत्येक गावात

गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत

दारोदारी – प्रत्येक दारी

घरोघरी – प्रत्येक घरी

मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.

ब) संस्कृत भाषेतील शब्द

उदा.  

प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन

आ (पर्यत) – आमरण

आ (पासून) – आजन्म, आजीवन

यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.
वरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपस्वर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे.

क) अरबी व फारसी भाषेतील शब्द

उदा.

दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.

गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त

हर (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा

बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक

वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


🔰1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
     ‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’

▪️1) ती गाडी  
▪️ 2) शिगोशिग   
▪️3) भरली होती  
▪️ 4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ✅

🔰2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा.

◾️ 1) कर्मणी प्रयोग  
◾️ 2) कर्तरी प्रयोग    ✅
◾️ 3) भावे प्रयोग  
◾️ 4) शक्यकर्मणी प्रयोग

🔰3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

▪️ 1) मध्यमपद लोपी समास    
▪️ 2) समाहार व्दंव्द
▪️ 3) इतरेतर व्दंव्द      
▪️ 4) कोणताही नाही✅

🔰4) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’

▪️अ) दोन शब्द जोडताना       
▪️ब) संबोधनाकरिता वापर केला जातो▪️क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी  
▪️ ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

▪️1) ब बरोबर
▪️2) ब, ड बरोबर
▪️3) क     
▪️4) अ, ड बरोबर ✅

🔰5) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)

▪️1) श्लेष अलंकार   
▪️2) यमक अलंकार  
▪️ 3) अतिशयोक्ती अलंकार
▪️4) उपमा अलंकार ✅

🔰6) सिध्द शब्द ओळखा.
  
▪️1) येऊन  
▪️2) ये      ✅
▪️3) येवो    
▪️4) येणार

🔰7) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

▪️1) व्यागार्थ  
▪️ 2) लक्षार्थ    ✅
▪️3) वाच्यार्थ   
▪️4) संकेतार्थ

🔰8) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

▪️1) जल      ✅
▪️2) जलद    
▪️3) ढग     
▪️4) क्षार

🔰9) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

▪️1) उन्नत   
▪️2) अवनत  
▪️ 3) आरोहण    ✅
▪️4) प्रारंभ

🔰10) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

▪️1) हात ओला तर मित्र भला    ✅
▪️2) मूल होईना सवत साहीना
▪️3) मनास मानेल तोच सौदा  
▪️ 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मोहनदास करमचंद गांधी


 

 (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८)

हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.

अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

 रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.
 सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.

त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

❇️महात्मा गांधी : विकिपीडिया ❇️

जन्म:
ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत

मृत्यू:
जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, 

भारतचळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना:

अखिल भारतीय काँग्रेस

पुरस्कार:

टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती, Order of the Companions of O. R. Tambo

प्रमुख स्मारके:राजघाट

धर्म:हिंदू

प्रभाव:लिओ टॉलस्टॉय
जॉन रस्किन
गोपाळ कृष्ण गोखले

पत्नी:कस्तुरबा गांधी

अपत्ये:हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...