१८ नोव्हेंबर २०२१

General Knowledge



● कोणत्या दिवशी ‘जागतिक द्रुक-श्राव्य वारसा दिवस’ साजरा करतात?

उत्तर : २७ ऑक्टोबर


● कोणत्या व्यक्तीची २६ ऑक्टोबर २०२१ रोजी कॅनेडा देशाचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? 

उत्तर : अनिता आनंद


● कोणत्या संस्थेने ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर : यूवुईकॅन फाउंडेशन


● कोणत्या संस्थेसोबत भारत सरकारचा ऐझवाल (मिझोरम) शहरातील गतिशीलतेच्या प्रकल्पाला वित्तपूरवठा करण्यासाठी ४.५ दशलक्ष डॉलर एवढ्या कर्जासाठी करार झाला?

उत्तर : आशियाई विकास बँक


● कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस” साजरा करतात? 

उत्तर : २८ ऑक्टोबर


●  कोणत्या संस्थेने HDFC बँकेद्वारे HDFC ERGO कंपनीच्या थकबाकी भांडवली समभागांमधील ४.९९  टक्क्यांच्या खरेदीला मंजूरी दिली?

उत्तर : भारतीय स्पर्धा आयोग


● ____ देशाच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर २०२१ रोजी १६ वी पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित करण्यात आली.

उत्तर : ब्रुनेई


● कोणत्या मंत्रालयाने “संभव” नावाचा राष्ट्रीय स्तरावरील जागृती ई-कार्यक्रम आयोजित केला? 

उत्तर :  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय


●  कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय वित्तीय पायाभूत सुविधा आणि विकास बँक (NaBFID) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली?

उत्तर :  के व्ही कामत

महाराष्ट्र शासनाने या संज्ञा दिल्या आहेत.काही महत्त्वाच्या संज्ञांचे अर्थ:


१) राज्याचा एकत्रित निधी (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/१) : राज्याला विविध मार्गातून मिळणारा संपूर्ण महसूल, राज्याद्वारे उभारलेले सर्व कर्ज आणि कर्ज परताव्यामध्ये राज्याला मिळणारे सर्व उत्पन्न म्हणजे राज्याचा एकत्रित निधी होय. शासनाच्या विविध कार्यावर होणारा खर्च या एकत्रित निधीतून भागविला जातो.


२) आकस्मिता निधी ( राज्यघटनेचा अनुच्छेद २६७/२) :अर्थसंकल्पात तरतूद न केलेले अकस्मात उद्भवलेले अत्यंत महत्त्वाचे खर्च भागविण्याकरिता किंवा अनेकदा केलेली तरतूद अपुरी असल्यामुळे आणि खर्च मात्र अत्यावश्यक असल्यास असा खर्च भागविण्याकरिता या आकस्मिता निधीची तरतूद केली जाते. हा खर्च पुढे पूरक मागण्यांच्या रूपात विधानमंडळात मंजुरीकरिता मांडण्यात येतो व त्याकरिता पुनर्विनियोजन करण्यात येते.


३) लोकलेखा (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/२) : यामध्ये एकत्रित निधीमध्ये अंतर्भूत केलेल्या रकमा वगळून शासनाला किंवा शासनाच्यावतीने मिळालेल्या इतर सर्व रकमा जमा करण्यात येतात. यातील व्यवहार बँकिंग व समायोजनाच्या स्वरूपाचे असल्याने यातून खर्च करण्यासाठी विधानमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता नसते. म्हणजेच लेखांच्या बाबतीत राज्यशासन बँकरची भूमिका करीत असते आणि ज्यावर व्याज देत असते व परत करण्याची जबाबदारी राज्यशासनाची असते असा निधी अथवा लेखे.


उदा. अल्पबचतचे पैसे, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, राज्यमार्ग निधी, शिक्षण उपकरनिधी इ. लोकलेखा स्वतंत्रपणे सांभाळला जातो आणि तो राज्याच्या एकत्रित निधीचा भाग असत नाही.


४) दत्तमत खर्च : राज्याच्या एकत्रित निधीतून करावयाच्या खर्चाच्या पै अन् पैची मान्यता ही विधानसभेतून घ्यावी लागते. यातील काही बाबी सोडल्या तर सर्व खर्च हा दत्तमत असतो म्हणजे ज्याला मतदानाने मंजुरी मिळवावी लागते. याचा अर्थ असा की विभागाच्या खर्चाच्या मागण्या या विधानसभेत मतदानाला टाकाव्या लागतात आणि त्या मतदानाने मान्य होतात.


५) भारित खर्च : हा खर्च मतदानाला टाकला जात नाही तर हा राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असतो. त्यामुळे विधानसभा याला नाकारू शकत नाहीत. उदा. मा. न्यायमूर्ती, मा. राज्यपाल, मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष विधानसभा, मा. सभापती व उपसभापती विधानपरिषद यांचे पगार, भत्ते आदींचा खर्च शासनाच्या कर्जावरील व्याजाचा खर्च, न्यायालयाच्या आदेशान्वये भागवायचा खर्च इत्यादी.


६) योजनांतर्गत खर्च : राज्याच्या वार्षिक योजनेअंतर्गत असलेला खर्च. हा खर्च संपूर्णपणे विकासात्मक खर्च असतो.


७) योजनेतर खर्च : योजनेतर खर्चात सर्वसाधारणपणे राज्याचे सर्व विकासेतर खर्च भागविले जातात. उदा. कर्मचाऱ्यांचे पेन्शन, कायदा सुव्यवस्था व करवसुली यावर येणारा खर्च, सामान्य प्रशासनावर येणारा खर्च इत्यादी.


८) महसुली लेखे : हे दोन प्रकारचे असतात.

A. महसुली जमा : राज्यशासनाचे सर्व प्रकारचे कर, सेस, शुल्क या माध्यमातून येणारे उत्पन्न, केंद्रीय कर व शुल्कातील राज्याला मिळणारा हिस्सा व करेतर उत्पन्न जसे की प्राप्त होणारे व्याज, फी, शास्तीचे उत्पन्न तसेच केंद्र शासनाकडून मिळणारी विविध अनुदाने याला महसुली जमा असे म्हणतात.

B. महसुली खर्च : राज्यप्रशासन, राज्य विधानमंडळ, करवसुली यावर होणारा खर्च, कर्ज परतफेड आणि व्याज प्रदान करणे. पेन्शन तसेच विविध संस्थांना अनुदाने देणे व शासनाच्या विविध विभागांतर्गत प्रशासकीय खर्च करणे.


९) भांडवली लेखे : हे खालील प्रकारचे असतात.


अ . महसुली लेखा बाहेरील भांडवली खर्च : शासनाने कायमस्वरुपी मत्ता निर्माण करण्याकरिता अथवा प्राप्त करण्याकरिता केलेले खर्च. जमीन अधिग्रहीत करणे, रस्ते अथवा पुलांचे बांधकाम, पाटबंधारे अथवा ऊर्जा निर्मिती वरील खर्च, वरील खर्च, कर्ज रोख्यातील गुंतवणूक, खाद्यान्नाची भांडारे इत्यादी भांडवली खर्चाचे प्रकार आहेत.

ब. भांडवली उत्पन्न : साधारणपणे शासनाच्या मत्तेच्या विक्रीतून प्राप्त झालेले उत्पन्न.


१०) महसुली तूट आणि महसुली शिल्लक : राज्याच्या अर्थसंकल्पात ज्यावेळी एकूण महसुली जमेपेक्षा महसुली खर्च अधिक असतो त्यावेळी त्याला महसुली तूट मानले जाते. परंतु ज्यावेळी जमा होणारा महसूल हा महसुली खर्च भागवून उरतो अधिक असतो त्याला महसुली शिल्लक म्हणतात. ‘महसुली शिल्लक चांगले’ तर महसुली तूट ही राज्याच्या अर्थव्यवस्थेत चिंताजनतक मानली जाते.


११) तुटीचा अर्थसंकल्प : महसुली व भांडवली लेखावरील एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च ज्यावेळी अधिक असतो त्यावेळी त्याला अर्थसंकल्पीय तूट असे म्हणतात.


१२) राजकोषीय तूट : वर उल्लेखित केलेल्या अर्थसंकल्पीय तुटीत भांडवली उत्पन्नातील कर्ज व इतर दायित्व समाविष्ट केल्यावर जी रक्कम तयार होते तिला राजकोषीय तूट असे म्हणतात.


१३) मागण्या : प्रत्येक विभागाला आपल्या विभागांतर्गत जो खर्च अपेक्षित आहे तो अर्थसंकल्पात समाविष्ट केला जातो व हा खर्च कशाकरिता करण्यात येणार आहे. याच्या स्पष्टीकरणासह मागणीच्या स्वरुपात तो विधानमंडळापुढे मंजुरीसाठी मांडावा लागतो.


१४) पूरक मागण्या : एखाद्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात अंदाजित केल्यापेक्षा अधिक खर्च एखाद्या बाबीवर होत असेल अथवा वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना ज्या खर्चाची कल्पना करण्यात आली नसेल असा नवीन बाबींवरील खर्च, अर्थसंकल्पात तरतूद न केलेला आकस्मिक स्वरुपाचा खर्च करावा लागला असेल तर तो आकस्मिता निधीतून केला जाते व मग पूरक मागण्यांच्या स्वरुपात त्याच्या स्पष्टीकरणासह विधानसभेसमोर मंजुरीकरिता मांडावा लागतो.


१५) अधिक खर्चाच्या मागण्या : या मागण्या पूरक मागण्यापेक्षा भिन्न असतात. कारण पूरक मागण्यांमधील चालू आर्थिक वर्षाकरिता मागणी असते तर यामध्ये मागील वित्तीय वर्षात झालेल्या अधिकच्या खर्चाकरिता मागणी असते.


१६) विनीयोजन विधेयक : सर्व विभागांच्या खर्चाच्या मागण्या एकत्रितपणे मतास टाकून मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागते याला विनियोजन विधेयक म्हणतात आणि या मागण्या समवेत जो भारित खर्च आहे त्याचा अंतर्भाव करून राज्याच्या एकत्रित निधीतून हा खर्च भागविण्याचे अधिकार शासनास याद्वारे प्राप्त होतात.


17. पुनर्विनियोजन विधेयक : पूरक मागण्या संदर्भात जे विधेयक येते त्याला पुनर्विनियोजन विधेयक असे म्हणतात.


१८) वित्तीय विधेयक : राज्याचा अर्थसंकल्प मांडताना भाषणाच्या दुसऱ्या भागात वित्तमंत्री करासंबंधीचे प्रस्ताव मांडतात. याच प्रस्तावाचे विधेयकात रूपांतर करण्याकरिता विधानसभेसमोर वित्तीय विधेयक मांडले जाते. या विधेयकामुळे कर कमी किंवा अधिक होतो अथवा त्यात सूट मिळते किंवा त्यावरची शास्ती इ. वाढते व यामुळेच वस्तूंचे भाव कमी अधिक होतात. लौकिक अर्थाने नागरिकांना भाव कमी अधिक होणे म्हणजेच बजेट वाटते.

जगातील सर्वात श्रीमंत देश



जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर कदाचित तुमचे उत्तर 'युनायटेड स्टेट्स' असेल. मात्र, हे उत्तर सपशेल चुकीचे आहे. पर कॅपिटा इनकमच्या (प्रति व्यक्ती उत्पन्न) आधारावर जगातील टॉप-10 श्रीमंत देशांमध्ये यूएसएचा 8 वा क्रमांक लागतो.


सर्वाधिक श्रीमंत देशातील प्रति व्यक्ती उत्पन्न हे 97 लाखापेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत भारताचे पर कॅपिटा इनकम जवळपास 3 लाख 77 हजार रुपये आहे. याचा अर्थ असा की, जगातील श्रीमंत देशातील लोक भारतीय व्यक्तीपेक्षा 30 पटीने जास्त कमवतात.


चला तर मग जाणून घेऊया. जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांविषयी.


*1. कतार*


जगातील 10 रिचेस्ट कंट्रीत कतार या देशाचा पहिला क्रमांक लागतो. येथील प्रति व्यक्ती उत्पन्न जवळपास 97 लाख (146,000 डॉलर) रुपये आहे. पेट्रोलियम व लिक्विफाइड नॅचलर गॅस हे या देशाचे उत्पन्नाचे स्रोत आहे. सरकारला 85 टक्के महसूल निर्यातीमधून मिळतो.


*2. लक्झेमबर्ग*


 लक्झेमबर्ग हा जगातील दुसरा श्रीमंत देश आहे. प्रति व्यक्ती उत्पन्न: 94,000 डॉलर (62 लाख 44 हजार रुपये) आहे. फायनान्शियल सेक्टर, इंडस्ट्री व स्टील सेक्टर हे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाते.


*3. सिंगापूर*


56 लाख 46 हजार रुपये (85,000 डॉलर) प्रति व्यक्ती उत्पन्नासोबत सिंगापूर जगातील तिसरा सर्वात श्रीमंत देश आहे.

फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर, केमिकल एक्सपोर्ट इंडस्ट्री तसेच लिबरल इकोनॉमी पॉलिसी हे येथील अर्थव्यवस्थेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत.


*4. ब्रुनेई*


 ब्रुनेई हा जगातील चौथा श्रीमंत देश आहे.

 प्रति व्यक्ती उत्पन्न: 80,000 डॉलर (53 लाख 14 हजार रुपये) आहे. येथील अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार क्रूड ऑईल व नॅचरल गॅस आहे.


*5. कुवेत*


 जगातील पाचवा सर्वात श्रीमंत देश कुवेत.

 प्रति व्यक्ती उत्पन्न: 72,000 डॉलर (47 लाख 83 हजार रुपये)

 अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार: पेट्रोलियम व एक्सपोर्ट रेव्हेन्यु


*6. नॉर्वे*


 जगातील सातवा सर्वात श्रीमंत देश नॉर्वे.

 प्रति व्यक्ती उत्पन्न: 68,000 डॉलर (45 लाख रुपये

 पेट्रोलियम पदार्थ येथील अर्थव्यवस्थेचा कणा


*7. युनायटेड अरब अमिरात (यूएई)*


 युनायटेड अरब अमिरातचे प्रति व्यक्ती उत्पन्न जवळपास 68,000 डॉलर (45 लाख रुपये) आहे.

 कच्चे तेल हे येथील अर्थव्यवस्थेचे प्रमुख साधन.


*8. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका*


 यूएसए जगातील आठवा सर्वाधिक श्रीमंत देश

 प्रति व्यक्ती उत्पन्न 57,000 डॉलर (37 लाख 86 हजार रुपये)

 ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, टेक्नॉलॉजिकल सेक्टर, न्यू इनोव्हेशन येथील अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो.


*9. स्वित्झर्लंड*


 जगातील सर्वात सुंदर देशांची यादी स्वित्झर्लंडचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

 स्वित्झर्लंड हा जगातील 9 वा श्रीमंत देश आहे. येथील प्रति व्यक्ती उत्पन्न 56,000 डॉलर (37 लाख रुपये)

 बॅंकींग सेक्टरचे येथील अर्थव्यवस्थेला मोठे योगदान आहे.


*10. सौदी अरब*


 सौदी अरब हा जगातील 10 वा सर्वात श्रीमंत देश आहे. 

प्रति व्यक्ती उत्पन्न लगभग 56,000 डॉलर (37 लाख रुपये) आहे.

 येथील अर्थव्यवस्थेला पेट्रोलियम सेक्टरचे महत्वपूर्ण योगदान आहे.

दयक बँका (Payment Banks)


    


  २० ऑगस्ट २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेने विविध ११ उद्योग, कंपन्यांना देयक बँका स्थापन करून बँकिंग व्यवहार करण्यास प्राथमिक मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर देयक बँकांसंबंधी काही महत्वाची माहिती............


 --    डॉ. नचिकेत मोर समिती 


२३ सप्टेंबर २०१३ रोजी रिझर्व्ह बँकेकडून आरबीआयचे संचालक डॉ. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर स्मॉल बिझनेसेस अँड लो इन्कम हाउसहोल्ड्स या समितीची स्थापना करण्यात आली होती.

७ जानेवारी २०१४ रोजी या समितीने देयक बँक (पेमेंट बँक) स्थापन करण्याची शिफारस केली होती.

याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे २७ नोव्हेंबर २०१४ मध्ये सादर करण्यात आली होती. त्यानुसार देयक बँक (पेमेंट बँक) म्हणून मर्यादित बँकिंग व्यवसाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे एकूण ४१ अर्ज आले होते. 

त्यानुसार डॉ. नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या अर्जांची छाननी करून बैठकीत पात्र अर्जदारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.


--    देयक बँक अथवा पेमेंट बँक म्हणजे काय? 


सध्या विविध व्यवहार ऑनलाईन होत आहेत अथवा कार्डाच्या माध्यमातून व्यवहार वाढीस लागत आहेत. अशावेळी अधिकाधिक कॅश लेस व्यवहारांच्या माध्यमातून व्यवस्थेत पैसा यावा या हेतूने पेमेंट बँकेची संकल्पना मांडण्यात आली.

यानुसार, ऑनलाईन अथवा कार्डावरून करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी जी तांत्रिक उभारणी अथवा व्यवस्था लागते त्याची उभारणी खाजगी कंपन्यांतर्फे केली जाते.

ग्राहकाला स्वत:च्या नियमित बँकेतील पैसे या पेमेंट बँकेच्या खात्यात भरून त्याद्वारे ऑनलाईन अथवा कार्डावरून व्यवहार करता येतात.

या व्यवहारांकडे ‘प्रीपेड’ व्यवहाराचे एक माध्यम म्हणून देखील बघता येईल. या बँका कोणलाही कर्जाऊ रक्कम देऊ शकत नाहीत.


 --   देयक बँकेसाठी निकष 


 

किमान भांडवल १०० कोटी रुपये.

पहिली पाच वर्षे प्रवर्तकाचा हिस्सा किमान ४० टक्के पाहिजे. 

खासगी बँकांसाठी एफडीआयच्या असलेल्या नियमांनुसारच पेमेंट बँकांमध्ये एफडीआयला परवानगी. 

बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट,१९४९ नुसार भागधारकांना मिळणार मतदानाचा हक्क. 

प्रथमपासूनच बँकेचे शाखा-जाळे असणे बंधनकारक. 

एकूण शाखांपैकी २५ टक्के बँकिंग सेवा न पोहोचलेल्या ग्रामीण भागात हव्यात.


--   ‘देयक बँकां’साठी कार्यमर्यादा 


देयक बँकांना कर्ज व्यवहार करता येणार नाहीत.

अशा बँकांना एटीएम/डेबिट कार्ड त्यांच्या ग्राहकांना देता येईल, पण क्रेडिट कार्ड देता येणार नाही

पेमेंट बँका प्रति खातेदार एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी स्वीकारू शकणार नाहीत.

इंटरनेट बँकिंगसारख्या तंत्रज्ञानाधारीत विविध सेवा त्या देऊ शकतात.

म्युच्युअल फंड, विमा उत्पादने आदी वित्तीय योजना या बँका विकू शकतात.

अनिवासी भारतीयांना या बँकांमध्ये खाते उघडता येणार नाही.

बचत खात्यावरील व्याजदराप्रमाणे व्याज देणार.

मोबाइल फोनच्या साह्याने पैसे हस्तांतरण शक्य. 

बिल भरणा, विनारोकड खरेदी व फोनच्या साह्याने चेकविना व्यवहार शक्य. 

बँक खात्यात पैसा जमा करताना त्यासाठी शुल्क आकारणार नाहीत. 

प्रवाशांना बँकांपेक्षा कमी दरात फॉरेक्स सेवा/कार्ड देणार.


रिझर्व्ह बँकेने देयक बँका स्थापण्यास परवानगी दिलेल्या ११ उद्योग व कंपन्या

आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड एअरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस लि.

चोलामंडलम डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस भारतीय टपाल विभाग

फिनो पेटेक लिमिटेड नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि.

रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड टेक महिंद्र लि.

व्होडाफोन एम-पैसा लिमिटेड विजय शेखर शर्मा

दिलीप शांतीलाल संघवी

रिझर्व्ह बँकेने दिलेली प्राथमिक मंजुरी ही पात्र अर्जदारांसाठी येत्या १८ महिन्यांसाठी असेल. या कालावधीत या कंपन्यांना मध्यवर्ती बँकेने घालून दिलेल्या अटींची पूर्तता करावी लागेल. त्यानंतरच त्यांना प्रत्यक्षात बँक व्यवसाय करण्याची अंतिम मंजुरी मिळेल.


 --   महत्वाचे 


एप्रिल २०१४ मध्ये परिपूर्ण बँकिंग व्यवसाय करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आयडीएफसी व बंधन या दोन वित्तसंस्थांनाच परवानगी दिली आहे.

यापैकी बंधन बँकेचे कार्यान्वयन २३ ऑगस्टपासून, तर आयडीएफसी बँकेचे १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 

भारतात आजमितीस २७ सार्वजनिक, २० खासगी, ४४ विदेशी, तर ५६ विभागीय ग्रामीण बँका कार्यरत आहेत.  

ग्रामीण विकासाच्या योजना



१)     समुदाय विकास कार्यक्रम (Community Development Programme) (२ ऑक्टो. १९५२):– ग्रामीण भागाच्या सर्वागीन विकासाठी भारत सरकारणे राष्ट्रीय पातळीवर सुरु केलेली पहिलीच महत्वाची योजना म्हणून समुदाय विकास कार्यक्रम या योजनेचा उल्लेख करता येईल.


उद्दिष्टे :– ग्रामीण भाग नेतृत्वाचा विकास करुन त्याद्वारे ग्रामीण भागाचा विकास घडवून आणणे.


२)    एकात्मिक ग्रामीण विकास योजना (Integrated Rural Development Programme):–


१९७८-७९ पासून ही योजना प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आली.


२ ऑक्टो. १९८० पासून हा कार्यक्रम व्यापक स्वरुपात सुरु करण्यात आला.


या योजनेच्या खर्चाचे प्रमाण केंद्र व राज्य सरकार – ५०: ५०


उद्दिष्ट:- ग्रामीण भागातील दारिद्र्य दुर करणे.


दारिद्र्य रेषेखालील कुटूंब म्हणजे ज्या कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न २० हजार रु. पेक्षा कमी आहे.


दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाला दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी या योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.


असे. अशा कुटूंबामध्ये अल्प भूधारक, भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांचा समावेश करण्यात आला.


१ एप्रिल १९९९ पासून हा कार्यक्रम सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्यात आला.


३)    ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना / Training for Rural Youth for Self Employment / TRYSEM – योजनेची सुरुवात झाली – १५ ऑगस्ट १९७९.


उद्दिष्टे :- ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारातून रोजागार निर्मितीसाठी


योजनेचे स्वरुप:-


१)    ही योजना १८ ते ३५ वयोगटातील ग्रामीण युवकांसाठी होती.


२)    एक ते सहा महिने या अल्प कालावधी प्रशिक्षण दिले जाई.


३)    बँकेमार्फत १० हजार रुपयांपर्यत कर्ज मिळवून देण्यात येत होते.


४)    प्रशिक्षण कालावधीत लाभार्थींना काही विद्यावेतन देण्यात येई.


१ एप्रिल १९९९ पासून ही योजना सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्यात आली.


४.सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार / SGSY:-


सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना हा एक नवा व्यापक रोजगार कार्यक्रम आहे.


हा कार्यक्रम १ एप्रिल १९९९ ला सुरु झाला.


खर्चाचे प्रमाण – केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ७५:२५ प्रमाणात केला जातो.


उद्देश:– गावात राहणा-या गरीब व्यक्तीचे उत्पन्न वाढविणे.


नियोजन आयोगाने दारिद्र्य निर्मुलनाच्या व रोजगार निर्मितीच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नियोजन आयोगाचे एक सदस्य प्रा. हश्मी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने दारिद्र्य निर्मुलन व रोजगार निर्मितीच्या योजनांमध्ये एक सुत्रता आणण्यासाठी या सर्व योजना एकाच स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्याची शिफारस केली. ही शिफारस स्वीकारुन सरकारने १ एप्रिल १९९९ पासून सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजना सुरु केली. त्यामध्ये पुढील योजना समाविष्ट करण्यात आल्या.


१.     एकात्मिक ग्रामीण विकास योजना (IRDP)


२.     ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना (TRYSEM)


३.     ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास (DWCRA)


४.     ग्रामीण कारागीरांना सुधारीत अवजारे पुरविणे (SITRA)


५.     गंगा कल्याण योजना (GKY)


६.     दशलक्ष विहीरी योजना (MWS)


अंमलबजावणी– ही योजना जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी द्वारे पंचायत समितीच्या माध्यमातून राबविली जाते.


५)    राष्ट्रीय वृध्दकाळ पेन्शन योजना (NOAPC)


उद्देश:– ज्यांना स्वतःचे नियमित उत्पन्न नाही किंवा ज्यांना कुटुंबाच्या सदस्यांकडून किंवा अन्य कोणत्या मार्गाने आर्थिक सहाय्य मिळत नाही व कोणत्याही आस-या शिवाय जीवन जगत आहेत अशा वृध्दांना आर्थिक मदत करणे.


वैशिष्ट्ये:–


१.     अर्जदाराचे वय ६५ वर्षा पेक्षा अधिक असावे.


२.     प्रत्येक महिन्याला लाभार्थीला २०० रु. पेन्शन दिले जाईल. राज्य सरकार आपल्या साधनातून आणखी काही रक्कम टाकून यात भर घालु शकते.


६५ वर्षावरील ४४ लक्ष निराधार व्यक्तींना सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यात आली.


६)    राष्ट्रीय परिवार सहाय्य योजना (NFBS):-


कमावणा-या, कर्त्याचा मृत्यू झाल्यास १० हजार रु. सहाय्य करण्यात येईल.


पात्रता- कर्त्याचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.


७) अन्नपुर्णा योजना:– १ एप्रिल २००० पासून सुरु झाली.


उद्देश – वृध्द लोकांची गरज पुर्ण करण्यासाठी अन्नाची सुरक्षा देणे.


अन्नपुर्णा योजने खालील लाभार्थीला दर महिन्याला १०किलो अन्नधान्य (गहु, तांदूळ) मोफत दिले जाईल.


पात्रता –१) अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असले पाहिजे.


२)आश्रयहीन, उत्पन्नाचे अजिबात साधन नसणारे.


३)अर्जदार पुर्वीपासून राष्ट्रीय वृध्दकाळ पेन्शन योजना किंवा राज्य पेन्शन योजनेची पेन्शन घेत नसावा.


८) रोजगार हमी योजना:–


महाराष्ट्राची रोजगार हमी योजना – रोजगार हमी योजना वि. स. पागे यांच्या शिफारशीवरुन प्रायोगिक तत्वावर १९६५ ला तासगाव (सांगली) येथे राबविली.


अग्रणी बँक योजना :



14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली. 


*शिफारस -*


डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय पत समिती अभ्यास गटा' ने राष्ट्रीयीकृत बँकांना 'क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण' लागू करण्याची शिफारस केली. (अर्थ : आपला शाखा विस्तार करीत असतांना राष्ट्रीयीकृत बँकांनी एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रीत करावे, त्या क्षेत्रात बँकिंगच्या सुविधांनी वाढ घडवून आणून त्या क्षेत्राचे पालन-संगोपन करून आर्थिक विकास घडवून आणावा.)1969 मध्ये या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी श्री.एफ.के.एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखाली "बँक व्यावसायिकांची समिती" (Committee of Bankers) स्थापन करण्यात आली. नरिमन समितीने गाडगीळ यांचा "क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण" मान्य करून त्याला मूर्त स्वरूप दिले व "अग्रणी बँक योजना" तयार केली. 


*सुरुवात -*


1969 च्या अखेरीला RBI ने योजना स्विकारली व तिची अंमलबजावणी देशातील 338 जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. 


*योजना -*


देशातील 338 जिल्हे, SBI, तिच्या सहयोगी बँका, 14 राष्ट्रीयीकृत बँका व 3 खाजगी बँकांमध्ये वाटून देण्यात आले.मात्र, मुंबई, कलकत्ता, मद्रास ही महानगरे आणि दिल्ली, पोंडीचेरी व गोवा हे केंद्रशासित प्रदेश यांना ही योजना लागू करण्यात आली नाही.अशा रितीने एक जिल्हा एका बँकेला दत्तक म्हणून देण्यात आला. त्या बँकेला त्या जिल्ह्याची "अग्रणी बँक" म्हणून दर्जा देण्यात आला.असा दर्जा मिळाल्यानंतर त्या अग्रणी बँकेने त्या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी प्रथम पुढाकार घ्यावा. तसेच,जिल्ह्याचे पतधोरण तयार करून संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी अग्रणी बँकेवर टाकण्यात आली. 


*कार्ये -*


जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अग्रणी बँकेने खालीलकार्ये करणे अपेक्षित होते -


जिल्ह्याचे सर्वेक्षण करून जिल्ह्याची पत गरज ठरविणे.बँक-शाखा कोठे सुरू करता येतील याचा शोध घेणे.जिल्हा सल्लामसलत समित्या (Dist.Consultative committees) ची स्थापना करून पुढीलप्रमाणे समन्वयाचे कार्य घडवून आणणे -

 जिल्ह्यातील सर्व व्यापारी बँका, सहकारी बँका व अन्य वित्तीय संस्थांमध्ये समन्वय.

 जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील बँकांमध्ये समन्वय.

 अल्पकालीन व दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यामध्ये समन्वय.

 जिल्ह्यातील विकास कार्यांमध्ये गुंतलेल्या सर्व संस्थांच्या कार्यांमध्ये समन्वय.1976 च्या उच्चाधिकारी समितीच्या शिफारसींनुसार अग्रणी बँकांवर 3 वर्षाचे जिल्हा पतधोरण (District Credit Plans) तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. हे धोरण सर्वसमावेशक स्वरूपाचे असून त्यात जिल्ह्यातील बँकांसाठी गटनिहाय, क्षेत्रनिहाय योजनानिहाय आणि बँकनिहाय कर्ज पुरवठ्याची लक्ष्ये ठरविली जातात.

 भारत सरकारच्या सुचनेंतर्गत एप्रिल 1989 मध्ये अग्रणी बँक योजनेंतर्गत क्षेत्रीय सेवा दृष्टीकोण लागू करण्यात आला. 


*महाराष्ट्रातील अग्रणी बँका (33 जिल्हयांसाठी)*


स्टेट बँक ऑफ इंडिया - बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नंदुरबार.सेंट्रल बँक ऑफ इंडिया - अकोला, अमरावती, सांगली, धुळे, जळगाव, यवतमाळ, अहमदनगर, वाशीम, बुलढाणा.बँक ऑफ इंडिया - नागपूर, भंडारा, चंद्रपुर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, गोंदिया.बँक ऑफ महाराष्ट्र - औरंगाबाद, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, जालना. 


*सध्यस्थिती -*


सध्या फेब्रुवारी 2013 मध्ये अग्रणी बँक योजना देशातील 622 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यात उत्स्फृर्तपणे सहभागी आहेत.     फेब्रुवारी 2013 मध्ये SBI किंवा तिच्या सहयोगी बँका सर्वाधिक म्हणजे 204 जिल्ह्यांमध्ये अग्रणी बँक म्हणून कार्य करीत होती. 


*उषा थोरात समिती -*


भारतीय रिझर्व्ह बँकेने श्रीमती. उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली अग्रणी बँक योजनेच्या परीक्षणासाठी एका उच्चाधिकार समितीची स्थापना केली होती. या समितीने 20 एप्रिल, 2009 रोजी आपला अहवाल सादर केला.

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :



(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न


(1) 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी संख्या 

      एकूण किती आहेत ?

--->  9


(2) 1 ते 100 या संख्यांमध्ये दोन अंकी संख्या 

       एकूण किती आहेत ?

--->  90


(3) 1 ते 100 या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या 

        एकूण किती आहेत  ?

---> 1


(4) 1  ते 100 या संख्यांमध्ये 11 वेळा येणारा 

      अंक कोणता  ?

--->  0


(5)  1 ते 100 या संख्यांमध्ये 21 वेळा येणारा 

      अंक कोणता  ?

--->  1


(6)  1 ते 100 या संख्यांमध्ये 8 हा अंक किती 

      वेळा येतो  ?

--->  20


(7) 1 ते 100 या संख्यांमध्ये एककस्थानी 7 

    हा अंक असलेल्या एकूण संख्या किती  ?

---> 10


(8) 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 ते 9  हे अंक 

    एकूण किती वेळा येतात  ?

---> 192


(9) 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 हा अंक 

    एकूण किती वेळा येतो ?

---> 10


(10) 10 ते 99 या दोन अंकी संख्यांपैकी सम आणि  विषम 

    एकूण संख्या किती ?

---> 45


(11)  1 ते 100 पर्यंत च्या संख्यांमध्ये सम आणि  विषम 

    एकूण संख्या किती ?

---> 50  

मिशन नोकरी


🏀 *भारतातील  पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*


🏀 *भारतातील  पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*


🏀 *भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*


🏀 *भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*


🏀 *भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*


🏀 *भारतातील  पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*


🏀 *भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*


🏀 *भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 *भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*


🏀 *भारतातील  पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*


🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*


🏀 *भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*


🏀 *भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 *पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*


🏀 *पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*

 

 🏀 *पहिले पोस्टाचे तिकीट  १ऑक्टोबर १८५४* 


🏀 *पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)* 


🏀 *पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*


🏀 *पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*

 

🏀 *पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*

 

*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*

 

🏀 *पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*


🏀 *पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*

 

🏀 *पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*

 

🏀 *पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*

 

🏀 *पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*

 

🏀 *भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*

 

🏀 *पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*

 

🏀 *पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*


🏀 *भारतातील पहिले :* 🏀

 

🏀 *भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*

 

🏀 *पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*

 

🏀 *पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*

 

🏀 *राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*

 

🏀 *पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*

 

🏀 *पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*

 

🏀 *पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

 

🏀 *पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*

 

🏀 *स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*

 

🏀 *पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*

 

🏀 *भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*

 

🏀 *इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*


🏀 *सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*


🏀 *सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*


🏀 *सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*


🏀 *भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*


🏀 *भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*


🏀 *भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*


  🏀 *सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*


🏀  *भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Answer- राजस्थान*


🏀 *भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*


🏀  *भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*


🏀 *भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*


🏀 *भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*


 🏀 *भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*


🏀 *भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*


🏀 *भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो? Answer- मावसिनराम (मेघालयं)*

१६ नोव्हेंबर २०२१

MPSC सराव प्रश्न

Q 1. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते?

Ans: गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते

Q 2. खालीलपैकी कोणत्या नद्यांमध्ये ताज्या पाण्याचे डॉल्फिन आहेत?

Ans: गंगा नदीमध्ये गोड्या पाण्यातील डॉल्फिन आहेत.

Q 3. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

Ans: गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे

Q 4. सिंधू नदीची एकूण लांबी किती आहे?

Ans: सिंधू नदीची एकूण लांबी  3180 किमी आहे.

Q 5. द्वीपकल्पात पश्चिमेकडे वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे?

Ans: नर्मदा नदी (रेवा म्हणूनही ओळखली जाते) ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम प्रवाही नदी आहे.

Q1. लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

Ans. उत्तर प्रदेश हे लोकसंख्येनुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशची एकूण लोकसंख्या 199,812,341 आहे.

Q2. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

Ans.क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. ते 342,239 किमी 2 व्यापते

Q3. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

Ans. सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे. सिक्कीमची एकूण लोकसंख्या 610,577 आहे.

Q4. क्षेत्रफळानुसार भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

Ans. जम्मू आणि काश्मीर, नव्याने गठित केंद्रशासित प्रदेश हा भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे जो 125,535 चौ. किमी व्यापतो.

Q5. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे?

Ans. गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे ज्याचे क्षेत्र 3,702 चौ. किमी आहे.

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- अच्च्युत गोडबोले.

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?
उत्तर- मका.

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १४ जून.

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- गोल्फ.

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?
उत्तर- कल्पना चावला.

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- साधना आमटे.

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?
उत्तर- कोलकाता.

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २९ जुलै.

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- नेमबाजी.

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?
उत्तर- रझिया सुलताना.

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- गोदावरी.

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बाॅक्सिंग.

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
उत्तर- गंगा.

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १ ऑगस्ट

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर- कृष्णा.

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- बॅडमिंटन.

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?
उत्तर- अजिंठा.

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर- गुजरात.

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १६

Current affairs questions

1. ख्यातनाम इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या.

अ. बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र, भारतातील लेखक, इतिहासकार आणि नाटय व्यक्तिमत्त्व होते.

ब. 2019 मध्ये पद्मविभूषण आणि 2015 मध्ये महाराष्ट्रभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

क. ते मुख्यतः त्यांच्या शिवाजी जाणता राजावरील लोकप्रिय नाटकासाठी प्रसिद्ध होते.

1. अ, ब, क
2. अ, क
3. ब, क
4. अ, ब

उत्तर-1

------------------------------------------------------------

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा पहिला-हफ्ता ग्रामीण ( PMAY-G) कोणत्या राज्यातील लाभार्थ्यांना हस्थांतरीत केला आहे?

1. आसाम
2. त्रिपुरा
3. नागालँड
4. उत्तराखंड

उत्तर- 2

------------------------------------------------------------

3. भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान स्वातंत्र्य सेनानी संग्रहालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले?

1.भोपाळ
2. झाशी
3. रांची
4. छिंदवाडा

उत्तर-3

------------------------------------------------------------

4. भारत सरकारने अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो च्या संचालकांचा कार्यकाळ सध्याचा 2 वर्षांवरून किती वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी 2 अध्यादेश जारी केला आहे?

1.  4 वर्ष
2. 5 वर्ष
3. 6 वर्ष
4. 3 वर्ष

उत्तर-2

------------------------------------------------------------

5. भारतातील...... हे राज्य पायनियरिंग टेक्नोप्रेन्योरशिप मालिका स्टार्ट-उप मिशन आणि सिस्को लॉन्चपॅड एक्सिलरेटर प्रोग्राम संयुक्तपणे होस्ट करेल.

1. गुजरात
2. कर्नाटक
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर-3

------------------------------------------------------------

6. खालीलपैकी कोणत्या देशातून 100 वर्षांनंतर देवी अन्नपूर्णाची मूर्ती भारतात परत आली?

1. कॅनडा
2. ऑस्ट्रेलिया
3. इंग्लंड
4. अमेरिका

उत्तर-1

------------------------------------------------------------

7. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ. 15 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो .

ब. हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे.

क. त्यांच्या मृत्यूपूर्वी, भारताने 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला , हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी जागतिक बालदिन म्हणून साजरा केला.

1. अ, ब
2. ब, क
3. अ, क
4. अ, ब, क

उत्तर-2

Correct ans-अ. 14 नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा केला जातो

------------------------------------------------------------

8. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) 12 डिसेंबरपासून 'भारत दर्शन-दक्षिण भारत यात्रा' सुरू करणार आहे.  ही यात्रा कोणत्या ठिकाणापासून सुरू होईल?

1. तिरुपती आणि गंटूर
2. तिरुपती आणि कुर्नुल
3. अमरावती आणि विजयवाडा
4. हैदराबाद आणि सिकंदराबाद

उत्तर- 4

------------------------------------------------------------

9. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.

अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 -10 वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विरगाथा प्रकल्प सुरू केला आहे.

ब. सशस्त्र दलातील अधिकारी आणि जवानांच्या शौर्याचे आणि धैर्याचे स्मरण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आहे.

क. वीर गाथा प्रकल्पाचे उद्दिष्ट शालेय विद्यार्थ्यांमध्ये शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्य कृत्ये आणि बलिदानाबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे .

1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त क
4. एकही नाही

उत्तर-1

Correct ans- अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 -12 वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विरगाथा प्रकल्प सुरू केला आहे.

------------------------------------------------------------

10. 15 नोव्हेंबर हा दिवस कोणत्या भारतीय राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो?

1. झारखंड
2. छत्तीसगड
3. केरळ
4. गुजरात

उत्तर-1

------------------------------------------------------------

1.खालीलपैकी योग्य विधान निवडा.

अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना आणि रिसर्व बँक-एकात्मिक लोकपाल योजना सुरू केली आहे.
ब. आरबीआय रिटेल योजना मध्यमवर्गीय, कर्मचारी, छोटे आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या लहान गुंतवणूकदारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेल्या रोख्यांमध्ये थेट आणि  सुरक्षित ठेवण्यासाठी माध्यम म्हणून काम करेल.
क. आरबी-एकात्मिक लोकपाल योजना आरबीआयने नियमन केलेल्या संस्थानविरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण करणे ही योजना एक राष्ट्र- एकलोकपाल वर आधारीत आहे.

1. अ, ब, क
2. अ, ब
3. ब, क
4. अ, क

उत्तर-1

------------------------------------------------------------

2. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि पोस्ट विभागाने ग्रामीण ग्राहकांना प्राधान्य देण्यासाठी कोणत्या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे?

1. बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स
2. भारती एक्सा जनरल इन्शुरन्स
3. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स
4. एचडीएफसी ERGO जनरल इन्शुरन्स

उत्तर-1

------------------------------------------------------------

3. किसान भवन आणि मधुमक्षिकापालन परोषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

1. केरळ
2. त्रिपुरा
3. मेघालय
4. नागालँड

उत्तर-4

----------------------------------------------------------

4. नुकतीच कोणत्या व्यक्तीची नार्कोटिक्स कंट्रोल  ब्युरो च्या महासंचालक पदी नेमणूक करण्यात आली?

1. राकेश अस्थाना
2. सत्य नारायण प्रधान
3. अतुल करवाल
4. यापैकी नाही

उत्तर-2

------------------------------------------------------------

5. नुकतीच केंद्र सरकारने किती राज्यांना कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे?

1. पाच
2. सात
3. आठ
4. नऊ

उत्तर-2

------------------------------------------------------------

6. भारतातील पहिले विश्वस्तरीय रेल्वेस्टेशनचे उद्घाटन कोणत्या शहरात केले जाणार आहे.

1. मुंबई
2. दिल्ली
3. चेन्नई
4. भोपाळ

उत्तर-4

------------------------------------------------------------

7. नेहरू: द डिबेट्स दॅट डिफाइंंड इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?

अ. त्रिपुरदमन सिंह
ब. सलमान खुर्शीद
क. आशिष चौधरी
ड. आदिल हुसेन

1. अ आणि ड
2. ब आणि क
3. अ आणि क
4. अ आणि ब

उत्तर- 1

------------------------------------------------------------

8. कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळविराच्या नेतृत्वाखाली क्रू मिशन स्पेस-एक्सचे प्रक्षेपण करण्यात आले?

1. राजा चारी
2. सुनीता विल्यम्स
3. सिरिशा बंदला
4. रवीश मल्होत्रा

उत्तर-1

------------------------------------------------------------

9. राज्यसभेचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात  आली आहे?

1. निर्मला सीतारमन
2. पी.सी मोदी
3. पियुष गोयल
4. यापैकी नाही

उत्तर- 2

------------------------------------------------------------

10. नुकताच जागतिक निमोनिया दिवस कधी साजरा करण्यात आला?

1. 8 नोव्हेंबर
2. 9 नोव्हेंबर
3. 11 नोव्हेंबर
4. 12 नोव्हेंबर

उत्तर-4

===========================

GK Questions and Answers 2021


प्र. १.   नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण?

१. मदर टेरेसा
२. हरगोबिंद टागोर
३. सी. रमण
४ . रवींद्रनाथ टागोर

प्र. २. ब्रिटिश भारतातील पहिली लोकसंख्या जनगणना कधी  झाली?
१. इ.स १८८२
२. इ.स १८७२
३. इ.स १८८८
४. इ.स १९७२

प्र. ३.   जगातील एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे?
१. १८.५%
२. १७.५%
३. २१.५%
४. १६.५%

प्र.४.  कलम १ (३)  नुसार, भारताचे राज्यक्षेत्र पुढील बाबीचे मिळून बनलेले असेल;

१) घटकराज्यांची राज्यक्षेत्रे
२) केंद्रशासित प्रदेश
३) संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्रे.
४) वरील पैकी सर्व

प्र.५.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे वर्णन संघराज्य असे न करता ' राज्याचा संघ' या शब्दात केले आले आहे कारण -

I) भारताचे संघराज्य अमेरिकन संघराज्याप्रमाणे घटकराज्यांतील कराराद्वारे निर्माण झालेले नाही.
II) घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही.

१) फक्त अ बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ आणि ब दोन्ही बरोबर
४) अ आणि ब दोन्ही चूक

प्र. ६.  सध्या भारतीय राज्यघटनेत  (डिसेंबर २०१८) पर्यंत किती कलमे आहेत ?

१) कलम ४४४
२) कलम ३२४
३) कलम ३४४
४) कलम ४७४

प्र.७.  १९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे?

१) भारत सरकार कायदा, १९३५
२) भारत सरकारचा कायदा, १८३३
३) भारत सरकारचा कायदा, १८५८
४) वरीलपैकी सर्व

प्र.८.  भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली, त्याबद्दल खालील पैकी योग्य वाक्य  ओळखा.

अ ) सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली.
ब ) हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे.
क) पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते.
ड) १९४६च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली.

पर्याय
१) अ,ब,
२) अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) अ, ड

प्र. ९.  कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी कोणत्या देशाने अलीकडे प्लाझ्माची ऑनलाइन उपलब्धता सुरू केली आहे?

१ ) भारत
२) अमेरिका
३) बांगलादेश
४) ब्राझील

प्र. १०  कोणत्या राज्य सरकारने नुकतीच पाचवीपर्यंतच्या मुलांसाठी ऑनलाईन वर्ग बंदी घातली आहे?

१) मध्य प्रदेश
२) कर्नाटक
३) ओडिशा
४) प. बंगाल

उत्तरे :
प्र. - १ - ४ . रवींद्रनाथ टागोर
प्र. - २ - २. इ.स १८७२
प्र. - ३ - २. १७.५%
प्र. - ४ - ४) वरील पैकी सर्व
प्र. - ५ - ३) अ आणि ब दोन्ही बरोबर
प्र. - ६ - १) कलम ४४४
प्र. - ७ - १) भारत सरकार कायदा, १९३५
प्र. - ८ - ३) अ,ब,क आणि ड
प्र. - ९ - ३) बांगलादेश
प्र. - १० - २) कर्नाटक

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...