12 November 2021

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)

·         औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा. 

·         मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? - औरंगाबाद. 

·         लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - उस्मानाबाद. 

·         जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - औरंगाबाद. 

·         महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? - मराठवाडा. 

·         गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद-जळगाव. 

·         औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? - अजिंठा. 

·         जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 

·         हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 

·         विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - नांदेड. 

·         गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? - पैठण-औरंगाबाद. 

·         जायकवाडी जलाशयाचे नाव काय? - नाथसागर. 

·         जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? - औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड. 

·         महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? - कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे. 

·         बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - राहुरी व औरंगाबाद. 

·         महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? - मराठवाडा. 

·         महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? - कोरडा दुष्काळ. 

·         जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पैठण, औरंगाबाद. 

·         गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? - जपान. 

·         हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? - औरंगाबाद. 

·         गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? - पैठण. 

·         महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? - मराठवाडा. 

·         शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? - नांदेड. 

·         दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? - पैठण. 

·         पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? - संत एकनाथ. 

·         औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - हिंगोली. 

·         घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 

·         शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? - नांदेड. 

·         परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? - बीड. 

·         खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - लातूर. 

·         अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड. 

·         तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद. 

·         पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? - औरंगाबाद. 

·         धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद. 

·         वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 

·         अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? - औरंगाबाद. 

·         वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? - शिल्पकला. 

·         महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा. 

·         मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? - 1972. 

·         वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? - औरंगाबाद. 

·         श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? - तुळजापूर (उस्मानाबाद). 

·         महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? - नांदेड. 

·         कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? - अंबेजोगाई. 

·         मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? - अक्षी. 

·         दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद. 

·         प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? - उस्मानाबाद.

·         महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·         भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? - एकनाथ. 

·         शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? - नामदेव. 

·         प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - गोदावरी. 

·         बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड. 

·         मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? - औरंगाबाद. 

·         देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? - अजंठा रांगा. 

·         गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? - हरिषचंद्र-बालाघाट. 

·         बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? - गोदावरी. 

·         महाराष्ट्रात अत्यल्प खनिजे कोणता भागात मिळतात? - मराठवाडा. 
t

संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याची आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळा (IMEO)

🔰संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याद्वारे युरोपिय संघाच्या पाठिंब्याने “आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळा (IMEO)’चे उद्घाटन करण्यात आले आहे. ग्लासगो (ब्रिटन) येथे आयोजित करण्यात आलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान IMEOचे अनावरण करण्यात आले.

🔰मिथेन वायू वर्तमानात वैश्विक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये किमान एक चतुर्थांश भागासाठी जबाबदार आहे. त्यामुळे वायुच्या उत्सर्जनावर लक्ष ठेवण्याच्या कार्यामध्ये IMEOची मदत होणार आहे.

🅾ठळक बाबी

🔰ही नवीन वेधशाळा हरितगृह वायू असलेल्या मिथेन वायूच्या पातळीवर लक्ष ठेवण्याचे कार्य करणार आहे. IMEO याला जगभरातील कंपन्या आणि सरकारांना धोरणात्मक शमनक्रियेवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी आणि विज्ञान-आधारित धोरण पर्यायांना समर्थन देण्यासाठी या माहितीचा वापर करण्यास अनुमती देईल.

🔰मानवी क्रियाकलापामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायुच्या पातळीविषयी स्पष्ट आणि अचूक माहिती पुरविण्यात IMEO अहवालाची मदत होणार आहे. IMEO सुरुवातीला जीवाश्म इंधनाच्या क्षेत्रातून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनावर लक्ष केंद्रित करेल आणि कालांतराने कृषी आणि कचरा यासारख्या इतर प्रमुख उत्सर्जन क्षेत्रांपर्यन्त कार्यविस्तार करेल.

🔰ताज्या ‘UNEP-CCAC ग्लोबल मिथेन असेसमेंट’ अहवालानुसार, शून्य किंवा कमी निव्वळ-किंमत कपात ही मानवी क्रियाकलापामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनची पातळी जवळजवळ निम्मी करू शकते आणि सिद्ध उपाययोजना 2050 सालापर्यंत ग्रहाच्या सरासरी वैश्विक तापमानात अंदाजित वाढीपासून 0.28 अंश सेल्सिअसने कमी करू शकतात.

🅾संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) विषयी

🔰हा संयुक्त राष्ट्रसंघाचा एक अंग असून ते प्रमुख जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. ही संस्था जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पातळीवर कार्य करते. संस्थेची 5 जून 1972 रोजी स्थापना झाली. संस्थेचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.

जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे

💥💥एकदा नक्की वाचा💥💥
💥★जागतिक भूगोलातील विशेष ठिकाणे★💥
🌟🌟Part-I

💥 जगातील सर्वात मोठा महासागर - पॅसिफिक महासागर

💥 महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)

💥 सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.

💥 सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320चौ.कि.मी.

💥सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया

💥सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)

💥सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया) 

💥 सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.

💥सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.

💥सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे

💥सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)

💥 सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची

💥सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.

💥सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)

💥  सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.

💥 सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.

💥 सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.

💥सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.

💥सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)

💥 सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)

लॉर्ड मेयो


🍁  कार्यकाळ

👉 (१८६९-१८७२) :

🌸  सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली.

🍁  डिसेंबर १८७० मध्ये  रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या.

🌸  १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले.

🍁   सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२  मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात.

🌸   जानेवारी, १८७२ मध्ये  अंदमान  येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.

🍁🍁🍁🍁☘☘🍁🍁🍁🍁☘☘

प्रमुख जमाती, त्यांची वस्ती, व्यवसाय व वैशिष्टे याबद्दल माहिती ‼️

♻️प्रमुख जमाती, त्यांची वस्ती, व्यवसाय व वैशिष्टे याबद्दल माहिती ‼️
♻️जमाती:-प्रदेश:-व्यवसाय:-वैशिष्ट्ये❗️

♻️लॅपलॅडर:-
▪️सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश:-
▪️लाकूडतोडे व शिकार:-
▪️फासेपारधी

♻️एस्कीमो:-
▪️टंड्रा प्रदेश:-शिकार करणे:-
▪️कच्चे मांस खातात

♻️पिग्मी:-
▪️कांगो खोरे:-
▪️फळे, कंदमुळे गोळा करणे:-
▪️स्थलांतरित शेती

♻️रेड इंडियन:-
▪️उ.व.द.अमेरिका:-
▪️शिकार, मासेमारी:-
▪️फळे गोळा करणे

♻️झुलू:-
▪️सुदानी गवताळ प्रदेश:-
▪️शिकार करणे:-
▪️स्थलांतरित शेती

♻️बडाऊन(अरब):-
▪️सहारा वाळवंट:-
▪️ओअॅसिस शेती व व्यापार:-
▪️खगोलशास्त्रात प्रवीण आहे.

♻️ किरगीज:-
▪️आशियातील स्टेप/गवताळ प्रदेश:-
▪️पशूपालन:-
▪️युर्ट नावाच्या तंबूत राहतात/कुमीस नावाचे आवडते पेय

♻️ कोझक:-
▪️रशियातील गवताळ:-
▪️पशुपालन:-
▪️घोड्यावर बसण्यात पटाईत

♻️ गाऊची:-
▪️द.अमेरिकेतील/पंपासचा गवताळ प्रदेश:-
▪️पशुपालन:-
▪️मस्त व दांडग्या जनावरांना/वठणीवर आणण्यात वाकबगार

♻️ सॅमाइड:-
▪️सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-
▪️फासेपारधी:
▪️लाकूडतोड व शेती करणे

♻️ ओस्टयाक:-
▪️सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-
▪️फासेपारधी:-
▪️लाकूडतोड व शेती करणे

♻️ बुशमे:-
▪️नकलाहारी वाळवंट:-
▪️शिकार, फळे:-
▪️शिकार करण्यात पटाईत

♻️ ब्लॅक फेलोज:-
▪️ऑस्ट्रेलिया:-
▪️शिकार, फळे गोळा:-
▪️शिकारीचा माग काढण्यात पटाईत

♻️ मावरी:-
▪️न्यूझीलंड:-
▪️शेती व मासेमारी:-
▪️उत्तम योद्धे

कोकण किनारपट्टी

सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र दरम्यानचे विभाग, चिंचोलाया आणि सुकल भागास “कोकण” असे म्हणतात .

🌿🌿कोकण निर्मिति: -🌿🌿

महाराष्ट्राच्या पश्चिमेस आणि अरबी समुद्रास लागून स्थळ सह्याद्रीच्या प्रसंगाचे प्रस्तर भंग आहे कोकण किनारपट्टी तयार आहे.

कोकळी क्षेत्र: -

कोकण किनारपट्टीची दक्षिण उत्तर लांबी किमी२० वर्ग उपलब्धि आहे.

 क्वेरेस दमणगंगा नदीपासुन दक्षिणेस तेरेखोल नदीचा प्रदेश कोकणे विस्तृत आहे

. पश्चिम घातांक कोक रुंदी सर्व साहित्य सारण कोकण कोनारपट्टीची सरासु रुंदी ते० ते किमी० वर्ग आहे.

 उत्तर भागा ही रुंदी ९ ० ९ एव एव एव एव एव एव.......... ४५ एव......... कोक रांधी उत्तर द्या दक्षता निमुळती जलप्रवेश. 

नदीच्या खोल्यांमध्ये रंडी १०० वर्ग उपलब्ध आहेत. हलके ही कोकणातल्या वस्तूंची नदी आहे.

कोक भौगोलिक क्षेत्रफळ ३०,३ ९ कि चौकीअमी नागरिक आहेत.

भारतातील प्रमुख जमाती

🔥जमात                  🔥राज्य

अबोर                  अरुणाचल प्रदेश
आपातनी             अरुणाचल प्रदेश
आओ                  नागाल्यांड
अंगामी                 नागाल्यांड
कोल                   छत्तीसगढ
कोटा                   तामिळनाडू
मुंडा                    झारखंड
कोलाम                आंध्र प्रदेश
छुतीया                आसाम
चेंचू                     आंध्र प्रदेश
गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा                     छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ
बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट                    हिमाचल प्रदेश
लेपचा                  सिक्कीम
वारली                  महाराष्ट्र
चकमा                  त्रिपुरा
गड्डी                     हिमाचल प्रदेश
जयंती                  मेघालय
बोदो                    आसाम
खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया                 त्रिपुरा
मोपला                  केरळ
भुतिया                  उत्तरांचल
जारवा                   छोटे अंदमान
कुकी                    मणिपूर
कुरुख                  झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश
डाफला                अरुणाचल प्रदेश
कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र
हो                       छोटा नागपूर
मुरीया                  बस्तर छोटा नागपूर
संथाल                  वीरभूम,झारखंड
गुज्जर                  हिमाचल प्रदेश
खोंड                     ओरिसा
मिकिर                  आसाम
उरली                  केरळ
मीना                    राजस्थान
ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

वारणा नदी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते.

पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.
सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत

.
वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात.

खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.

वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

English Exercise Pronoun

1. .........showed ........some photographs of my holiday in Italy.
            
   (A) We, me  
   (B) I, them ✓  
   (C) I, us  
   (D) You, they  
            
2. ......... told ...........that the meeting had been postponed.
            
   (A) She, they  
   (B) He, him  
   (D) He, us   ✓
            
3. .........helped their mother wash ......... car.
            
   (A) I, mine  
   (B) We, ours  
   (C) They, her   ✓
   (D) They, theirs  
4. ......... should make Anne a card. it would make ......... very happy.
            
   (A) He, I  
   (B) She, him  
   (C) You, her  ✓
   (D) I, she  
            
5. Jerry and Simone will wait for Freddy and ......... at the bus stop.
            
   (A) I  
   (B) my  
   (C) it  
   (D) me  ✓
            
6. "Why are ......... here ? Are ......... in trouble ?" asked the girls in the headmaster's office.
            
   (A) we, we ✓
   (B) us, us  
   (C) we, us  
   (D) us, we  
            
7. This is ......... home. Welcome !
            
   (A) we  
   (B) our  ✓
   (C) us  
   (D) ours  
       
8. Harry and ......... play badminton. ......... play every weekend.
       
   (A) I, We  ✓
   (B) we, Us  
   (C) me, You  
   (D) you, They  
       
9. The waitress showed ......... family and ......... to our table.
       
   (A) my, I  ✓
   (B) me, I  
   (C) me, mine  
   (D) myself, I  
       
10. They mayor presented Suzy with ......... very own medal of honor for ......... bravery.
       
   (A) his, his  
   (B) her, her ✓  
   (C) her, his  
   (D) him, her

रुपयाची परिवर्तंनियता.

🅾1 मार्च 1992 – LERMS/दुहेरी विनिमय पद्धती लागू

🅾1993-94 – रुपया व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

🅾मार्च 1994 – रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

🅾या समितीने रुपया भांडवली खात्यावर एका टप्यात परिवर्तनीय करण्याऐवजी 1999-2000 या वर्षाअखेर तीन टप्यांमध्ये करावा अशी शिफारस केली.

🅾मात्र, जुलै 1997 च्या पूर्व आशियाई संकटामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला. या संकटाचे मूळ कारण होते, त्या देशांची चचने त्यांच्या भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय होती.

🅾 मात्र सध्या परकीय चलन साठा मोठया प्रमाणावर वाढल्याने सरकारने भांडवली खात्यावरील काही व्यवहारासंबंधी परकीय चलनाच्या विनिमयावरील नियंत्रणे शिथिल केली आहे.

🅾 भांडवली खात्यावर रूपयाच्या पूर्ण परिवर्तनीयतेबद्दल शिफारसी करण्यासाठी RBI ने 2006 मध्ये एस.एस.तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एका दुसर्‍या समितीची स्थापना केली. या समितीने 31 जुलै 2006 रोजी आपला अहवाल RBI ला सादर केला, जो तिने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण

निरनिराळ्या अर्थशास्‍त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण केलेले आहे.
सार्वजनिक खर्चांचे काही महत्‍त्‍वपूर्ण प्रकार आता बघुयात ..

अ) महसुली खर्च :

महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्‍यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च  नियमितपणे उद्भवतो.
उदा :- 
शासनाचा प्रशासकीय खर्च,
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्‍ते, निवृत्‍ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्‍यांचा खर्च इत्‍यादी.

ब) भांडवली खर्च :

भांडवली खर्च म्‍हणजे देशाच्या वृदध् ी व  विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय.
उदा :-
विविध विकास प्रकल्‍पांतील मोठ्या गुंतवणूका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्‍य शासन व शासकीय कंपन्यांना
दिलेले कर्ज इत्‍यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत.

क) विकासात्‍मक खर्च :

विकासात्‍मक खर्च हा उत्‍पादक
स्‍वरूपाचा असतो. ज्‍या खर्चामुळे रोजगार निर्मिती,उत्‍पादन वाढ, किंमतस्‍थेैर्य इत्‍यादी बदल घडून वाढ होते. त्‍याला
विकासात्‍मक खर्च असे म्‍हणतात.
उदा :- 
आरोग्‍य शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्‍याण, संशोधन आणि विकास यांवरील खर्च इत्‍यादी.

ड) विकासेतर खर्च :

शासनाच्या ज्‍या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्‍यक्ष उत्‍पादक परिणाम होत नाही, त्‍याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्‍हणतात.
उदा :-
प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्‍यादी हे खर्च  अनुत्‍पादक स्‍वरुपाचे असतात.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

🧩स्वरूप -

🅾जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत.

🧩कार्ये -

🅾जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.

🧩भांडवल उभारणी -

🅾स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी.

🧩विस्तार -

🅾भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने


 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
_____________________________________
⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899
_____________________________________
⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट
_____________________________________
. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम
_____________________________________
 महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔
_____________________________________
 कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920
_____________________________________
 जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन
_____________________________________
 _____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939
__________________________________
 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना
__________________________________
. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935
______________________________________

Latest post

2025 चालू घडामोडी

1) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भालाफेकपटू कोण ठरला आहे ? ✅ नीरज चोप्रा 2) नीरज चोप्रा किती गुणसंख्या...