१२ नोव्हेंबर २०२१

भारतातील प्रमुख जमाती

🔥जमात                  🔥राज्य

अबोर                  अरुणाचल प्रदेश
आपातनी             अरुणाचल प्रदेश
आओ                  नागाल्यांड
अंगामी                 नागाल्यांड
कोल                   छत्तीसगढ
कोटा                   तामिळनाडू
मुंडा                    झारखंड
कोलाम                आंध्र प्रदेश
छुतीया                आसाम
चेंचू                     आंध्र प्रदेश
गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा                     छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ
बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट                    हिमाचल प्रदेश
लेपचा                  सिक्कीम
वारली                  महाराष्ट्र
चकमा                  त्रिपुरा
गड्डी                     हिमाचल प्रदेश
जयंती                  मेघालय
बोदो                    आसाम
खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया                 त्रिपुरा
मोपला                  केरळ
भुतिया                  उत्तरांचल
जारवा                   छोटे अंदमान
कुकी                    मणिपूर
कुरुख                  झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश
डाफला                अरुणाचल प्रदेश
कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र
हो                       छोटा नागपूर
मुरीया                  बस्तर छोटा नागपूर
संथाल                  वीरभूम,झारखंड
गुज्जर                  हिमाचल प्रदेश
खोंड                     ओरिसा
मिकिर                  आसाम
उरली                  केरळ
मीना                    राजस्थान
ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

वारणा नदी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते.

पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.
सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत

.
वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात.

खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.

वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

English Exercise Pronoun

1. .........showed ........some photographs of my holiday in Italy.
            
   (A) We, me  
   (B) I, them ✓  
   (C) I, us  
   (D) You, they  
            
2. ......... told ...........that the meeting had been postponed.
            
   (A) She, they  
   (B) He, him  
   (D) He, us   ✓
            
3. .........helped their mother wash ......... car.
            
   (A) I, mine  
   (B) We, ours  
   (C) They, her   ✓
   (D) They, theirs  
4. ......... should make Anne a card. it would make ......... very happy.
            
   (A) He, I  
   (B) She, him  
   (C) You, her  ✓
   (D) I, she  
            
5. Jerry and Simone will wait for Freddy and ......... at the bus stop.
            
   (A) I  
   (B) my  
   (C) it  
   (D) me  ✓
            
6. "Why are ......... here ? Are ......... in trouble ?" asked the girls in the headmaster's office.
            
   (A) we, we ✓
   (B) us, us  
   (C) we, us  
   (D) us, we  
            
7. This is ......... home. Welcome !
            
   (A) we  
   (B) our  ✓
   (C) us  
   (D) ours  
       
8. Harry and ......... play badminton. ......... play every weekend.
       
   (A) I, We  ✓
   (B) we, Us  
   (C) me, You  
   (D) you, They  
       
9. The waitress showed ......... family and ......... to our table.
       
   (A) my, I  ✓
   (B) me, I  
   (C) me, mine  
   (D) myself, I  
       
10. They mayor presented Suzy with ......... very own medal of honor for ......... bravery.
       
   (A) his, his  
   (B) her, her ✓  
   (C) her, his  
   (D) him, her

रुपयाची परिवर्तंनियता.

🅾1 मार्च 1992 – LERMS/दुहेरी विनिमय पद्धती लागू

🅾1993-94 – रुपया व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

🅾मार्च 1994 – रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

🅾या समितीने रुपया भांडवली खात्यावर एका टप्यात परिवर्तनीय करण्याऐवजी 1999-2000 या वर्षाअखेर तीन टप्यांमध्ये करावा अशी शिफारस केली.

🅾मात्र, जुलै 1997 च्या पूर्व आशियाई संकटामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला. या संकटाचे मूळ कारण होते, त्या देशांची चचने त्यांच्या भांडवली खात्यावर पूर्ण परिवर्तनीय होती.

🅾 मात्र सध्या परकीय चलन साठा मोठया प्रमाणावर वाढल्याने सरकारने भांडवली खात्यावरील काही व्यवहारासंबंधी परकीय चलनाच्या विनिमयावरील नियंत्रणे शिथिल केली आहे.

🅾 भांडवली खात्यावर रूपयाच्या पूर्ण परिवर्तनीयतेबद्दल शिफारसी करण्यासाठी RBI ने 2006 मध्ये एस.एस.तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एका दुसर्‍या समितीची स्थापना केली. या समितीने 31 जुलै 2006 रोजी आपला अहवाल RBI ला सादर केला, जो तिने 1 सप्टेंबर रोजी जाहीर केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण

निरनिराळ्या अर्थशास्‍त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण केलेले आहे.
सार्वजनिक खर्चांचे काही महत्‍त्‍वपूर्ण प्रकार आता बघुयात ..

अ) महसुली खर्च :

महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्‍यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च  नियमितपणे उद्भवतो.
उदा :- 
शासनाचा प्रशासकीय खर्च,
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्‍ते, निवृत्‍ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्‍यांचा खर्च इत्‍यादी.

ब) भांडवली खर्च :

भांडवली खर्च म्‍हणजे देशाच्या वृदध् ी व  विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय.
उदा :-
विविध विकास प्रकल्‍पांतील मोठ्या गुंतवणूका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्‍य शासन व शासकीय कंपन्यांना
दिलेले कर्ज इत्‍यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत.

क) विकासात्‍मक खर्च :

विकासात्‍मक खर्च हा उत्‍पादक
स्‍वरूपाचा असतो. ज्‍या खर्चामुळे रोजगार निर्मिती,उत्‍पादन वाढ, किंमतस्‍थेैर्य इत्‍यादी बदल घडून वाढ होते. त्‍याला
विकासात्‍मक खर्च असे म्‍हणतात.
उदा :- 
आरोग्‍य शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्‍याण, संशोधन आणि विकास यांवरील खर्च इत्‍यादी.

ड) विकासेतर खर्च :

शासनाच्या ज्‍या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्‍यक्ष उत्‍पादक परिणाम होत नाही, त्‍याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्‍हणतात.
उदा :-
प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्‍यादी हे खर्च  अनुत्‍पादक स्‍वरुपाचे असतात.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका

🧩स्वरूप -

🅾जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत.

🧩कार्ये -

🅾जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात.

🧩भांडवल उभारणी -

🅾स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी.

🧩विस्तार -

🅾भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने


 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर ✔
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)
_____________________________________
⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 ✔
C. 1896
D. 1899
_____________________________________
⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन ✔
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट
_____________________________________
. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम ✔
D. इंडियन आश्रम
_____________________________________
 महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔
_____________________________________
 कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920
_____________________________________
 जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन
_____________________________________
 _____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939
__________________________________
 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना
__________________________________
. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 ✔
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935
______________________________________

अंकगणित घटक - घड्याळ

स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.

🎯  सुत्र :-

1) वेळ दिली असता कोन काढणे.
      11
= --------- × M    -  30 × H
       2

M  - मिनीट
H  - दिलेल्या वेळेत एकूण किती तास आहेत.

2 )  समजा 7 ते 8 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा एकमेकावर येतात.....

सुञ...
       60 
=   -----------  ×  7 × 5
        55

3)  दिवसात किती वेळा तास व मिनीट काटा 90° चा कोन करतात  ??

उत्तर  -  12 तासात  -  22 वेळा.
            24 तासात  - 44 वेळा.

4) दिवसात किती वेळा तास काटा व मिनीट काटा परस्परांशी विरूद्ध असतात /येतात  ?

उत्तर  - 
     12 तासात    -  11 वेळा
     24 तासात    -  22 वेळा.

5 ) एक मिनीट म्हणजे   6° होय.
एक तास म्हणजे  90° होय.

6 ) प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण ठोके किती पडतात ?
      12  × 13 
=  ----------------   = 78.....12 तासात.
            2  

24 तासात एकूण ठोल   - 156

7 )  4 ते 5 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा विरुद्ध दिशेला असतील ?

स्पष्टीकरण  -
या वेळी मिनीट काटा 10 ते 11 च्या दरम्यान असेल म्हणून ...
M = 10 घ्यावे .

      60
=  --------- ×  5 × M
       55

       60  
=  -----------  × 5 × 10  
       55
      600               6
= -----------   = 54 ------
       11                11

                                  6
म्हणजे च  4 वाजून 54 ----- मिनीट.
                                  11                     

8)  5 ते 6 च्या दरम्यान किती वाजता 90 ° चा कोन होईल ?
स्पष्टीकरण  -

90 ° चा कोन होण्यासाठी मिनीट काटा 8 च्या पुढे असाला पाहीजे.
म्हणून  M = 8 घ्यावे .
       60 
  =  ------- × 5 × 8
        55

        480                7
=  -------------  = 43 ------
         11                 11

म्हणून ...                         7
90° चा कोन 5 वाजून 43 ----- मिनीट.
                                     11

आज वयवारी या टॉपिकवरील काही महत्वाची उदाहरणे पाहू

1) अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?

1) 15 वर्षे   2) 10 वर्षे   3) 5 वर्षे   4) 20 वर्षे

उत्तर : 5 वर्षे

स्पष्टीकरण :- वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.
अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.

2)   जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?

1)  11 वर्षे  2)  36 वर्षे  3)  34 वर्षे   4)  38 वर्षे

उत्तर : 38 वर्षे

क्लृप्ती :-  दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2
(49+27) ÷ 2 = 38
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

3)  रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?

1)  24 वर्षे
2)  32 वर्षे
3)  40 वर्षे
4)  48 वर्षे
उत्तर : 32 वर्षे

स्पष्टीकरण :-  राम व हरीच्या वयांचे  प्रमाण = 3x : x
दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x
फरक = 3 x – x = 2x =16,
x=8
4x = 4×8 = 32

4)   अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?

1)  21 वर्षे  2)  23 वर्षे  3)  15 वर्षे  4)  28 वर्षे

उत्तर : 21 वर्षे

स्पष्टीकरण :- सुरेशचे वय = 10 वर्षे, म्हणून अशोकचे वय = 2x-5= 20-5 = 15 वर्षे,
अशोकचे वय = 15 वर्षे यानुसार अजयचे वय x मानल्यास
x/3+8=15 म्हणून x/3=7
x=21

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले?
उत्तर : सेल्को सोलार लाइट

▪️ कोणत्या देशाने ‘लॉंग मार्च 5B’ अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : चीन

▪️ जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 8 मे

▪️ भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
उत्तर : इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स

▪️ कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री युबा योगायोग योजना’ याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
उत्तर : त्रिपुरा

▪️ ‘इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : प्राइसवॉटरहाऊस कूपर्स लिमिटेड

▪️ कोणत्या देशाने "तोमान" नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
उत्तर : इराण

▪️ इराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मुस्तफा अल-कदिमी

▪️ कोणत्या संस्थेनी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित केली?
उत्तर : युरोपीय संघ

▪️ कोणत्या संस्थेनी ‘डिजिटल इन इंडिया 2019’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘देखो अपना देश’ या कार्यक्रमाचे बोधचिन्ह चित्रित करण्याची स्पर्धा आयोजित केली?
उत्तर : पर्यटन मंत्रालय

▪️ कोणती व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमामध्ये भारताचे सदिच्छा दूत आहे?
उत्तर : दिया मिर्झा

▪️ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी चालविलेल्या अभियानाचे नाव काय आहे?
उत्तर : वंदे भारत मिशन

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर : जिनेथ बेदोया लिमा

▪️ कोणत्या राज्य सरकारने “CMAPP” अॅप तयार केले?
उत्तर : आंध्रप्रदेश

▪️ कोणत्या देशाच्या नेत्याला रशिया सरकारच्या वतीने ‘द्वितीय विश्वयुद्ध स्मारक युद्ध पदक’ देऊन गौरविण्यात आले?
उत्तर : उत्तर कोरिया

▪️ कोणते राज्य सरकार “निगाह” योजना राबवत आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश

▪️ कोणत्या देशात परिवहन क्षेत्रात ‘वन्स इन ए जनरेशन’ गुंतवणूक योजनेची घोषणा केली गेली?
उत्तर : ब्रिटन

▪️ 2020 साली जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड

महत्वाचे प्रश्न


❇️प्रश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?

१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही

❇️प्रश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?

१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात

❇️प्रश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?

१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया

❇️प्रश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?

१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही

❇️प्रश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?

१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे

❇️प्रश्न 6️⃣:-  ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅

❇️प्रश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?

१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही

❇️प्रश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?

१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही

❇️प्रश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?

१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅

❇️प्रश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?

१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅

भारतीय इतिहास

♻    स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.

♻    स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
·        
♻भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.
·        
♻भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.
·        
♻26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·        
♻20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.

♻17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·
♻भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
·        
♻डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
·
♻घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
·        
♻26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
·       
♻ घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.

♻इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
'दार समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.

♻तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.

♻राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.
सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला.

♻1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.

♻1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.

♻1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले.

♻1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली.

♻1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले.

♻1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली.

♻1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.

वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना
-----------------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना
------------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.
------------------------------------------------------

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे
-------------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम
-----------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर.

राष्ट्रपतींच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण.

🏆 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज २०२१ साठीच्या पद्म पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपती भवनात करण्यात आलं.

🏆 जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे, शिल्पकार सुदर्शन साहो, इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक मौलाना वहिदुद्दीन खान यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला.

🏆 तसंच प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांना मृत्यू पश्चात पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

🏆 माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, गायिका के एस चित्रा, प्रसिद्ध  कवी चंद्रशेखर कंबारा, निवृत्त सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्र यांना आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, माजी केद्रीयमंत्री रामविलास पासवान यांना मृत्यू पश्चात पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

🏆 समाज सेविका सिंधूताई सपकाळ, संगीतकार बॉम्बे जयश्री, ब्रीटीश चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रूक यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले.

🏆 गोव्याच्या माजी मुख्यमंत्री मृदुला सिन्हा यांना मृत्यू पश्चात हा पुरस्कार देण्यात आला.

🏆 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं यंदा ७ पद्मविभुषण, १० पद्मभुषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...