२९ ऑक्टोबर २०२१

मराठी व्याकरण: अलंकार

अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.
पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.
अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.

  शब्दालंकार:

जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात.
प्रकार-

अनुप्रास – कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
( गडद गडद जलदची पुनरावृत्ती)

यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदा.

मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||

या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |

अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.

श्लेष - एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.
उदा.

मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूय)

श्रीकृष्ण नवरा मी नवरी |
शिशुपाल नवरा मी न-वरी ||

अर्थालंकार  :

दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे.

उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून ‘कमल’ हे तेथे ‘उपमान’ आहे.

उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ किंवा ‘समान धर्म’ असे म्हणतात. वाक्यात उपमेय ‘मुख’ आणि उपमान ‘कमळ’ यांमध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे.

उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ किंवा ‘साम्यसूचक शब्द’ म्हणतात.

वरील वाक्यात ‘कामलासारखे मुख’ यातील ‘सारखे’ हा ‘साधर्म्यसूचक’ शब्द आहे.
प्रकार -

उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||

उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही

तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||

व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.

अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा

तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा

अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला |
जॉईन करा 

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषणाचा उपयोग केला आहे?

   1) मी ते काम करून टाकेन    2) मी येथून जाऊन येत आहे
   3) मी परीक्षा उत्तीर्ण होणारच    4) मी बाजारातून आंबे आणले

उत्तर :- 2

2) पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘भर’

   1) परिणामवाचक    2) दिक्वाचक   
   3) भागवाचक      4) संबंधवाचक

उत्तर :- 1

3) ‘भिका-याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले.’
     या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) परिणामबोधक    4) स्वरूपबोधक

उत्तर :- 2

4) केवलप्रयोगी अव्ययाविषयी विचार करा.

   अ) केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून ठरवितात.
   ब) केवलप्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या ती अव्यये कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवितात.

   1) फक्त अ बरोबर    2) फक्त ब बरोबर
   3) अ आणि ब बरोबर    4) अ आणि ब चूक

उत्तर :- 2

5) “मी पत्र लिहित असेन” या वाक्यातील काळ ओळखा.

   1) साधा भविष्यकाळ    2) रीती भविष्यकाळ 
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) अपूर्ण भविष्यकाळ

उत्तर :- 4

6) पुढीलपैकी केवलप्रयोगी शब्द ओळखा.

   1) परंतु    2) शाबास   
   3) त्यासाठी    4) तेथे

उत्तर :- 2

7) ‘ला’ ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो ?

   1) वर्तमान    2) भूत     
   3) भविष्य    4) रीतिवर्तमान

उत्तर :- 2

8) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो ?

   1) बाग      2) वेळ     
   3) वीणा    4) सर्व

उत्तर :- 4

9) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही.

   अ) संबोधन      ब) व्दितीया   
   क) प्रथमा      ड) षष्ठी

   1) अ आणि ड    2) फक्त अ   
   3) ब आणि क    4) फक्त ब

उत्तर :- 4

10) खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्य करा.
     “आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले.”

   1) आपण अपराधी असल्याचे त्याने कबूल केले.    2) अपराध केला म्हणून तो कबूल झाला.
   3) त्याने आपला अपराध कबूल केला.      4) तो अपराध करून कबूलही झाला.

उत्तर :- 1

समानार्थी शब्द

अलक्ष - परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
 
अमृत - सुधा, पीयूष, संजीवनी
 
अरण्य - वन, जंगल, रान, विपिन
 
अग्नी - विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
 
अश्व - तुरंग, घोडा, वारू, वाजी
 
अर्जुन - पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
 
अमर्याद - असंख्य, अगणित, अमित
 
अंबर - गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
 
अपयश - पराभव, हार, अपमान, अयश
 
अवधी - समय, वेळ, काळ, अवकाश
 
आई - जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
 
आठवण - ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
 
आकांत - हंबरडा, आक्रोश, रुदन
 
आनंद - उल्हास, हर्ष, संतोष, मोद
 
आशय - भावार्थ, अर्थ, तात्पर्य
 
आशा - आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
 
इंद्र - वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष
 
इष्ट - आवडते, प्रिय मानलेले
 
इब्लिस - बदमाश, खोडकर, विचित्र
 
उकल - उलगडा, सुटका, मोकळे
 
उधळणे - फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
 
उपाय - तजवीज, इलाज, उपचार
 
उमाळा - तरंग, लोट, उकळी
 
ऊब - आधार, सुख, उष्णता, वाफ
 
उत्कर्ष - प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक

एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ 

ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 

ओज - तेज, पाणी,

ओढ - कल, ताण, आकर्षण 

ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 

ओळख - माहिती, जामीन, परिचय 

कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 

कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था

श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव 

कपाळ - ललाट, भाल, निढळ 

कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 

कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 

काक - कावळा, वायस, एकाक्ष 

किरण - रश्मी, कर, अंशू 

काळोख - तिमिर, अंधार, तम 

कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 

करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य नैपुण्य, खुबी 

कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 

कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 

कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 

खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 

खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 

खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1) कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो?
उत्तर : 23 डिसेंबर

2) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 22 डिसेंबर

3) "हेल्थ अँड वेल बीइंग इन लेट लाइफ: पर्स्पेक्टिव्ह्ज अँड नॅरेटीव्ह्ज फ्रॉम इंडिया" पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : प्रसून चटर्जी

4) कोणत्या ठिकाणी जंगलाचे सर्वात प्राचीन जीवाश्म सापडले?
उत्तर : न्यूयॉर्क

5) अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात असलेले ‘CBERS-4A’ हे काय आहे?
उत्तर : चीन आणि ब्राझिल यांचा उपग्रह

6) कोणत्या संस्थेनी पुणे या शहरात ‘वॅक्सिनेशन ऑन व्हील्स’ क्लिनिकचा शुभारंभ केला?
उत्तर : IIT हैदराबाद

7) ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ या कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : देवेश श्रीवास्तव

8) ‘प्रवेशयोग्य निवडणुका’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा कोठे पार पडली?
उत्तर : नवी दिल्ली

9) कोणत्या संघटनेनी ICC सोबत महिला सक्षमीकरणाबाबत भागीदारीची घोषणा केली?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)

10) "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" या पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : राहुल अग्रवाल

२८ ऑक्टोबर २०२१

अर्थसंकल्प- अर्थ व उद्दिष्ट्ये

प्रा. बॅस्टेबल यांच्या मते, “अर्थसंकल्प हे विशिष्ट काळातील उत्पन्न व खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे पञक असून ते मान्यतेसाठी संविधानाकडे किंवा संसदेकडे सादर केले जाते.”

अर्थसंकल्पाबाबत आपणास असे म्हणता येईल की,

हे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे माहितीपञक असते.

हे एका वर्षासाठी असते.

अर्थसंकल्पाला सार्वजनिक मान्यता मिळावी लागते.

उत्पन्न कसे मिळवले जाणार आहे व खर्च कसा केला जाणार आहे याची माहिती अर्थसंकल्पात असते.

चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न व खर्च याप्रमाणेच गतवर्षाचे उत्पन्न खर्च याची माहिती अर्थसंकल्पात असते.

अर्थसंकल्पाची उद्दिष्ट्ये

अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामागे पुढील उद्दिष्ट्ये असतात.

उत्पन्न व खर्चाचे नियोजन करणे.

कालबद्ध उद्दिष्ट्ये सादर करणे. एका वर्षात कोणती आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य केली जाणार आहेत याची माहिती देणे.

सुनिश्चित उद्दिष्टांसाठी निधीची किती प्रमाणात आवश्यकता आहे हे स्पष्ट करणे.

निधी संकलन व खर्च यात कार्यक्षमता आणणे.

मागील खर्चाच्या आधारे चालू वर्षाच्या खर्चाचा अंदाज करणे.

उत्पन्न व खर्चाच्या विश्लेषणाचे साधन म्हणून कार्य करणे. उत्पन्न व खर्च यात कोणते बदल होत आहेत ते पाहणे.

लोकांच्या प्रति असणारे आर्थिक इत्तरदायित्व स्पष्ट करणे.

शिलकीचे अंदाजपत्रक

ज्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न हे सरकारच्या खर्चापेक्षा अधिक असते असे अर्थसंकल्प.

फायदे

आर्थिक शिस्त

आर्थिक कार्यक्षमता

खर्चाचे प्राधान्यक्रम

सरकारचा किमान हस्तक्षेप

भविष्यकालीन तरतूद

तोटे

आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करता येत नाहीत

कालबाह्य संकल्पना

आर्थिक आपत्ती

कल्याणकारी राज्यसंकल्पनेशी विसंगत

आर्थिक विकासास पूरक नाही

अर्थसंकल्प साधन आहे, साध्य नाही

तुटीचे अंदाजपञक

ज्या प्रकारच्या अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न खर्चापेक्षा कमी असते किंवा खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असतो.

फायदे

उत्पन्न व रोजगारात वाढ

मंदी विरोधी

बेरोजगारी घटविणे

आर्थिक विकास

उत्पादनास चालना

तोटे

भाववाढीचा धोका

काळाबाजार

खर्चावर नियंञण नाही

उत्पादनरचना बिघडते

विषमता वाढते

संतुलित अंदाजपत्रक

अशा अर्थसंकल्पात सरकारचे उत्पन्न व खर्च समान असते.

फायदे

खर्चावर नियंञण

चलनपुरवठा वाढत नाही

उत्पादनवाढीस उपयुक्त

कार्यक्षमता

अर्थसंकल्पिय परिणाम नाही

तोटे

अर्थव्यवस्थेस उपयुक्त नाही

विकासाला पोषक नाही

मंदी वाढते

खर्चात अपव्यव

सामाजिक लाभ नाहीत

पारंपारिक अंदाजपत्रक

उत्पन्न व खर्च यांच्यावर त्यातील समायोजनावर भर देणारे अर्थसंकल्प म्हणजे पारंपारिक अर्थसंकल्प होय.

कार्यात्मक अंदाजपत्रक

सरकारची उत्पन्न व खर्च ही साधने असून ती विशिष्ट सामाजिक उद्दिष्टांसाठी(कार्यास) वापरणे म्हणजे कार्यात्मक अर्थसंकल्प होय.

शून्याधिष्ठीत अंदाजपत्रक

मागील वर्षाच्या खर्चाचा आधार न घेता किंवा मागील वर्षाच्या खर्चाचा आधार शून्य समजून तयार केलेला अर्थसंकल्प.

तुम्हाला हे ठाऊक आहे का ?

भारतीय रेल्वे विभाग

विभाग    - केंद्र  -   स्थापना

1) मध्य विभाग
▪️ मुंबई - सन 1951

2) पश्चिम विभाग
▪️ मुंबई - सन 1951

3) उत्तर विभाग
▪️ दिल्ली - सन 1952

4) दक्षिण विभाग
▪️ चेन्नई - सन 1951

5) पूर्व विभाग
▪️ कलकत्ता - सन 1955

6) दक्षिण पूर्व विभाग
▪️ कलकत्ता - सन 1955

7) दक्षिण-मध्य
▪️ सिकंदराबाद - सन 1966

8) उत्तर पूर्व विभाग
▪️ गोरखपूर - सन 1952

9) सरहद्द रेल्वे
▪️ गोहाटी - सन 1958

10) पूर्व किनारपट्टीय विभाग
▪️ भुवनेश्वर - सन 1996

11) उत्तर मध्य विभाग
▪️अलाहाबाद - सन 1996

12) पूर्व मध्य विभाग
▪️ हाजीपूर - सन 1996

13) उत्तर पश्चिम विभाग
▪️ जयपूर - सन 1996

14) पश्चिम मध्य विभाग
▪️ जबलपूर - सन 1996

15) दक्षिण पश्चिम विभाग
▪️ बंगलोर - सन 1996

16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग
▪️ बिलासपुर - सन 1998

17) कलकत्ता मेट्रो
▪️ कलकत्ता - सन 2010

18) दक्षिण किनारी रेल्वे
▪️ विशाखापट्टणम, सन - 2019

महाराष्ट्रा मधील घाट



औटराम घाट
हा घाट चाळीसगाव-औरंगाबाद ह्या गाडीरस्त्यावर आहे. पायथ्याचे गाव चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव व माथ्याचे गाव कन्नड ता. कन्नड, जि. औरंगाबाद हे आहेत. ह्या घाटाने पितळखोरे लेणी, गौतम गुंफा, गौताळा अभयारण्य येथे जाता येते.

एकदरा घाट
एकदरा : पायरस्ता असलेला हा घाट असून, पायथ्याचे गाव टाकेद ता. इगतपुरी व माथ्याचे गाव कोकणगाव ता. अकोले जि. अहमदनगर यांना जोडणारा आहे. किल्ले अवंध पट्टा येथे जाता येते.

उंबरदरा घाट
पायरस्ता असलेल्या घाटाचे पायथ्याचे गाव चोंढा/साकुर्ली ता. शहापूर जि. ठाणे व माथ्याचे गाव सामरद ता. अकोले, जिल्हा अहमदनगर आहे. किल्ले रतनगड, शिपनेर येथे जाता येते

उत्तर तिवे घाट
हा घाट पायरस्त्याचा असून, पायथ्याचे गाव तिवरे ता. चिपळूण/खेड जि. रत्नागिरी व माथ्याचे गाव वासोटा ता. जावळी, जि. सातारा हे आहेत. ह्या घाटाने किल्ले वासोटा येथे जाता येते.

आंबोली घाट-४
हा घाट पायरस्त्याचा असून, ह्या घाटाचे गाव आंबोली ता. खेड जिल्हा रत्नागिरी व माथ्याचे गाव चक्रदेव ता. जावळी, जि. सातारा हे आहे. किल्ले रसाळगड, सुभारगड, महिपतगड येथे जाता येते.

आंबोली घाट-३
हा घाट सावंतवाडी-बेळगाव ह्या गाडीरस्त्यावर असून, पायथ्याचे गाव सावंतवाडी व माथ्याचे गाव आंबोली ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आहेत. आंबोली गाव माथ्याचे गाव असल्यामुळे ते थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. व ह्या घाटात हिरण्यकेशी ही नैसर्गिक गुहा आहे.

आंबोली घाट-२
हा घाट ता. मुरबाड जि. ठाणे व ता. जुन्नर जि. पुणे यांना जोडणारा पायरस्ता असणारा घाट आहे. ह्या घाटाचे पायथ्याचे गाव पळू ता. मुरबाड, जिल्हा ठाणे, व आंबोली हे माथ्याचे गाव आंबोली ता. जुन्नर, जि. पुणे हे आहेत. ह्या घाटाने किल्ले धाकोबा, जीवधन येथे जाता येते.

आंबोली घाट
हा घाट ठाणे व नाशिक जिल्ह्यांना जोडणारा घाट आहे. ह्या घाटाचे पायथ्याचे गाव मोखाडा ता.मोखाडा जि. ठाणे व माथ्याचे गाव अळवंडी (वैतरणा) ता. इगतपुरी जि. नाशिक हे आहेत. पायरस्ता असलेल्या घाटाने किल्ले हरिहर, उतवड, भाजगड येथे जाता येते.

आंबेनळी घाट
हा घाट ता. महाबळेश्वर जि. सातारा येथे आहे. वाडा कुंभरोशी हे घाटपायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाटमाथ्याचे गाव आहेत. हा घाट महाड महाबळेश्वर गाडीरस्ता असून, ह्या घाटातून प्रतापगड, चंद्रगड येथे जाता येते.

अहुपे घाट
हा घाट पायरस्त्याचा असून, देहेरी हे घाटपायथ्याचे गाव ता. मुरबाड जिल्हा ठाणे व अहुपे घाटमाथ्याचे गाव ता. जुन्नर, जि. पुणे ह्यात आहे. या घाटाने जवळ असलेले सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड व इतर किल्ल्यांना जाता येते.

भूगोल प्रश्नसंच

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A]  200.60 लाख हेक्टर

B] 207.60 लाख हेक्टर

C]  307.70 लाख हेक्टर✔️

D]  318.60 लाख हेक्टर


कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.

A] 513✔️

B]  213

C]  102

D]  302

खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A]  तेरणा

B] प्रवरा

C] मांजरा

D]  भातसा✔️


___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A]  कांडला

B] कोची

C]  मांडवी

D] वरीलपैकी नाही

जागतिक वारसा शिल्पस्थानात _________ या लेणीची नोंद केलेली आहे.

A]  अजंठा लेणी✔️

B] कार्ले लेणी

C] पितळखोरा लेणी

D] बेडसा लेणी

गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A]  अकोला   

B]  बुलढाणा

C] धुळे✔️

D] ठाणे

2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ____________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A] नाशिक

B] औरंगाबाद

C] पुणे✔️

D] सोलापूर


महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A] सह्याद्रि पर्वत✔️

B]  सातपुडा पर्वत

C] निलगिरी पर्वत

D]  अरवली पर्वत


महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _________ नावाने ओळखली जाते.

A] सायरस

B]  ध्रुव

C]  पूर्णिमा

D] अप्सरा ✔️


महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे _________ जिल्ह्यात आहे.  

A]  अमरावती व अकोला

B] नांदेड व परभणी

C] हिंगोली व वाशिम

D] यवतमाळ वे रत्नागिरी✔️

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)

औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा.

मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? - औरंगाबाद.

लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - उस्मानाबाद.

जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - औरंगाबाद.

महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? - मराठवाडा.

गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद-जळगाव.

औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? - अजिंठा.

·        जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - नांदेड.

·        गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? - पैठण-औरंगाबाद.

·        जायकवाडी जलाशयाचे नाव काय? - नाथसागर.

·        जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? - औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड.

·        महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? - कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे.

·        बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - राहुरी व औरंगाबाद.

·        महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? - मराठवाडा.

·        महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? - कोरडा दुष्काळ.

·        जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पैठण, औरंगाबाद.

·        गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? - जपान.

·        हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? - औरंगाबाद.

·        गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? - पैठण.

·        महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? - मराठवाडा.

·        शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? - नांदेड.

·        दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? - पैठण.

·        पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? - संत एकनाथ.

·        औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - हिंगोली.

·        घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? - नांदेड.

·        परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? - बीड.

·        खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - लातूर.

·        अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? - औरंगाबाद.

·        धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? - औरंगाबाद.

·        वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? - शिल्पकला.

·        महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? - 1972.

·        वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? - औरंगाबाद.

·        श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? - तुळजापूर (उस्मानाबाद).

·        महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? - नांदेड.

·        कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? - अंबेजोगाई.

·        मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? - अक्षी.

·        दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? - उस्मानाबाद.

·        महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? - एकनाथ.

·        शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? - नामदेव.

·        प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - गोदावरी.

·        बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? - औरंगाबाद.

·        देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? - अजंठा रांगा.

·        गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? - हरिषचंद्र-बालाघाट.

·        बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? - गोदावरी.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...