३० ऑक्टोबर २०२१

सर्वनाम

नामऐवजी वापरल्या जाणार्‍या शब्दांला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामचे मुख्य प्रकार सहा आहेत.
1. पुरुषवाचक सर्वनाम
2. दर्शक सर्वनाम
3. संबंधी सर्वनाम
4. प्रश्नार्थक सर्वनाम
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम
6. आत्मवाचक सर्वनाम

👉. पुरुषवाचक सर्वनाम :

याचे तीन उपप्रकार पडतात.
1. प्रथम पुरुष : मी, आम्ही, आपण, स्वत: इ
  उदा. 1. मी गावाला जाणार.
        2. आपण खेळायला जावू.

2 .व्दितीय पुरुष : तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
     उदा. 1. आपण कोठून आलात?
            2. तुम्ही घरी कधी येणार?

3. तृतीय पुरुष  : तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
    उदा. 1. त्याने माला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
          2. त्या सर्वजण इथेच येत होत्या.

👉. दर्शक सर्वनाम :

कोणतीही जवळची किंवा वा दूरची वस्तु दर्शविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात.
उदा. हा, ही, हे, तो, ती, ते.
उदा. 1. ही माझी वही आहे
  2. हा माझा भाऊ आहे.
3. ते माझे घर आहे.
4. तो आमचा बंगला आहे.

👉. संबंधी सर्वनाम :

वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्‍या सर्वनामाला संबंधी सर्वनामे असे म्हणतात.
उदा. जो, जी, जे, ज्या
ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
  उदा .1. जे चकाकते ते सारेच सोने नसते.
2. जो तळे राखील तो पाणी चाखील.

👉  प्रश्नार्थक सर्वनाम :

ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात.
  उदा. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
  उदा. 1. तुझे नाव काय?
2. तुला कोणी संगितले.
3. कोण आहे तिकडे.

👉सामान्य / अनिश्चित सर्वनाम :

कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.
  उदा. 1. त्या पेटीत काय आहे ते सांग.
2. कोणी कोणास हसू नये.
3. कोण ही गर्दी !

👉 आत्मवाचक सर्वनाम :

आपण व स्वतःह्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात. हे सर्वनाम वाक्याच्या सुरवातीला कधीच येत नाही.
  उदा. 1. मी स्वतःत्याला पहीले.
2. तू स्वतः मोटर चालवशील का?
3. तो आपण होवून माझ्याकडे आला.
4. तुम्ही स्वतःला काय समजतात.

मराठीत मूळ 9 सर्वनाम

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत - तो, हा, जो.
1. तो- तो, ती, ते
2. हा- हा, ही, हे
3. जो-जो, जी, जे
वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे :

मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. - मी, तू, तो, हा, जो इ
1. मी- आम्ही
2. तू- तुम्ही
3. तो- तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
4. हा- हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
5. जो- जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)

समानार्थी शब्द


▪️निफड - गरज, जरूरी, लकडा
 
▪️निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
▪️निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
▪️पंगत - भोजन, रांग, ओळ
 
▪️पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
▪️पान - पर्ण, पत्र, दल
 
▪️परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
▪️प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
▪️पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
▪️पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
▪️पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
▪️पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
▪️प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
▪️पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
▪️पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
▪️पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
▪️प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
▪️पाय - चरण, पाऊल, पद
 
▪️पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
▪️प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
▪️प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
▪️फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
▪️फट - चीर, खाच, भेग
 
▪️फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
▪️फरक - अंतर,

संपूर्ण मराठी व्याकरण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द:

उदय × अस्त
आदी × अनादी
किंकर,चाकर × मालक,धनी
मर्त्य × अमर
सकाम × निकाम
धुरीण × अनुयायी
रंक × राव,धनाढ्य
दीप्ती × अंधःकार
दुभती × भाकड
दैववाद × प्रयत्नवाद
तम,तिमिर × प्रकाश,उजेड
विनंती × ताकीद
जागृत × निद्रिस्त
तृप्त × अतृप्त
तजेलदार × कोमेजलेले
झकास × निकृष्ट
औत्सुक्य × औदासीन्य
आसक्ती × विरक्ती
औधत्य × नम्रता
कुकर्म × सत्कर्म
साव × चोर
अशांत × प्रशांत
दुष्ट × सुष्ट
सधवा × विधवा
सुलभ × दुर्लभ
सुवर्णयुग × तमोयुग
गद्य × पद्य
सक्षम × अक्षम
राजमार्ग × आडमार्ग
खोल × उथळ
आपुलकी × परकेपणा
आहेरे × नाहिरे
कुलटा × घरंदाज
कृपा × अवकृपा
प्रशंसा × कुचाळी
खम्बीर × डळमळीत
औरस × अनौरस
श्राव्य × अश्राव्य
नीटनेटका × गबाळयंत्री
टंचाई × रेलचेल
इष्टाग्रह × दुराग्रह
साकल्य × वैफल्य
साकार × निराकार
तारतम्य × अविवेक
आठवण × विसर, विस्मरण
उघड × गुप्त
सुविचार × अविचार
उद्योगी × आळशी
एकमत × दुमत
आक्षेप × निरसन
गुंता × उकल
संक्षिप्त,त्रोटक × इत्यंभूत
विन्मुख × उन्मुखी
खंडन × मंडन
सामूहिक × वैयक्तिक
वस्तुस्थिती × आभास
क्षणभंगुर × चिरकलीन
माजी × आजी,विद्यमान
श्रमजीवी × बुद्धिजीवी
स्वस्ताई × महागाई
गर्विष्ठ × निगर्वी
विधायक × विध्वंसक
भरती × ओहोटी
हर्ष × खेद
साकार × निराकार
सकाम × निष्काम
चढाई × माघार
खंडित × अव्याहत
परिक्ष × अपरिक्ष
आडकाठी × मोकळी
सत्य × मिथ्या, मिथ्य
छाया × पडछाया
ग्राह्य × त्याज्य
हीन × दर्जेदार
राग × अनुराग
आमंत्रित × अनाहूत,आंगतूक
सह्य × असह्य
बंडखोर × शांत
कीर्ती × अपकीर्ती
इच्छा × अनिच्छा
सदाचरण × दुराचरण
उपलब्ध × अनुपलब्ध
इप्सित × अवांच्छित
उत्तेजन × खच्चीकरण
प्रसन्न × उद्विग्न
उल्लड × पोक्त
कृष्ण × धवल
अर्थ × अर्थहीन
अंतरंग × बहिरंग
इहलोक × परलोक
उदार × अनुदार
तन्मय × द्विधा
समदर्शी × पक्षपाती
कळस × पाया, पायरी
ओवळा × सोहळा
गच्च × सैल,विरळ
उपाय × निरुपाय
गतकाल × भविष्यकाळ
शंका × कुशंका
विवाद × निर्विवाद
वेध × निर्वेध
सुबोध ×  दुर्बोध
वियोग × संयोग,मिलन
सन्मार्ग × कुमार्ग
लौकिक × दुलौकीक
रुकार × नकार
ऐलतीर × पैलतीर
भोग × त्याग
आवक × जावक
हलकी × अवजड
कुचकामी × फलदाई
उदंड × कमी
स्वार्थ × परमार्थ
क्षम्य × अक्षम्य
संकुचित × व्यापक
श्रुत × अश्रुत
स्मृती × विस्मृती
सनातनी × सुधारक
सक्ती × खुषी
क्षेम × धोका
क्षर × अक्षर
स्वतंत्र × परतंत्र्य
स्वातंत्र्य × पारतंत्र्य
सुरस × नीरस
स्थूल × सूक्ष्म,कृश
पौर्वात्य × पाश्चात्य, पाश्चिमात्य
तारक × मारक
अवधान × अनावधान
अजस्त्र × चिमुकले
स्वीकार × अव्हेर
याचित × आयाचित
उत्कर्ष × अपकर्ष
कला × पांढरा, गोरा
नक्कल × अस्सल
गंभीर × अवखळ
प्रगती × अधोगती
उताणा × पालथा
उंच × ठेंगणा, बुटका,सखल
कोवळे × जून,राठ, निबर
अब्रू × बेअब्रू
उतार × चढाव
एकमत × दुमत
उन्नत × अवनत
उदार × कंजूस, अनुदार
उच्च × नीच
अंध × डोळस
अर्वाचीन × प्राचीन
उष्ण × थंड,गार, शीतल
एक × अनेक
ओली × कोरडी,सुकी
उन्नती × अवनती,अधोगती
आधुनिक × सनातनी
अकलवन्त × अकलशून्य,अकलमंद
अमृत,सुधा × विष,जहर,गरळ
आय × व्यय
इमानी × बेइमानी
आरोहण × अवरोहण
अभिमान × दुराभिमान
घट्ट × सैल,भोंगळ
कोवळा × जून,कडक,निबर
गती × अधोगती,परागती
जनता × नेणता
जेता × जित
जाड्या × रोड्या
चवदार × सपक
चेतन × जड
जणता × अजाण,अडाणी
आमंत्रित × आंगतुक
कालिक × कालातीत
कृतज्ञ × कृतघ्न
मोद × खन्त
रनशूर × रनभीरु
रुचकर × बेचव,सपक,रुचीहीन
राव × रंक
लठ्ठ × कृश
वंद्य × निंद्य
शाश्वत × अशाश्वत,क्षणभंगूर
शंका × खात्री

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खाली दिलेल्या वाक्यातून विशेषण असणारे वाक्य निवडा.

   1) दशरथाने कैकयीला दोन वर दिले    2) तू त्या राजपुत्राला वर
   3) पक्षी झाडावर बसतो        4) वरपिता मुलाच्या लग्नात उपस्थित नव्हता

उत्तर :- 4

2) संयुक्त क्रियापदे म्हणजे

   1) कृदन्त + धातुसाधित      2) प्रयोजक क्रियापद + शक्य क्रियापद
   3) धातू + क्रियादर्शक पद      4) धातुसाधित + सहाय्यक क्रियापद

उत्तर :- 4

3) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – नेता लोक मोठमोठयाने बोलत होते.

   1) नाम      2) सर्वनाम   
   3) विशेषण    4) क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 4

4) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
     ‘ठायी’

   1) स्थलवाचक    2) कालवाचक   
   3) संग्रहवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

5) न्युनत्वबोधक संयुक्तवाक्य तयार करताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?

   1) आणि, व    2) अथवा, किंवा   
   3) पण, परंतु    4) म्हूणून, सबब

उत्तर :- 3

6) ‘गायरान’ या शब्दाचे लिंग कोणते?
   1) नपुंसकलिंग    2) स्त्रीलिंग   
   3) पुल्लिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

7) अयोग्य जोडी निवडा.

   अ) सप्तमी    - 1) आपादान
   ब) पंचमी    - 2) अधिकरण
   क) तृतीया    - 3) करण
   ड) षष्ठी    - 4) संबंध

   1) फक्त अ आणि ब    2) फक्त अ   
   3) फक्त ब आणि क    4) फक्त क आणि ड

उत्तर :- 1

8) तुम्ही मला मदत करणार नाही – योग्य प्रश्नार्थक वाक्य निवडा.

   1) तुम्ही मला काय मदत करणार ?      2) तुम्ही मला मदत करणार का ?
   3) तुम्ही मला मदत केली नाही ?      4) तुम्ही मदत कराल ना ?

उत्तर :- 1

9) “आज संपत्ती त्याजपाशी आहे.” – या वाक्यातील मुळ उद्देश कोणते ?

   1) आज    2) त्याजपाशी   
   3) संपत्ती    4) आहे

उत्तर :- 3

10) ‘विराम निबंध लिहितो’ प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी    2) कर्तरी     
   3) भावे    4) संकीर्ण

उत्तर :- 2

दीर्घ पल्ल्याच्या ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी.



🔰ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून ‘अग्नी-5’ या अणु-क्षमतेच्या आंतरखंडीय लक्ष्यवेधी क्षेपणास्त्राची (ICBM) चाचणी DRDO संस्थेच्या नजरेखाली दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी यशस्वीपणे पार पाडण्यात आली.


🔴अग्नी-5 क्षेपणास्त्राची वैशिष्ठ्ये..


🔰भारताचे स्वदेशी ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्र हे आण्विक युद्धसामुग्री वाहून नेण्यासाठी सक्षम आहे आणि लांब अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेणाची क्षमता ठेवते. या क्षेपणास्त्राचा विकास 2007 साली केला गेला.हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.


🔰त सुमारे 5,000 ते 8,000 किलोमीटर अंतरावर मारा करू शकते.

हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याच्या अॅडवांस्ड सिस्टम्स लेबोरेटरीने विकसित केलेल्या ‘अग्नी’ या मालिकामधील पाचवी आवृत्ती आहे.


🔰कषेपणास्त्राला एकात्मिक पथदर्शी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) अंतर्गत तयार केले गेले आहे.

‘अग्नी’ची मालिका


🔰सवदेशी ‘अग्नी’ क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) कडून विकसित करण्यात आले आहे.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) कंपनीला 'महारत्न' दर्जा प्राप्त



भारत सरकारने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) या सरकारी कंपनीला 'महारत्न' दर्जा प्रदान केला आहे.


▪️ठळक बाबी


पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) ही वीज मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील असलेली सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे.


PFC ही ‘महारत्न’ श्रेणीमध्ये प्रवेश करणारी भारतातील 11 वी कंपनी ठरली आहे.

कंपनीला 'महारत्न' दर्जा प्राप्त झाल्यामुळे, PFC अधिक चांगल्यापणे गुंतवणूक करण्यास, संयुक्त आर्थिक उपक्रम आणि पूर्ण मालकीच्या उपकंपन्या तयार करण्यास सक्षम असेल. तसेच कंपनी भारतामध्ये तसेच विदेशात विलीनीकरण आणि अधिग्रहण यासंबंधीचे कार्ये करू शकणार.

‘महारत्न’ दर्जाविषयी


केंद्रीय सरकारने ‘महारत्न’ दर्जाच्या स्थापना 2009 साली केली. मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमांना (C.P.S.E) आपल्या कार्याचा विस्तार करणे आणि जगातील एक मोठी कंपनी म्हणून नावारूपास येण्यास सक्षम करणे हा या मागचा हेतु आहे.


‘महारत्न’ दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपनीला 'नवरत्न' दर्ज़ा प्राप्त झालेला असावा लागतो. तसेच मागील तीन वर्षांच्या कालावधीत सरासरी वार्षिक भागभांडवल 15,000 कोटी रुपये यापेक्षा अधिक असावे लागते. कंपनीची वैश्विक पातळीवर महत्वपूर्ण उपस्थिती / आंतरराष्ट्रीय कार्ये असावे लागते.

भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाची 8 वी मंत्रीस्तरीय बैठक वॉशिंग्टन डीसी येथे संपन्न.


भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाची 8 वी मंत्रीस्तरीय बैठक अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे 15 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडली.


केंद्रीय वित्त आणि कंपनी कार्ये मंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेच्या कोषागार सचिव डॉ. जेनेट येलेन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.


भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारी संवादाच्या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान व्यापक आर्थिक दृष्टीकोन आणि कोविड-19 परिस्थितीत सुधारणा, आर्थिक नियामक आणि तांत्रिक सहकार्य, बहुपक्षीय सहभाग, हवामान बदल रोखण्यासाठी गुंतवणूक आणि काळ्या पैश्याला प्रतिबंध आणि दहशतवादाला होणाऱ्या वित्तपुरवठ्याला आळा घालण्यासह (AML/CFT) विविध विषयांवर चर्चा झाली.

परस्पर आणि जागतिक आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सौहार्दपूर्ण रणनीती आणि उपाययोजनांच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी दोनही देशांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मंचांवर सहकार्य सुरू ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.


2010 साली भारत-अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारीची स्थापना करण्यात आली. दोनही देशांमधील आर्थिक बंध बळकट करण्यासाठी आणि भविष्यात अधिक सहकार्य आणि आर्थिक वाढ निर्माण करण्यासाठी ते एक चौकट म्हणून कार्य करते.

एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ नामक गस्त सरावात भारतीय सैन्याला सुवर्ण पदक मिळाले.



13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ब्रेकन (वेल्स, ब्रिटन) येथे आयोजित केलेल्या ‘एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ नामक गस्त सरावात भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 4/5 गोरखा रायफल्स (फ्रंटियर फोर्स) संघाला सुवर्णपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


ब्रिटीश लष्कराच्या भूदलाचे चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल सर मार्क कार्लटन-स्मिथ यांनी 15 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या एका औपचारिक समारंभात भारतीय लष्कराच्या संघाला सुवर्णपदक प्रदान केले.


▪️ठळक बाबी.


‘एक्झरसाइज केंब्रियन पेट्रोल’ हा एक बहुपक्षीय लष्करी गस्त सराव आहे, जो ब्रिटीश लष्कराच्या भूदलाच्यावतीने आयोजित करण्यात येतो.


हा सराव म्हणजे मानवी सहनशक्ती आणि संघभावना यांची अत्युच्च चाचणी परीक्षा समजली जाते आणि जगभरातील लष्करी समुदायांमध्ये याला लष्करी गस्तीचे ऑलिम्पिक असे संबोधण्यात येते.


या सरावात एकूण 96 संघ सहभागी होते. या संघांमध्ये जगभरातील विशेष लष्करी दले आणि अत्यंत सन्माननीय पलटणींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17 आंतरराष्ट्रीय संघांचा समावेश होता.


या युद्धाभ्यासामध्ये सहभागी झालेल्या संघांनी अतितीव्र वातावरण असलेले भूभाग आणि असह्य थंड वातावरण यामुळे तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना केला. 


तसेच प्रत्यक्ष जगातील गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले,  जेणेकरून प्रत्यक्ष रणभूमीवर या लष्कराचे प्रतिसाद कसे असतील याचे परीक्षण करता येईल.

२९ ऑक्टोबर २०२१

Online Test Series

संपूर्ण मराठी व्याकरण अर्थासह मराठी म्हणी

1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे
30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे
37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे
38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही
47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे
48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

मराठी व्याकरण - भाषेतील रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे (सहा रस) आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव** कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती –  शृंगार
हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन
उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर
हा रस कुठे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात
उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण
हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात
उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र
हा रस कुठे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन
उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय**

रसनिर्मिती- भयानक
हा रस कुठे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत
हा रस कुठे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

मराठी व्याकरण: अलंकार

अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.
पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.
अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.

  शब्दालंकार:

जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात.
प्रकार-

अनुप्रास – कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
( गडद गडद जलदची पुनरावृत्ती)

यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदा.

मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||

या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |

अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.

श्लेष - एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.
उदा.

मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूय)

श्रीकृष्ण नवरा मी नवरी |
शिशुपाल नवरा मी न-वरी ||

अर्थालंकार  :

दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे.

उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून ‘कमल’ हे तेथे ‘उपमान’ आहे.

उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ किंवा ‘समान धर्म’ असे म्हणतात. वाक्यात उपमेय ‘मुख’ आणि उपमान ‘कमळ’ यांमध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे.

उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ किंवा ‘साम्यसूचक शब्द’ म्हणतात.

वरील वाक्यात ‘कामलासारखे मुख’ यातील ‘सारखे’ हा ‘साधर्म्यसूचक’ शब्द आहे.
प्रकार -

उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||

उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही

तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||

व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.

अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा

तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा

अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला |
जॉईन करा 

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...