२४ ऑक्टोबर २०२१

भारताचा भूगोल

भारताचा भौगोलिक नकाशा.

🍀भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात

🍀 भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

🍀भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता.

🍀पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. 

🍀भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला.

🍀आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो.  गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.

अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो.

अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. 

 पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते

. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो. 

दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत.

दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी
वर्षांपेक्षाही अधिक आहे.

 भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.

♦️बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. 

♦️गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडकी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते.

♦️दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात्.

♦️ मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.[९] [१०] पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात.

♦️ गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. [११]. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात.

♦️ दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्विप व बंगालच्या उपसागरातील बर्मा व इंडोनेशियाजवळील अंदमान आणि निकोबार. 

🍂भारतीय हवामान हे हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे.

⭐️हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत.

⭐️थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात.

🍂जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैरुत्य मोसमी वार्‍यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. 

🍂हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते.

🍂अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान जास्तच असते. 

 🍂ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आद्र हवामान, विषवृत्तीय शुष्क हवामान, समविषववृतीय आद्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान. 

♦️भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,  38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.

♦️भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो. 

♦️भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश.

♦️भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे. 

♦️भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.

♦️भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.

♦️भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.

♦️जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.

♦️21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.

♦️जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.

♦️के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.

♦️कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळच्या
सीमेवार आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.

♦️देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.

♦️भारतात एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.

♦️क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.

♦️लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.

♦️चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.

♦️देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे. 

♦️भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील

♦️राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.

♦️भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.

♦️भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.

♦️भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.

♦️भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.

♦️देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.

♦️देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.

♦️देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.

♦️सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.


🧩व्दिपकल्प - 

🅾एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

🧩 भूशीर - 

🅾व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

🧩खंडांतर्गत समुद्र -

🅾 मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🧩 बेट - 

🅾एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

🧩 समुद्रधुनी -

🅾 काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 🧩संयोगभूमी - 

🅾दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 🧩आखात - 

🅾उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

🧩खाडी - 

🅾आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

🧩 समुद्र किंवा सागर - 

🅾महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

🧩 उपसागर - 

🅾खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र

■ *महाराष्ट्रातील :अष्टविनायक*
--------------------------------------------------
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
--------------------------------------------------
*महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प*
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
● *महाराष्ट्र : अभयारण्ये.*

*कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.

◆ *पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे

■ *नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.

●  *औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.

■ *अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

लोकपालच्या बोधचिन्हाचा आणि ब्रीदवाक्याचा स्वीकार

26 नोव्हेंबर 2019 रोजी लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकपालच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रकाशन झाले. या शिवाय लोकपालचे ब्रीदवाक्य (घोषवाक्य / motto) म्हणून “मा गृधः कस्यस्विद्धनम्” स्वीकारण्यात आले.

लोकपालच्या बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्यासाठी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या निवड प्रक्रियेततून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजचा रहिवासी प्रशांत मिश्रा यांच्या चिन्हाची निवड करण्यात आली.

बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्य विषयी

चित्रात दर्शवल्याप्रमाणे चिन्हाच्या मध्यभागी न्यायासन आहे, तर आजूबाजूला मानवी चित्रातून जनता दर्शवली आहे. अशोक चक्रासारख्या आकृतीतून डोळा अर्थात लक्ष दर्शवण्यात आले आहे. केशरी रंगात कायद्याचे पुस्तक आहे आणि दोन हिरव्या हातांनी समतोल दर्शवला आहे. तिरंगी रंगातला हा लोगो राष्ट्रीय लोकपाल दर्शवतो.

लोकपालपीठाने सर्वसंमतीने ‘ईशावास्योपनिषध’ याच्या पहिल्या श्लोकात असलेल्या “मा गृधः कस्यस्विद्धनम्” या वाक्याची निवड केली. ‘मा गृधः= लोभ करु नका’; ‘कस्यस्वित्=कोणाच्याही’, ‘धनम्=धनाचा’ म्हणजेच “कोणाच्याही संपत्तीचा लोभ करु नका” असा या वाक्याचा अर्थ होतो.

लोकपाल म्हणजे काय?

लोकपाल (Ombudsman) म्हणजे अशी अधिकृत व्यक्ती/मंडळ, जे वैयक्तिक तक्रारीची दखल घेत कुठल्याही कंपनी आणि संस्थेची (विशेषत: सार्वजनिक) चौकशी करू शकते.

सन 2014 मध्ये ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला संसदेनी मंजुरी दिली. लोकपाल संस्था कोणत्याही संविधानाच्या आधाराशिवाय चालणारी एक वैधानिक संस्था आहे, जी पंतप्रधान सहित सर्व लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तपास करू शकण्यास सक्षम असणार.

लोकपाल कायद्यानुसार लोकपाल संस्थेवर अध्यक्षांखेरीज किमान आठ सदस्यही नेमण्यात आली आहेत. यापैकी चार सदस्य न्यायिक व चार सदस्य गैरन्यायिक आहेत. दोन्ही प्रकाराच्या सदस्यांपैकी किमान 50% सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्गीय, अल्पसंख्यांक व महिला यांच्यातून नेमण्यात आली आहेत.

व्यापारी बँकांची कार्य.


🅾व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात.

🅾बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते.

1. प्राथमिक कार्य – ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

A. ठेवी स्विकारणे-

1. मागणीदेय ठेवी/चालू ठेवी –

🅾ज्या ठेवीचे पैसे मागणी करताच परत द्यावे लागतात त्यांना मागणीदेय ठेवी म्हणतात.

🅾खात्यातून केव्हाही व कितीही रक्कम काढता व ठेवता येते.

🅾खात्यावर धांनादेशाची सोय असल्यास त्यादवारे व्यवहार केला जाऊ शकतो  

2. मुदत ठेवी –

🅾या ठेवीत एक विशिष्ट मुदतीसाठी पैसे ठेवले जातात.

🅾मुदत संपल्याशिवाय पैसे देण्याचे बंधन बँकेवर नसते.

🅾मुदतपूर्व पैसे हवे असल्यास दंडात्मक व्याजदर आकारून ते पैसे दिले जातात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

तुम्हाला माहीत आहे का ?

♻️ लोकसंख्या घनता - 1901 ते 2011♻️

●सातत्याने वाढच झालेली आहे.
(अपवाद - 1911 ते 1921)

●1901 ते 1951 -लोकसंख्या घनता - दीड पट वाढ

●1951 ते 2011 लोकसंख्या घनता - 3.25 पटीने वाढ

     वर्ष            घनता(चौ.किमी)
●1901       -         77
●1911       -         82
●1921       -         81(घनता कमी झाली)
●1951       -         117
●1961       -         142
●1991       -         267
●2001       -         325
●2011       -         382

📚पंचायतराज - परिक्षाभिमुख मुद्दे📚

📚 2 ऑक्टोबर 1952 - समुदाय विकास कार्यक्रम - CDS योजना

✅ BDO पदाची निर्मिती

📚5 स्तरावर - समुदाय विकास कार्यक्रम राबवणार
1. केंद्र
2. राज्य
3. जिल्हा
4. गट
5. ग्राम
,
📚16 जानेवारी 1957 - बलवंतराय मेहता समिती स्थापन📚

लोकशाही विकेंद्रीकरण शिफारस - 'पंचायत राज' नाव - पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुचवले

त्रिस्तरीय पंचायतराज शिफारस - जिल्हा परिषद, पंचायत समिती , ग्रामपंचायत

ग्रामपंचायत - प्रत्यक्ष निवडणूक व्हावी

पंचायत समिती व जिल्हा परिषद - अप्रत्यक्ष निवडणूक

जिल्हा परिषदेत - लोकसभा व विधानसभा सदस्यांना स्थान असावे.

जिल्हा परिषद अध्यक्ष - जिल्हाधिकारी असावा.

2 किंवा अधिक ग्रामपंचायतीकरिता न्यायपंचायत स्थापन करावी.

2 ऑक्टोबर 1959 - पंचायतराज सर्वप्रथम - नागौर जिल्हा राजस्थान

भारताचे उपराष्ट्रपती (1952 ते 2019)

01. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952 ते 1962)
02. डाॅ. झाकीर हुसेन (1962 ते 1967)
03. वराहगिरी वेंकट गिरी (1967 ते 1969)
04. गोपाळ स्वरूप पाठक (1969 ते 1974)
05. बसप्पा धनप्पा जत्ती (1974 ते 1979)
06. न्या. महम्मद हिदायतुल्ला (1979 ते 1984)
07. रामास्वामी वेंकटरमण (1984 ते 1987)
08. शंकर दयाल शर्मा (1987 ते 1992)
09. कोचीरिल रमण नारायण (1992 ते 1997)
10. कृष्ण कांत (1997 ते 2002)
11. भैरवसिंह शेखावत (2002 ते 2007)
12. महम्मद हमिद अन्सारी (2007 ते 2017)
13. वेंकय्या नायडू (2017 ते आजपर्यंत)

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या व्यक्तीची राष्ट्रपतींसाठीचे नवे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : कपिल देव त्रिपाठी

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘कोविड इंडिया सेवा’ या नावाने एका संकेतस्थळाचे उद्घाटन केले?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪️ "GetCETGo" नावाने एक ऑनलाईन व्यासपीठ कोणत्या राज्याने सुरु केले आहे?
उत्तर : कर्नाटक

▪️ कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर : संजय कोठारी

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भागीदारीने टेक महिंद्रा ही कंपनी नवसंशोधन केंद्रांची स्थापना करणार आहे?
उत्तर : IBM

▪️ कोणत्या बँकेनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) विशेष भांडवली मदत योजना जाहीर केली?
उत्तर : भारतीय लघू उद्योग विकास बँक

▪️ कोणत्या अंतराळ संस्थेनी 60 इंटरनेट बीमिंग उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले?
उत्तर : स्पेसएक्स

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘माय बुक माय फ्रेंड’ मोहीमेचे उद्घाटन केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

▪️ कोणत्या राज्यात 23 एप्रिल या दिवशी खोंगजोम दिन पाळला जातो?
उत्तर : मणीपूर

वाचा :- भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये

● *बराक 8* : हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते

● *निर्भय* : या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात.

● *पिनाका अग्निबाण प्रणाली 6* : अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.

● *आकाश : हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे

● *ब्राम्होस* : हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल.

● *त्रिशुळ* : या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे.

● *नाग* : हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे.

● *सूर्या* : हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे.

● *सागरिका* : हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे.

● *शौर्य* : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

● *धनुष* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे.

● *अग्नी* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे.

● *तेजस* : हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे.

● *सारथ* : हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

● *हॉक्स* : हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल.

● *फाल्कन* : हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे.

स्पर्धा परीक्षा प्रश्नावली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️नाथसागर हे धरण कोठे आहे?
  
  पैठण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️"स्कुल ऑफ आर्टिलरी' कोठे आहे..?
  
देवळाली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते?
   
हुपरी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

  मुख्य कार्यकारी अधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?             
  
सरपंच
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?

  पोलीस पाटील
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

  गटविकास अधिकारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

  गोंदिया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️संत तुकडोजी महाराज गुरूकुंज आश्रम कोठे आहे?

मोझरी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?

  गडचिरोली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️भिमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे?
  
पुणे

काळ, काम आणि वेग टॉपिकवर सराव  प्रश्न


1) 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?

1) 6  2) 8   3) 10   4) 4

⧪ उत्तर : 4

क्लृप्ती :-
माहिती भाग = प्रश्न10×6×12=20×9×xयानुसार X = 10×6×12/20×9= 4
---------------------------------------------------------
2) ‘अ’ एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास ‘ब’ ला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?

1) 8   2) 12   3) 15   4) 10

⧪ उत्तर : 12

स्पष्टीकरण :-
‘अ’ ला एक काम करण्यास 20 दिवस लागतात आणि ‘ब’ ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात. त्यानुसार ‘अ’ एक दिवसात 1/20 x काम करतो आणि ‘ब’ एक दिवसात 1/3 x काम करतो:: दोघे मिळून एक दिवसात 1/20+1/30=3/60+2/60=5/60 भाग काम करतात दोघे मिळून ते कामा X= 60/5=12 दिवसात पूर्ण करतील
---------------------------------------------------------
3)  ‘अ’ हा ‘ब’ च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. ‘अ’ एकटा 12 दिवसांत एक काम संपवितो तर ‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

1) 4   2) 12   3) 8   4) 6

⧪ उत्तर : 4

स्पष्टीकरण :-
‘अ’ ला एक काम संपविण्यास 12 दिवस लागतात,जर ‘अ’, ‘ब’ च्या दुप्पट काम करतो, तर ‘ब’ ला ते काम करण्यास 24 दिवस लागतील.:: ‘अ’ व ‘ब’ हे दोघे एक दिवसात 1/12+1/24=3/24 काम करतील:: ‘क’ हा ‘अ’ आणि ‘ब’ यांच्या एवढे काम करतो, म्हणजेच 3/24 काम करतो‘अ’, ‘ब’, ‘क’ मिळून एक दिवसात 3/24+3/24=6/24 भाग काम करतात.:: तिघे मिळून ते काम 24/6=4 दिवसांत पूर्ण करतील.
---------------------------------------------------------
4)  एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?

1) 15   2) 8   3) 12   4) 10

⧪ उत्तर : 10

स्पष्टीकरण :-
3 मुले = 2 पुरुष म्हणजेच 15 मुले = 10 पुरुष,यावरून 10 पुरुष ते काम 20 दिवसांत करतात.: 20 पुरुष ते काम 10 दिवसांत करतील.
---------------------------------------------------------
5) 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरीत्या किती दिवसांत पूर्ण करतील?

1) 12   2) 9   3) 10   4) 16

⧪ उत्तर : 9

स्पष्टीकरण :-
6 पुरुष किंवा 8 मुले म्हणजे 3:4 प्रमाण म्हणजेच 4 मुलाएवढे 3 पुरुष काम करतात.यानुसार 12 मुलाएवढे 9 पुरुष काम करतील आणि 6 पुरुष 24 दिवसांत काम करतील:: 7+9=16 याप्रमाणे  6×24/16 = 9, म्हणजेच 16 पुरुष 9 दिवसांत काम पूर्ण करतील.

संख्या व स्थानिक किंमत यांच्या विषयी संपूर्ण माहिती


 नमूना पहिला –

उदा . 795421 ऊया संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमत किती?

9,000

900

90,000

9,00,000

उत्तर : 90,000

स्पष्टीकरण :-अंकाची स्थानिक किंमत लिहिताना त्या अंकापुढे जेवढे अंक येतात. तेवढे शून्य त्या अंकापुढे लिहिणे.यानुसार 9 च्या पुढे 4 अंक आहेत म्हणून 90,000.

नमूना दूसरा –

उदा . 4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

330

270

170

280

उत्तर : 270

स्पष्टीकरण :-समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 9 च्या पटीत असतो.
43322 9 ×3 = 27
 270

नमूना तिसरा –

उदा . 8**3 या चार अंकी संख्येतील * च्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे, तर तो अंक कोणता?

7

8

9

4

उत्तर : 8

स्पष्टीकरण :-स्थानिक किमतीतील फरक हा संख्येतील पहिल्या अंकाच्या पुढील अंक येतो.
उदा. 720 7 च्या पुढील अंक 8 येईल.

नमूना चौथा-

उदा . 35132 या संख्येतील 3 च्या नंतर येणार्याी 5 ची स्थानिक किंमत ही 1 नंतर येणार्‍या 5 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?

10

1000

100

10000

उत्तर : 100

स्पष्टीकरण :-पट काढताना दिलेल्या पहिल्या अंकाच्या पुढे कितव्या स्थानावर तो अंक येतो.हे मोजून 1 वर तेवढे शून्य देणे.

नमूना पाचवा –

उदा . 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

1000

100

10000

10

उत्तर : 100

स्पष्टीकरण :-5 अंकी लहानात लहान संख्या 10000 आहे.
3 अंकी लहानात लहान संख्या = 100
:: 10000÷100=100 किंवा 5-3=2 फरकाएवढे शून्य 1 वर देणे  100

नमूना सहावा-

उदा . खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे ?

2354

21753

54213

62301

उत्तर : 54213

स्पष्टीकरण :-ज्या संख्येतील दिलेल्या अंकापुढे सर्वात जास्त अंक येतील त्या अंकाची त्या संख्येतील स्थानिक किंमत सर्वात जास्त असते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...