२५ सप्टेंबर २०२१

चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान



थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?

(अ) कोलकाता

(ब) गुजरात✔️✔️

(क) चेन्नई

(ड) दिल्ली


 डीएसटी (DST) चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मुखपृष्ठ (a special cover) कोणी जारी केले आहे?

(अ) रविशंकर प्रसाद

(ब) नितीन गडकरी

(क) डॉ. हर्षवर्धन ✔️✔️

(ड) प्रकाश जावडेकर


जागतिक त्सुनामी जागृती दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 4 नोव्हेंबर

(ब) 5 नोव्हेंबर✔️✔️

(क) 3 नोव्हेंबर


(ड) 2 नोव्हेंबर


# : फिशर लोकांच्या चांगल्या उपजीविकेसाठी कोणत्या राज्यात "Parivarthanam" योजना सुरू केली?


(अ) कर्नाटक

(ब) ओडिशा

(क) गोवा

(ड) केरळ✔️✔️

Explanation  : scheme for better livelihood of fisher folk?


कोणत्या देशाला दहशतवाद (State sponsors of Terrorism List) यादीमधून वगळण्यात आले आहे?

(अ) लेबनॉन

(ब) युएई

(क) सुदान✔️✔️

(ड) पाकिस्तान   


 

#  :देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो? 

अ) राष्ट्रीय शिक्षक दिन 

ब) राष्ट्रीय शिक्षण दिन ✔️✔️

क) जगातील विद्यार्थी दिन 

ड) शिक्षक दिन     


  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते? 

अ) 25 वे 

ब) 26 वे    

क) 27 वे  

ड) 28 वे✔️     


अलीकडे केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्कार 2020 कोणाला दिला आहे?

(अ) जयराम

(ब) मोहनलाल

(क) हरिहरन✔️✔️

(ड) दिलीप


Answer  : the JC Daniel Award 2020   

 अलीकडेच प्रसिद्ध व्यक्ती ‘फराज खान’ यांचे निधन झाले, ते कोण होते?

(अ) अभिनेता

(ब) लेखक✔️✔️

(क) गणितज्ञ

(ड) वैज्ञानिक


आंतर संसदीय संघटनेचे (IPU) नुकतेच अध्यक्ष कोण बनले?

(अ) अल्विरो क्लार्क

(ब) जेम्स केन

(क) रॉली फेरिस

(ड) डुआर्ते पाचेको✔️✔️


Answer  : Duarte Pacheco :- (Inter Parliamentary Union)


ऑक्टोबर 2020  रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(अ) 150 वी

(ब) 147 वी

(क) 155 वी

(ड) 145 वी✔️✔️


नुकतेच पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड ( Petronet LNG Limited) चे नवीन सीईओ कोण बनले?

(अ) राकेश कुमार सिंह

(ब) अक्षय कुमार सिंग✔️✔️

(क) मनीषसिंग राजपूत

(ड) आकाश प्रीत देवगौडा


कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतेच पॅरिस मास्टर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे?

(अ) डोमिनिक थीम

(ब) अलेक्झांडर झेवरेव

(क) डॅनियल मेदवेदेव✔️✔️

(ड) जिमी कॉनर्स


Answer  :-  Daniel Medvedev (the title of Paris Masters 2020 ) 


# : कोणत्या राज्यात, नुकताच भारताचा पहिला सौर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला?

(अ) मध्य प्रदेश

(ब) अरुणाचल प्रदेश

(क) हिमाचल प्रदेश✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश


# : नुकताच अमेरिकेचा 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण झाला?

(अ) हिलरी क्लिंटन

(ब) मार्टिन जोसेफ    

(क) रॉबिन चार्ल्स

(ड) जो बायडेन ✔️✔️   



ऑस्कर नामांकनासाठी कोणती शॉर्ट फिल्म पात्र ठरली आहे?

(अ) गल्ली बॉय 

(ब) मर्दानी 2

(क) नटखट✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही


आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) November नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर





प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांसाठी (Administrative and Budgetary Questions) यूएनच्या सल्लागार समितीत कोणाला निवडले गेले आहे?

(अ) विदिशा मैत्र✔️✔️

(ब) स्मृती इराणी

(क) निर्मला सीतारमण

(ड) किरण बेदी


 जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day) कधी साजरा केला जातो?

(अ) 6 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


 राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 7 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर

(क ) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


प्रश्नः कोणत्या मंत्रालयाचे विस्तार व नाव बदलून, " बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय " करण्यात आले आहे?

(अ) परिवहन मंत्रालय

(ब) नौवहन मंत्रालय✔️✔️

(क) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

(ड) यापैकी काहीही नाही


 केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी कोणत्या राज्यात साई (SAI) च्या नवीन क्षेत्रीय केंद्राचे उद्घाटन केले?

(अ) बिहार

(ब) हरियाणा

(क) पंजाब✔️✔️

(ड) राजस्थान

२४ सप्टेंबर २०२१

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे


मुंबई: आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.

यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

उमेदवारांच्या अडचणी

- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही

- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही

- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही

- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य

- संकेतस्थळ अनेकदा हँग होते

आरोग्य विभागातील पदे

१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक

२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस... आदी

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :

संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्ज

गट क : २७२५ : ४,०५,०००

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र :


महाराष्ट्रातील :अष्टविनायक
-----------------------------------------------------:
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
🐆🐅🐿🐇 महाराष्ट्र : अभयारण्ये.🐇🐿🐅🐆
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

पुणे करार :- 24 सप्टेंबर 1932

◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी

◾️पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला.

◾️ दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता.

◾️ त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "येरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.

२३ सप्टेंबर २०२१

मिहान प्रकल्‍प

🔸नाव : Multi-Model International Passenger and Cargo Hub Airport at Nagpur’ (MIHAN).

🔹ठिकाण : नागपूर✅

🔸जागा : विमानतळालगतच्‍या अंदाजे 2000 हेक्‍टर परीसर

🔹 उद्दोगाचा समावेश : सौंदर्य प्रसाधने व दागिने, वस्‍ञोदृोग, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, औषधे, अन्‍न धान्‍य प्रकिया, उदृोग आणि अशाच स्‍वरुपाच्‍या अन्‍य.

🔸क्षमता :  सुमारे 900 ट्रक एकाचवेळी ठेवता येतील एवढा वाहनतळ, मोठे भांडारग़ृह शीतसाठा खुले गुरांचे गोठे असलेला विस्‍तीर्ण थांबा आणि त्‍यालगतच ज्‍यावरुन एकाचवेळी दोन रेल्‍वे धावू शकतील अशी रेल्‍वे लाइनची सुविधा

🟠विशेष आर्थिक क्षेत्र (एसइझेड) पायाभूत सुविधा :

🔸सहापदरी, चारपदरी, तीनपदरी व दोनपदरी रस्‍त्‍यांचे जाळे

🔹कला- दूरसंचारण विस्‍तार

🔸रहिवासी/बिगर रहिवासी कारणाकरीता पाणीपूरवठा व्‍यवस्‍था (100 एमएलडी क्षमतेची)

🔹सांडपाण्‍याची निचरा व्‍यवस्‍था

🔸246 मेगावॅटचा व 25 एम डब्‍ल्‍य डिझेल बॅकअपचा विदृूत प्रकल्‍प

🔹करमणुकीची साधने- बहुविध चित्रपटगृह, गोल्‍फ कोर्स, पत्‍यांचा क्‍लब

🔸मिहान प्रकल्‍पाअंतर्गत काम करणा-या नोकरवर्गासाठी राहण्‍याची सुविधा

२२ सप्टेंबर २०२१

अंकगणित प्रश्नमंजुषा

डिजिटल कृषीव्यवस्था पुढे नेण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पाच खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार..



🔰14 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत कृषी भवन येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खासगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.


🔰सिस्को, निंजाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) या खासगी कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले आहेत.


🔴ठळक बाबी...


🔰या प्रायोगिक प्रकल्पांनंतर, शेतकऱ्यांना शेतात कुठली पिके लावायची, कोणत्या प्रकारची बियाणे वापरायची, जास्तीत जास्त पीक येण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, अशा सगळ्या प्रश्नांवर, तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती पुरवली जाईल.


🔰पराप्त माहितीच्या आधारे ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घेऊ शकतील. कृषी पुरवठा साखळी उद्योगात असलेले लोकही त्यांच्या खरेदीविषयक तसेच मालाच्या दळणवळणासाठीची मालवाहतूक व्यवस्था याविषयी अचूक आणि नेमका निर्णय घेऊ शकतील. 


🔰तयाशिवाय, आपल्या पिकांची विक्री करायची की साठा ठेवायचा याचा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी हवामानाची पूर्वसूचनाही याच तंत्रज्ञानातून मिळू शकेल.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶 सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶 शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶 परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)


SCO देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे झाली.



🔰SCO (शांघाय सहकार्य संघटना) गटाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक संमिश्र स्वरुपात 17 सप्टेंबर 2021 रोजी दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे पार पडली.


🔴ठळक बाबी...


🔰ही बैठक ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


🔰शिखर परिषदे नंतर शांघाय सहकार्य संघटना आणि सामुहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात अफगाणिस्तानसंदर्भात सत्र झाले.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या SCO-CSTO संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.


🔰भारताच्या विकास कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या भारताचे अनुभव पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले आणि ते ओपन सोर्स उपाय शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर देशांसमवेत सामायिक करण्याची तयारी दर्शवली.

ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’



💫भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या परिचारिका सेवेचे उपमहासंचालिका ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले.


💫राष्ट्रपती श्री  राम नाथ कोविंद यांनी एका आभासी समारंभात ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती सहीत एकूण 51 परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ प्रदान केला आहे.


☄️पार्श्वभूमी..


💫1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्‍म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते.


💫फलोरेन्स नायटिंगेल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.


💫1965 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेस -ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. 1974 साली 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली.

२१ सप्टेंबर २०२१

सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प

🔸सुवर्ण चतुष्कोण हा भारत सरकारने हाती घेतलेला भारतातील सर्वात मोठा व जगातील ५व्या क्रमांकाचा रस्तेबांधणी प्रकल्प आहे.

🔹भारताचे माजी पंतप्रधान  अटलबिहारी  वाजपेयी  ह्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाची घोषणा केली. 

🔸भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (भाराराप्रा) सुवर्ण चतुष्कोणासाठी जबाबदार आहे.

🔹ह्या योजनेअंतर्गत भारताची चार प्रमुख महानगरे  दिल्ली,  मुंबई,  कोलकाता  आणि चेन्नई ही भारताची चार प्रमुख महानगरे जोडली गेली आहेत.✅

🔸ही महानगरे चौपदरी वा सहापदरी द्रुतगतीमार्गांनी जोडली गेली आहेत.

🔹ह्या प्रकल्पातील रस्त्यांची एकुण लांबी ५,८४६ किमी आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो २०२२ ला पाठवणार उपग्रह.



🔰सर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह २०२२ च्या तिसऱ्या तिमाहित प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने केली आहे. ‘आदित्य एल १’ असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘एल वन’ या पॉईंटवर हा उपग्रह कार्यरत असेल असं ‘मानव अवकाश उड्डाण केंद्र’ ( human spaceflight center )चे संचालक डॉ उन्नीकृष्णन नायर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलंय. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जिथे दोघांची गुरुत्वाकर्षण शक्ती समसमान असते त्या पॉइंटला ‘एल वन’ पॉईंट या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणाहून सुमारे १५०० किलो वजनाचा ‘आदित्य एल वन’ उपग्रह विविध संवेदक आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करणार आहे.


🔰‘आदित्य’ मोहिम ही पूर्णपणे वैज्ञानिक मोहिम असणार आहे. पण त्या आधी आणखी एक वैज्ञानिक मोहिम हाती घेत असल्याची माहिती डॉ नायर यांनी दिली आहे. ‘X-PoSat’ही आणखी एक अवकाश दुर्बीण इस्त्रो पुढल्या वर्षी २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत अवकाशात पाठवणार आहे. अवकाशातील ‘वैश्विक क्ष किरण’ च्या स्त्रोताचा अभ्यास ही अवकाश दुर्बीण करणार आहे.


🔰विशेष म्हणजे ‘X-PoSat’ ही अवकाश दुर्बीण इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकासह प्रक्षेपित केली जाणार आहे. Small Satellite launch Vehicle ( SSLV ) असे या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून या वर्षाअखेरीस याचे उड्डाण नियोजित केले आहे. या प्रक्षेकामुळे अत्यंत कमी वेळेत तयारी करत ३०० किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे ५०० किलोमीटर उंचीपर्यंत पाठवणे शक्य होणार आहे.


🔰२०२०-२१ या काळांत तब्बल २० अवकाश मोहिमांचे नियोजन इस्त्रोने केले होते. मात्र करोनोनामुळे जेमतेम ४ उपग्रह प्रक्षेपण मोहिमा या शक्य झाल्यात. तेव्हा येत्या काळात अवकाश मोहिमांना वेग येईल अशी अपेक्षा आहे.

विश्वचषकानंतर विराट टी-२० कर्णधारपद सोडणार .



🔰सयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी ट्विटरवरून जाहीर केले; परंतु कसोटी आणि एकदिवसीय संघांचे कर्णधारपद सांभाळणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले.


🔰२०१७मध्ये कोहलीने भारताच्या दोन्ही मर्यादित षटकांच्या संघांची कर्णधारपदाची सूत्रे महेंद्रसिंह  धोनीकडून स्वीकारली. 


🔰यानंतरच्या ६७ सामन्यांपैकी ४५ सामन्यांतच विराटला खेळवले गेले. त्याच्यावरील ताण कमी करण्यासाठी त्याला हल्ली टी-२० सामन्यांमधून विश्रांती दिली जाते.


🔰माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय टी-२० संघाचा मार्गदर्शक म्हणून नेमणूक झाली. ही नियुक्ती विराटवर दबाव आणण्यासाठी आहे की त्याला साह्य करण्यासाठी आहे, याविषयी तर्क लढवले जाऊ लागले आहेत.

भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग



1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07

- लांबी 3745 km

- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)


2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km

- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)


3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08

- लांबी 2807 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)


4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km

- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)


5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221

- लांबी 2040 km

- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)


6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km

- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)


7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km

- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)


8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05

- लांबी 1711 km

- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)


9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17

- लांबी 1622 km

- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)


10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02

- लांबी 1435 km

- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)

संपूर्ण मराठी व्याकरण-काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ


अढल : हुशार ,वाकबगार


अन्नगुरु : खादाड


अपट : पडदा, आडोसा


अपलाप : सत्य लपविणे


अपुत : अशुध्द ,अपवित्र


अपेत : दूर गेलेला


अबू : बाप


अबाब : सरकारी कर


आंदोली  :  हेलकावा, झोका


आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला


आपगा  :  नदी


आभु  :  ब्रम्हा


आमण  :  आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते


आयतन  :  जागा ,स्थळ


आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार


आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ


महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न उत्तरे

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था.

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953.

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957.

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती.

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960.

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री.

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226.

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद.

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद).

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962.

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966.

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17.

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी.

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी.

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे.

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून.

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार.

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त.

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच.

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती.

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3).

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4).

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती.

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती.

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त.

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक.

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा.

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून.

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक.

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे).

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला.

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी.

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते.

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री.

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी.

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या).

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा.

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था.

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953.

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957.

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती.

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960.

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री.

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226.

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद.

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद).

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962.

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966.

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17.

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी.

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी.

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे.

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून.

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार.

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त.

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच.

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती.

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3).

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4).

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती.

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती.

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त.

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक.

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा.

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून.

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक.

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे).

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला.

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी.

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते.

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री.

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी.

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या).

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा.

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष.

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक.

आज २१ सप्टेबर जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन...

विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना आवाहन आहे कि, २१ सप्टेबर १९९५ मध्ये गणपती दुध प्यायला अशी भली मोठी अफवा पसरवली होती, तिचे उच्चाटन व प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सत्यशोधन करून हि निव्वळ अफवा आहे हे सिद्ध केले होते, त्या दिवसापासून अंनीस ने २१ सप्टेबर हा दिवस "चमत्कार सत्यशोधन दिन "
म्हणजेच जागतिक अंधश्रद्धा निर्मुलन दिन म्हणून घोषित केला आहे. श्रद्धा तपासून पाहण्याचं भान ठेवा. 'विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे' असे डॉ.दाभोळकर नेहमी म्हणत असे. समाजात वर्षानुवर्षे ज्या चुकीच्या रुढी-परंपरांचा पगडा आहे, त्या रुढी हद्दपार करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहत असताना होणाऱ्या त्रासाचं, येणाऱ्या अडचणीना न जुमानता महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज यांसारख्या समाजसुधारकांचे विचार प्रत्यक्षात यावेत, हाच या परिवर्तनवादी चळवळीमागचा हेतू आहे.

२० सप्टेंबर २०२१

शब्दाच्या जाती

1)नाम -
जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.

उदाहरण - घर, आकाश, गोड

2)सर्वनाम-

जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.

उदाहरण - मी, तू, आम्ही

3) विशेषण-

जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच

4)क्रियापद-

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.

उदाहरण - बसणे, पळणे

5)क्रियाविशेषण-

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या

6) शब्दयोगी अव्यय-

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी

7) उभयान्वयी अव्यय-

जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - व, आणि, किंवा

8) केवलप्रयोगी अव्यय-

जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदाहरण - अरेरे, अबब
___________________________________

सह्याद्रीतील प्रमुख घाट

घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे

आंबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर

आंबेनळी घाट () महाबळेश्वर-पोलादपूर

आंबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर

कुंभार्ली घाट() चिपळूण-कराड

खंबाटकी-खंडाळा () पुणे-सातारा

चंदनापुरी घाट () नाशिक-पुणे

ताम्हिणी घाट () माणगाव (कोकण)-पुणे

दिवा घाट() पुणे-सासवड

थळघाट-कसार्‍याचा घाट (७)

नाशिक-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)

पसरणी घाट () वाई-महाबळेश्वर

पारघाट (१०) सातारा-रत्नागिरी

फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा

बोरघाट-खंडाळ्याचा घाट (१५)

पुणे-मुंबई (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४)

माळशेज घाट() आळेफाटा-कल्याण

रणतोंडी घाट () महाड-महाबळेश्वर

वरंधा घाट (६) भोर-महाड

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...