०७ मे २०२१

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

पंतप्रधान बाबत मते

❇️ लॉर्ड मोर्ले:-

🔳समानातील प्रथम

🔳मंत्रिमंडळ रुपी कमानीच्या आधारभूत शिळा

❇️ हर्बर्ट मॅरीसन:-

🔳सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानातील प्रथम आहे पण आजच्या काळात हे वर्णन तोकडे आहे.

❇️ विल्यम हारकोर्ट:-

🔳कमी तेजस्वी ताऱ्यामधील चंद्र

❇️ जेनिग्ज:-

🔳ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा हा सूर्य आहे.

❇️ एच जे लास्की:-

🔳ज्या केंद्राभोवती संपूर्ण सरकारी यंत्रणा फिरते असा हा केंद्रबिंदू आहे.

❇️ एच आर जी ग्रीवझ:-

🔳सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान सरकारचा स्वामी आहे.

❇️ मनरो:-

🔳हा राज्याच्या नौकेचा कप्तान आहे.

❇️ रमसे मुर:-

🔳राज्याच्या नौकेचा सुकाणू चालवणारा खलाशी आहे.

भारतातील प्रसिद्ध व्यक्तीची समाधी स्थळे

🔰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चैत्यभूमी
🔰 महात्मा गांधी : राजघाट
🔰 जवाहरलाल नेहरू : शांतिवन
🔰 लाल बहादूर शास्त्री : विजय घाट
🔰 इंदिरा गांधी : शक्ति स्थल
🔰 जगजीवन राम : समता स्थल
🔰 चौधरी चरण सिंह : किसान घाट
🔰 राजीव गांधी : वीर भूमि
🔰 ज्ञानी जैलसिंह : एकता स्थल
🔰 चंद्रशेखर : जननायक
🔰 आय के गुजराल : स्मृति स्थल
🔰 अटल बिहारी वाजपेयी : सदैव अटल
🔰 के आर नारायण : उदय भूमि
🔰 मोरारजी देसाई : अभय घाट
🔰 शंकर दयाल शर्मा : कर्म भूमि
🔰 गुलजारीलाल नंदा : नारायण घाट
🔰 डॉ. राजेंद्र प्रसाद : महाप्रयाण .

महाराष्ट्र पोलिस भरती - महत्त्वाचे प्रश्न

(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.

(०२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.

(०३) 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.

(०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.

(०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

(०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.

(०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.

(०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.

(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 

Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात?
- रेने कॅसिन

Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?
- 12 ऑक्टोबर 1993

Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?
- आशिया खंडात

Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ?
-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)

Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?
-कन्हारगाव अभयारण्य

Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा)

Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?
- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग

Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?
- 86 सेंटिमीटर

Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?
- 8611 मीटर

Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)

०५ मे २०२१

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द!

महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले होते. या प्रकरणात न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज हा निकाल सुनावला आहे.


१९९२ मध्ये इंद्रा सहाणी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिली होती.


नऊ सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेले होते. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला होता. अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला असून आरक्षण रद्द केलेल आहे.


हवामानविषयक शिखर परिषद  (22-23 एप्रिल 2021)


🌼 अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन  यांनी दिलेल्या निमंत्रणावरून   पंतप्रधान  नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल  2021 रोजी होणाऱ्या हवामान विषयावरील नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत सहभागी होतील. 

🌼 पंतप्रधान 22 एप्रिल  2021 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान होणाऱ्या  पहिल्या सत्रात  “Our Collective Sprint to 2030” यावर आपले विचार मांडतील.

🌼 या शिखर परिषदेत जगातील सुमारे 40 अन्य नेते सहभागी होत आहेत.  मेजर इकॉनॉमीज फोरमचे सदस्य असलेल्या देशांचे आणि हवामान बदलाचा धोका असलेल्या देशांचे ते प्रतिनिधित्व करतील (भारत याचा  सदस्य आहे).

🌼 हवामानातील बदल, हवामानसंबंधी उपाययोजनांत वाढ,  कार्बन उत्सर्जन  कमी करण्यासाठी अर्थसहाय्य जमवणे, निसर्ग आधारित उपाय, हवामान सुरक्षा तसेच स्वच्छ उर्जेसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यावर नेते आपली मते व्यक्त करतील.

🌼 राष्ट्रीय परिस्थिती आणि शाश्वत विकासाच्या प्राथमिकतांचा आदर करतांना  सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक विकासाशी हवामान कृतीची जग कशी सांगड घालू शकेल यावरही नेते चर्चा करतील.

🌼 नोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सीओपी 26 च्या अनुषंगाने हवामानविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक बैठकांच्या मालिकेचा ही  शिखर परिषद एक भाग आहे.

एक रकमी १२ कोटी लशी विकत घ्यायची महाराष्ट्राची तयारी - उद्धव ठाकरे.

🔰राज्यात शनिवारपासून म्हणजेच १ मे पासून १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू होणार की नाही? सुरू झालं तर ते व्यापक स्तरावर होणार की मर्यादित स्वरूपात? किती लोकांना आणि कुठे दिलं जाणार? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना उत्तर दिलं आहे. त्यासोबतच केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

🔰“१८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे १२ कोटी डोस आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व १२ कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. मी केंद्राला पुन्हा विनंती करतो की आमची पूर्ण तयारी आहे.

🔰कृपया आपण यात लक्ष घालून आम्हाला जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून दिला, तर महाराष्ट्र लवकरात लवकर या कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

इंटरपोलची महासभा 2022

🔰2022 ची इंटरपोलची महासभा भारतात होणार आहे.

🔰आवृत्ती : 91 वी

🔰गृहमंत्री अमित शहा यांनी यासंबंधीचा प्रस्ताव इंटरपोलचे महासचिव जगन

🔰स्टॉक यांच्याकडे ठेवला होता.

🔰2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत.

🔰25 वर्षांनंतर भारतात आयोजन. यापूर्वी 1997 मध्ये ही भारतात भरली होती.

🔰2019 ची महासभा ( 88 वी) : सॅन्टियागो, चिली

🔰कालावधी : 15 - 18 ऑक्टोबर

🅾इंटरपोल :

🔰 आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य संस्था

🔰स्थापना: 7 सप्टेंबर 1923 (@व्हिएन्ना, ऑस्ट्रिया)

🔰मुख्यालय ल्योन, फ्रान्स

🔰सदस्य देश:- 194

🔰घोषवाक्य:- सुरक्षित जगासाठी पोलिसांची जोडणी

जी-20 परिषद 2019

🔰ठिकाण: ओसाका (जपान)

🔰कालावधी: 28-29 जून 2019 आवृत्ती : 14 वी

🔰जपानद्वारा आयोजित पहिलीच जी-20 परिषद

🔰यामध्ये जागतिक शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी आठ संकल्पनावर चर्चा करण्यात आली. यामध्ये जागतिक अर्थव्यवस्था, च्यापार आणि गुंतवणूक, नवकल्पना, पर्यावरण आणि ऊर्जा, रोजगार, महिला सक्षमीकरण, विकास आणि आरोग्य यांचा समावेश होता.

🔰जी-20

🔰19 देश व यूरोपियन युनियनचा गट

🔰निर्मिती 26 सप्टेंबर 1999

🔰जगाच्या जीडीपीत वाटा 85%

🔰जागतिक व्यापारात वाटा 75%

🔰उद्देश सदस्य राष्ट्रांना जागतिक अर्थव्यवस्थेच्या समस्यांवर च करण्यासाठी एकत्र करणे

🔰सदस्य: भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि युरोपियन युनियन

🅾सौदी अरेबिया G20 च्या अध्यक्षपदी

🔰१ डिसेंबर २०११ रोजी सौदी अरेबियाने जपानकडून G20 गटाचे अध्यक्षपद स्वीकारले..

🔰G20 गटाचे अध्यक्षपद भूषविणारा सौदी अरेबिया हा पहिला अरब देश ठरला आहे.

🔰२०२० मधील G20 शिखर परिषद रियाध (सौदी अरेबिया) येथे होणार आहे.

🔰परिषदेची थीम: सर्वांसाठी २१ व्या शतकाच्या संधींची जाणीव (Realising Opportunities of the 21st Century for All) कालावधी : २१-२२ नोव्हेंबर २०२०

🔰२०१९ ची G20 शिखर परिषद ओसाका (जपान) येथे पार पडली

टी. रवी शंकर: भारतीय रिझर्व्ह बँकेचे चौथे उपगव्हर्नर

🔰टी. रवी शंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

🅾ठळक बाबी...

🔰2 एप्रिल 2021 रोजी टी. रवी शंकर यांनी पदाचा कार्यभार सांभाळला. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी केली गेली आहे.
त्यांची नियुक्ती बी. पी. कानुनगो यांच्या जागी झाली.वर्तमानात, भारतीय रिझर्व्ह बँकेचे इतर तीन उपगव्हर्नर - महेश कुमार जैन, मायकेल पात्रा, राजेश्वर राव.

🅾भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी...

🔰भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

🔰RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उपगव्हर्नर नियुक्त केले जातात.

🔰 ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

🔰सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

जगातील सर्वात मोठ्या विमानाची दुसरी चाचणी यशस्वी.


🔰अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉंच कंपनीचे तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानाने त्याचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

🔰ही चाचणी कॅलिफोर्निया येथे घेण्यात आली. चाचणीदरम्यान विमान 14,000 फूट (4,267 मी) उंचीवर ताशी 199 मैल एवढ्या सर्वोच्च गतीपर्यंत पोहोचले होते.

🅾विमानाची वैशिष्ट्ये..

🔰विमानाच्या पंखांच्या विस्ताराची एकूण लांबी 385 फूट (117 मीटर) आहे.
विमान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

🔰विमानाचे शरीर कार्बन-कंपोजिट पदार्थाने तयार केले गेले आहे.

🔰विमान 550,000 पौंड (250 टन) एवढे भार वाहू शकते.

🔰विमानामध्ये एकूण सहा इंजिन बसविण्यात आले आहेत.

भारतीय नौदलाची ‘समुद्र सेतू द्वितीय’ मोहीम


🔰कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणि ‘समुद्र सेतू द्वितीय’ या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या सात नौका तैनात करण्यात आल्या आहेत.

🔰भारतीय नौदलाच्या INS कोलकाता, INS कोची, INS तलवार, INS तबर, INS त्रिकंद, INS जलश्व आणि INS ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत.

🅾ठळक बाबी...

🔰INS कोलकाता व INS तलवार हा पर्शियन आखातात तैनात केलेला पहिला जहाजांचा ताफा होता ज्यांना त्वरित या कामासाठी वळविण्यात आले आणि त्यांनी 30 एप्रिल 21 रोजी मनामा (बहरीन) बंदरात प्रवेश केला.

🔰INS तलवार हे 40 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन देशात परतले आहे. INS कोलकाता वैद्यकीय पुरवठा मिळवण्यासाठी दोहा (कतार) येथे रवाना झाले आहे आणि त्यानंतर द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी ते कुवेतला मार्गस्थ होईल.

🔰पूर्वकिनारपट्टीवर, INS ऐरावत यालासुद्धा या कामासाठी वळविण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी समुद्र सेतू मोहिमेदरम्यान महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या INS जलश्व याची देखभाल दुरुस्ती करून या मोहिमेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले आहे.

🔰द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी INS ऐरावत सिंगापूरमध्ये दाखल होणार आहे आणि अल्प मुदतीच्या सूचनेनुसार वैद्यकीय साठा आणण्यासाठी INS जलाश्व यालाही त्या प्रांतात सज्ज ठेवण्यात आले आहे.

🔰अरबी समुद्रात तैनात INS कोची, INS त्रिकंद आणि INS तबर या दुसर्‍या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे.दक्षिणी नौदल कमांडमधून INS शार्दुल या मोहिमेमध्ये 48 तासात सामील होण्यासाठी सज्ज आहे.

🅾समुद्र सेतू मोहीम...

🔰समुद्र सेतू मोहीम 2020 साली भारतीय नौदलाने सुरू केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत, कोविड-19 च्या उद्रेकात शेजारच्या देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 4,000 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या मायदेशी आणण्यात आले होते.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गात जागेचा अडसर.

🔰प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्य़ात सुमारे २९ हजार ७८८ घरकु लांचे काम केवळ लाभार्थ्यांकडे जागा नसल्याने रखडल्याचे वास्तव समोर आले असून आता यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंचांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

🔰प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्याने बेघर लाभार्थीना घरकु लाचा लाभ देण्याबाबतचे सरकारचे धोरण आहे. या योजनेअंतर्गत सर्वाना घरकु लांचा लाभ मिळावा, यासाठी १९ नोव्हेंबर २०२० पासून राज्यात महाआवास अभियान राबवण्यात येत आहे.

🔰जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात २०१६-१७ ते २०-२१ पर्यंत एकू ण ९३ हजार १९२ घरकु ले उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ हजार ४०४ घरकू ल लाभार्थीना मंजुरी देण्यात आली. जागा नसलेल्या लाभार्थीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदी, अतिक्र मण नियमानुकू ल करणे, जागा नसलेल्या लाभार्थीना खुले भूखंड उपलब्ध करून देणे तसेच ई आणि एफ वर्ग शासकीय जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यात येत असली, तरी अजूनही जिल्ह्य़ात तब्बल २९ हजार ७८८ लाभार्थ्यांच्या घरकु लांना मंजुरी मिळू शकलेली नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांकडे घरकू ल बांधकामासाठी जागा नसल्याचे दिसून आले आहे

टी २० विश्वचषक आयोजनावर करोनाचं सावट; बीसीसीआयची नवी रणनिती.

🔰देशात करोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्याने करोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यात आयपीएल स्पर्धेचं बायोबबलमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. तर काही खेळाडूंनी करोनाच्या भीतीपोटी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता आयसीसी टी २० विश्वचषकाचं आयोजन कसं करणार? असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. त्यासाठी या विश्वचषकाचं आयोजन युएईला ठेवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे.

🔰या वर्षी १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्याना आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा आहे. मात्र करोना स्थिती पाहता हे आयोजन संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयनं प्लान बी तयार ठेवण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

🔰‘या स्पर्धेसाठी माझी डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.आपल्या देशात विश्वचषकाचं आयोजन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचं करोना स्थितीवर लक्ष आहे. या स्थितीवर आम्ही आयसीसीशी बोलत आहोत. तसेच आम्ही यूएईत स्पर्धेचं आयोजन करण्याची रणनिती आखत आहोत. मात्र यावर बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल’, असं बीसीसीआयचे जनरल मॅनेजर धीरज मल्होत्रा यांनी सांगितलं आहे.

०४ मे २०२१

महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

Q : केंद्र शासनाच्या ___ या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे?
अ) महिला व बालविकास
ब) समाजकल्याण विभाग
क) अर्थ मंत्रालय
ड) गृह मंत्रालय
Answer : महिला व बालविकास

Q : मातृ वंदना योजनेविषयी योग्य असलेले पर्याय निवडा?
अ) मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे
ब) महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
क) या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.
ड) राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.
इ) वरील सर्व
Answer : इ) वरील सर्व

Q : आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडू पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर आहेत?
(अ) विराट कोहली आणि रोहित शर्मा
(ब) कपिल देव आणि एमएस धोनी
(क) एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या
(ड) रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर

Anwser : A

Q : 126 व्या घटनादुरुस्तीने देशातील विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीकरिता (ST) अनुक्रमे खालील प्रमाणे जागा राखीव आहेत?
अ) 614 , 554
ब) 514 , 554
क) 714 , 654
ड) 84 , 47
Answer : A

Q : भारताचे पहिले सीडीएस (CDS) कोण आहेत?
A) नरेंद्र मोदी
B) राजनाथ सिंग
C) अमित शाह
D) बिपीन रावत
Answer : D

Q : कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 चा मशाल रिले लाँच केला?
A) ओडिशा
B) आसाम
C) मणिपूर
D) छत्तीसगड
Answer : B

Q : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?
A) अशोकराव चव्हाण
B) राज ठाकरे
C) उद्धव ठाकरे
D) अजित पवार
Answer : D

Q : फॅनफोन चक्रीवादळामुळे कोणत्या देशाची वित्त व जीवित हानी झाली आहे ?
A) जपान
B) इंडोनेशिया
C) फिलिपाइन्स
D) श्रीलंका
Answer : C

Q : अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच कोणत्या देशाची अंतराळवीर आहे?
A) अमेरिका
B) जपान
C) चीन
D) रशिया
Answer : A

Q.टिळक पत्रकारिता पुरस्कार-२०१९ कोणाला जाहीर झाला?
A) कुंदन व्यास
B) सिद्धार्थ वरदराजन
C) पंढरीनाथ सावंत
D) संजय गुप्ता
Answer : D

भारतीय रेल्वे विभाग

    🅾विभाग - केंद्र  - स्थापना🅾

1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951
2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951
3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952
4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951
5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966
8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952
9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958
10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996
11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996
12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996
13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996
14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996
15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996
16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998
17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन 2010

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राष्ट्रीय पुरस्कार रक्कम


❇️खेलरत्न पुरस्कार:-

🔳स्थापना:-1991

🔳पूर्वी रक्कम:-7.5 लाख

🔳2020 पासून:-25 लाख

❇️अर्जुन पुरस्कार:-

🔳स्थापना:-1961

🔳पूर्वी रक्कम:-5 लाख

🔳2020 पासून:-15 लाख

❇️द्रोणाचार्य पुरस्कार:-

🔳स्थापना:-1985

🔳पूर्वी रक्कम:-5 लाख

🔳2020 पासून:-15 लाख

हा जीवनगौरव पुरस्कार आहे.

❇️ध्यानचंद पुरस्कार:-

🔳स्थापना:-2002

🔳पूर्वी रक्कम:-5 लाख

🔳2020 पासून:-10 लाख

भारतातील जनक विषयी माहिती

    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

    🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

    🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

    🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

    🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

    🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

    🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

    🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

    🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...