२९ जानेवारी २०२१

मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा किंवा…”; भाजपा नेत्याची मागणी.


🟠कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त भागाला केंद्रशासित घोषित करण्याची मागणी केली. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलीय.


🟠लक्ष्मण सवादी यांनी, “ज्या क्षेत्रावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. माझीही हीच मागणी आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही सवादी यांनी मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणीही केलीय. “जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो,” असं सवादी म्हणाले आहेत.


🟠कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  “सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात.


🟠कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर काही तासांमध्येच सवादी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केलीय.

8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ लागू केला जाणार


▪️कद्रीय सरकार भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ (ग्रीन टॅक्स) लागू करण्याची मंजुरी दिली.


▪️वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देताना हा कर वसूल केला जाणार. या करामधून मिळणारा पैसा प्रदुषण नियंत्रणासाठी खर्च केला जाणार आहे.


🛑ठळक बाबी....


▪️8 वर्षे जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करताना रस्ता कराच्या 10 ते 25 टक्के इतका हरित कर लागू केला जाऊ शकतो.


▪️याव्यतिरिक्त सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या वाहनांच्या अ-नोंदणीकरण आणि भंगारात काढण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांसाठी हा नियम असणार आहे.


▪️15 वर्षांनंतर नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करताना खासगी वाहनांवर हरित कर लागू केला जाणार. मात्र सार्वजनिक वाहतूक विभागाच्या गाड्यांवर कमी हरित कर लागू केला जाणार.सरकारने जास्त प्रदूषण असेलल्या शहरांमधील वाहनांसाठी जास्त कर लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.


▪️सर्वाधिक प्रदूषित असलेल्या शहरांमध्ये नोंदणीकृत वाहनांवर सर्वाधिक करीत कर आकारला जाणार

आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार.



🔰फरान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं  माहिती दिली.


🔰फरान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.


🔰भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.

Online Test Series

२८ जानेवारी २०२१

'यूपीएससी उमेदवारांना आणखी संधी नाही’


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) कोविड १९ महासाथीच्या काळात झालेल्या परीक्षेत गेल्या वर्षी संधी हुकलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील उमेदवारांना आणखी संधी देण्याचा कुठलाही विचार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातच स्पष्ट केले.


न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील पीठास अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले की, अशी संधी देता येणार नाही. राजू यांनी कार्मिक व प्रशिक्षण विभागाची बाजू मांडली.  राजू यांनी सांगितले की, यूपीएससीच्या उमेदवारांना आणखी संधी देण्याचा सरकारचा विचार नाही, असे संकेत कालच केंद्राने दिले आहेत, त्याबाबत आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहोत.


दरम्यान, यासंदर्भातील रचना सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर २५ जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येईल असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की,  केंद्र सरकारने याबाबत विहित काळात प्रतिज्ञापत्र दाखल करून नोटिसा जारी कराव्यात.

अंतिम सामना पुढे ढकलला; नव्या तारखा जाहीर


🔰एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ लागल्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंजकता निर्माण करण्यासाठी २०१९च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर कसोटी अजिंक्य स्पर्धा (World Test Championship) सुरू करण्यात आली. या स्पर्धेची रूपरेषा जाहीर करतानाच स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर १० ते १४ जून या दरम्यान खेळला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होते. पण ICCने आता अंतिम सामना पुढे ढकलला असून नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.


🔰ICCच्या महत्त्वाकांक्षी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या लॉर्ड्सवरच होणार आहे. पण नव्याने मिळालेल्या माहितीनुसार हा सामना १० ते १४ जूनऐवजी आता १८ ते २२ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. IPL 2021 चं आयोजन एप्रिल-मे या दरम्यान केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे BCCIच्या विनंतीला मान देत ICCने अंतिम सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला असल्याची चर्चा आहे.


🔰नव्या नियमांनुसार हल्ली एका देशातून दुसऱ्या देशात क्रिकेट खेळण्यासाठी गेल्यास क्वारंटाइनचा नियम लागू होतो. ७ ते १४ असा विविध ठिकाणी हा कालावधी वेगवेगळा असतो. तसेच IPL स्पर्धेत पाकिस्तान वगळता इतर सर्व देशांचे खेळाडू खेळतात. त्यामुळे कोणतेही दोन संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पोहोचले तरी त्या संघातील खेळाडूंना क्वारंटाइन आणि सरावाला पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने अंतिम सामना पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ICCने अंतिम सामना पुढे ढकलला आहे.

नेपाळच्या पंतप्रधानांची पक्षातून हकालपट्टी.


🔰नेपाळमध्ये पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या फुटीर गटाने रविवारी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांची पक्षाच्या सर्वसाधारण सदस्यपदावरून हकालपट्टी केली असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यापूर्वी या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून हटवले होते.

 

🔰ओली यांच्या अलीकडच्या कृतींबाबत पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले होते. मात्र त्यांनी स्पष्टीकरण न दिल्यामुळे माजी पंतप्रधान प्रचंड व माधवकुमार नेपाळ यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना सर्वसाधारण सदस्य म्हणून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ‘दि हिमालयन टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.


🔰परचंड यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांच्या बालुवाटार येथील निवासस्थानी हकालपट्टीचे पत्र नेऊन दिले. ओली हे पक्षाचे नियम मोडीत  असल्याचा आरोप आहे.

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय.


🔰लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने घेतलेली अ‍ॅपबंदीची भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. भारताने काही चिनी अ‍ॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी बंदी घातली होती. मात्र आता ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call (Xiaomi) आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.


🔰या अ‍ॅप्सवर केंद्र सरकारकडून याआधीच बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस केंद्र सरकारने ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती त्यामध्ये यांचाही समावेश होता. आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारने चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अ‍ॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.


🔰माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा गोळा करणं, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यांची उत्तर देण्यात कंपन्या असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

निम्म्यावर स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्येच रोजगार.


🔰करोना काळात देशभरातून उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या ४५ लाखांहून अधिक कामगार-मजुरांपैकी निम्म्याहून अधिक जणांना उत्तर प्रदेशमधील लघु व मध्यम उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. इतरांनाही मनरेगासह स्वयंरोजगाराच्या अन्य योजनांमध्ये रोजगार पुरविण्यात येत असल्याने आता बहुतांश स्थलांतरित  अन्य राज्यांमध्ये परतणार नाहीत, असे उत्तर प्रदेशच्या लघु व मध्यम उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नवनीत सेहगल यांनी सांगितले.


🔰करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतरच्या तीन-चार महिन्यांच्या काळात दिल्ली, महाराष्ट्रासह देशभरातून लाखो स्थलांतरित मजूर व कामगार उत्तर प्रदेशमध्ये परतले. रस्ते व रेल्वे वाहतुकीची साधनेही उपलब्ध न झाल्याने हजारो कामगारांनी मिळेल त्या वाहनाने व पायीही प्रवास केला. तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्ये रोजगार पुरविण्यासाठी स्वतंत्र स्थलांतरित आयोग (मायग्रंट कमिशन) स्थापन करण्याची घोषणा केली होती.


🔰सथलांतरित आयोगाकडे सुमारे ४५ लाख जणांची नोंद झाली आहे. या कामगार-मजुरांचे शिक्षण, रोजगार कोणत्या स्वरूपाचा होता, त्यांच्याकडे कोणते व्यवसाय कौशल्य आहे, हे पाहून आतापर्यंत २८ लाख २८ हजार ३७६ कामगार-मजुरांना येथील लघु-मध्यम स्वरूपाच्या सुमारे ११ लाख ५० हजार उद्योगांमध्ये रोजगार देण्यात आला आहे.


🔰समारे चार लाख जणांना शासकीय आस्थापनांशी निगडित रोजगार देण्यात आला आहे. मनरेगा, मुद्रा बँक योजनेसह स्वयंरोजगार यांच्या योजनांचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे आता हे स्थलांतरित कामगार उत्तर प्रदेशमध्येच राहतील, असे अपेक्षित असल्याचे सेहगल यांनी सांगितले.

राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते


👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला 

👤 वयोम आहुजा : उत्तरप्रदेश : कला 

👤 हरुदय आर के : केरळ : कला 

👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला 

👤 तनुज समादार : आसाम : कला 

👤 वनिश केईशम : मणिपूर : कला 

👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला 

👤 जयोती कुमारी : बिहार : साहस 

👤 कवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस 

👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस 

👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 शरीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन

👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन

👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन

👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन

👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन

👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन

👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन

👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान

👤 आनंद : राजस्थान : विद्वान

👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान

👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान

👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान

👤 परसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम 

👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ 

👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ

👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ

👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ

👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ 

👤 खशी पटेल : गुजरात : खेळ

👤 मत्र हरखानी : गुजरात : खेळ .

भारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस



जगातील सर्वात मोठ्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली. यामध्ये अमेरिका, युके, फ्रान्सलाही भारतानं मागे टाकलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात एकूण २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे.


 अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. 


आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही दिवसांमध्ये लसीकरणानंतर ४४७ जणांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.

सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी बनली मुख्यमंत्री; सरकारी योजनांचा घेतला आढावा.



✴️राष्ट्रीय बालिका दिना निमित्त आज(रविवार) हरिद्वार येथील सृष्टी गोस्वामी हिला उत्तराखंडचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी मिळाली होती. यावेळी, सृष्टीने राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या विविध योजानांचा अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला.


✴️दशभरात महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकाराने दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो.


✴️हरिद्वार जिल्ह्यातील बहादराबाद विकासखंडच्या दौलतपुर गावातील असलेली सृष्टी गोस्वामी २०१८ मध्ये बाल विधानसभेत बाल आमदार म्हणून देखील गेलेली आहे. तसेच, २०१९ मध्ये सृष्टीने गर्ल्स इंटरनॅशनल लीडरशीपसाठी थायलंडमध्ये भारताचे नेतृत्व देखील केलेले आहे. मागील दोन वर्षांपासून सृष्टी ‘आरंभ’ ही योजना चालवत आहे. यामध्ये परिसरातील गरीब मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं व त्यांना मोफत पाठ्यपुस्तक पुरवण्याचं काम केलं जातं.


✴️सष्टी रुडकी येथील बीएसएम पीजी महाविद्यालयाची बीएससी अॅग्रीकल्चरची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील प्रवीण पुरी हे गावात किराणा दुकान चालवतात. तर आई सुधा गोस्वामी या अंगणवाडी कार्यकर्ता आहेत. छोटा भाऊ श्रेष्ठ पुरू इयत्ता अकारावीचा विद्यार्थी आहे. सृष्टीचा सर्व गावाला अभिमान आहे, असं तिच्या वडिलांना म्हटलं आहे.

प्रमुख पुरस्कार आणि सम्मान 2019-20



एशिया गेम चेंजर अवार्ड 2020- शेफ विकास खन्ना


लोकमान्य टिळक नेशनल अवार्ड 2020- सोनम वांगचुक


पी.सी.महालनोबिस पुरस्कार 2020- सी.रंगराजन


डॉ. एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार 2020- वी.प्रवीण.राव


गुलबेंकियन पुरस्कार 2020- ग्रेटा थेंबर्ग


एबल पुरस्कार 2020- हिलेल फुरस्तेनबर्ग


डैन डेविड पुरस्कार 2020- गीता सेन


टायलर पुरस्कार 2020- पवन सुखदेव


इंदिरा गांधी पुरस्कार 2020- आर. रामानुजम


क्रिस्टल अवार्ड 2020- दीपिका पादुकोण


संगीत कलानिधि पुरस्कार 2019- एस. सौम्या


एकलव्य पुरस्कार 2019- जिह्ला दलबेहेरा


प्रितज़कर अवार्ड 2019- अराटा इसोजोकी


विश्व खाद्य पुरस्कार 2019- साइन एन ग्रूट


डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम अवार्ड 2019- के. शिवन


व्यास सम्मान 2019- नासिरा शर्मा(कागज़ के नाव)


सरस्वती सम्मान 2019- वासदेव मोही


मूर्ति देवी पुरस्कार 2019- विश्वनाथ तिवारी


ज्ञानपीठ पुरस्कार 2019- अच्युतन नंबूदरी 


रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार 2020- जावेद अख्तर


मैडल ऑफ द आर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया -शोभा शेखर


हीरो टू एनिमल्स(पेटा)- नवीन पटनायक


सेंट्रल बैंकर ऑफ द ईयर- शक्तिकांत दास


आर्डर ऑफ राइजिंग सन- थांगजाम धबली सिंह


संयुक्त राष्ट्र सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ द ईयर-मेजर सुमन गवानी


युगांडा का सर्वोच्च नागरिक सम्मान-राजेश चपलोत


वैश्विक मानवतावादी पुरस्कार-सचिन अवस्थी

पश्चिम बंगालमध्ये वारसास्पर्धा.



📋पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वारसा सांगण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये शनिवारी ‘वारसास्पर्धे’ला तोंड फुटले. तृणमूलने नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त त्यांचा जन्मदिवस ‘देशनायक दिवस’ जाहीर केला, तर केंद्र सरकारने ‘पराक्रम दिन’ म्हणून घोषित केला.


📋तणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यात मोठी मिरवणूक काढून नेताजींची जयंती साजरी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पराक्रम दिना’च्या कार्यक्रमात सहभागी झाले. नेताजींच्या जयंतीनिमित्त तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राज्यभर अनेक कार्यक्रम आयोजित करून परस्परांशी जणू स्पर्धाच केली.


📋तणमूल आणि भाजप यांच्यातील निवडणूकपूर्व राजकीय संघर्ष आजपर्यंत रस्त्यावर होत होता. परंतु शनिवारी नेताजींच्या १२५व्या जंयतीनिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मारकात झालेल्या सरकारी कार्यक्रमातही निवडणुकीच्या राजकारणाने शिरकाव केल्याचा प्रत्यय आला.  या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर होते.


📋ममता भाषणासाठी उभ्या राहताच श्रोत्यांमधील भाजप समर्थकांनी जय श्रीराम घोष सुरू केला. त्यामुळे ममता यांनी भाषण करण्यास नकार दिला आणि अशा प्रकारचा अपमान अस्वीकारार्ह आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सरकारी कार्यक्रम आहे, राजकीय नाही. निमंत्रित केल्यानंतर मान राखला पाहिजे. निमंत्रित करून कोणीही अपमानित करीत नाही, अशा शब्दांत ममता यांनी संताप व्यक्त केला.

Online Test Series

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 नियोजित वेळापत्रकानुसार अवघ्या दीड महिन्यावर येवून ठेपली आहे.



या कालावधीचे नियोजन कसे  करावे? असा प्रश्नांसाठी आपुलकीचा सल्ला :


1. शेवटच्या दीड महिन्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revision. तुमचे राहिलेले महत्वाचे टॉपिक या आठवड्यात संपवून घ्या. 

जे आधीच वाचले आहे, underline करून ठेवले आहे, short notes मध्ये लिहून ठेवले आहे. त्याची व्यवस्थित उजळणी करा. 


बर्‍याचदा टेस्ट सिरीज मध्ये 2 पैकी एक पर्याय confuse होवून उत्तर चुकत असते, revision कमी पडल्याने असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी उजळणी करायलाच हवी.. मागील राज्यसेवा पेपर सोडवायलाच हवे. 


2. सोबतच, रोज काही तास csat ला द्या. Csat मधील passages सोडविण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या प्रकाराचा passage अवघड जातोय, कोणते passage शेवटी सोडवायला हवे? Reasoning चे कुठले जास्त वेळ घेतात? याचे विश्लेषण करा. 


3. Current affairs करताना फार वाहवत जाऊ नका, दिवसभर इतर अभ्यास करून झाल्यानंतर या भागाला वेळ द्या. मागील papers पाहून चर्चेतील व्यक्ति, दिवंगत व्यक्ती , isro च्या achievements असे जे जे topics महत्वाचे वाटतात, त्यांची लिस्ट तयार करून त्यांचे revision करा.. 


विनाकारण खूप सारे facts, current issues यात वाहवत जावू नका. त्याऐवजी तेवढाच वेळ polity, geography, science ला दिलात तर खूप output येईल.. 


4. पुरेशी झोप घ्या. जागरण टाळा. परीक्षेच्या शेड्यूल सोबत मॅच व्हा. 

(रात्री 10 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, 

किमान 7 तास झोप घ्या )

 ( दुपारची झोप (विशेषतः पुण्यातील उमेदवारांनी) बंद करून दुपारी csat प्रॅक्टिस करा. कारण आपला csat paper दुपारी असणार, आणि झोप येत असल्यास आकलन, आकडेमोड याला लागणारा वेळ वाढेल).. आणि जागरण करून अभ्यास करायला ही काही बोर्ड परीक्षा नाही, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आठवायला, लॉजिक लावायला मन:स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.


5. एक-दीड महिना शिल्लक असल्याने या स्टेजला टेंशन येणे, हे नॉर्मल आहे. पास होण्याची इच्छा बाळगून अभ्यास करण्याऱ्या जवळपास सर्वांनाच याकाळात टेंशन येत. टेंशन आल म्हणुन जागरण न करता, पास होईल की नाही याचा विचार करत वेळ न घालवता, दिवसभराचा वेळ व्यवस्थित वापरून अभ्यास करावा.. 


6. आणि, वाचलेल्या सगळ्या गोष्टी लक्ष्यात रहाव्यात, पाहिजे तेव्हा आठवाव्या, असे काही नाही. आपली परीक्षा Objective आहे, तिथे चारपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बर्‍याच वेळी पर्याय पाहिले की उत्तर आठवते.. विनाकारण facts आठवण्याचा प्रयत्न केला तरी टेंशन येत असते.. 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)



🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली

🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू

🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर

🔰 ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव

🔰 ८३वे : २०१० : पुणे : द.भि.कुलकर्णी

🔰 ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे

🔰 ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके

🔰 ८६वे : २०१३ : चिपळूण : ना कोत्तापल्ले

🔰 ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे

🔰 ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स मोरे

🔰 ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस

🔰 ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे

🔰 ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख

🔰 ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे

🔰 ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो

🔰 ९४वे : २०२१ : नाशिक : जयंत नारळीकर .

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे



प्रश्न१५१) कोणती व्यक्ती राष्ट्रीय स्टार्टअप सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- पियुष गोयल


प्रश्न१५२)  कोणती बँक “टू बिग टू फेल” यादीत समाविष्ट करण्यात आली आहे?

उत्तर :- भारतीय स्टेट बँक,आयसीआयसीआय बँक,एचडीएफसी बँक


प्रश्न१५३) कोणत्या राज्याने नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ मधील मोठ्या राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे?

उत्तर :- कर्नाटक


प्रश्न१५४) कोणत्या व्यक्तीची किर्गिजस्तान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली?

उत्तर :- सादीर झापारोव्ह


प्रश्न१५५) कोणत्या दिवशी भारतीय सशस्त्र दलांचा ‘माजी सैनिक दिन’ साजरा करतात?

उत्तर :-  14 जानेवारी


प्रश्न१५६) कोणत्या मंत्रालयाने पाचव्या राष्ट्रीय कायाकल्प पुरस्कारांची घोषणा केली?

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


प्रश्न१५७) कोणती व्यक्ती डिजिटल कर्ज सेवांचे नियमन करण्यासाठी RBIने नेमलेल्या कार्य गटाचे अध्यक्ष आहे?

उत्तर :- सौरव सिन्हा


प्रश्न१५८) कोणत्या संस्थेने ‘तेजस’ नामक हलके लढाऊ विमान तयार केले?

उत्तर :- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड


प्रश्न१५९) कोणत्या देशात “विलियूचिन्स्की धबधबा” आहे?

उत्तर :- रशिया


प्रश्न१६०) कोणत्या काळात ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2021’ पाळला गेला?

उत्तर :- 18 जानेवारी - 17 फेब्रुवारी

पद्म पुरस्कार - 2021 (महाराष्ट्र विशेष)


 


• प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.

• महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील पाच जण पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. 

• परशुराम आत्माराम गंगावणे (कला), नामदेव सी. कांबळे (साहित्य आणि शिक्षण), गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य), जसवंतीबेन जमनादास पोपट (उद्योग आणि व्यापार) आणि सिंधुताई सपकाळ (सामाजिक कार्य)


परशुराम आत्माराम गंगावणे

• कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील परशुराम गंगावणे यांना जाहीर झाला आहे. 

• परशुराम गंगावणे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी पारंपरिक लोककला जतन आणि प्रसार करण्याचे काम करत आहेत. 

• आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी ही लोककला जोपासली असल्याने त्यांचे कार्य विशेष ठरले.

• सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावात परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांची कला जोपसली आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी अनेक लोककथा सादर केल्या आहेत.

• आदिवासी कलेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी गुरे आणि गोठा विकून त्याठिकाणी लोककलेचे संग्रहालय बनवले आहे. 

• त्यांनी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्टही सुरू केले आहे या संग्रहालयात पपेट, चित्रकथा, कळसूत्री पहायला मिळतात.


सिंधुताई सपकाळ

• सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली. 

• अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.

• सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. 

• त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगतात की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.


नामदेव कांबळे

• गावकुसाबाहेरील स्त्रियांच्या वेदना मांडणारे विदर्भातील लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. 

• 'राघववेळ' या कांदबरीसाठी 1995 साली साहित्य अकदमीच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

• वाशीममधील शिरपूर गावात शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वाशीम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेत ते शिक्षक होते. याच शाळेत त्यांनी सुरुवातीला सुरक्षारक्षकाचीही नोकरी केली.

• अस्पर्श,राघववेळ, ऊनसावली, साजरंग अशा आठ कांदबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, चरित्र लेखन, भाषण संग्रह असे साहित्य त्यांच्या नावावर आहे.

• डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. बालभारतीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.


गिरीश प्रभुणे

• सामाजिक कार्य क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला आहे. उपेक्षित, वंचित घटकातील लोकांसाठी, भटक्या-विमुक्त समाजासाठी त्यांनी काम केले.

• 'भटके-विमुक्त समाज परिषदे'च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. तुळजापूरजवळील वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांसाठी त्यांनी काम केले. 

• चिंचडवड येथील 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम'मधील भटक्या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी त्यांनी कार्य केले.

• पारधी समाजासाठी, त्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या जीवनावर आधारित त्यांनी लेखन केले. 

• 'पारधी' पुस्तकाचे ते लेखक आहेत.


जसवंतीबेन जमनादास पोपट

• व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठीचा पद्मश्री पुरस्कार जसवंतीबेन जमनादास पोपट यांना जाहीर झाला. 

• सुप्रसिद्ध लिज्जत पापड उद्योगाच्या त्या संस्थापिका आहेत.

• 80 रुपये उधारीवर जसवंतीबेन यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाची उलाढाल शेकडो कोटींची असून 42 हजार महिला कर्मचारी येथे काम करतात.

• मुंबईत गिरगाव परिसरात राहणाऱ्या जसवंतीबेन आणि त्यांच्या सात मैत्रीणींच्या पुढाकाराने हा उद्योग 1965 साली सुरू झाला. 

• आपल्या घराला हातभार म्हणून महिलांनी हे काम सुरू केले आणि बघता बघता लिज्जत पापड घराघरात पोहचला.


भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)


संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे. 


महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..


कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या  आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.


कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.


कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..

कोसी नदी



बिहार राज्याची अश्रूंची नदी. मुख्य प्रवाहाची लांबी सु. ५९० किमी. ही पूर्व नेपाळच्या हिमालय प्रदेशात उगम पावते. तिचा एक शीर्षप्रवाह तर तिबेटातून येतो. उंच पर्वतांवरून येणाऱ्या सात प्रवाहांनी ती बनलेली असल्यामुळे तिला सप्त कोसी व त्या प्रदेशाला सप्तकोसिकी म्हणतात. मुख्य प्रवाह सुन कोसी हा आहे. गाधीच्या कुशिक राजाची मुलगी कौशिकी हिने पुत्रप्राप्तीनंतर नदीचे रूप घेतले. तीच कोसी नदी अशी आख्यायिका आहे. सु. ९६ किमी. दक्षिण व

नैर्ऋत्य दिशांनी वाहिल्यावर सुन कोसी पूर्व व आग्नेय दिशांस २९६ किमी. वाहते. तिला मग उत्तरेकडून अरुण व  पूर्वेकडून तांबर नद्या मिळाल्यावर ती दक्षिणाभिमुख होते. भारत-नेपाळ सीमेच्या उत्तरेस ४८ किमी. छतरा येथे ती खडकाळ, अरुंद निदरीतून सपाटीवर येते.


येथपर्यंतचा तिचा प्रवाह लहानमोठे धबधबे, द्रुतवाह इत्यादींनी युक्त असून मौंट एव्हरेस्टच्या पश्चिमेस गोसाइंतान व पूर्वेस कांचनजंघा यांमधील सु. ६२,४०० चौ. किमी. पर्वतप्रदेशातील पावसाच्या व वितळलेल्या बर्फाच्या पुराचे पाणी ती आपल्या वेगवान प्रवाहाने घेऊन येते.

रॉबर्ट ओएन (१७७१-१८५८) हा आधुनिक सहकारी चळवळीचा जनक होय.

वयाच्या एकविसाव्या वर्षी स्कॉटलंडमधील गिरणीत तो भागीदार बनला. न्यू लानार्क येथे त्याचा कारखाना होता.


🩸 तथे त्याने कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी सहकारी पद्धतीचा अयशस्वी प्रयत्न  केला. पुढे अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने ‘ न्यू हार्मनी कॉलनी ’ ही सहकारी वसाहत स्थापन केली.


🩸 गरेट ब्रिटनमधील रॉचडेल या सुती कापड गिरण्यांच्या छोटया गावातील २८ कामगारांनी २१ डिसेंबर १८४४ रोजी इक्विटेबल पायोनिअर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या सहकारी भांडाराची स्थापना केली. त्यांनी स्वीकारलेली तत्त्वे सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरली. 


🩸सभासदत्व सर्वांना खुले असावे, प्रत्येकाला एकच मत असावे, भांडवलावर ठराविक व्याज दिले जावे, सर्व खर्च वजा जाता शिल्ल्क राहिल्यास ती सभासदांमध्ये खरेदीच्या प्रमाणात वाटून दयावी, सर्व व्यवहार रोखीने व्हावा, माल शुद्ध व निर्भेळ दिला जावा, वजने-मापे यांत गडबड  होऊ नये, राजकारण व धर्म यांबाबत सोसायटीची तटस्थतेची भूमिका असावी, ही तत्त्चे पुढे बहुतेकांनी स्वीकारली. सहकाराच्या कल्पनेला व्यावहारिक व व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. 


🩸वयवसाय संघटनेचा एक नवीन प्रकार म्हणून सहकारी संस्थांचा उपयोग पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झाला.

एकाचवेळी १४३ उपग्रहांचे प्रक्षेपण; Elon Musk यांच्या कंपनीकडून नवा विक्रम



🔰जागतिक स्तरावर आरामदायी वाहन निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या 'टेस्ला' या कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या Elon Musk यांच्या एका वेगळ्या कंपनीने एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम आधी भारताच्या नावावर होता. 


🔰Elon Musk यांच्या 'स्पेसएक्स' या कंपनीकडून अंतराळात एकाच वेळी १४३ उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता. भारताच्या या विक्रमाला मागे टाकत स्पेसएक्स यांनी तब्बल १४३ उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत. यामुळे स्पेस एक्सने नवीन जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. 


🔰सर्व १४३ उपग्रह 'फाल्कन ९'मधून प्रक्षेपित करण्यात आले. फ्लोरिडा येथील कॅप केनेवरल येथून भारतीय वेळेनुसार, रविवारी रात्री ०८ वाजून ३१ मिनिटांनी उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात हे उपग्रह सोडण्यात येणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला.  Elon Musk यांची कंपनी उपग्रह सोडण्यासाठी तब्बल १० लाख डॉलर घेते, अशी माहिती मिळाली आहे. 


🔰अतराळात उपग्रह सोडण्याचे स्वप्न घेऊन Elon Musk वयाच्या ३० व्या वर्षी रशियात पोहोचले. मात्र, दोनवेळा प्रयत्न करूनही रशियाने उपग्रह देण्यास नकार दिला. यानंतर Elon Musk यांनी स्वतःच उपग्रह निर्मितीचा चंग बांधला आणि स्पेसएक्स या कंपनीची स्थापना केली. या प्रवासात Elon Musk यांनी अनेक आव्हाने, संकटे आणि अडचणींचा सामना केला. मात्र, अखेर Elon Musk यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरवले, असे सांगितले जाते. आताच्या घडीला Elon Musk जागतिक स्तरावरील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये आघाडीवर आहेत.

२७ जानेवारी २०२१

Online Test Series

नोबेल पुरस्कार २०२० विजेते

🏆 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)
👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)
👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)

🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)
👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)
🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)

🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)
🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)

🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०
🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )

🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०
🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम

🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०
👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)
👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

आयपीएल’चा लिलाव १८ फेब्रुवारीला

🖱इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया १८ फेब्रुवारीला होण्याची दाट शक्यता असून, ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालेले नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.

🖱‘आयपीएल’चा आगामी हंगाम भारतात होणार की परदेशात हेसुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली मात्र हंगाम होण्याबाबत आशावादी आहे. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर २०२०चा ‘आयपीएल’ हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत झाला होता.

🖱पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांद्वारे देशात ‘आयपीएल’ होण्याबाबतची स्पष्टता येऊ शकेल. तसेच ४ फेब्रुवारीपर्यंत संघांसाठी खेळाडू स्थलांतरण व्यवहार प्रक्रिया सुरू राहील.

11 वा राष्ट्रीय मतदार दिन देशभरात साजरा

निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार कार्ड, वेब रेडीओचे केले उद्‌घाटन

👉25 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथे आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित 11 वा राष्ट्रीय मतदार दिन देशभरात साजरा करण्यात आला.
👉केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.
👉यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त सुशील चंद्र, राजीव कुमार, सरचिटणीस उमेश सिन्हा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
👉यावर्षी, कोविड-19 मुळे, देशभरातील एनव्हीडी उत्सव हा प्रत्यक्ष आणि आभासी दोन्ही पद्धतीने साजरा केला जात आहे.

👉‘आपले मतदार सक्षम, जागरुक, सुरक्षित आणि माहितीपूर्ण बनविणे’ ही NVD 2021 ची संकल्पना आहे.

कोविड-सुरक्षित निवडणुका आयोजित करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या (ईसीआय) वचनबद्धतेचा तसेच प्रत्येक मतदाराला माहितीपूर्ण, नैतिक आणि जागरूक करण्याचा हा पुनरुच्चार आहे.

👉आज दोन अनोखे डिजिटल उपक्रम सुरु करण्यात आले. आयोग डिजिटल मतदार ओळखपत्रे किंवा ई-ईपीआयसी सुरु करत आहे, यामध्ये मतदाता हेल्पलाइन मोबाइल ॲप , मतदार पोर्टल (www.voterportal.eci.gov.in) किंवा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (www.nvsp.in/) वरून लॉग इन केल्यानंतर मोबाइल फोनवर किंवा संगणकावर स्व-मुद्रणयोग्य स्वरुपात डाउनलोड करू शकतो.

👉राष्ट्रपतींनी आज ‘रेडिओ हॅलो वोटर्स’ ही एक 24x7 ऑनलाईन डिजिटल रेडिओ सेवा देखील सुरू केली, जी भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मतदार जागरूकता कार्यक्रम प्रसारित करेल.

राष्ट्रीय बाल पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर

🔶शौर्य, संशोधन, कला, ज्ञानार्जन, क्रीडा या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कारावर राज्यातील मुलांनी मोहोर उमटवली आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने देशभरातील ३२ मुलांना हा पुरस्कार जाहीर केला असून त्यातील पाच मुले राज्यातील आहेत.

🔶‘महाराष्ट्राची माती ही गुणांची खाण आहे हेच या मुलांनी सिद्ध केले आहे. लढवय्येपणा, शौर्य यात महाराष्ट्र मागे हटत नाही. क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राने कायमच चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर संशोधन, नवनिर्माण यांतही नवी पिढी उमेदीने पुढे जात आहे,’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुक केले आहे.

🔶नागपूर  येथील बाल नवसंशोधक श्रीनभ अग्रवाल याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शेतात ‘येलो मोजॅक विषाणू’ने  पिकांचे मोठे नुकसान होते.‘येलो मोजॅक विषाणू’चा नाश करू शकणारा यशस्वी प्रयोग त्याने केला.

72 वा प्रजासत्ताक दिन साजरा

🔶26 जानेवारी 2021 रोजी भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला.

🔶यंदाच्या पथप्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेशाच्या सैन्याची तुकडी आणि बॅंड. ऐतिहासिक मुक्तीच्या 50 वर्षांच्या स्मृतिदिनानिमित्त पहिल्यांदाच बांगलादेशाच्या त्रि-सेवांमधील 122 सैनिकांची मार्चिंग तुकडी व बँडने पथप्रदर्शनामध्ये भाग घेतला.

🔶राष्ट्रीय ध्वजाला 21 तोफांची सलामी दिल्यानंतर, लष्करातील पराक्रमी, शूर सैनिकांना शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले. याप्रसंगी, दरवर्षीप्रमाणे देशातली लष्करी ताकद आणि विविध क्षेत्रातील कृत्ये, राज्यांमधील असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन, संरक्षण प्रणाली यांचे प्रजासत्ताक दिन पथप्रदर्शनामधून प्रदर्शित केले गेले.

🛑 पार्श्वभूमी...

🔶प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटिश सरकारपासून स्वतंत्र झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ‘भारत सरकार कायदा-1935’ संपुष्टात येऊन भारताचे स्वतंत्र संविधान अस्तित्वात आले. भारत सार्वभौम झाला. तेव्हापासून भारत देश हा संविधानानुसार चालतो. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.

विशेष सेवेसाठी राज्यातील ५७ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाले ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

🔶प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली.

🔶“शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची ४ पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची ४० पदके पटकावली आहेत. खास सेवेसाठी एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

🔶तसेच, “पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने या सर्वांचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” असं म्हणत त्यांनी पदक मिळवणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन देखील केलं आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा पदक विजेत्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.

केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

◾️प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.

◾️ महाराष्ट्रातील सहा जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

                       🔴 पद्मश्री 🔴

🔹 सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)
🔹 गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
🔹 नामदेव कांबळे (साहित्य)
🔹 परशूराम गंगावणे (साहित्य)
🔹 जसवंती बेन जमनादास पोपट (उद्योग)
🔹 रजनीकांत श्रॉफ

                     🔴 पद्मभूषण 🔴

🔹 सुमित्रा महाजन (माजी लोकसभा सभापती)
🔹 रामविलास पासवान (दिवंगत नेते, लोक जनशक्ती पक्ष)
🔹 तरुण गोगोई (दिवंगत नेते, आसामचे माजी मुख्यमंत्री)
🔹 कल्बे सादिक (दिवंगत मुस्लिम नेते)

                   🔴 पद्मविभूषण 🔴

🔹 शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान)
🔹 एस. पी. बालसुब्रमण्यम (दिवंगत, गायक-संगीतकार)
🔹 सुदर्शन साहो (सँड आर्टिस्ट)
🔹 बी. बी. लाल (पुरातत्वशास्त्रज्ञ)

 ◾️ या यादीत २९ महिलांचा समावेश आहे.

◾️ १६ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

--------------------------------------------------------------------

गूगलचा ऑस्ट्रेलियाला ‘सेवा बंद’चा इशारा

🔰ऑस्ट्रेलिया सरकारने वृत्तसेवेसाठी शुल्क आकारण्याच्या योजनेची अंमलबजावणी करावयाचे ठरविल्यास त्या देशातील सर्च इंजिनची सेवा खंडित केली जाईल, असा इशारा शुक्रवारी गूगलने दिला.

🔰ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्वरेने गूगलला फटकारताना स्पष्ट केले की, आम्ही इशाऱ्यांना भीक घालत नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियात काय करू शकता याची नियमावली आम्हीच तयार करतो, असे मॉरिसन यांनी ब्रिस्बेन येथे वार्ताहरांना सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत निर्णय घेण्यात आला आहे, आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे, ऑस्ट्रेलियात तशाच पद्धतीने काम होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

🔰नवी नियमावली अयोग्य असल्याचे गूगल ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे व्यवस्थापकीय संचालक मेल सिल्व्हा यांनी सिनेट चौकशी समितीसमोर सांगितल्यानंतर मॉरिसन यांनी वरील बाब स्पष्ट केली.

केंद्रीय अर्थसंकल्प यंदा कागदमुक्त

🔰 मोबाइल अ‍ॅपद्वारे खासदार, नागरिकांना दस्तावेज 🔰

🔶अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाच्या संकलनाची सुरुवात ज्या कार्यक्रमाद्वारे केली जाते त्या प्रतीकात्मक ‘हलवा समारंभा’त  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर सहभागी झाले होते.

🔶यंदा करोना निर्बंधांमुळे अर्थसंकल्पाच्या दस्तऐवजाची छपाई केली जाणार नसून खासदारांना त्याचे इलेक्ट्रॉनिक वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी हलवा कार्यक्रमाने अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती.

🔶स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच केंद्रीय अर्थसंकल्पातील मिळकत आणि खर्च याबाबतचे दस्तऐवज, त्याचबरोबर वित्त विधेयक, नव्या करांबाबतचा सविस्तर तपशील आणि नव्या आर्थिक वर्षासाठीच्या अन्य उपाययोजनांबाबतच्या दस्तऐवजाची छपाई करण्यात येणार नाही.

🔶केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१-२२) यंदा प्रथमच कागदविरहित पद्धतीने सादर केला जाणार आहे. संसदेत १ फेब्रुवारी २०२१ रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. खासदारांना आणि जनतेला अर्थसंकल्पाचा दस्तऐवज सहज उपलब्ध व्हावा यासाठी अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल-अ‍ॅपसेवा सुरू केली आहे.

पद्म पुरस्कार जाहीर - 2021

1. पद्मविभूषण -7 जणांना जाहीर
2. पद्मभूषण - 10 जणांना जाहीर
3. पद्मश्री - 102 जणांना जाहीर

एकूण पद्म पुरस्कार - 119 जणांना जाहीर

🏆 महाराष्ट्रातील रजनीकांत देविदास श्रॉफ यांना - पद्मभूषण जाहीर

🏆 महाराष्ट्रातील 5 जणांना पद्मश्री जाहीर 🏆

1. सिंधुताई सपकाळ
2. परशुराम गंगावणे
3. नामदेव कांबळे
4. जसवंतिबेन पोपट
5. गिरीश प्रभुणे

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

प्रश्न१६१) जोयमोती कोनवारी ही कोणत्या राजघराण्याची राजकन्या होती?
उत्तर :- अहोम साम्राज्य

प्रश्न१६२) कोणत्या कवीने लिहिलेल्या कवितासंग्रहाचे इंग्रजीत “नॉट मेनी, बट वन” या शीर्षकाखाली अनुवाद करण्यात आले आहे?
उत्तर :- श्री नारायण गुरु

प्रश्न१६३) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021’ प्रसिद्ध केला?
उत्तर :- जागतिक आर्थिक मंच (WEF)

प्रश्न१६४) कोणत्या राज्यात नागौर-गंगानगर खोरे आहे?
उत्तर :- राजस्थान

प्रश्न१६५) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय

प्रश्न१६६) टायटन (शनी ग्रहाचा चंद्र) यावरील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव काय आहे?
उत्तर :- क्रेकन मेर

प्रश्न१६७) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात भारतातल्या सर्वात दीर्घ कमानी रस्ता-पूलाचे उद्घाटन झाले?
उत्तर :- मेघालय

प्रश्न१६८) कोणत्या भारतीय उपग्रहाने ‘मिल्की वे’ आकाशगंगेमध्ये दुर्मिळ असे उष्ण अतिनील-चमकदार तारे शोधले?
उत्तर :- अ‍ॅस्ट्रोसॅट

प्रश्न१६९) कोणत्या राज्यात नवा थलतेज-शिलाज-रणचरदा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात आला?
उत्तर :-  गुजरात

प्रश्न१७०) ‘लाँगऑप्स / LongOps’ प्रकल्प हा __ या देशांचा एक संयुक्त उपक्रम आहे.
उत्तर :- ब्रिटन आणि जपान

प्रश्न१७१) कोणत्या ठिकाणी ‘MeerKAT रेडिओ दुर्बिण’ आहे?
उत्तर :- दक्षिण आफ्रिकेचा उत्तर केप

प्रश्न१७२) कोणत्या सैन्य दलाने भारतात “सर्द हवा” मोहीम राबविण्यास सुरुवात केली?
उत्तर :-  सीमा सुरक्षा दल

प्रश्न१७३) 'विश्वाचे गुंजन’ नामक विशिष्ट ध्वनी मृत ताऱ्याच्या एका प्रकारापासून प्रक्षेपित होतो, ज्याला _ असे म्हणतात.
उत्तर :- पल्सर

प्रश्न१७४) कोणत्या तारखेला नवा अण्वस्त्रे बंदी करार संपूर्णपणे लागू झाला?
उत्तर :- 22 जानेवारी 2021

प्रश्न१७५) कोणत्या राज्य सरकारने ‘अवलोकन’ सॉफ्टवेअर तयार केले?
उत्तर :- कर्नाटक

प्रश्न१७६) कोणत्या संस्थेत सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची नवी पद्धत विकसित करनेत आली आहे?
उत्तर :- CSIR-केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था, दुर्गापूर

प्रश्न१७७) ‘WASP-107b’ हे काय आहे?
उत्तर :-  बाह्य-ग्रह

प्रश्न१७८) कोणता यूरोपमधला सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे?
उत्तर :- फ्रान्सिस्को पिझारो प्रोजेक्ट

प्रश्न१७९) नवीन ‘स्टार्ट’ करार हा _ या देशांमध्ये झालेला एक करार आहे.
उत्तर :- रशिया आणि अमेरिका

प्रश्न१८०) नव्याने सापडलेली ‘ऊसेरेया जोशी’ ही जात कोणत्या प्रजातीची आहे?
उत्तर :-  मुंगी

कोकणातील नद्या


▪️ठाणे
- सुर्या
- वैतरणा
- उल्हास

▪️मुबंई उपनगर
- दहिसर 
- माहीम

▪️रायगड
- पाताळगंगा
- सावित्री

▪️रत्नागिरी
- वशिष्ठी 
- शास्त्री
- काजळी
- मुचकुंदी

▪️सिंधुदुर्ग
- देवगड
- माचरा
- कर्ली

ठिबक सिंचनाचे अन्य फायदे

१. ठिबक सिंचनाने गरजेनुसार पाणी दिल्याने झाडांच्या हरितद्रव्य तयार करण्याच्या क्रियेत खंड पडत नाही. त्यामुळे त्यांची वाढ जलद आणि जोमाने होते. पर्यायाने उत्पादन वाढते. उत्पादनात २० ते २००% पर्यंत वाढ होते.

२. ठिबकने ३० ते ८०% पाण्यात बचत होते.

३. बचत झालेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्रात वापर करता येतो.

४. कमी अगर जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही.

५. दिवस-रात्र कधीही पिकांना पाणी देता येते.

६. ठिबकने सारख्या प्रमाणात पाणी दिले जात असल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने आणि जलद होत राहते.

७. पाणी साठून राहत नाही.

८. पिके लवकर काढणीला येतात. त्यामुळे दुबार पिकाला फायद्याचे ठरते.

९. क्षारयुक्त जमिनीत ठिबकने पाणी दिले तरीही पिकांचे उत्पादन घेता येते.

१०. जमिनी खराब होत नाही.

११. चढ-उताराच्या जमिनी सपाट न करता ठिबकने लागवडीखाली आणता येतात.

१२. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पिके घेऊन उत्पादन काढता येते.

१३. ठिबकने द्रवरूप खते देता येतात. खताचा १००% वापर होतो. खताच्या खर्चात ३०-३५% बचत होते. खताचा अपव्यय टळतो. पिकांना सम प्रमाणात खाते देता येतात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो.

१४. जमिनीची धूप थांबते.

१५. निर्यातक्षम उत्पादनासाठी ठिबक सिंचन आवश्यकच आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...