०७ नोव्हेंबर २०२०

डॉ. झाकिर हुसेन


(८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये ⇨जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.

त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.

स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.

रामकृष्ण परमहंस

 

(१८ फेब्रुवारी १८३६–१५ ऑगस्ट १८८६). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष. मूळ नाव गदाधर, वडील क्षुदिराम चतर्जी, आई चंद्रामणीदेवी. गदाधरांचा जन्म कलकत्त्यापासून सु. १०० किमी. दूर असलेल्या कामारपुकुर या खेड्यात व शालेय शिक्षण गावातील धर्मदास लाहा यांच्या शाळेत केवळ एकदोन इयत्ता इतकेच झाले. अगदी लहानपणापासून ईश्वरभक्ती व साधुबैरागी यांकडे त्यांची ओढ होती.काळ्याभोर ढगांच्या पृष्ठभूमीवरून आकाशातून उडत चाललेली पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची रांग पाहून गदाधरांचे भान नष्ट झाले. भक्तिपर गाणी ऐकताना, शिवाची भूमिका नाटकात करीत असतानाही तसाच भावावेश होई. ईश्वराशी मन असे तन्मय होण्याची जन्मसिद्ध प्रवृत्ती त्यांच्या ठायी होती व ती सतत टिकून राहिली. १८४३ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

गदाधरांची नवव्या वर्षी मुंज झाली. आधी शब्द दिला होता म्हणून मुंजीच्या वेळी पहिली भिक्षा त्यांनी धानी लोहारणीकडून घेतली. हे परंपरेहून वेगळे पाऊल होते.उदरनिर्वाहासाठी पाठशाळा चालवणारा थोरला भाऊ राजकुमार याने १८५२ मध्ये गदाधरांना कलकत्त्यास आणले. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. कलकत्त्यापासून सु. ६ किमी. वरील दक्षिणेश्वर या खेड्यात गंगेच्या तीरावर १८५५ मध्ये राणी रासमणीने उभारलेल्या कालीमातेच्या मंदिरात रामकुमार पुजारी झाला. शुद्राची सेवा ब्राह्मणाने करू नये, या कारणासाठी प्रथम नकार दिलेल्या गदाधरांनी राणी रासमणीचे जावई व मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाश विश्वास यांच्या आग्रहावरून वर्षभराने ते पुजारीपण स्वीकारले. १८५६ मध्ये रामकुमारचा मृत्यु झाला.

यानंतर गदाधरांची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात. धोतर सोडून ठेवीत, ब्राह्मणत्त्वाचे चिन्ह असे यज्ञोपवीत काढून ठेवीत आणि ध्यानधारणा करीत. उत्कटता वाढत चालली. रात्र व दिवस यांचे भान नष्ट होत गेले. ‘आई, दर्शन दे’ असा आक्रोश सुरू झाला. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे.भाचा हृदय हा दोन घास गदाधरांना भरवी. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्‌ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. या वेळी त्यांचे वय पंचवीस होते. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. गदाधरांस रामकृष्ण हे नाव कोणी व केव्हा दिले हे ठरवता येत नाही. रामकृष्ण विवाहित होते. १८५९ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची सहा वर्षांची कन्या सारदामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरला आलेल्या सारदादेवींची त्यांनी जगन्माता या नात्याने केलेली षोडशी पूजा, हा रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा. सारदादेवींना रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णपणे सहभागी करून घेतले आणि त्याही सर्वार्थांनी त्यांच्या सहधर्मिणी झाल्या. रामकृष्णांच्या खालोखाल त्यांच्या अनुयायीवर्गात सारदामाता यांचे स्थान मान्यता पावले आहे.

कालीमातेची रीतसर पूजा करू लागण्याच्या आधीचा एक धार्मिक विधी म्हणून रामकृष्णांनी कलकत्त्यातील केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली होती. ते साधनाकालापूर्वीचे त्यांचे दीक्षागुरू. त्यानंतरचे त्यांचे गुरू दोन. १८६१ मध्ये दक्षिणेश्वरला आलेल्या भैरवी ब्राह्मणी या चाळिशीतील संन्यासिनीने दोन अडीच वर्षांच्या अवधीत रामकृष्णांकडून तंत्रमार्गानुसार सर्व प्रकारच्या साधना करून घेतल्या. रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत, असे शास्त्रीपंडितांच्या सभेत भैरवी ब्राह्मणीने प्रथम म्हटले. सुमारे सहा वर्षे रामकृष्णांच्या सहवासात राहून ती काशीला गेली. १८६४ मध्ये तोतापुरी हा संन्यासी दक्षिणेश्वरला आला. त्याने रामकृष्णांकडून वेदान्ताची साधना करून घेतली. त्या आधी त्यांना संन्यास दीक्षा दिली. तीन दिवसांनी समाधी लागली. ती तीन दिवस राहिली. हा निराकाराचा साक्षात्कार. दहा महिने राहून तोतापुरी गेल्यावर रामकृष्ण अद्वैतानुभवाच्या अवस्थेत सतत सहा महिने होते. त्यानंतर त्यांना आदेश मिळाला. ‘भावमुखी राहा’. १८६६ मध्ये गोविंद राय यांच्यामुळे इस्लाम धर्मानुसार त्यांची साधना झाली, तर शंभुचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला. येशू ख्रिस्तीने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला, असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवांतून, सारे धर्म हे एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत, हे रामकृष्णांचे मत बनले. १८६८ मध्ये त्यांनी मधुरबाबूंबरोबर काशीवृंदावनची यात्रा केली.

कलकत्त्यातील सुशिक्षितांना रामकृष्णांची माहिती ब्राह्मो समाजाचे नेते  केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे प्रथम झाली. दक्षिणेश्वरला दर्शनासाठी लोक येऊ लागले. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासनतास चालणारे संवाद  महेंद्रनाथ गुप्त यांनी ‘एम्.’ या टोपणनावाने श्रीरामकृष्ण कथामृत – ५ खंड, १८९७ – १९३२ (म. भा. श्री रामकृष्ण वचनामृत – १९५१) या ग्रंथात संकलित केले. अखेरच्या चार वर्षातील हे संवाद आहेत. त्यांवरून त्यांची शिकवणूक कळते. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण (१९४४) या नावाने केले. या ग्रंथाची तुलना बायबलशी केली गेली. रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे.कामिनीकांचनाच्या मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, ईश्वरदर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. कामिनीकांचनाचा सर्वथा त्याग, संन्यासव्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करूण शिष्यांना केला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभाव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत.

रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हात, काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चतर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. काही स्त्रियाही त्यांच्या शिष्यवर्गात होत्या. दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते. त्यांतील अग्रणी म्हणजे स्वामी  विवेकानंद. त्यांनी स्थापन केलेल्या  रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्


सर्वपल्ली राधाकृष्णन् : (५ सप्टेंबर १८८८ – १६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (१९०९ – १६). म्हैसूर विद्यापीठ (१९१६ –२१), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (१९२९ ३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (१९३१ –३५), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९ ४८) होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली.

अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (१९२७) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (१९३०) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते मद्रास येथे जाऊन राहिले.तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.

त्यांनी तत्त्वचिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही अशी टीका पुष्कळदा केली जाते. ती खरीही आहे आणि खोटीही आहे. खरी अशाकरता, की आपल्या लिखाणात शंकराचार्याच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करण केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी दाखवून दिले. सगुण ब्रह्म अथवा ईश्वर हा निर्गुण परब्रह्माचा खालच्या पातळीवरील आविष्कार आहे असे न म्हणता, भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या अपेक्षेने ग्रहण केल्यावर जो ईश्वर म्हणून भासतो त्याचेच संबंध – निरपेक्ष रीतीने ग्रहण केल्यावर तो परब्रह्म म्हणून उरतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. राधाकृष्णन् यांनी मायावाद स्वीकारला; जग ईश्वरावर अवलंबून आहे, स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन रूप मिळाले आहे असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद, डॉ. भगवानदास, म. गांधी इत्यादींच्या प्रमाणे राधाकृष्णन् यांनाही आहे.

सर्व धर्मांतील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेषकरून जोपासली आहे. असे राधाकृष्णन् यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या शिकवणुकी या तत्त्वज्ञानाचा अभ्यासविषय आहेत; देवशास्त्राच्या (थिऑलॉजीच्या) नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. असे ते म्हणू शकले याचे कारण ज्ञानमीमांसेत प्रत्यक्ष व अनुमान यांच्याप्रमाणेच अंतःप्रज्ञ (इंट्यूइशन) हेही सत्यज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे असे त्यांनी मानलेले आहे. धर्मग्रंथांचे प्रामाण्य त्यांत ग्रथित असलेल्या ऋषींच्या गूढानुभूतींवर आहे, त्या ग्रंथाच्या ईश्वरकर्तृत्वावर नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही दृष्टी पतकरली म्हणजे धर्माची चिकित्सा करता येते आणि प्रस्थापित धर्ममतांचा समन्वयही करता येतो.

बुद्धाने अनात्मवाद सांगितला; पण राधाकृष्णन् यांच्या मताप्रमाणे तो अनात्मवाद आणि वेदान्ताचा आत्मवाद अथवा ब्रह्मवाद यांच्यात विरोध नाही.बुद्धाने नाकारला तो ‘मी’ आणि ‘माझे’ अशी वृत्ती निर्माण करणारा जीवात्मा होय. जीवात्मा हा अहंकाराचा परिणाम होय. अहंकाराचा लोप झाला म्हणजे निर्वाणरूपी परम शांतीचा अनुभव येतो. वेदान्तही अहंकाराचे विसर्जन करावयास सांगतो. अहंकार नष्ट झाल्यावर जो शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो, त्यास वेदान्तात आत्म्याचा अनुभव म्हणतात.

खरे म्हटले तर धर्म एकच असतो. संप्रदाय अनेक असतात. याचा अर्थ असा नव्हे, की कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत. इतकेच केले पाहिजे, की संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे.

द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांच्या मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैत मताकडे– म्हणजे सगुणोपासनेकडे- झुकलेला दिसतो. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले दिसते. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या अॅन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल. यात असे म्हटले आहे, की देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल; पण अंतिम मोक्ष अथवा ब्रह्म-निर्वाण हे सर्व जीव मुक्त झाल्याशिवाय एका व्यक्तिला प्राप्त होणार नाही. म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात. हे मत महायान पंथातील बौद्ध मतासारखे बोधिसत्व संकल्पनेसारखे आहे. त्यांनी उपनिषदे वप्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज – १९६०) व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता – १९४८) या वेदान्ताच्या ⇨ प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिल्यामुळे प्राचीन अर्थाने त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी लावता येईल. यांशिवाय द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची ग्रंथरचना आहे.

धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही त्यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते.

आज ज्याला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान म्हणतात त्याच्याशी आपल्या विचारांचा सांधा जमवून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे आजच्या अस्तित्ववादाविषयीही त्यांनी फारसा आदर दाखविला नाही. त्यांच्या मते, उपनिषदांतील तत्त्वज्ञान हेच खरे अस्तित्ववादी आहे. कारण, त्याची सुरूवात आत्म्याच्या अस्तित्वापासून होते. जडवादात अंतःप्रज्ञेला अथवा गूढानुभूतीला स्थान नसल्यामुळे आध्यात्मिक मर्मदृष्टीला तो पारखा होतो.

गाडगे महाराज



गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.


बालपण :

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.

डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.


सामाजिक सुधारणा :

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.


समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.


त्यांनीनाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.


महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.


अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "

गाडगेबाबा प्रबोधन काव्य

भुकेलेल्यांना = अन्न

तहानलेल्यांना = पाणी

उघड्यानागड्यांना = वस्त्र

गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत

बेघरांना = आसरा

अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार

बेकारांना = रोजगार

पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय

गरीब तरुण-तरुणींचे = लग्न

दुःखी व निराशांना = हिंमत

गोरगरिबांना = शिक्षण

हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!


संक्षिप्त चरित्र :-

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.

ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.

१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.

१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.

१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.

"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.

गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.

१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.

गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.

"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]

आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'

१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.

गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.

डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.

२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.


गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.


गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :

१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.


गाडगेबाबांचे विचार :

एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"

पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."


गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :

The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई

आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)

कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)

गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)

गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)

गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)

दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)

मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)

मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)

लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)

श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)

श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)

श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)

श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)

श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)

श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)

श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)

संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)

संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)


संकीर्ण :

डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.


पुरस्कार :

गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.

१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार

२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :


👉1.संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक


👉2.चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला


👉3.हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंग

भूम


👉4.जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधु


👉5.खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई


👉6.संथाळांचा उठाव

1855

कान्हू व सिंधू


👉7.खासींचा उठाव

1824आसाम

निरत सिंग


👉8.कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर


👉9.दक्षिण भारतातील उठाव


👉10.पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास


👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर


👉12.विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर


👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर


👉14.रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड


👉15.रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत


👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824


👉17.केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर


👉18.फोंडा सावंतचा उठाव

1838


👉19.लखनऊ उठाव


👉21.भिल्लाचा उठाव

1825

खानदेश


👉21.दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

रशिया



🎯रशियाचा इतिहास🎯


🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. 


🔴पर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली . 


🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात . 


🔴जन १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली . 


*🎯रशियन साम्राज्य-🎯*


🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. 


🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. 


*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. 


🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. 


🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात. 


🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. 


🔵ह प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.


🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.


🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले. 


🔵कथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.


🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .


 *🎯सोव्हियेत रशिया-🎯*


सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.


🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता.  


🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. 


🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.


*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. 


🔵समारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. 


🔴सबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. 


🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.


त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.


१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.


आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. 


या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. 


प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. 


प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,


त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.


या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.


भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.


या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.


आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. 


अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.


चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.


राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.


या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.


या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

आजाद हिंद सेनेची स्थापना

 


👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 


👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला.  


👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना.  


👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. 


👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली


👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. 


👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. 


👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. 


👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.

जागतिक इतिहास



🔹बस्टील

""""""""""""""""""""


 बॅस्टील पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला.

बॅस्टील या शद्बाचे दोन अर्थ आहेत : तटबंदीयुक्त इमारत व शस्त्रागार. याची उभारणी ह्यूजिस ऑब्रिएट याच्या मार्गदर्शनाखाली १३६९-१३७० मध्ये शतवार्षिक युद्धाच्या वेळी झाली.


 पाचव्या चार्ल्सच्या राजवाड्याच्या संरक्षणार्थ ती करण्यात आली. या आयताकृती किल्ल्याला २३ मी. उंचीचे आठ बुरूज असून ते सलग भिंतीने जोडलेले होते. किल्ल्याच्या सभोवती रुंद खंदक होता. फ्रान्सचा शासकीय तुरुंग म्हणून याची प्रसिद्धी होती.


तेथे राजकीय व संकीर्ण स्वरुपाचे गुन्हेगार कैदी म्हणून ठेवीत. सोळाव्या शतकापर्यंत त्याचा लष्करी दृष्ट्या उपयोग केला जाई. त्यानंतर १६२० पासून फ्रान्सचा पंतप्रधान आर्मां झां रीशल्य याने त्याचा कारागृह म्हणून प्रथम वापर करण्यास सुरुवात केली. सुमारे ४० कैदी येथे असत. त्यांचा येथे अनन्वित छळ केला जाई. 


राजाच्या विरोधकांची न्यायालयीन चौकशी न करता त्यांच्या कारवासाची मुदत राजाच्या मर्जीवर अवलंबून असे. येथे जप्त केलेली पुस्तकेही आणून ठेवीत. या किल्ल्याच्या व्यवस्थापनास फार खर्च येऊ लागला; म्हणून तो पाडण्यात यावा, अशा प्रकारचे विचारही १७८४ मध्ये प्रसृत झाले.



फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात बॅस्टील हे अनियंत्रित राज्यसत्तेच्या अन्यायाचे व जुलमाचे प्रतीक मानले गेले. जुलै १७८९ च्या सुरुवातीस १६ व्या लूईने राष्ट्रीय सभा (नॅशनल असेंब्ली) नेस्तनाबूत करण्यासाठी पॅरिसच्या आसपास लष्कराची जमवाजमव सुरू केली, तेव्हा राष्ट्रीय सभेने त्याला लष्कर मागे घेण्यास सांगितले; पण लुईने ह्या कृतीस नकार दिला व त्या वेळचा लोकप्रिय झालेला अर्थमंत्री झाक नेकेर यास बडतर्फ केले (१७८१).


राजाच्या बेमुर्वतपणामुळे चिडून जाऊन कॅमिल देमुलच्या नेतृत्वाखाली जनतेने जोराचा उठाव केला व केला व १४ जुलै १७८९ रोजी तेथील कैदी सोडविण्यासाठी व युद्धसामग्री हस्तगत करण्यासाठी बॅस्तीलच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी व राज्यपाल बेरनार रने झॉरदां लोनो याच्या मदतीस यावेळी फक्त १३० फ्रेंच सैनिक होते. 


त्यास पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा तेथे नव्हता. थोड्याशा प्रतिकारानंतर दुपारच्या सुमारास लोनोने किल्ला क्रांतिकारकांच्या ताब्यात दिला. क्रांतिकारकांनी किल्ल्यात प्रवेश केल्यावर तुरुंग फोडून तेथील कैद्यांस मुक्त केले आणि किल्ल्याच्या मोडतोडीस प्रारंभ केला. त्या वेळी आत फक्त सात कैदी होते. प्रक्षुब्ध जमावाने लोनोचा बळी घेतला.


बॅस्टीलचा पाडाव हा लष्करी दृष्ट्या फारसा महत्त्वाचा नसला, तरी त्याचे राजकीय महत्त्व मोठे आहे. यामुळे क्रांतीकारकांना लुईविरुद्ध महत्त्वाचा विजय मिळाला. लोकांचा लूईबद्दलचा आदर कमी झाला. बॅस्तीलच्या पाडावामुळे पॅरिसच्या जनतेत स्वसामर्थ्याची प्रखर जाणीव झाली.


बॅस्टीलचा किल्ला पुढे संपूर्णपणे पाडण्यात येऊन त्या जागी १७८९ व १८३० मध्ये झालेल्या क्रांत्यांमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक ब्राँझचा स्तंभ उभारण्यात आला. पुढे १४ जुलै हा बॅस्तीलदिन म्हणून राष्ट्रीय सुटीचा दिवस जाहीर करण्यात आला (१८८०). तो दिवस मिरवणुका, भाषणे, नृत्य इत्यादींनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

महादेव गौविंद रानडे -

 

         -------------------

🔸 जन्म - १८ जानेवारी १८४२

     ( निफाड, नाशिक )


🔸 मत्यू - १६ जानेवारी १९०१


🔗 रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हनुन संबोधले जाते 


🔗 तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी म्हनतात.रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.


🔗 रानडे हे गौपाळ कृष्ण गौखले यांचे गुरू होते. त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जाते.


🔗 समाजसुधारकांसाठी सर्वांगीन प्रतिमान मांडनारे प्रज्ञावंत रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते.

🔻 १८८७ - सामाजिक परीषद 

🔻 १८९० - औद्योगिक परीषद


🔸 सस्थात्मिक योगदान -


🔻 १८६५ - विधवा विवाहोत्तेजक मंडळी

🔻 १८६७ - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग

🔻 १८७० - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग


उद्दिष्ट -

थंड गौळा होउन पडलेल्या समाजात विचार , संघटना व कृतीची सांगड घालन्यासाठी व्यासपीठ उभे केले

🔻 वकृत्वत्तेजक सभा - पुणे

भारत स्वातंत्र्याचा इतिहास



भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले :


भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 साली सुरू केले.

 या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या.

 संविधान समितीने तयार केलेले संविधान 26 जानेवारी, 1950 रोजी अमलात आले.

 ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या.

 या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली.


संस्थानांचे भारतात विलीनीकरण :


भारतावरील ब्रिटिश सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात केली होती.

 संस्थानांनी स्वतंत्र राहायचे की भारत किंवा पाकिस्तान यांपैकी एका राज्यात विलीन व्हायचे हा निर्णय त्यांनी घ्यायला होता.

 संस्थाने स्वतंत्र राहिली तर भारत शेकडो तुकडयांत विभागला जाणार होता. देशाची एकात्मता व सुरक्षितताही धोक्यात येणार होती.

 संस्थानी प्रजा मात्र भारतात सामील होण्यास उत्सुक होती.

 या पेचातून त्या वेळचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला.

 भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांनी संस्थानिकांना पटवून दिले.

 तसेच संस्थानिकांच्या प्रतिष्ठेला व मानमरातबाला धक्का लावला जाणार नाही असे आश्वासनाही त्यांनी दिले.

 भारत सरकारशी करार करून संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण या बाबी भारत सरकारच्या हाती सोपवाव्यात असे त्यांनी सुचवले.

 याला संस्थानिकांनी मान्यता दिली. जूनागड, हैदराबाद व काश्मीर सोडून बहुतेक सर्व संस्थाने 15 ऑगस्ट, 1947 पूर्वी भारतात विलीन झाली.


जूनागडचे विलीनीकरण :


जूनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते.

 तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, तर जूनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता.

 त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला.

 त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये जूनागड भारतात विलीन झाले.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना



धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

 विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

 ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.

 आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.

 त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते.

 हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.

 त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता.

 सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.

 स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती.

 पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.

 संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली.

 रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


ब्राम्हो समाजाची स्थापना :


त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.

 हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

 हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.

 अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.

 वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.

 म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

खुदीराम बोस


भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक

स्मृतिदिन - ११-०८-१९०५


खुदीराम बोस  : भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.


बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.


यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.


घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.

गोपाल गणेश आगरकर:



जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.

मृत्यू : 17 जून 1895,पुणे

1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.

बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .

संस्थात्मिक योगदान :


1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .

15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.

स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.

शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.

'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक.

हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

वैशिष्टे :


इष्ट असेल ते बोलणार......

राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.

हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.

बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.

जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

धोंडो केशव कर्वे



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.

1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :


1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.

1907 - हिंगणे महिला विद्यालय.

1910 - निष्काम कर्मकठ.

1916 - महिला विद्यापीठ, पुणे.

1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

1 जानेवारी 1944 - समता संघ.

1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.

1948 - जातींनीर्मुलन संघ.

1918 - पुणे - कन्याशाळा.

1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :


मानवी समता - मासिक.

1893 - विधवेशी पुनर्विवाह.

1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.

1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

आचार्य विनोबा भावे



जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).

मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.

आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.

भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.


संस्थात्मक योगदान :


1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.

संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.

18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.

कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.


आचार्य यांचे लेखन :


1923-महाराष्ट्र धर्म मासिक.

गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.

मधुकर(निबंधसंग्रह)

गीता प्रवचने.

'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.

विचर पोथी.

जीवनसृष्टी.

अभंगव्रते.

गीताई शब्दार्थ कोश.

गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.


वैशिष्टे :


वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.

गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.

चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.

मंगरौठ - उत्तरप्रदेश येथे 'सब भूमी गोपाल की' हा नारा दिला.

'जय जगत' घोषणा

राजर्षि शाहू महाराज :



जन्म - 16 जुलै 1874.

मृत्यू - 6 मे 1922.

एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.

महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.

भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

एक कल्याणकारी राजा.

संस्थात्मक योगदान :


ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.

1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

1917 - विधवा विवाहाचा कायदा.

1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.

1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.

यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.

1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.

1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.

1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.

ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

वैशिष्टे :


महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.

सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.

जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.

पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.

उदार विचार प्रणालीचा राजा.

राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.


कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.


शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.


टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.

1857 च्या पूर्वीचे उठाव :



आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)


गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.

बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.

शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.

शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

हटकरांचा उठाव - मराठवाड्यात


नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.

नेता - नौसोजी नाईक

प्रमुख ठाणे - नोव्हा

ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  

खानदेशातील भिल्लाचा उठाव


भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.

नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल

भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.


खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.

भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  

बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

काजरसिंग नाईकचा उठाव:


1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.

पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.

ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)



1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.


  फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.


  त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.

  काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.


  कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.


  दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.

  खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.


  युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.


  कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले.


  1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला.


  या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

आधुनिक भारताचा इतिहास



भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).


१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.


२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.


लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.


लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

गोंद्या आला रे .....



कालच्या दिवशी १८९७ साली पुण्यात एक प्रतिशोधाचे धगधगते अग्निकुंड पेटले. त्यात जुलमी ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध तर झालाच, पण पुणेकर जनतेवर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध म्हणून रँडवर ही कारवाई करणारे तीन युवा क्रांतिकारक चाफेकर बंधू यांनीही फाशीच्या तक्तावर चढून आत्माहुती दिली. 


त्यांच्या या बलिदानाने साऱ्या देशात खळबळ उडाली. चाफेकर बंधू अमर झाले.


वासुदेव, दामोदर व बाळकृष्ण हे तिघे चाफेकर बंधू मुळचे कोकणातले. त्यांचे कुटुंब पुण्याजवळ चिंचवडला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृतीचे कार्य सुरू केले.


ते लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले व त्यांच्या कार्याला दिशा व गती लाभली. १८९7मध्ये प्लेगच्या साथीने पुण्यात अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. 


रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची व रँडचा वध करण्याची योजना त्यांनी तयार केली.


त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव भारतातही साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. 


याच संधीचा फ़ायदा घेत दामोदर चाफेकर यांनी गणेश खिंडीत पाळत ठेवली व २२ जून १८९७ च्या मध्यरात्री रँडच्या घोडागाडीवर चढून जवळून गोळ्या झाडल्या. रँड काही काळ कोमात राहिला व ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. 


याचवेळेस दामोदराचा  भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.


चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू हुतात्मा झाले.


तीन सख्ख्या भावांनी एकाच वेळी स्वातंत्र्य लढ्यास बलिदान करण्याची जगातील ही बहुधा पहिली व एकमेव घटना!


त्यांच्या तेजस्वी स्मृतींना आदरांजली!

Online Test Series

डेली का डोज


1.हाल ही में किस देश के पूर्व प्रधानमंत्री जॉन टर्नर का 91 वर्ष की उम्र में निधन हो गया है?

a.    कनाडा✔️

b.    नेपाल

c.    जापान

d.    रूस


2.अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (आइएमएफ ) के कार्यकारी निदेशक का सलाहकार किसे नियुक्त किया गया है?

a.    अनिल अग्रवाल

b.    सीमांचल दास✔️

c.    राहुल सचदेवा

d.    मोहन त्यागी


3.अंतरराष्ट्रीय शांति दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a.    10 मार्च

b.    12 अप्रैल

c.    21 सितम्बर✔️

d.    15 जून


4.हाल ही में किस देश में कोरोना के बढ़ते संक्रमण के कारण दूसरी बार देशव्यापी लॉकडाउन लगाया गया है?

a.    भारत

b.    चीन

c.    रूस

d.    इजराइल ✔️


5.किस हाईकोर्ट ने हाल ही में हर्षवर्धन लोढ़ा को बड़ा झटका देते हुए एमपी बिड़ला समूह के सभी पदों से तत्काल हटाने का फैसला दिया है?

a.    कलकत्ता हाईकोर्ट✔️

b.    पटना हाईकोर्ट

c.    दिल्ली हाईकोर्ट

d.    इलाहाबाद हाईकोर्ट


6.हाल ही में किस केंद्रीय मंत्री ने मोदी कैबिनेट से कृषि सम्बन्धी विधेयक का विरोध करते हुए अपने पद से इस्तीफा दे दिया है?

a.    नरेन्द्र सिंह तोमर

b.    हरसिमरत कौर✔️

c.    कैलाश चौधरी

d.    परषोत्तम रूपाला


7.हाल ही में किस देश ने लोकप्रिय चीनी सोशल मीडिया ऐप टिकटॉक और वीचैट को राष्ट्रीय सुरक्षा के मद्देनजर प्रतिबंधित करने का आदेश जारी किया है?

a.    नेपाल

b.    पाकिस्तान

c.    बांग्लादेश

d.    अमेरिका✔️


8.रॉ के पूर्व प्रमुख अनिल धस्माना को कितने साल के लिए राष्ट्रीय तकनीकी अनुसंधान संगठन (एनटीआरओ) का नया अध्यक्ष बनाया गया है?

a.    पांच साल

b.    चार साल

c.    तीन साल

d.    दो साल✔️


9.भारत ने कोविड-19 महामारी के अर्थव्यवस्था पर पड़े प्रभाव से निपटने में मदद हेतु मालदीव को कितने करोड़ डॉलर की वित्तीय सहायता उपलब्ध करायी है?

a.    25 करोड़ डॉलर✔️

b.    15 करोड़ डॉलर

c.    20 करोड़ डॉलर

d.    30 करोड़ डॉलर


10.हाल ही में किस राज्य सरकार ने मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना (MMUY) का शुभारंभ किया है?

a.    बिहार

b.    पंजाब

c.    गुजरात✔️

d.    दिल्ली




मलय.


1) मलयगिरि : 


🅾️दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात. भवभूतीच्या महावीरचरितातील उल्लेखावरून हा पर्वत कावेरी नदीच्या दक्षिणेस होता असे दिसून येते.


🅾️अग्नि, कूर्म, विष्णु इ. पुराणांतील उल्लेखांवरून सांप्रतच्या कोईमतुर खिंडीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या त्रावणकोर व कार्डमम्‌ टेकड्या म्हणजे मलयगिरी असावा. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्‍या ताम्रपर्णी व कृतमाला (सांप्रत वैगई) या नद्या मलय पर्वतात उगम पावतात , असा उल्लेख मार्कंडेय, वायु, मत्स्य इ. पुराणांत मिळतो; त्यावरून या घाटाचा दक्षिण भाग म्हणजे मलयगिरी या विधानाला दुजोरा मिळतो.


🅾️पार्जिटरच्या मते पश्चिम घाटातील निलगिरीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतची डोंगररांग म्हणजे मलयगिरी होय. माळव्याच्या परमार घराण्यातील राजांच्या कागदपत्रांत भोज राजाचा राज्यविस्तार दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत होता, असा उल्लेख मिळतो.


🅾️या पर्वताच्या पावित्र्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. मनूने या पर्वतावर तपश्चर्या केल्याचा उल्लेख मत्स्य पुराणात आहे. या पर्वतावरील पोथिगेई शिखरावर अगस्त्य (स्ती) ऋषींचे वास्तव्य होते. असा चैतन्यचरितामृतात उल्लेख आहे. त्यामुळे याला अगस्ती कूट असेही म्हणतात. पुराणात मलय पर्वत चंदनाने समृद्ध होता असे. उल्लेख आढळतात.


2) भारतातील एक प्राचीन ठिकाण. 

याच्या स्थाननिश्चितीविषयी वेगवेगळी मते आहेत. तेलंगांच्या मते हे पश्चिम घाटाच्या दक्षिण टोकाला होते, तर केशवलाल ध्रुव यांच्या मते हे ठिकाणचे नाव नसून ही एक जमात आहे. या जमातीचे लोक हिंदूस्थानाच्या उत्तर सरहद्दीवर राहत असावेत.


🅾️रामायण, महाभारत रत्न्कोश इ. संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासावरून जेम्स बर्जेस यांच्या मते गंडकी व राप्ती नद्यांच्या वरच्या बाजूस असलेला मलयभूमी नावाचा जिल्हा म्हणजेच मलयांचा देश असे दिसून येते.


ह्युमिक अँसिड.



🧩१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड....


🅾️सद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.


🧩हयुमस /ह्युमिक अँसिड?


🅾️हयुमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच  पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.


🧩हयुमिक अँसिडचे गुणधर्म....


🅾️हयुमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.


🧩हयुमिक अँसिडचे फायदे ...


🅾️हयुमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.


🅾️मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.


🅾️हयुमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.


🅾️जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.


🅾️बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.


🅾️यरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.


मस्लिम सामाजिक धार्मिक आंदोलन


♦️फराजी आंदोलन:-


◾️वर्ष:-1804


◾️सथान:-फरीदपूर


◾️सस्थापक:-हाजी शरीयतुला व दादू मियाँ


♦️तयुनी आंदोलन:-


◾️वर्ष:-1839


◾️सथान:-ढाका


◾️सस्थापक:-करामाती आली


♦️दवबंद आंदोलन:-


◾️वर्ष:-1867


◾️सथान:-देवबंद


◾️महम्मद कासीम ननोतवी व अहमद गंगोही


♦️अलिगढ आंदोलन:-


◾️वर्ष:-1875


◾️सथान:-अलिगढ


◾️सर सय्यद अहमद खान


♦️अहमदिया आंदोलन:-


◾️वर्ष:-1889-90


◾️सथान:-फरीदकोट


◾️सस्थापक:-कादिया के मिर्जा गुलाम अहमद


हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा‼️‼️



🦋हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे 8 नोव्हेंबर 2020 रोजी उद्घाटन होणार आहे. ते हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.


🅾️ठळक बाबी


🦋जलमार्ग वाहतुकीसाठी हजिरा येथे तयार करण्यात आलेल्या रो-पॅक्स टर्मिनलची लांबी 100 मीटर असून रूंदी 40 मीटर आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.


🦋रो-पॅक्स फेरी व्हेसलचे ‘व्होएज सिम्फनी’ या नावाचे तीन डेकचे जहाज आहे. त्याची क्षमता 2500-2700 मेट्रिक टन आहे. त्याचबरोबर 12000 ते 15000 GT सामान वाहून नेण्याची क्षमता आहे. या फेरी बोटीच्या मुख्य डेकवरून 30 मालमोटारी (प्रत्येकी 50 मेट्रिक टन वजनाच्या) वाहून नेता येणार आहेत. अप्पर डेकवर 100 प्रवासी गाडया आणि सर्वात वरच्या प्रवासी डेकवर  500 प्रवासी आणि त्याव्यतिरिक्त जहाजावरील 34 कर्मचारी आणि आदरातिथ्य करणारा कर्मचारी वर्ग यांची वाहतूक होऊ शकणार आहे.

सेवेचे फायदे


🦋हजिरा ते घोघा या दरम्यान जलवाहतुकीचे अनेक लाभ होणार आहेत. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये हा जलमार्ग ‘गेट वे’ म्हणून काम करणार आहे. त्यामुळे घोघा ते हजिरा यांच्यामधले 370 किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते अवघे 90 किलोमीटर होणार आहे. त्याचबरोबर सामानाच्या वाहतुकीचा वेळ 10 ते 12 तासांवरून फक्त चार तास होणार आहे.


🦋परिणामी, अंदाजे प्रतिदिनी 9000 लिटर इंधनाची बचत होऊ शकणार आहे. या जलमार्गामुळे वाहतुकीच्या कोंडीचा त्रास कमी होणार. त्याचबरोबर वाहनांची वाहतूक कमी झाली तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमालीचे कमी होणार आहे. प्रतिदिनी अंदाजे 24 मेट्रिक टन म्हणजेच प्रतिवर्षाला 8,653 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊ शकणार आहे.


🦋फरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागामधील बंदरांच्या क्षेत्रात फर्निचर आणि खते उद्योगाला चालना मिळणार आहे. गुजरातमध्ये विशेषतः पोरबंदर, सोमनाथ, व्दारका आणि पालिताना येथे पर्यटनाला प्रोत्साहन मिळू शकणार आहे. फेरी सेवेमुळे गिर येथील वन्यजीव अभयारण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.



🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी


🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी


🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स


🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी


🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी


🔶मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी


🔶 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी


🔶पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी


🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी


🔶धातूंचा अभ्यास - मेटलर्जी


🔶 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी


🔶जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी


🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी


🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स


🔶पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी


🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी


🔶आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स


🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी


🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी


🔶 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी


🔶अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स


🔶पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी


🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी


🔶जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री


🔶सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी


🔶 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स


🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी


🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर


🔶शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी


🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी


🔶 मतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी


🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

महाराष्ट्र नैसर्गिक सीमा


वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या


उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या


ईशान्य:- दरकेसा टेकड्या


पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर


दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी


पश्चिम:- अरबी समुद्र

देशी बनावटीचे स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्र



🔰सरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) देशी बनावटीच्या स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.


🔴सटँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राविषयी....


🔰त भारतीय हवाई दलासाठी (IAF) DRDO संस्थेनी विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.ते हवेतून पृष्ठभागावर मारा केले जाणारे क्षेपणास्त्र आहे.


🔰SANT क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरद्वारे सोडल्या जाणाऱ्या ‘नाग (हेलीना)’ या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती आहे.ते ‘लॉक-ऑन बिफोर लॉंच’ आणि ‘लॉक-ऑन आफ्टर लॉंच’ अश्या दोनही पद्धतीने मार्गदर्शित केले जाऊ शकते.

यावर्षी (Nov/Dec) MPSC चे पेपर होण्याची शक्यता उरली आहे का...?



✍️ यशाचा राजमार्गच्या  मताशी खालील दिलेल्या परीक्षा बद्दल माहिती बाबतीत आम्ही सहमत आहोत.. 🙏


मुख्यमंत्र्यांनी  पेपर  पुन्हा एकदा पुढे ढकलताना मुलांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला आणि कोरोना ही दोन कारणे सांगितली.परंतु मुख्य कारण सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे आरक्षण.आरक्षण या मुद्द्यामुळे पेपर पुढे ढकलण्यात आले ही वस्तुस्थिती आहे.तर आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने  4 आठवडे पुढे ढकलली आहे.म्हणजेच नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा सुनावणी होईल.आणि आरक्षणामुळे पेपर पुढे ढकलले आहेत तर आयोगाला निकाल लागेपर्यंत थांबावे लागेल.मग पुढील सुनावणीला निकाल लागेल का ?..पुढील सुनावणी ही खरे पाहता पहिलीच सुनावणी असणार आहे कारण मागील सुनावणीला राज्य सरकारचे वकील अनुपस्थित होते.त्यामुळे सुनावणी झालीच नाही.आरक्षणासारखे मुद्दे एकाच सुनावणीत निकालात निघतील याची शक्यता किती  आहे हे सर्वानाच माहीत आहे.आपल्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास नोव्हेंबर मधील सुनावणी जर पुन्हा एकदा पुढे ढकलली तर ती डिसेंबर मधे घ्यावी लागेल आणि डिसेंबर मध्ये समजा आरक्षणाचा निकाल लागला आणि पेपर घेण्याचा मार्ग मोकळा झाला तर पेपर कमीत कमी डिसेंबर end ला ला घ्यावे लागतील आणि मुख्य परीक्षा मार्च एप्रिल ला घ्यावी लागेल.असे झाले तर मग 2021 च्या पूर्व परीक्षा घेणार कधी ? ज्या की दरवर्षी एप्रिल मे मध्ये होतात... Practically पाहता यावर्षीची परीक्षा डिसेंबर मध्ये चालू करून पुन्हा पुढील वर्षाची परीक्षा एप्रिल मध्ये चालू करणे याची शक्यता कमी वाटत आहे...वरील गोष्टींना अनुसरून माझी काही मते सांगत आहे ही माझी वैयक्तिक मते आहेत.

👉काही रिक्त पदे add करून 2020 ची Ad हीच 2021 ची Ad म्हणून परीक्षा घेतली जाऊ शकते.

👉नकतेच Graduation झालेल्या विद्यार्थ्यांना 2021 चा फॉर्म भरण्याची संधी दिली जाऊ शकते.

👉पपर फेब्रुवारी अथवा एप्रिल ला होऊ शकतात.

👉मख्य परीक्षेला नेहमीप्रमाणे पुरेसा वेळ दिला जाऊ शकतो.

👉वर्ग ३ तसेच वनसेवा यांच्या परीक्षा ही 2021 मध्ये घेतल्या जाऊ शकतात.पदे कमी काढतील परंतु पेपर नक्कीच घेतील.

👉आरक्षणाच्या मुद्द्यावर जरी न्यायालयात निर्णय लवकर नाही होऊ शकला तरी त्यावर नक्कीच तोडगा काढला जाईल आणि परीक्षेचा मार्ग मोकळा होईल.

👉2021 मध्ये परीक्षा होणार हे मात्र 100% खरे.

👉 समजा वरील सर्व गोष्टी खोट्या ठरवत आयोगाने याच वर्षी पेपर घेतले तर माझ्या मते किमान December च्या शेवटच्या आठवड्या आधी पेपर घेण्याची शक्यता कमी आहे.त्यानंतर  पेपर घेतले तर ते केवळ रविवारीच होतील या भ्रमात राहू नका. कोणत्याही दिवशी घेऊ शकतात.

👉एवढ सांगण्याचा कारण हेच की आपल्याकडे किती वेळ आहे याप्रमाणे आपल्या अभ्यासाचा नियोजन करावे.

👉परत्येकाची जशी काही Prediction असतात तसेच माझेही आहे.यात कोणालाही Demotivate करण्याचा उद्देश नाहीये केवळ अभ्यासाला एक दिशा मिळावी हाच उद्देश आहे.कदाचित वरील सर्व Prediction खोटीही ठरू शकतात कारण शेवटी परिस्थितीनुसार  काय निर्णय घ्यायचा ते आयोग आणि सरकार घेणार आहे.

👉परत्येकाला परीक्षा कधी होतील हे गृहीत धरूनच अभ्यास करावा लागेल अन्यथा अभ्यासाला दिशा मिळणार नाही.

👉शवटी पुन्हा एकदा सांगत आहे आरक्षणाचा निकाल जरी प्रलंबित राहिला तरी त्यावर काहीतरी तोडगा काढून परीक्षा या 100% होतीलच.

(वरील सर्व मते ही माझी वैयक्तिक मते आहेत.याला कोणतीही अफवा अथवा अधिकृत समजू नये.खूप विद्यार्थी याबाबत विचारात असल्याने केवळ एक Prediction केले आहे)


डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप



🔰वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा पेच दिवसागणित अधिकच वाढत आहे. एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. अनधिकृत मतांच्या माध्यमातून विजय चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसा ज्यो बायडन यांना २६४ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.


🔰परसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, जर तुम्ही वैध मतांची मोजणी केली तर मी सहजपणे जिंकत आहे. मात्र जर तुम्ही अवैध मतांची (मेल इन बॅलेट्स) मोजणी केली तर डेमोक्रॅट आमच्याकडून विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मी अनेक मोठ्या राज्यांमध्ये ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.


🔰यावेळी विविध माध्यमांनी दाखवलेल्या ओपिनियन पोल्सवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली. ओपिनियन पोल्स घेणाऱ्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण देशाता ब्लू व्हेव दाखवली. प्रत्यक्षात अशी कुठलीही लाट नव्हती. संपूर्ण देशात मोठी रेड व्हेव आहे. याचा प्रसारमाध्यमांना अंदाज होता. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.

युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन: 6 नोव्हेंबर


🔰दरवर्षी 6 नोव्हेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा केला जातो.


🔰सयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्या मते, गेल्या 60 वर्षांत सर्व अंतर्गत संघर्षांपैकी किमान 40 टक्के नैसर्गिक स्त्रोतांच्या शोषणाशी संबंधित होते.


🔰यद्ध व सशस्त्र संघर्षादरम्यान होणारी पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठीच्या उद्देशाने 2001 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी 6 नोव्हेंबरला ‘युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ म्हणून घोषित केले.


🔰हा दिवस कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे. जगाच्या कोणत्याही भागात कोणत्याही सशस्त्र संघर्षादरम्यान पर्यावरणाला इजा होणार नाही याची खात्री करणे, हा या दिनाचा उद्देश आहे.

०६ नोव्हेंबर २०२०

Online Test Series

महत्वाच्या घटना दुरुस्त्या


४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट ५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक

४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.

१ली [१९५०]- ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]

५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]

७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]

७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]

२१वी [१९६७]- सिंधी भाषा समाविष्ट

७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट

९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट

२४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]

२५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत

२६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द

३६वी [१९७५]- सिक्किमला राज्याचा दर्जा

५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा

५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा

६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.

८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट

८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)

९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.

९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद

९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले

९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]

१०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना

१०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]

११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी

११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी

११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.

महिलां विषयी कायदे:



― सतीबंदी कायदा -1829

 

― विधवा पुनर्विवाह कायदा -1856


― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866


― भारतीय घटस्फोट कायदा -1869


― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993


― आनंदी विवाह कायदा -1909


― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986


― विशेष विवाह -1954


― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956


― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959


― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956


― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929


― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929


― बालविवाह निर्बंध कायदा -1929


― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक  कायदा -2005


― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन                कायदा -2005


― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961


― समान वेतन कायदा -1976


― बालकामगार कायदा -1980


― अपंग व्यक्ती कायदा -1995


― मानसिक आरोग्य कायदा -1987


― कुटुंब न्यायालय कायदा - 1984


― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990


― माहिती अधिकार कायदा -2005


― बालन्याय कायदा - 2000


― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959


― अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960


― हिंदू विवाह कायदा -1955


― कर्मचारी विमा योजना -1952


― प्रसूती सुधारणा कायदा -1961

   

― अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

    

― वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

 

― हुंडा निषेध कायदा - 1986.

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय निवडणूक आयोग



ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.


▪️राज्यसभा

- संसदेचे उच्च सभागृह

- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त

- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा


▪️लोकसभा

- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014


▪️लोकसभा निवडणूक 2014

- 16 वी लोकसभा निवडणूक

- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान

- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

- एकूण मतदारसंघ: 543

- एकूण मतदान केंद्र: 927553

- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)

राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)


▪️ पक्षीय बलाबल

- भारतीय जनता पक्ष: 282

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

- कम्युनिस्ट पक्ष: 01

- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

- राज्यस्तीय पक्ष: 182

- नोंदणीकृत पक्ष: 16

- अपक्ष: 03


▪️ वैशिष्ट्ये

- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 

- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला

- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 

- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

--------------------------------------

• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 

- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 

- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"



2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


- कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

124 वे घटनादुरुस्ती विधेयक



- उच्च जातींना आर्थिक निकषांवर 10%आरक्षण


- 8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक मंजूर


- खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचे 10% आरक्षण सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्क्यांच्या वर असेल. 


- या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून 60 टक्के होईल. 


- संविधानातील कलम 15 आणि 16 मध्ये दुरूस्ती केली जाईल.


- यापूर्वी 1990 च्या दशकात आर्थिक निकषांवर दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते.

(आर्थिक निकषांवर आरक्षण देता येत नाही व राज्यघटनेत तशी तरतूद नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.)

ससदेविषयी महत्त्वाची माहीती




· एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.


· संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.


· नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.


· राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.


· घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.


· संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.


· जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.


· विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.


· करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.


· सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.


· वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.


· विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.


· वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.


· वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.


· सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.


· राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.


· लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.


· लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.


· आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.


· राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.


· राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.


· लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.  

_____________________________________

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे



भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.


कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती


कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे


कलम १४. - कायद्यापुढे समानता


कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा


कलम १८. - पदव्या संबंधी


कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार


कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी


कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.


कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना


कलम ४४. - समान नागरी कायदा


कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण


कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन


कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग


कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे


कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक


कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता


कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही


कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ


कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता


कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग


कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक


कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार


कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ


कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार


कलम ७६. - भारताचा महान्यायवादी


कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल


कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य


कलम ७९ - संसद


कलम ८० - राज्यसभा


कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील


कलम ८१. - लोकसभा


कलम ८५. - संसदेचे अधिवेशन


कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते


कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो


कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही


कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो


कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या


कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक


कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार


कलम १२४. - सर्वोच न्यायालय


कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.


कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात


कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक


कलम १५३. - राज्यपालाची निवड


कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ


कलम १५७. - राज्यपालाची पात्रता


कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)


कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती


कलम १७०. - विधानसभा


कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग


कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक


कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार


कलम २१४. - उच्च न्यायालय


कलम २३३. - जिल्हा न्यायालय


कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये


कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार


कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी


कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार


कलम २८०. - वित्तआयोग


कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा


कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग


कलम ३२४. - निवडणूक आयोग


कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा


कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा


कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती


कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी


कलम ३५६. - राज्य आणीबाणी


कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी


कलम ३६८. - घटनादुरुस्ती


कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती


कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे


कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

जम्मू-काश्मीर आणि कलम ‘३५ अ’



जम्मू-काश्मीरसंदर्भात महत्त्वाचे आहे. आतापर्यंत या कलमाबद्दल भारतीय जनमानसात फार चर्चा झालेली नाही. मात्र, काश्मीरमधील राजकीय परिस्थिती बदलत असताना कलम ‘३५ अ’ पुन्हा चर्चेत आले आहे. काय आहे हे कलम?


> रहिवासी ठरवण्याचा अधिकार


भारतीय राज्यघटनेतील कलम ‘३५ अ’ अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेला राज्याचे ‘कायमस्वरूप रहिवासी’ (परमनंट रेसिडंट्स) ठरवण्याचा अधिकार आहे. याशिवाय नागरिकांचे विशेष हक्क आणि विशेषाधिकारही विधानसभेला ठरवता येतात. जम्मू-काश्मीरमधील तत्कालीन सरकारच्या सहमतीने १९५४मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशाने हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले.


> ऐतिहासिक पार्श्वभूमी


जम्मू-काश्मीर संस्थान असताना तेथील डोग्रा शासक महाराजा हरिसिंग यांनी १९२७ आणि १९३२मध्ये राज्यात राज्याचे विषय आणि त्याचे अधिकार निश्चित करणारा कायदा लागू केला होता. त्याअंतर्गत राज्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांचे नियमनही होत होते. महाराजा हरिसिंग

यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर ऑक्टोबर १९४७मध्ये भारतात समाविष्ट झाले. त्यानंतर काश्मीरमधील लोकप्रिय नेते शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता आली. त्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून राज्यघटनेत कलम ३७० समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे विषय केंद्राकडे ठेवून जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला.


> कलम ‘३५ अ’ कधी आले?


तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत १९५२मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटनेतील काही तरतुदी राष्ट्रपतींच्या आदेशाने १९५४मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी कलम ३५अ राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले. जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये मराहाजा हरिसिंग यांच्या काळातील ‘कायमस्वरूपी नागरिकां’ची व्याख्या परत आणण्यात आली. त्यानुसार १९११पूर्वी राज्यात जन्मलेले किंवा स्थायिक झालेले सर्व नागरिक किंवा संबंधित तारखेपूर्वी दहा वर्षांहून अधिक काळ कायदेशीर मार्गाने स्थावर मालमत्ता धारण केलेले नागरिक यांचा समावेश आहे. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर केलेले सर्व नागरिक, त्यामध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झालेले नागरिकही येतील, हा राज्याचा विषय असेल. स्थलांतरितांच्या पुढील दोन पिढ्यांतील वंशजांचाही यात समावेश आहे.


> बाहेरच्या नागरिकांना बंदी


जम्मू आणि काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिक नसलेल्या व्यक्तींना राज्यात स्थावर मालमत्ता धारण करता येणार नाही. सरकारी नोकरी, शिष्यवृत्ती, सरकारी मदत त्यांना मिळणार नाही, अशी तरतूद ‘३५ अ’ अंतर्गत आहे. जम्मू-काश्मीरचे कायमस्वरूपी नागरिकत्व असलेल्या महिलेने बिगर कायमस्वरूपी नागरिकत्व असलेल्या पुरुषाशी लग्न केल्यास, तिचे राज्याचे नागरिकत्वाचे अपात्र ठरते. मात्र, ऑक्टोबर २००२मध्ये जम्मू आणि काश्मीर हायकोर्टाने काश्मीरबाहेरील व्यक्तीशी विवाह केलेल्या महिलेचे नागरिकत्व अपात्र ठरणार नाही, असा निकाल दिला होता. मात्र, अशा महिलेच्या मुलांना वंशपरंपरागत अधिकार नसतील, असेही कोर्टाने म्हटले होते.


> कलम ‘३५ अ’ कशामुळे चर्चेत?


‘वी द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेने २०१४मध्ये कलम या कलमाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. कलम ३६८अंतर्गत सुधारणांद्वारे हे कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे सांगून याचिकाकर्त्यांनी त्याला विरोध केला आहे. संसदेसमोर हे कलम मांडण्यात आले नाही, तसेच ते तातडीने लागू करण्यात आल्याचा दावा संस्थेने केला आहे. गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात दुसऱ्या एका प्रकरणात दोन काश्मिरी महिलांनी म्हणणे मांडले होते. कलम ३५अ आधारित राज्याच्या कायद्यामुळे आमच्या मुलांचे नागरिकत्व हिरावले गेले असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले होते.


> विरोध का?


‘३५ अ’ रद्द झाल्यास जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता लोप पावेल, अशी भीती राजकीय पक्ष आणि फुटीरतावादी संघटनांना वाटते आहे. कलम रद्द झाल्यास मुस्लिम बहुसंख्य असलेल्या या राज्यात सामाजिक बदल होतील. काश्मीरचा करार सर्वोच्च स्वायत्ततेवर आधारित असल्याचे राज्यातील राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. ३५ अ रद्द झाल्यास राज्यात ‘हिंदू’ धर्मियांचे लोंढे येतील, अशी शक्यता फुटीरतावादी व्यक्त करतात. जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या ७० वर्षांत सामाजिक स्थितीत फरक पडलेला नाही. राज्यातील जम्मू भागात हिंदू बहुसंख्य आहेत, तर लडाखमध्ये बौद्ध धर्मिक मोठ्या संख्येने आहेत. त्यांना खोऱ्यात संपत्ती खरेदी करण्याचा, तसेच स्थायिक होण्याचा अधिकार आहे.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...