11 August 2020

एकमान पद्धत विषयी संपूर्ण माहिती


(अ) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

252 रु.

336 रु.

168 रु.

420 रु.

उत्तर : 252 रु.  

स्पष्टीकरण :-दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252

नमूना दूसरा –

उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?

16

24

27

36

उत्तर : 27

स्पष्टीकरण :-एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना

नमूना तिसरा –

उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?

26

121

84

169

उत्तर : 169

क्लृप्ती :-एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे.

नमूना चौथा –

उदा. 60 चा 2/5 =?

12

24

18

30

उत्तर : 24

क्लृप्ती :-60 चा 2/5 = 60×2/5 = 12×2 = 24  किंवा1/5 = 2/10 आणि 2/5 = 4/10, 60 चा = 1/10 आणि 60 चा 4/10 = 6×4

नमूना पाचवा –

उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

5

3

2

8

उत्तर : 3

क्लृप्ती :-80 चा 3/5 = 80×3/5 = 48, 60 चा ¾ = 60×3/4 = 45,उदाहरणानुसार 48-45 = 3

नमूना सहावा-

उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?

200

180

210

240

उत्तर : 240

स्पष्टीकरण :-400 चा 3/8 = 400×3/8 = 50×3 = 150 आणि क्ष चा 5/8 = 150:: क्ष = 150×8/5 = 240 किंवा5 भाग = 400:: 3 भाग = 400 × 3/5 = 240 किंवा400×3/8×8/5 = 240

नमूना सातवा –

उदा. 350 लीटर पाणी मावणार्‍या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?

3.15 ली.

200 ली.

250 ली.

245 ली.

उत्तर : 250 ली.

स्पष्टीकरण :-350 चा 2/7 = 50×2 = 100 उदाहरणानुसार 350-100 = 250 लीटर

नमूना आठवा –

उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?

50

60

120

75

उत्तर : 60

स्पष्टीकरण :-1/3+1/4=4/12+3/12=7/12;1-7/12=12/12-7/12=5/12=25 एकर,:: एकूण शेत = 5/12  चा व्यस्त 12/5 ने 25 ला गुणणे,यानुसार 12/5×25=60

 (ब) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रु. तर एका खुर्चीची किंमत किती?

15 रु.

150 रु.

105 रु.

140 रु.

उत्तर : 105 रु.

स्पष्टीकरण :-अनेकांवरून एकाची किंमत काढताना भागाकार करावा व एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा.यानुसार 1680 ÷ 16 = 105

नमूना दूसरा –

उदा. 12 सेकंदांत 1 पोळी लाटून होते; तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

250

150

125

180

उत्तर : 150

स्पष्टीकरण :-60 सेकंद = 1 मिनीट, 12 सेकंदांत 1 पोळी यानुसार60 सेकंद = 1 मिनीट = 5 पोळ्या:: 30 मिनिटात = 5×30 = 150अर्धातास = 30 मिनीटे:: 60/12 × 30 = 150

चालू घडमोडी


• 22 मे रोजी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ......................या वाहनांसाठी L7 श्रेणीतल्या उत्सर्जन नियमांसाठी अधिसूचना जाहीर केली
- BS-6 वाहन.

• जागतिक बँकेचे नवे उपाध्यक्ष - कारमेन रेनहार्ट. (जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष
- डेव्हिड मालपास.)

• 2020 सालाचा ‘यूनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी .................. यानिवडलेला भारतीय शांतीदूत सैनिकाची निवड करण्यात आली आहे.
- मेजर सुमन गवनी.

• भारतातील ................ या राज्याने क्रिडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा प्रदान दिला 
- मिझोरम.

• खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी.............. या राज्याच्या क्रिडा प्राधिकरणाने टाइम्स सेंटर फॉर लर्निंग लिमिटेड (TCLL) सोबत सामंजस्य करार केला
– गुजरात क्रिडा प्राधिकरण.

• ................... या राज्याने कारखाने कायद्यांतर्गत कामाचे तास 8 तास वरुन वाढवून 12 तासांपर्यंत करणारे भारतातील पहिले राज्य ठरले
:-राजस्थान.

• ............ यांच्या अध्यक्षतेखाली 27 मे ते 29 मे या कालावधीत आणि जून 2020 महिन्यात ‘आर्मी कमांडर’ ची परिषद दोन टप्प्यांत आयोजित केली जाणार आहे
- भारतीय भुदलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे.

• सत्तापालट झाल्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त टर्की देशाचे राष्ट्रपती रेसेप तैयिप एर्दोगन यांनी ...............या शहराच्या जवळ पाण्यातले लोकशाही व स्वातंत्र्य बेटाचे उद्घाटन केले
- इस्तंबूल.

• भारताने युगांडा या आफ्रिका देशातील  जिन्जा जिल्ह्यात ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभारण्यासाठी मदत केली आहे, त्याचे नाव -------------- हे ठेवण्यात आले आहे.
‘इंडिया’.

• ग्रामीण भागातल्या सर्व व्यक्तींना काम देण्यासाठी ‘श्रम सिद्धी’ योजना............... या राज्य सरकारने सुरु केली
- मध्यप्रदेश.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिनाची (28 मे) संकल्पना............. ही आहे.
- ‘विमेन इन पीसकीपिंग: ए की टू पीस’.

• 2019-20 या आर्थिक वर्षात भारतात झालेली थेट परकीय गुंतवणूक (FDI)
– 49.97 अब्ज डॉलर (13 टक्क्यांनी वाढ).
(भारतात FDI साठीचा सर्वात मोठा स्रोत - सिंगापूर.)

• 26 मे 2020 रोजी जगातला सर्वात उष्ण प्रदेश
- उत्तर भारत (आग्नेय पाकिस्तान सहीत).

• 50 डिग्री सेल्सिअस तापमानासहीत जगातले सर्वात उष्ण ठिकाण
- चूरू (राजस्थान), जेकबाबाद (पाकिस्तान).

• बँक्स बोर्ड्स ब्युरो या संस्थेचे नवीन अध्यक्ष
- राजेश्वरी एस. एन.

• न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवे अध्यक्ष
- मार्कोस प्राडो ट्रोयजो (ब्राझील). (न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी - अनिल किशोरा.)

• जम्मू-काश्मीर आणि ईशान्य राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचे पुनर्रचना करताना,................. या व्यक्तीच्या नेतृत्वात सीमांकन आयोगाची स्थापना 7 मार्च रोजी करण्यात आली
- न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई (आणखी 15 खासदार).

• रस्त्याच्या दोन्ही बाजूनी औषधी वनस्पतींची लागवड करून.............. हे राज्य सरकार 800 कि.मी.चे हर्बल रस्ते विकसित करणार आहे
- उत्तरप्रदेश.

• .............हे राज्य सरकार आपल्या सर्व 6.5 कोटी नागरिकांच्या आरोग्याचा माहिती संग्रह तयार करणार आहे
- कर्नाटक.

• ...............या देशाने जागतिक आरोग्य संघटना (WHO) यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली
– संयुक्त राज्ये अमेरिका.

Online Test Series

10 August 2020

वृत्तपत्रे व संक्षिप्त माहिती

🧩दिग्दर्शन:

🅾श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

🧩समाचार दर्पण:  

🅾२३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

🧩सोमप्रकाश: 

🅾पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

🧩तत्त्वबोधिनी पत्रिका: 

🅾देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

🧩सुलभ समाचार :

🅾केशवचंद्र सेन (१८७८)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Online Test Series

08 August 2020

सर्व स्पर्धा परीक्षा IMP इतिहास प्रश्न


०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

A. लतिका घोष ✔
B. सरोजिनी नायडू
C. कृष्णाबाई राव
D. उर्मिला देवी

०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

A. अक्स-ला-चॅपेलचा तह ✔
B. पॉंडेचेरीचा तह
C. मँगलोरचा तह
D. पॅरिसचा तह

०३. १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

A. खान बहादूर खान
B. कुंवरसिंग ✔
C. मौलवी अहमदुल्ला
D. रावसाहेब

०४. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केल े?

A. १८४९
B. १८५१
C. १८५३ ✔
D. १८५४

०५. १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केल े?

A. फ्री इंडिया
B. नया भारत
C. फ्री प्रेस जर्नल
D. लीडर ✔

०६. १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही ✔
D. वरीलपैकी एकही नाही

०७. खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.

अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय
A. अ-ब-क-ड ✔
B. अ-क-ब-ड
C. क-अ-ब-ड
D. अ-ड-क-ब

०८. विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✔
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर

०९. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

A. भारत सरकारचा कायदा १९३५
B. भारत सरकारचा कायदा १९१९
C. भारत कौन्सिल कायदा १९०९ ✔
D. भारत कौन्सिल कायदा १८९२

१०. मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

A. सहदरण आय्यपन
B. नारायण गुरु ✔
C. हृदयनाथ कुंजरू
D. टी.एम. नायर

१२. बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

A. कथा
B. कादंबरी
C. काव्य
D. नाटक ✔

१३. श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली
B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला.
D. वरील एकही नाही ✔

१४. क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ?

A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे.
C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल.
D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता ✔

१५. बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले ?

A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.
B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. ✔
D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.

१६. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली ?

A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस ✔
B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस
C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
D. अखिल भारतीय किसान सभा

१७. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा.

अ)  श्रीधर परांजपे                १. हैद्राबाद
ब)  डॉ. सिद्धनाथ काणे        २. अमरावती
क)  दादासाहेब खापर्डे           ३. यवतमाळ
ड)  नार्हरीपंत घारपुरे            ४. वर्धा,नागपूर

         अ)  ब)  क)  ड)
   A.   ४   ३    १    २
   B.   ४   ३    २    १ ✔
   C.   १   २   ३    ४
   D.   २   १   ४    ३

१८. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?

A. जी.बी.वालंगकर
B. ज्योतिबा फुले
C. वरील दोघांचाही ✔
D. वरील कोणाचाही नाही

१९. खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत ?

A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले.
B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
D. वरीलपैकी एकही नाही

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ

० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

० महात्मा फुले- पुणे

० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

० गोपाळ हरी देशमुख- पुणे

० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

० साने गुरुजी- पालघर (रायगड)

० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

० संत ज्ञानेश्वर- आपेगाव

०संत एकनाथ- पैठण

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

● जगातल्या महासागराच्या सर्वाधिक ज्ञात खोलीवर तळाशी पोहोचणारी पहिली महिला आणि व्यक्ती कोण?
: कॅथी सुलिव्हन (अमेरिका - 1984 साली)

● संयुक्त संशोधन, उत्पादनांच्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी IFFCO या संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी सामंजस्य करार केला?
: भारतीय कृषी संशोधन परिषद

● युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कोणती संस्था करार करीत आहे?
: राष्ट्रीय खते मर्यादित

● ‘पूनम अवलोकन’ या अभ्यासाद्वारे कोणत्या प्राण्याची संख्या मोजली गेली?
: सिंह

● भारतातल्या डिप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (DSRV) कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले?
: विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)

● चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सुरूवात झालेल्या CBICच्या प्रमुख कार्यक्रमाचे नाव काय?
: तुरंत कस्टम्स

● मर्सेर संस्थेच्या '2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग' अहवालानुसार भारतातले सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराला ठरविण्यात आले?
: मुंबई

● “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संघटनेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक बँक

● यंदा 2020 सालची जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय होती?
: सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते

● भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
: बिस्वजीत दासगुप्ता (वाईस अ‍ॅडमिरल)

● ‘जगनन्ना चेडोडू’ योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?
: आंध्रप्रदेश

● ‘पूर्णपणे डिजिटल’ कार्यभार चालविणारी बांधकाम क्षेत्रातली पहिली संस्था कोण?
: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

● संकेतस्थळ आधारित ‘आरोग्यपथ’ या नावाचे व्यासपीठ कोणत्या संस्थेनी कार्यरत केले?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘कॅप्टन अर्जुन’ रोबोट कोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहे?
: पुणे रेल्वे स्थानक

● आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन कधी साजरा केला जातो?
: 13 जून

● ‘घर घर निगरानी’ मोबाईल अ‍ॅप कोणत्या राज्य सरकारने तयार केले?
: पंजाब

आजच्याच दिवशी कलकत्त्यातील टाऊन हॉल येथून स्वदेशी आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली होती...

🔸7 जुलै 1905 रोजी सिमला येथून लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची योजना घोषित केली.

🔸19 जुलै- सरकारने अधिकृतरीत्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🔸20 जुलै-बंगालचे विभाजन दोन भागात करण्यात आले.

🔸7 ऑगस्ट-फाळणी अंमलात येण्याच्या आधीच देशभरात वंगभंग व स्वदेशी चळवळ सुरू.

🔸16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली व बंगालमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली.

🔸बंगाल प्रांताच्या विभाजनाची जबाबदारी ही पूर्णत: कर्झनची असली तरी मूळ कल्पना मात्र त्याची नव्हती.

👉सदरील फाळणीची योजना ही विल्यम वार्ड कल्पनेनुसार बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर सर अँड्रयू फ्रेजर (फाळणीच्या योजनेचा जनक) याने आखली होती...

🔸फाळणीचे कारण काय दर्शविले- प्रशासकीय सीमांचे पुननिर्धारण...

🔸 फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुसऱ्या आयर्लंडमध्ये होईल असा इशारा निसंदिग्ध शब्दात कृष्णकुमार मित्रा यांनी 'संजीवनी' मधून दिला.

🔸ही स्वदेशी चळवळ प्रामुख्याने बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवण्यासाठी सुरू करण्यात आली.

🔸जमीनदार,शेतकरी,कामगार,स्त्रिया,विद्यार्थी हा वर्ग या चळवळीत सहभागी झाला परंतु या चळवळीची उणीव म्हणजे यात मुस्लिम गटाचा विशेष करून मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही.

वंगभंग आंदोलन-
🔸16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने 'राष्ट्रीय शोक दिन' म्हणून पाळला.स्वदेशीचा पुरस्कार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली.

🔸बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतील 'वंदे मातरम' हे गीत आंदोलकांच्या परवलीचा शब्द बनले. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा वर बहिष्कार टाकला.

🔸डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांनी 'बंगाल केमिकल्स' हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला.

🔸या स्वदेशी चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी,कृष्णकुमार मित्रा (संजीवनी वृत्तपत्राचे संपादक),आनंद मोहन बोस,गुरुदास बॅनर्जी,रवींद्रनाथ टागोर यांनी केले.

🔸महाराष्ट्र व पंजाब मधील जनतेनेही या चळवळीत साथ दिली.
🔸1905 च्या बनारस अधिवेशनात (अध्यक्ष-गोखले) बंगालच्या फाळणीचा तीव्र निषेध.

🔸1906 च्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट असल्याचे सांगत स्वराज,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यास मंजुरी दिली.
अध्यक्षीय भाषणात दादाभाईंनी 'चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा' असा संदेश दिला.

👉बंगालची फाळणी रद्द करण्या संबंधीचा ठराव ढाक्याचा नवाब ख्वाजा आतिकुल्ला यांच्याकडून मांडला गेला.

🔸लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुञी कार्यक्रम भारतीयांना दिला.

🔸पुढे वंगभंग विरोधी आंदोलन राष्ट्रव्यापी बनल्याने 12 डिसेंबर 1911 (लक्षात ठेवायला सोप्प 😊 12-12-11) रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.

सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty)

◾️देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

🔰 निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :

◾️दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.

🔰 राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

वारे व त्यांचे प्रकार

🔥दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. 

🔥दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात

🔥भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. 

🔥कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

❗️ गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties)

🔥 ४०° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना ‘गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties) असे म्हणतात. 

❗️ खवळलेले पन्‍नास’ (Furious Fifties)

🔥५०° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना यां ‘खवळलेले
पन्‍नास’ (Furious Fifties) म्हणतात.

❗️किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)

🔥६०°दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना यां ‘किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)म्हणतात.

वातावरणाचे थर -


वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते...

👉 वातावरणाचे मुख्य थर (प्रकार)

🔸तपांबर -भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर.याची सरासरी जाडी ११ किमी.या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात.पाऊस,वारे,ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात...

🔸तापस्तधी-तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय.उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते...

🔸स्थितांबर-तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय.या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण नसतात व हवा शुष्क असते...

🔸स्थितस्तब्धी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तब्धी होय.या थरातील तापमान स्थिर असते.या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो.हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो...

🔸मध्यांबर-स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय.या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते...

🔸मध्यस्तब्धी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तब्धी होय...

🔸दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय.या थरात उंचीनुसार तापमान वाढते...

🔸आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे.या थरात उंचीनुसार तापमान वाढते.या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात...

🔸बाह्यांबर - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांबर होय.भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे.या थरातील विविध वायूंचे अणू,रेणू,पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात..