१२ ऑगस्ट २०२०

भिल्लांचा उठाव

  कालखंड :- 1817 ते 1857

  नेतृत्व :- चिलनाईक, काजीसिंग

  मुख्य ठिकाण :- अजिंठा, सातमाळा, सातपुडा

🖍 यांची वस्ती अरवली, विंध्य, सह्याद्री व सातपुडा या पर्वतरांगात असून सर्वात जास्त वस्ती खानदेशात असे व यावेळी तेथे कलेक्टर हा कॅप्टन ब्रीज हा होता.

🖍  यावेळी त्यांनी अजिंठा, सातमाळा या भागात उठाव केले.

🖍  1857 मध्ये काजीसिंग (खर्जासिंग) याच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी खानदेशात उठाव केले व सातपुडा भागात शंकरशहाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला.

🖍  तसेच भिमा नाईक, भागोजी नाईक, दौलतसिंग, कुजरसिंग नाईक, नेवशा नाईक यांच्या नेवृत्वाखाली 1870 पर्यंत भिल्ल हे इंग्रजांविरुध्द लढा देत होते.

Online Test Series

११ ऑगस्ट २०२०

ओझोन चे संरक्षण कवच

🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो.

🔰ओझोन  वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे  सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे.

🔰सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही
किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील  सजीवांचे रक्षण होते.

🔰वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड  करण्यासाठी वापरला जाणारे
📌 क्लोरोफ्लुरोकार्बन्स तसेच 
📌 कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास  ओझोनच्या थराचा नाश होतो. 

🔰ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी  १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’  म्हणून मानला जातो.

काही समानार्थी म्हणी

📔आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
📒आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
📕कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
📗साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
📘कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
📙काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
📓करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
📔खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
📒खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
📕आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
📗गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
📘काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
📙घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
📓चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
📔जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
📒पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
📕नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
📗नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
📘बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
📙पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
📓वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
📕वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   

स्नायू


स्नायूंची रचना

🌸स्नायू (स्नायू) सह (संकोचनक्षम) Constrictive प्राणी येत मेदयुक्त आहे. 

🌺त्यामध्ये सेलचे आकार बदलणारी सूत्रे आहेत. पेशी निर्मिती स्नायू मेदयुक्त करण्यासाठी स्नायू मेदयुक्त संपूर्ण म्हणतात अवयव गती निर्माण. 

🌺पेशी जी या ऊती बनविताततेथे आकार आणि डिझाईन्सचे विशेष प्रकार आहेत. 

🌺त्यांच्यात चिरडण्याची क्षमता आहे. तीन प्रकारचे स्नायू अस्तर, नॉनलाइनर आणि हृदय आहेत.

🌺 मानवी शरीरात 40 टक्के स्नायू. मानवी शरीरात 639 स्नायू आढळतात. 

🌺यापैकी 400 स्नायू आहेत. शरीरातील बहुतेक स्नायू मागच्या बाजूला आढळतात.

🌺 मागे 180 स्नायू आहेत. तीन प्रकारचे स्नायू आहेत.

🌺 ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू आणि हृदय स्नायू.

परावर्तन


नमुनेदार प्रतिबिंबांचे रेखाचित्र

प्रतिबिंब दोन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते: स्पेक्युलर रिफ्लेक्शन आणि डिफ्यूज रिफ्लेक्शन्स 

. विशिष्ट प्रतिबिंब मिररसारख्या पृष्ठभागाच्या चमकांचे वर्णन करते, जे प्रकाश, सोप्या आणि अंदाजानुसार प्रतिबिंबित करते. 

हे प्रतिबिंबित प्रतिमांच्या निर्मितीस अनुमती देते जे अंतराळातील वास्तविक ( वास्तविक ) किंवा एक्स्ट्रोपोलेटेड ( आभासी ) स्थानाशी संबंधित असू शकते .

 डिफ्यूज प्रतिबिंब कागदावर किंवा रॉकसारख्या चमकदार नसलेल्या पदार्थांचे वर्णन करते. 

या पृष्ठभागावरील प्रतिबिंबांचे वर्णन केवळ आकडेवारीनुसार केले जाऊ शकते, साहित्याच्या सूक्ष्म रचनांवर अवलंबून प्रतिबिंबित प्रकाशाचे अचूक वितरण. 

लम्बर्टच्या कोसाइन कायद्याद्वारे बरेच डिफ्यूज रिफ्लेक्टर वर्णन केले आहेत किंवा अंदाजे केले जाऊ शकतातजे कोणत्याही कोनातून पाहिले असता समान चमकदार पृष्ठभागांचे वर्णन करते . 

चमकदार पृष्ठभाग सट्टेबाज आणि डिफ्यूज दोन्ही प्रतिबिंब देऊ शकतात.

वर्ग आणि वर्गमूळ


(65)2 = 4225 संख्येच्या शेवटी जर 5 असेल तर वर्गसंख्येच्या शेवटी 25 येतात व दशक स्थानाचा अंक व त्या पुढचा अंक यांच्या गुणाकारांची संख्या लिहावी.

उदा. (65)2 =4225 = (शेवटी 25 लिहून 6 च्या पुढचा अंक 7 घेऊन 6 × 7 = 42 लिहावे).

 दोन अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग काढताना :-

उदा. (42)2 =(a+b)2 =a2 +2ab + b2 या सूत्राचा वापर करून कोणत्याही संख्येचा वर्ग काढता येतो.

(42)2

यात a=4,b=2

 (42)2 = (40+2)2=1600+2 (40×2)+4

=1600+160+4 = 1764   किंवा

22 = 4 एककस्थानी 4 लिहा.

2(4×2) = 16 चे 6 हातचा 1,

42 चा वर्ग 16   16+1 = 17, याप्रमाणे सूत्रानुसार

    :: √1764 = 42

 लक्षात ठेवा :

1) 1 व 9 च्या वर्गाच्या एककस्थानी 1 असते.

2) 3 व 8 च्या वर्गाच्या एककस्थानी 4 असते.

3) 3 व 7 च्या वर्गाच्या एककस्थानी 9 असते.

4) 4 व 6 च्या वर्गाच्या एककस्थानी 6 असते.

5) 5 च्या वर्गाच्या एकक स्थानी 5 असते.

उदा.√5329 =73 या उदाहरणात एककस्थानी 9 हा अंक आहे. म्हणून वर्ग मुळात 3 किंवा 7 हे अंक येतील.

53 ही संख्या 7 च्या वर्गापेक्षा मोठी आहे. म्हणून वर्गमूळ 73 किंवा 79 असले पाहिजे.

परंतु 70 चा वर्ग = 4900 व 80 चा वर्ग = 6400 आहे. 5329 ही संख्या 4900 ला जवळची, म्हणून 73 हे वर्गमूळ किंवा (75)2= 5625 यापेक्षा 5329 हे लहान आहे.

म्हणून √5329 = 73

नमूना पहिला –

उदा.

खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?

0.196

19.6

1.96

0.00196

उत्तर : 1.96

ल्कृप्ती :-

पूर्ण वर्गासाठी अपूर्णांकातील स्थळांचे स्थान सम पाहिजे.

नमूना दूसरा-

उदा.

खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल ?

**304

*50

7*38

*765

ल्कृप्ती :-

कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1,4,5,6,9,0, हे अंक येतात व संख्येच्या एकक स्थानी 5 असेल. तर संख्येचा दशकस्थानी 2 अंक येतो व संख्येच्या एकेक स्थानी 0 असेल; तर संख्येत शेवटी 2 च्या पटीत शून्य येतात.

नमूना तिसरा –

उदा.

√(26)2-(10)2 =?

4

16

24

48

उत्तर : 24

ल्कृप्ती :-

a2-b2 = (a+b)(a-b) √(26+10)×(26-10)

= √36×16 = 6×4 = 24

नमूना चौथा –

उदा.

81×64=5184, ::√5184=?

62

72

68

78

उत्तर : 72

सूत्र :-

√a2 × b2 = a×b  यासूत्राचा वापर √5184 = √81×64

= √92 × 82 = 9×8

= 72

नमूना पाचवा –

उदा.

√0.0289 =?

1.7

0.17

17

0.017

उत्तर : 0.17

नियम- वर्गमुळात दशांशस्थळे निम्मी होतात

:: √289=17

:: √2.89=1.7  आणि :: √0.0289=0.17

:: √0.000289=0.017

नमूना सहावा-

उदा.

√1.44/x=0.1;  :: x=?

1.44

12

144

14.4

उत्तर : 144

स्पष्टीकरण :-

√1.44/x

=0.1 1.44/x

=(0.1)2 1.44/x

=(0.01)    

:: x= 1.44/0.01=144  

नमूना सातवा –

उदा.  

√21+√10+√36=?

6

2

5

7

उत्तर : 5

स्पष्टीकरण :-

√21+√10+√36

= √21+√10+6

=√21+√16

= √21+4

= √25

=5

IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019

स्वित्झर्लंडच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेकडून ‘IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2019’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल देशात प्रतिभावंत व्यक्तित्व तयार करण्यासाठीच्या हेतूने गुंतवणूक व विकास, मागणी आणि तत्परता या तीन मुख्य श्रेणीमध्ये देशांनी केलेल्या कामगिरीवर आधारित आहे.

▪️ठळक बाबी

- टॅलेंट रँकिंगमध्ये स्वित्झर्लंड अग्रस्थानी आहे. घटक पातळीवर, गुंतवणूक व विकास तसेच तत्परता यात त्याचा द्वितीय क्रमांक आणि मागणीमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आहे.

- यादीतले प्रथम दहा देश – स्वित्झर्लंड, डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रिया, लक्झेमबर्ग, नॉर्वे, आईसलँड, फिनलँड, नेदरलँड्स, सिंगापूर.

- यादीतल्या पहिल्या दहा राष्ट्रांच्या बाहेर, सर्वात मोठी वाढ तायवान, चीन या देशांनी नोंदवलेली आहे आणि ते 7 स्थानांनी वरती चढत 20 व्या स्थानावर आले आहेत. तसेच लिथुआनिया 8 स्थानांची उडी घेत 28 व्या क्रमांकावर तर फिलिपिन्स 6 स्थानांची उडी घेत 49 व्या क्रमांकावर आणि कोलंबिया 6 स्थानांची उडी घेत 54 व्या क्रमांकावर आहे.

- कॅनडाने अधिक तीव्र घसरणीचा अनुभव घेतला आहे आणि ते 7 स्थानांनी खाली घसरत 13 व्या क्रमांकावर आले आहे. तर पोर्तुगाल गेल्या वर्षीच्या 17 व्या स्थानावरून यावर्षी 23 व्या स्थानावर आले आहे, जापान 6 स्थानांनी खाली येत 35 व्या स्थानी, जॉर्डन 10 स्थानांनी खाली येत 51 व्या स्थानी, टर्की 7 स्थानांनी खाली येत 58 व्या स्थानी आहे.

- भारत 53 व्या स्थानावरुन 59 व्या स्थानावर घसरला आहे. मुख्यताः मागणीच्या घटकाच्या संदर्भातल्या कामगिरीच्या परिणामामुळे भारताची घसरण झाली. प्रदूषणाच्या (कण-स्वरुपात असलेल्या प्रदूषणाचा संपर्क) उपाययोजनेच्या बाबतीत भारताचा क्रमांक 61 वा आहे. जीवनमानाची गुणवत्ता या बाबतीत 51 व्या स्थानी आहे, तर अर्थव्यवस्थेत बुद्धिमत्तेतली घट यात दिसून येणारे नकारात्मक परिणाम या बाबतीत 31 व्या स्थानी आहे आणि प्रतिभा आकर्षित करणे व टिकवून ठेवण्याचा प्राधान्यक्रम या बाबतीत 41 व्या स्थानी घसरले. कामगारांना प्रेरणा या बाबतीत 35 व्या स्थानी अश्या किंचित घसरणीमुळे परदेशी अति-कुशल व्यक्तींना (40 वा क्रमांक) आकर्षित करण्यासाठी योग्य वातावरण होते. प्रति विद्यार्थी शिक्षणावर होणारा एकूण सार्वजनिक खर्च आणि शिक्षणाची गुणवत्ता राखण्याबाबत केलेल्या उपाययोजना या बाबतीत भारताचा 62 वा क्रमांक आहे.

- एकूण 39.12 गुणांसह भारत 59 व्या स्थानी आहे. त्याच्याखाली मेक्सिको, ब्राझील, व्हेनेझुएला आणि शेवटी मंगोलिया या देशांचा क्रम लागतो आहे. BRICS देशांमध्ये भारत चीन (42 वा), रशिया (47 वा) आणि दक्षिण आफ्रिका (50 वा) या देशांच्याही मागे आहे.
———————————————————————————

एकमान पद्धत विषयी संपूर्ण माहिती


(अ) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?

252 रु.

336 रु.

168 रु.

420 रु.

उत्तर : 252 रु.  

स्पष्टीकरण :-दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252

नमूना दूसरा –

उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?

16

24

27

36

उत्तर : 27

स्पष्टीकरण :-एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना

नमूना तिसरा –

उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?

26

121

84

169

उत्तर : 169

क्लृप्ती :-एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे.

नमूना चौथा –

उदा. 60 चा 2/5 =?

12

24

18

30

उत्तर : 24

क्लृप्ती :-60 चा 2/5 = 60×2/5 = 12×2 = 24  किंवा1/5 = 2/10 आणि 2/5 = 4/10, 60 चा = 1/10 आणि 60 चा 4/10 = 6×4

नमूना पाचवा –

उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?

5

3

2

8

उत्तर : 3

क्लृप्ती :-80 चा 3/5 = 80×3/5 = 48, 60 चा ¾ = 60×3/4 = 45,उदाहरणानुसार 48-45 = 3

नमूना सहावा-

उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?

200

180

210

240

उत्तर : 240

स्पष्टीकरण :-400 चा 3/8 = 400×3/8 = 50×3 = 150 आणि क्ष चा 5/8 = 150:: क्ष = 150×8/5 = 240 किंवा5 भाग = 400:: 3 भाग = 400 × 3/5 = 240 किंवा400×3/8×8/5 = 240

नमूना सातवा –

उदा. 350 लीटर पाणी मावणार्‍या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?

3.15 ली.

200 ली.

250 ली.

245 ली.

उत्तर : 250 ली.

स्पष्टीकरण :-350 चा 2/7 = 50×2 = 100 उदाहरणानुसार 350-100 = 250 लीटर

नमूना आठवा –

उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?

50

60

120

75

उत्तर : 60

स्पष्टीकरण :-1/3+1/4=4/12+3/12=7/12;1-7/12=12/12-7/12=5/12=25 एकर,:: एकूण शेत = 5/12  चा व्यस्त 12/5 ने 25 ला गुणणे,यानुसार 12/5×25=60

 (ब) एकमान पद्धत

नमूना पहिला –

उदा. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रु. तर एका खुर्चीची किंमत किती?

15 रु.

150 रु.

105 रु.

140 रु.

उत्तर : 105 रु.

स्पष्टीकरण :-अनेकांवरून एकाची किंमत काढताना भागाकार करावा व एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा.यानुसार 1680 ÷ 16 = 105

नमूना दूसरा –

उदा. 12 सेकंदांत 1 पोळी लाटून होते; तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

250

150

125

180

उत्तर : 150

स्पष्टीकरण :-60 सेकंद = 1 मिनीट, 12 सेकंदांत 1 पोळी यानुसार60 सेकंद = 1 मिनीट = 5 पोळ्या:: 30 मिनिटात = 5×30 = 150अर्धातास = 30 मिनीटे:: 60/12 × 30 = 150

चालू घडमोडी


• 22 मे रोजी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ......................या वाहनांसाठी L7 श्रेणीतल्या उत्सर्जन नियमांसाठी अधिसूचना जाहीर केली
- BS-6 वाहन.

• जागतिक बँकेचे नवे उपाध्यक्ष - कारमेन रेनहार्ट. (जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष
- डेव्हिड मालपास.)

• 2020 सालाचा ‘यूनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी .................. यानिवडलेला भारतीय शांतीदूत सैनिकाची निवड करण्यात आली आहे.
- मेजर सुमन गवनी.

• भारतातील ................ या राज्याने क्रिडा क्षेत्राला उद्योगाचा दर्जा प्रदान दिला 
- मिझोरम.

• खेळाडूंचे व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी.............. या राज्याच्या क्रिडा प्राधिकरणाने टाइम्स सेंटर फॉर लर्निंग लिमिटेड (TCLL) सोबत सामंजस्य करार केला
– गुजरात क्रिडा प्राधिकरण.

• ................... या राज्याने कारखाने कायद्यांतर्गत कामाचे तास 8 तास वरुन वाढवून 12 तासांपर्यंत करणारे भारतातील पहिले राज्य ठरले
:-राजस्थान.

• ............ यांच्या अध्यक्षतेखाली 27 मे ते 29 मे या कालावधीत आणि जून 2020 महिन्यात ‘आर्मी कमांडर’ ची परिषद दोन टप्प्यांत आयोजित केली जाणार आहे
- भारतीय भुदलाचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे.

• सत्तापालट झाल्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त टर्की देशाचे राष्ट्रपती रेसेप तैयिप एर्दोगन यांनी ...............या शहराच्या जवळ पाण्यातले लोकशाही व स्वातंत्र्य बेटाचे उद्घाटन केले
- इस्तंबूल.

• भारताने युगांडा या आफ्रिका देशातील  जिन्जा जिल्ह्यात ‘मिलिटरी वॉर गेम सेंटर’ उभारण्यासाठी मदत केली आहे, त्याचे नाव -------------- हे ठेवण्यात आले आहे.
‘इंडिया’.

• ग्रामीण भागातल्या सर्व व्यक्तींना काम देण्यासाठी ‘श्रम सिद्धी’ योजना............... या राज्य सरकारने सुरु केली
- मध्यप्रदेश.

• 2020 साली आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांतीदूत दिनाची (28 मे) संकल्पना............. ही आहे.
- ‘विमेन इन पीसकीपिंग: ए की टू पीस’.

• 2019-20 या आर्थिक वर्षात भारतात झालेली थेट परकीय गुंतवणूक (FDI)
– 49.97 अब्ज डॉलर (13 टक्क्यांनी वाढ).
(भारतात FDI साठीचा सर्वात मोठा स्रोत - सिंगापूर.)

• 26 मे 2020 रोजी जगातला सर्वात उष्ण प्रदेश
- उत्तर भारत (आग्नेय पाकिस्तान सहीत).

• 50 डिग्री सेल्सिअस तापमानासहीत जगातले सर्वात उष्ण ठिकाण
- चूरू (राजस्थान), जेकबाबाद (पाकिस्तान).

• बँक्स बोर्ड्स ब्युरो या संस्थेचे नवीन अध्यक्ष
- राजेश्वरी एस. एन.

• न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवे अध्यक्ष
- मार्कोस प्राडो ट्रोयजो (ब्राझील). (न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवे उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी - अनिल किशोरा.)

• जम्मू-काश्मीर आणि ईशान्य राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचे पुनर्रचना करताना,................. या व्यक्तीच्या नेतृत्वात सीमांकन आयोगाची स्थापना 7 मार्च रोजी करण्यात आली
- न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई (आणखी 15 खासदार).

• रस्त्याच्या दोन्ही बाजूनी औषधी वनस्पतींची लागवड करून.............. हे राज्य सरकार 800 कि.मी.चे हर्बल रस्ते विकसित करणार आहे
- उत्तरप्रदेश.

• .............हे राज्य सरकार आपल्या सर्व 6.5 कोटी नागरिकांच्या आरोग्याचा माहिती संग्रह तयार करणार आहे
- कर्नाटक.

• ...............या देशाने जागतिक आरोग्य संघटना (WHO) यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली
– संयुक्त राज्ये अमेरिका.

Online Test Series

१० ऑगस्ट २०२०

वृत्तपत्रे व संक्षिप्त माहिती

🧩दिग्दर्शन:

🅾श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

🧩समाचार दर्पण:  

🅾२३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

🧩सोमप्रकाश: 

🅾पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

🧩तत्त्वबोधिनी पत्रिका: 

🅾देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

🧩सुलभ समाचार :

🅾केशवचंद्र सेन (१८७८)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Online Test Series

०८ ऑगस्ट २०२०

सर्व स्पर्धा परीक्षा IMP इतिहास प्रश्न


०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

A. लतिका घोष ✔
B. सरोजिनी नायडू
C. कृष्णाबाई राव
D. उर्मिला देवी

०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

A. अक्स-ला-चॅपेलचा तह ✔
B. पॉंडेचेरीचा तह
C. मँगलोरचा तह
D. पॅरिसचा तह

०३. १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

A. खान बहादूर खान
B. कुंवरसिंग ✔
C. मौलवी अहमदुल्ला
D. रावसाहेब

०४. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केल े?

A. १८४९
B. १८५१
C. १८५३ ✔
D. १८५४

०५. १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केल े?

A. फ्री इंडिया
B. नया भारत
C. फ्री प्रेस जर्नल
D. लीडर ✔

०६. १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही ✔
D. वरीलपैकी एकही नाही

०७. खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.

अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय
A. अ-ब-क-ड ✔
B. अ-क-ब-ड
C. क-अ-ब-ड
D. अ-ड-क-ब

०८. विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✔
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर

०९. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

A. भारत सरकारचा कायदा १९३५
B. भारत सरकारचा कायदा १९१९
C. भारत कौन्सिल कायदा १९०९ ✔
D. भारत कौन्सिल कायदा १८९२

१०. मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?

A. सहदरण आय्यपन
B. नारायण गुरु ✔
C. हृदयनाथ कुंजरू
D. टी.एम. नायर

१२. बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?

A. कथा
B. कादंबरी
C. काव्य
D. नाटक ✔

१३. श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली
B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला.
D. वरील एकही नाही ✔

१४. क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ?

A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे.
C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल.
D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता ✔

१५. बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले ?

A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.
B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. ✔
D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.

१६. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली ?

A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस ✔
B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस
C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
D. अखिल भारतीय किसान सभा

१७. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा.

अ)  श्रीधर परांजपे                १. हैद्राबाद
ब)  डॉ. सिद्धनाथ काणे        २. अमरावती
क)  दादासाहेब खापर्डे           ३. यवतमाळ
ड)  नार्हरीपंत घारपुरे            ४. वर्धा,नागपूर

         अ)  ब)  क)  ड)
   A.   ४   ३    १    २
   B.   ४   ३    २    १ ✔
   C.   १   २   ३    ४
   D.   २   १   ४    ३

१८. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?

A. जी.बी.वालंगकर
B. ज्योतिबा फुले
C. वरील दोघांचाही ✔
D. वरील कोणाचाही नाही

१९. खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत ?

A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले.
B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
D. वरीलपैकी एकही नाही

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...